प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या

द्राविड संस्कृति, भाषावर्ग:- या भाषावर्गांत दक्षिण हिंदुस्थानांतील प्रमुख भाषांचा समावेश होतो. या भाषा बोलणारांची एकंदर संख्या ठोकळमानानें पांच कोटी सत्तर लक्ष इतकी आहे. येथें फक्त तामीळ, मल्याळी, कानडी व तेलगू इतक्यांची माहिती देऊन किरकोळ कोडगु, तुळू, तोड, कोट या भाषा वगळल्या आहेत. या भाषावर्गाला द्राविडी हें नांव केवळ सांकेतिक अर्थानें दिलेलें आहे. हा शब्द संस्कृत द्रविड शब्दापासून बनलेला असून तोहि जुन्या द्रमिळ, दमिळ, तामिळ, अशा मूळ शब्दांपासून होत गेलेला आहे. तेव्हां द्राविडी व तामिळी हे दोन्ही शब्द एकच होत. आंध्र (म्हणजे तेलगु) व द्रविड (म्हणजे तामिळ) या लोकांची जी भाषा तिला आंध्र-द्रविड भाषा असें कुमारिलभट्‍टानें म्हटलें आहे. हिंदुस्थानांत द्रविड या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, उदा. पंचद्रविड असें जे म्हणतात त्यांत तेलगु, कानडी, मराठी, गुजराथी, व तामिळ इतक्यांचा समावेश होतो. यूरोपियनांनीं द्रविडी हें एका सबंध भाषावर्गाला नांव दिलेलें असून तें नांव टाकून देण्याचें कांहीं कारण दिसत नाहीं.

या द्राविडी भाषांनीं सर्व दक्षिण हिंदुस्थान व सिलोनचा उत्तरार्ध व्यापिला आहे. उत्तरेस याची मर्यादा गोमांतक ते कोल्हापूर येथपासून सुरू होते. पुढें हैद्राबादेमधून वर्‍हाडच्या दक्षिणहद्दीवरून पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यंत ती मर्यादा पोहोंचते. चांदा व भंडारा यांच्या पूर्वेकडील टेंकडयांतूनहि द्रविडी लोक असून सपाट प्रदेशांतील आर्य भाषामध्यें या द्राविडी भाषा बेटाप्रमाणें बसलेल्या आहेत. उत्तरेकडे छोटा नागपूर, मध्यप्रांत व गंगेच्या कांठचा राजमहाल येथें द्राविडी भाषा आढळतात. आणि अगदीं वायव्येस बलुचिस्तानांतहि एक द्राविडी भाषा चालू आहे. उत्तरेकडील हे द्रविडी जातींचे लोक झपाटयानें आर्य बनत चालले असून त्यांच्या भाषेवर आर्य भाषेचा परिणाम होतांहोतां शेवटीं तिच्या जागीं आर्यभाषा आली आहे. १८९१ सालीं गोंड लोकांची संख्या ३०,६१,६८० होती, पण गोंडी भाषा बोलणारे मात्र १३,७९,५८० इतकेच लोक होते. अनेक जातींचे लोक पूर्वीं द्राविडी भाषा बोलत असलेले हल्लीं आर्यभाषा बोलूं लागले आहेत. कित्येक द्राविडी भाषांत आर्य भाषांची मिसळ होऊन त्या मिश्रभाषा बनल्या आहेत. या आर्यभाषांच्या प्रसाराचा असाहि परिणाम झाला कीं, मूळ आर्यभाषा बोलणार्‍या लोकांतहि द्राविडीचें मिश्रण आढळतें. दुसरें असें कीं, द्रविड लोक हिंदुस्थानांत आर्यलोक येण्यापूर्वीं बराच काळ राहिलेले होते यांत शंका नाहीं. आर्यांनीं उत्तर हिंदुस्थान व्यापल्यावर द्रविड लोकांचा संहार न करतां उलट त्यांनां आपल्या समाजांत घेतलें. आतां द्राविडी भाषेच्या खुणा अद्यापहि आर्यभाषांत सांपडतात किंवा काय एवढाच आपल्यापुढें प्रश्न आहे व याचें उत्तर होकारार्थी आहे असें बिशप काल्डवेल याच्या पुढील उतार्‍यावरून दिसून येईल:-

''आर्यपूर्व द्रविड लोक संख्येनें अधिक होते. त्यांचा नाश न करतां आर्यांनीं त्यांनां आपल्या समाजांत घेऊन परतंत्र बनविलें. द्रविड लोकांनीं जेत्या आर्यांची भाषा उचलली, पण तिच्यावर त्यांच्या द्राविडी भाषेचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाहीं. तो परिणाम असा कीं आर्यभाषेंत कित्येक द्राविडी शब्द नवीन आले, व एकंदर आर्यभाषेचा जोर व वळण दोन्ही बदलून गेलीं.''

प्रथम शब्दसंग्रहाबद्दल विचार करतां असें दिसून येतें कीं, इंडो-आर्यन भाषेंतील बरेचसे शब्द कोणत्याहि इंडो-यूरोपियन भाषेंत आढळत नाहींत. विशेषत: अर्वाचीन देशी भाषांत असे शब्द पुष्‍कळ आहेत. अशा शब्दांपैकीं पुष्‍कळांची उत्पत्ति संस्कृतपासूनच आहे असें अलीकडील भाषा शास्त्रज्ञांनीं सिद्ध करण्याचा क्रम चालविला आहे. तथापि तसले शब्द संस्कृत भाषेंत किंवा मूळ वैदिक भाषेंत सांपडतात इतकेंच सिद्ध झाल्यानें भागत नाहीं. तर ते संस्कृतप्रमाणें इंडो-यूरोपियन वर्गांतील भाषामध्येंहि सांपडले पाहिजेत; तरच ते मूळ द्राविडी नाहींत असें ठरेल. परंतु ही गोष्‍ट तर भाषाशास्त्रानें सिद्ध होऊं शकत नाहीं. उदा. क्रियापदांतील कित्येक मूळ संस्कृत धातू इंडो-यूरोपियन भाषांत आढळत नाहींत. तसेंच बरेच शब्दहि आढळत नाहींत. तेव्हां असले कित्येक शब्द व धातू मूळ द्राविडी भाषांमधील असले पाहिजेत. बिशप काल्डवेलनें आपल्या व्याकरणांत असल्या शब्दांच्या याद्या दिल्या आहेत. त्यांपैकीं एक 'शिव' शब्द उदाहरणार्थ घेऊं. रुद्रदेवता या अर्थी 'शिव' हा शब्द वेदांत आलेला आहे. द्राविडी भाषेंत शिव म्हणजे तांबडा असा अर्थ असून तिकडूनच तो संस्कृतमध्यें आला असावा असें दिसतें. ऋग्वेदांत रुद्र म्हणजे तांबडा असा अर्थ आहे. रुद्र-शिव या देवाच्या नांवामध्यें द्राविडी भाषेंतील कल्पना शिरलेली दिसते. या एकाच शब्दावरून शब्द व कल्पना या दोन्हींवर द्राविडी भाषेचा किती परिणाम झालेला आहे तें स्पष्‍ट दिसतें. साधारणत: असा एक नियम दिसतो कीं, जे लोक दुसरा देश जिंकून तेथें नवीन वसाहत करतात त्यांनां त्या नव्या देशांतील हवामानानुसार व तद्देश लोकांबरोबरच्या संघट्‍टनेमुळें उच्चारपद्धति थोडयाफार अंशानें स्वीकारावी लागते. आर्य लोकांमधील मुर्धन्यवर्ण द्राविडी भाषेंतून आलेले आहेत किंवा संस्कृतमध्यें मूळ ते होतेच याबद्दल बराच वाद माजलेला आहे. हे मूर्धन्यवर्ण इंडो-यूरापियन भाषांत असल्याचें दिसत नाहीं. द्राविडी भाषांत मात्र ते प्रमुख्यानें आहेत. हिंदुस्थानांत या वर्णाच्या उच्चार काहीं मुर्धन्य व कांहीं दंत्यवर्णांसारखा करतात. तेव्हां मूळ द्राविडी भाषेंतील मुर्ध्यन्यवर्णांचा आर्यभाषेंतील वर्णांवर परिणाम झाला असावा हें संभवनीय दिसतें. द्राविडी भाषेचा आर्यभाषेवर दुसरा परिणाम झालेला दिसतो. तो 'ल' या वर्णाच्या बाबतींतील होय. बहुतेक इंडो-यूरोपियन भाषांत 'र' व 'ल' असे दोन्ही स्वतंत्र वर्ग आहेत. परंतु इतर भाषांत जेथें 'र' असतो तेथें संस्कृतमध्यें 'ल' असतो; आणि उलट 'ल' च्या जागीं 'र' असतो. जुन्या इराणी भाषांत 'ल' हा वर्णच नाहीं. तेव्हां या बाबतींतहि द्राविडीचा परिणाम झाला असावा हें स्पष्‍ट दिसतें. 'र' चा 'ल' असा फरक द्राविडी भाषेंत पुष्‍कळ आढळतो आणि वेदकालापासून पुढें 'ल' चा उपयोग इंडो-आर्यन्भाषेंत वाढत्या प्रमाणांत होत गेला आहे, या गोष्‍टीवरूनहि वरील अनुमानाला दुजोरा मिळतो. प्राकृत भाषेंत एकेरी शब्दांत व सामासिक शब्दांत स्वरापुढें आलेल्या कठोर व्यंजनाला मृदुत्व येणें, मराठीमध्यें तालव्य वर्णांचा दोन प्रकारानें उच्चार होणें, छ बद्दल स आणि स बद्दल ह येणें वगैरे गोष्‍टी द्राविडी भाषेच्या झालेल्या परिणामाच्याच द्योतक आहेत.

प्रत्ययांच्या बाबतींत द्राविडी भाषांचा आर्यभाषांवर परिणाम झालेला आहे, तो वरच्यापेक्षां अधिक महत्त्‍वाचा आहे. विभक्तिप्रत्ययांच्या ऐवजीं शब्दयोगीअव्ययें जोडून अर्थ आणण्याची पद्धत असून हीं अव्ययें एकवचनाला व अनेकवचनाला सारखींच असतात. ही इंडो-आर्यन भाषेंतील पद्धत द्राविडी भाषेंत आढळते व इतर अनार्यभाषांतहि आढळते. शिवाय हीं अव्ययें शब्दाच्या मूळ रूपाला न लागतां सामान्यरूपाला लागतात व द्राविडी भाषेंतहि तीच पद्धत असून या सामान्यरूपालाच षष्‍ठी विभक्तीचा अर्थ असतो. मराठी व बिहारी भाषेंत हें सामान्य रूप फार उपयोगांत आणतात, आणि या दोन भाषांवरच द्राविडीचा परिणाम सर्वांत अधिक झालेला आहे. शिवाय या दोन्ही भाषावर्गांमध्यें षष्‍ठीविभक्तीरूपांचा विशेषणाप्रमाणें उपयोग करतात.

द्रविड लोकांची हिंदुस्थानांत वस्ती किती काळ आहे तें नक्की माहीत नाहींत. तथापि आर्यलोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वींच ते हिंदुस्थानांत होते यांत शंका नाहीं. परंतु द्राविडी लोक हिंदुस्थानांतील मूळचे रहिवाशी आहेत किंवा दुसर्‍या ठिकाणाहून ते हिंदुस्थानांत आलेले आहेत हेंहि सांगतां येत नाहीं. हिंदुस्थानच्या वायव्येकडील प्रांतांत द्राविडी भाषा आढळते. यावरून आर्यलोकांप्रमाणेंच द्रविड लोकहि त्याच बाजूनें बाहेरून हिंदुस्थानांत आले असले पाहिजेत, असें बिशप काल्डवेलचें म्हणणें आहे; आणि डॅनिश भाषाशास्त्रज्ञ रास्क याच्या मताप्रमाणेंच त्याचेंहि मत त्यानें आधारानिशीं असें दिलें आहे कीं, द्राविडी ही सिथियन भाषावर्गापैकीं एक भाषा आहे.

एका भाषावर्गाला दिलेलें सिथियन नांव हेंच बरोबर नाहीं. ग्रीक ग्रंथकारांमार्फत सिथियन म्हणून जे शब्द चालत आलेले आहेत ते मूळ वास्तविक इराणियन आहेत; म्हणजे इंडोयूरोपियन भाषावर्गांतील आहेत. आशिया व यूरोप येथील ज्या भाषा इंडो-यूरोपीय किंवा सेमिटिक या भाषावर्गांत पडत नाहींत अशा भाषांच्या वर्गाला सिथियन असें नांव देण्याचा प्रघात पडला आहे. तथापि या भाषा सर्व एका वर्गांत पडण्यासारख्या नाहींत. चीन व शेजारचा प्रदेश यांतील एकाक्षरी भाषा ही काकेशस पर्वतांतील भाषेहून किंवा फिन लोक व माग्यार लोक यांच्या भाषांहून इंडो-यूरोपीय भाषाइतकीच भिन्न आहे. द्राविडी भाषांचा हिंदुस्थानाबाहेरील इतर भाषावर्गांशीं संबंध दाखविण्याचे सर्व प्रयत्‍न सामान्यत: निष्‍फळच झालेले आहेत; सबब द्राविडी हा एक स्वतंत्र भाषावर्ग कल्पिणें आपणांस प्राप्त आहे. द्राविडी वर्गाचा मुंडावर्गाशीं संबंध आहे हें त्या भाषावर्गावरील लेखांत दाखविलेंच आहे. द्राविडी भाषांचा इंडो-यूरोपीय भाषांशीं संबंध आहे असें दाखविण्याचे प्रयत्‍न सर्व निष्‍फळ झालेले आहेत. द्राविडी भाषावर्गांतील तामीळ, मल्याळी, कानडी व तेलगू या प्रमुख भाषा आहेत. फार कालापासून त्यांत वाङ्मय होत आलेलें आहे. तथापि ही वाङ्मयीन भाषा त्या त्या लोकांच्या बोलण्यांतील भाषेहून भिन्न आहे आणि बोलण्याच्या व लिहिण्याच्या भाषेंत फरक इतका असतो कीं, एखाद्या निरक्षर इसमाला त्याच्याच भाषेंतील ग्रंथ वाचून दाखविल्यास तो समजणें अशक्य असतें. या बोलण्याच्या व लिहिण्याच्या भाषेंत फरक कोठें व कसा पडतो याचें विवेचन करण्याचें हें स्थळ नव्हें. इतकें मात्र खरें कीं, बोलण्याच्या भाषेपेक्षां लिहिण्यांतील भाषा जुन्या स्वरूपांतली असते. याबद्दलची अधिक माहिती बिशप काल्डवेलच्या व्याकरणग्रंथांत सांपडेल.

द्रविडी भाषा मूळ ज्या भाषेपासून निघाल्या त्या भाषेंतील पुष्‍कळशा गोष्‍टीं जिच्यांत अद्यापिहि कायम आहेत अशी एकच भाषा आहे, ती तामीळ होय. तेव्हां या भाषेच्या आधारानें इतर भाषांचें वर्गीकरण करणें युक्त आहे. मल्याळी भाषेंतील वाङ्मयावर तामिळीचा फार परिणाम झालेला आहे आणि या दोन्ही भाषांमध्यें साम्य फारच आहे. पण दोन्ही भाषांत स्वतंत्र निरनिराळें वाङ्मय झालेलें असल्यामुळें त्यांनां दोन निराळ्‍या भाषा मानणें भाग आहे. कानडी भाषाहि तामिळीशीं फार समान आहे. या दोन भाषांतच स्त्रीलिंगाबद्दल व्यवस्थित नियम आहेत; सबुद्ध व निर्बुद्ध नामांचे अनेक वचनी प्रत्ययहि दोहींत सारखेसारखेच आहेत; व दोहींतहि सामान्यरूपें सारख्याच प्रकारचीं होतात. कुमारिलभट्‍टानें आंध्र-द्राविडभाषा म्हणून जें म्हटलें आहे तींतील द्राविड शब्दांत कानडी व तामिळ या भाषांचा समावेश होत असून आंध्र म्हणजेच तेलगू भाषा होय.

निरनिराळ्‍या द्राविडी भाषा बोलणारांची १९११ सालची संख्या पुढील कोष्‍टकावरून दिसून येईल:-

भाषा संख्या
तामीळ १,८१,२८,३६५
मल्याळी ६७,९२,२७७
कानडी १,०५,२५,८६१
तेलगू २,३५,४२,८६१
तुळू  ५,६३,४५३
कोडगु ४२,८८१
तोडा ७३० 
कोटा १,२८०
कुरुख ८,००,३२८
माल्टो ६४,८७५
गोंडी १५,२७,१५७
कुइ ५,३०,४७६
कोलामी व नाइकी २४,०७४
ब्राहुई १,७४,२२९
एकूण ६,२७,१८,७२५


संस्कृति:- या संस्कृतीविषयीं पद्धतशीर विवेचन झालें नाहीं. या संस्कृतीचा इतिहास द्यावयाचा म्हणजे आर्यन् संस्कृतीचा परिणाम होण्यापूर्वींचे रूप पहावयाचें आणि एकंदर मनुष्‍यभ्रमणाच्या इतिहासामध्यें या महावंशाचीं भ्रमणें देऊन तिच्या पोटसंस्कृती कशा निर्माण झाल्या हें पहावयाचें.

आज ही संस्कृति हिंदुस्थानांत प्रामुख्यानें आहे व इतर तत्सदृश जे लोक असतील त्यांचा भारतीय द्राविडांशीं कितपत ऐतिहासिक संबंध जोडतां येईल हा मुख्य ऐतिहासिक प्रश्न होय. ज्या वंशाशीं द्राविड वंशाचा संबंध जोडण्यांत येत आहे असे वंश म्हटले म्हणजे सरहद्दीवरील ब्राहुई, इराणांतील लुरी, प्राचीन तुर्कस्तानांतील सुमेरियन, हे होत. यापेक्षां दूरचा संबंध लावणार्‍या मंडळींनीं त्यांचा सेमिटिक लोकांशीं वांशिक संबंध लावला आहे आणि कित्येकांनीं ऑस्ट्रेलियांतील अन्य लोकांशीं संबंध लावला आहे. याची पुढची पायरी म्हणजे फिन, लॅप वगैरे लोकांशीं संबंध जुळविणें. तर तसली कल्पनाहि अर्धी मुर्धी गंभीरपणानें व अर्धी मुर्धी थट्टेनें रिसलेनें सुचविली आहे. द्राविड लोकांचे थोडे बहुत कुरळे केंस, यहुद्यांचे तसल्याच प्रकारचे केंस व मिलॅनेशियन भाषा बोलणार्‍यांचे केंस यांचें सादृश्‍य कित्येक लोक विचारास घेतात तर कित्येक लोक बूमेरँगनें आस्ट्रोलॉइड व द्राविड लोकांचा संबंध जोडूं पहातात. कोलेरियन, निग्रिटो इत्यादि रक्तें हिंदुस्थानांत होतीं आणि त्यांचा वंश नष्‍ट झाला असेल असें कीन म्हणतो (कोचीन ट्राइब्स अँड कास्ट्स भाग पहिला, कीनची प्रस्तावना). हें मत हिंदुस्थानांतील सरकारी मानवशास्त्रवेत्त्‍यांच्या मताविरुद्ध आहे आणि ते कोलेरियन व निग्रिटो या केवळ कल्पना असून ते द्राविडांचेच पोटभेद आहेत असें म्हणूं लागतात.

प्राचीन द्राविडांचें वाङ्मय शिल्लक नाहीं. हिंदुस्थानांतील सर्वांत जुनें वाङ्मय जें तामिळ जुन्यांतले जुने ग्रंथ जरी घेतले तरी ते ग्रंथ संस्कृत भाषेनें तामिळवर परिणाम केल्यानंतरच्या काळांतले आहेत आणि त्यामुळें हिंदुस्थानामध्यें द्राविडी संस्कृतीला जें स्वरूप प्राप्त झालें तें केवळ आर्यन संस्कृतीची रूपांतर पावलेली शाखा या नात्यानेंच झालें. द्राविडी छंद:शास्त्रांतील वैशिष्‍टयें विज्ञानेतिहासांत सविस्तर दिलेलींच आहेत. द्राविडांचें जें स्वतंत्र संगीत आहे तें द्राविडांच्या लौकिक गानास संस्कृत-शास्त्रज्ञांनीं पद्धति लावून निर्माण केलेलें संगीत होय.

द्राविडांचा विशिष्‍ट कायदा देखील हिंदु कायद्याची उपशाखा या नात्यानें अस्तित्वांत आहे. द्राविडांचा विशिष्‍ट असा जो मातृपरंपरेचा कायदा तो देखील औदीच्यांच्या धर्मकल्पनांपासून अस्पृष्‍ट राहिला नाहीं. उदाहरणार्थ, प्रत्येक मल्याळी नायरांचे विवाह हे ब्राह्मणी कायद्याप्रमाणें पाट होत, त्यांत मुलीचें लग्न अगोदर ब्राह्मणाबरोबर अगर झाडाबरोबर लागतें, तेंच थाटानें होतें व त्या लग्‍नानंतर मुलीस २।४ दिवसांनीं वैधव्याची दीक्षा देण्यांत येते आणि मग मात्र ती आपला संबंध वाटेल त्याबरोबर करते व जेव्हां पहिल्या नामधारी लग्नाचा नवरा मरेल तेव्हां त्या नवर्‍यास (संबंधच्या नवर्‍यास नव्हे) नायर स्त्री पिंड देते. कायद्यावर जसा परिणाम घडला तसा दुसर्‍या अनेक आचारांवरहि परिणाम घडला आहे. द्राविड संस्कृतीवर वैदिक संस्कृतीचा जरी परिणाम झाला तरी त्यायोगानें तिचें वैशिष्‍टय नष्‍ट न होतां तें जास्त प्रगट करावयास एक दिशा मिळाली आणि तिनें हिंदु संस्कृतीस वैचित्र्य आणलें. तें वैचित्र्य आपणांस द्राविडी कलाकौशल्यांत व वास्तुशास्त्रांत पूर्णपणें आढळून येतें.

द्राविडी संस्कृतीचा हिंदु संस्कृतीशीं मिलाफ जितका उत्तम तर्‍हेनें झाला तितका दुसर्‍या कोणत्याहि संस्कृतीशीं झाला नाहीं. पापुअन, फिजी, ऑस्ट्रोलाइड हे सर्व वंश वन्य स्थितींत राहिले. चिनी संस्कृति त्यांच्यावर फारशी परिणाम करूं शकली नाहीं. अरबांनीं तिच्यावर फारच थोडा परिणाम केला आणि आतां जर परिणाम बराच होत असेल तर तो ख्रिस्ती संस्कृतीचा होय.

हिंदुस्थानांतील द्राविडांमध्यें जरी हिंदुत्व पूर्णपणें शिरलें तरी कित्येक आचार जुनेच राहिले हें वीरक्कल, माद्रीगल यांच्या अस्तित्वावरून दिसून येईल (वीरक्कल पहा). कांहीं गोष्‍टींमध्यें द्राविड संस्कृतीनें आपला जोर दाखविला तो आपल्या आवडीनिवडीनें होय. कर्नाटकामध्यें बसवाच्या संप्रदायास जो जोर मिळाला त्यांत दिसून येणारें मन आपलें थोडेसें स्वातंत्र्य दाखवीत होतें यांत शंका नाहीं.

सुमेरियन लोकांशीं द्राविडांचा संबंध कितपत आहे हें अन्यत्र (सुमेरियन पहा) दिलेंच आहे. तसाच सेमिटिक लोकांशीं संबंध (जो अजून पूर्णपणें सिद्ध झालासें वाटत नाहीं) तो सेमिटिक या सदराखालीं दिला आहे.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .