प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या  
 
द्रव्य (मेंटर):- विद्युच्छास्त्राचा अभ्यास जारीनें करून पाश्र्चात्त्‍य शास्त्रज्ञांनीं कुतूहलपूर्ण  व मानवी बुद्धीस थक्क करून सोडणारे असे अनेक शोध लाविले आहेत. या शोधांनीं मनुष्‍याचा दृष्‍टिकोण बदलण्याचा बराच संभव आहे. विद्युच्छास्त्राच्या अभावीं विचार करण्याची पद्धति व विद्युत्शास्त्रांची मदत घेऊन बनलेली विचाराची दिशा यांमध्यें महदंतर पडत चाललें आहे. यांपैकीं दोन शोध तर द्रव्याचें वास्तविक स्वरूप व घटना यांचा अभ्यास करतांना फारच उपयुक्त होणार आहेत. पहिला शोध असा कीं, निरनिराळ्‍या विरल (रेरिफाइड) वायूंतून विद्युत्प्रवाह सोडला असतां दृष्‍टोस्‍पत्तीस येणारे चमत्कार, व दुसरा शोध कांहीं विवक्षित किरणविसर्जनाचा. जगतांत कांहीं पदार्थ असे आहेत कीं, त्यांच्यापासून विशिष्‍ट अदृश्‍य किरण एकसारखे विसर्जन पावत असतात, व हे किरण अपारदर्शक वस्तूंतून सुद्धां प्रवेश करूं शकतात.
आतां पूर्वकालीं द्रव्याच्या घटनेसंबंधीं कोणतें मत प्रचलित होतें व या आश्चर्यकारक शोधांच्या साहाय्यानें त्यासंबंधीं शास्त्रज्ञांचें मत कसें बदलत चाललें आहे याचा संक्षेपत: विचार करूं.

प्रथमत: जगांतील प्रत्येक पदार्थ अति सूक्ष्म कण एके ठिकाणीं जमून त्यांच्या समवायानें बनलेला आहे असा समज होता. पुढें याच कणांनां अणु असें शास्त्रांत म्हणूं लागले. प्रत्येक पदार्थ अण्वात्मक आहे व या मूलभूत अणूंचा धर्म व त्या विवक्षित पदार्थाचा धर्म एकच असतो. निरनिराळ्‍या प्रकारच्या अणूंच्या समवायानें निरनिराळ्‍या गुणधर्मांचे पदार्थ तयार होतात अशी अण्वात्मक उपपत्ति होती. परंतु या उपपत्तीमुळें प्रत्येक पदार्थगणिक भिन्न अणू समजावे लागतात व यामुळें अनवस्था उत्पन्न होते. ही आपत्तिअंशत: कां होईना-डाल्टनच्या परमाणुवादानें टळली. त्याचें म्हणणें असें कीं वर सांगितलेले अणू सुद्धां स्वत: अविभाज्य नाहींत तर ते त्यांहून सूक्ष्म असणार्‍या दुसर्‍या कणांचेज्यांनां आपण परमाणू म्हणूं-बनलेले आहेत. हे परमाणू ६०-७० पृथक मूलद्रव्यांचे असतात. या मूलद्रव्यांस स्वतंत्र गुणधर्म आहेत. परंतु जेव्हां निरनिराळे दोन किंवा अधिक प्रकारचे परमाणू एके ठिकाणीं येऊन संयोग पावतात तेव्हां तिसर्‍याच पदार्थाचे अणू निर्माण होतात. या अणूंचा गुणधर्म घटक परमाणूंच्या गुणधर्मांहून निराळा कां असतो हें समजण्यास मात्र अद्यापि साधनें नाहींत. याहि पलीकडे जाऊन प्रख्यात शास्त्रवेत्ता प्रौट हा असें प्रतिपादन करितो कीं, उज्ज हेंच सर्व पदार्थांचें मूळ घटकद्रव्य आहे व याचेच परमाणू भिन्न प्रमाणांत संयुक्त होऊन भिन्न भिन्न गुणधर्मांचे भिन्न पदार्थ निर्माण होतात. मूलद्रव्यांच्या परमाणुभारांकांच्या कोष्‍टकाकडे नजर टाकिली तर असें दिसून येईल कीं उज्ज हें द्रव्य सर्वांत हलकें आहे व बहुतेक मूलद्रव्यांचें परमाणुभारांक उज्जाच्या कोणत्या तरी पूर्ण पट असतात. यावरून प्रौटनें असा कयास केला कीं, उज्ज हाच सर्व पदार्थांचा मूळघटक आहे. परंतु कांहीं परमाणुभारांकांची उज्जाशीं तुलना केली असतां अशा पूर्ण पटी बसत नाहींत व उज्जाच्या परमाणूचे सुद्धां स्वत:चे स्वतंत्र गुणधर्म काय आहेत हें अद्याप दृष्टोत्पत्तीस आलेलें नाहीं. या गोष्‍टीनें डाल्टनच्या म्हणण्याला थोडासा अपवाद येतो, तथापि एवढें निश्चित आहे कीं, सर्व मूलद्रव्यांनां आधारभूत असें कांहीं विशिष्‍ट द्रव्य आहे व मूलद्रव्यांच्या परमाणुभारांकांचा त्या त्या द्रव्यांच्या रासायनिक व पदार्थवैज्ञानिक धर्मांवर बराच परिणाम होतो. न्यूलंड्स व मेंडेलीफ यांचा नियतांतरत्वाचा नियम (लॉ ऑफ पीरिऑडिक क्लासिफिकेशन) हेंच प्रतिपादन करतो. मूलद्रव्याचा परमाणुभारांक जसा चढतो किंवा उतरतो तसा त्या मूलद्रव्याचा परमाणुभारांक जसा चढतो किंवा उतरतो तसा त्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांमध्यें पदार्थवैज्ञानिक अगर रासायनिक चढ किंवा उतार दृष्टोत्पत्तीस येतो. राँटजेन किरण, ऋणध्रुवकिरण व किरणविसर्जक पदार्थांपासून निघणारे किरण यांचें पदार्थभेदकत्व पुष्‍कळ अंशीं त्या पदार्थांतील मूल द्रव्यांच्या परमाणुभारांकांवरच अवलंबून असतें. यावरून असें स्पष्‍ट दिसून येईल कीं, द्रव्याचा अभ्यास करतांना त्याच्या मूलद्रव्याच्या परमाणुभारांकास विशेष महत्त्‍व आहे.

आतांपर्यंत द्रव्याच्या घटनेसंबंधीं जो विचार झाला तो विद्यृच्छास्त्राची फारशी मदत न घेतां झाला. परंतु आधुनिक काळांत विद्युत्‍शास्त्रांत जे नवीन प्रयोग झाले त्यांच्या साहाय्यानें शास्त्रज्ञांनीं द्रव्याची घटना काय ठरविली आहे तें पाहूं.

किरणविसर्जक द्रव्यांच्या परमाणूंमध्यें ऋणविद्युत्कण असतात असें आढळून आलें आहे. परंतु इतर पदार्थांसहि प्रकाशोद्वाही तीव्रज्वलनोष्‍णता दिली असतां किंवा अतिनील प्रकाशांत त्यांचें निरीक्षण केलें असतां सदरहू ऋणविद्युत्कण दृष्‍टीस पडतात. यावरून असें दिसतें कीं प्रत्येक कणांत ऋणविद्युत्कणांचें वास्तव्य आहे; व प्रयोगांतीं असें सिद्ध झालें आहे कीं प्रत्येक ऋणविद्यृत्कणापाशीं सारखाच ऋणविद्यृत्चा संचय आहे. प्रत्येक ऋणविद्यृत्कणाचा ऐन जिन्नस अथवा द्रव्यराशि (मास) उज्जाच्या १/१७०० व्या हिश्‍शाएवढा आहे. निरनिराळ्‍या मूलद्रव्यांत त्यांच्या परमाणुभारांकांच्या प्रमाणांत या ऋणविद्युत्कणांचें वास्तव्य असतें. प्रत्येक परमाणूच्या ठिकाणीं ऋणविद्यृत्कणांचें अशा तर्‍हेंनें अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर ज्याअर्थी दरेक परमाणु सुप्तविद्यृत् (इलेट्रिकल न्यूट्रल) आहे त्याअर्थी या ऋणविद्युत्चें कार्य मारणारी (नाहींसें करणारी) अशी समबल व प्रतिरोधी धनविद्युत् आणि पर्यायानें धनविद्युत्कण त्याठिकाणीं असले पाहिजेत असें सहजच अनुमान निघतें. आणि हें अनुमान खालील प्रयोगावरून खरें ठरलें. हवेचा दाब हलका असतां कोणत्याहि वायूंतून विद्युत्प्रवाह सोडला असतां त्या वायूंत धनविद्युत्कण आहेत असें दिसून येईल. या धनविद्युत्कणांचा धनविद्युत्संचय ऋणविद्युत्कणांएवढाच असतो परंतु त्यांचा द्रव्यराशि उज्जाच्या परमाणूएवढा असतो.

द्रव्याची घटना विद्युत्कणात्मक आहे असें ठरल्यानंतर त्याच्या द्रव्यराशीची उपपत्ति काय आहे याचा विचार करणें अप्रस्तुत होणार नाहीं.

आपल्या भोंवतालचें वातावरण एका निर्भार अदृश्‍य व स्थितिस्थापक प्रवाही इथ्र नांवाच्या पदार्थानें भरलेलें आहे. अशा प्रकारच्या वातावरणांत प्रत्येक परमाणूमध्यें वास्तव्य करणारे ऋणविद्युत्कण अति सूक्ष्म पण अप्रतिहत गतीनें एकसारखे भ्रमण करीत असतात. विद्युच्छास्त्रांतील एक नियम या ठिकाणीं लक्षांत ठेविला पाहिजे कीं, समविद्युत्कण एकमेकांस अपसारक असतात व विषम विद्युत्कण हे एकमेकांस आकर्षक असतात. या तत्त्‍वास अनुसरून यांच्या परस्परक्रियांपासून एक प्रकारची प्रेरणा उत्पन्न होते. आतां ज्या ठिकाणीं प्रेरणा उत्पन्न झाली त्या ठिकाणीं द्रव्यराशि असलाच पाहिजे. कारण द्रव्यराशीशिवाय प्रेरणाच उद्भवूंशकत नाहीं. या द्रव्यराशींत केव्हां केव्हां थोडा बदल होऊं शकतो. तो दोन प्रकारांनीं; एक असा कीं, वातावरणांत असलेलें इथ्र या विद्युत्कणांच्या गतीला प्रतिरोध करितें. या प्रतिरोधानें द्रव्यराशि विद्युत्क्रियेनें होणार्‍या द्रव्यापेक्षां जास्त भासतो. दुसरा बदल असा कीं, गति प्राप्त झाली असतां बीजभूत शक्तीहि वाढते व त्याबरोबरच द्रव्यराशीहि वाढतो. गति जर प्रकाशवेगाइतकी मोठी असेल तरच ही वाढ मोठी भासते. परंतु सर्वसाधारण द्रव्याचे घटक जे विद्युत्कण त्यांसंबंधीं विचार कर्तव्य असतां त्यांची गति अति सूक्ष्म असल्यामुळें ही वाढ जमेंत धरली नाहीं तरी चालेल.

वजन:- आतांपर्यंत द्रव्याच्या घटनेचा विचार विद्युदृष्‍टया केला. आतां त्याच धोरणानें त्याच्या वजनाचा विचार करूं. वजन व द्रव्यराशि यांचा संबंध हा द्रव्याचा एक गूढ व महत्त्‍वाचा गुणधर्म आहे. कोणत्याहि पदार्थाचें वजन त्याच्या द्रव्यराशीशीं प्रमाणांत असतें, हा सिद्धांत न्यूटननें व नंतर इ. स. १८३० मध्यें बेसेलनें प्रयोगांतीं सिद्ध करून दाखविला. द्रव्याच्या घटनेचा संबंध विद्युत्शीं असतो असा विचार करीत असतां ह्या गुणोत्तराच्या सातत्यास नवीनच महत्त्‍व प्राप्त होतें. आतांपर्यंत आपण असें पाहिलें कीं प्रत्येक पदार्थांतील परमाणूमध्यें बारीक कण असतात, त्यांचा द्रव्यराशि उज्जाच्या परमाणूच्या १/१७०० इतका असतो, तो बारीक कण ऋणविद्युत्नें संचारित असतो आणि ह्या संचाराच्या योगानेंच त्याचा द्रव्यराशि बनलेला असतो. नंतर असा प्रश्न उद्भवतो कीं हा द्रव्यराशि मोजतां येण्यासारखा आहे कीं काय? प्रथम आपण असें समजूं कीं हा द्रव्यराशि मोजतां येण्यासारखा नाहीं. असें असेल तर या सूक्ष्म कणांच्या भरतीनें परमाणूंच्या द्रव्यराशींत वाढ होईल पण वजनांत होणार नाहीं. जर परमाणूमधील सूक्ष्मकण परमाणुभारांकांशीं प्रमाणात्मक असतील तर वजनाशीं द्रव्यराशीचें असलेलें गुणोत्तर, सूक्ष्म कण मोजतां येण्याजोगे असले किंवा नसले तरी सुद्धां, स्थिर असतें आणि जर हे सूक्ष्म कण प्रमाणात्मक नसतील व जर त्यांनां वजन नसेल तर द्रव्यराशीशी वजनाच्या असलेल्या गुणोत्तरांत व बेसेलनें सिद्ध केलेल्या गुणोत्तरांत बराच फरक पडेल. पण आपणांस सूक्ष्म कण परमाणुभारांकांशी प्रमाणात्मक असतात हें निराळ्‍या रीतीनें दाखवितां येतें. ह्मणून द्रव्यराशीशीं असलेल्या वजनाच्या गुणोत्तराचें सातत्य विद्युत्संचाराच्या योगानें उत्पन्न होणारा द्रव्यराशि मोजतां येण्याजोगा आहे किंवा नाहीं हें ठरविण्यास उपयोगी पडत नाही.

आपणांस जर क्ष-किरणाविसर्जक पदार्थांच्या बाबतींत हें गुणोत्तर काढतां येईल तर ह्या मुद्दयावर बराच प्रकाश पडेल आणि ज्या अर्थी हे पदार्थ बरीच उष्‍णता बाहेर टाकतात त्याअर्थी इतर पदार्थांतल्यापेक्षां त्यांच्यामध्यें बीजरूप शक्ति पुष्‍कळच असली पाहिजें हें सिद्ध होतें. आतां आपण जर अशी कल्पना केली कीं, १ ग्रॅम क्ष-किरण विसर्जक पदार्थानें त्यांतील क्ष-किरणविसर्जक धर्माचा लय होईपर्यंत टाकलेली उष्‍णता हें त्या पदार्थांतील बीजरूप शक्ति मोजण्याचें प्रमाण (मूलमान) आहे, तर क्ष-किरणविसर्जक पदार्थांत क्ष-किरण विसर्जक नसणार्‍या पदार्थांपेक्षां असलेला जास्त द्रव्यराशि हा क्ष-किरणविसर्जक पदार्थांमध्यें असलेल्या विद्युत्-संचाराच्या योगानेंच आहे असें सिद्ध होतें. हा फरक वरुणामध्यें (युरेनियम) वीस हजार मूलद्रव्याच्या द्रव्यराशीच्या भागांत एक भाग ह्या प्रमाणांत आढळतो. म्हणजे क्ष-किरणविसर्जक पदार्थांत हें गुणोत्तर काढतां येणें शक्य आहे आणि प्रो. जे. जे. थॉमसन् व सदर्न्स (१९१०) ह्यांनीं केलेल्या प्रयोगावरून क्ष-किरणविसर्जक असणार्‍या किंवा नसणार्‍या दोन्ही प्रकारच्या पदार्थांमध्यें विद्युत्च्‍या योगानें उत्‍पन्न होणारा जास्त द्रव्यराशि भारांकांशीं प्रमाणात्मक असतो असें सिद्ध होतें.

अलीकडे गुणोत्तर शोधण्याकरितां फारसे प्रयोग झाले नाहींत. तरी पण पदार्थांच्या वजनावर रासायनिक किंवा पदार्थवैज्ञानिक स्थितींतील बदलानें होणार्‍या परिणामावर बरेच शोध लागले आहेत. रासायनिक संयोगांत, वजनांत मोजतां येण्याजोगा फरक होत नाहीं असें लँडोल्टनें सिद्ध केलें आहे. पॉयिंटिंग व फिलिप्स यांनीं असें दाखविलें आहे कीं उष्‍णमानांत जरी फरक केला तरी वजनांत फरक होत नाहीं, तसेच पॉयिंटिंग यानें असें दाखविलें कीं, स्फटिकाचें वजन किंवा दोन स्फटिकांमधील आकर्षक शक्ति ही त्यांतील अक्षांच्या विशिष्‍ट दिशेवर अवलंबून नसते. हे सर्व सिद्धांत असें दर्शवितात कीं, द्रव्याच्या कोणत्याहि भागाचें वजन हें पदार्थवैज्ञानिक स्थितींवर किंवा रासायनिक संयोगाच्या वेळीं असणार्‍या परिस्थितीवर अवलंबून नसतें. क्ष-किरण-विसर्जक पदार्थामध्यें मात्र होणार्‍या बदलाच्या वेळीं वजनांत बदल होतो कीं नाहीं ह्याबद्दल अद्याप निश्चित शोध लागले नाहींत.

आतां आपण वजनाचा विचार गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्यानें करूं. गुरुत्वाकर्षणाबद्दल बरींच मतें प्रस्थापित झालेलीं आहेत. त्यांतील आपण दोन मतांचा विचार करूं. हीं दोनहि मतें बरींच जुनीं असून विद्युच्छास्त्रदृष्‍टया केलेल्या द्रव्याच्या विचाराशीं जुळतीं आहेत. यांपैकीं पहिलें मत विद्युत्च्या द्वि-द्रवमताशीं संमत आहे. आतां एकाच प्रकारच्या दोन विद्युत्मधील अपसारक शक्तीपेक्षां निरनिराळ्‍या प्रकारच्या दोन विद्युत्मधील आकर्षक शक्ति जास्त असते. ही अवशिष्‍ठ असणारी शक्ति म्हणजेच गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्वाकर्षण जर ह्या अवशिष्‍ट असणार्‍या शक्तीवर अवलंबून असेल तर वजन हे पदार्थामध्यें असलेल्या विद्युत्‍च्‍या मूलमानावर अवलंबून असलें पाहिजे. दुसरें मत जिनीव्हा येथील ली सेज यानें इ. स. १८१८ मध्यें प्रस्थापित केलें. ह्याच्या म्हणण्याप्रमाणें सर्व जग हें अतिसूक्ष्म अशा कणांनीं भरलेलें असून ते कण अतिशय वेगानें इतस्तत: भ्रमण करीत असतात. हे कण सूर्यमालेच्याहि पलीकडून आलेले असल्यामुळें त्यांस 'मृत्युलोकातीत कण' (अल्ट्रामुंडेन) असें म्हणतात. हे कण कोणत्याहि पदार्थांतून आरपार जाऊं शकतात. व मोठमोठया पदार्थांतून हे बहुतेक अपशोषल्याशिवाय जातात. अपशोषण होतें तें फार थोडें असतें व पदार्थ एकाच प्रकारच्या परमाणूचा बनलेला असून त्या घटकपरमाणूंमधील अंतर त्यांच्या आकारापेक्षां अधिक असेल तर हें अपशोषणहि त्या पदार्थामधील द्रव्यराशीशीं प्रमाणात्मक असतें. ली सेज ह्यानें असेंहि सिद्ध केलें कीं कोणत्याहि दोन पदार्थांत ह्या कणांच्या शिरकावाच्या योगानें मिळणार्‍या भ्रामक शक्तीचा दर, त्या पदार्थांच्या द्रव्यराशीच्या गुणाकरांशीं प्रमाणात्मक असतो व त्यांच्यामधील अंतर त्यांच्या द्रव्यराशीपेक्षां बरेंच मोठें असल्यास त्या अंतराच्या वर्गांच्या व्यस्त प्रमाणांत असतो. ह्यावरून असें दिसून येतें कीं, त्यांच्यावर असलेल्या प्रेरणा गुरुत्वाकर्षणाचे नियम बरोबर पाळतात. क्लार्क मॅक्सवेल असें समजतो कीं, मृत्युलोकातीत सूक्ष्म कणांकडून दिल्या जाणार्‍या भ्रामक शक्तीमुळें गतिविशिष्‍ट शक्ति कमी होते व तिचें रूपांतर राँटजेन किरण, उष्‍णता, अरिभवन, या किंवा अशाच कोणत्याहि एका प्रकारच्या शक्तींत होतें. अर्वाचीन मताप्रमाणें ह्या सूक्ष्म कणांचें अस्तित्व सिद्ध होऊन त्यांनां पदार्थामधून आरपार जाण्याची शक्ति असते असें सिद्ध झालें आहे, आणि आपणांस हेंहि माहीत आहे कीं त्यांच्या प्रेरणेचें रूपांतर प्रकाशलहरींमध्यें किंवा राँटजेन किरणांमध्यें होतें. ली सेज याच्या मताप्रमाणें हे सूक्ष्म कण फक्त भ्रामकशक्तिवाहक आहेत. भ्रामक शक्ति असणारे कोणतेहि पदार्थ अति वेगानें फिरत असतात आणि त्यांनां कोणत्याहि पदार्थांतून आरपार जाण्याची शक्ति असते. राँटजेन किरणांत हे सर्व गुणधर्म असतात. म्हणून ली सेज याच्या सूक्ष्म कणाबद्दल राँटजेन किरण घालण्यास कांहीं एक प्रत्यवाय नाहीं.

ह्या लेखामध्यें द्रव्याच्या घटनेचा विचार, त्याचा विद्युत्शास्त्राशीं संबंध आहे अशा धोरणानें केला आहे. कारण या धोरणास पोषक असे बरेच सिद्धांत प्रयोगांनीं सिद्ध करून दाखविले आहेत व अजून नवीन नवीन सिद्धांत प्रयोगांनीं द्रव्याच्या घटनेबद्दल वगैरे सिद्ध होत आहेत. म्हणूनच ह्या दृष्‍टीनें द्रव्याच्या घटनेचा विचार करणें श्रेयस्कर आहे.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .