प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या   
   
द्वयाश्रय काव्य:- एक इतिहासग्रंथ. सिद्धराज व कुमारपाल यांच्या कारकीर्दीतील प्रसिद्ध हेमराजानें या ग्रंथास सुरवात केली याचें हें नांव असण्याचें कारण असें कीं या ग्रंथाच्या रचनेचे हेतु दोन होते; संस्कृत व्याकरण शिकविणें व अनन्हिलवाडप¬ट्‍टणच्या राजांचा इतिहास सांगणें. त्या काव्याचा गोषवारा येणेंप्रमाणें:-
    
सर्ग १ ला:- अनहिलपूर नांवाचें शहर होतें. तेथें राज्य करणार्‍या सोळंकी राजांमध्यें पहिला राजा मूळराजा हा होता. हें शहर फार चांगलें होतें आणि मूळराजाहि मोठा पराक्रमी होता. यानें उत्तर कोसल देश जिंकला.
    
सर्ग २ रा:- मूळराजाचे मंत्री खेरालूचे चेराणक, जंबक आणि जेहल या नांवाचे होते. त्यांच्या सल्ल्यानें त्यानें वामनस्थली येथें राहणारा सौराष्‍ट्र देशाचा राजा ग्राहरिपु हा प्रभासक्षेत्रावरच्या यात्रेकरूंस त्रास देई म्हणून त्यावर स्वारी करण्याचा निश्चय केला. ग्राहरिपूनें सिंधु देशच्या राजास जिंकलें होतें व कच्छ देशचा फुलामहाराजाचा मुलगा लाखा राजा हा त्याचा मित्र होता. वामनस्थळी हें उज्जयंताद्री पासून ७ कोस व समुद्रापासून २० कोस होतें. ग्राहरिपु हा जातीचा अभीर (गवळी) होता.
    
सर्ग ३ रा:- मूळराज यास बीज आणि दंडक असे दोन चुलते होते. त्याचे मुलगे मूळराजाच्या पदरीं नव्हते. या सर्गांत मूळराज विजय यात्रेस निघतो.
    
सर्ग ४ था:- ग्राहरिपु, लाखा व सिंधु देशचा राजा यांसह मूळराजास जंबुमाळी नदीवर भेटतो.
    
सर्ग ५ वा:- मूळराजानें ग्राहरिपु व लाखा यांस लढाईत मारलें. मूळराजाचा धाकटा भाऊ गंगाधरचा राजा गंगामह, व त्याचा मित्र रेवतीमित्र, शिलाराष्‍ट्र येथील राजा व एक मारवाड राजा हे व काशी देशचा राजा हे सर्व मूळराजाच्या बाजूनें लढले. परमार वंशांतील श्रीगाल येथील राजाहि मूळराजाकडे होता (हा मारवाडचा राजा शेट राठोड याचा मुलगा व उदेपूर व ईदर या घराण्यांचा मूळपुरुष शियोजी असावा).
    
सर्ग ६ वा:- मूळराजास चामुंडराजा नांवाचा पुत्र झाला. त्याचें शिक्षण रुद्रप्रसाद (सिद्धपूर येथील रूद्रमाला देवालय) येथें बरेंच झालें असावें. मूळराजास अंगदेश, वनवासदेश, देवगिरी, कोल्हापूर (येथून पद्मराग), काश्‍मीर (कस्तूरी), कुरुदेश, पांचाल देशांतील कांपिल्य नगरीचा राजा इत्यादि राजे खंडणी देत असत. लाट देशाचा राजा द्वारप यानें कुलक्षणी हत्ती खण्डणीदाखल दिल्यावरून मूळ राजा त्याजवर मुलासह चालून जातो. च्छभ्रवति (नर्मदा?) नदीवर भृगुकच्छ (भडोच) नगराजवळ चामुंड राजानें द्वारप राजाचा पराभव करून त्यास मारिलें. नंतर परत आल्यावर चामुंड राजास राज्याभिषेक करून सरस्वती तीरावर श्रीस्थळ (सिद्धपूर) येथें मूळराज निजधामास गेला (इ. स. ९९७). वाटेंत च्छभ्रवती (नर्मदा) तीरावर सूर्यपूर नगर लागलें; तेथील स्त्रिया कुरूप होत्या.
    
सर्ग ७ वा.:- चामुंड राजा यास वल्लभ राजा, दुर्लभराजा, व नागराजा असे तीन पुत्र झाले. चामुंडराजानें आपल्या बहिणीस-चिनी देवीस-भ्रष्‍ट केल्यामुळें तो काशीयात्रेस जात असतां त्याचें चामर माळव्याच्या राजानें हिसकून घेतलें. म्हणून परत आल्यावर त्यानें वल्लभराय यास त्याजवर स्वारी करण्यास पाठविलें. तो पारापारा व सिंधुसिंधु या नद्या ओलांडाव्या लागूं नयेत म्हणून कुंतल (बेल्लारी किंवा अडवाणीचा भाग) देशामधून गेला. परंतु वाटेंत त्यास देवी आल्यामुळें त्यानें आपलें सैन्य परत पाठविलें (इ. स. १०१०); पुढे तो तेथेंच मेला. नंतर चामुंडराजानें दुर्लभराय यास गादीवर बसवून शुक्ल तीर्थास (भडोचजवळ) गमन केलें व तेथें तो मेला. (?)
    
दुर्लभराजास श्रीजिनेश्वरसूरी यानें जैन धर्माचीं मूलतत्वें समजावून दिलीं होती. दुर्लभ राजाचीं बहीण (?) मारवाडचा राजा महेन्द्र यास दिली होती. दुर्लभराजा व नागराजा हे महेन्द्र राजाकडे गेले. त्याची मुलगी दुर्लभादेवी ही दुर्लभराजानें स्वयंवरांत मिळविली व महेन्द्रानें आपली धाकटी मुलगी नागराजास दिली. परत येत असतां त्यांनीं अंगदेश, माळवा, हूणदेश, मथुरा (या राजानें तुर्क लोकांकडे साहाय्यार्थ गमन केलें), आंध्र देश, वैदिय, कुरु व काशी इत्यादि राजांचा पराभव केला.
    
सर्ग ८ वा:- दुर्लभराजाचा धाकटा भाऊ नागराज यास भीम या नांवाचा पुत्र झाला. त्याला गादीवर बसवून दुर्लभ राज व नागराज दोघेहि तपश्चर्येस गेले व पट्‍टण येथें स्वर्गस्थ झाले. भीमदेवास पुण्ड्रदेश, आंध्रदेश, व मगधदेश येथील राजे करभार देत असत. भीमदेवानें सिंध देशचा राजा हम्मुक यावर स्वारी केली. हम्मुकानें शिवसाण येथील राजास जिंकिलें होतें. भीमदेव हा पंजाबांत गेला व तेथील नद्यांवर त्यानें झाडें, दगड व माती यांचा पूल बांधून हम्मुकाबरोबर लढाई करून त्यास जिंकिलें [चेदिदेश (गोण्डवण) हा त्यावेळीं हम्मुक राजाच्याच ताब्यांत होता?]
    
सर्ग ९ वा:- नंतर भीमदेव चेदिदेशाकडे वळला. वाटेंत त्यानें पुष्‍कळ राजांस जिंकलें. चेदिदेशच्या राजाजवळ भिल्ल व म्लेंछ सैन्य होतें पण तो भीमदेवास शरण आला, त्याचें नांव कर्ण होतें. भीमदेवानें काशी, गजबन्धदेश, यंतू, कलिंग देशचा राजा तंतिक, व नन्ति, गन्ति, हन्ति, वन्ति, मन्ति आणि गोंड देशाचा राजा यांनां जिंकलें होतें. भीमदेवास क्षेमराज व कर्ण असे दोन पुत्र होते. क्षेमराजास देवप्रसाद या नांवाचा एक मुलगा होता. भीमदेव हा कर्णास गादीवर बसवून निजधामास गेला (इ. स. १०७३). क्षेमराज हा राज्याचा स्वीकार न करितां दहिस्थळ या गांवाजवळ मुण्डिकेश्वर या तीर्थावर राहिला. कर्णराजानें हें दहिस्थळ देवप्रसाद यास दिलें. कर्णराजानें दक्षिणेंतील चंद्रपूर नगरच्या जयकेशी नांवाच्या राजाच्या मयनल्लदेवी नांवाच्या मुलीबरोबर लग्न केलें.
    
सर्ग १० वा:- कर्णानें पुत्रप्राप्तीकरितां लक्ष्मीस प्रसन्न करून घेतलें.
    
सर्ग ११:- कर्णास जयसिंह नांवाचा पुत्र झाला. त्याला त्यानें गादीवर बसविलें (इ. स. १०९३) व आपण स्वर्गास गमन केलें. देवप्रसाद यानें आपला पुत्र त्रिभुवनपाल यास जयसिंहाच्या हवालीं करून स्वत:स दहन करून घेतलें.
    
सर्ग १२ वा:- जयसिंहानें श्रीस्थळ (सिद्धपूर) तीर्थाच्या संरक्षणार्थ मांसभक्षक राक्षसांवर स्वारी करून त्यांचा राजा बर्बर (बर्बरक) यास कैद केलें. पण त्याची बायको पिंगलिका हिच्या विनवणीवरून त्यानें त्यास सोडून दिलें. हा बर्बर कोणी स्वारी करून आलेला मुसुलमान असावा. त्याच्या बाजूनें अंतधार्नदेशच्या राजाचा धाकटा भाऊ लढत होता.
    
सर्ग १३ वा:- जयसिंहास रानांत पाटल देशांतील भोगावतीपुरीचा नागराज रत्‍नचूड याचा पुत्र कनकचूड भेटला. याचें दुसरा नागपुत्र दमन याचा सहाध्यायी, याजबरोबर भांडण झालें होतें. जयसिंहानें त्यास मदत केली व त्यानें यास वर दिला. बर्बरक यास वर्वरक असें उज्जन येथील ताम्रपटांत म्हटलें आहे. तो ताम्रपट रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ताब्यांत आहे.
    
सर्ग १४ वा:- जयसिंहानें उज्जनीचा राजा यशोवर्मा याजवर स्वारी करून त्यास कैद केलें व अवंती आणि धारप्रांत मिळविलें, तसेंच उज्जनीजवळचा सिमहा प्रांत जिंकला. या स्वारींत त्याला भिल्ल राजाकडून पुष्‍कळ मदत झाली. उज्जनीच्या राजांच्या कारकीर्दी येणेंप्रमाणें आहेत:- (१) भोजदेव, (२) उदयादित्य, (३) नरवर्मा (मृ. सं. ११९०), (४) यशोवर्मा (मृ. सं. ११९४), अजयवर्मा (सं. १२००-१२३५) इत्यादि.
    
सर्ग १५ वा:- नंतर जयसिंह माळव्याहून परत फिरला. वाटेंत पुष्‍कळ राजांनीं त्यास मुली दिल्या. नंतर तो कांही दिवस सिद्धपुरास राहिला. तेथें पूर्ववाहिनी सरस्वती तीरावर त्यानें रुद्रमाळा बांधिली व एक महावीरस्वामीचें देऊळ बांधिलें. नंतर तो पांचाळ देशच्या राजांकडे, त्यांनां सोमनाथाची यात्रा करण्यास सांगण्यास पायांनीं चालत गेला. त्यानें देवलपट्टणास येऊन सोमनाथाचें दर्शन घेतलें. देवलपट्टणच्या राजानें त्याचा सत्कार केला. नंतर तो गिरनार पर्वतावर गेला आणि तेथें त्यानें नेमिनाथांची पूजा केली. पुढें सिंहपुरास (सिहोर) गेला आणि तेथून पट्टणास परत आला. त्यानें सहस्त्रलिंगनामक तलाव बांधला व पुष्कळ तळीं, विहिरी, मंदिरें, बागा वगैरे बांधिल्या व सदावर्तें घातलीं. त्यानें ज्योतिष, न्याय पुराण इत्यादिकांच्या अभ्यासासाठीं शाळा स्थापन केल्या आणि चंडिकादेवी वगैरेंचीं एकशें आठ देवळें बांधलीं. नंतर सिद्धराजानें त्रिभुवनपालाचा पुत्र कुमारपाल यास गादीवर बसवून स्वर्गारोहण केलें (इ. स. १९४३).

स र्ग १६ वा.- सपादलक्ष (नागोर) देशाचा राजा आन(याला मेरूतुंग विशालदेव चव्हाण याचा नातु आनक असें म्हणतो) हा अवंतीचा राजा बल्लाळ याशीं मैत्रीं करून व पारा नदीतीरावरच्या राजांच्या साहाय्यानें चालून आला. त्याच्या सैन्यांत परकीय भाषा जाणणारे पुष्कळ लोक होते. त्याला उत्तरधिप असें म्हणत व कुमारपाल याला पश्चिमाधिप असें म्हणत. आन राजानें पश्चिम गुरजाथवर प्रथम स्वारी केली व त्यास कथागामचा राजा व कुमारपालाचा एक सेनापति चाहाद [याचा नदोल येथील जैन लायब्ररींतील ताम्रपटांत उल्लेख आहे (१२१४) व मेरूतुंग म्हणतो कीं आन राजास वाहाद जाऊन मिळाला]. या आन राजानें गुजराथमध्यें येणा-या व्यापा-यांकडून तेथील बरीच माहिती मिळविली होती. आन राजास पाटलिपुत्र येथील राजा (हा कोल्ह्यासारखा होता) येऊन मिळाला. आनराजाचें सैन्य राक नांवाच्या ब्राह्मणाच्या हाताखालीं होतें.

कुमारपालास उत्तम घोडेस्वार असे कोळी व कच्छ प्रांतांतील त्याचे मांडलिक येऊन मिळाले तसेच सिंधी लोक येऊन मिळाले. कुमारपाल अबूकडे सैन्य घेऊन निघाला व तेथें त्यास हरणाचें कातडें पांघरणारे पुष्कळ रानटी लोक येऊन मिळाले. यावेळीं अबूचा राजा विक्रमसिंह होता. विश्वमित्रापासून निघालेल्या परमार वंशांतील जालंधर (जालोर) देशाचा राजा पण त्यास येऊन मिळाला. अबूवर वर्णासा नदीतीरावर कुमारपाळानें तळ दिला.

स र्ग १७ वा.- यांत रात्रीचें वर्णन असून १८ व्यांत आन राजास त्याच्या मंत्र्यानें म्हटलें कीं आपण मारवाड सोडून इकडे स्वारी करण्यास यावयाचें नव्हतें व आतां लढाई न करतां तह करावा. लढाईमध्यें गुजराथीं सैन्य आहाद या मंत्र्याच्या हाताखालीं होतें व आन राजाचें सैन्य गोविंदराज या मंत्र्याच्या हाताखालीं होतें. आन राजा बाण लागून जमिनीवर पडला. व त्याचें सैन्य शरण आलें.

स र्ग १९ वा.- कुमारपालानें आनराजाची मुलगी जल्हाणा हिजबरोबर विवाह केला व परत फिरला. बल्लाळ राजावर त्यानें पाठविलेले विजय आणि कृष्ण हे सेनापती फितुर होऊन त्यास मिळाले. तेव्हां कुमारपालानें त्याजवर चालून जाऊन त्याचा पराभव केला.

स र्ग २० वा.- यांत कुमारपालानें प्राणियज्ञ बंद केला. त्याला महिपालदेव नांवाचा भाऊ होता व त्या महिपालास जयदेव नांवाचा पुत्र होता. ब्राह्मण देखील यज्ञामध्यें पशुवध बंद करून धान्याचा यज्ञ करूं लागले. पालिदेश आणि पांचाल देश या देशांतहि पशुयज्ञ बंद केला व मांसविक्रय बंद करून त्या लोकांस ३ वर्षांचें त्यांचें उत्पन्न नुकसानीदाखल दिलें. काशीच्या आसपासचे लोक मात्र प्राणिहत्या करीत. बेवारशी मालहि तो जप्त करीत नसे. त्यानें केदारेश्वर व सोमनाथ या देवळांचा जिर्णोंद्धार केला. त्यानें अनहिलपुरास पार्श्वनाथाचें देवालय बांधून स्फटिकाच्या मूर्ती बसविल्या. त्यानें देवपट्टणासहि पार्श्वनाथाचें देवालय बांधलें. अनहिलपूरच्या देवालयास त्यानें कुमराविहार असें नांव ठेविलें. नंतर त्यानें अनहिलपुरासच कुमारपालेश्वराचें देवालय बांधलें.

याप्रमाणें जिनेश्वरसूरि याचा शिष्य लेशजयतिलकगणी यानें लिहिलेल्या द्व्याश्रय नांवाच्या ग्रंथांतील कथेचा सारांश आहे. लक्ष्मीतिलककवि यानें या ग्रंथावर टीका लिहिली. हा ग्रंथ वि. सं. १३१२ (इ. स. १२५६) मध्यें श्रीप्रल्हादपट्टण येथें दिवाळीच्या दिवशीं समाप्त झाला. [रासमाला; एचिरिस. पु. ९; टॉड- वेस्टर्न इंडिया; इं. अँ. पु. १ व ३; रॉ ए. सो. (बां. ब्रँच), पु. १, (बेंगाल) पु. ५ व ७.]

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .