प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

घटककाम न करणारेंविभाग पंधरावा: तपून - धमन्या

दुधदुभतें- दु ध दु भ त्या सं बं धीं ऐ ति हा सि क मा हि ती.- सर्व जनावरांत गाय व बैल हे फार प्राचीन कालापासून माणसाळलेले प्राणी आहेत. आपल्या भरतखंडांतील सर्वांत जुन्या अशा वेदवाड्मयांतील निरनिराळ्या ऋचांतून गाय, दूध, दहीं, तूप वगैरेंच्या संबंधी जे उल्लेख आहेत त्यांवररून वेदवाङमय ज्यावेळीं तयार झालें त्या वेळेपूर्वी गाय, बैल वगैरेसंबंधीं चांगली माहिती होती व दुभतें प्रचारांत होतें हें उघड आहे. त्यावरून वेदकालीन दुभत्यासंबंधींचीं माहिती व त्या वेळीं आर्यांच्या मनांत गाईविषयीं किती पूज्यभाव व प्रेम हीं वसत असत यावी उत्तम कल्पना येईल. मनुस्मृतींत अनेक स्थलीं दूधदुभत्यासंबंधीं आज्ञा दिलेल्या आहेत त्यांवरून दुधदुभत्यासंबंधीं नियम करण्याइतकीं दुभत्याची प्रगति झाली होती हें उघड आहे.

गाय, म्हैस वगैरे नेहमींच्या जनावरांच्या दुधाविषयीं उल्लेख चरक ग्रंथांत सांपडतो. शेळी, मेंढी, गाढवीण, उंटीण, घोडी, हत्तीण व स्त्री यांच्याहि दुधाच्या गुणधर्मांचे उल्लेख त्यांत आहेत. दुधापासून तयार होणारे दहीं, तूप, ताक, चक्का, कढी वगैरे पदार्थांचेहि गुणधर्म त्यात दिले आहेत. यावरून चरकाच्या कालीं (समारें इ. स. पू. ४०० वर्षें) निरनिराळ्या प्राण्यांच्या दुधाचें परीक्षण फारच बारकाईनें झालेलें होतें हें अगदीं उघड आहे. आपल्या इकडे दुधाच्या गुणधर्माचें निरीक्षण फक्त आरोग्यशास्त्रदृष्टयाच विशेष झालें होतें. परंतु दूध कसें तयार होतें, त्याचे घटक काय काय आहेत व ते कोणत्या प्रमाणांत असतात वगैरे गोष्टींविषयीं विचार झालेला दिसत नाहीं. या बाबतींत पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनींच विशेष संशोधन केलेलें आढळतें. हे शास्त्रज्ञ कोण कोण होते व त्यांनीं कोणत्या वर्षी काय काय शोध केले हें रा. घारे यांनीं लिहिलेल्या’‘दुभतें व दुभतीं जनावरें’‘या पुस्तकांत पाहावयास मिळेल.

इ. स. १८८९ सालापासून दुभत्याच्या पाश्चात्त्य पद्धतीचा प्रसार आपल्या देशांत होऊं लागलें. पुढें हलके हलके लष्करी खात्यानें फौजेकरितां दुभत्याची व्यवस्था करण्यास सुरवात केली. प्रस्तुतची गाईबैलांची शोचनीय स्थिति अंशत: तरी दूर व्हावी, दुभत्या जनावरांनां खाटिकांच्या सुरीखालून सोडविणें, गरीब शेतकर्यांस शेतकामाकरितां बैल पुरविणें, शेतकर्यांच्या शेतांत गुरें बसवून त्यांच्या शेतीची सुधारणा करणें, व पोरक्या अर्भकांनां निर्भेळ दुधाचा पुरवठा करणें यासारखीं कामें कांहीं गोरक्षण संस्था करीत आहेत.

ज ना व रां क रि तां गो ठे.- दुभत्या जनावरांस शक्य तितका आराम, वक्तशीर पौष्टिक चारा, पिण्यास स्वच्छ पाणी, चरण्यास उत्तम मोकळें कुरण व राहाण्यास स्वच्छ गोठे मिळाल्यास त्यांची प्रकृति उत्तम रहाते व तीं भरपूर व पौष्टिक दूध देतात. पैकीं स्वच्छता व आराम या दोन बाबी मुख्यत्वेंकरून जनावरांकरितां जे गोठे तयार करावयाचे त्यांच्या बांधणीवर व नंतर ठेवलेल्या व्यवस्थेवर अवलंबून असतात. म्हणून गोठे बांधण्यापूर्वी त्यांत कोणकोणत्या सोयी केल्या म्हणजे जनावरांस सर्वांत अधिक आराम मिळून ते गोठे सर्वस्वीं आरोग्यकारक राहातील याचा नीट विचार करून नंतर गोठ्याचे नकाशे तयार करावे व त्याप्रमाणें गोठ्याच्या बांधकामास सुरवात करावी. बांधकामास सुरवात करण्यापूर्वी इमारतीचे नकाशे तयार केल्यानें फार फायदा आहे. पैकीं पहिली बाब म्हणजे इमारतीस साधारण ठोकळमानानें किती खर्च येईल त्याचा अंदाज होतो व दुसरें नकाशाप्रमाणें बांधकाम नीट व्यवस्थित रीतीनें होत आहे कीं नाहीं हें तपासून पाहतां येतें. तेव्हां नकाशा तयार करतांना लक्षांत घेण्याच्या गोष्टींचा अनुक्रमानें खालीं विचार केला आहे.

(१) गोठ्यांत किती जनावरांची सोय पाहिजे किती जनावरांकरितां गोठा बांधावयाचा हें ठरवितांना आपणांस किती दुधाचा पुरवठा पाहिजे आहे हें नक्की ठरविलें पाहिजे. कारण दुधाच्या कमी अधिक पुरवठ्याप्रमाणें जनावरांची संख्याहि कमी अधिक होते; जनावरांच्या जातिपरत्वें एका जनावरापासून कमी अधिक दूध, सालाच्या सरासरीनें आपणांस मिळतें.’दुभत्या जनावरांच्या जाती’या सदराखालीं प्रत्येक जातीच्या गाई म्हशीपासून साधारण सरासरीनें आपणांस रोज अजमासें किती दूध मिळूं शकेल ही माहिती दिली आहे. त्या मानानें कांहीं विशिष्ट पुरवठा करण्यास किती जनावरें पाळलीं पाहिजेत हें सहज ठरवितां येतें. उदाहरणार्थ, आपणांस रोज दोन्ही वेळ मिळून एक मण दूध पुरवावयाचें आहे व आपण सिंधी जातीच्या गाई ठेवणार आहोंत. आतां सिंधी जातीच्या गाई प्रत्येकी रोज दोन्ही वेळ मिळून चार शेर दूध देतात असें धरलें तर ४०/४ = १० गाई, दुभत्या व शिवाय भाकड गाई आपण पाळल्याच पाहिजेत. म्हणजे रोज दोन्ही वेळां मिळून एक मण दुधाचा पुरवठा करतां येईल.

याप्रमाणें दुधाच्या पुरवठ्याप्रमाणें किती जनावरें ठेवलीं पाहिजेत हें ठरवावें. याशिवाय आटलेलीं भाकड जनावरें गोठ्यांत ठेवावयाचीं असल्यास वर दिलेल्या रीतीनें काढलेल्या जनावरांच्या संख्येपेक्षां शेंकडा ४० कमी संख्या येईल. कारण साधारपणें शंभर गाईंत सुमारें साठ गाई दुभत्या असतात व चाळीस भाकड असतात. याप्रमाणें संख्येसंबंधीं बाबी लक्षांत घेऊन किती जनावरें आपणास ठेवावयाचीं हें ठरवावें.

(२) प्रत्येक जनावरास उठण्या बसण्यांस किती लांबी रुंदीचें क्षेत्र ठेवावयाचें हें ठरवितांना आपणांस कोणत्या जातीचीं जनावरें पाळावयाचीं हें ठरवावें. कारण, जनावरांच्या जातींप्रमाणें त्यांची लांबी रुंदी निरनिराळी असते. साधारपणें प्रत्येक जनावरास ८ फूट लांब व ५ फूट रुंदीचें क्षेत्र ठेवल्यानें अडचण न होतां प्रत्येकास पुरी जागा मिळते. ज्या ठिकाणीं जागा महाग अथवा थोडी असते त्या ठिकाणीं ६ फूट लांब व ४ फूट रुंद जागा प्रत्येक जनावरास ठेवतात. मिलिटरी डेअरींतून जनावर फक्त उभें राहील इतकीच जागा प्रत्येकास देतात. यांत जागेची व बांधकामाची बचत होते. शेणामुतानें गोठ्यांतील जमीन घाण होण्याची बाब दोन्हीं बाबतींत जवळ जवळ सारखीच असते.

(३) जनावरांस चारापाणी देण्यास कोणत्या तर्हेची गवाणी बांधावी:- जनावरास चारा देण्यास गवाण करणें ती पक्की करावी म्हणजे तिच्या दुरुस्तीकरतां वारंवार खर्च होत नाहीं व ती चांगल्या स्थितींत पुष्कळ वर्षे रहाते. पक्की गवाण केल्यानें ती रोजच्या रोज धुवून स्वच्छ ठेवतां येते. पक्क्या गवाणीस आंतून प्लास्टर (सिमेंटाचें) केलें म्हणजे ती फारच मजबूत होते व अगदीं स्वच्छ ठेवतां येते. गवाण रोजच्या रोज धुतांना वापरलेलें पाणी गवाणीबाहेर काढून लावण्यास मुद्दाम एक भोंक ठेवावें म्हणजे धुण्यास वापरलेलें पाणी तेव्हांच गवाणी बाहेर वाहून जातें. जमिनीपासून गवाणीची उंची दीड फूट असावी. जास्त उंच केल्यास जनावरांस चारा नीट खातां येत नाहीं. गवाणीची रुंदी दीड फूट व खोली एक फूट असावी. प्रत्येक रांगेत वीस अगर जास्त जनावरें बांधण्याइतका मोठा गोठा असल्यास प्रत्येक चार जनावरांस एक सलग गवाण ठेवावी म्हणजे तिची व्यवस्था ठीक ठेवतां येते. पुष्कळदां लांकडी फळ्यांची गवाण तयार करतात पण तींत चा-याची नासाडी होते व असली गवाण स्वच्छ ठेवतां येत नाहीं. पुष्कळदां लांब लांकडी ओंडकी मांडून गवाण केलेली पहाण्यांत येते. ही पद्धत नुसत्या जमिनीवर चारा देण्यापेक्षां बरी इतकेंच काय तें. यांत चा-याची अतिशय नासाडी होते व स्वच्छतेच्या दृष्टीनेंहि ती रीत फार वाईट असते. जनावरें थोडीं असल्यास लांकडी पेटारीं, पिपाचें अर्धुक, लोखंडी अगर मातीच्या नांदी वगैरे चारा देण्यास वापरतात. परंतु जेथें पुष्कळ जनावरें पाळावयाचीं असतात, तेथें यांचा उपयोग होत नाहीं. अशा ठिकाणीं पक्कीच गवाण पाहिजे. इंग्लंड, अमरिका वगैरे देशांत लोखंडी पत्र्याच्या साध्या अगर इंनॅमल्ड केलेल्या पृथक् नांदी प्रत्येक जनावरास ठेवतात. व असल्या नांदींत पिण्याचें पाणी देण्याचीहि व्यवस्था केलेली असते.

(४) भिंतीची जाडी किती ठेवावयाची वगैरे:- प्रथम गोठ्याला भिंती ठेवावयाच्या कीं खांब ठेवावयाचें हें ठरवावें व भिंती किती बाजूंनीं घालावयाच्या हें ठरविलें पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीनें गोठ्यास मुळींच भिंती न घालणें सर्वांत उत्तम. कारण असें केल्यानें गोठ्यांतील हवा शुद्ध रहाते व गोठ्यांत सर्वांत अधिक सूर्यप्रकाश येतो. तेणेंकरून ते आरोग्यकारक रहातात. परंतु गोठा सर्व बाजूंनी मोकळा ठेवल्यानें थंडीपासून जनावरांचा नीट बचाव होत नाहीं. म्हणून ज्या ठिकाणीं अति कडक थंडी व उन्हाळा असतो त्या ठिकाणीं गोठ्यास भिंती घालाव्या लागतात. गोठ्यास भिंती न घातल्या तर थंडीपासून जनावरांचें संरक्षण करण्यास गोणपाटाचे पडदे लावण्याची अगर गवताच्या ताट्या भोंवताली लावण्याची व्यवस्था करावी लागते. गोठ्यास भिंती घातल्यास त्या पक्क्याच असाव्यात. म्हणजे गोठे टिकाऊ होतात. कच्च्या भिंतींची नेहमीं डागडुजी करण्यांत खर्च फार येतो व त्या नीट स्वच्छ ठेवतां येत नाहींत. शिवाय त्यांस लोणा चढण्याचा फारच संभव असतो. पक्क्या भिंतीची जाडी दीड फूट असल्यास पुरी होते. पक्क्या भिंतीच्या दर्जा चुन्यानें भरलेल्या असाव्यांत व आंतील बाजूस जमीनीपासून चार पांच फूटपर्यंत सिमेंटचे प्लॅस्टर केलेलें असावें; म्हणजे त्यास लोणा चढण्याची मुळींच भीति नसते व त्या स्वच्छ ठेवतां येतात. भिंतींची उंची गोठे किती उंच करावयाचे त्या मानानें ठरवावी. गोठ्याची मध्यम उंची, पंधरा-सोळा फूट ठेवल्यास पुरे होते.

(५) दरवाजे, खिडक्या व जाळ्या ठेवण्यासंबंधीं:- गोठ्यांत भरपूर उजेड येईल व त्यांत शक्य तितकी जास्त हवा खेळती राहील अशी व्यवस्था करण्यास दरवाजे, खिडक्या व जाळ्या ठिकठिकाणीं ठेवाव्या लागतात. गोठ्यांत सूर्यप्रकाश असल्यानें व खेळती हवा राहिल्यानें ते जास्त आरोग्यकारक होतात. गोठ्यांतील हवा जनावरांच्या श्वासोच्छासानें व शेणामुताच्या घाणीनें वगैरे सारखीं दूषित होत असते. ही दूषित हवा बाहेर घालविण्यास व बाहेरची शुद्ध हवा आंत येण्यास दरवाजे, खिडक्या, जाळ्या व पाखाडींत ठेवलेली खुली जागा यांची अत्यंत आवश्यकता असते.

श्वासोच्छ्वासाच्या घटकांचें शेंकडा प्रमाण.

प्राणवायु नत्रवायु कर्बाम्लवायु
श्वास २०.८१ ७९.१५ ०.०४
उच्छ्वास  १६.०३ ७५.५५ ४.३८
फरक -४.७८ ००० + ४.३४

प्राण्याच्या शरीरांतील व्यापार व घडामोडी नीट सुरळीत चालण्यास शरीरांत खेळणारें रक्त शुद्ध असावें लागतें व रक्त शुद्ध राहण्यास श्वासावाटे हवेंतील प्राणवायूचा भरपूर पुरवठा व्हावा लागतो. शरीरांत चालणा-या घडामोडींत उत्पन्न होणारा कर्बाम्लवायु रक्तांत मिसळून त्यास अशुद्ध करतो व रक्ताचें फुप्फुसांत शुद्धीकरण होत असतांना तो वायु उच्छवासाबरोबर बाहेर येतो. रक्ताच्या शुद्धीकरणांत प्राण वायूचें शोषण होतें व कर्बाम्लवायूचें शरीराबाहेर विसर्जन होतें. यामुळेंच उच्छवासाच्या हवेंत प्राणवायूचें प्रमाण ४.७८ नें कमी होतें व कर्बाम्ल वायूचें प्रमाणे ४.३४ नें अधिक होतें हें वर दिलेल्या कोष्टकावरून स्पष्ट होत आहे. गोठ्यांतील हवा जर खेळती नसेल तर तींत श्वासोच्छवासानें कर्बाम्ल वायूचें प्रमाण अधिकाधिक वाढेल व त्यामुळें ती दूषित होऊन जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. हा वाईट परिणाम टाळण्याकरितां खिडक्या, जाळ्या वगैरे ठेवाव्या लागतात. प्रत्येक जनावरास आठ फूट लांब व ५ फूट रुंद क्षेत्र ठेवल्यास व गोठ्याची मध्यम उंची पंधरा फूट ठेवल्यास प्रत्येक जनावरास ८ x ५ x १५ = ६०० घनफूट पोकळी मिळते व साधारणपणें हवेस नेहमींप्रमाणें गति असल्यास २४ तासांत कमींत कमी तीन वेळ गोठ्यांतील हवा बदलली जाते असें धरून चालल्यास प्रत्येक जनावरास २४ तासांत कमींत कमी ६०० x ३ = १८०० घनफूट हवा मिळते. परंतु हवा नेहमींच मंदगतीनें वाहत नसते म्हणून १८०० घनफुटांपेक्षां कितीतरी जास्त हवा प्रत्येक जनावरास मिळते. म्हणून व्यवहारांत प्रत्येक जनावरास ६०० घनफूट पोकळी ठेवल्यास खिडक्या वगैरे पाहिजे तितक्या ठेवल्यास पाहिजे तितकी शुद्ध हवा मिळते. गोठ्याच्या लांबीच्या मानानें कमी अधिक दरवाजे ठेवावेत. दोन जनावरें एकदम दरवाजांतून बाहेर जातील इतका दरवाजा रुंद असावा हें लक्षांत ठेवावें. प्रत्येक दोन ते चार जनावरांस एक खिडकी असून ती जमिनीपासून पांच फूट उंच व दीड फूट रुंदीची असावी. तिच्या दारांस कांचा बसविल्यानें ती बंद केल्यावरहि उजेडाची कमतरता पडत नाहीं. पुष्कळदां भिंतींत जमिनीपासून दोन तीन इंच उंचीवर चिंचोळ्या जाळ्याहि ठेवितात. यांनींहि गोठ्यांतील हवा शुद्ध व खेळती रहाण्यास मदत होते.

(६) गोठ्यांतील गटार कोठें व कसें ठेवावयाचें व त्याची रुंदी आणि ढाळ किती पाहिजे वगैरे:- गोठ्यांतील गटारें नेहमीं पक्कींच पाहिजेत. कच्च्या गटारांतून वाहाणारें मलमूत्राचें पाणी जमिनींत मुरून चोहोंकडे ओलावा पसरतो. याशिवाय मूत वगैंरे कुजून त्याची घाण सुटते व हवा दुषित होते. करितां गटारें खताच्या गारी (खळी) पर्यंत पक्कींच केलीं पाहिजेत. गटारें चुना व सिमेंटानें दर्जा भरून पक्कीं करावी म्हणजे तीं टाकाऊ होऊन मलमूत्राचें पाणी जमिनींत व आजूबाजूस मुरत नाहीं. गटारास आंतील बाजूनें सिमेंटाचें प्लॅस्टर केल्यास फारच उत्तम. गटारें बहुतकरून बंद केलेलीं असतात. परंतु झांकलेल्या गटारांपेक्षां उघडीं गटारें चांगली असतात. कारण तीं नीट धुवून स्वच्छ करतां येतात. त्यांत सांचलेला मळ तेव्हांच नजरेस येतो त्यामुळें तीं स्वच्छ ठेवण्याकडे जास्त प्रवृत्ति होते. तसेंच उघड्यागटारावर सूर्यप्रकाश पडल्यानें त्यांत सूक्ष्म, रोगट जंतूची वाढ कमी होते, हवा खेळती राहिल्यानें घाण सुटत नाहीं. झांकलेल्या गटारांत हे फायदे मुळींच नसतात. गटारांत कोंपरे, चिरा व भेगा नसाव्या. गटारें आंतून चौकोनी, तिकोनी अगर वाटोळीं असतात; पैकीं आंतून वाटोळीं गटारें सर्वांत उत्तम. कारण, त्यांत कोपरें राहणें शक्य नसतें, व तीं चांगलीं धुवून स्वच्छ ठेवतां येतात. तीं फार रुंद अगर उंच नसावींत. गटारें दीड फूट रुंद ठेवून त्यांतून पाणी जाण्यासाठीं त्यांनां पुरा ढाळ ठेवावा. दर दहा फुटांस दोन तीन इंचांचा ढाळ पुरा होतो.

(७) नोकर लोकांस वावरण्यास गोठ्यांत रस्ता कोठें ठेवावा व त्याची रुंदी किती असावी:- जनावरें बांधणें, सोडणें, त्यांस चारा घालणें, त्यांची धार काढण्यास जाणें वगैरे कामीं वापरण्यास गोठ्यांत रस्ता ठेवावा लागतो. तो तीन अगर चार फूट रुंद असून पक्का असावा.

(८) गोठ्यांतील जमीन व ढाळ:- गोठ्यांतील जमीन ही नेहमीं पक्की असली पाहिजे. जमीन घडीव दंगडांनीं अगर पक्क्या विटांनीं फरसबंदी करून व तिच्या दर्जा सिमिटानें भरून पक्की करावी म्हणजे मूत वगैरे मुरून ती ओली होत नाहीं. खांच खळगे होऊन चिखलाची व घाणीची राड न होतां ती रोज धुऊन स्वच्छ ठेवतां येते. जमीनी मुरूम, चुनखडी, दगडाची खडी अगर लहान लहान गोटे ठोकून केलेल्या आढळतात. परंतु अशा जमिनी फरसबंदीच्या जमिनीप्रमाणें टिकाऊ नसतात व त्या तितक्या स्वच्छ ठेवितां येत नाहींत. कच्चा मातीच्या जमिनी सर्व दृष्टींनीं वाईट असतात. गोठ्यांतील जमिनीस गटाराकडे ढाळ ठेविल्यानें मूत वगैरे वाहून जातें. साधारणपणें सहा ते आठ फूट रुंदीच्या जमिनीस चार ते सहां इंच ढाळ पुष्कळ होतो.

(९) गोठ्याचें छप्पर कोणत्या प्रकारचें करावयाचें:- गोठ्याला जे पाखाडें अगर छप्पर करावयाचें तेंहि हवा खेळण्यास जागा ठेवून करावें. दोन्ही बाजूंच्या खालच्या पाखाडयांमध्यें पांच सहा फूट जागा सोडून त्यावर दुसरें छप्पर मोकळ्या जागेवर करावें व खालच्या व वरच्या पाखाडयांमध्यें एक-दीड फुटाची मोकळी जागा सोडावी म्हणजे त्या मोकळ्या जागेंतून हवा खेळती रहाते. अशा छप्पराचा आकार लष्करी शिपायांच्या बराकीच्या छप्परासारखा होतो.

(१०) जनावरांचें शेणमूत वगैरे सांठविण्यास खताची गार कोठें करावी:- जनावरांचें शेणमूत सांठविण्याकरितां खताच्या गारी गोठ्यापासून दूर तयार कराव्यात. जवळ केल्यास शेणामुताची घाण गोठ्यांत येते. गटार खताच्या गारीपर्यंत पक्कें केलेलें असावें. खताच्या दृष्टीनेंहि पक्या गटाराचा फायदा आहे. जनावरांच्या मुताचा खताच्या दृष्टीनें फारच उपयोग असतो तेव्हां जितकें मूत खताच्या गारींत जाईल तितकें तें खत उत्तम प्रकारचें होऊन पिकाचें उत्पन्न अधिक येतें. खताच्या गारी जनावरांच्या संख्येच्या मानानें दोन अथवा अधिक असाव्यात. म्हणजे मोकळ्या गारी भरेपर्यंत भरलेल्या गारींतील खत कुजून तयार होतें व तें खत शेतांत घातल्यावर मोकळ्या झालेल्या गारींत पुन्हां शेण वगैरें सांठवितां येतें. याप्रमाणें आळीपाळीनें गारी भरतां व मोकळ्या करतां येतात. खताच्या गारी करणें त्या साधारण उंच जागेवर कराव्या म्हणजे पावसाच्या दिवसांत पाण्यानें खताची नासाडी होणार नाहीं व त्यांतला महत्त्वाचा उपयोगीं अंश पाण्यानें धुपून जाणार नाहीं.

(११) जनावरांचा चारा ठेवण्यास व पेंड- दाणा ठेवण्यास कोठार गोठ्याजवळच असावें. म्हणजे रोजचा लागणारा पेंडदाणा त्यांतून घेऊन थोड्या वेळांत जनावरांस देतां येतो. हें पेंडदाण्याचें कोठारहि पक्कें असलेलें उत्तम. तें तसें असलें म्हणजे उंदीर, वाळवी वगैरेंपासून मालाची नासाडी होत नाहीं. अशा कोठारांचा आकार जनावरांच्या संख्येच्या मानानें लहान मोठा ठेवावा. या कोठारांत पेंड, दाणा, मीठ, कोंडा वगैरे निरनिराळे खाण्याचे पदार्थ तसेंच पोतीं, टोपल्या, दावीं, खुंटे, तराजू वगैरे जनावरांच्या खाण्यापिण्यासंबंधीं लागणारें सर्व सामान व्यवस्थित रीतीनें ठेवण्याची व्यवस्था केलेली असावी. अशा कोठारासहि हवा व उजेडाकरितां खिडक्या ठेवाव्यात. कोठाराची सर्व इमारत पक्की केल्यानें त्यांत ठेवलेला माल चांगला सुरक्षित राहतो.

(१२) वांसरें, पोळ व बैल यांचा गोठा व नोकरमाणसांची घरें वगैरे कोठें व कशीं असावीं:- वासरें बांधण्यास निराळा गोठा मुख्य गोठ्याजवळच असावा. म्हणजे धारेच्या वेळीं वांसरें सोडणें, बांधणें वगैरे सोईचें होतें. वांसरांच्या गोठ्यांतील सर्व व्यवस्था मुख्य गोठ्याप्रमाणेंच असावी. त्यांत फरक एवढाच कीं प्रत्येक वांसरास चार फूट लांब व तीन फूट रुंद क्षेत्र ठेवावें व त्याची चा-याची गवाण एक फुटापेक्षां अधिक उंच असूं नये व गवाणीची आंतील खोली व रुंदी अनुक्रमें नऊ इंच व बारा ते चवदा इंच ठेवल्यास पुरी होते.

(१३) आरोगदृष्टया आजारी जनावरें बांधण्यांकरितां कोठडी करणें ती गोठ्याच्या आवारांपासून दूर अंतरावर व निरोगी जनावरें तिकडे सहज न जातील अशा ठिकाणीं करावी म्हणजे चांगल्या जनावरांत तो आजार पसरणार नाहीं. या कोठडींतील सर्व व्यवस्था मुख्य गोठ्याप्रमाणें असावी.

(१४) ओला चारा मुरवण्याचें कोठार (सायलो) अथवा पेंव:- दुभत्या जनावरांस नेहमींच ओला चारा मिळतो असें नाहीं. म्हणून जेव्हां ओला चारा मुबलक असतो अशा वेळीं तो मुरवून ठेवावा. म्हणजे ज्या वेळीं ओला ताजा चारा मिळत नाहीं अशा वेळीं तो देतां येतो. अशा रीतीनें ओला चारा मुरवण्याकरितां सायलो अगर चारा मुरवण्याकरितां कोठार अवश्य बांधावें लागतें. हें कोठार चौकोनीं अगर वाटोळें असतें. परंतु वाटोळें कोठार चौकोनीपेक्षां उत्तम. कारण त्यांत चारा चांगला दाबून भरतां येतो व चा-याची नासाडी होत नाही. ह्या कोठाराचा कांहीं भाग जमिनींत व बाकीचा जमिनीवर असतो. असें केल्यानें चारा भरणें व बाहेर काढणें सोपें जातें. हें मुरविण्याचें कोठार चांगले पक्कें असावें व आंतील बाजूनें त्यास सिमेंटाचें प्लास्टर असावें म्हणजे चारा खराब होत नाहीं. या कोठाराची खोली व व्यास त्यांत जो चारा सांठवावयाचा त्या मानानें कमी अधिक असावी. साधारणपणें दाबलेला मुरवलेचा चारा दर घनफुटांत १५।१६ शेर राहतो. त्या मानानें कोठाराचें माप ठेवावें. चारा मुरवण्याचें कोठार, गोठ्याच्या आवारांतच पेंडदाण्याचें कोठार अथवा कडबा वगैरेंच्या गंजी करण्याच्या जागेंत करावें म्हणजे सोयीचें होतें. कोठार बांधतांनां त्यांत चारा घालतां यावा व बाहेर काढतां यावा म्हणून जमिनीपासून ८।१० फुटांच्या अंतरावर एकंदर उंचीच्या मानानें खिडक्या ठेवाव्या. किंवा जमिनीपासून वरपर्यंत तीन फूट रुंदीची फट ठेवावी व या फटींत भिंतींत खोबण ठेवावी म्हणजे कोठारांत चारा भरण्याच्या वेळीं लांकडी फळ्या घालून कोठार बंद करतां येतें.

(१५) जनावरें खुल्या जागेंत बांधण्याकरितां गोठ्याजवळच मोकळी जागा अवश्य ठेवावी. गोठा साफ करण्याच्या वेळीं व थंडीच्या दिवसांत सकाळच्या प्रहरीं जनावरांस उन्हांत बांधतां येतें. अशाच प्रकारची जागा वांसरांकरितां निराळी ठेवावी व तिच्या भोंवतालीं कोंडाळें करावें म्हणजे त्यांत वांसरांनां मोकळें सोडतां येतें. व तीं त्यांत मोकळेपणानें हिंडतात. त्यामुळें त्यांजवर एक प्रकारचा तजेला येतो.

(१६) गोठ्याच्या आवारांत किंवा आवाराच्या लगतच जवळ गवत, कडबा, भूस वगैरें चा-याच्या गंजी लावून सांठवण करण्याकरितां मोकळी जागा सोडावी. अशीं जागा सखल जागीं नसावी. कारण पावसाळ्याच्या दिवसांत सखल जागेंत भोंवतालचें पाणीं येऊन गंजीची व चा-याची खराबी होते. म्हणून गंजी लावण्याकरितां जागा उंच भागीं असावी. या जागेंत जनावरांच्या खालीं बिछायती करितां लागणारा पालापाचोळाहि सांठवितां येतो.

(१७) जनावरांस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जवळ नदी वगैरे असल्यास गोठ्यानजीक करण्याची जरूरी नसते. परंतु जवळ तशी सोय नसल्यास गोठ्याच्या आवारांत जनावरांस पिण्याच्या पाण्याकरितां एक पक्का हौद करावा लागतो. त्यांत विहिरीचें अगर नळाचें पाणी सोडावें. हौदास आंतील बाजूनें सिमेंटाचें प्लास्टर केल्यास तो मजबूत होतो. त्यांतून पाणी झिरपत नाहीं व तो स्वच्छ ठेवतां येतो. अशा हौदाचा कांठ जमिनीपासून दीड फुटापेक्षां कधींहि उंच असूं नये. या हौदाच्या भोंवतालीं आठ फूट पर्यंत पक्की फरसबंदी करावी. कारण असें केलें असतां जनावरांच्या तुडवणीनें तेथें चिखलाची राड होत नाहीं. या फरसबंदीसहि ढाळ ठेवावा म्हणचे पाणी नीट वाहून जाईल.

(१८) जवळपास नदी असल्यास जनावरें धुण्यासाठीं निराळी सोय करण्याची जरूरी नसते. परंतु तसें नसल्यास अशी सोय करावी. पिण्याच्या पाण्याच्या हौदाभोंवतालची पक्की फरसबंदी दहा बारा फूट रुंद करून भोंवतालीं पक्कें गटार काढल्यास तेथें जनावरांस धुतांहि येतें. मात्र हौदांतून बालदीनें पाणी घेऊन फरसबंदीवर जनावरें धुवून तेथील गटारहि खताच्या गारीकडे काढून लावावें म्हणजे खळमळ खताच्या गारींत जाऊन खताच्या दृष्टीनें नुकसान होत नाहीं. पाणी पिण्याचा हौद जमिनीवर केल्याचें जनावरांच्या हगण्यामुतण्यानें पिण्याचें पाणी घाण होण्याचा संभव नसतो.

(१९) गोठ्याच्या आवारांतील रस्ते:- गोठ्याच्या आवारांतील रस्ते गाड्या जाण्यायेण्यासारखे रुंद असावेत. ते खडीचे अथवा मुरुमाचे असावेत म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत ते खराब होत नाहींत. जनावरें अवाराच्या बाहेर चरण्यास जाण्यास रस्ता स्वतंत्र असलेला बरा. पेंडदाण्याच्या कोठाराकडे जाण्यास एक व कडबा वगैरेंच्या गंजींकडे जाण्यास एक असे रस्ते पाहिजेत.

(२०) सर्व बांधकामास कोणता मालमसाला व किती वापरावा:- वर दिलेल्या बाबी लक्षांत घेऊन गोठ्यांचा वगैरे नकाशा काढला म्हणजे सर्व इमारतीस किती मालमसाला लागेल याचा नक्की अंदाज करतां येतो. उत्तम प्रकारचा माल वापरला म्हणजे सर्व इमारती टिकाऊ व मजबूत होतात. साधारणमानानें जागेच्या प्रत्येक चौरस फुटामागें मालाप्रमाणें एक रुपयापासून तीन रुपयेपर्यंत खर्च येतो. यांत मालमसाल्याची किंमत व मजुरी येते. यावरून सर्व इमारतीस किती खर्च येईल याचा अंदाज करतां येतो.

(२१) वर दिलेल्या इमारतीशिवाय पोळांकरतां व बैलांकरितां निराळा गोठा करावा. पोळ व बैल गाईंत बांधणें बरें नसतें. परंतु ज्या ठिकाणीं पोळ व बैल यांची संख्या थोडी तेथें निराळा गोठा नसला तरी चालतो. अशा वेळीं गाईंच्या गोठ्यांत एके बाजूस त्यांनां बांधलें तरी चालतें. गाय माजास आल्यावर तिला पोळ दाखविण्याकरितां एक निराळीच जागा असावी व त्या जागेभोंवती सहा सात फुट उंचीइतकें आडोशाकरितां भिंतीचें कोंडाळे असावें. म्हणजे माजास आलेलें जनावर व पोळ यांनां तेथें ठेवतां येतें व त्यांनां इतरांपासून उपद्रव पोंचत नाहीं. अशी सोयीची जागा नसल्यास पुष्कळदां पोळ जवळपास वावरणा-या माणसास इजा करतो. याकरितां अशा कामासाठीं स्वतंत्र जागा असलेली बरी. गाभण जनावरास विण्याच्या सुमारास एकांत असें ठिकाण असलेलें बरें म्हणजे त्यांजवर स्वतंत्रपणें देखरेख करणें बरें पडतें व विण्याच्या वेळीं त्यास इतर जनावरांपासून इजा होत नाहीं. गडीमाणसांस राहण्याकरितां गोठ्याच्या आवारांतच जागा केल्यानें सोयीचें होतें व सर्व कामें वेळच्या वेळीं होतात. साधारणपणें ८।१० जनावरांमागें एक मनुष्य या प्रमाणांत नोकरांची रहाण्याची व्यवस्था करावी.

(२२) गोठ्यांचे प्रकार:- गोठे दोन प्रकारचे असतात एकेरी व दुहेरी. ज्या ठिकाणीं जनावरांचीं संख्या थोडी असते त्या ठिकाणीं एकेरी गोठा बांधणें सोयीचें असतें. अशा गोठ्यांत जनावरांची एकच रांग असते. परंतु जेथें पुष्कळ जनावरांची सोय करावयाची असते तेथें दुहेरी गोठेच बांधावे लागतात. दुहेरी गोठ्यांत जनावरें दोन रांगांत बांधलेलीं असतात. दुहेरींतहि दोन भेद आहेत. एकांत दोन्ही रांगांतील जनावरांचीं तोंडें एकमेकांकडे असतात, मध्यभागीं वावरण्याचा रस्ता असतो व रस्त्याच्या दोन्ही बाजूंस चा-याची गवाण असते. गवाणीच्या पलीकडे जनावरें बांधण्याची जागा व त्याच्या पलीकडे गटार व गोठ्याची भिंत असते. कधीं कधीं गटार व भिंत यांच्यामध्यें वावरण्यास रस्ता ठेवलेला असतो. दुसर्यांत दोन्ही रांगांतील जनावरांच्या शेंपट्या एकमेकांकडे असतात. म्हणजे मध्यभागीं वावरण्याचा रस्ता असतो व त्या रस्त्याच्या दोन्हीं बाजूंस गटार असतें. गटारापलीकडे जनावरें बांधण्याची जागा, त्या पलीकडे चा-याची गवाण, नंतर वावरण्याचा रस्ता व गोठ्याची भिंत अशी व्यवस्था असते.

(२३) जनावरांच्या गोठ्यास जागा:- जनावरांचे गोठे बांधण्यास योग्य जागा पसंत करणें हें काम फार महत्त्वाचें आहे. जागा सखल, दलदलीची, व कोंदट अशी नसावी. जवळपास उत्तम पाण्याचा भरपूर पुरवठा होण्यासारखा असावा. जवळपास हमरस्ता नसावा. जवळच जनावरांस चारा तयार करण्यांकंरितां पाटाच्या अगर विहिरीच्या पाण्यानें भिजणांरी जमीन असावी. आसपास जनावरांस उत्तम चराईचें कुरण असावें व थोडक्या वेळांत गिर्हाइकाकडे दूध पोंचवितां येईल अशा ठिकाणीं जनावरांचे गोठे बांधावे. सखल, कोंदट व दलदलीची जागा नसल्यानें जनावरांचे आरोग्य नीट रहातें व रोग बहुधां पसरत नाहीं व नुकसान होत नाहीं. हमरस्ता जवळपास नसल्यानें जाणा-या येणा-या वर्दळीपासून जनावरांस त्रास होत नाहीं व जनावरांत सांथींचे रोग पसरत नाहींत. गोठे बांधण्यास उंचवठ्याची खुली जागा पसंत केल्यानें मुबलक स्वच्छ हवा व सूर्यप्रकाश मिळतो; जनावरांचे आरोग्य उत्तम राहातें व त्यामुळें निरोगी व स्वच्छ दूध मिळतें. स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा भरपूर होण्यासारखा असला म्हणजे सर्वत्र स्वच्छता ठेवतां येते व जनावरांस शुद्ध पाणी पिण्यास मिळाल्यानें रोगांचा प्रसार न होतां आरोग्य चांगले रहातें.

ज ना व रा चें खा णें.- जनावरांच्या खाद्यपदार्थांचे स्थूल मानानें मुख्य तीन विभाग होतात. (१) पोटभरीचा चारा (रफेज, बल्की फॉडर), (२) पौष्टिक अथवा सकस अन्न (कांन्सेंन्ट्रेटेड फूड) व (३) मसाला (कांडिमेंट्स) किंवा '‘अन्नानुबंधपदार्थ’‘(फूडऍड्जंवट्स्). पैकीं पहिल्या विभागांत गवत, कडबा, भुसा, बाटुक वगैरे हिरवा चारा-न '‘सुकलेला चारा’‘(सायलेज) हीं येतात, दुस-या विभागांत पेंड, दाणा, कोंडा, चूण, फोल वगैरे येतात; व तिसर्यांत मीठ, गूळ, तेल, ओवा, बडिशेप, हळद, लसूण वगैरे मसाल्याचे पदार्थ येतात. जनावरांकडून त्यांचें काम योग्य रीतीनें व्हावें, तीं निरोगी व सशक्त रहावींत व त्यांच्या शरीराची वाढ जोमानें व्हावी म्हणून योग्य प्रमाणांत पोटभरीचा चारा, पौष्टिक अन्न व मसाले त्यांनां दिले पाहिजेत. सर्वच जनावरांचें काम सारखें नसतें; उदाहणार्थ गाभण गाईचें मुख्य काम म्हणजे गर्भाची योग्य वाढ, दुभत्या गाईचें काम दूध, वांसरांचें काम शरीराची वाढ, पोळांचें काम गर्भधारण घडवून आणणें व कामकरी बैलांचें काम शारीरिक श्रम. यांवरून प्रत्येकाच्या कामाप्रमाणें त्याच्या खाण्यांतहि फरक असणें अवश्य आहे. वर दिलेल्या मुख्य कामाशिवाय शरीराची होणारी झीज भरून काढून शरीर सुस्थितींत ठेवणें हेंहि प्रत्येक व्यक्तीचें काम असतेंच. यावरून रोजची झीज भरून काढून शरीर सुस्थितींत ठेवण्यास जितक्या व ज्या प्रकारच्या अन्नाची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीस असते त्याशिवाय जे विशिष्ट कार्य व्यक्तीस असते त्याशिवाय जे विशिष्ट कार्य व्यक्तीस करावयाचें असेल तें कार्य योग्य रीतीनें होण्याकरितां आणखीं विशिष्ट प्रकारचें अन्न दिलें पाहिंजे हें उघड आहे. पोटभरीच्या चार्यांत उपयुक्त पौष्टिक द्रव्यांचें शेंकडा प्रमाण सर्वांत कमी असतें व पेंड वगैरे पदार्थांत त्यांचें प्रमाण अधिक असतें म्हणून जनावरांचें पोट भरून त्यास अवश्य लागणा-या पौष्टिक द्रव्यांचा योग्य भाग मिळेल अशा रीतीनें चारा व पेंड-दाणा यांचें प्रमाण ठेवलें पाहिजे. ज्यावेळीं जनावरास कांहींच विशिष्ट काम करावयाचें नसतें त्यावेळीं पाहिजे जितका पोटभरीचा चारा दिला म्हणजे काम होतें. परंतु विशेष कामाकरितां पोटभरीच्या चा-याशिवाय पेंड, दाणा वगैरे दिलाच पाहिजे व तसें न करितां जर त्याच्याकडून ते विशिष्ट काम करून घेतलें तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

चा -या चे घ ट क व का र्यें.- खाद्य पदार्थांचे मुख्य घटक (१) पाणी, (२) स्निग्धांश (ऑइल फॅंट), (३) शर्करासत्वादि वर्गांतले पदार्थ (कार्बो हायड्रेटस्), (४) मांसजनक पदार्थ (प्रोटीड), (५) काष्टतंतुमयभाग (वूडीफायबर), व (६) निरिंद्रियभाग (इन-आर्गनिक मॅटर) हेच असतात. परंतु निरनिराळ्या खाद्य पदार्थांत यांचें शेकडा प्रमाण मात्र निरनिराळें असतें. तें पुढें दिलेल्या कोष्टकांत दिलें आहे. खाद्यपदार्थांच्या या घटकांपैकीं स्निग्धांश, शर्करासत्वादि पदार्थ, व मांसजनक पदार्थ यांचेंच शरीरपोषणाच्याकामीं विशेष महत्त्व आहे. यांपैकीं स्निग्धांश व शर्करासत्वादि पदार्थ यांचें शरीरनिर्वाह संबंधी कार्य म्हणजे शरीराची उष्णता कायम राखणें, निरनिराळीं शारीरिक कामें करण्यास लागणा-या शक्तीचा पुरवठा करणें हींच आहेत व यांशिवाय प्रसंगानुसार अन्नांतून यांचा पुरवठा कमी झाल्यास उष्णता कायम राखण्यास व शक्तीचा पुरवठा करण्यास अवश्य लागणा-या चरबीचा सांठा करण्याकरितां हीं द्रव्यें उपयोगीं पडतात. मांसजनक घटकांचें कार्य शरीरांतील स्नायुमय भागांची वाढ करण्याचें आहे. परंतु उष्णता व शक्ति यांचाहि पुरवठा करण्याकडे त्यांचा उपयोग प्रसंगांनुसार होतो आणि याकरितांच कोणत्याहि अन्नाचा पौष्टिकपणा त्यांत असलेल्या मांसजनक पदार्थांच्या शेंकडा प्रमाणावर अवलंबून असतो. पेंड ही गवत व कडबा वगैरेपेक्षां जास्त सकस व पौष्टिक असते, याचें कारण पेंडींत मांसजनक पदार्थांचें शेंकडा प्रमाण गवत व कडब्यांतल्यापेक्षां अधिक असतें. खाली दिलेल्या कोष्टकावरून निरनिराळ्या चार्यांतील घटकांचें शेंकडा प्रमाण कळेल व त्यांचा कमीजास्त पौष्टिकपणा लक्षांत येईल.

 जनावरांच्या चारा-दाण्यांतील उपयुक्त घटकांचे शेंकडा प्रमाण

चा -या च्या घ ट कां चें प च न.- खाद्य पदार्थांचे मुख्य उपयुक्त घटक स्निग्धांश, शर्करासत्तवादि पदार्थ व मांसजनक पदार्थ. यांचे पचन निरनिराळ्या पिंडरसांच्या सहाय्यानें होतें. पैकीं लाळ ही लालोत्पादक पिंडांत उत्पन्न होते व तिचा परिणाम अन्न चावलें जात असलेल्या सत्तवावर (स्टार्च) होतो व त्यास द्राव्य स्थिति येते. जठराच्या आंत सूक्ष्म पिंड असून त्यांत’‘जाठरसर’‘(गॅस्ट्रिकज्यूस) उत्पन्न होतो, व त्याचा परिणाम अन्नांतल्या मांसजनक पदार्थावर होतो व त्याचें रूपांतर होऊन त्यास द्राव्य स्थिति येते. यकृतांत (लिव्हर) पित्ता (बाइल) उत्पन्न होतें व त्याचा परिणाम स्निग्धांशावर होऊन ते शोषण होण्यास योग्य होतात. प्रोमरसाच्या (पँक्रिऍटिकज्यूस) योगांनें सत्तव, स्निग्धांश व मांसजनक पदार्थ या तिहींवर परिणाम होऊन त्यास द्राव्य स्थिति येते. याशिवाय’‘आंत्ररसाचाहि (इंटेस्टायनल ज्यूस) अन्नाचें पचन होण्यास उपयोग होतो. याप्रमाणें निरनिराळ्या रसांचा परिणाम अन्नाच्या घटकांवर होऊन त्यास द्राव्य स्थिति येते व त्यानंतर द्रव स्थितींत त्यांचें शोषण होऊन शोषलेला भाग रक्तांत मिसळतो व रक्ताच्या द्वारा सर्व शरीरभर खेळता राहून ज्या ठिकाणीं नवीन भाग तयार होत असेल किंवा झीज झाली असेल त्या ठिकाणीं त्याचा उपयोग होऊन नवीन भाग तयार होतो अगर झालेली झीज भरून निघते. खाल्लेल्या अन्नांतील सर्वच उपयुक्त भाग पचून शोषला जात नाहीं; कारण सर्व’पाचक रसांचा’(डायजेस्टिव्ह ज्यूस) त्यावर परिणाम होऊन त्यांस पूर्णपणें द्राव्यरूप मिळत नाहीं व सर्व द्राव्यस्थितींत असलेल्या भागांचें पूर्ण शोषण होत नाहीं. यामुळें अन्नांतील उपयुक्त द्रव्यांपैकीं कांहीं भाग पचून त्याचें शोषण होतें व उरलेला भाग मलरूपानें शरीराबाहेर निघून जातो. एकच प्रकारचें अन्न निरनिराळ्या जनावरांस व निरनिराळ्या परिस्थितींत दिल्यास पचन झालेल्या भागांचें प्रमाण निरनिराळे आढळतें. हें’पाचकत्वाचें शेंकडा प्रमाण’(कोइफिशंट ऑफ डायजेस्टिबिलिटि) योनि, वय, शारीरिक स्वास्थ, श्रम, मानसिक स्वास्थ्य, ऋतु व हवामान, अन्नाचा प्रकार व अन्न तयार करण्याची रीति यांवर अवलंबून असतें. रंवथ करणा-या प्राण्यांच्या बाबतींत पाचकत्वाचें शेंकडा प्रमाण खालीं दिलेल्या कोष्टकांत दिलें आहे. या कोष्टकांतलें प्रमाण पाश्चात्त्य देशांत केलेल्या प्रयोगांवरून काढलेलें आहे व हें प्रमाण आपल्या देशांत सर्वतोपरि उपयोगीं पडेल असें मुळींच नाहीं. परंतु त्यावरून निरनिराळ्या खाद्य पदार्थांतील उपयुक्त घटकांचें पाचकत्वाचें शेंकडा प्रमाण किती असतें याची बरीचशी कल्पना येईल. अशा प्रकारचे प्रयोग अद्याप आपल्या देशांत झालेले नाहींत.

चार्यांतील उपयुक्त घटकांच्या पाचकत्वाचें
            शेंकडा प्रमाण.
चा-याचें नांव मांसजनक पदार्थ स्निग्धांश शर्करासत्वादिपदार्थ
गवत (आक्टोबर.) ५६ ४६ ६१
मक्याचें बाटूक ६५ ७२ ७३
मुरवलेलें मक्याचें बाटूक ५१ ८० ६७
ज्वारीचें बाटूक ६२ ८५ ७८
हिरवी जई (फुललेली) ७५ ७० ६३
लूसर्न (फुललेलें) ८१ ४५ ७२
गवत वाळलेलें ५७ ५१ ६४
लूसर्न ’' ६८ ५३ ६२
गव्हाचा भुसा ३१ ३७
जईचा भुसा ३३ ३६ ४६
जवाचा भुसा २५ ३९ ५३
भाताचा पेंढा ४५ ४७ ३२
वाटाण्याचा भुसा ६० ४६ ६४
जईदाणा ७६ ८० ७६
मका दाणा ७२ ८९ ९५
सरकी ६८ ८७ ५०
गव्हाचा कोंडा ७९ ७१ ७१
शिरसाची पेंड ८१ ७९ ७६
जवसाची पेंड ८६ ९२ ७८
भुइमुगाची पेंड ९० ९० ८४
तिळाची पेंड ९० ९० ५६
खोब-याची पेंड ७५ ९८ ७७
गाईचें दूध ९८ ९४ १००

 

वर दिलेल्या कोष्टकांवरून हें लक्षांत येईल कीं जनावरानें जो चारा खाल्ला असेल त्यांत असलेल्या उपयुक्त घटकांचा शेंकडा किती भाग पचनशील असतो. उदाहरणार्थ:- जर जनावरानें भुइमुगाची पेंड खाल्ली तर त्या पेंडींत असल्या मांसजनक पदार्थांपैकीं शेंकडा ९० भाग पचण्यासारखा असतो व उरलेला हिस्सा म्हणजे शेंकडा १० भाग शेणाबरोबर बाहेर येतो; तो पचत नाहीं. या कोष्टकावरून व चार्यांत असलेल्या उपयुक्त घटकांच्या शेंकडा प्रमाणावरून त्यांत शेंकडा किती पचनशील उपयुक्त घटक असतात हें साध्या त्रैराशिकानें काढतां येईल हें उघड आहे.

जनावराच्या कामाप्रमाणें पोषणास लागणारें त्याच्या दर हजारी पौंड वजनास लागणा-या द्रव्यांचें शेंकडा सरासरी प्रमाण (आंकडे पौंडांचे आहेत.)

        पोषक द्रव्याचें कोष्टक

 

जनावराचें वर्णन चार्यांतील घनभाग पचनशील भाग
मांस जनक स्निग्धांश शर्करा सत्वादि
पूर्ण वाढीचें व
काम न करणारें


 १८ ०.७ ०.१ ८.१
 थोडें काम करणारें  २३ १.३  ०.३ १०.६
 साधारण ,,  ,,  २५  १.७ ०.३ १०.६
फार  ,,  ,, २७ २.२ ०.८ १४.२
रोज १० पौड दुधाचें २४ १.४ ०.३ ९.६
,,   २०  ,, २७ २.६ ०.५ ११.७
,,  ३०  ,, २९ २.९ ०.६ १३.८
,,  ४०  ,, ३० ३.५ ०.८ १४.६
वांसरें
२-३ महिन्याचें
(१५० पौं.वजन)
२३ ३.७ २.० १३.०
३-६ महिन्याचें
(३०० पौं. वजन)
२४ ३.१ १.० १३.०
६-१२ महिन्याचें
(५०० पौं. वजन)
२६ २.६ ०.६ १२.७
१२-१८ महिन्याचें
(७०० पौं वजन)
२६ २.६ ०.४ १२.४
१८-२४ महिन्याचें
(९०० पौ.वजन)
२६ २.६ ०.३ १२.०

कामाप्रमाणें अवश्य लागणा-या उपयुक्त घटकांची इयत्ता किंवा कामानुसार अन्नांशाच्या इयत्तांचे प्रमाण (फीडींग स्टॅडर्ड) पाश्चात्य देशांत निरनिराळ्या जनावरांवर निरनिराळ्या परिस्थितींत प्रयोग करून त्या त्या जनावरांस त्या त्या परिस्थितींत किती पचनशील उपयुक्त द्रव्यांची जरूर असते यावरून ठरविलें आहे. असले प्रयोग आपल्या देशांत अद्याप झालेले नाहींत म्हणून पाश्चात्य देशांतील प्रयोगावरून निघालेलीं अनुमानें वर दिलीं आहेत त्यांवरून जनावरांस परिस्थितीप्रमाणें किती उपयुक्त पचनशील घटकांची आवश्यकता असते याची कल्पना येईल. हे प्रयोग गायबैलांसंबंधीं आहेत.

ज ना व रां स खु रा क त या र क र णें.- जनावरांस ज्या प्रकारचें काम करावयाचें असेल त्यामानानें त्याला किती पौष्टिक द्रव्यांची अवश्यकता असते हें ठरवून त्या मानानें त्याच्या रोजच्या खाण्यांत कोणता चारा व पेंड दाणा वगैरे दिला पाहिजे हें ठरवावें लागतें; त्याकरितां जनावरांच्या खाद्य पदार्थांचा कमी अधिक पौष्टिकपणा लक्षांत घेऊन प्रत्येक पदार्थ किती दिला पाहिजे हें ठरवावें लागतें. चा-याचा पौष्टिकपणा त्यांत असलेल्या निरनिराळ्या घटक पदार्थांच्या परस्पर प्रमाणावरून ठरवावा लागतो. याकरितां चा-याचे जे घटक असतात त्यांचीं काय काय कार्ये असतात ती पहावीं लागतात. याकरितां मांसजनक घटक व उष्णता आणि शक्ति यांचा पुरवठा करणारे घटक कोणत्या प्रमाणांत असतात हें पहावें लागतें म्हणजे मांसजनक पदार्थांपासून शरीरांतील मांसल भागांची वाढ होते, रोजची झीज भरून येते व उष्णता आणि शक्तीचा पुरवठा करणा-या पदार्थांपासून किती पुरवठा होईल हें कळतें. याकरितां शर्करासत्तवादि पदार्थ व स्निग्धांश यांनां गणितानें एकरूप देऊन मग त्यांची मांसजनक पदार्थांशी तुलना करावी लागते. प्रयोगाअंती असें सिद्ध झालें आहे कीं, शर्करासत्वादि पदार्थ व स्निग्धांश यांच्यापासून सारखी शक्ति व उष्णता उत्पन्न होत नाहीं, साधारणपणें स्निग्धांशापासून शर्करासत्वादि पदार्थांपेक्षां २.३ पट जास्त उष्णता व शक्ति मिळते. म्हणून या दोहोंस एकरूप देण्याकरितां स्निग्धांशास २.३ नें गुणावें लागतें म्हणजे स्निग्धांशास शर्करासत्वादीचें रूप मिळतें. उदाहरणार्थ.- गव्हाचा कोंडा हा पदार्थ घेतल्यास त्यांत शेंकडा ३.५ स्निग्धांश, १३.२ मांसजनक पदार्थ व ५८.४२ शर्करासत्वादि पदार्थ असतात. तेव्हां त्यांत शक्ति व उष्णता देणारा भाग, ३.२ दर शेंकडा स्निग्धांश व ५८.४२ दर शें. शर्करासत्वादि भाग आहे. तेव्हां त्यांत शेंकडा ३.२ x २.३ (स्निग्धांश दर शें. x २.३) + ५८.४२ = ६५.७८ इतका’‘सत्तवतुल्य’‘अथवा '‘सत्तवसम’‘(स्टार्च इक्वीव्हॅलंट) (उष्णता व शक्तीचा पुरवठा करणारा) भाग येतो. त्याचप्रमाणें गवतांत तो किती आहे हें पाहिल्यास तो फक्त ४६.४७ इतकाच आहे. पण मांसजनक पदार्थ गवतांत फक्तदर शेंकडा ४.५४ व गव्हाच्या कोंडयांत दर शेंकडा १३.२ आहेत; तेव्हां मांसजनक पदार्थ व उष्णता व शक्तीचा पुरवठा करणारे पदार्थ यांचें परस्पर प्रमाण म्हणजे’‘प्रौंजस प्रमाण’‘(अल्ब्युमिनाइड रेशिओ)- गवताचें ४.५४:४६.४७=१:१०.२ व गव्हाच्या कोंड्याचें १३.२:६५.७८ = १:४.९ इतकें पडतें. म्हणजे मांसजनक पदार्थांच्या प्रत्येक भागास ४.९ भाग उष्णता देणारे पदार्थ गव्हाच्या कोंडयांत असतात व गवतांत हें प्रमाण १:१०.२ असल्यानें गव्हाचा कोंडा गवतापेक्षां जास्त सकस व पौष्टिक ठरतो हें उघड आहे. याप्रमाणें प्रत्येक चा-याचें’ पौंजस प्रमाण’‘काय आहे हें काढतां येईल व याच रीतीनें जनावरांस जें खाणें द्यावयाचें त्याचें प्रौजस प्रमाण काढतां येऊन त्यावरून जनावरांचा खुराक किती पौष्टिक आहे  हें काढतां येतें. मागें’‘कामाप्रमाणें अवश्य लागणा-या उपयुक्त अन्नघटकांची इयत्ता’‘या सदराखालीं जे कोष्टक दिलें आहे त्यांत जनावरांच्या कामाप्रमाणें स्निग्धांश वगैरे घटकांचें प्रमाण चार्यांत किती अवश्य पाहिजे हें दिलें आहे. त्यावरून जर प्रौजस प्रमाण काढलें तर तें प्रत्येक बाबतींत वेगळें आहे हें कळेल व जसें काम त्या मानानें प्रौजस प्रमाण वेगळें व त्या खुराकाचा पौष्टिकपणा वेगळा असतो हें लक्षांत येईल. जनावरांच्या खाण्याच्या सर्व पदार्थांत ओला चारा सर्वांत नि:सत्व व पेंड सवार्तं सकस असते हें वर दिल्याप्रमाणें गणितानें सिद्ध होतें हे अनुभवहि गणितास धरून आहेत. तेव्हां गुरांच्या रोजच्या खाण्यांत ओला चारा, दाणा, कोंडा, पेंड, यांचें योग्य प्रमाण ठेवल्यास जनावरास त्याच्या कामाप्रमाणें अवश्य पाहिजे तितका भाग देतां येतो. पूर्ण वाढीच्या व कांहीं एक काम न करणा-या बैलास जो पौष्टिक भाग अवश्य आहे त्यापेक्षां जास्त पौष्टिक भाग काम करणा-या बैलास  अवश्य लागतो व तीच गोष्ट दूध देणा-या गाईची आहे. खुराक ठरवितांना शरीररक्षणास किती भाग पाहिजे व शरीर रक्षणाशिवाय दुसरें काम करावयाचें असतें. त्याकरितां किती पौष्टिक भाग पाहिजे हें लक्षांत घेऊन चार्यांत कोणकोणते व किती पदार्थ द्यावयाचे हें ठरवावें. साधारपणें १००० पौंड वजनाच्या पूर्ण वाढीच्या जनावरास फक्त शरीररक्षणास रोज ०.७ पौड मांसजनक पदार्थ व ६.० पौंड सत्वसम भाग पाहिजे व या शिवाय प्रत्येक १० पौंड दुधास ०.५ पौंड मांसजनक पदार्थ व २.५ पौंड सत्तवसम भाग रोज पाहिजे हें प्रयोगावरून सिद्ध झालें आहे; तेव्हां यावरून जनावरांचें वजन व रोजचें दूध किती असेल त्यामानानें त्याच्या खुराकांत किती पौष्टिक पदार्थ पाहिजेत हें ठरवावें. काम करणा-या जनावरांच्या बाबतींत शरीररक्षणास लागणा-या भागाशिवाय कामाच्या मानानें मांसजनक भाग ०.४ ते १.१ पौंड व सत्वसम भाग १.४ ते ६.८ पौंडपर्यंत लागतात. यावरून त्यांचा खुराक कसा असावा हें ठरवावें. साधारणमानानें जनावर सुका व ओला चारा खाईल तेवढयांत त्याच्या शरीररक्षणास पाहिजे तितका भाग येतो व विशिष्ट प्रकारच्या कामाकरितां त्यास पेंड दाणा वगैरे द्यावा लागतो. याप्रमाणें शास्त्रीय रीतीनें खुराक ठरविण्याकरितां खाण्याच्या पदार्थांत शेंकडा पचनशील उपयुक्त घटक किती असतात हें माहीत पाहिजे हें उघड आहे. परंतु सर्वांना ही माहिती नसते तेव्हां त्यांच्या अभावीं दुभत्या जनावरांच्या बाबतींत तें खाईल तितका सुका व ओला चारा द्यावा व त्याशिवाय प्रत्येक एक शेर दुधास ०.६ ते ०.८ शेर पेंड, कोंडा वगैरेंचें मिश्रण द्यावें म्हणजे प्रमाणशीर व्यावहारिक खुराक तयार होतो (पाश्चात्य देशांत हें प्रमाण प्रत्येक शेर दुधास ०.३ शेर पेंड वगैरेंचें मिश्रण असे पडतें.) किंवा वजनानें रोजचें जितकें दूध असेल त्याचा ३/५ ते ४/५ पेंड वगैरेंचा हिस्सा ठेवावा म्हणजे झालें.

नि र नि रा ळ्या खा द्य प दा र्थां ची तु ल ना.- जनावरांचे जे निरनिराळे खाद्य पदार्थ असतात त्यांचा बाजारभाव सर्वकाळ व सर्व ठिकाणीं सारखा नसतो व सर्व पदार्थ सारखे पौष्टिक नसतात. म्हणून कोणते पदार्थ उपयोगांत आणले म्हणजे फायदेशीर पडेल हें पहावें लागतें व याकरतां त्यांची परस्पर तुलना करावी लागते. ही तुलना करण्याकरतां प्रत्येक पदार्थांत उपयुक्त द्रव्यांचें शेंकडा प्रमाण किती पडतें तें अगर त्यांपासून शरीरास किती उष्णता मिळण्यासारखी आहे हें काढावे लागतें. शरीरपोषणाच्या दृष्टीनें मांसजनक पदार्थांची व स्निग्धांशाची किंमत शर्करासत्वादि पदार्थांपेक्षां २.५ पट ठोकळ मानानें धरतात व त्याप्रमाणें खाद्य पदार्थांत असलेल्या मांसजनक पदार्थांस व स्निग्धांशास २.५ नें गुणून सत्त्वाचें रूप देऊन त्यांत शेंकडा किती सत्तवमय भाग आहे हें काढतां येतें. त्यावरून व बाजारभावावरून त्या पदार्थांची एकमेकांशीं तुलना करतां येते. चार्यांत उपयुक्त सत्तवसम भाग शेंकडा किती आहे हें खालीं दिलेल्या सूत्राप्रमाणें काढावें (पोषणाच्या दृष्टीनें) शेंकडा’‘सत्तवसमभाग’‘= (स्निग्धांश दर शेकंडा + मांसजनक पदार्थ दर शेंकडा x २.५ + सत्तवादिपदार्थ दर शेंकडा.

उष्णतेचा पुरवठा यादृष्टीनें तुलना करावयाची असल्यास प्रत्येक : १०० पौंड खाद्यपदार्थांतील सर्व उपयुक्त घटकांचा उष्णता उत्पन्न करण्याकडे उपयोग झाल्यास त्यापासून किती : उष्णता मिळेल हें काढून तुलना करतात. मांसजनक पदार्थ व सत्तवादिपदार्थ यांच्या प्रत्येक पौंडापासून १८६० क्यालोरी उष्णता मिळते व स्निग्धांशाच्या एका पौंडापासून ४२२० क्यालोरी उष्णता मिळते तेव्हां खाद्य पदार्थांच्या १०० पौंडापासून किती उष्णता मिळेल हें खालील सूत्राप्रमाणें काढावें व खाद्य पदार्थांची परस्पर तुलना करावी. १०० पौंड खाद्य पदार्थांतील उष्णता (क्यालोरी) = (मांसजनकपदार्थ दर शेंकडा + सत्तवादिपदार्थ दर शेंकडा) १८६० + स्निग्धांश दर शेंकडा x ४२२०. त्या असल्या गणितांतील क्यालोरी म्हणजे एक पौंड पाण्याचें उष्णमान ४० वाढवण्यास जितकी उष्णता लागते तितकी उष्णता हें लक्षांत ठेवावें.

ज ना व रां च्या खा ण्या पि ण्या ची व्य व स्था.- जनावरांस नियमितवेळी खाण्यास दिलें पाहिजे व रोजचा खुराक अवश्य तितका पौष्टिक असला पाहिजे. रोजच्या खुराकाशिवाय जनावरास रोज नियमितवेळीं रानांत चरावयास नेलें पाहिजे व चा-याप्रमाणें पाणीहि नियमितवेळीं दिलें पाहिजे. दुभत्या जनावरांच्या बाबतींत त्यांनां नेहमीं हिरवा चारा मिळेल अशी व्यवस्था असावी. त्यांनां नुसत्या सुक्या किंवा नुसत्या हिरव्या चा-यावर ठेवूं नये. हिरव्या चा-याची व्यवस्था ठेवण्याकरतां लूसर्न, गिनी गवत, कडवळ, जई, वगैरे हिरवा चारा व हंगामाच्या वेळीं कडवळ गवत, हिरवें गवत वगैरे मुरवून ठेवावें म्हणजे वेळेनुसार त्याचा हिरव्या चा-याच्या ऐवजीं उपयोग करतां येतो. हिरवा चारा मुरवण्यांत (१) चारा फुलण्याच्या सुमारास कापून कडबा कापण्याच्या यंत्रानें त्याचे बारीक तुकडे करणें, (२) चारा मुरवण्याच्या कोठारांत तो कापलेल्या चा-या सारखा पसरून सर्वत्र सारखा दाबून त्यांतील शक्य तितकी हवा काढून टाकणें व (३) सर्व कोठार भरलें म्हणजे चारा हवा न जाईल अशा तर्हेनें झांकून ठेवणें यां मुख्य बाबी आहेत (सविस्तर माहितीकरितां लेखकाचें’‘दुभतें व दुभतीं जनावरें’' हें पुस्तक पान ९७ पहा). या बाबीकडे लक्ष दिलें म्हणजे चारा खराब होत नाहीं व तो चांगल्या स्थितींत पुष्कळ वेळ टिकतो. चार्यांत जर हवा राहिली किंवा गेली तर तो लवकर कुजून नासतो व खाण्यास निरुपयोगी होतो. चारा भरतांना त्यांत थोडें मीठ मिसळलें तर तो रुचकर होऊन दुभतीं जनावरें फार आवडीनें खातात. जो चारा जनावरांस द्यावयाचा तो बारीक करून दिला म्हणजे त्याची नासाडी होत नाहीं व तो चांगला चावला जाऊन त्याचें पचन चांगलें होतें. चारा बारीक करण्यास कडबा कापण्याचें यंत्र उपयोगांत आणलें असतां त्याचा चांगला उपयोग होतो. गुरांनां हिरवा व सुका चारा मिसळून द्यावा. पुष्कळदां चारा पाण्यांत भिजवून देतात. चारा कुजका किंवा किडका नसावा. त्यांत पानांचें प्रमाण जास्त असावें व ताट बारीक असावें. चार्यांत, लूसर्न, गवारी, भुईमूग, उडीद, मूग, वगैरेंचे वेल अगर भुसा मिसळल्यानें चारा जास्त रुचकर व पौष्टिक होऊन तो जनावरें आवडीनें खातात. पेंड, दाणा वगैरे पदार्थ भिजवून बारीक करून वेगळे अगर चा-याबरोबर मिसळून द्यावे. प्रथम दाणा भरडून नंतर भिजवून अगर शिजवून दिल्यानें चांगला चावला जातो व त्यामुळें त्याचें उत्तम पचन होऊन नासाडी होत नाहीं. चूण, कोंडा वगैरे पदार्थांबरोबर माती अगर इतर इजा करणारे पदार्थ न जातील अशी व्यवस्था असावी. पेंड, दाणा, कोंडा वगैरे किडके अगर कुजके किंवा बुरसलेले नसावेत. चारा, दाणा वगैरे सर्वच विकत घेणें असल्यास तो हंगामांत घेणें फायदेशीर असतें. कोंडा, चूण वगैरे पदार्थ एकदम फार घेऊं नयेत. कारण ते लवकर खराब होतात. चारा-दाणा नेहमीं चांगल्या कोरड्या जागेंत ठेवले म्हणजे खराब होत नाहींत. जनावरांस रोज थोडथोडें मीठ देत गेलें म्हणजे तीं निरोगी राहतात व चारा रुचकर होतो. लाहोरी मिठाचे मोठे खडे जनावरांशेजारीं ठेवल्यास तीं वाटेल त्यावेळीं तो खडा चाटीत बसतात व त्यांस हवें तेवढें मीठ मिळतें. मधून मधून चार्यांत फरक करावा व कधीं कधीं तेल, हळद, गूळ, ओवा, सुंठ, मिरें वगैरेंचा पाचक खुराक औषधाप्रमाणें द्यावा म्हणजे जनावरांची पचनशक्ति जोरावते. याशिवाय गव्हाचा कोंडा किंवा जवसाचें कूट पाण्यांत शिजवून पाजावें म्हणजे जनावरांचा कोठा साफ रहातो. जनावराचें दूध अटल्यावर पेंड वगैरे कांहीं दिवस देण्याची जरूरी नसते. भरपूर सुका व ओला चारा व रानांत चरणें पुरें होतें. मात्र जनावर विण्याच्या पूर्वी सुमारें दोन महिने थोडथोडा सकस चारा देण्यास सुरुवात करावी व तो हलके हलके वाढवावा म्हणजे जनावर विण्याच्या सुमारास, दूध देत असतांना जितका सकस चारा मिळत असेल तितका मिळावा. विण्याच्या पूर्वी १५।२० दिवस पचण्यास सुलभ असा चारा द्यावा व मधून मधून गव्हाचा कोंडा अगर जवसाचें कूट पाण्यांत शिजवून व थोडें मीठ टाकून पाजावें म्हणजे गाभण जनावराचा कोठा साफ रहातो व विण्याच्या वेळीं त्रास होत नाहीं. वाढत्या वांसरांनां चांगला पौष्टिक व सुलभ रीतीनें पचणारा असा चारा द्यावा; त्यांनां पेंड वगैरेहि द्यावी म्हणजे तीं जोमानें वाढतात. इतर जनावरांबरोबर त्यांस रानांत सोडल्यानें त्यांचे अवयव मोकळे होऊन तीं निरोगी रहातात व त्यांची वाढ उत्तम होते. वांसरांसहि गव्हांचा कोंडा व जवसाचें कूट मधून मधून शिजवून द्यावें. आजारी जनावरांस सहज पचेल असा चारा द्यावा. रुचकर चारा थोडथोडा दिल्यानें त्यांची प्रकृति लवकर सुधारेल. त्यांनां निबर कडब्याचा चारा देऊं नये. हरळी उत्तम असते. आजारी जनावरास मालकानें अगर त्याच्या सवयींच्या माणसानें हातानें त्यांनां आवडणारा चारा द्यावा म्हणजे त्यांनां फार समाधान होतें व त्यामुळें त्यांची प्रकृति लवकर सुधारते. खाण्यापिण्याच्या बाबतींत जनावरांची योग्य रीतीनें बरदस्त ठेवली म्हणजे तीं सहसा आजारी पडत नाहींत व आपलें काम योग्य रीतीनें करीत असतात.

दु भ त्या ज ना व रां ची नि गा.- दुभत्या जनावरांची निगा ठेवणें हें फार महत्त्वाचें आहे. गाई, बैल, वांसरे यांकरितां निरनिराळे गोठे असावेत; परंतु तशी व्यवस्था नसल्यास एकाच गोठ्यांत गाई एके ठिकाणीं; बैल, पोळ, एके बाजूस; म्हशी एके ठिकाणीं व वांसरें एकीकडे अशी बांधावींत. सर्वत्रांची खिचडी करून बांधूं नये. म्हणजे सर्व व्यवस्था ठीक राहते. कारण गाई, म्हशी, बैल, वांसरें वगैरेंच्या चार्यांत फरक असतो. त्याप्रमाणें चारादाण्याचीं वांटणी करणें सुलभ पडतें. गाई-म्हशींची धार काढण्यांत अडथळा येत नाहीं व मोठ्या जनावरांत वांसरें न मिसळल्यानें त्यांनां कोणत्याहि प्रकारचा उपसर्ग पोंचत नाहीं. जनावरांस दोरी अगर सांखळीनेंच बांधणे बरे पडतें. अलीकडे मिलिटरी डेअरीमधून लांकडाच्या अगर लोखंडी उघडत्या मिटत्या चौकटींत जनावरांचीं मान अडकवून त्यांनां डांबून ठेवण्याची विलायती पद्धत सुरू केलेली आढळते; परंतु आपल्या चालू परिस्थितींत दोरी अगर सांखळीच्या दाव्यानेंच जनावरें बांधणें बरें असतें. जनावरास, तें विशेष तापट असल्याखेरीज शिंगास दोरी लावून बांधूं नये. पायास दोरी बांधण्याची पद्धत वाईट. तीपासून जनावरांस अपाय होण्याचा संभव असतो. गळ्याला दावें लावून जनावरें बांधणें सर्वस्वीं उत्तम असतें.

जनावराचा गोठा धारेच्यापूर्वी निदान अर्धा तास तरी झाडून व धुवून साफ करावा, व जनावरांचें अंग रुमालानें अगर ब्रशानें साफ करावें. म्हणजे धार काढतांना दुधांत केरकचरा जाण्याचा संभव कमी असतो. गोठा साफ केल्यानंतर नियमित वेळीं धार काढावी व धार काढतांना’‘धार काढणें’‘या सदराखालीं माहिती दिल्याप्रमाणें सर्व व्यवस्थां ठेवावी. धार काढतांना जनावरांच्या अनुक्रमाप्रमाणेंच धार काढावी, त्यांत कधीं बदल करूं नये. हा अनुक्रम बदलल्यास ज्यांची धार नेहमीं प्रथम काढण्यांत येते त्यांचा पान्हा थोडा फार जिरून दुध कमी निघण्याचा संभव असतो. जनावरें बाहेर मोकळ्या व स्वच्छ जागेंत बांधण्याची व्यवस्था असून हवेची परिस्थिति अनुकूल असल्यास त्यांस बाहेर बांधून धार काढावी. अशा वेळीं धारेनंतर गोठे धुतले तरी हरकत नाहीं.

धार काढल्यानंतर जनावरांस व जाणत्या वांसरांस कुरणांत चरण्यास न्यावें. यावेळी पोळांनांहि त्यांबरोबर न्यावें. कुरणांत चरण्यास नेल्यानें स्वच्छ खुली हवा व उन्हाचा ताप त्यांनां हवा तितका मिळतो व त्यांनां मोकळेपणानें हिंडता फिरतां येतें, त्यांचे पाय मोकळे होतात, बेताच्या व्यायामामुळें रुधिराभिसरण चांगलें होतें, चारादाणा चांगला पचतो, व तीं निरोगी राहून त्यांपासून उत्तम दूध मिळतें. वाढत्या जनावरांचीं वाढ जोमानें होतें. याप्रमाणें निदान तीन तास तरी जनावरांस कुरणांत ठेवावें. गाभण जनावरांची विण्याची वेळ जवळ आली असल्यास त्यांनां कुरणांत चरण्याकरितां पाठवूं नये म्हणजे पुष्कळ आघात टळतात. मोठीं जनावरें कुरणांत चरण्यास गेल्यावर लहान वांसरांस बागडण्याकरितां मोकळ्या आवारांत सोडावें म्हणजे तीं मनमुराद बागडतात व त्यामुळें तीं खुरटीं न रहातां जोमानें वाढून निरोगी रहातात. फार पावसामुळें जनावरांस बाहेर नेतां येत नसल्यास गोठ्यांतच मालिस करावें म्हणजे यांचें अंग स्वच्छ होऊन रुधिराभिसरण चांगलें होऊन त्यामुळें फायदा होतो.

जनावरांचें अंग चोळून धुवून स्वच्छ ठेवावें म्हणजे पिसा, तांबवा, गोचीड, गोमाशा वगैरेंपासून जनावरांचा बचाव होऊन खरूज, नायाटे, केंस गळणें वगैरे रोग होत नाहींत. अंग धुवून स्वच्छ करतांना जनावरास कोठें कांहीं दुखापत वगैरे झाली असल्यास ती नजरेस येऊन तिजवर वेळींच उपचार करणें बरें पडतें. त्यांचें अंग धुतल्यानें केंस स्वच्छ, मऊ व तुळतुळीत होऊन जनावरें दिसण्यांत चांगलीं दिसतात. म्हशींनां रोज धुतलेंच पाहिजे. गाईंनां ८।१५ दिवशीं धुतलें तरी चालतें. जवळपास नदी असल्यास जनावरांस पोहण्यास न्यावें म्हणजे त्यांनां व्यायाम मिळून त्यांचें अंगहि स्वच्छ होतें.

खाण्याविषयीं’चारा पाणी’या सदराखालीं माहिती दिल्याप्रमाणें व्यवस्था ठेवावी. लहान वांसरें, गाभण जनावरें, आजारी जनावरें, यांचें खाणेंपिणें वगैरेबद्दल विशेष खबरदारी घ्यावी. निगेसंबंधी सर्व गोष्टी नियमित वेळीं व विशेष काळजीनें कराव्या व इतर जनावरांपासून त्यांस कोणत्याहि प्रकारचा त्रास होऊं देऊं नये. जनावरांच्याखालीं पालापाचोळा वगैरे पसरून बिछाली करावी. विशेषत: थंडीच्या दिवसांत बिछालीची विशेष आवश्यकता असते. बिछालीमुळें अंगास चांगलीं ऊब येऊन जनावरास आराम मिळतो व खताच्या दृष्टीनेंहि फायदा होतो. मात्र शेधामुतानें ओली झालेली बिछाली रोज काढून खतांत टाकली पाहिजे व निदान ८-१५ दिवसांनीं सर्व बिछाली गोळा करून त्यांतील भुगा खतांत टाकून चांगला भाग घेऊन त्यांत नवा पालापाचोळा मिसळावा व गोठ्याची जमीन स्वच्छ धुतल्यावर बिछाली पसरावी. अशा रीतीनें बिछाली बदलली नाहीं तर पिसा वगैरे होऊन जनावरांस त्रास होतो. बिछालीच्या पाल्यापाचोळ्यांत कांटे, कांचांचे तुकडे वगैरे इजा करणारे पदार्थ न जातील अशी खबरदारी घ्यावी. सर्व जनावरांशीं सर्वदां ममताळूपणानें वागावें म्हणजे तीं आनंदी व गरीब स्वभावाचीं होतात व त्यांनां आपला लळा लागतो. वरचेवर त्यांच्या जवळ जाऊस त्यांस थोपटावें, चुचकारावें, अंगावरून हात फिरवावा व प्रेमानें त्यांच्या नांवानें हांका मारून गोड शब्दांनीं त्यांच्याशीं बोलावें. मधून मधून आपल्या हातीं चारा घेऊन त्यांनां तो चारावा म्हणजे त्यांनां फार आनंद वाटतो. दुभत्या जनावरांशीं प्रेमानें व ममतेनें वागल्यास तीं कधींहि पान्हा चोरीत नाहींत. त्यांच्यावर प्रेम करणा-या मनुष्याशिवाय इतर कोणी धार काढण्यास गेल्यास तीं नेहमींपेक्षां दूध कमी देतात. याचें कारण प्रेमाचा किंवा संवयीचा अभाव हेंच असतें. जनावरांशीं कठोरपणानें वागल्यास तींहि कठोर होतात व कोणासहि न जुमानतां खोड्याळ होतात. जनावरांस निष्ठुरपणानें केव्हांहि मारूं नयें व त्यांच्यावर मोठ्यानें ओरडूं नये. त्यांचें लक्ष्य दुसरीकडे असतांना त्यांनां हांक मारल्याशिवाय त्यांच्या जवळ एकदम जाऊं नये अगर कोणत्याहि रीतीनें तीं बुजतील व बिघडतील असें करूं नये. याविषयीं विशेषत: नुकत्याच व्यालेल्या जनावरांच्या बाबतींत विशेष खबरदारी घ्यावी.

दू ध, त्या चे गु ण ध र्म व प री क्षा, दुधाची उत्पत्ति:- सस्तन प्राण्यांच्या मातृपद मिळालेल्या मादीच्या’‘दुग्धोत्पादक पिंडांत’‘(स्तनांत) उत्पन्न होणारा रस हेंच '‘दूध’‘होय. सस्तन प्राण्यांच्या शरींरांत दुग्धोत्पादक पिंड दोन असतात. एक उजव्या बाजूस व एक डाव्या बाजूस असतो. दुग्धोत्पादक पिंडाचे योनिपरत्वें दोन अगर त्यापेक्षां अधिक विभाग झालेले असतात व प्रत्येक विभागाकरितां एक आंचळ असतें. कांहीं योनींतील प्राण्यांच्या दुग्धोत्पादक पिंडांचे मुळींच विभाग झालेले नसतात म्हणून प्रत्येक पिंडास एकच आंचळ असतें. याशिवाय योनिपरत्वें दुग्धोत्पादक पिंडातील अंतर कमी अथवा अधिक असतें. गाय, म्हैस वगैरेंच्या योनींत दोन्ही दुग्धोत्पादक पिंड अगदीं एकमेकांस चिकटलेले असल्यामुळें त्यांच्यांत मुळींच अंतर अंतर नसतें. दोन्ही दुग्धोत्पादक एकमेकांस चिकटून एकच कांस होते; परंतु प्रत्येक दुग्धोत्पादक पिंडाचे दोन विभाग असल्यानें एक एक विभागास एक एक आंचळ असून कांसेस एकूण चार आंचळे असतात. दोन्हीं दुग्धोत्पादक पिंड एकमेकांस स्नायूच्या योगानें चिकटलेले असतात. दुग्धोत्पादक पिंडांत शुद्ध व अशुद्ध रक्तवाहिन्या, मज्जातंतू, मेदोवाहिन्या, दुग्धवाहिन्या यांचें जाळें असून, पिंडाचा मुख्य दुग्धोत्पादक भाग’‘दुग्धोत्पादक पेशी’‘(ऍसिनी) हा असतो. दुग्धोत्पादक पिंडांत दूध कसें तयार होतें याविषयीं शास्त्रज्ञांनीं अनेक मतें पुढें आणिलीं आहेत. परंतु अद्यापपर्यंत संमत असा सिद्धांत पुढें आलेला नाहीं. एवढी गोष्ट सिद्ध झाली आहे कीं, दुग्धोत्पादक पिंडात अनेक घडामोडी होऊन दूध तयार होतें व या घडामोडीस मज्जातंतूंचें उत्तेजन व भरपूर उक्तप्रवाह यांची आवश्यकता असून दूध उत्पन्न होतांना त्यांत अन्न, मेद व रक्त यांच्या घटकांपैकीं कांहीं घटक जसेच्या तसेच व कांहीं रूपांतर होऊन येत असावे. पूर्वी एका काळीं दूध हें रक्ताचें रूपांतर आहे असें मत प्रचलित होतें परंतु तें आतां खोटें ठरलें आहे. त्या काळीं रसायनशास्त्रांत फारशी प्रगति झाली नव्हतीं व निरनिराळ्या दृष्टीनें परीक्षण करण्याचीं साधनेंहि उपलब्ध नव्हतीं. रक्ताचे घटक जे’‘श्वेत’‘व’‘पीत’‘सूक्ष्म शरीरें (ब्लड कॉरपस्कल्स) निरोगी ते जनावरांच्या दुधांत केव्हांहि नसतात. रक्तांत दुधाइतका स्निग्धांश केव्हांहि नसतो. दुधांत असलेले मांसजनक पदार्थ रक्तांत त्याच रूपांत कधींहि नसतात. दुधांत असलेली दुग्धशर्करा रक्तांत नसते व रक्तांत दुधाइतके पोटॅंशियमचे क्षार केव्हांहि नसतात. यावरून दूध हें रक्ताचें रूपांतर नसून दूध हा रसदुग्धोत्पादक पिंडांत स्वतंत्रपणें उत्पन्न झालेला रस आहे हें उघड आहे. दुग्धोत्पादक पिंडांत निरनिराळ्या घडामोडी होऊन जे निरनिराळे पदार्थ उत्पन्न होतात त्या सर्वांचें जें एक मिश्रण तयार होतें तेंच दूध होय.

दु धा चे घ ट क.- दूध हें (१) पाणी, (२) स्निग्ध पदार्थ, (३) मांसजनक (प्रोटीड) पदार्थ, (४) दुग्धशर्करा व (५) निरिंद्रिय क्षार हे मुख्य पांच पदार्थ मिळून तयार झालें आहे; म्हणून हेच पदार्थ दुधाचे मुख्य घटक होत. थोड्याशा दुधांत दुप्पट तिप्पट पाणी घालून तें’‘सूक्ष्म वीक्षणींतून’‘(मायक्रास्कोप) पाहिलें असतां असतां स्निग्ध पदार्थाचे हजारों अतिसूक्ष्म बिंदू पाण्यासारख्या पारदर्शक पातळ पदार्थांत तरंगत असलेले दिसतात व हेच स्निग्ध पदार्थांचे सूक्ष्म बिंदू दूध बराच वेळ स्थिर ठेवलें म्हणजे त्याच्या वरच्या भागांत एकत्रित होऊन दुधावर’‘साखा’‘जमतो. यावरून दूध हें निरनिराळ्या पदार्थांचें मिश्रण आहे हें उघड आहे.

स्निग्धांशाच्या या तरंगत्या सूक्ष्म बिंदूशिवाय मांसजनक पदार्थांचा कांहीं भागहि तरंगत्या स्थितींत असतो व या तरंगत्या भागामुळेंच दुधास पांढरा रंग येतो. दुध नासलें म्हणजे किंवा त्यांत एखादें अम्ल घालून गरम केलें म्हणजे या तरंगत्या पदार्थांचा चोथा तयार होतो व पाणी व त्यांत विरलेले पदार्थ निराळे होतात. यावरून दुधाचा पांढरा रंग या तरंगत्या पदार्थामुळेंच असतो हें उघड आहे. दुग्धशर्करेमुळें त्यास गोडसर चव येते. योनि व जातिपरत्वें दुधाचे पाणी, स्निग्ध पदार्थ, मांसजनकपदार्थ, दुग्धशर्करा व निरिंद्रियक्षार या घटकांचें सरासरीं शेंकडा प्रमाण कांहीं मर्यादेबाहेर जात नाहीं हें पुढील आंकड्यावरून लक्षांत येण्यासारखें आहे.

गाय व म्हैस यांच्या दुधांतील घटक अनुक्रमें (सरासरी शेंकडा):- पाणी ८५.३० व ८१.७; स्निग्धांश ५.५५ व ८.१५; मासंजनक पदार्थ ३.६७ व ४.३२; दुग्धशर्करा ४.६६ व ५.०१; निरिंद्रियद्रव्यें ०.७६ व ०.८२.

दुधाच्या घटकांपैकीं स्निग्धपदार्थ पाण्यापेक्षां हलके, व मांसजनक पदार्थ, दुग्धशर्करा व निरिंद्रियक्षार हे पदाथ्र पाण्यापेक्षां जड असल्यामुळें त्यांच्या परस्परप्रमाणाप्रमाणें दुधाचें विशिष्टगुरुत्व कमीजास्त होतें व तें विशिष्ट मर्यादेबाहेर जात नाहीं. साधारणपणें वर दिलेल्या प्रमाणांत घटक असले म्हणजे गाईच्या दुधाचें विशिष्टगुरुत्व १.०२९ ते १.०३० व म्हशीच्या दुधाचें १.०३१० ते १.०३१६ या मर्यादेंत असतें. परंतु एकाच जनावराचें दूध घेतल्यास त्याचें विशिष्ट गुरुत्व १.०२८ ते १.०३४ पर्यंत सुद्धां असतें. साधारणपणें तुलना व परीक्षा करण्यासाठीं विलायतेंत दुधाचें विशिष्टगुरुत्व १.०३२ धरतात. परंतु आपल्या इकडील दुधाचे गुणधर्म लक्षांत घेतां दुधाचें विशिष्टगुरुत्व १.०३० धरलें पाहिजे.

योनिपरत्वें दुधास एक प्रकारचा वास येतो. शिवाय रोगी जनावराच्या दुधास नेहमींपेक्षां निराळा वास येतो. दुधांत निरनिराळे निरिंद्रिय क्षार असल्यानें निळ्या व तांबड्या लिटमस रंगावर परिणाम होऊन’‘द्विगुणप्रतिक्रिया’' (ऍंफोटेरिक रीऍक्शन) होते व दोन्ही रंग बदलतात, हा एक दुधाचा विशेष गुण आहे. दूध जसजसें शिळें होत जातें तसतसें त्यांस अम्लाचें प्रमाण वाढतें व त्यामुळें निळा लिटमसरंग तांबडा होण्याची प्रतिक्रिया त्या मानानें अधिक होत जाते. दूध तापवले म्हणजे उष्णतेचा दुधावर परिणाम होऊन त्यांत फरक होतो. त्याचें उष्णमान १४०० झालें म्हणजे मांसजनक पदार्थावर हवेंतील प्राणवायूचा परिणाम होऊन साय येऊं लागते. त्याचें उष्णमान १७६० झालें म्हणजे त्यांतील दुग्धशर्करा करपावयास लागून त्याचा रंग तांबूस व्हावयास लागतो व २१४० उष्णमान झालें म्हणजे तें उकळावयास लागतें व मांसजनक घटकांशीं संयुक्त असलेले चुन्याचे क्षार भांड्याच्या बुडाशीं बसून त्यांची’खरवड’होऊं लागते. १५८० उष्णतेमुळें मांसजनक घटकांपैकीं एक घटकाचे (अल्ब्यूमिन्) रूपांतर होऊन तें घट्ट होतें; व दूध ३३० पर्यंत थंड केलें म्हणजे तें गोठतें. याशिवाय उष्णतेमुळें १५८० दुधाच्या वासांत फरक पडतो. घृतांशाबरोबर बराचसा भाग साईंत येतो, आणि त्यांत असलेले वायू निघून जातात. दुधाच्या अंगीं कोणत्याहि प्रकारचा वास शोषून घेण्याचा धर्म असतो म्हणून दुधाशेजारीं कोणताहि वासाचा पदार्थ ठेवल्यास तो वास दुधास लागतो.

पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, मांसजनक पदार्थ व निरिंद्रिय क्षार या मुख्य घटकांशिवाय शेंकडा कर्बाम्लवायु ३.२७, प्राणवायु १९.१३ व नायट्रोजन ७७.६० या प्रमाणांत दुधांतल्या शोषलेल्या हवेंत असतात. याशिवाय ताज्या दुधांत रक्तांतल्यासारखे श्वेतपिंड (ल्यूकोसाइटस्) असून मूत्रिका (सायट्रेट्स) सूक्ष्म प्रमाणांत असतात. गाढवीण व मेंढी यांच्या दुधांत’‘पाचक पदार्थ’‘(एनझाईम) असतो व सांसर्गिक रोगानें जनावर आजारी असल्यास त्या रोगाचे जंतू दुधांत येतात. पाणी, स्निग्ध पदार्थ, मांसजनक पदार्थ, दुग्धशर्करा व निरिंद्रियक्षार या घटकांपैकीं पाणी व स्निग्धपदार्थ यांच्या शेंकडा प्रमाणांत बराच फरक पडतो तितका फरक मांसजनक पदार्थ, दुग्धशर्करा व निरिंद्रियक्षार यांच्या प्रमाणांत पडत नाहीं. योनि, जात, वैयक्तिकधर्म (इंडिव्हिज्युआलिटी) खाणें, वयमान, शरीराचें स्वास्थ्य, दुग्धप्रधानकाल (लॅक्टेशन पीरिअड), धार काढण्याच्या वेळेंतील अंतर, ऋतु हवामान आणि मानसिक स्वास्थ्य वगैरे कारणांनीं फरक पडतो हें पुढें दिलेल्या कोष्टकावरून सहज लक्षांत येईल.
 

    
गाय व म्हैस यांच्या दुधांतील निरनिराळ्या घटकांचें शेंकडा सरासरी प्रमाण पुढीलप्रमाणें असतें; गाईचें दूध:- पाणी ८५.३१, स्निग्धांश ४.९, मांसजनक पदार्थ ३.२, दुग्धशर्करा ४.५७, व निरिंद्रिय क्षार ०.७२, म्हशीचें दूध:- पाणी ८२.९, स्निग्धांश ७.६९, मांसजनक पदार्थ ४.११, दुग्धशर्करा ४.४८ व निरिंद्रिय क्षार ०.७८.

धार काढतांना प्रथम व शेवटीं निघणा-या दुधांतील घटकांचे फरक होतात ते शेंकडा प्रमाणांत दिले आहेत.

आरंभीची धार स्निग्धांश पाणी इतर घटक
पहिला भाग १.१० ८९.४२ १०.५८
शेवटचा भाग ७.८८ ८३.३७ १६.६५
शेवटची धार १०.०० ८०.६० १९.४०

गाईच्या दुधांत वयोमानाप्रमाणें पडणारा स्निग्धांशाचा फरक शेंकडा प्रमाणांत पुढील प्रमाणें पडतो:- पहिलें वेत ४.८८, दुसरें वेत ५.१, ३ रें वेत ५.०९, चवथें वेत ४.८२, पांचवें वेत ४.६८, सहावें वेत ४.५९, व सातवें वेत ४.५७,

योनिपरत्वें निरनिराळ्या प्राण्यांच्या दुधांतील फरक व घटकांचें शेंकडा प्रमाण

 

नांव पाणी स्निग्धांश मांसजनक
घटक
दुग्ध
शर्करा
निरिंद्रिय
क्षार
मनुष्य ८६.७३ ४.१३ १.९९ ६.९३ ०.२०
गाय ८५.३० ५.५५ ३.६७ ४.६६ ०.७६
म्हैस ८१.७० ८.१५ ४.३२ ५.०१ ०.८२
मेंढी ८२.२७ ५.०३ ७.०१ ४.०२ १.००
गाढवीन ९१.१७ १.०२ १.७९ ५.०५ ०.४२
घोडी ८८.०८ २.०५ २.९९ ५.६१ ०.५०
सांडीण ८६.९४ २.०९ ३.८४ ५.६६ ०.६६
डुकरीण ८४.०४ ४.५५ ७.२३ ३.१३ १.०५
कुत्री ७६.६० ९.५५ ९.९१ ३.१९ ०.७३
भाटी ८१.७३ ३.३३ ९.५४ ४.९१ ०.५८
हत्तीण ६७.८५ १९.५७ ३.०९ ८.८४ ०.६५

 

चीक:- जनावर व्याल्यानंतर पहिल्या दिवशीं जो चीक निघतो तो रंगानें जास्त पिंवळट असून साध्या दुधापेक्षां जास्त दाट असतो. जनावर व्याल्याबरोबर प्रथम जो चीक निघतो त्यांत दुग्धोत्पादक पिंडांतल्या अंतस्त्वचेचा (एपिथेलियम) कांहीं भाग जशाचा तसाच येतो; कारण दुग्धोत्पादक पिंडांत ज्या घडामोडी होऊन दूध तयार होतें त्या पूर्णत्वास पोंचलेल्या नसतात. या करितांच चीक निषिद्ध समजला जात असावा. चिकामध्यें थोडासा सारक गुण आहे व त्यामुळें वासरांचा कोठा साफ करण्यास त्याचा उपयोग होतो. चिकांत मांसजनक घटकाचें प्रमाण फार असतें. केसीनपेक्षां अल्ब्यूमिनचें प्रमाण अधिक असतें त्यामुळें कच्चा चीक गरम केला कीं अल्ब्यूमिनचें रूपांतर होऊन तें घट्ट होतें, व’‘खरवस’‘तयार होतो. चिकांत मांसजनक घटकाचें प्रमाण फार असल्याचें चीक व त्यापासून केलेला खरवस पचण्यास फार जड असतो. चिकांत निरनिराळ्या घटकांचें शेंकडा प्रमाण साधारणपणें काय असतें तें खालीं दिलें आहे.

गाईच्या चिकांतील घटकांचें शेंकडा प्रमाण:- (जानस्टन यांच्या शोधावरून) पाणी ७८.८, स्निग्धांश ३.५, मांसजनक घटक १२.७, दुग्धशर्करा ४.२ व निरिंद्रिय क्षार ०.८.

सू क्ष्म जं तू व त्यां चा दु धा व र प रि णा म.- दुधावर’‘सूक्ष्मजंतू’‘(बॅक्टिरिआ) चा परिणाम फार लवकर होतो. हे सूक्ष्म जंतू क्षुद्र वनस्पतीच असतात. एका जातीच्या सूक्ष्म जंतूच्या दुधाच्या घटकांपैकीं दुग्धशर्करेवर प्रथम परिणाम होऊन तिचें विघटीकरण होतें व’‘दुग्धाम्ल’‘(लॅक्टिक अॅसिड) व’‘कर्बाम्लवायु’‘(कार्बन डाय ऑक्साइड) तयार होतात. नंतर दुग्धाम्लाचा केसीनवर परिणाम होऊन त्याचें रूपांतर होतें व तें घट्ट होतें. हा फरक घडवून आणणा-या सूक्ष्म जंतूंस’‘दुग्धाम्ल जंतु’‘(लॅक्टिक बॅक्टिरिआ) म्हणतात व या दुग्धाम्लजंतूंमुळेंच दहीं विरजतें. म्हणून दह्यापासून केलेल्या पदार्थांत ते असंख्य असतात. परंतु हे जंतू अपायकारक नसून त्यांच्या सहाय्यानें अन्नपचनास मदत होते. ताकास पाचकपणा यामुळेंच येतो असें म्हणण्यास हरकत नाहीं. हे जंतू सर्वत्र असतात म्हणून दूध उघडें राहून शिळें झालें म्हणजे नासतें. सूक्ष्म जंतूंच्या जाती पुष्कळ आहेत व त्यांच्या जातींप्रमाणें निरनिराळे फरक घडून येतात. कांहीं जातींच्या योगानें दुग्धशर्करेपासून कर्बाम्ल वायु व दारूच्या (अल्कोहल) जातीचे पदार्थ उत्पन्न होतात. कांहीं जातींमुळें मांसजनक पदार्थ कडवट होतात. कांहींमुळें त्यास तार व चिकटपणा येतो. कांहींमुळें त्यांचें विघटीकरण होऊन’‘सल्फ्यूरेटेड हायड्रोजन’',’‘कार्बरेटेड हायड्रोजन’‘व’‘फास्फरेटेड हायड्रोजन’‘वगैरे वायू उत्पन्न होऊन अति वाईट घाण सुटते व कांहींमुळें स्निग्ध पदार्थांचें विघटीकरण होतें. लोणी फार दिवस निष्काळजीपणानें ठेवलें म्हणजे त्यास जी वाईट घाण येऊं लागते ती ब्युटिरिनचें विघटीकरण होऊन जें’‘ब्यूटिरिक अॅसिड’‘तयार होतें त्यामुळें येते. सूक्ष्म जंतू अति सूक्ष्म असून सर्वत्र असल्याकारणानें जर दूध व त्यापासून केलेले पदार्थ वापरण्यांत  थोडासा निष्काळजीपणा झाला तर सूक्ष्म जंतूंची वाढ तेव्हांच होऊन ते पदार्थ बिघडतात व याकरितांच दूधदुभत्याच्या स्वच्छतेसंबंधीं फारच काळजी घ्यावी लागते. दुधाच्या द्वारें निरनिराळ्या सूक्ष्मजंतूंमुळें उत्पन्न होणारे रोग पसरतात व अनेकांस प्राणांस मुकावें लागतें. अगदीं धारोष्ण दूध जरी घेतलें तरी त्यांत हजारों दुग्धाम्ल जंतू असतात. त्यांतल्या त्यांत धार काढतांना प्रथम निघणा-या दुधांत शेवटीं निघणा-या दुधांतल्यापेक्षां जंतूंची संख्या अधिक असते. साधारपणें व्यवहारांत वापरल्या जाणा-या दुधांत जंतुविरहित दूध नसतेंच असें म्हणण्यास हरकत नाहीं. थंडीच्या दिवसांत त्यांची संख्या कमी असते व पावसाळ्यांत सर्वांत अधिक असतें. डॉ. जोशी यांच्या मतें हिंवाळ्यांत एक घन इंच दुधांत ३२ लक्ष व पावसाळ्यांत ८० लक्ष यांच्या आंत सूक्ष्म जंतूंची संख्या असावी. व्यवहारांत सूक्ष्म जंतूंची संख्यागणना शक्यच नाहीं म्हणून दूध १५।२० मिनिटें उकळावें व नंतरच वापरावें हाच एक सुरक्षित मार्ग आहे. जनावरास जर सांसर्गिक रोग झाला तर त्या रोगाचे जंतू त्याच्या दुधांत येतात. पाश्चात्य देशांत क्षयी जनावरांच्या दुधानें मनुष्यास क्षयरोग होत असतो. आपल्या हिंदुस्थानदेशाचें हवामान व एकंदर परिस्थिति भिन्न असल्यामुळें इकडच्या जनावरांस क्षयरोग होत नाहीं. गाईंना फारच क्वचित् क्षयरोग होतो. म्हशीस तो झाल्याचीं उदाहरणें नाहींत व शेळीच्या दुधाचा आपल्याकडे क्षयावर औषधाप्रमाणेंच उपयोग करतात. सूक्ष्म जंतूंची वाढ उष्णतमान ३९० ते १२२० या मर्यादेंत शक्य असते. त्याबाहेर उष्णमान असल्यास
वाढ होत नाहीं. परंतु त्यांचीं बीजें मात्र मरत नाहींत. अर्थात् दूध उकळल्यास त्यांचीं बीजें सुद्धां मरून जाऊन तें पूर्णपणें जंतुविरहित होतें. दूध थंड होऊन गोठलें तरी सुद्धां त्यांत असलेले सूक्ष्मजंतु-बीज मरत नाहीं व म्हणूनच दूषित दुधापासून केलेला’‘मलाईका बरफ’‘(ऐस्क्रीम) खाण्यानें अपघात झाल्याचीं उदाहरणें घडून आलीं आहेत व अजून येतातहि. यावरून दूध व त्याचे पदार्थ वापरण्यांत
व ते तयार करण्यांत कोणत्याहि प्रकारें ते बिघडणार नाहींत याविषयीं दक्षता व स्वच्छता ठेविली पाहिजे.

दू ध व श री र पो ष ण:- दुधांत पाणी, स्निग्धपदार्थ, दुग्धशर्करा व निरिंद्रिय क्षार असल्यानें शरीरपोषणास आवश्यक असणारीं सर्व द्रव्यें त्यांत असतात. म्हणून पौष्टिक व सात्त्विक अन्न या दृष्टीनें तें महत्त्वाचें आहे. त्यांत असलेल्या स्निग्ध पदार्थांच्या योगानें शरीरांत उष्णता उत्पन्न होते, निरनिराळीं कार्यें घडून येण्यास आवश्यक लागणा-या शक्तीचा पुरवठा होतो व प्रसंगानुसार या कार्यास उपयोगी पडण्याकरितां वसेचा (चरबी) सांठा शरिरांत होतो. मांसजनक घटकांच्या योगानें स्नायूंची वाढ होते व प्रसंगानुसार स्निग्धपदार्थांचीं कार्येंहि त्यांच्यांमुळें होतात. दुग्धशर्करेनें स्निग्ध पदार्थांचीं सर्व कार्यें घडून येऊन दुधास गोड चव येते. निरिंद्रिय क्षारांच्या योगानें शरीरांतील अस्थिपंजरांची वाढ होते. यांपैकीं दुग्धशर्करा, मांसजनक पदार्थांपैकीं अल्ब्यूमिन व निरिंद्रियक्षारांपैकीं कांहीं भाग विरलेल्या स्थितींत असतात; आणि मांसजनक पदार्थांपैकीं केसीन, निरिंद्रिय क्षारांचा कांहीं भाग व स्निग्धांश हे तर त्या स्थितींत असतात व त्यांचे कण इतके सूक्ष्म असतात कीं, ते त्या स्थितींत आहेत याची खात्री आपल्या नुसत्या चक्षूंनीं पटणार नाहीं. स्निग्ध पदार्थांचे सूक्ष्म बिंदु उत्तम सूक्ष्म वीक्षणीनें दिसतात तरी पण ते मांसजनक पदार्थ व निरिंद्रियक्षार सूक्ष्मवीक्षणींनेंहि दिसत नाहींत. अशी परिस्थिति असल्यानें अन्नाचें पचन करणा-या रसांचा त्यांवर परिणाम होऊन ते अगदीं सुलभपणें पचून जातात. नुकत्याच जन्मलेल्या अपत्याचें जीवित कायम राखण्यास व त्या कोमल अवस्थेंत त्याच्या शरीराचें पोषण करून तें वाढीस लावण्यास जन्मदात्या आईच्या दुधासारखें अन्न या भूतलावर दुसरें कोणतेंहि नाहीं आणि म्हणूनच या ईश्वरदत्त अन्नास’‘भूलोकीचें अमृत’‘असें अर्थपूर्ण नांव मिळालें आहे. खरोखर पाहिलें असतां गर्भधारणा, अपत्यजनन, नियमित कालपर्यंत दुग्धोत्पत्ति, प्रसवकालानंतर नियमित कालांतरानें पुनर्रजोदर्शन व त्यानंतर पुन्हां गर्भधारणा या गोष्टींचा विचार केल्यास दुग्धोत्पत्ति फक्त अपत्यसंगोपनार्थच आहे याची सत्यता मनास पटल्यावाचून रहात नाहीं व अपत्याकरितां निर्माण झालेल्या अन्नाचा ज्यांस दुस-या अन्नांवर निर्वाह करण्याची पात्रता आहे अशांनीं अपहार करणें म्हणजे ईश्वरी योजनेची थट्टा करणें आहे व मनुष्यप्राण्याशिवाय इतर कोणत्याहि प्राण्यांत न दिसून येणारा आपलपोटेपणा आहे यांत संशय नाहीं. परंतु दुधाकरितां जनावरें पाळून त्यांच्या दुधाचा अन्नासारखा उपयोग करण्याची वहिवाट अनादिकालापासून चालत आली असून ती इतकी हाडींमांसीं भिनली आहे कीं, दुस-या योनींतील प्राण्याच्या दुधाचा उपयोग करणें म्हणजे आपलपोटेपणा होय ही कल्पनासुद्धां मनांत येत नाहीं. सारांश इतकाच कीं ही अपालपोटेपणाची तात्त्विक दृष्टि जरा एका बाजूस ठेवून सुदृढ माणसांनीं वांसरें, लहान मोठीं मुलें, म्हातारीं आणि अशक्त माणसें यांचीं गरज भागवून उरलेलें दूध स्वत:करितां उपयोगांत आणण्याची प्रवृत्ति ठेवावी कारण त्यांचाच हक्क दुधावर प्रथम पोंचतो.

दु धा ची प री क्षा.- दुध अस्सल व शुद्ध आहे कीं नाहीं हें पाहण्याकरितां त्याचे गुणधर्म लक्षांत घ्यावे लागतात व परीक्षा करतांना तुलना करण्याकरितां त्याच्या घटकांचें सरासरीचें शेंकडाप्रमाण ठरवावें लागतें. दुधाच्या घटकांपैकीं पाणी व स्निधांश यांच्या शेंकडा प्रमाणांत सर्वांत अधिक फरक पडलेला दिसतो व मांसजनक घटक, दुग्धशर्करा, व निरिंद्रियक्षार यांच्या शेंकडाप्रमाणांत विशेष फरक पडत नाहीं. म्हणून परीक्षे करितां स्निग्धांशविरहित घन पदार्थ (मांसजनक पदार्थ,दुग्धशर्करा व निरिंद्रियक्षार) व पाणी यांचें मध्यम शेंकडाप्रमाण तुलनेकरितां ठरवावें लागतें व नंतर परीक्षेकरितां घेतलेल्या दुधाच्या नमुन्यांत त्यांचें शेंकडा प्रमाण किती आहे हें काढून व शुद्ध दुधांतील मध्यम शेंकडाप्रमाणाशीं तुलना करून तो परीक्षेस घेतलेला दुधाचा नमुना शुद्ध आहे कीं भेसळीचा आहे हें ठरवावें लागतें. दुधाची भेसळ खालीं दिलेल्या रीतीनें केलेली बहुधां आढळते. (१) गाई म्हशींचें वगैरे दूध एके ठिकाणीं मिसळणें अगर त्या मिश्रणांत पाणी घालणें : (आ) शुद्ध दुधांत पाणी मिसळणें; (इ) शुद्ध दुधांतील थोडा फार स्निधांश काढून घेणें व त्यांत पाणी मिसळणें; (ई) विलायती पद्धतीनें क्रीम काढून घेतलेलें दुध शुद्ध दुधांत मिसळणें व त्यांत पाणी घालणें;(उ) शुद्ध दुधांत पाणी मिसळून त्यांत तांदूळ, बटाटे वगैरेंचें सत्तव (स्टार्च) अगर साखर मिसळणें.

हे व अशा प्रकारचे भेसळीचे प्रकार वर दिल्याप्रमाणें दुधाची परीक्षा केल्यास उघडकीस येतात. दुधाची परीक्षा करतांना खालीं दिलेल्या बाबतींत परीक्षा करावी.

(१) दुधाचा रंग, वास व चव यावरून पाण्याची भेसळ,निरनिराळ्या दुधांची भेसळ, साखरेची भेसळ, व दूध तापवलें आहे कीं नाहीं याची थोडी फार कल्पना येते.

(२) सूक्ष्म वीक्षणीनें परीक्षा करणें, यानें दुधांतील केरकचरा शिजविल्याशिवाय सत्त्व घातलें असल्यास कळतें.

(३) विशिष्टगुरुत्व काढणें, यानें स्निग्धांशविरहित घन पदार्थांचें प्रमाण काढतां येतें.

(४) स्निग्धांशाचें शेंकडा प्रमाण काढणें, यानें स्निग्धांश विरहित घनपदार्थांचें शेंकडा प्रमाण कळतें.

अशा रीतीनें परीक्षा करण्यास’सूक्ष्मवीक्षणी’व तिचीं उपकरणें,’उष्णतामापकयंत्रें’,’विशिष्टगुरुत्वमापक यंत्र’,
‘स्निग्धांशमापकयंत्र’(ब्युटिरामिटर) व त्याचीं उपकरणें व गणित करण्यास लागणारीं कोष्टकें व’चलग्दुणनी’(स्लाइड रूल, मिल्क स्केल) वगैरे साधनांची आवश्यकता असते. वर दिलेल्या प्रकारानें दुधाची भेसळ केली असल्यास विशिष्टगुरुत्व व स्निग्धांशविरहित घनपदार्थ यांच्या शेंकडाप्रमाणांत फरक पडतो, व त्यामुळें तुलनेनें भेसळ तेव्हांच उघडकीस येते. दुधांत पाणी घातल्यानें दुधाच्या घटकांचें शेंकडा प्रमाण व विशिष्टगुरूत्व हीं कमी होतात. स्निग्धांश काढून घेतल्यानें स्निग्धांशविरहित घनपदार्थांचें प्रमाण विशिष्टगुरुत्व हीं वाढतात व पुन्हां त्यांत पाणी घातल्यानें तीं कमी होतात, परंतु स्निग्धांशाचें प्रमाण कमीच असतें. साध्या दुधांत क्रीम काढून घेतलेलें दूध मिसळलें म्हणजे स्निग्धांशाचें प्रमाण कमी होतें व स्निग्धांशविरहित घनपदार्थांचें प्रमाण अधिक झाल्यानें विशिष्टगुरूत्व वाढतें व पाणी घातल्यानें तें कमी होतें; पण स्निग्धांशाचें प्रमाण
कमी असतें. वासानें, तापवलेलें दूध किंवा शेळीचें दूध मिसळलें असल्यास कळतें. जनावरानें उग्र वासाचे पदार्थ खाल्ले असल्यास कळतात. रंगावरून गाईम्हशीच्या दुधांची भेसळ अगर पाण्याच्या भेसळीसंबंधीं कयास बांधतां येतो. चवीनें पाण्याची व साखरेची भेसळ यासंबंधीं कल्पना करतां येते. दुधाची परीक्षा करण्यास अवश्य लागणारें दुधाच्या घटकांचें सरासरी शेंकडा प्रमाण पुढें दिल्याप्रमाणें घ्यावें.

गाईच्या व म्हशीच्या दुग्धांतील सरासरी घटक अनुक्रमें:- पाण्याखेरीज घटक १३.७ व १७.२ स्निग्धांश ४.९१ व ७.३७, स्निग्धांश विरहित पदार्थ ८.८२ व ९.८.

दुधांतील स्निग्धांशाचें शेंकडा प्रमाण काढण्याची रीत.-दुधाची परीक्षा करण्याकरितां त्यांतल्या त्यांत स्निग्धांशांचें शेंकडा प्रमाण किती आहे हें माहीत पाहिजे. हें प्रमाण काढण्याकरितां डॉ. गरबरचें स्निग्धांशमापक यंत्र फार सोयीचें असतें. या यंत्राबरोबर’‘स्निग्धांशमापक नलिका’(ब्यूटिरामिटर टेस्ट टयूब) मिळतात त्यांवर शेंकडा प्रमाण दाखविणा-या खुणा खोदलेल्या असतात.

नमुन्यांतील स्निग्धांशांचें शेंकडा प्रमाण काढण्या करितां प्रथम स्निग्धांशमापकनलिकेंत १० क्यू. सेंटमीटर सल्फ्यूरिक अॅसिड (विशिष्टगुरुत्व १.८२५) मोजून घालून नंतर ११ क्यू. सेंटिमीटर दूध व नंतर १ क्यू. सें. अमाइल अल्कोहल घालून बूच घट्ट घालावें व नलिका हलवून सर्वांचें एकजात मिश्रण करावें व नंतर स्निग्धांशमापक यंत्रांत नळी ठेवून (बुचाचा भाग परिघाकडे करून) झांकण बसवून यंत्र जोरानें तीन मिनीटें फिरवावें व आपोआप थांबल्यावर नळी (बुचाचा भाग खालींकरून) काढावी व स्निग्धांश शेंकडा किती आहे तें पहावें. कांहीं नलिकांवर'‘०’',’‘१’',’‘२’',’‘३’‘असे आंकडे असतात व कांहींवर’‘०’',’‘१०’',’‘२०’',’‘३०’‘असेअसतात.पैकीं पहिल्या प्रकारची नळी असल्यास’‘१’‘म्हणजे शेंकडा एक व दुस-या प्रकारची असल्यास’‘१०’‘म्हणजे शेंकडा १०/१०० स्निग्धांश आहे. असें समजावें. पहिल्या प्रकारांत’‘०’‘व'‘१’‘मधील अंतराचे दहा भाग केलेले असतात. असला प्रत्येक भाग म्हणजे १/१० शेंकडा प्रमाण दाखविणारा असतो.नळी यंत्रांत घालून फिरविली म्हणजे दुधांत जो स्निग्धांश असतो तो नलिकेच्या निमुळत्या भागांत (तो भाग यंत्राच्या मध्याकडे असल्यानें) एकत्रित होतो. याचें कारण यंत्र जोरानें फिरविण्यानें उत्पन्न होणारी केंद्रात्सारिणी शक्ति आहे. सल्फ्यूरिक अॅसिडचा परिणाम दुधावर झाल्यानें मिश्रण काळें होतें व नळी गरम होते. नळी गरम आहे तोंपर्यंतच स्निग्धांश किती आहे तें पहावें. कारण नळी थंड झाल्यावर स्निग्धांश थिजतो व शेंकडा प्रमाण बरोबर मोजतां येत नाहीं. नळी थंड झाल्यास ती थोडा वेळ गरम पाण्यांत ठेवून मग काढून पहावें.

मलईमधील स्निग्धांशांचें शेंकडा प्रमाण काढण्याची रीत:-मलई घेऊन तिच्या दसपट पाणी घालून एकजात मिश्रण करावें व वर दिलेलया रीतीप्रमाणें त्या मिश्रणांत स्निग्धांश किती आहे तें पहावें व त्याची दसपट करावी म्हणजे मूळच्या मलईंत स्निग्धांशाचें शेंकडा प्रमाण येईल.

दुधाचें विशिष्टगुरुत्व काढण्याची रीत : हें विशिष्ट गुरुत्व काढण्याच्या तराजूनें काढतां येतें; किंवा विशिष्ट गुरुत्वमापक यंत्रानें काढावें. यांपैकीं दुस-या प्रकारानें विशिष्टगुरुत्व काढणें बरें असतें विशिष्टगुरुत्व काढतांना दूध कांचेच्या उभ्या भांडयांत कांठोकांठ भरावें आणि विशिष्टगुरुत्वमापक यंत्र ०० पर्यंत बुडवावें व नंतर आपोआप वर येऊं द्यावें. तें स्थिर झालें म्हणजे दुधाच्या सपाटीबरोबर असणारा आंकडा वाचावा. उदाहरणार्थ उष्णमान ६००असतांना जें विशिष्टगुरुत्व येतें तें घेण्याची वहिवाट आहे पण दुधाचें उष्णमान ६०० नेहमीं कायम असतेंच असें नाहीं.याकरितां दुधाचें उष्णमान काय आहे हेंहि त्याच वेळीं पहावें व खालीं दिलेल्या रीतीप्रमाणें दुरुस्ती करावी दुधाचें उष्णमान ६०० या पेक्षां जास्त असेल तर साधारणपणे प्रत्येक अंशास ०.१ वर प्रमाणें आलेल्या आंकडयांत मिळवावा व कमी असेल तर प्रत्येक अंशास ०.१ याप्रमाणें वजा करावा. उदाहरणार्थ, दुधाचें उष्णमान ६५० आहे व विशिष्टगुरुत्वमापक यंत्रानें पाहिलेला आंकडा २८.३ आहे तर त्या दुधाचें विशिष्टगुरुत्व ०.६० उष्ण- मान असतांना २८.३ + ५ x ०.१ = २८.८ इतकें येतें

अशा रीतीनें काढलेला विशिष्टगुरुत्वाचा आंकडा दुधाची परीक्षा करतांना उपयोगी पडणारीं जीं सूत्रें पुढें दिलीं आहेत त्यांतील’‘विशिष्टगुरुत्व’‘सूचक आहे हें ध्यानांत ठेवावें. खरें विशिष्टगुरुत्व म्हणजे हा आंकडा १००० त मिळवून त्या बेरजेस १००० नें भागून जो भागाकार येईल तोच. उदाहरणार्थ, वरील उदाहरणांत घेतलेल्या दुधाचें खरें विशिष्टगुरुत्व म्हणजे १००० + २८.८ / १००० = १.०२८८ हेंच आहे.

दुधांतील घनपदार्थांचें शेंकडा प्रमाण काढण्याची रीति:- दुधाचें विशिष्टगुरुत्व व स्निग्धांशांचें शेंकडा प्रमाण वर दिलेल्या रीतीप्रमाणें काढल्यावर त्यांतील घनपदार्थांचें शेंकडाप्रमाण खालीं दिलेल्या सूत्राप्रमाणें काढावें.

वि. गुरुत्व / ४ + ६ x स्निग्धांशाचें शेंकडाप्रमाण / ५ + ०.१४

दुधांतील भेसळीच्या पाण्याचें शेंकडा किमान मान काढण्याची रीत:- गाईच्या दुधांतील हें शेंकडा किमान खालीं दिलेल्या सूत्राप्रमाणें काढावें. शेंकडा भेसळीचें पाणी = १००- १०० x स्निग्धांशविरहित घनपदार्थ शें प्रमाण / ८.५ किंवा = १००, १०० x (वि. गुरुत्व + स्निग्धांश शें प्रमाण) / ३४.५

दूध म्हशींचें असल्यास ८.५ च्या ऐवजीं ९.५ व ३४.५ च्या ऐवजीं ३७ हे आंकडे वापरावे.

गायीच्या दुधावरील किती सांका काढून घेतला आहे तें काढण्याची रीत:-

सांक्याचें शें. प्रमाण = १००- (स्निग्धांशाचें शें. प्रमाण) १०० / ४.५

दूध म्हशीचें असल्यास ४.५ च्या ऐवजीं ७ आंकडा वापरावा.

तापवलेल्या दुधाची भेसळ ओळखण्याची रीति:- नमुन्यांत थोडें टिंक्चर ग्वाएकम घालावें. रंग निळा झाल्यास त्यांत तापवलेलें दूध मिसळलें आहे असें समजावें कच्च्या दुधानें रंग बदलत नाहीं. याशिवाय घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्यास वास घेतल्यानेंहि दुधाची भेसळ कळते.

दुधांत साध्या साखरेची भेसळ पाहण्याची रीत:- १० क्यू. सेंटिमीटर दूध घ्यावें व त्यांत अर्धा ग्राम अमोनियम मोलिबेट् घालून त्यांत १० क्यू. सेंटिमीटर पातळ केलेलें (१.१०) हायड्रोक्लोरिक अॅसिड घालावें व तें मिश्रण पाण्यांत ठेवून सावकाश ८०० (सेंटिग्रेड) पर्यंत तापवावें. त्या मिश्रणाचा निळा रंग झाल्सास त्यांत साधी साखर आहे हें समजावें. तुलनेकरितां शुद्ध दुधाचीहि त्याबरोबरच वरीलप्रमाणें परीक्षा करावी. म्हणजे फरक तेव्हांच कळतो.

दु ध घ र.- रोजच्या घरगुती दुभत्यांत दुधाकरितां निराळी खोली नसते. परंतु दूध वगैरे जिन्नस ठेवण्याकरितां शिंकीं, कपाटें, पेट्या व कोनाडे उपयोगांत आणलेले आढळतात. पैकीं शिंक्यावर एकावर एक अशीं भांडीं ठेवावीं लागत असल्यानें वरच्या भांड्याच्या बुडाला असलेला केरकचरा अगर खालच्या भांडयांतील पदार्थ गरम असल्यास वरच्या भांड्याच्या बुडाशीं तयार झालेले पाण्याचे थेंब बुडावर असलेल्या मळासकट खालच्या भांडयांत असलेल्या जिनसांत पडण्याचा फार संभव असतो, म्हणून दुभतें ठेवण्यास शिंकीं अयोग्य आहेत. कोनडयांचीहि थोडी फार तीच स्थिति आहे. पेटयांतील हवा खेळती न राहिल्यानें दुधास वाईट वास येऊं लागतो; व आंतील कुंद हवेमुळें पेटींत ठेवलेले पदार्थहि कुबटतात. अशा पेटयांत ठेवलेलें दूध लवकर नासतें. फळ्यांऐवजीं बारीक छिद्रांच्या जाळीचा उपयोग केल्यास वरील अवगुण राहाणें शक्य नाहीं. जाळीदार कपाटें दुभतें ठेवण्यास फारच चांगलीं असतात. त्यांतील हवा खेळती राहिल्यानें आंतील जिन्नस कुबटत नाहींत, व कपाटांस कप्पे असल्यामुळें दूध, दहीं, ताक, लोणी व तूप वगैरे पदार्थ निरनिराळ्या कप्यांत ठेवतां येतात. तेणेंकरून एकाचा संपर्क दुस-यास लागत नाहीं व म्हणून ते जिन्नस बिघडत नाहींत. शिवाय जाळी व दार घट्ट असल्यानें मांजरें उंदीर, झुरळें वगैरे प्राण्यांपासून दुभत्याच्या जिन्नसांचा बचाव होतो. याकरितां दुभतें ठेवण्यासाठीं शक्य तितकें जाळीदार कपाटच वापरावें. घरगुती दुभत्याचे जिन्नस नेहमीं निराळी जागा नसल्यास स्वयंपाकघरांत ठेवणें सोयीचें असतें. परंतु या बाबतींत एक खबरदारी घेणें अवश्य आहे. ती हीच कीं, दुभत्याचें कपाट हें मोरीशेजारीं, अंधा-या जागेंत अगर कोंदट ठिकाणीं नसावें. तसेंच तें चुलीजवळहि नसावें. त्याच्यासाठीं स्वच्छ उजेडाची व हवाशीर जागा असावी म्हणजे दूध वगैरे पदार्थ चांगल्या स्थितींत रहातात.

धंदा या दृष्टीनें मोठ्या प्रमाणावर देशी अगर विलायती पद्धतीप्रमाणें दुभतें करणें झाल्यास त्याकरितां दूधघर स्वतंत्र असले पाहिजे व त्यांत निरनिराळ्या कामाकरितां स्वतंत्र खोल्या असाव्या. दूधघर बांधतांना खालीं दिलेल्या बाबी अवश्य लक्षांत घ्याव्यात.

(१) दूधघराची जागा हमरस्त्यावर, कोंदट व सखल ठिकाणीं नसावी. आजूबाजूस घाण पाणी मुरत असलेलें अगर वहात असलेलें नसावें. जवळपास खताच्या गारी, कच-याच्या पेट्या व शेतखानें नसावेत. दूधघरास उत्तम जागा वस्तीपासून दूर, उंचवट्यावर व हवाशीर अशी असावी.

(२) दूधघराची इमारत पक्की असावी. भिंतीस आंतील बाजूनें निदान ४-५ फुटांपर्यंत सिमेंटाचें प्लास्टर केलेलें असावें. जमीन पक्की चिरेबंदीची व सिमेंटानें दरवाजा भरलेली असावी. जमीन सिमेंटाची केल्यास फारच उत्तम. जमीनीस ढाळ ठेवावा व तीवर धुण्यास घातलेलें पाणी बाहेर गटारांत जाईल अशी व्यवस्था असावी.

(३) दूधघर कौलारू अगर गच्चीचें असावें. तें कौलारू असल्यास आंतील बाजूनें लांकडी फळ्यांची पाटणी असावी व ती वरचेवर वरच्या बाजूनें साफ करतां येईल अशी व्यवस्था करावी. तक्तपोशी केली म्हणजे कौलांतला केरकचरा खालीं पडत नाहीं व तक्तपोशीवरून साफ करतां आली म्हणजे तीवर केरकचरा सांचत नाहीं. फटी न रहातील अशा फळ्या बसवाव्यात व आंतील बाजूनें त्यांस पांढरें रोगण लावावें अगर चुन्याची सफेती द्यावी.

(४) दूधघरांतील हवा खेळती राहण्यास खिडक्या व जाळ्या कराव्या व बाहेरचा केर, माशा वगैरे आंत येऊं नयेत म्हणून जाळ्या, खिडक्या व दारें हीं दुहेरी दारांचीं असावींत. एक दार बारीक भोंकांच्या जाळीचें व दुसरें कांचेच्या तावदानाचें असावें म्हणजे भरपूर उजेड मिळतो.

(५) जरूरीप्रमाणें पाण्याची व मोरीची व्यवस्था करावी व सर्व पाणी पक्क्या गटारांतून दूरवर सोडावें. दूधघराच्या आजूबाजूस निदान ३०।४० फूट मोकळी जागा असावी म्हणजे जास्त खुलेपणा राहतो. शक्य असल्यास दुधघराभोंवती पडवी असावी म्हणजे दूधघर जास्त थंड रहातें व वावरण्यास सोय होते.

(६) दूधघरास मुबलक स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची सोय असावी.

(७) दूधघरांत दूध व क्रीमकरितां, लोण्याकरितां, सांठविणीकरितां, भांडी वगैरे धुण्याकरितां अशा निरनिराळ्या खोल्या असाव्यात. धंद्याच्या लहानमोठ्या प्रमाणाप्रमाणें कमी अधिक खोल्या कराव्यात. दुभत्याचीं भाडीं व कपडे वगैरे उन्हांत अगर हवाशीर ठिकाणीं वाळवतां येतील अशी व्यवस्था करावी.

(८) खोल्यांतून जरूरीप्रमाणें कोनाडे, फडताळें, कपाटें, खुंट्या वगैरेंची व्यवस्था करावी.

(९) घरगुती दुभत्यांस दुभत्याचीं कपाटें अगर पेट्या दर १५।२० दिवसांनी स्वच्छ धुवून उन्हांत वाळवाव्यात, म्हणजे पदार्थ स्वच्छ रहातात. एखादे वेळीं जर कांहीं पदार्थ त्यांत सांडला तर तो लागलीच फडक्यानें पुसावा, कपाट स्वच्छ धुवावें व उन्हांत वाळवावें म्हणजे तो जिन्नस लांकडांत मुरत नाहीं. व कपाटास घाण येत नाहीं. दुभत्याचें फडताळ असल्यास तें स्वच्छ मातीनें सारवावें व त्यास दर ४।६ महिन्यांनीं चुना द्यावा. धंद्याकरितां दुभतें केल्यास दूधघराची जमीन रोज सर्व काम झाल्यावर पाण्यानें स्वच्छ धुवून साफ करावी. बाहेरून येणा-या माणसास केव्हांहि पाय साफ केल्याशिवाय दूधघरांत येऊं देऊं नये. पाय व जोडे साफ करण्याकरितां दुधघराबाहेर एक लोखंडी पट्टीची खरडवणी, जोडयांचा तळ साफ करण्यास जमिनींत बसविलेली असावी व दूधघराच्या दरवाज्याबाहेर एक खरखरीत चटई ठेवलेली असावी म्हणजे दूधघरांत पायाबरोबर फार घाण येत नाहीं. दुधघराचीं दारें खिडक्या वगैरेचीं जाळीचीं दारें नेहमीं बंद ठेवावींत म्हणजे दुधघरांत माशा वगैरे फारशा येत नाहींत. दूधघरांतील कोणत्याहि जिनसास कोणाहि बाहेरच्या माणसास हात लावूं देऊं नये. व तेथें कोणताहि उग्र वासाचा पदार्थ ठेवूं नये. वापरलीं जाणारीं भांडीं वगैरे स्वच्छ धुतल्याशिवाय तशींच केव्हांहि ठेवूं नयेत. दुधघरांतील सर्व जिन्नस नीटनेटके व्यवस्थित रीतीनें जेथल्या तेथें ठेवावेत म्हणजे आयत्यावेळीं तेथील भांड्याचा वगैरे गोंधळ होत नाहीं व जिन्नस वेळेवर तयार मिळतात. दुधघराचें गटार व जमीन दर १५।२० दिवसांनीं चुना अगर पोटॅशपरमँगेनेटच्या पाण्यानें स्वच्छ धुवावी व दूधघराच्या भिंती वगैरेस दर सहा महिन्यांनीं मोरचूत घालून कळीच्या चुन्याची सफेती द्यावी. अशा प्रकारच्या स्वच्छतेसंबंधी सर्व बाबी अंमलांत आणाव्यात. दूधघरांत स्वच्छतेची किती आवश्यकता आहे हें ’‘दुधाचे गुणधर्म’‘ या सदराखालीं सूक्ष्म तंतूविषयीं जी माहिती दिली आहे तीवरून सहज लक्षांत येईल.

दु भ त्या ची दे शी प द्ध त, धार काढणें:- धार काढण्याच्या वेळीं जनावरांनां स्वच्छ ठिकाणीं बांधून व त्यांचें अंग स्वच्छ धुवून मग धार काढणारानें आपले हात स्वच्छ धुवावे व धार काढण्याचें स्वच्छ कोरडें भांडें हातीं घेतल्यावर दुस-या कोणत्याहि जिनसास हात लावूं नये. वांसरूं सोडण्याबांधण्यास दुसरा मनुष्य असावा. एकाच माणसास दोन्हीं कामें करावीं लागल्यास दुधांत घाण जाते. गाईची कांस कोमट पाण्यानें धुवून स्वच्छ करावी व नंतर वांसरास सोडावें. वांसरास सोडल्यावर थोड्याच वेळानें गाय पुरी पान्हवते, त्यावेळी तिची कांस दुधानें अगदीं तुडंब भरलेली दिसते. पान्हा सोडण्याच्या वेळीं पुष्कळ जनावरें मलसूत्रोत्सर्जन करतात. त्यावेळीं दुधाच्या भांडयांत शिंतोडे न जातील अशी खबरदारी घ्यावी. शिवाय जनावरानें शेंपूट हालवून दुधांत केर पाडूं नये म्हणून त्याचें शेंपूट एका पायास दोरीनें बांधावें व जनावर लाथा मारणारें असल्यास त्यास भाला घालावा. हीं कामें वांसरूं पीत असतांना वांसरूं सोडणारानें करावींत. जनावरानें पान्हा चांगला सोडला असें पाहून धार काढणारानें आंचळापासून वांसरांस सोडावावें व दुस-यानें वांसरास आंवरावें व नंतर धार काढणारानें धारेस सुरवात करावी. दोन्हीं हातांनीं धार काढणें चांगलें. एकाच बाजूचीं दोन्ही आंचळें न धरतां एका हातानें एका बाजूचें पुढचें आंचळ धरलें तर, दुस-यानें दुस-या बाजूचें मागचें आंचळ धरून धार काढावी, म्हणजे कांसेच्या दोन्हीं भागांतील सारखें दुध निघतें. धार काढणारानें पायाच्या चौड्यावर बसून गुडघ्यांत दुधाचें भांडें धरून धार काढावी. थोड्या जनावरांची धार अशा रीतीनें विशेष त्रासाशिवाय काढतां येते. परंतु जेथें पुष्कळ जनावरांची धार काढावयाची असेल तेथें धार काढणा-यास बसण्यासाठीं एक लहानशी घडवंची केल्यास त्रास कमी होतो. धार काढतांना कोणी वांकविलेला अंगठा व चार बोटें यांच्यामध्यें आंचळ धरून धार काढतात. कोणी साध्या मुठींत आंचळ धरून काढतात. ही बाब संवयीवर अवलंबून आहे. परंतु म्हशी व जाड कातडीच्या गायी यांच्या धारेस अंगठा व बोटें यांच्यामध्यें आंचळ धरणें सोपें जातें. धार काढणारांचीं नखें वाढलेलीं नसावींत व त्यांस कोणताहि सांसर्गिक रोग नसावा. धार काढण्यास सुरवात करण्यापूर्वी आंचळांस एखादी सडी वगैरे चिकटली आहे कीं काय हें पाहावें म्हणजे आंजळास दुखापत होण्याचा संभव नसतो. धार झटपट व पुरी काढावी. पुरें दूध न निघाल्यास पुष्कळ दूध देणारीं जनावरें बिघडतात व कमी दूध द्यावयास लागतात. पुष्कळ वेळां पुरें दूध न निघाल्यास अगर दुध काढण्याच्या वेळांत अनियमितपणा झाल्यास जनावरांनां आपलें स्वत:चेंच दुध पिण्याची वाईट संवय लागते. याशिवाय शेवटीं निघणा-या दुधांत धृतांशाचें प्रमाण सर्वांत अधिक असतें म्हणून शेवटचें दूध जास्त सकस असतें, सबब पुरी धार काढणे अशक्य आहे. धार काढतांना जवळपास गोंगाट मुळींच नसावा व जनावर बुजेल असें वर्तन कोणींहि करूं नये. धारेच्या वेळीं पेंड, सरकी, फोल, कोंडा वगैरे न देण्याची पहिल्या वेतापासूनच वहिवाट असावी. परंतु देण्याची संवयच झाली असल्यास धारेच्या वेळीं पेंड वगैरे द्यावयासच पाहिजे, नाहीं तर दुध कमीं मिळण्याचा अगर जनावर बिथरण्याचाहि संभव असतो. धारेस सुरवात करतांना प्रथम एखाद दुसरी धार जमिनीवर पाडून दुधाचा रंग नेहमींप्रमाणें आहे कीं नाहीं हें पहावें. कारण कांसेस दुखापत झाल्यास अगर आजार झाला असल्यास नेहमींप्रमाणें दुधाचा रंग नसतो. नेहमींपेक्षां निराळ्या रंगाचें दूध दिसल्यासहि पुरी धार काढावी परंतु तें दूध दूषित असल्यामुळें वापरूं नये; खताच्या गारींत ओतावें. या व अशा प्रकारच्या स्वच्छतेसंबंधीं इतर सर्व बाबी लक्षांत घेऊन त्याप्रमाणें व्यवस्था ठेवल्यास शुद्ध दूध मिळतें. दूध स्वच्छ गाळण्यानें गाळून त्याचें वजन करून तें लिहून ठेवावें अगर मापणें असल्यास फेंस जिरल्यावर मापावें म्हणजे चूक होत नाहीं. प्रत्येक जनावरापासून किती दूध मिळालें याची नोंद केलेली असावी.

दुधाची विल्हेवाट:- धारेनंतर दूध स्वच्छ गाळण्यानें गाळल्यावर गिर्हाइकांनां द्यावें. दूध मोजण्याच्या मापास दांडा असावा म्हणजे काढतांना दुधांत बोटें बुडवावीं लागत नाहींत. माप केव्हांहि जमिनीवर ठेवूं नये म्हणजे दुधांत केर जात नाहीं. दुधाचें भांडें झांकणीनें अगर स्वच्छ कपड्यानें झांकलेलें असावें म्हणजे त्यांत केर पडत नाहीं व दुधावर माशा बसत नाहींत. शिळें व ताजें आणि गाई व म्हशींचें दूध एकत्र करून विकूं नये. लांबवर दूध पाठवावयाचें असल्यास पाटी, शिर्के अगर कावड उपयोगांत आणतात अगर दूध जास्त असल्यास गाडीची जरूरी असते. दूध एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतांना केव्हांहि उघडे नेऊं नये. तें चांगलें झांकलेलें असावें म्हणजे त्यांत रस्त्यावरचा घाणेरडा केर, धुराळा पडत नाहीं व त्यावर माशा बसून तें दूषित होत नाहीं. सध्यांच्या गवळ्यांच्या वहिवाटीप्रमाणें दुधाच्या चरबींत गवताची चुंबळ अगर लहानशी हिरवी टहाळी घातलेली असते, त्यानें दुध उसळत नाहीं परंतु त्यांत रस्त्याचा धुरळा व केर जाऊन तें दूषित होतेंच. म्हणून दुधाच्या भांडयांस चांगलेंच झांकण असलें पाहिजे. हल्लीं दूध नेण्याकरितां बरणीच्या आकाराचीं झांकणाचीं भांडीं मिळतात त्यांचा उपयोग करावा किंवा त्यांसारखीं पितळी भांडीं तयार करवून घेऊन त्यांस उत्तम कल्हई करून त्यांचा उपयोग करावा. असल्या भांडयांस दूध काढण्यास नळी असते त्यामुळें प्रत्येक वेळीं माप दुधांत बुडविण्याचें मुळींच कारण पडत नाहीं. शिवाय झांकणास कडीची सोय असल्यानें कुलूप अगर मोहोर लावण्याची सोय असते. त्यामुळें मध्यंतरी दुधांत भेसळ करण्याचा संभव कमी असतो. दुध वांटतांना तें नीट हलवून गिर्हाइकांस द्यावें म्हणजे सर्वत्रास एकसारखें दूध मिळतें. दूध वांटतांना कोणास किती दूध दिलें त्याचें टिपण करावें व उरलेलें दुधव वांटलेले दूध यांची बेरीज मूळ दुधाइतकी आहे कीं नाहीं हें ताडून पहावें व कांहीं मर्यादेबाहेर फरक आढळल्यास कांहीं तरी चूक झाली असें खास समजावें. दुधाचा शुद्धपणा कायम राखण्याकरितां कोणत्याहि रीतीनें तें दूषित होणार नाहीं अशी खबरदारी घ्यावी. वांटून उरलेलें दूध वेळ न लावतां तापत ठेवावें.

दहीं.- दहीं करण्याकरितां दूध मंदाग्नीवर संथपणें तापवावें व साधारणपणें पांचवा हिस्सा आटल्यावर तें कोमट करून विरजावें. दूध संथपणे तापलें म्हणजे त्यावर चांगली जाड’‘साय’‘येते. या सायींत दुधांतील स्निग्धांशाचा बहुतेक भाग असतो. दूध इतर कामास वापरावयाचें असल्यास तें प्रथम उकळेपर्यंत तापवून नंतर वापरावें. दूध वाजवीपेक्षां फाजील तापल्यास व आटल्यास तांबूस रंग येतो व एक प्रकारचा चमत्कारिक वास येऊं लागतो. दूध तापविण्याचें भांडें जाड व उत्तम कल्हईचें असावें. कल्हई न केलेल्या भांडयांत जास्त वेळ दूध ठेवल्यास तें कळकून त्यांत तांब्याचा विषार आल्यानें तें हिरवट होतें व असलें दूध प्याल्यास मळमळूं लागतें. दूध लोण्याकरितां विरजावयाचें असल्यास साय व वरचा भाग निराळा विरजावा व दह्याकरितां खालचें दूध विरजावें म्हणजे ताक करणें व लोणी काढणें वगैरेस मोठ्या भांड्याची जरूरी नसते व सायीचें दहीं वापरल्यानें कमी होणारें लोणी वांचतें. सायीसकट विरजलेलें दहीं खाण्यास सर्वांत उत्तम असतें. दूध विरजण्याकरितां ताजें ताक वापरावें; शिळें वापरल्यास दहीं चांगलें विरजत नाहीं. थंडीच्या दिवसांत विरजणाचीं भांडीं उबदार ठिकाणीं ठेवावीं म्हणजे दहीं होण्यास फार वेळ लागत नाहीं व उन्हाळ्यांत थंड ठिकाणीं ठेवावीं म्हणजे विरजण फसफसून जात नाहीं. थंडीच्या दिवसांत दूध विरजण्यास थंडीच्या मानानें बारा तासांपेक्षां जास्त वेळ लागतो व उन्हाळ्यांत हवेच्या उष्णतेच्यामानानें बारा तासांपेक्षा कमी वेळ लागतो. दह्याला मधुर आंबटपणा आला म्हणजे तें वापरण्यास व लोणी करण्यास योग्य समजावें. विरजण जास्त शिळें झाल्यास तें फार आंबट होतें, फार फसफसतें व दुधांतील मांसजनक पदार्थ व स्निग्धांश यांचेंहि विघटीकरण होण्यास सुरवात होते; व वाईट घाण येऊं लागून कडवट चव येते. दहीं कडू, मळमळीत, पांचट, बुळबुळीत असल्यास अगर त्यास तार येत असल्यास तें दूषित झालें आहे असें समजावें व तें कोणत्याहि कामास वापरूं नये. दह्यापासून, लोणी, ताक, मठ्ठा, श्रीखंड व श्रीखंडाच्या वड्या इत्यादि पदार्थ करितात. दह्याचे घटक पाणी, स्निग्धांश, मांसजनक पदार्थ, दुग्धशर्करा, दुग्धाम्ल, निरिंद्रियक्षार हेच मुख्य आहेत. याशिवाय दह्यांत दुग्धाम्ल जंतू व कर्बाम्लवायु हे जास्त असतात.

लोणी:- दहीं घुसळून त्यापासून लोणी तयार करण्याकरितां दह्याच्या भांड्यापेक्षां मोठें, स्वच्छ व कल्हईचें भांडें घ्यावें. रवी प्रथम आधण्याच्या पाण्यानें धुवावी, नंतर थंड पाण्यांत भिजवून घुसळण्यास घ्यावी. रवीच्या दो-या स्वच्छ असाव्या व घुसळण्यानें दोरीचे धागे भांडयांत न पडतील अशी व्यवस्था ठेवावी. घुसळण्याच्या भांडयांत दहीं घातल्यावर हलके हलके घुसळावें नाहींतर घुसळत असलेलें दहीं उसळून भांड्याबाहेर येतें व भांड्यावर व जमीनीवर सांडतें. त्यामुळें लोण्याचा बराच हिस्सा असलेला भाग बाहेर पडल्यानें खराब होतो. मध्यंतरी हवेच्या उष्णमानाप्रमाणें थोडें गरम अगर थंड पाणी घालावें म्हणजे लोणी लवकर येतें. लोण्याचे साधारणपणें हरभ-यायेवढे खडे बनल्यावर घुसळणें बंद करावें व तें भांडें स्थिर ठेवावें. म्हणजे सर्व लोण्यांतील खडे वर येतात व लोणी काढणें सोपें जातें. लोणी हातानें काढल्यानें तें मेणचट होतें व तें दूषित होण्याचा संभव असतो. तें हातानेंच काढणें झाल्यास हात चांगले स्वच्छ धुवून नंतर ओल्या हातानें लोणी काढावें. सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे चमच्यानें लोणी काढणें हा होय. लोणी निराळ्या भांडयांत काढल्यावर तें थंड पाण्यानें २-३ वेळ स्वच्छ धुवावें म्हणजे त्यांतील ताकाचा अंश निघून जातो. जितका ताकाचा अंश लोण्यांत राहील तितकें तें लवकर बिघडतें. लोणी धुतल्यावर तें स्वच्छ व न कळकणा-या भांडयांत ठेवावें व त्यांत थंड पाणी घालावें. लोणी जास्त दिवस ठेवणें असल्यास त्यांत घातलेलें शिळें पाणी काढून टाकावें व रोज ताजें, थंड पाणी घालावें म्हणजे तें चांगलें टिकतें. याशिवाय एक मोठ्या तोंडाचें मातीचें भांडें घेऊन त्यांत पाणी घालावें व त्यांत लोण्याचें भांडें ठेवावें म्हणजे थंडावा चांगला राहून लोणी लवकर बिघडत नाहीं. लोण्यांत घालावयाच्या पाण्यांत जर थोडें मीठ घातलें तर लोणी जास्त दिवस चांगल्या स्थितींत टिकतें. त्यामुळे त्यास थोडीशी खारट चव येते इतकेंच. लोणी जितकें थंड राहील तितकें तें चांगलें रहातें. उन्हाळ्यांत लोण्यास लवकर वास येतो याचें कारण हवेचें जास्त उष्णमान हेंच आहे. तेंच थंडीच्या दिवसांत विशेष काळजी घेतल्याशिवायहि पुष्कळ दिवस चांगलें टिकतें. दह्यापासून केलेलें लोणी चवीला आंबूस लागतें पण विलायती पद्धतीनें केलेलें लोणी आंबूस लागत नाहीं. याचें कारण विलायती पद्धतीच्या लोण्यांतील ताकाचा सर्व अंश धुवून टाकतां येतो परंतु देशी पद्धतीच्या लोण्याचे गोळे मोठे होत असल्यामुळें त्यांत असलेला सर्व अंश धुवून टाकतां येत नाहीं व याच कारणानें देशी लोणी जास्त दिवस ठेवल्यास त्याचें विघटीकरण होण्यास लवकर सुरवात होते व त्यामुळें त्यास घाण येऊं लागते. लोणी करण्यास थंड वेळ उत्तम असते म्हणूनच उन्हाळ्यांत सूर्योदयाच्या सुमारास अगर पहाटे लोणी केलें पाहिजे. लोण्यामध्यें दह्यांत असलेले सर्व घटक पदार्थ असतातच. परंतु त्याचें प्रमाण मात्र निराळें असतें. साधारणपणें शेंकडा ८० ते ८५ टक्के स्निग्धांश असतो व इतर सर्व पदार्थ शेंकडा १५ ते २० टक्के या प्रमाणांत असतात. गाईचें लोणी किंचित् पिंवळट रंगाचें असतें व म्हशीचें शुभ्र पांढरें असतें. गाईपेक्षां म्हशीच्या दुधांत स्निग्धांश जास्त असल्यानें म्हशीच्या दुधापासून गाईच्या तितक्याच दुधापेक्षां जास्त लोणी निघतें. जनावरास सरकी दिल्यानें लोण्यास जास्त घट्टपणा येतो.

ताक:- दहीं घुसळून लोणी काढून घेतल्यावर जें’‘ताक’' मागें रहातें त्यांत दह्यांत असलेले सर्व पदार्थ असतात. स्निग्धांश सर्वांत कमी व पाणी अधिक प्रमाणांत असतें, कारण स्निग्धांशाचा बहुतेक सारा भाग लोण्यांत जातो व घुसळतांना त्यांत थोडें फार पाणी घालावें लागल्यानें पाण्याचें प्रमाण वाढतें. ताक हें कढी वगैरे पदार्थ करण्यास व नुसतें खाण्यास उपयोगी असतें. ताज्या ताकाची चव चांगली असते; पण तें जसजसें शिळें होत जाईल तसतसा त्याचा आंबटपणा वाढतो व पुढें पुढें त्यास कडवट चव येऊन घाण येऊं लागते. ताक पाचक असून त्याचा उपयोग करण्यास वैद्य व डॉक्टर रोग्यास सांगतात. सायीसकट विरजलेलें मधुर दहीं, लोणी निराळें न होईल इतकें घुसळलें म्हणजे ’‘मठ्ठा’‘ तयार होतो. मठ्ठा ताकांपेक्षां जास्त स्वादिष्ट असतो; परंतु पचण्यास ताकाइतका हलका नसतो व ताकाइतका त्यांत पाचक गुण नसतो.

तूप.- लोण्याचें तूप करण्यास तें कढण्याकरितां जाड भांडे घ्यावें. पातळ भांडयांत लोणी कढवल्यास थोडी जास्त आंच लागली तर तूप करपण्याच्या जास्त संभव असतो. लोणी नेहमीं माफक आंचेवर कढवावें म्हणजे तें करपत नाहीं व तुपांतील लवकर उडून जाणारा भाग तितका कमी उडतो व त्यामुळें तुपाचा खमंग स्वाद कमी होत नाहीं. घरगुती कामाकरितां तूप पक्क्या कढाचें करण्यासाठीं त्यांतलें सर्व पाणी जाईपर्यंत तें तापवावें. सर्व पाणी आटल्यावर भांडें खालीं उतरावें व थंड होऊं द्यावें व साधारण कढत राहिल्यावर स्वच्छ गाळण्यांतून गाळून उत्तम कल्हईच्या भांडयांत अगर बरण्या वगैरेंत झांकून ठेवावें. लोणी कढवलें म्हणजे त्यांत असलेलें पाणी वाफ होऊन नाहीसें होतें व पाणी व तुप शिवाय इतर पदार्थांचा कांहीं भाग भांड्याच्या बुडाशीं बसतो व कांहीं फेंसांत येतो. बुडाशीं बसलेला भाग आंचेमुळें करपून जातो व त्याची बेरी होते. तूप बाजाराकरितां तयार करणें झाल्यास तें कच्च्या काढाचें ठेवण्याची वहिवाट आहे. याचें कारण त्याचें वजन जास्त होतें व गिर्हाइकानें तें घेतल्यावर कढवून वापरावें लागतें. परंतु तूप कच्च्या कढाचें ठेवावयाचें म्हणून त्यांत फार पाणी ठेवूं नये. थोडे पुरें होतें. तुपामध्यें लोण्यांत असलेला घृतांश मात्र असतो. आंचेमुळें त्याच्या रूपांत फरक पडतो इतकेंच. लोण्यापासून शेंकडा ८० ते ८५ टक्के तूप पडतें. दुधापासून केलेल्या इतर कोणत्याहि पदार्थापेक्षां तूप सर्वांत जास्त दिवस चांगल्या स्थितींत टिकतें. तुपांत असलेल्या निरनिराळ्या स्निग्ध पदार्थांच्या परस्पर प्रमाणाप्रमाणें व हवेच्या उष्णमानाप्रमाणें तुपांत कमी किंवा अधिक कणी तयार होते. बाजारी तूप कच्च्या कढाचें असल्यामुळें त्यांत ताकाचा अंश असतो व दुकानांत स्वच्छतेसंबंधीं पाहिजे तितकी काळजी न घेतली तर तुपांत धुराळा जातो व या कारणामुळें बाजारी तूप घरच्या तुपापेक्षां लवकर बिघडतें. याशिवाय बाजारी तूपांत तेल, चरबी, बटाटे अगर अळवाच्या कांद्याचा बलक वगैरेंची भेसळ केलेली आढळते. यानेंहि बाजारी तूप लवकर बिघडतें. गाईचें तूप पिंवळट रंगाचें असतें व म्हशीचें पांढरें असतें. ताजें तूप स्वच्छ डब्यांत डाग लावून बंद करून ठेवल्यास तें कित्येक महिने चांगल्या स्थितींत रहातें.

दहीं, ताक, लोणी, तूप या दुभत्यांतील मुख्य पदार्थांशिवाय दुधापासून बासुंदी व खवा करतात. हे जिन्नस करण्यास दूध जाड भांडयांत घालून आटवावें लागतें. बासुंदी करण्यास कल्हईचें जाड पातेलें व खवा करण्यास लोखंडी जाड कढई उत्तम असते. हे पदार्थ तयार करतांना लक्षांत ठेवण्याची गोष्ट म्हणजे माफक आंचेवर दुधाचा भाग भांड्यास लागून न करपेल असें सारखें ढवळणें ही मुख्य आहे. दूध आटून साधारण पाकाइतकें दाट झाल्यावर साखर वगैरे घालून बासुंदी करण्यास योग्य होतें. दूध ३/४ ते ४/५ हिस्से आटवून चवथा अगर पांचवा हिस्सा राहिला म्हणजे त्यास खवा म्हणतात. खवा करण्यास घेतलेल्या दुधांत पाण्याचें शेंकडा प्रमाण ज्या मानानें कमी अधिक असतें त्या मानानें शेंकडा २० ते २५ टक्के खवा पडतो. खव्याचा उपयोग पेढे, बर्फी वगैरे मिठाई व पक्वान्नें करण्याकडे होतो. दुधापासून तयार केलेल्या इतर कोणत्याहि पदार्थांपेक्षां खवा जास्त पौष्टिक परंतु पचण्यास सर्वांत अधिक कठिण असतो. खव्यांत दुधांत असलेले सर्व पदार्थ असतात परंतु तो तयार करण्यास लागणा-या आंचेमुळें त्याचें थोडेंफार रूपांतर होतें. त्यांत पाण्याचें प्रमाण फारच कमी असतें. व स्निग्धांश, मांसजनक पदार्थ व दुग्धशर्करा यांचें प्रमाण अधिक असल्यानें त्याचा पौष्टिकपणा वाढतो व तो पचण्यास फार जड असतो.

दु भ त्या ची वि ला य ती प द्ध त, हिंदुस्थानी व विलायती पद्धतींतील मुख्य फरक:- दुभत्याच्या इकडील व विलायतेकडील पद्धतींत फरक आहे. इकडच्या पद्धतींत दूध तापवून नंतर त्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करतात. परंतु विलायती पद्धतींत ताज्या दुधापासून अगर वाफेच्या योगानें अति थोड्या वेळांत दूध तापवून व नंतर थंड करून त्यापासून निरनिराळे पदार्थ करण्यास सुरवात होते. आपल्या इकडच्या पद्धतींत दूध संथपणानें पुष्कळ वेळ तापल्यानें त्याच्यावर साय येते परंतु विलायती पद्धतींत वाफेच्या योगानें फारच थोड्या वेळांत दूध तापल्यानें व तें तापत असतांना स्थिर नसल्यानें त्यावर साय मुळींच येत नाहीं. हिंदुस्थानी पद्धतींत तापवलेल्या दुधाचें दहीं करून त्यापासून लोणी व ताक करतात, परंतु विलायती पद्धतींत थंड केलेल्या अगर ताज्या दुधापासून’‘क्रिम’‘अथवा मलई तयार करतात व ती विरजल्यावर अगर तशीच घुसळून लोणी तयार करतात. हिंदुस्थानी पद्धतींत लोण्यापासून तूप करतात. विलायती पद्धतींत तूप करण्याचा प्रघात फारच क्वचित व काहीं विशिष्ट भागांत आढळतो. कारण तिकडे बहुधा तुपाचा प्रघात नसतो असें म्हणण्यास हरकत नाहीं. तिकडे क्रीम व लोणी यांखेरीज ’‘चीझ’‘ करण्याचा फार प्रघात आहे. आपल्याकडे जसें दहीं व ताक सरसकट उपयोगांत आणतात तसाच तिकडै ’‘चीझ’‘ हा पदार्थ सरसकट उपयोगांत आणतात. तिकडे ताजें दूध थंड करून अथवा तापवलेलें दूध थंड करून गिर्हाइकांस देण्याची सरसकट व्यवस्था असते. आपल्याइकडे दूध तापवल्याशिवाय वाटण्यांत येतें. तिकडे क्रीम, लोणी, चीझ वगैरे पदार्थ दुकानांतून विकत आणण्याचा बहुधा सरसकट प्रघात आहे. परंतु आपल्याइकडे तूप व क्वचित लोण्याशिवाय करून दुधाचे इतर पदार्थ बाजारांतून आणण्याची सरसकट वहिवाट नाहीं. दहीं, ताक, लोणी बहुधां घरगुतीच केलेलें असतें. तिकडील रहिवाशी गोमांसभक्षक असल्यानें स्वाभाविकच दुभत्याकरितां व खाटिकांच्या दुकानाकरितां विशेष फायदेशीर पडणा-या अशा गाईंच्या निरनिराळ्या जाती उत्पन्न करण्याचे प्रयत्न झाले व त्यांत चांगलें यश आलें आहे. आपल्याकडे दुभत्याकरितां जमिनीची मशागत करण्याकरितां उपयोगी पडणा-या अशा निरनिराळ्या जाती उत्पन्न करण्याचे प्रयत्न देशपरिस्थितीनुरूप झाले व त्यांत यशहि उत्तम आलें. बदललेल्या परिस्थितीनें त्या जातींची सध्यां अवनति झालेली आढळते ही गोष्ट निराळीं. याशिवाय दोन्ही पद्धतींतील ठोकळ फरक म्हणजे आपल्याइकडे जनावरें दूध देण्याची बंद होईपर्यंत वांसरांस पाजण्याची सरसकट वहिवाट आहे; याच्या उलट परिस्थिति तिकडे आहे. तिकडे सरसकट वांसरे बहुधां न पाजण्याची वहिवाट आहे. वांसरांनां वरच्या दुधावर ठेवतात अगर खाटकाच्या हवालीं करतात. फक्त उत्तम दुभत्या जनावरांचीच संतति वाढूं देतात.

विलायती दुभत्यांतील मुख्य बाबी म्हणजे (१) दूध आणि त्याची व्यवस्था, (२) क्रीम अथवा मलई करणें, व (३) मलईपासून लोणी करणें, याच होत. यांविषयीं माहिती क्रमानें पुढें दिली आहे.

(१) दूध व त्याची व्यवस्था:- प्रथम गाईची धार हातानें अगर धार काढण्याच्या यंत्रानें काढल्यावर तें फडक्यांतून अगर गाळण्यांतून गाळतात. धार काढण्याचें यंत्र प्रथम अमेरिकेंत इ. स. १८७८ मध्यें उपयोगांत आणलें. त्याचे हल्लीं अनेक प्रकार झाले आहेत. हीं यंत्रें हातानें अगर वाफ व वीज यांच्या शक्तीनेंहि चालवितां येणारीं हल्लीं मिळूं लागलीं आहेत. पाश्चात्त्य-विशेष सुधारलेल्या देशांत यांचा प्रसार बराच झालेला आहे. तथापि पुष्कळ लोक आपल्या इकडच्या सारखीच हातानेंहि धार काढतात. या धार काढण्याच्या यंत्रांचा हा फायदा आहे कीं, थोड्या वेळांत पुष्कळ गाईंची धार काढता येते व दूध दूषित होण्याचा संभव नसतो. दूध काढून तें गाळल्यावर’‘रेफ्रीजरेटर’‘(उष्णतानिवारक यंत्र) नांवाच्या दूध थंड करण्याच्या यंत्रानें ५५ ते ६० ब इतकें थंड करून गिर्हाइकांनां वांटतात. अगर गाळलेलें दूध ’‘पाश्चुरायझर’‘ नांवाच्या यंत्रानें वाफेच्या साहाय्यानें १४० ते १७६ पर्यंत तापवून पुन्हां रेफ्रीजरेटरच्या साहाय्यानें ५५ ते ६० पर्यंत थंड करून वांटतात. धार काढल्याबरोबर ५५ ते ६० अंशापर्यंत थंड केल्यानें दुधांतील सूक्ष्म जंतू थंडावतात व त्यामुळें त्यांची वाढ उबट दुधांतल्यासारखी झपाट्यानें होत नाहीं. पुष्कळदां ज्या यंत्रानें दुधापासून क्रीम तयार करतात त्या यंत्रानें क्रीम तयार करून पुन्हां तें क्रीम त्या यंत्रांतून निघालेल्या दुधांत मिसळून तें मिश्रण म्हणजे दूध-गिर्हाइकांस देतात. असें केल्यानें दुधांत जो कांही केरकचरा असतो तो व त्यांत असलेले पुष्कळसे सूक्ष्म जंतू यंत्रांतील एका भागास चिकटून राहतात व त्यामुळें यंत्रांतून निघालेलें क्रीम व क्रीमविरहित दूध शुद्ध होतें व नंतर क्रीम व क्रीमविरहित दूध एके ठिकाणीं चांगलें मिसळलें म्हणजे पुन्हां शुद्ध दूध तयार होतें. या शिवाय ’‘अल्ट्राव्हायोलेट’‘ नांवाच्या विद्युत्किरणानेंहि दूध शुद्ध करतात. सूर्यप्रकाशांत ज्याप्रमाणें सूक्ष्म जंतुविनाशक धर्म आहे त्याप्रमाणेंच या ’‘अल्ट्राव्हायोलेट’' विद्युत्किरणांमध्येंहि आहे. म्हणून दुधाच्या पातळ थरावर हे किरण पाडले म्हणजे दूध सूक्ष्मजंतुविरहित होऊन शुद्ध होतें. अशा तर्हेचीं अल्ट्राव्हायोलेट किरणांचीं विद्युद्यंत्रें दूध शुद्ध करण्याकरितां पाश्चात्त्य देशांत ब-याच ठिकाणीं उपयोगांत आणतात; परंतु दूध वाफेनें तापवून नंतर थंड करून शुद्ध करण्याची पद्धत बहुतेक सर्व ठिकाणीं आहे. याशिवाय वाफेच्या उष्णतेनें दूध पूर्णपणें जंतुविरहित (स्टेरिलाइझड्) करून तें हवा न जाईल अशा स्प्रिंगच्या बुचाच्या बाटल्यांत भरून गिर्हाइकांस देण्याचीहि वहिवाट आहे. अशा रीतीनें दूध पूर्णपणें सूक्ष्मजंतुविरहित करण्यास उष्णमान २३० ते २६० पर्यंत न्यावें लागतें व तें निदान अर्धा तास तरी कायम ठेवावें लागतें. हें काम ज्या यंत्रानें करतात त्यास’‘स्टेरिलायझर’‘म्हणतात. दूध लांबवर रेल्वेमधून पाठवावयाचें असल्यास दुधाच्या चरवींत बर्फ ठेवण्याची व्यवस्था करतात. यानें दूध थंड राहून बिघडत नाहीं. अशा रीतीनें रेल्वेनें दूध लांबवर पाठविण्याकरितां तिकडील रेल्वेकंपन्यांनीं थंड रहाणा-या स्वतंत्र डब्यांचीहि व्यवस्था केलेली असते. गिर्हाइकांकडे दूध रवाना करण्याकरितां ज्या चरव्या उपयोगांत आणतात त्यांनां, केरकचरा पडून दूध बिघडूं नये म्हणून उत्तम झांकणांची व्यवस्था असून चरवींतून दूध काढण्याकरितां तोटीचीहि व्यवस्था असते.

(२) क्रीम अथवा मलई करणें:- पाश्चुरायझरमधून दूध तापल्यावर त्याचें उष्णमान हवामानाप्रमाणें ८५० ते ९५० पर्यंत कमी करतात अगर थंड केलेल्या दुधाचें तितकें वाढवितात, व नंतर क्रीम तयार करण्याच्या यंत्रानें (क्रीमसेपरेटर) त्यापासून क्रीम तयार करतात. या यंत्रांतील ज्या भागांत दूध पडतें व क्रीम वेगळें होतें त्याला चक्राकार तीव्र गति देण्याची व्यवस्था असते व याच तीव्र गतीमुळें केंद्रोत्सारिणी शक्ति उत्पन्न होऊन तिच्या योगानें दुधांतील जड भाग त्या फिरत्या भागाच्या परिघाकडे फेंकला जातो व त्यामुळें त्यांतील हलका भाग म्हणजे घृतांश त्याच्या मध्याकडे एकत्र होत जातो व हाच घृतांश अधिक असलेला दुधाचा भाग म्हणजे क्रीम होय. ही मलई व मलईविरहित दुधाचा भाग यंत्राच्या निरनिराळ्या भागांत पडण्याची व्यवस्था असते. तेथून ते निरनिराळ्या नळ्यांवाटे यंत्राबाहेर येतात. या यंत्रानें क्रीम तयार करतांना लक्षांत ठेवावयाच्या गोष्टी खालीं दिल्या आहेत.

(१) गाळलेलें दूध घेणें व दुधाचें उष्णमान  ८५ ते ९५ हवामानाप्रमाणें ठेवणें; उन्हाळ्यांत व हिंवाळ्यांत ९५० उष्णमान असावें. (२) क्रीम करण्याचें यंत्र साफ ठेवणें, तेल देण्याच्या भागास यंत्र सुरू करण्यापूर्वी तेल देणें व यंत्राचे सर्व भाग जेथल्या तेथें नीट बसविणें. (३) यंत्रास गति प्रथम फार थोडी देऊन हलके हलके वाढविणें व दर मिनिटास साधारणपणें ६० वेळ यंत्राचा दांडा फिरेल इतकी पूर्ण गति मिळाल्यावर यंत्रांत दूध सोडणें व दूध संपेपर्यंत हीच पूर्ण गति कायम ठेवणें. (४) काम झाल्यावर यंत्राचें वेगळे होणारे भाग स्वच्छ धुवून व्यवस्थितपणें ठेवणें.

या यंत्रांत क्रीम पातळ किंवा घट्ट तयार करतां येईल अशी व्यवस्था असते. यंत्र सावकाश चालविल्यानें पातळ क्रीम तयार होतें व मर्यादेपेक्षां अधिक वेगानें चालविल्यास क्रीम घट्ट होतें. यंत्राच्या ज्या फिरत्या भागांत क्रीम तयार होतें तो भाग जर थोडासा खालीं वर झाला तर यंत्र काम नीट देत नाहीं. कारण असें झालें तर क्रीम निघलेल्या दुधांत क्रीम मिसळतें किंवा क्रीममध्यें क्रीम निघालेलें दूध मिसळतें. याकरितां तो फिरता भाग ज्यावर ठेवावयाचा असतो त्यामध्यें केव्हांहि फेरफार करूं नये.

क्रीम तयार करण्याच्या यंत्राशिवायहि दुधापासून क्रीम तयार करतात. एका उथळ अथवा खोल भांडयांत दूध पुष्कळ वेळ स्थिर ठेविलें म्हणजे त्या दुधांतील स्निग्धांश वरच्या भागांत येतो व त्याचा एक थर तयार होतो तेंच क्रीम होय. तें चमच्यानें निराळें घेतात. या रीतीनें क्रीम तयार करण्यास वेळ फार लागतो व दूध बिघडून जाण्याचा बराच संभव असतो व त्यास हवामान विशेष थंड असावें लागतें. या सर्व अडचणी क्रीम तयार करण्याच्या यंत्रानें दूर झाल्या आहेत म्हणून यंत्राच्या साहाय्यानें बहुतेक सर्व ठिकाणीं क्रीम तयार करण्यांत येतें. दुधांत जे घटक असतात तेच क्रीममध्येंहि असतात. फरक इतकाच कीं, स्निग्धांश अधिक असतो. क्रीम म्हणजे दुधावरचा सांकाच होय. खालीं दिलेल्या कोष्टकांत क्रीम व दूध यांच्या घटकांचें शेंकडा प्रमाण दिलें आहे त्यावरून हें लक्षांत येईल.

घटकपदार्थ  उत्तम दूध उत्तम क्रीम कनिष्ठ क्रीम
पाणी ८१.१९ २९.० ७६.६
स्निग्धांश ०८.७० ६७.५ १५.१
मांसजनक पदार्थ ०४.३७ ०१.२ ०३.२
दुग्धशर्करा ०४.९१ ०२.२ ०४.५
निरिंद्रियक्षार ००.८३ ००.१ ००.६


दाट क्रीममध्यें स्निग्धांश अधिक असतो व पाणी व इतर घटकांचें प्रमाण कमी असतें. याच्या उलट स्थिति पातळ क्रीमची असते हें वरील कोष्टकावरून उघड होतें. क्रीम दुधांपेक्षां हलकें असतें. कारण त्याचें विशिष्टगुरुत्व घटकांच्या परस्परप्रमाणाप्रमाणें  १.०१७ पासून ०.९४७ पर्यंत बदलतें. थंडीनें क्रीम दाट होतें व उष्णतेनें पातळ होतें. क्रीमपासून लोणी तयार करितात. लोणी तयार करण्यास थंडीच्या दिवसांत क्रीम पातळ असावें व उन्हाळ्याच्या दिवसांत दाट असावें. कारण थंडीच्या दिवसांत पातळ क्रीम लवकर विरजतें व उन्हाळ्याच्या दिवसांत दाट क्रीम असलें म्हणजे दुग्धाम्ल जंतूंची वाढ कमी होऊन दूध फसफसून जात नाहीं. याचें मुख्य कारण दुग्धशर्करेचें कमजास्त प्रमाण हेंच आहे. दुग्धशर्करेमुळेंच सूक्ष्म जंतूची वाढ होते.

मलईविरहित दूध:- क्रीम काढल्यावर जें मलईविरहित दूध रहातें त्याचाहि उपयोग साध्या दुधाप्रमाणें करतात. साध्या दुधांत फरक इतकाच कीं घटकांचें परस्परप्रमाण वेगळें असतें. मलईविरहित दुधांत स्निग्धांश फारच कमी असतो व पाण्याचा अंश दुधापेक्षां फारच जास्त असतो. मलईविरहित दुधापासून केसीनें तयार करतात. याशिवाय त्यापासून’दुग्धशर्करा’‘हि तयार करतात. कारण वैद्यकांत तिचा उपयोग फार असतो.

गाईच्या दुधांत मांसजनक पदार्थ, दुग्धशर्करा, व निरिंद्रियक्षार यांचें शेंकडाप्रमाण साध्या दुधापेक्षां थोडें अधिक असल्यानें मलईविरहित दूध साध्यापेक्षां पौष्टिक असतें.

क्रीम तयार करण्याच्या यंत्राची व्यवस्था:- या यंत्राचे सुटे होणारे भाग क्रीम तयार करणें झाल्याबरोबर वेगळे करावे व प्रथम थंड पाण्यानें धुवून नंतर ते साबणाच्या अगर धुण्याच्या सोड्याच्या पाण्यानें धुवून स्वच्छ करावे व नंतर हवाशीर ठिकाणीं व्यवस्थित रीतीनें पालथे ठेवून त्यावर स्वच्छ पातळ कापड घालून ठेवावें, म्हणजे त्यांवर केरकचरा पडत नाहीं. या यंत्राच्या ज्या फिरत्या भागांत क्रीम तयार होतें त्याच्या आंतील भागास दाट पांढरा पदार्थ चिकटलेला असतो तो क्रीम समजून क्रीममध्यें मिसळूं नये. या दाट पदार्थांत दुधांतील सूक्ष्म जंतू व कचरा असतो. यंत्राचा सुटा न होणारा भाग दमट कपड्यानें पुसून स्वच्छ करावा. पाण्यानें धुवूं नये कारण त्यानें गंज चढतो.

(३) मलईपासून लोणी करणें, मलई विरजणें:- विरजण्याकरितां मलाई घेणें ती चिनी मातीच्या, कथलाच्या अगर एनॅमलच्या रुंद तोंडाच्या भांडयांत ठेवावी व त्यावर स्वच्छ कापड झांकण घालावें. विरजण्याकरितां हें क्रीमचें भांडें थंडीच्या दिवसांत थंड ठिकाणीं ठेवावें. हवामानाप्रमाणें व कमीअधिक पातळपणाप्रमाणें आठपासून चोवीस तास मलई होण्यास वेळ लागतो. थंडींत अधिक व उन्हाळ्यांत कमी वेळ लागतो. क्रीममध्यें थोडेसें ताजें ताक मिसळलें म्हणजे तें लवकर विरजतें. क्रीम विरजण्यास ठेविलें म्हणजे मधून मधून २।३ वेळ ढवळावें म्हणजे खालपासून वरपर्यंत तें चांगलें विरजतें; वर दाट व खालीं पाणी असें दुधदुभतें होत नाहीं. होतां होईतों ताजें व शिळें क्रीम एकत्र मिसळूं नये. परंतु प्रसंगानुसार क्वचित् तसें करावें लागल्यास ताजें व शिळें क्रीम यांचें ढवळून एकजात मिश्रण करावें म्हणजें तें चांगलें विरजतें. क्रीम चांगलें विरजलें म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त दाट होतें. नंतर तें थोडें गरम होतें व त्यास किंचित् दह्यासारखा आंबूसहि वास येतो. विरजलेलें क्रीम वाजवीपेक्षां जास्त वेळ ठेवल्यास तें फेंसाळतें व फसफसून जातें व त्यास वाईट वास येऊं लागतो. त्यांत असलेल्या नायट्रोजनयुक्त पदार्थाच्या व स्निग्धांशाच्या विघटीकरणामुळें वाईट वास येऊं लागतो. हा वास अशा क्रीमपासून केलेल्या लोण्यासहि लागतो म्हणून योग्य वेळींच लोणी करावें.

क्रीमपासून लोणी करणें:- क्रीम पासून लोणी तयार करण्याचीं निरनिराळ्या प्रकारचीं लहानमोठीं यंत्रें असतात. पैकीं लांकडी यंत्रें प्रथम कढत पाण्यानें स्वच्छ धुवावीं व नंतर त्यांत थंड पाणी घालावें. लांकडांत पाणी मूरून तें चांगलें थंड झाल्यावर त्यांत क्रीम घालण्यास तें योग्य होतें. कधीं कधीं कढत पाण्यानें यंत्र धुतल्यावर त्यास आंतील बाजूनें बारीक मीठहि चोळतात. असें केल्यानें लोणी चिकटून लांकूड मेणचट होत नाहीं. विरजलेलें क्रीम दाट असतें म्हणून त्यांत थोडें थंड पाणी घालून पातळ करावें व त्यांत केषरबोंडीचा, रंग ताज्या दुधांत मिसळून अगर आयता ऑलिव्ह तेलांत तयार केलेला रंग मिसळून मोठ्या भोकांच्या गाळणींतून गाळावें व नंतर तें गाळलेलें क्रीम लोणी तयार करण्याच्या यंत्रांत ओतावें. झांकण नीट घट्ट बसविल्यावर तें यंत्र चालू करावें. साधारणपणें दर मिनिटास ३० ते ४० वेळा यंत्र फिरेल इतकी त्यास गति द्यावी. थोड्या वेळानें आंतील कर्बाम्ल मिश्रित हवा बाहेर काढून लावण्याकरितां झांकणात असलेलें बटन दाबावें म्हणजे फुस्स असा आवाज होऊन आंतील हवा बाहेर येते. नंतर पुन्हां तें यंत्र चालवावें. मधून मधून झांकणांत बसविलेल्या कांचेकडे पहावें. लोण्याचे बारीक दाणे जसजसे तयार होत जातात तसतशी ही कांच निवळत जाऊन लोणी तयार झालें म्हणजे ती अगदीं स्वच्छ होते व तिला बाजरी अगर जोंधळ्याएवढाले लोण्याचे दाणे थोडे चिकटलेले दिसतात. ही स्थिति आल्यावर यंत्र बंद करावें क्रीम अतिशय थंड असल्यास अगर जास्त गरम असल्यास अनुक्रमें कोमट अथवा थंड पाणी घालावें लागतें. म्हणजे लवकर लोणी येतें. यंत्र अर्धे भरेल इतकें अगर त्यापेक्षां कमी क्रीम यंत्रांत ओतावें. क्रीम जास्त झाल्यास लोणी लवकर येत नाहीं. झांकणांतल्या कांचेस जोंधळ्याएवढे लोण्याचे कण चिकटलेले असून ती स्वच्छ दिसली म्हणजे १०/१५ मिनिटें यंत्र स्थिर ठेवावें म्हणजे लोण्याचे कण ताकाच्या वरच्या भागांत एकत्र होतात. नंतर झांकण काढून ताक बाहेर काढून घेण्याचें भोंक मोकळें करून ताक काढून घ्यावें. असें करतांना बाहेर येणा-या ताकाच्या धारेखालीं पातळ ओलें फडकें किंवा केसांची गाळणी धरावी म्हणजे शेवटीं शेवटीं ताकाबरोबर बाहेर येणारे लोण्याचे कण त्यावर अडकतात व वांया जात नाहींत. ताकाबरोबर लोण्याचे कण येऊं लागले कीं, तें भोंक बंद करावें व लोण्याच्या दाण्यावर सुमारें ताकाइतकेंच थंड पाणी ओतावें व झांकण घट्ट बसवून एक दोन मिनिटें यंत्र सावकाश चालवावें व पूर्वीप्रमाणें थोडा वेळ स्थिर ठेवून त्या भोंकावाटे पाणी काढून घ्यावें. अशानें लोण्याच्या कणांत जो ताकाचा अंश उरलेला असतो तो धुवून जातो. याप्रमाणें ३ वेळ केल्यावर साधारण निवळ पाणी येऊं लागतें. असें झाल्यावर हें धुण्याचें काम बंद करून लोण्यावर बर्फानें थंड केलेलें पाणी घालून यंत्र स्थिर ठेवावें. बर्फाच्या पाण्यानें लोण्याचे दाणे कठिण होतात. नंतर ते दाबून त्यांतलें पाणी काढून टाकणें व त्याच्या वड्या करणें शक्य होतें. लोणी करण्यांत पुढील बाबी अवश्य पाळाव्या, (अ) सर्व लांकडी जिनसा पाण्यांत भिजलेल्या व थंड पाहिजेत, (आ) रंग बेतानें किंचित पिंवळसर होईल इतकाच घालावा. (इ) वाजवीपेक्षां फाजील वेळ यंत्र चालवूं नयें; कारण फाजील घुसळण्यानें लोण्याचें मोठमोठे गोळे होतात, लोणी मेणचट होतें, त्याचा दाणेदारपणा रहात नाहीं व त्यांतलें सर्व ताक धुवून काढतां येत नाहीं व असलें लोणी जास्त वेळ चांगलें टिकत नाहीं. (ई) लोण्याच्या बाबतींत लागणा-या पाण्याचें उष्णमान ६० पेक्षां जास्त असूं नये. (उ) लोण्यांतील ताकाचा सर्व अंश धुवून काढणें.

लोण्याच्या वड्या तयार करणें:- बर्फाच्या पाण्यानें लोण्याचे दाणे चांगले कठिण झाल्यावर लांकडी चमच्यानें ते लोणी दाबण्याच्या यंत्रावर ठेवावे व त्यांतलें पाणी तें यंत्र चालवून काढून टाकावें. या यंत्रानें लोणी वाजवीपेक्षां फाजील दाबल्यास त्याचा दाणेदारपणा मोडतो व तें मेणचट होऊन कमी प्रतीचें होतें. पाणी काढल्यावर याच यंत्रानें लोण्यांत स्वच्छ व बारीक केलेलें मीठ मिसळतात. साधारणपणें शेंकडा २/३ टक्क्यांपेक्षां अधिक मीठ केव्हांहि घालूं नये. पुष्कळदां लोणी तयार करण्याच्या यंत्रांतच मीठ घातलेलें बर्फाचें पाणी घालून तें यंत्र एक दोन मिनिटें सावकाश चालवितात व दाणा कठिण झाल्यावर लोणी दाबण्याच्या यंत्रावर दाबतात व मग निराळें मीठ घालीत नाहींत. लोण्यांत मीठ मिसळल्यावर लांकडी थापटणी व ठसे यांच्या साहाय्यानें लोण्याच्या चौकोनी अगर वाटोळ्या वड्या तयार करून बर्फात ठेवतात. लोण्याच्या वडयांस गुंडाळण्याकरितां एक विशिष्टप्रकारचा कागद केलेला असतो त्यांत त्या गुंडाळून ठेवतात. हा कागद पाण्यानें भिजला तर साध्या कागदाप्रमाणें फाटत नाहीं, हा त्याचा विशेष धर्म आहे. बर्फात लोणी ठेवल्यानें तें पुष्कळ दिवस चांगल्या स्थितींत टिकतें.

लोण्याचे घटक:- विरजलेल्या क्रीमचे जे घटक असतात ते सर्व लोण्यांत असतात. परंतु त्यांचें परस्पर प्रमाण मात्र भिन्न असतें. व या घटकांशिवाय त्यांत मीठ अधिक असतें. साधारणपणें लोण्यांत शेंकडा ८० ते ८५ टक्के स्निग्धांश असतो. व शेंकडा १५ ते २० टक्के पाणी, मीठ, दुग्धशर्करा वगैरे असतात. पुढील आंकडयांवरून लोण्याचे घटक साधारणपणें शेंकडा कोणत्या प्रमाणांत असतात तें समजेल.

मीठ घातलेलें लोणी:- पाणी १२.५०; स्निग्धांश ८४.६२; मांसजनक पदार्थ ०.४८; दुग्धाम्ल व दुग्धशर्करा ०.४०; मूळचे निरिंद्रियक्षार व मीठ २.०० शिवाय लोणी जर खंबट झालें असलें तर मांसजनक पदार्थ व स्निग्धांश यांच्या विघटीकरणानें नवीन पदार्थ उत्पन्न झालेले असतात. व त्यामुळेंच अशा लोण्यास घाण येते. या विघटीकरणानेंच लोणी खंबट होतें.

लोण्याची प्रत त्याच्या घटकांचें शेंकडा प्रमाण, त्याचा स्वाद, चव व रंग आणि त्याचें पॅकिंग यांवरून लावण्यांत येते. त्याचा टिकाऊपणाहि लक्षांत घेतला जातो. ताज्या क्रीमपासून केलेलें लोणी विरजलेल्या क्रीमपासून केलेल्या लोण्यापेक्षां जास्त टिकाऊ असतें. त्याचा स्वाद थोडा निराळा असतो परंतु ताज्या क्रीमपासून लोणी करण्यास थोडा अधिक वेळ लागतो. लोणी केल्यावर सर्व लांकडी जिनसा व यंत्रें प्रथम थंड पाण्यानें धुवून नंतर किंचित सोडा घातलेल्या कढत पाण्यानें ब्रशानें चोळून धुवावींत व नंतर कडकडीत पाण्यानें दोन तीन वेळ धुवून उघड्या हवेंत परंतु सावलींत व्यवस्थित रीतीनें ठेवून त्यांवर पातळ स्वच्छ कापड घालावें म्हणजें त्याच्यावर केरकचरा पडत नाहीं. लांकडी जिनसा व यंत्रें उन्हांत ठेवल्यास ती तडकतात व खराब होतात.

चीझ:- वर दिलेल्या पदार्थांशिवाय पाश्र्चात्त्य देशांत दुधापासून’'चीझ'‘या नांवाचा एक पदार्थ तयार करतात व त्यास तिकडें क्रीम लोण्याइतकेंच महत्त्व आहे. चीझ तयार करण्यास केवळ दुधावर पोसणा-या गाईंच्या वासरांच्या पोटापासून तयार केलेल्या’'रेनेट'‘नांवाच्या पदार्थाची आवश्यकता असते व ही गोष्ट हिंदुधर्मबाह्य असल्यामुळें निवृत्तामांस लोकांस चीझ पदार्थाचें मुळींच महत्त्व नाहीं. व याकरितांच कांहीं थोड्या मिलिटरी डेअरींखेरीज कोठेंहि चीझ तयार करीत नाहींत.

केसीन:- दुवांत जे मांसजनक पदार्थ असतात त्यांत’'केसीन'‘पदार्थ मुख्य आहे व त्याचे प्रमाणहि जास्त असतें. दुधांतील केसीन (चोथा) निराळें काढण्याकरितां मलईविरहित दूध घ्यावें लागतें. दुधापासून केसीन तयार करण्याकरितां गंधकाम्ल अथवा ऍसिटिक अॅसिडचा उपयोग करतात. मोठ्या प्रमाणांत केसीन करण्यास गंधकाम्लच बरें असतें. साधारणपणें दीड भाग गंधकाम्ल घेऊन तो सात भाग पाण्यांत मिसळावा व जें मिश्रण तयार होईल तें १००० भाग दुधापासून केसीन करण्यास पुरें होतें. मलईविरहित दुधांत वरील मिश्रण मिसळावें व तापवावें. जसजसें तें तापत जातें तसतसें केसीन वेगळें होऊं लागतें व दूध फाटल्यासारखें दिसतें. सर्व केसीन वेगळें झालें म्हणजे केसीन घट्ट होऊन त्याचा गोळा होतो व किंचित पिवळटनिळसर रंगाचें पाणी निराळें होतें. असें झाल्यावर तें पिंवळट पाणी गाळून वेगळें करावें व जो पांढरा घट्ट पदार्थ गाळण्यावर राहतो तेंच केसीन होय. असलें केसीन जास्त शुद्ध करण्याकरितां सोडा कार्बोनेटच्या पाण्यांत घालून तापवावें म्हणजे तें त्या पाण्यांत विरून जातें व नंतर ऍसिटिक अॅसिड व पाणी यांचें मिश्रण घालून तापविलें म्हणजे पुन्हां तें घट्ट होऊन त्याचा गोळा होतो, नंतर गाळण्यानें तें केसीन वेगळें करावें व त्याचे बारीक तुकडे करून वाळवावे म्हणजे झालें. अशा रीतीनें केलेलें केसीन जास्त शुद्ध असतें. साधारणपणें केसीनचें प्रमाण शेकडां साडेतीन टक्के पडतें. केसीन वाळल्यानंतर गारगोटीसारखें दिसतें व तें फार कठिण असते. शुद्ध केलेल्या केसीनमध्येंहि कॅलशियम फॉस्फेट संयुक्त स्थितींत थोडें असतेंच. केसीनचा उपयोग गोंद करणें, बटणें करणें, कागद ग्लेझ करणें, बनावट हस्तिदंत करणें, लहान मुलें व अशक्त माणसांकरितां अन्न तयार करणें वगैरे अनेक कामांकडे होतो म्हणून त्यास बाजारांत फार मागणी असते. ज्या ठिकाणीं मलईविरहित दूध रोज पुष्कळ तयार होतें व त्यास नीट भाव येत नाहीं अगर मागणीहि नाहीं अशा परिस्थितींत त्यापासून केसीन तयार करणें फार फायदेशीर पडतें. केसीन अगदीं कोरड्या स्थितींत सुरक्षितपणें ठेवलें म्हणजे बिघडत नाहीं म्हणून तें जसें तयार होईल तसें सांठवावें व बरेंच सांठलें म्हणजे एकदम विकावें. साध्या दुधापासून केसीन करणें फायदेशीर पडत नाहीं व शिवाय त्यांतला स्निग्धांश काढणें कठिण जातें.

कंडेंस्ड मिल्क अथवा आटींव दूध:- हें कंडेस्ड मिल्क अथवा आटीव दूध साध्या अगर मलाईविरहित दुधापासून करतात. ते करतांना त्यांत साखर घातलेली असते अगर नसते. दूध आटण्याकरितां’व्हॅकमपॅनचा’(निर्वातपात्राचा) उपयोग करतात. म्हणजे उष्णतेचा दुधाच्या घटकांवर परिणाम होत नाहीं व तें पाण्याशीं लवकर मिसळून त्याचें दूध सहज तयार करतां येतें. दूध आटवतांना त्याचें उष्णमान १६०० पेक्षां जास्त ठेवीत नाहींत व साधारणपणें तीन हिस्से आटल्यावर आटवण्याचें बंद करतात व असें करतांना त्यांत सूक्ष्म जंतूंचा शिरकाव कोणत्याहि रीतीनें होणार नाहीं अशी खबरदारी घेण्यांत येते.

आटलेल्या दुधांत कधीं कधीं तें आटण्यापूर्वी दर शेर दुधास दोन छटाक या प्रमाणांत साधारणपणें साखर घालतात. त्यामुळें तें गोड होऊन जास्त टिकाऊ होतें. आटवलेलें दूध पुष्कळ महिने चांगल्या स्थितींत रहातें व तें दूरदूरच्या ठिकाणीं पाठविणें सोईस्कर होते. आटवलेल्या दुधाचा उपयोग लढाईच्या काळांत फौजेकरितां, दुष्काळांत गोरगरिबांकरितां, मोठमाठ्या दवाखान्यांत रोग्यांकरितां व प्रवासांत फारच होतो. साध्या दुभत्यांत हें तयार करीत नाहींत; तें तयार करण्याचे स्वतंत्रच कारखाने असतात.

विशिष्ट श्रेणीचें (स्टँडर्डाइझड्) दूध व क्रीम:- अशक्त, आजारी माणसें व लहान मुलांनां जें दूध द्यावें लागतें त्यांत स्निग्धांश वगैरे दुधाचे निरनिराळे घटक कांहीं विशिष्ट प्रमाणांत ठेवल्यास त्यांपासून फायदा होतो. नाहीं तर प्रकृतीस अपाय होण्याचा संभव असतो. कारण स्निग्धांश वगैरेचें प्रमाण प्रकृतीस मानवेल त्यापेक्षां जास्त असल्यास अपचन होऊन विकार उद्धवतो, असा डॉक्टरांचा व वैद्यांचा अनुभव आहे; म्हणून अशा माणसांकरितां कांहीं विशिष्ट श्रेणीचें दूध तयार करून विकण्याची वहिवाट पाश्र्चात्त्य देशांत आहे. दुधांत स्निग्धांश विशिष्ट प्रमाणांत राखण्यास साधें व मलईविरहित दूध थोडथोडें मिसळतात.

दुभत्यासंबंधीं हिशोब:- हा हिशोब पद्धतशीर ठेवल्यानें अनेक फायदे आहेत. दुभतें हें धंदा या दृष्टीनें पाहिलें तर त्यांत अनेक अडचणी कोठें, कधीं व कशा आल्या व त्यांचा परिणाम काय झाला याचा नक्की थांग पद्धतशीर हिशोबानेंच कळतो. मोठ्या जनावरांची व वासरांची नोंद, जनावरांची व्यक्तिश: माहिती, सामानाची यादी, चारादाण्याचा हिशोब, रोजच्या धारेचें टिपण, व्यक्तिश: गिर्हाइकांचा हिशोब, दूध वगैरेंची जमा व विल्हेवाट यांचा हिशोब. यांचे तक्ते करून सर्व नोंदी जेव्हांच्या तेव्हां कराव्यात. याशिवाय कीर्द व खतावणी ठेवावी. म्हणजे दुभत्याचा धंदा चांगला चालण्यास हरकत येणार नाहीं. (ले. रा. भास्कर काशिनाथ घारे.)

दुधाचे औद्योगिक उपयोग:- दुधापासून बरेच जिन्नस तयार करितात. त्यांपैकीं प्रमुख या ठिकाणीं उल्लेखिले आहेत. दूध व तूप ह्यांचा उपयोग खाण्याकडे व मेवामिठाई करण्याकडे करतात. दुधापासून शास्त्रीय पद्धतीनें काढल्या जाणा-या साखरेचा उपयोग होमिओपाथीचीं औषधें बनविण्याच्या कामीं फार होतो. जर्मन टिश्यू रेमिडीज अथवा बायोकेमिक औषधांमध्यें या साखरेचा मुख्य उपयोग करतात. मुरंबे, पाक, सरबतें इत्यादि पदार्थ नासूं नयेत म्हणून त्यांमध्येंहि दुधाची साखर घालतात. त्यायोगें हे पदार्थ दीर्घकालपर्यंत नासत अगर आंबत नाहींत. वनस्पतींच्या काढयांतहि दुधापासून काढलेली साखर घालतात. शेंकडा एकपासून दोनपर्यंत ह्या काढयांमध्ये साखर घातल्यास ते नासत नाहींत. अशा प्रकारचे काढे आपल्याकडे अद्याप तयार होऊं लागले नाहींत. दुधापासून निघणा-या चोथ्याचा (केसीन) कृत्रिम हस्तिदंत तयार करण्याच्या कामीं चांगला उपयोग होतो. या हस्तिदंताचे कंगवे, बटणें, छत्रीच्या मुठी, चाकू, मुलांचीं खेळणीं इत्यादि वस्तू करतात. आरारूट, सवागी, जस्ताचें फूल व चोथा यांच्या योग्य मिश्रणापासून तोंडाला लावण्याची गुलाबी पावडर तयार होते. त्याचप्रमाणें या चोथ्यापासून इतर कांहीं पदार्थांच्या मिश्रणानें साबण, बिलियर्डचे चेंडू, पेपरवेट्स, सोंगट्या, फांसे वगैरे वस्तू तयार करतात. यापासून अनेक प्रकारचे रंगहि करूं लागले आहेत. कापड वॉटरप्रुफ करण्याच्या कामींहि या चोथ्याचा उपयोग होतो. असे दुधापासून निघणा-या या चोथ्याचे नानाविधि उपयोग आहेत. (रा. स. वा. परांजपे केमिस्ट (टोकियो) यांचा’दूध व त्याचे उपयोग या लेखाचा सारांश.)

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .