प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ

धातुविद्या- या शब्दाचा उपयोग अशोधित धातूपासून शुद्ध धातु काढण्याची क्रिया दाखविण्याकडे केला जातो. विद्युतच्या योगानेंहि कांहीं धातू वेगळे करतात पण त्या बाबतींत विद्युद्धातुविद्या हा शब्द योजतात. खालील कोष्टकांत कांहीं महत्त्वाचे धातू अशोधित स्थितींत ज्या स्वरूपांत सांपडतात तीं दिलीं आहेत.

धातूंची अशोधित स्वरूपें

 


धातूचें नांव
कच्च्या धातूचें स्वरूप.
लोखंड प्राणिदें, गंधकिद.
ताम्र मिश्र गंधकिदें, पाणिदें, धातु.
रजत गंधकिद, धातु, हरिद.
सुवर्ण  खुद्द धातु.
शिसें गंधकिद आणि अनाम्लिककर्वित
गंधकिद वगैरे.
जशद गंधकिद, प्राणिद, कर्बित, उज्जिव.
कथील प्राणिद.
पारा गंधकिद धातु.
अंज गंधकिद.
बिस्मत धातु.
निकल, कोबाल्ट तालिदें.
प्लातिन वगैरे धातु.


यांपैकीं लोहगंधकिद, रजतहरिद व शीसगंधकिद हीं फारशीं महत्त्वाचीं नाहींत.

धा तु घ ट ना सं शो ध न.- सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानें धातूंच्या घटनेसंबंधीं अर्वाचीन कालांत बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. ज्या धातूची किंवा मिश्रधातूची घटना शोधावयाची असेल त्याच्या शुद्ध नमुन्याची ¼ इंच जाड व १ चौरस इंच क्षेत्र व्यापणारी पातळ चकती घेऊन ती बारीक कुरुंदाचा चूर लावलेल्या कागदानें बरीच घांसतात. पण ह्या घांसण्याच्या योगानें पत्र्यावर आरशासारखा पातळ पापुद्रा येतो व त्याच्या योगानें पत्र्यावरील अपूर्ण घर्षणाच्या योगानें राहिलेल्या खांचा दिसत नाहींत आणि नमुना बिघडतो. तेव्हां हा पापुद्रा शक्य तितका पातळ करण्याची खबरदारी घेतात. हा पापुद्रा कांहीं योग्य द्रव रासायनिक द्रव्यांच्या योगानें ताबडतोब घालवून पत्र्याचा मूळ पृष्ठभाग दृष्टोत्पत्तीस आणतां येतो. या पृष्ठभागावर खोदक रासायनिक द्रव्यें विद्युत किंवा सेंद्रिय द्रव्य यांच्या क्रियेनें आपणास पाहिजे ह्या तऱ्हेचा नमुना तयार करवून घेतां येतो. अशा रीतीनें तयार केलेल्या नमुन्याचें सूक्ष्मदर्शक यंत्र व प्रकाशलेखन यंत्रं यांच्या साहाय्यानें छायाचित्र घेतात. या छायाचित्रावरून धातूच्या किंव मिश्रधातूच्या घटनेसंबंधीं बराच बोध होतो.

धा तु शु द्धं क र ण्या च्या स र्व सा धा र ण री ती.- कधीं कधीं धातु त्याच्या मूळ स्वरूपांत सांपडून याच्याबरोबर असलेलीं खनिजगर्भित द्रव्यें हातांनीं किंवा हातोडीनें काढतां येतात; पुष्कळसे धातू खाणीबाहेर काढल्याबरोबर खनिजगर्भित द्रव्यें यांनीं मिश्रित असतात ह्मणून कच्च्या धातूपासून शुद्ध धातु काढण्यापूर्वी कच्चा धातु शुद्ध करून घ्यावा लागतो. तो शुद्ध करण्याकरितां प्रथमत: त्याचें दळून अति सूक्ष्म चूर्ण करतात म्हणजे तो माती वगैरेंच्यापासून वेगळा होतो व नंतर तें चूर्ण धुतात. पुष्कळ कच्चे धातू रासायनिक संयुक्त पदार्थ असल्यामुळें त्यांपासून रासायनिक क्रियेशिवाय शुद्ध धातू काढतां येत नाहींत. त्यांपैकीं कांहीं क्रिया खालीं दिल्या आहेत.

अग्निक्रिया:- प्रथमत: कच्ची धातु घेऊन तींत संमिश्रक द्रव्य मिसळतात व नंतर त्या मिश्रणास विस्तवाची आंच देतात. ह्या आंचीच्या योगानें रासायनिक व पदार्थवैज्ञानिक असे दोन्हीहि फरक घडतात. या भट्ट्याहि अशाच तऱ्हेनें बनविलेल्या असतात कीं, त्यांतील उष्णतेचा व त्यांत उत्पन्न

धातुकाम

होणाऱ्या वायूंचा आपणांस पाहिजे तसा उपयोग करून घेतां येतो. कांहीं बाबतींत कच्च्या धातूंतील कांहीं कांहीं पदार्थांचे पूर्णपणें जाळून भस्म करावयाचें असतें त्यावेळीं न जळालेल्या प्राणवायूची गरज असते. अशा वेळीं भट्टींत वायूचा प्रवाह चालू ठेवतात. अगर जेव्हा कच्च्या धातु प्राणवायुरहित करावयाचा असतो तेव्हां भट्टींतून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह बंद करतात. धातु भट्टींतल्याच जळणाऱ्या वायूमध्यें तप्त केला गेल्यानें आपणास पाहिजे तसा परिणाम घडवून आणतां येतो. धातुविद्येंतील बहुतेक रासायनिक क्रियांचा या दुसऱ्या प्रकारांत समावेश होतो, व ज्वालेमध्यें न मिळणारी द्रव्यें वापरून शुद्ध करण्याची क्रिया क्वचितच करावी लागते.

पारदमिश्रण:- कच्च्या धातूचें पाऱ्याशीं मिश्रण करतात. हें मिश्रण शुद्ध करून त्याचें ऊर्ध्वपातन केलें असतां पारा उडून जातो व शुद्ध धातु खालीं रहातो.

आर्द्रप्रक्रिया:- ह्या क्रियेमध्यें प्रथमत: कच्चा धातु भाजून त्याचा एखाद्या क्षाराशीं किंवा अम्लाशीं संयोग करून त्या संयोगावर किंवा कांहीं बाबतींत खुद्द कच्च्या धातूवर सुद्धां एखाद्या योग्य रासायनिक द्रव्याची क्रिया करून शुद्ध धातु कच्च्या धातुपासून वेगळा करतात.

रासायनिक क्रिया:- पारदमिश्रणक्रिया अथवा आर्द्रक्रिया ह्या दोन्ही सोनें, तांबें, रजत वगैरेसारख्या धातूंनांच उपयुक्त आहेत. पण तिग्म रासायनिक क्रियांचा बऱ्याच ठिकाणीं उपयोग होत असल्यानें आपण त्यांचा विचार करूं. कोणती रासायनिक क्रिया करावयाची हें मूळ धातु ज्या अधातूशीं संयुक्त झाला असेल त्यावरून ठरवावयाचें असतें.

प्राणिद.- उज्जित. कर्बित व सिक्रित:- ह्या स्वरूपांत खाणींतून बाहेर निघालेला कच्चा धातु प्रथम: भाजतात. म्हणजे त्यापासून कर्बंद्विप्राणिद व पाणी वेगळें होऊन कांहीं गंधक, ताल आणि सेंद्रिय द्रव्यें हीं भस्म होतात, व धातूचें अशुद्ध प्राणिद मिळतें. हें प्राणिद जळाऊ पदार्थांच्या योगानें बरेंच तापविलें असतां प्राणवायुरहित होऊन मूळ धातु मिळतो. जर कच्चा धातु सिकित असेल तर तो तापवीत असतांच सिके वेगळें करून प्राणिद मिळविण्याकरितां त्यांत चुना मिसळतात. लोह, कथिल, ताम्र, शिसें आणि जशद हे धातू अशा रीतीनें काढतात. जशदाच्या बाबतींत प्राणरहित करण्याकरतां त्याच्या उकळण्याच्या बिंदूच्या उष्णमानाहून जास्त उष्णमान लागतें म्हणून त्याचा कच्चा धातु प्राणवायुरहित करणाऱ्या द्रव्याशीं मिश्रित करून तें मिश्रण शीतक असलेल्या बकपात्रांत किंवा मेघडंबरीपात्रांत तापवितात. बाकीचे बहुतेक धातु वाऱ्याच्या झोतावर चालणाऱ्या भट्टींतील विस्तवांतच प्राणवायुरहित करतात. या भट्टींत कोळशाचे व कच्च्या धातूचे एकावर एक असे थर रचून त्यांस खालून अग्नि देतात. नंतर कोळशामधील कर्ब आणि वाऱ्याच्या झोताबरोबर येणाऱ्या वायूमधील प्राण यांच्या संयोगानें झालेल्या कर्बैंकप्राणिदाच्या योगानें धातूचें प्राणिद प्राणवायुरहित होऊन धातुरूप होतें व हें द्रवरूप स्थितींत असल्याकारणानें मळीसह भट्टीच्या खालील भागांत सांचतें. या ठिकाणीं असलेल्या छिद्रांच्या गुडघा (बुचें) काढल्या असतां मळीसह धातु आपणांस काढून घेतां येतो.

गंधकिदें:- लोह, ताम्र, शिसें, जशद, पारा, रजत, अंज ह्या धातू या स्वरूपांत सांपडतात. गंधकिदांचे दोन विभाग करतात:- (१) साधीं गंधकिदें व (२) संकीर्ण गंधकिदें. पहिल्या वर्गांत जशदगंधकिद, लोहगंधकिद, पारदगंधकिद वगैरे गंधकिदें येतात आणि दुसऱ्या वर्गांत निरनिराळ्या धातूंचीं संयुक्त गंधकिदें येतात; जसें बोर्नोनाइट, शिसें, अंज आणि ताम्र यांचें संकीर्ण गंधकिद.

गंधकिद प्रथमत: ज्वालापरावर्तक भट्टींत (रेव्हर्बेंटरी फरनेस) प्राणवायुमिश्रित करण्याकरितां भाजून काढतात. या भाजण्याच्या योगानें तालाचा कांहीं भाग आणि गंधकाचा कांहीं भाग जळला जातो. आतां  निरनिराळ्या गंधकिदांवर भाजण्याचे काय काय परिणाम होतात हें पाहूं.

(१) रजतगंधकिद व पारदगंधकिदें भाजलीं असतां गंधक- द्विप्राणिद वेगळा होऊन रजत किंवा पारा मिळतो. रजताच्या बाबतींत रजतगंधकितहि मिळतें. पारा या परिस्थितींत वायुरूप होतो तेव्हां मंद उष्णमान असल्यास त्यास शीतकाच्या योगानें द्रवरूप करतात.

(२) जशद व लोह यांचीं गंधकिदें तापविलीं असतां जशदप्राणिद व लोहप्राणिद मिळतात. जशदाच्या बाबतींत प्रथमत: अनाम्ल गंधकित बनतें. हीं प्राणिदें कर्बाच्या योगानें प्राणवायुरहित करून मूळ धातू बनवितां येतो.

(३) शिसें व ताम्र यांचीं गंधकिदें तापविलीं असतां शिशाच्या गंधकिदापासून प्राणिद व गंधकित यांचें मिश्रण तयार होतें व ताम्राच्या गंधकिदापासून प्राणिद व अनाम्लिक गंधकित मिळतें. शिशाचें गंधकित रक्तोष्णतेच्या वेळीं स्थिर (स्टेबल) असतें व त्याच वेळीं ताम्राच्या गंधकितापासून प्राणिद, गंधक-द्वि- प्राणिद व प्राणवायु मिळतात. दोहोंच्याहि बाबतींत प्राणिदीकरणाची अथवा ज्वलनाची क्रिया शेवटापर्यंत नेत नाहींत. साधारण भाजल्या जाणाऱ्या पदार्थांमध्यें व तसेंच मूळ रूपांत असलेल्या गंधकिदामध्यें प्राणाशीं असणारें गंधकाचें प्रमाण प्र: गं झालें म्हणजे प्राणिदीकरणाची क्रिया बंद करून सर्व मिश्रण उच्च उष्णमानापर्यंत तापवितात म्हणजे गंधक व प्राण हे दोन्ही निघून जाऊन मूळ धातू शुद्ध स्वरूपांत मिळतात.

(४) अंजाचें गंधकिद भाजलें असतां प्राणिद व गंधकिद यांचा एक मिश्र धातु बनतो. लोहाचाहि प्रकार याप्रमाणेंच आहे. पण त्या बाबतींत जें प्राण-गंधकिद मिळतें त्याचें अधिक उष्णता देऊन लवकरच शुद्ध प्राणिद बनवितां येतें. अंजाच्या गंधकिदाशीं लोह मिश्रण करून तें द्रवरुपांत नेलें असतां लोहाचें गंधकिद बनून अंज वेगळा होतो. कारण लोहगंधकिदापेक्षां अंज बरेंच जड आहे. याच क्रियेनें शिशाच्या गंधकिदापासून शिसें वेगळें करतां येतें. पुढें कंसांत दिलेले धातू क्रमानें घेतल्यास पुढील धातूंच्या गंधकिदावर मागील धातूची क्रिया केली असतां मागील धातूचें गंधकिद बनून पुढील धातु वेगळा होतो (ताम्र, लोह, कथील, जशद, शिसें, रजत, अंज, ताल).

तालिदें:- तालसंयुक्त कच्चे धातू हे फारच थोडे असून त्यांत कोबाल्ट, निकेल हे बरेच महत्त्वाचे आहेत. ह्यांच्यापासून शुद्ध धातू काढण्याकरितां प्रथमत: कच्ची धातु भाजतात म्हणजे तालीदांचा कांहीं भाग प्राणिदांत रूपांतर होऊन जातो व कांहीं ताल तसाच उडून जातो. राहिलेला भाग संकीर्ण- अल्पमूल्यक तालिद म्हणून राहतो. ह्या राहिलेल्या भागावर कांहीं द्रव्याची क्रिया करून तो द्रव रूपांत नेतात. मँगेनीज, लोह, कोबल्ट, निकेल हे धातू सिकित रूपांत मळीमध्यें जातात व निकिल व कोबाल्ट यांचें प्राणिदें न झालेले तालिदांचे भाग ही क्रिया योग्य वेळीं थांबविली असतां तळाशीं सांपडतात, व निराळें संमिश्रक द्रव्य पुन्हां टाकलें असतां निकेल व कोबाल्ट निरनिराळे होऊन आपणांस कोबाल्टचें तालिद मिळतें.

किरकोळ प्रतिक्रिया द्रव्यें:- ज्वालेमध्यें असणाऱ्या प्राणिदीकारक अगर सोज्जीकारक (प्राणमिश्रक व प्राणहारक) द्रव्यांशिवाय इतर पुष्कळ संमिश्रक द्रव्यांचा उपयोग करतात. लोहाचा उपयोग गंधक काढण्याकरितां करतात. शिशाच्या प्राणिदाचाहि प्राणिदीकारक म्हणून बराच उपयोग केला जातो. रक्तोष्णतेच्या वेळीं जेव्हां हें प्राणिद वितळत असतें तेव्हां त्याची क्रिया सोनें व रजत खेरीज करून सर्व धातूंवर होऊन गंधक द्विप्राणिदांखेरीज त्याच्याशींच एकादें संकीर्ण प्राणिद, शिसें व शिशाचें प्राणिद कमी असल्यास तयार झालेल्या रांघ्यांत गंधकाशीं लवकर संयोग पावणारे धातू असतात.

संमिश्रक द्रव्यें:- ह्यांचा उपयोग धातु द्रवरूपांत नेण्याकरितां करतात. त्यांची निवड अशाच रीतीनें करतात कीं त्यामुळें कच्या धातूंचा वितळून लवकरच रांधा बनले. यांचे तीन प्रकार आहेत:- (१) चित्र-खनिज, (२) आम्लिक संमिश्रक द्रव्यें व (३) अनाम्लिक संमिश्रक द्रव्यें. यांपैकीं चित्र-खनिज हें सिकित किंवा खटगंधकितासारख्या पदार्थांस द्रवरूपांत नेण्यास उपयोगीं पडतें. सिंधुकर्बित किंवा पालाशकर्बित हें आनाम्लिक संमिश्रक द्रव्य असून त्याचा सिकितें द्रवरूप काचेंत नेण्याकरितां उपयोग करतात. टाकणखार हें आम्लिक द्रव्य असून अनाम्लिक प्राणिदें द्रवरूपांत नेण्यास उपयोगी पडतें.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .