प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या

दिव्य- वहिमी किंवा आरोपी इसमाकडून धोक्याची अशी कांहीं भौतिक गोष्ट करवून ख-याखोट्याचा निर्णय करण्याच्या पद्धतीला दिव्य म्हणतात. रोमन कायदेपद्धतींत हा प्रकार मुळींच नव्हता; ग्रीकांनां माहीत होता पण न्यायदानांत त्याचा तो उपयोग करीत नसत. चिनी व अमेरिकन इंडियन लोकांत या पद्धतीची वाढ झाली नाहीं. कुराणामध्यें दिव्याचा स्पष्ट निषेध केला आहे. दिव्यांचा विशेष प्रचार हिंदु, आफ्रिकन व टयुटॉनिक या लोकांतच आढळतो. आफ्रिकेंत विषदिव्य विशेष रूढ आहे.

सु मे रो बा बि लो नि य न.- या प्राचीन संस्कृतीच्या लोकांत कायदेशास्त्र बरेंच वाढ पावलें असल्यामुळें दिव्यांनां महत्त्व नव्हतें पण मानवी पुरावा हतबल ठरल्यास एका जलदिव्याचा उपयोग करण्याबद्दल खमुरब्बीच्या कोडांत उल्लेख आहे. एखाद्या नदींत उडी घालण्यास सांगून त्यांतून आरोपी वांचल्यास त्याच्यातर्फे निकाल देत.

रो म न.- रोमनकायद्यांत दिव्याला स्थान नव्हतें. तथापि प्राचीनतम रोमन समाजांत दिव्यें करीत असत. त्यांपैकीं अग्नींतून चालत जाणें हा एक प्रकार असे. जादूनें भारलेली भाकर खावयास दिल्यावर ती ज्याच्या घशांत अडकेल तो खरा गुन्हेगार होय असा एक दिव्याचा प्रकार असे तिसरा प्रकार द्वंद्वयुद्धानें करण्याची चाल यूरोपांत ख्रिस्तोत्तार १४।१५ व्या शतकापर्यंतहि फार रूढ होती आणि तिचा थोडाफार अवशेष अद्यापहि सांपडतो.

इ रा णी.- अवेस्ता ग्रंथांत सुमारें ३३ प्रकारचीं दिव्यें दिलीं आहेत. त्यांत उष्ण व थंड अशा दोन जाती आहेत. अग्नि, उकळणारें पाणी, वगैरे उष्ण आणि विषप्राशन वगैरे थंड दिव्यांचे प्रकार होत.

मु सु ल मा नी.- कुराणपूर्वकालीन अरबांत अग्निदिव्य प्रचलित होतें. त्याकरितां तरवार, चमचा, किंवा दुसरा एखादा धातूचा जिन्नस खूप तापवीत व तो आरोपींकडून जिभेंनें चाटवीत. ज्याची जीभ फार भाजेल तो हरला असें समजत. जादूनें भारलेल्या जागेंत उभें करून शपथ घ्यावयास लावणें हा दिव्याचा दुसरा प्रकार असे. कुराणांत ह्या प्रकारांचा निषेध असल्यामुळें तदनंतर दिव्यें बंद झालीं. मात्र जारकर्तींत आणि खुनांत शपथ करविण्याची पद्धत अद्याप चालू आहे.

हिं दु- इंग्रजी होण्यापूर्वी मराठी व मुसुलमानी राज्यांत व तत्पूर्वीहि दिव्य करण्याचा प्रघात होता. तंटाभांडणाचा निकाल या दिव्यपद्धतीनें होई. वाक्पारूष्य, दंडपारुष्य, व स्तेय इत्यादि व्यवहारनिर्णयाच्या बाबतींत दिव्य करीत.

दिव्य केव्हां करावयाचें याबद्दल नियम असे. ज्यावेळीं लेखी व तोंडीं पुरावा मुळींच मिळत नसेल त्यावेळीं मात्र दिव्य करावें, नाहीं तर करूं नये (याज्ञवल्क्य स्मृति, अ. २ श्लो. २२). तसेंच ज्या ग्रामसभेपुढें निर्णय होई तींतील गोतसभासदांची खात्री जर नुसत्या तोंडी पुराव्यावरून होत नसेल तर दिव्य करीत. स्मृतिकारहि असेंच म्हणजे, मानुषप्रमाणांचा सर्वथा अभाव असल्यास मग दिव्य करावें, म्हणतात. (याज्ञवल्क्य स्मृ. अ. २२).

या दिव्याचे प्रकार अग्नि, जल, तुला, विष इत्यादि असत. ऋग्वेद (१.१५४,४), पंचविंश ब्राह्मण (१४.६,६), छांदोग्य उपनिषद (६.१६) व कौशिक सूत्र (५२.८) यांत अग्निदिव्याचा आणि शतपथ ब्राह्मण (११.२,७) यांत तूलादिव्याचा उल्लेख आहे. आपस्तंबाखेरीज इतर धर्मसूत्रांत दिव्यासंबंधीं मुळींच उल्लेख नाहीं. मनुस्मृतींत दिव्यांचा उपयोग व्यवहारंनिर्णयांत करण्याबद्दल स्पष्ट सांगितलें आहे व तेथपासून दिव्यांचे अनेक प्रकार रूढ असलेले आढळतात. मराठी ऐतिहासिक कागदपत्रांतील कांही माहिती येथें देतों.

(१) दिव्य करणाराचे हात प्रथम साबणानें धुवून नखें काढीत, नंतर पिशव्यांत हात घालून त्या बंद करून त्यांवर मोहोर करून तीन रात्रीं दिव्य करणा-यास अटकेंत ठेवीत. पिशव्यांत हात घालण्यापूर्वी हातांवरील सर्व खाणाखुणा टिपून ठेवीत. चौथ्या दिवशीं देवळाच्या अगर दिव्य करावयाच्या ठिकाणीं सात मंडळें करावयाचीं. एक लोखंडाचा लिंबाएवढा गोळा तापवून लाल करावयाचा. दिव्य करणाराच्या हातांवर पिंपळाचीं पानें द्यावयाचीं. त्यांवर थोडें तूप घालून तो तापविलेला गोहा लोहारानें सांडसांत धरून ठेवावयाचा. मग दिव्य करणारानें तो गोळा हातांत घेऊन तीं सात मंडळे ओलांडून पुढें गवत ठेविलेल्या खव्यांत तो टाकावयाचा. गोळा टाकल्यावर त्या गवतानें पेट घेतला पाहिजे. नंतर फिरून पिशव्यांत हात घालून, त्यांवर मोहोर करून पुन्हां तीन रात्र दिव्य करणारास अटकेंत ठेवावयाचें. नंतर पिशव्या सोडून हात तपासून पहावयाचे. हातांवर फोड दिसल्यास तो दिव्य करणारा व तो ज्या पक्षाचा असेल तो पक्ष खोटा ठरला असें समजण्यांत येई. फोड वगैरे न आढळल्यास दिव्य करणारा पक्ष खरा समजला जाई.

(२) तप्तमहादिव्य अथवा रवा काढणें:- तूप अगर तेल एका ताम्हनांत (अथवा कढईंत) तापवावयाचें व त्यांत एक ते तीन माशांचा सोन्याचा, रुप्याचा किंवा तांब्याचा तुकडा (रवा) टाकावयाचा दिव्य करणारानें सात मंडळें चालत येऊन त्या तापलेल्या तुपांतील अगर तेलांतील तो रवा काढावयाचा. हातांस इजा झाली नाहीं असें दिसल्यास दिव्य करणारा खरा झाला असें समजत. तुकडा काढावयाच्या पूर्वी हातांसंबंधीं तरतुदी वर सांगितल्याप्रमाणें करीत.

(३) देवाचा भंडारा व निर्माल्य डोक्यावर घेऊन शपथक्रिया करणें.

(४) कृष्णा-गोदा वगैरेंसारख्या नदींत उभें राहून शपथ घेणें.

(५) एका पोत्यांत दिव्य करणारास बांधून तें पोतें ठराविक पूज्य मानिलेल्या झाडावर बांधून शपथ घेवविणें व शपथ घेतल्यावर पोतें खालीं ढकलून देणें. मेल्यास तो खोटा व वांचल्यास खरा.

(६) एका ठरलेल्या ठिकाणीं तेथील देवाची पूजाअर्चा करीत राहणें. ठराविक मुदतींत, रहाणा-याच्या घरास आग लागली, जनावर चोरीस गेलें, कोणी माणूस मेलें किंवा खुद्द तो राहणारा स्वप्नांत भिऊन ओरडला तर त्यास क्रिया लागली म्हणजे तो खोटा झाला असें ठरवीत.

(७) वादीप्रतिवादींकडून देवापुढें दिवे लावावयाचे. दोन्हीं दिव्यांत तेल सारखें असावयाचें; असें असतां ज्याचा दिवा विनाकारण आधीं विझेल तो खोटा झाला.

(८) वादीप्रतिवादी यांनां तीर्थांत (अगर पवित्र नदींत) उभे करून जो खरा असेल त्याचा हात धरून साक्षीदारानें त्यास बाहेर काढणें. तसें करतांना अडखळून पाण्यांत पडल्यास साक्षीदारानें खोटी साक्ष देऊन खोट्या माणसास पुढें आणिलें असें ठरे.

(९) मस्तकावर गाईचें चामडें घेऊन व उजव्या हातीं तीर्थाच्या पाण्यानें भरलेला चंबू घेऊन शपथ घेणें. चंबू जड होऊन खालीं पडल्यास (एका व्यवहारांत त्या चंबूंत एकाएकीं सर्प निघाला होता. वाड भा. ७ पृ. १८०) तो खोटा ठरे.

दिव्य करण्याचीं ठिकाणें पुढीलप्रमाणें होतीं: पैठण येथील एकनाथाचें देऊळ; रांजणगांव (निजामशाही) येथील मशीद; खेडशिवापूर येथील महादेवाच्या देवळासमोरील पिंपळाचें झाड; कर्हाड येथील कृष्णाकोयना संगम; माहुली येथील कृष्णावेंणासंगम. रहिमतपूरचें कृष्णाकांठचें शिवनाथाचें देऊळ; निंब (सातारा जिल्हा) येथील सदानंद गोसाव्याचा मठ; पंढरपूरच्या सभामंडपांतील रंगशिळा; (खंडोबाच्या) पालीचें (सातारा जिल्हा) खंडेरावाचें मंदीर (येथें अद्यापि वर सांगितलेलीं सात मंडळें व गवताचा खव आहे); जेजुरीच्या देवळांतील कांसव; इ. इ.

(संदर्भग्रंथ- एन्साय० ऑफ रिलिजन ऍंड एथिक्स; मनुस्मृति, अ. ८; नारदस्मृति, अ. १; आपस्तंबस्मृति २. २९; बृहस्पतिस्मृति २.३; मिताक्षरीटीका; वाड, भा. २.)

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .