प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या
 
देवरुखे:- हे ब्राह्मण मुख्यत्वें कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यांत (फुणगुसच्या खाडीच्या दोन्ही कांठांवर ९० गांवांत) आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यांत संगमेश्वर तालुक्यांतील देवरुख गांवावरून ते आपल्यास देवरुखे म्हणवितात. त्यांचें म्हणणें कीं, आपण मूळचे देशस्थ; परंतु देवरुखभागांत राहावयास गेल्यामुळें देवरुखे हें गांव प्राप्त झालें. विल्सन म्हणतो कीं, अथर्ववेदाच्या देवर्षिशाखेचा हा वर्ग असावा. महाराष्ट्र ब्राह्मणांत त्यांचा दर्जा कमी लेखला जातो; त्यांच्या पंक्तीस बसल्यास संकटें कोसळतात असा समज आहे. त्यामुळें पुष्कळ कर्हाडे-देशस्थ-चित्पावनब्राह्मण त्यांच्या पंक्तीस बसत नाहींत'‘(से. रि. १९११; बाँबे, भा. २ पृ. २४५.). यांच्या धार्मिक व सामाजिक चालीरीती देशस्थ-ब्राह्मणांहून फारशा निराळ्या नाहींत. यांच्यापेकीं पुष्कळजण शेतकरी असून, अगदीं थोडे लोक व्यापार व सरकारी नोकरींत शिरले आहेत.

शके १६४६ (स. १७२४) मध्यें सोपारें (जि. ठाणें) येथील ब्राह्मणांनीं देवरूखें हे पंक्तिपावन ब्राह्मण नाहींत असा निकाल दिला होता (भा. इ. मं. वा. इति. १८३६). सध्यां मुंबईतील बहुतेक खाणावळी देवरुख्यांनीं चालविल्या आहेत व त्यांत सर्व तर्हेचे ब्राह्मण जेवतात; कोंकणांतहि बहुतेक लोक त्यांच्याशीं रोटीव्यवहार करतात.

वरील निर्णयपत्रांत देवरुख्यांनां देवराष्ट्रीय म्हटलें आहे. स्कंदपुराणांतहि त्यांनां देवराष्ट्रीय म्हणून ते देवराष्ट्रांतून आलेले व अपांक्त म्हटलें आहे.’'अन्येपि देवराष्ट्रीया देवराष्ट्रादुपागता: । अपांक्तेया अयाज्याष्व गिरिकांतारवासिन: ॥'‘पद्मपुराणांत सुद्धां यांनां पंक्तिदूशक देवराष्ट्रब्राह्मण म्हणून संबोधिलें आहे.

शके २७२ (स. ३५०) च्या अलाहाबादच्या समुद्रगुप्ताच्या शिलालेखांत देवराष्ट्र देशाचा उल्लेख आढळतो. दक्षिणापथांतील जे जे राजे त्यानें जिंकले त्या देशांच्या नामावलींत देवराष्ट्राचें नांव आहे. तसेंच तेथील कुबेर नांवाच्या राजाचाहि उल्लेख आहे. नागपुर ते म्हैसूरपर्यंतच्या प्रदेशांत मध्येंच हें देवराष्ट्र होतें. सह्याद्रीच्या किना-याचा टापू त्या राष्ट्रांत मोडत असे.

कृष्णानदीच्या कांठीं कर्हाडा (सातारा जिल्हा) जवळ कुंडलच्या पूर्वेस २/३ कोसांवर हल्लीं देवराष्ट्र नांवाचें एक खेडें आहे (पहा). त्याच्या आसपास प्राचीन अवशेष, लेणीं, देवळें फार आहेत. येथें कुबेरेश्वर व समुद्रेश्वर यांचीं देवळेंहि आहेत. हेंच पूर्वीच्या देवराष्ट्राच्या राजधानींचें शहर; हें राज्य सातारा ते कोल्हापूर व अरबीसमुद्र ते पंढरपुर या भागावर पसरलें असावें व शके २७२ त तेथें कुबेर राजा होता. त्याच्या आश्रयानें देवराष्ट्र या प्रांतांत जे ब्राह्मण रहात असत ते देवराष्ट्र-देवराष्ट्रीय-देवरुखे ब्राह्मण होत असें रा. राजवाडे म्हणतात.

शातवाहनांचें राज्य (२२८) नष्ट झाल्यावर त्यांचे मांडलिक तगरेश्वर यांचाहि र्हास होऊन देवराष्ट्र येथील राजांनीं महाराष्ट्रांत डोकें वर उचललें असावें. त्यांनां पुढें (३५०) समुद्रगुप्तानें मांडलिक केलें. नंतर ते ४७८ पर्यंत कांहीं काळ मांडलिक व कांहीं काळ स्वतंत्र राहून, षेवटीं चालुक्याचे मांडलिक बनले असावेत. या २५० वर्षांच्या (२३०-४८०) कालांत महाराष्ट्रांत अनेक लहानमोठे राजे व राज्यें उदयास आलीं. त्यांपैकींच देवराष्ट्राचें एक राज्य होय. हें राज्य ४७८ त चालुक्यांच्या अंकित झालें असावें व पुढें थोड्याच कालानें नष्ट झालें असावें. त्यावेळीं कुबेर राजाचे आश्रित हे देवराष्ट्रीय ब्राह्मण राजाश्रयाभावीं त्या (देवराष्ट्र) प्रांतांतून निघून संगमेश्वर व फुणगूसच्या आसपास येऊन कायमचे राहिले असावे. हा टापू त्यावेळीं चालुक्यांच्या अंमलापासून दूर होता. यावेळीं तेथें दुसरे (चित्पावन) ब्राह्मण होतेच. त्यांच्यामध्यें परचक्राच्या भयानें हे देवराष्ट्रीय येऊन गिरिगव्हरांत लपून राहिले. या घाटावरील भिन्नाचाराच्या व भिन्न व्यवहाराच्या ब्राह्मणांपासून यज्ञयाग करणारे चित्पावन ब्राह्मण अर्थातच अलिप्त राहिले.

देवराष्ट्र याचा अपभ्रंश देवरठ्ठ होतो; देवऋषि याचा अपभ्रंश देवरुखे किंवा देवरखे. संगमेश्वराजवळ देवरुख हें एक गांवहि आहे. सारांश ही जात प्रादेशिक आहे; याशिवाय इतर महाराष्ट्रीय ब्राह्मण व यांच्यांत विशेष फरक नाहीं.

हे स्वत:स देवर्षिब्राह्मण ह्मणवून पंचद्राविडांतर्गत महाराष्ट्र ब्राह्मण असल्याचें सांगतात. मुंबई इलाख्यांत यांची लो. सं. सुमारें ५ हजार असून याशिवाय माळवा, ग्वाल्हेर, कर्नाटक इकडे २ हजारांपर्यंत लोक आहेत. ठाणें जिल्ह्यांत उंबरगांव पेटयांतहि यांची वस्ती बरीच आहे.

कुलाबा जिल्ह्यांत दहिवली येथील विठ्ठलदेवाचें एक संस्थान या जातीच्या पंचायतीच्या मालकीचें आहे. गरीब विद्यार्थ्यांकरितां अलीकडे यांनीं कांहीं फंड काढले आहेत. पूर्वी यांच्यांत पंचायती होत्या, सांप्रत नाहींत. यांच्यांत पोटजाती नाहींत; हे आपणास ऋग्वेदीय देशस्थांची पोटजात म्हणवितात आणि देशस्थांशीं आपला लग्नव्यवहार २५० वर्शांपासून असल्याचें सांगतात. यांचा धर्मविधी देवरुखे भिक्षुकांकरवींच बहुश: होतो. हे अपांक्त नाहींत याबद्दल निरनिराळ्या ठिकाणच्या धर्मसभेचीं व अधिकार्यांची आज्ञापत्रें (नकला) पहाण्यांत येतात.

शतप्रश्नकल्पलता या पुस्तकांत (अ. १, प्र. ९) यांच्या उत्पत्तीबद्दल एक दंतकथा आहे. तीच सर्वत्र आढळते. यांचें म्हणणें कीं कोल्हापूरप्रांतांतून शृगाल राजाच्या (?) छळामुळें आम्हीं कोंकणांत गेलों. पुढें परशुराम कोंकणांत आल्यावर त्याच्या वडिलाच्या श्राद्धास या ब्राह्मणांनां क्षण दिला असतां हे गेले नाहींत म्हणून मग त्यानें चित्पावनांनां निर्माण केलें व देवर्षि ब्राह्मणांनां शाप दिला.

यांचीं व देशस्थांचीं गोत्रें (बरीचशीं) एकच आहेत. तसेंच दोघांच्या कुलस्वामींमध्येंहि बरेंच साम्य आहे. ऋग्वेदी आश्वलायन व यजुर्वेदी तैत्तिरीय शाखांतर्गत हिरण्यकेशी अशा दोन शाखा यांच्यामध्यें आहेत. तुळजापूर व कोल्हापूर येथील देवी, जेजूरीचा खंडोबा हे यांचे मुख्य देव आहेत.

यांचीं कांहीं आडनांवें:- करोडे, कानडे, कारूळकर, कोबजे (कोगजे), कारकर, कवठेकर, कुलकर्णी, खटावकर, खरवतकर, आरेकर, आंबेडकर, चाफेकर (दोन गोत्रांचे), चांदे, जुवेकर, जकाते, जोशी, ढापरे, डांगे, ताले, टांकसाळे, तेरे, तेरेदेसाई, डंबळकर, गोंधळेकर, चौगुले, निमकर, नवरंगे, निबंधे, धनुर्धर, पेडवळे, पिंपुटकर, बोमे (भोभे), भोळे, भडसावले, बाढे, बाठे, पांगारकर, मोगरे, देवळे, महाजन, मराठे, मांदुसकर, मुठ्ठल, मुळे, मुसळे, रोडे, शितूत, साले, सावले. यांशिवाय कर्नाटक प्रांतांत गेलेल्या लोकांची आडनांवें:- थळहट्टी, बनहट्टी, कलघटगीकर वगैरे.

कै. विष्णु परशुराम पंडित यानीं’पंचद्राविडान्तर्गत महाराष्ट्र ब्राह्मणांतील देवरुख्यांविषयीं शास्त्रसंमतविचार’नामक एक पुस्तक लिहिलें आहे (१८७४) त्यांत देवरुख्यांनां देशस्थ म्हटलें आहे.

मुसुलमानी अंमलांत कुळकर्ण, देसाईपण, करोडगिरी वगैरे अधिकार यांनां मिळाल्यानें पुन्हां हे देशावर अहमदनगर, बेळगांव, धारवाडाकडे गेले. मराठी राज्यांत हे जकाते, कारकून झाल्यानें गुजराथ, माळवा, सातारा, पुणें या भागांत पसरले. महादजी शिंद्याच्या लष्करांत अमझारवाले जहागीरदार होते. नागो देवचक्के हाहि एक पथक्या त्यांत होता. (सेन्सस रिपोर्ट १९११. मुंबई; भा. इ. सं. अहवाल, शके १८३८; रत्नागिरी ग्याझे; सोलापूर ग्याझे; भांडारकर-हिस्टरी ऑफ दि डेक्कन; विल्सन-इंडियन कास्ट्स; हरिवंश; सह्याद्रिखंड; रा. भि. मो. मांदुसकर यांची माहिती.)

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .