प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या  

दृष्टि:- पाहण्याची क्रिया नेत्रांकडून होते. चक्षुरिंद्रियाच्या अन्तर्गत पडद्यावर (रेटिना) प्रकाशाच्या योगानें बाह्यवस्तूंची प्रतिमा पडते. या पडद्याला दृङ्मज्जारज्जू जोडलेले असतात. या मज्जारज्जूंच्या योगानें पडद्यावरील प्रतिमेचें ज्ञान मेंदूस होतें. जर प्रकाशकिरण पडद्यावर एकवटून न पडतां विस्तृतपणें पडतील तर त्या योगानें पदार्थ ओळखतां येणार नाहींत; म्हणून पदार्थाची प्रतिमा बरोबर रीतीनें नेत्राच्या पडद्यावर पडावी म्हणून एक विशिष्ट प्रकारची रचना असते. हें काम कनीनिका आणि डोळ्यांत असणारें बाह्यगोलभिंग (लेन्स) हीं करितात; फोटोच्या क्यामेर्यांत ज्याप्रमाणें प्रतिमा कांचफलकावर (ग्रौंड ग्लासवर) पडते त्याप्रमाणेंच या नेत्रान्तर्गत लेन्सच्या योगानें चक्षुरिंद्रियान्तर्गत पडद्यावर प्रतिमा पडते व त्या योगानें आपणांस ज्ञान होतें.

त्रिपार्श्र्व (प्रिझम) भिंगांतून सूर्यप्रकाशाचे किरण पाठविले तर सात रंगांचा एक पट्टा पडतो. या पट्टयास’'कृत्रिम इंद्रधनुष्य'‘असें नांव आहे. पदार्थविज्ञानशास्त्रवेत्तयांनीं असें सिद्ध केलें आहे कीं, तांबड्या किरणांच्या योगानें सुमारें दर सेकंदास ३९२ महापद्म आंदोलनें आणि तांबडा रंग; किंवा ७५७ महापद्म आंदोलनें आणि जांभळा रंग यांमध्यें कसा काय कार्यकारण संबंध आहे हें अद्याप शास्त्रज्ञलोकांस समजलें नाहीं. जर दर सेकंदास इथरची ३९२ महापद्म आंदोलनांपेक्षां कमी आंदोलनें किंवा ७५७ आंदोलनांपेक्षां जास्त आंदोलनें झालीं तर मानवी नेत्रास त्यांचें ज्ञान होत नाहीं. तांबड्या रंगाच्या आंदोलनांपेक्षां कमी आंदोलनें झाल्यास त्यांचें उष्णतेच्या किरणांच्या रूपानें ज्ञान होऊं शकतें व जांभळ्या रंगाच्या आंदोलनांपेक्षां जास्त आंदोलनें झाल्यास त्यांच्या योगानें कांहीं रासायनिक क्रिया घडतात. जर याप्रमाणें जास्त आंदोलनाच्या लहरी क्किनाइन सल्फेट या नांवाच्या पदार्थाच्या द्रावणांतून जाऊं दिल्या तर मानवी नेत्रांस त्या दृग्गोचर होऊं शकतात. याचें कारण असें आहे कीं, वरील द्रव्वाच्या योगानें त्यांची आंदोलनें कमी प्रमाणावर होऊं लागतात त्यामुळें मनुष्यास हीं आंदोलनें दिसूं लागतात. रांइटजन किरण नांवाच्या किरणांचीं दर सेकंदास ७५७ पेक्षां जास्त आंदोलनें होतात, त्यामुळें हे किरण दिसत नाहींत. परंतु हेच किरण बेरिअम प्लाटिनो सायनाइड नांवाच्या द्रवांतून गेल्याच्या योगानें ते मानवी दृष्टीस दृग्गोचर होऊं शकतात. कारण कीं ह्या किरणांचीं आंदोलनें वरील द्रवाच्या योगानें ब-याच कमी प्रमाणावर होऊं लागतात व त्यामुळें आपल्या नेत्रास हें किरण पाहतां येतात.

आपल्या डोळ्यांत एक लेन्स असतें म्हणून वर सांगितलेंच आहे. जवळचा पदार्थ पाहतांना तें लेन्स नेत्रांतील स्नायूंच्या योगानें जास्त फुगीर होतें व दूरचे पदार्थ पाहतांना लेन्स पातळ होतें. त्यामुळें आपणास दूरचे किंवा जवळचे पदार्थ स्पष्टपणें पाहतां येतात. मनुष्याच्या नेत्रांतील लेन्सांत कित्येक दोष उत्पन्न होतात. त्या दोषांचें निराकरण करावयाचें असल्यास कित्येकदां नेत्रांपुढें कृत्रिम कांचेचीं लेन्सें बसवून दृष्टिदोषाचें निराकरण करतां येतें.

कनीनिका:- आपल्या डोळ्यांत जो काळा भाग दिसतो त्याच्या मध्यभागीं एक बारीकशा मसुरीएवढें वर्तुल दिसतें. अर्धवट अंधेरांत हें वर्तुळ पाहिल्यास मोठें झालेलें दिसतें व तीव्र उजेडांत बारीक झालेलें दिसतें. ही क्रिया एका पडद्याच्या योगानें होते. या पडद्यास कनीनिका असें नांव आहे. या पडद्यास कांहीं स्नायु जोडलेलें आहेत, त्यांच्या योगानें वरील छिद्र लहानमोठें होतें. अंधेरांतून उजेडांत आल्यास मोठ्या छिद्रांतून जास्त प्रकाश येऊं लागतो, व त्यामुळें दृङ्मज्जारज्जूस त्रास होऊं लागतो, हा त्रास न व्हावा म्हणून कनीनिकेचें छिद्र लहान होतें; व त्यामुळें प्रकाश माफक प्रमाणावर नेत्रांत गेल्यामुळें नीट दिसूं लागतें.

अंधबिंदु आणि पीतबिंदु:- एका कागदावर सुमारें पावणेदोन इंचांच्या अंतरावर एक फुली व एक लहान काळा ठिपका अशीं दोन चिन्हें काढावींत. नंतर डावा डोळा मिटून फुलीकडे पहात कागद पुढेंमागें सरकवावा; म्हणजे कागदाची अशी एक स्थिति होते कीं, फुली दिसते, परंतु ठिपका दिसत नाहीं. या चमत्काराचें कारण असें आहे कीं, ठिपक्याची प्रतिमा नेत्राच्या पडद्यावरील’अंधबिंदु’नांवाच्या स्थळीं पडते. त्यामुळें त्याची प्रतिमा आपणांस दिसत नाहीं. नेत्राच्या पडद्यावर दोन महत्त्वाचीं स्थळें आहेत. त्यांपैकीं एकास पीतबिंदु व दुस-यास अंधबिंदु अशीं नांवें आहेत. पीतबिंदूवर बाह्य वस्तूची प्रतिमा पडल्यास ती अगदीं स्पष्टपणें दिसते; अंधबिंदूवर पडल्यास प्रतिमेचें ज्ञान मनास होत नाहीं; व या दोहोंव्यतिरिक्त अन्यस्थळीं (पडद्यावरच) प्रतिमा पडल्यास ती साधारणपणें दिसते.

दृष्टिसातत्य:- नेत्राच्या पडद्यावर प्रतिमा पडली व नंतर ती प्रतिमा नाहींशी झाली तरी तिचें आपणांस कांहीं काळपर्यंत ज्ञान होतें. हा काळ सुमारें १/७० सेंकडपासून १/३० सेकंदांपर्यंत आहे. नेत्रेंद्रियाच्या या गुणधर्माचा उपयोग सिनेमाटोग्राफ नांवाच्या यंत्रांत केलेला आहे. व्यवहारांत सुद्धां असेंच दिसून येईल. उ पेटलेली उदबत्ती घेऊन ती झपाट्यानें वर्तुलाकार फिरविल्यास आपणास अग्निवर्तुल दिसतें; याचें कारण सुद्धां दृष्टिसातत्य हेंच आहे.

अंतर्विसर्जन:- क्षेत्रफळानें सारखे असे दोन चौकोन घेतले व प्रत्येकांत एकेक लहान चौकोन काढला, व एक काळा आणि दुसरा पांढरा असा रंगविला तर आंतला काळा चौकोन पांढ-या चौकोनापेक्षां किंचितसा लहान दिसतो. असें दिसण्याचें कारण असें आहे कीं, नेत्रपटलावर जो ठसा उमटतो तो चित्राच्या आकाराच्या बाहेर थोडासा जातो. यामुळें शुभ्र वस्तूंचा ठसा काळ्या प्रदेशावर पडून त्यामुळें कृष्ण भूमिकेवरील शुभ्र वस्तू किंचितशा मोठ्या दिसूं लागतात. हा जो परिणाम दिसतो त्यास अंतर्विसर्जन अशी संज्ञा आहे. हा परिणाम भिन्न भिन्न लोकांवर भिन्न भिन्न प्रमाणांत घडतो आणि एकाच मनुष्यावर भिन्न भिन्न दिवशीं भिन्न भिन्न प्रमाणांत घडतो.

रंगांचें ज्ञान:- रंगाचें जें ज्ञान होतें तें ईथरमध्यें ठराविक आंदोलनें अथवा कंप होऊन त्यांची प्रतिमा नेत्रपटलावर पडल्याच्या योगानें होतें. ठराविक प्रमाणांत ठराविक कंप झाल्याशिवाय रंगाचें ज्ञान होणें शक्य नाही. शुभ्र प्रकाश सात रंगांच्या मिश्रणानें उत्पन्न होतो. एखाद्या पदार्थावर सूर्यप्रकाश पडला असतांना तो प्रकाश त्या पदार्थापासून परावर्तन होतांना त्या पदार्थानें कोणत्याहि प्रकारच्या प्रकाशलहरीचें ग्रहण न करितां प्रकाशाचें उत्सर्जन केल्यास तो पदार्थ पांढरा दिसतो. सर्वच प्रकारच्या लहरींचें ग्रहण करून कांहींच उत्सर्जन न केल्यास तो पदार्थ काळा दिसतो. जर पदार्थांनें हिरव्याशिवायकरून दुस-या सर्व प्रकारच्या लहरींचें ग्रहण केलें तर पदार्थ हिरवा दिसतो; याप्रमाणेंच दुस-या रंगांविषयीं समजावें.

निरनिराळ्या रंगांचें मिश्रण:- निरनिराळ्या रंगांचें मिश्रण करण्याच्या अनेक पद्धती आहेत; त्यांपैकी एक दोन पद्धती पुढें दिल्या आहेत.

पहिली पद्धत:- दोन कोन जवळ जवळ आणून एक फट तयार करतात. या फटीशेजारीं एक त्रिकोणी भिंग बसविलेलें असतें. या भिंगांत वरील फटींतून सूर्यप्रकाश घेऊन त्याच्यापासून योग्य प्रकारचा रंग येऊं येतात; नंतर दुस-या एका फटींतून दुस-या भिंगाच्या योगानें दुस-या एखाद्या रंगाचा प्रकाश येऊं देतात; हे दोन्ही रंग एका स्वच्छ पडद्यावर एकाच ठिकाणीं पडूं येतात. या पडद्याकडे पाहून या रंगाचें मिश्रण झालेलें समजून येतें.

दुसरी पद्धत:- समजा कीं, आपणांस हिरवा आणि नारिंगी यांचें मिश्रण करावयाचें आहे. तर अ व ब दोन ठिकाणीं त्या रंगाचे कागद ठेवून द्यावे व त्यांच्या वरल्या बाजूंस क येथें एक कांच धरावी. म्हणजे तेथील नारिंगी किरण कांचेपासून परावर्तन पाऊन निघतील व अ येथील हिरवे किरण क कांचेस छेदून जातील, असें झाल्यामुळें डोळ्यास हिरवा आणि नारिंगी यांचें मिश्रण पिवळें होतें असें आपल्या डोळ्यास समजून येतें.

तिसरी पद्धत:- एका चक्रावर जे रंग ज्या प्रमाणांत पाहिजे त्या प्रमाणांत त्या चक्रावरील वृत्ताखंडें रंगवावींत; नंतर तें चक्र यंत्राच्या साहाय्यानें अत्यंत वेगानें फिरवावें. अशा रीतीनें चक्र फिरत असतां त्याकडे पाहिलें तर आपणास दोन रंगांचें मिश्रण झालेलें दिसून येईल. याप्रमाणें चक्र फिरविलें तर दृष्टिसातत्यामुळें रंगांचें मिश्रण झालेलें दिसून येतें.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यानें इंद्रधनुष्यांत दिसणारे सात रंग याप्रमाणेंच एका चक्रावर काढून तें चक्र फार वेगानें फिरविलें. तेव्हां ते सात रंग निरनिराळे न दिसतां त्या सर्वांचा मिळून एकच पांढरा रंग दिसूं लागला; याप्रमाणें न्यूटननें सात रंगांच्या मिश्रणापासून पांढरा रंग उत्पन्न होतो असें सिद्ध केलें.

पांढ-या रंगांत किती प्रमाणांत सात रंग आहेत हें पुढें दिलेल्या वृत्ताखंडांच्या अंशांवरून ध्यानांत येईल.

रंगाचें नांव अंश कला
तांबडा ६० ४५.४'
नारिंगी ३४ १०.५'
पिवळा ५४ ४१.'
हिरवा ४५.'५
अस्मानी ५४ ४१'.
निळा ३४ १०.'५
काशपुष्परंग ६० ४५.'५


(वरील सर्व अंशांची बेरीज ३६० अंशांइतकी पाहिजे. परंतु .५’कला म्हणजे ३० विकला-इतकी तफावत पडते). वरील कोष्टकावरून प्रत्येक रंगाचें पांढ-या रंगांत काय प्रमाण आहे, याचा हिशोब करतां येतो.

रंगाविषयींचे सिद्धान्त:- रंगांचें ज्ञान आपणास कोणत्या प्रकारें होतें याविषयीं सध्यां प्रचलित असे दोन सिद्धान्त आहेत. या सिद्धान्तांचें विवेचन पुढें केलें आहे. प्रत्येक रंगाच्या ठराविक लांबीच्या लहरी असतात. पुढें कित्येक रंगांच्या लहरींची लांबी दिली आहे. लांबीचें परिमाण मिलिमिटरचा एक दषलक्षांष हें आहे. तांबडा ६५६; नारिंगी ६०८; पिंवळा ५६७; हिरवट पिंवळा ५६४; इत्यादि याप्रमाणें निरनिराळ्या लांबीच्या लहरींच्या योगानें निरनिराळे रंग दिसतात. परंतु अमुक प्रकारच्या लहरींच्या योगानें अमुक प्रकारचाच रंग कां दिसावा याविषयीं यंग आणि हेल्महोट्झ यांची पुढें दिल्याप्रमाणें कल्पना आहे. यंग यानें प्रथमत: ही कल्पना बसविली व नंतर हेल्महोट्झ यानें ती कल्पना जास्त परिणत केली.

नेत्रपटलावर तीन प्रकारचे मज्जातंतू आहेत असें यांत गृहीत धरलें आहे. त्यांतील एका प्रकारच्या तंतूनें तांबड्या लहरीचें ज्ञान होतें, दुस-या प्रकारच्यानें हिरवीचें ज्ञान होतें व तिस-या प्रकारच्यानें काशपुष्परंगाचें ज्ञान होतें. परंतु सृष्टीमध्यें तीन रंग नाहींत. तीन रंगांव्यतिरिक्त जे दुसरे रंग आहेत; तेव्हां त्यांनीं असें गृहीत धरलें कीं, दोन तीन प्रकारच्या मज्जारज्जूंस निरनिराळयया प्रमाणांत चेतना मिळते; त्यामुळें निरनिराळे रंग दिसतात. तिन्हीहि प्रकारच्या मज्जारज्जूंस समप्रमाणांत जर चेतना मिळाली तर पांढरा रंग दिसतो.

हेअरिंगचा सिद्धान्त:- वरील सिद्धान्ताविरुद्ध हेअरिंग नांवाच्या शास्त्रज्ञानें असा सिद्धान्त मांडला आहे कीं, नेत्रपटलावर तीन प्रकारचे मज्जारज्जू आहेत; त्यांतील प्रत्येकानें पुढील जोडयांचें ज्ञान होतें. त्या जोड्या येणेंप्रमाणें:- तांबडा आणि हिरवा; पिंवळा आणि निळा; पांढरा आणि काळा. या मज्जारज्जूंवर एका प्रकारच्या लहरीनें घटनात्मक कार्य होतें. आणि दुस-या प्रकारच्या लहरीनें विघटनात्मक कार्य होतें. उदाहरणार्थ समजा कीं, रक्तहारित मज्जेवर घटनात्मक कार्य झाल्यास तांबडा रंग दिसूं लागेल. व विघटनात्मक कार्य झाल्यास हिरवा रंग दिसूं लागेल रंगांत दोन किंवा तीन प्रकारच्या मज्जारज्जूंचें कार्य होऊन तसले मिश्र रंग दिसतात. या वरील दोन प्रकारच्या सिद्धान्तांपासून शास्त्रीयदृष्टया रंगांच्या दोन निरनिराळ्या उपपत्ती संभवतात; त्यांपैकीं जास्त प्रमाणयुक्त कोणती हें अद्याप नीटसें सिद्ध झालें नाहीं.

वर्णन्धता:- शोधकांनां असें आढळून आलें आहे कीं, दर शंभर लोकांत ४ लोकांच्या ठिकाणीं वर्णान्धता असते; म्हणजे कांहीं लोकांनां रंग ओळखूं येत नाहींत. कित्येकांनां तांबडा रंग दिसत नाहीं, तर त्याऐवजीं त्यांनां काळसर हिरवा रंग दिसतो. परंतु कित्येकांनां हिरवा रंग दिसत नाहीं तर, त्या हिरव्या रंगाऐवजीं काळसर पिंवळा रंग दिसतो. असेंहि आढळून आलें आहे कीं, स्त्रियांमध्यें वर्णान्धतेचें प्रमाण अत्यंत अल्प असतें आणि पुरुषांमध्येंच बहुधां हा रोग जास्त आढळून येतो. रेल्वेवरील बहुतेक सर्व नोकरांनां हिरवा, पांढरा, तांबडा वगैरे रंग फार दुरूनच ओळखावे लागतात. म्हणून रेल्वे अधिकारी वर्णान्धता असलेलीं मनुष्यें सहसा नोकरीवर लावीत नाहींत.

दृष्टिदोष:- दृष्टिदोष अनेक प्रकारचे आहेत; त्यांपैकीं कांहींचें वर्णन पुढें केलें आहे.

दूरदृष्टिदोष:- या प्रकारचा दृष्टिदोष बहुतकरून म्हातारपणीं उत्पन्न होतो. क्वचित प्रसंगीं हा दोष तारुण्यांत सुद्धां उत्पन्न होतो. या रोगाचें महत्त्वाचें कारण हें आहे कीं, नेत्रांतील लेन्सची जाडी कमी होऊन लेन्सचें केद्रान्तर वाढतें; व त्यामुळें जवळचें दिसत नाहीं. हा दोष नाहींसा करण्याकरितां योग्य केंद्रान्तराच्या बाह्यगोलभिंगांचा चष्मा वापरावा लागतो (जास्त माहिती उपनेत्र या लेखांत पहा.).

समीपट्टीष्टिदोष:- हा रोग आधुनिक ग्रंथप्रसारामुळें उत्पन्न झाला आहे. जंगली लोकांत हा रोग आढळत नाहीं. अतिवाचनामुळें डोळ्यांतील लेन्समध्यें फुगीरपणा उत्पन्न होतो. त्यामुळें लांबचें दिसेंनासें होतें. हा दोष नाहींसा करण्याकरितां  अंतरर्गोलभिंगें वापरतात (उपनेत्र पहा.)

तिरळेपणा:- नेत्रांचा तिरळेपणा नाहींसा करण्याकरितां त्रिकोणी भिंगांचा चष्मा वापरतात (उपनेत्र पहा).

मोतीबिंदु:- या रोगांत नेत्रांतील लेन्सचें पारदर्शकत्व नाहींसें होतें; त्यामुळें मनुष्य अगदीं अंध होतो; परंतु शस्त्रप्रयोगानें हें निरुपयोगी झालेलें लेन्स काढून टाकतात; व नंतर योग्य प्रकारचें लेन्स असलेला चष्मा नाकावर बसविल्यास या अंध मनुष्यास उत्तम प्रकारें दिसूं लागतें ! मोती बिंदु दुरुस्त केलेल्या मनुष्यास जवळचें पाहण्यास वेगळा चष्मा आणि दूरचें पाहण्यास वेगळा चष्मा या प्रमाणें निदान दोन चश्मे तरी वापरावे लागतात.

दृष्टीचें संरक्षण:- आतां दृष्टीच्या आरोग्याचे ठळक ठळक नियम देऊं. लहान मुलांच्या दृष्टीविषयीं फार जपलें पाहिजे; विशेषत: ज्या मुलांच्या आईबापांच्या दृष्टींत दोष असतील त्या मुलांच्या दृष्टीविषयीं फारच जपलें पाहिजें. कारण दृष्टीसंबंधीं असणारे कित्येक दोष संततींस उत्पन्न होतात. कांहीं दोष प्रत्यक्ष रीतीनें संततींस उतरत नाहींत, तरी त्या दोषांची पूर्व तयारी संततीच्या ठिकाणीं भरपूर असते; समीपदृष्टिदोष हा रोग फक्त आधुनिक सुधारणेपासूनच उत्पन्न झाला आहे. रानटी मनुष्यांत समीपदृष्टिदोष असलेला एकहि इसम सांपडत नाहीं. पुस्तकांचा प्रसार झाल्यापासून, विषेशत: बारीक टाइपांच्या पुस्तकांच्या प्रसारापासून या रोगास चांगलीच मदत होते. मुलें शाळेंत जात असतांना त्यांच्या सर्वसाधारण  आरोग्याची काळजी न घेणें, वाचण्यास अंधेराची जागा असणें, अत्यंत जवळ पुस्तक धरणें, बारीक टाईप, खराब टाईप, वाईट कागद इत्यादि कारणें हा रोग उत्पन्न करण्यास कारणीभूत होतात. तेव्हां हीं कारणें वेळींच दूर केलीं पाहिजेत. जर समीपदृष्टिदोष उत्पन्न झाला असेल तर योग्य चष्मा वापरावा; हा चष्मा डोळ्यावर सतत असूं द्यावा. नवीन चष्मा लावणा-यास विषेशत: मुलास आपल्या डोळ्यावर सतत चष्मा असूं देण्याचें पसंत पडत नाहीं; परंतु त्यांस याविषयीं नीट समजाऊन सांगावें. सामान्य मनुष्य जवळचें पाहूं लागला तर डोळ्यांतील लेन्स फुगीर होतें व दूरचें पाहूं लागला कीं चापट होतें; परंतु समीप-दृष्टि हा दोष उत्पन्न झालेल्या मनुष्याच्या डोळ्यांत असें घडत नाहीं; त्यामुळें त्याचा दृष्टिदोष वाढतच जातो. परंतु योग्य प्रकारचा चष्मा लावल्यानें डोळ्यांतील सेंद्रिय लेन्सची क्रिया पूर्ववत् घडूं लागते व त्यायोगानें डोळ्यातील स्नायूस योग्य व्यायाम घडतो. याकरितांच समीप-दृष्टीच्या मनुष्यानें आपल्या डोळ्यावर सतत चष्मा असूं द्यावा असें वैद्य व डॉक्टर लोक सांगतात.

मुलांच्या शाळा:- मुलांच्या शाळा दृष्टीचे दोष उत्पन्न करण्यापासून अलिप्त अशा असाव्यात. कारण मुलांस दिवसांतील कित्येक तास शाळेंत घालवावे लागतात. शाळेंत उजेड आणि हवा मुबलक यावी. मुलास एकसारखें पुस्तकाकडे किंवा पाटीकडे पाहत बसवूं नये; मधून मधून दुस-या प्रकारानें शिकवावें.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .