प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या  

देवळें:- देऊळ हा शब्द देवालय (देव + आलय- देवाचें घर) या संस्कृत शब्दापासून झाला आहे. इंग्रजी शब्द’टेंपल’मूळ लॅटिन भाषेंतील भविष्यकथनाची जागा या अर्थाच्या शब्दापासून झाला असून नंतर त्याला देवालय असा अर्थ प्राप्त झाला. देवालयांचा प्रसार मूर्तिपूजक लोकांच्या देशांतच फार आढळतो, तथापि मूर्तिपूजाविहीन अशा ख्रिस्ती व मुसुलमानी धर्मांतहि देवालयासारखीं पवित्र गृहें असतात व त्यांत प्रत्यक्ष देवाची मूर्ति नसली तरी तेथें ईश्वर अदृश्य रूपानें वास करतो किंवा तेथें मधून मधून भेट देतो असें मानतात, व अशा गृहांचा सार्वजनिक प्रार्थना करण्याच्या कामीं उपयोग करतात. ख्रिस्ती धर्मातलीं चर्चे व इस्लामी धर्मांतील मशिदी अशा प्रकारच्या होत.

प्राथमिक अवस्थेंतील समाज:- ऐतिहासिक दृष्टया पाहतां वारंवार स्थानांतर करण्या-या (नोमॅड) भटक्या जातीच्या लोकांत देवतांची पूजा असली तरी देवालयें असणें शक्य नाहीं. बहुधां यांचे धार्मिक विधी उघड्या जागेंत होतात, कारण वृक्षपाषाणदिकांच्या आश्रयानें देवता रहातात अशा समजुतीनें वृक्षपाषाणादिकांचीच ते पूजा करतात. मूर्तिपूजेचा अवलंब केल्यावरहि देवांच्या मूर्ती ते स्थानांतर करतांना बरोबर घेतात व त्यांनां झोपडींत किंवा तंबूंत तात्पुरत्या स्थापन करतात. याच्या पुढील पायरी स्थायिक एके ठिकाणीं राहणा-या रानटी जातींची. ज्या ठिकाणीं मृत पूर्वजांचे आत्मे किंवा देव प्रादुर्भूत होतात अशीं समजूत असते अशा पवित्र स्थानांनां भोंवतालीं दगडांचें कोंडाळें करून मध्यें मूर्ति किंवा इतर देवतादर्शक दगड वगैरे ठेवतात. नंतर अशा पवित्र स्थानीं लहानसें झोपडें बांधण्याची चाल पडली व सांप्रत अप्रगत व गरीब स्थितींतल्या लोकसमाजांत हाच प्रकार दृष्टीस पडतो. अशा प्राथमिक अवस्थेंतील देवालयाबरोबरच मृतांच्या देहांचें दफन करण्याची (पुरण्याची) चाल ज्या ज्या धर्मांत आहे त्या त्या धर्माच्या समाजांत दफनभूमीलाहि पावित्र्य प्राप्त होऊन तेथें देवालयासारखींच पवित्र गृहें (इमारती) बांधण्याची चाल रूढ झाली. देवळांचा एक नैसर्गिक प्रकार म्हणजे गुहा. अशा गुहांमध्यें दैवतें मांडून त्यांनां पवित्र पूजाप्रार्थनास्थानांचें स्वरूप देणा-या रानटी जाती पुष्कळ आहेत. हा प्रकार ईजिप्त, अरबस्तान, अमेरिकेंतील पेरु व इतर देशांत आढळतो.

उच्च संस्कृतींतील समाज:- उच्च संस्कृतीच्या लोकांत धार्मिक बाबतींत देवळांनां मोठे महत्त्व असतें आणि तीं षिल्पकलेच्या मानवी प्रगतीच्या दृष्टीनें फार महत्त्वाचीं असतात. कारण त्यांवरून त्या त्या समाजाच्या धार्मिक विधींची व त्याचप्रमाणें त्यांच्या औद्योगिक प्रगतीची व सौंदर्यविषयक कल्पनांची माहिती मिळते. ईजिप्तमध्यें प्राचीन काळचीं मोठालीं देवालयें आहेत. तीं दगडी असून देवाची मूर्ति स्थापलेल्या मध्यवर्ती जागेभोंवतीं ब-याच खाल्या व दिवाणखाने बांधल्यामुळें एकंदर देवालयाची इमारत पुष्कळ मोठी असते. मूर्तीची जागा अंध:कारयुक्त असून तेथें फक्त उच्च पुरोहित वर्गाला (प्रीस्ट) जाण्याची परवानगी असते. अशा देवालयांच्या पुढील भागाची उंची सर्वात अधिक व मागील भागांची कमी कमी होत गेलेली असते. बाबिलोनियांत जुन्या काळचीं कांहीं देवालयें जमिनीखालून उकरून काढलीं आहेत तींहि फार मोठालीं आहेत. त्यांत बाहेरच्या बाजूला एक मोठा दिवाणखाना असून त्याला लागून मागें एक लहान खोली असते व तींत देवतेची मूर्ति असते. कांहीं देवालयें फार उंच व सहासात मजल्यांचीं असून शेवटच्या मजल्यापर्यंत जिने असत आणि अगदीं शिखरावर एक खोली असून तींत सिंहासनावर देवाची मूर्ति स्थापलेली असे एकंदर विश्वाची रचना एकावर एक असे सात लोक (झोन) मिळून आहे अशा समजुतीमुळें देवळांनां सात मजली आकार देऊन वर देवाची स्थापना केली आहे. ईजिप्तमधील देवळांचें क्षेत्रफळ किंवा भोंवतालचें आवार फार विस्तृत असतें तर बाबिलोनियांतील प्राचीन देवालयांची उंची फार असते. ईजिप्त व बाबिनोनिया या दोन्ही देशांतील देवळांस पुष्कळ जमिनी इनाम दिलेल्या असत आणि बाबिलोनियांत तर देवळांतील पुरोहितांकडेच न्यायमनसुब्याचें काम असे व तें देवालयाभोंवतालच्या इमारतींत चाले. त्यामुळें त्या राष्ट्रांत देवालयें ही मोठी महत्त्वाची संस्था होती. ग्रीक लोकांतील प्राचीन देवळात मुख्य भाग म्हणजे एक चौकोनी लांबट खोली असून तिच्या भोंवतीं अनेक खोल्या असत. देवळाचें तोंड पूर्वेकडे असून मुख्य दरवाज्यासमोर देवाची मूर्ति बसवीत असत. हीं देवळें साधारणपणें लहानच असत पण तीं चांगली रंगीत शोभिवंत केलेलीं असत.

हिंदु:- वैदिक काळांत मूर्तिपूजा व देवळें नव्हतीं, बुद्धपूर्व काळांतील देवालयांचे अवशेष मुळींच उपलब्ध नाहींत. वैदिक काळांत देवळें असलींच तर तीं हल्लीं ब्रह्मदेशांतल्याप्रमाणें लांकडी असलीं पाहिजेत, कारण अशोकाच्या काळापर्यंत इमारतीकडे दगडांचा उपयोग करण्याचें माहीतच नव्हतें, असें वास्तुकलाभिज्ञ जेम्स फर्ग्युसन म्हणतो. देवळें म्हणून मोठाल्या दगडी इमारती बांधण्याची पद्धत बौद्ध काळांत सुरू झाली. पण बौद्धांच्या देवळांत देवाच्या मूर्ती नसून बुद्धाच्या शरीराचे अवशेष ठेवण्याची पद्धत होती. अशा स्थानाला प्रथम स्तूपाचा म्हणजे वाटोळ्या झांकणाचा आकार देत. चैत्य या नांवाच्या पवित्र स्थानांचा दुसरा एक प्रकार आहे याला देवालयाप्रमाणें मोठ्या इमारतीचा आकार देऊन त्यांत स्तूप बांधलेला असतो. पवित्र बौद्ध स्थानांचा दुसरा प्रकार म्हणजे डोंगरी खडकांत खोदून तयार केलेले स्तूप व चैत्य (पहा) हा होय. तिसरा प्रकार विहार उर्फ बौद्ध भिक्षूंनां राहण्याकरितां बांधलेल्या खडकांत खोदून तयार केलेल्या लहानमोठ्या खोल्या. स्तूप, चैत्य व विहार हिंदुस्थानांत अनेक ठिकाणीं आहेत.

हिंदूंचीं जीं देवळें सर्व हिंदुस्थानभर आहेत त्यांची मूळ कल्पना, आकार व शोभा या बाबतींत बौद्धांच्या उपर्युक्त पवित्र स्थानांचें अनुकरण बरेंच झालें आहे. तथापि हिंदु देवालयपद्धतीचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक दक्षिणहिंदुस्थानांतील द्राविडी व दुसरा बाकीच्या भागांतील सर्व सामान्य. दक्षिणेकडील देवळें चौरस असून त्यांचा वरचा भाग मनो-याप्रमाणें उंच व कित्येक मजले देऊन केलेला असतो. मुख्य देवळाच्या आंत एक गाभारा उर्फ मुख्य मूर्तीची लहान खोली असून तिच्या भोंवतालीं प्रदक्षिणेकरितां मोकळा मार्ग असतो. पुढल्या बाजूला अनेक खांब असलेला मोठा सभामंडप असतो. शिवाय मुख्य देवळाभोंवतीं पुजार्यांनां राहण्याकरितां खोल्या, मोठें अंगण, पाण्याचीं टांकीं किंवा विहीरी वगैरे असतात. शैव व वैष्णव दोन्हीं पंथांचीं देवळें सारखींच असून फक्त मूर्ती व खोदकाम निराळ्या प्रकारचें असतें. उत्तरेकडील देवळांचा खालचा आकार बहुकोनी असून वरील शिखर वाटोळें व निमुळतें होत गेलेंलें असतें व त्याला मजले नसतात. देवळाच्या समोर एक चौरस चबुतरा असून त्यावर मनो-यासारखें छप्पर असतें. देवालयाशिल्पाविषयीं माहिती शिल्पशास्त्रांतील असल्यानें ती येथें फारशी दिलेली नाहीं.

नेपाळ, ब्रह्मदेश, तिबेट, चीन व जपान या देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यावर तेथें स्तूप बांधण्यांत आले. पण त्यांच्या आकारांत निरनिराळ्या देशांत थोडा फार फरक आहे. बहुतेक सर्व धर्मात सर्वश्रेष्ठ असें एक देवालय असतें. ख्रिस्ती धर्मांतील रोम येथील पँथिऑन, मुसुलमानांचे मक्का येथील काबा, हिंदूंचे काशी येथील विश्वेश्वराचें देवालय, बौद्धांचें गया येथील बौधिवृक्षाचें स्थान हीं स्थानें अशा प्रकारचीं होत. प्राचीन काळापासून मुख्य यात्रेचीं हीं ठिकाणें असून गुन्हेगारांनां संरक्षक स्थळें म्हणूनहि हीं उपयुक्त असत.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .