प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
 
धार्मिक उत्सव- मनुष्य उत्सवप्रिय आहे. तेव्हां प्रत्येक राष्ट्रांत वर्षाच्या बहुतेक महिन्यांतून उत्सव आढळल्यास नवल नाहीं. शिवाय या उत्सवांनां धार्मिक स्वरूप दिल्याकारणानें ते बहुधां सर्वांकडून पाळले जातातच. या लेखांत निरनिराळ्या राष्ट्रांतून उत्सव कसे चालतात याची थोडक्यांत माहिती दिली आहे.

भा र ती य.- प्राचीन काळचे सर्वच हिंदूंचे उत्सव धार्मिक स्वरूपाचे होते. याचें कारण त्यांचें वाङ्मय विशेषेंकरून धर्मविषयक होतें एवढेंच नसून, प्रत्येक बाबतींत धर्माचा धागा गुंतवावयाचा ही जी प्राचीन आर्यांची मनोवृत्ति हेंहि एक महत्त्वाचें कारण आहे.

प्राचीन उत्सव:- हिंदूच्या प्राचीन उत्सवांत पौर्णिमा व दर्श हे दिवस उत्सवाचे समजले जात. पण याहिपेक्षां ‘चतुर्मासान्त’ उत्सव हा विशेष महत्त्वाचा गणला जाई. दर चार महिन्यांच्या अखेरीस हा उत्सव केला जात असे. हिंवाळा, पावसाळा व उन्हाळा संपावयाच्या दिवशीं त्या त्या ऋतूच्या देवतेनिमित्त यज्ञ करण्याची चाल असे. सोमयज्ञाचेंहि प्राचीन काळीं फार प्रस्थ होतें. या यज्ञामध्यें जे भाग घेत त्यांनां फुलांच्या माळांनीं भूषविलें जाई. नंतर रथांच्या शर्यत होत असत. मद्यपानहि यथेच्छ होत असे. अशा रीतीनें हा उत्सव मोठ्या थाटांत साजरा केला जाई. अश्वमेधज्ञय हाहि त्या काळीं फार प्रचारांत होता. या यज्ञांत राजापासून रंकापर्यंत सर्व भाग घेत असत. श्रीमंत लोक आपल्या घोड्यांनां उत्तम रीतीनें सजवीत असत. यज्ञदिनीं गाणें, संवाद, वीररसपर काव्यें गायिलीं जात असत. अयनोत्सव, व द्वदशरात्र्युत्सव हेहि महत्त्वाचे उत्सव होते. याशिवाय, हल्लीं ज्या निरनिराळ्या तीर्थांच्या ठिकाणीं प्रचंड यात्रा भरतात त्यांचें मूळ, प्राचीन काळीं दृशद्वती, सरस्वति इत्यादि पवित्र ठिकाणीं यात्रा जमल्याचे व यज्ञ केल्याचे जे उल्लेख आहेत त्यामध्यें दिसून येतें.

अर्वाचीन उत्सव:- प्राचीन उत्सवांत व अर्वाचीन उत्सवांत एक महत्त्वाचा भेद म्हटला म्हणजे हा कीं, प्राचीन उत्सवांत विधीचें स्तोम फार असे व तें अर्वाचीन उत्सवांत दिसून येत नाहीं. पूर्वीचे, ‘चतुर्मासांत’ उत्सव, ‘वर्षारंभोत्सव’ इत्यादि उत्सव हल्लीं देखील साजरे केले जातात पण त्यांत पूर्वीसारखें आचारांचें बंड नसतें. शिवाय अर्वाचीन उत्सवांनां सार्वजनिक स्वरूप प्राप्त झालेलें दिसतें, हाहि अर्वाचीन उत्सवांचा एक विशेष आहे. उत्तर हिंदुस्थानांतील महत्त्वाचे उत्सव म्हणजे, वसंतोत्सव. जगन्नाथ येथील जत्रा व प्रयाग येथील जत्रा हे होत. हे तीन्ही उत्सव फारच थाटांत होतात. दक्षिण हिंदुस्थानांत देखील पुष्कळ तीर्थांच्या ठिकाणीं यात्रा होतात. हजारो नव्हे लाखो लोक तीर्थामध्यें स्नान करून पावन होतात. दक्षिणेकडे वसंतोत्सव साजरा करण्यांत येतो त्यामध्ये कामचेष्टांनां पूर येतो. बंगालमधील दुर्गोत्सवांतहि असाच प्रकार आढळतो. होलिकोत्सव तर अभद्र गोष्टींचें माहेरघरच आहे असें म्हटल्यास हरकत नाहीं.

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुनी अमावास्येपर्यंतच्या उभ्या वर्षांतील उत्सवांची मोजदाद केल्यास ते पुष्कळच भरतील. पण त्यांतल्या त्यांत महत्त्वाचे उत्सव जे असतील तेवढेच पहाणें भाग आहे. चैत्रप्रतिपदा हा वर्षारंभाचा दिवस म्हणून फार पवित्र मानला जातो. संक्रांतीचा सण सर्व हिंदुस्थानांत पाळला जातो. या दिवशीं प्रयाग येथें स्नानाला असंख्य लोक जातात. याच दिवशीं दक्षिणेकडे ‘पोंगल’ नांवाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशीं उन्हांत अग्नीवर दुधानें भरलेलें मडकें ठेऊन तें दूध कोणत्या दिशेनें उतूं जातें हें पाहून त्यावरून पुढील वर्षाचें भविष्य वर्तविण्याचां वहिवाट आहे. हा मोठ्या आनंदाचा सण आहे. याशिवाय रामनवमी, गोकुळअष्टमी, नागपंचमी, गणेशचतुर्थी, विजयादशमी इत्यादि उत्सव अत्यंत थाटानें होतात. दीपोत्सव तर मौजेचें आगरच होय. या उत्सवांत प्रत्येक जण आपापल्या योग्यतेप्रमाणें नटत थटत असतो. जिकडे तिकडे दीपमाला लावण्यांत येतात. कांहीं ठिकाणीं देवतांच्या मिरवणुकी निघतात. संगीत, नाच, वाद्यवादन इत्यादि करमणुकीनें हा दीपोत्सव साजरा केला जातो.

वर जे उत्सव सांगितले ते विशेष महत्त्वाचे व अखिल हिंदुस्थानांत पाळले जाणारे तेवढेच सांगितले पण निरनिराळ्या प्रांतांत, निरनिराळे उत्सव साजरे केले जातात त्यांकडेहि दुर्लक्ष करून चालावयाचें नाहीं. विशेषत: मुंबई इलाख्यांत ‘पंढरपूरची यात्रा’ अत्यंत महत्त्वाची आहे. या यात्रेला लाखो लोक जमतात. विठोबाचें भजन करण्यांत, चंद्रभागेचें स्नान करण्यांत अत्यंत पुण्य आहे अशी या लाखों लोकांची मसजूत असते. पुष्कळ ठिकाणीं स्थानिक उत्सव मोठ्या थाटानें पाळले जातात. अशा तऱ्हेच्या चैत्रांतील व नवरात्रांतील देवींच्या यात्रा, बालाजीच्या यात्रा, निर्मळ वगैरे ठिकाणच्या पुण्यपुरुषांच्या समाधीच्या ठिकाणच्या यात्रा हेहि उत्सव होत. कांहीं उत्सवांत धार्मिक स्वरूप प्रामुख्यानें दिसत नाहीं. महाभारतांत अशा उत्सवांचे उल्लेख आढळतात. त्यांतल्या त्यांत, अशा प्रकारच्या उत्सवांचें ढळढळींत उदाहरण म्हणजे पूर्वीचा ‘स्वयंवर’ उत्सव होय. या स्वयंवराच्या वेळीं निरनिराळ्या देशांचे राजे मोठ्या थाटानें नटून सजून स्वयंवराच्या जागीं येतात. त्यांपैकीं जो आवडेल त्याला राजकन्या माळ घालते व त्याच्याशीं तिचा विवाह होतो. याशिवाय हत्तींच्या लढाया (साठमारी) वगैरे उत्सव हेहि धार्मिक स्वरूपाच्या उत्सवांत पडत नाहींत.

[संदर्भग्रंथ- नटेशशास्त्री-हिंदू फीस्ट्स, फास्ट्स अँड सेरीमनीज, मद्रा, १९०३; वुइल्सन-सीलेक्ट वर्क्स, भाग २,लंड..१८६२; मॉनीअर वुइल्यम्स-मॉर्डन हिंदुइझम. लंडन १८७७.]

बौद्ध.- बौद्धांच्या धर्मग्रंथांतून खालील उत्सवांचा नामनिर्देश करण्यांत येतो:-

(१) उपोसथ:- उपोसथ उत्सवांचें मूळ वैदिक चालीरीतींत आढळतें. दर महिन्याच्या पौर्णिमेला व अमावस्येला प्राचीन वैदिक लोक विशेष पवित्र मानीत. हीच चाल बौद्धांनींहि चालू केली. प्रथम प्रथम हे दोनच दिवस उपोसथांचे दिवस मानले जात पण पुढें दोन्ही पक्षांतील अष्टम्या यादेखील या उपोसथोत्सवांत मोडल्या गेल्या व अशा रीतीनें उपोसथांचे दिवस चार झाले. या चार दिवशीं बौद्ध भिक्षू एके ठिकाणीं जमून लोकांनां आपल्या धर्माचा उपदेश करीत असत. या दिवशीं बौद्धधर्मीय लोक उपवास करीत, शुभ्रवस्त्रें परिधान करीत व या चार दिवशीं पाठशाळांनां सुट्टी असे. या दिवसांमध्ये अहिंसा पाळणें, अदत्त ग्रहण न करणें, असत्य न बोलणें, मद्यपान न करणें, धर्माविरुद्ध कामाचें सेवन न करणें, वाईट फळें न खाणें; सुगंधी तेलें वगैर न लावणें चटयावर न निजणें, इत्याद धार्मिक सूत्रांत सांगितलेल्या आज्ञा पाळाव्या लागत.

(२) वस्म:- वर्षांतून आठ महिने बुद्ध हा नेहमीं धर्मोपदेशासाठीं प्रचार करीत असे; व पावसाळ्याने चार महिने तो एकाच ठिकाणीं रहात असे. पावसाळ्यांत बाहेर पडल्यास, भिक्षूंच्या हातून न कळत कां होईना पण अनेक लहान लहान जीव मरत असत, देशांतून जात असतांना लहान लहान वनस्पती चुरडल्या जात व त्यामुळें अहिंसातत्त्वाला बाध येत असे. ही आपत्ति टाळण्याकरितां बुद्धानें असा नियम घालून दिला कीं पावसाळ्यामध्ये बुद्धभिक्षूंनीं पर्यटण करूं नये. आपल्या विहारांतच राहून आपले धार्मिक विधि, धर्मपठण इत्यादि गोष्टी कराव्यात.

(३) पवारणा:- वस्सकालाच्या अखेरच्या दिवशीं ‘पवारणा’ दिन साजरा केला जात असे. या दिवशीं सर्व भिक्षूंनीं एकत्र जमून वस्स कालांत प्रत्येकानें आपण काय पाहिलें, काय वाचलें व आपल्या काय शंका आहेत, याचा पाढा इतर भिक्षूंपुढें वाचावयाच असे; व नंतर प्रत्येकाच्य वर्तनासंबंधी ज्याला कांहीं बोलावयाचें असेल अगर सुचवयाचें असेल त्याला तसें करण्याची मुभा असे सर्व भिक्षू आपापल्यामध्ये गुण्यागोविंदानें रहातात अगर नाहीं हें यावेळीं सहज दिसून येत असे व त्याचसाठीं बुद्धानें हा दिवस पाळण्याची आज्ञा घातलेली होती.

(४) कठिण:- पवारणेनंतर लगेच ‘कठिण’ नांवाच्या उत्सवाला आरंभ होई. या दिवशीं संघाच्या भिक्षूंनां गृहस्थाश्रमी लोक भिक्षूंनां लागणारीं वस्त्रें दान करीत असते. यासंबंधींचे सर्व आचार महावग्गाच्या सातव्या खंडकांत सविस्तरपणें पहावयास मिळतात.

(५) ऋतू:- वर्षांतून तीन ऋतूंच्या प्रारंभीं तीन यज्ञोत्सव करण्याची बुद्धपूर्व भारतवर्षाची चाल असे. तीच पुढें बुद्धानें चालू ठेवली. फक्त यज्ञांत हिंसा मात्र करावयाच नाहीं एवढा त्यानें फरक केला. पहिल्या ऋतूमध्यें वृक्षांच्या खाली राहून भक्तीपूर्ण मनन करावयाचें. दुसऱ्या ऋतूकालामध्ये वस्त पाळावयाचा व तिसऱ्या कालां पप्णशाला बांधून, अध्ययन व अध्यापन करावयाचें अशी बुद्धानें वहिवाट पाडली.

(६) संगीतें:- या उत्सवात सर्व धर्मगुरूंनीं व भिक्षूंनीं एकत्र जमून धर्मग्रंथाचें तालस्वरयुक्त पठण करावयाचें असे.

[संदर्भग्रंथ:-कर्न-मॅन्यूअल ऑफ इंडियन बुद्धिझम, १८९६; क्लौ-कर्मवाक्य दि रिच्युअल ऑफ दि बुद्धिस्ट प्रीस्टहुड; धम्मिक सुत्त; महावाग.]

जै न– जैनांमधील अतिशय महत्त्वाचा उत्सव म्हणजे ‘पज्जूसन’चा उत्सव होय. हा उत्सव श्रावणाच्या शेवटच्या दिवसांत व भाद्रपदाच्या प्रारंभीच्या दिवसांत पाळला जातो. या उत्सवांत दिगंबर, श्वेतांबर इत्यादि जातींचे लोक उपासरा अगर मठ यांमध्ये प्रार्थना करतात. कल्पसूत्रांची मिरवणूक काढतात पर्यूषणाच्या शेवटचा दिवस संवत्सरी हा असून या दिवशीं सर्व जैन कडकडीत उपोषण करतात. संध्याकाळीं नटूनथटून देवदर्शनाला जाण्याचीहि वहिवाट आहे. पज्जूसनाच्या चवथ्या दिवशीं जैनगुरू महावीराची जयंतीहि थाटानें पाळण्यांत येते. इतर तीर्थकराच्याहि जयंत्यापाळल्या जातात. पज्जुसनोत्सवाच्या खालोखाल, जैनांचा दुसरा महत्त्वाचा उत्सव म्हणजे दीपोत्सव होय. जैन लोक साधारणत: व्यापारी असल्यानें दीपोत्सवाचा सण ते फारच थाटानें पार पाडतात यांत नवल नाहीं. याशिवाय सिद्धिचक्रोत्सव, ऋतूत्सव, ज्ञानपंचमीचा उत्सव, मौंग्यारसोत्सव, आम्बेलोत्सव, गोमातेश्वरस्नानयात्रा इत्यादि उत्सव जैनलोकांत साजरे करण्यांत येतात. [संदर्भग्रंथ:-मार्गारेटस्टीव्हन्सननोट्स ऑन मॉडर्न जैनिझम, लंडन १९१०.]

ति बे ट.- हिंदू व बौद्ध लोकांतील उत्सवांप्रमाणेंच तिबेटमधील लोकांचें उत्सव मुख्य: धार्मिक स्वरूपाचे असतात. तिबेटमधील उत्सवांचे सामान्यत: दोन भाग पडतात. (१) बॉन लोकांचे उत्सव, व (२) बुद्धधर्मीयांचे उत्सव. बॉन लोक हे तिबेटांतील मूळचे रहिवाशी होत. यांच्यामधील उत्सव मुख्यत: सृष्टिविषयक असतात. उदाहरणार्थ, अयनांच्या आरंभींचे उत्सव, अगर निरनिराळ्या ऋतूंच्या आरंभीचे उत्सव, याशिवाय पैतृक उत्सवांचेंहि माहात्म्य यालोकांत आढळतें. बौद्धधर्मीयांच्या उत्सवांत बुद्धाच्या चरित्रांतील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींच्या स्मृत्यर्थ होणारे उत्सव त्याचप्रमाणें, लाभाधर्माचा संस्थापक पद्मसंभव व साँगखप नांवाच्या लाभाधर्मामध्यें नवीन सुधारणा घडवून आणणारा धर्मगुरू यांच्याहि आयुष्यांतील स्मरणी गोष्टींचा स्मृत्यर्थ होणारे उत्सव यांचा समावेश होतो. या उत्सवांमध्यें लोक आपलीं पोटाचीं कामें बंद ठेवून, हे उत्सवाचे दिवस, मौजेंत, धर्मपठणांत, देवालयांत जाण्यांत घालवितात. धर्मगुरू कडकडीत उपास करून हा काळ धर्मपठणांत खर्च करतात. प्रत्येक महिन्यांत साधारणत: एखादा तरी उत्सव तिबेटी लोकांत आढळून येतोच. लोगसर, मॉनलम, वज्र, कालचक्र, परिनिर्वाण, पद्मसंभवजन्मोत्सव, हे महत्त्वाचे उत्सव होत.

[संदर्भग्रंथ- वॅडेल-बुद्धिझम ऑफ तिबेट, लंडन १८९५; कवागुची- थ्री ईयर्स इन तिबेट, लंडन १९०९.]

ने पा ळ.- नेपाळांमधील उत्सवांत, हिंदु आणि बौद्ध धर्मांचें मिश्रण झालेलें आढळून येतें. निवार अगर राष्ट्री उत्सवांचें प्रस्थ, गुरखे लोकांच्या सत्तेखालीं पुष्कळ कमी झालें असलें तरी अद्यापीहि पुष्कळच उत्सव दरवर्षी साजरे केले जातात. या नेपाळी लोकांच्या उत्सवांत धर्मविधीपेक्षां, मौज व करमणुकीचेंच प्राबल्य दिसून येतें. भैरव जत्रा, गाइजत्रा, बन्ऱ्हाजत्रा, इंद्रजत्रा, स्वयंभूमला, शिवरात्रि, छोटी व मोठी मच्छेंद्रजत्रा, नेतदेविरजत्रा व नारायणोत्सव इत्यादि नेपाळांतील प्रमुख उत्सव होत. [संदर्भग्रंथ- ओल्डफील्ड- स्केचेस फ्रॉम नेपाल, लंडन १८८०; मॉनीयर वुइल्यम्स- बुद्धिझम १८८९.]

स या म.- सयाममध्यें फार प्राचीन काळापासून, ब्राह्मणधर्म व बौद्धधर्म हे एकत्र व एकोप्यानें नांदत होते. सयामचे राजे मुख्यत; जरी शिवभक्त होते तरी त्यांनीं, बौद्धधर्माची हेटाळणी कधींच केली नाहीं. अर्थांतच सयाममध्यें ब्राह्मणी उत्सव व बौद्धधर्मीयांचे उत्सव असे दोन प्रकार आढळतात. व दोन्हीं प्रकारचे उत्सव पुष्कळ काळ सयामांत होत असल्यानें या दोन्ही प्रकारच्या उत्सवांची छाप परस्परांवर पडली असल्यास नवल नाहीं. विशेषत: सतराव्या शतकांत, साँगथाम आणि माँगकटसारखे बौद्धधर्मीय राजे सयामच्या गादीवर बसले त्यावेळीं, तर या दोन्ही प्रकारच्या उत्सवांमध्यें बरीच भेसळ झालीं. सयमामध्यें उत्सवांचें प्राबल्य फार दिसून येतें. प्रत्येक महिन्यांत कोणतानाकोणता तरी उत्सव असतोच. संवत्सरछिंद, गजेन्द्राश्वसान, थूनम, सोंक्रण (संक्राति), विशाखपूजा, तुलाभार, वरुणसत्र, सात (शारदीयोत्सव) दीपोत्सव, कार्तिकेयोत्सव, पतंगोत्सव; दोलोत्सव, धान्यदाहोत्सव, शिवरात्रि, माघपूजा इत्यादि प्रमुख उत्सव होत.

ची न.- ‘सिंगक्की’ अगर धर्मगुरूंनीं पाळावयाचे नियम या ग्रंथामध्यें, चीनमधील लोकांत पाळल्या जाणाऱ्या उत्सवांची माहिती आहे. चीनमधील उत्सवांचे चार प्रकार पडतात. (१) राष्ट्रीय, (२) देवतोत्सव, (३) बुद्ध अगर बोधिसत्व यासंबंधींचेव (४) चीनमधील धर्मविषयक.

(१) राष्ट्रीय उत्सव:- शेंगसी अगर बादशहाचा जन्मदिनोत्सव; राणीचा जन्मदिनोत्सव; पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी (दोन्ही पक्षांतील) असे महिन्यांतील चार दिवसांनिमित्त उत्सव. या चतुर्दिनोत्सावाला किनमिंग शिचई असें नांव आहे.

(२) देवतोत्सव:- या उत्सत्वांची माहिती, किन क्कांग मिंगकिंग या धर्मसूत्रांत मिळते. देवपूजोत्सव, चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाच्या वेळीं प्रार्थना करण्याचा उत्सव, बुद्धधर्मपालक वीटूचा उत्सव, वीटूचा जन्मदिनोत्सव, बाक्कांग, लंग क्कांग, क्कांग ति इत्यादि देवतोत्सव हे प्रमुख होत.

(३) बुद्ध व बोधिसत्त्व यासंबंधींचे उत्सव:- मिलिफो (मैत्रेय बुद्धाचा जन्मदिनोत्सव,) शावन्य मुनीचे परिनिर्वाण, क्कानशियिन पुसा अगर अवलोकितेश्वराचा जन्मदिनोत्सव, शाक्यमुनीचा जन्मदिनोत्सव, भैषज्यगुरुबुद्धोत्सव, ओमीटूफोचा जन्मोत्सव, इत्यादि.

(४) चीनमधील बौद्धधर्मांतील इतिहासप्रसिद्ध व्यक्तींचे उत्सव:- पोचंग,बीयून,ताऊसीयून,बोधिधर्म, हैनशेन, चिकइ या व्यक्तींच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे उत्सव; याशिवाय निरनिराळ ऋतु सुरू होण्याच्या प्रारंभींच्या दिवसांचा उत्सव, वर्षारंभोत्सव इत्यादीहि उत्सव करण्यांत येतात.


[संदर्भग्रंथ:- आयटेल-हँडबुक फॉर दि स्टूडंट ऑफ चायनीज बुद्धिझम, लंडन १८७०; बील- बुद्धिझम इन चायना.]

ज पा न.- जपानी लोकांच्या उत्सवांत चीनांतील उत्सवापेक्षां अधिक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालें आहे. जपान मधील राष्ट्रीय उत्सव मुख्यत: दहा आहेत. त्यांचीं नावें.- शिहोआइ (जानेवारी ता. १); गेंजीसाई (जानेवारी ता. ३); कोमीटेन्नोसाई (जानेवारी ता. ३०); किजेनसेत्सु (फेब्रुवारी ता. ११); शंकीकोरीसाई (मार्च ता. २१);जिम्मूटेनोसाई (एप्रील ता. ३); शकी कोरीसाइ (सप्टेंबर ता. २४); कन्नामेसाइ (आक्टोबर ता. १७); टेंचोसेत्सु (नोव्हेंबर ता. ३); नीनामेसाइ (नोव्हें. ता. २३). याशिवाय गोसेकु अगर पांच उत्सव म्हणून प्रसिद्ध उत्सव आहेत तेहि जपानी लोक थाटानें साजरे करतात. हे उत्सव ह्मणजे शोगत्सुनो सेकू, जोमीनोसेकू नोबोरीनोसेकू, चोयोनोसेकू, तनबरनोसेकू, हे होत.

[संदर्भग्रंथ:- चेंबर्लेन- थिंग्स जॉपनीज (लंडन १९०५); हर्न ग्लिंप्सेस ऑफ दि अनुफमीलियर जपान (बोस्टन १८९४); हचिहामा- सुपरस्टिशस जपान.]

इराणी लोक.- इराणी लोकांच्या उत्सवाची माहिती त्यांच्या धर्मग्रंथांतून फारशी आढळत नाहीं. पर्शु-अरेबिक वाङ्मयापासूनच ती आपल्याला उपलब्ध होते. अलबेरूणी यानें इराणी उत्सवासंबंधीं बरीच माहिति आपल्या ग्रंथांत ग्रथित केली आहे व ती फारच उपयुक्त आहे.

इराणी लोकांचे दोन महत्त्वाचे उत्सव म्हटले म्हणजे, नौरूझ व मिर्हजान हे होत. या उत्सवांत राजापासून रंकापर्यंत सर्व लोक उत्साहानें भाग घेतात. हे दोन्ही उत्सव सहा दिवसांचे असतात. याशिवाय दुसरे उत्सव म्हटले म्हणजे झमझमह (फ्रबर्टिनचा १७वा दिवस), कस्न इनिलूफर, सतवैरो (हेमंतोत्सव); कुसहबर्निशिन; झरथुष्ट्राच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव; बर्सादहक; मॅगोफोनिया; इत्यादि होत.

[संदर्भग्रंथ- कराका-हिस्ट्री ऑफ दि पारशीज (लंडन १८८४); पेरॉन- झेंड अवेस्ता, पॅरिस १७७१; अल्बेरूणी-क्रॉनॉलजी ऑफ एन्शंट नेशन्स, लंडन १८७९.]

ई जि प्शि य न.- ईजिप्तमधील लोकांमध्यें उत्सवांची चंगळ आहे. स्थानिक, प्रांतिक, राष्ट्रीय इत्यादि उत्सवांची जर आपण मोजदाद केली तर जवळ जवळ ईजिप्तमधील उत्सवांची संख्या १५०० वर जाईल. स्थानिक देवतांचे, ऋतूंचे, नद्यांचे, इत्यादि सर्व प्रकारचे उत्सव ईजिप्तमध्यें साजरे केले जातात. उत्सवांच्या लढायांचे दिवस उत्सवांप्रमाणें पाळले जातात. प्तहसोकरसंबंधीं व ऑसीरीस देवतेसंबंधीं उत्सव राष्ट्रीय स्वरूपाचे आहेत. राजघराण्यांतील पुरुषांच्या अगर स्त्रियांच्या चरित्रांतील महत्त्वाच्या गोष्टींच्या स्मरणार्थ उत्सव केले जातात. यासंबंधींची विशेष माहिती 'ईजिप्त' या लेखांत पहावीं.

[संदर्भग्रथ:- ब्रेस्टेड-एन्शंट रेकार्डस ऑफ ईजिप्त, शिकॅगो, १९०६-०७;विल्किन्सन-मॅनर्स, अँड कस्टम्स्, १८७८.]

मुसुलमानी.- मुसुलमानांचा सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे अल्ईद अल् कगीर हा होय. धूल हिज्जच्या दहाव्या दिवसापासून तों तेराव्या दिवसापर्यंत हा पाळला जातो. या दिवशीं प्राण्यांची बरीच हिंसा केली जाते. रमजानच्या महिना उपवासाचा पाळल्यानंतर त्या महिन्यानंतरचे तीन दिवस फार थाटानें पाळले जातात. याशिवाय लैलत अल् कद हा उत्सवहि प्रसिद्ध आहे. मोहरमचे सहा दिवसहि पवित्र मानले गेल्यामुळें ते मोठ्या उत्साहानें पाळले जातात. याशिवाय महमंदाचा जन्म व मृत्यूचा, हसनहुसेनचे जन्म व मृत्यू यांसंबधींचे उत्सवहि साजरे केले जातात.

[संदर्भग्रंथ:-  सेलस- फेथ ऑफ इस्लाम, लंडन १८९६; एनसायक्कोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स.]

ग्री. क.- ग्रीकांच्या उत्सवांचे तीन भाग स्थूलमानानें पडतात. (१) कृषिकर्मविषयक उत्सव; उदाहरणार्थ थेस्मोफोरिया, स्किरोफोरिया कार्मिया, थर्गेलिया इत्यादि. लेनैया व डायोनिशिया हे उत्सव फारच महत्त्वाचे असून, या उत्सवांच्या वेळीं मिरवणुकी, खेळ, नाटकें वगैरे केलीं जात असत. (२) राष्ट्रीय अगर ऐतिहासिक प्रकारचे उत्सव ग्रीक लोकांत फार आहेत. पनथेनैयाचा उत्सव फार महत्त्वाचा आहे. आलिंपिक उत्सव तर अतिशय थाटांत होत असे. डेल्फाय येथील अपोलो देवतेचा उत्सव दर नऊ वर्षांनीं एकदां होत असून त्यावेळीं ग्रीसमधील सर्व लोक एकत्र जमत असत. (३) इतिहासप्रसिद्ध व्यक्तींचें उत्सव व गूढशक्तींचे उत्सव; उदाहरणार्थ, अगॅमेम्नानचा उत्सव, इत्यादि.

[संदर्भग्रंथ:गार्डनर-ग्रीक अथ्लेटिक फेस्टिव्हल्स (लंडन १८१०); फार्नेल-कल्ट्स ऑफ ग्रीक स्टटेस १८९६.]

ख्रि स्ती.- ख्रिस्ती लोकांमध्यें उत्सव पुष्कळ असून ते महत्त्वाचेहि आहेत. ईस्टरसारखे जे उत्सव अतिशय महत्त्वाचे आहेत ते त्या त्या नांवाखाली स्वतंत्र रीतीनें दिले आहेत. यांखेरीज जे इतर उत्सव आहेत, ते म्हणजे लेंट, होली वीक, असेन्शन डे. ट्रॅन्सफिग्यूरेशन ऑफ अवर लॉर्ड, पेटेंकॉस्ट, ट्रिनिटी संडे, कॉर्पस ख्रिस्टी, अडव्हेंट, सेंटजॉन दिबॉप्टिस्टचा उत्सव, सेंट मायकेलचा उत्सव, इत्यादि होत.

[संदर्भग्रंथ.- डॉउडन- चर्च ईयर अँड कॅलेंडर, केंब्रिज १९१०; नीले-हिस्ट्री ऑफ दि होली ईस्टर्न चर्च, लंडन १८५०.]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .