प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
 
धेड- गुजराथ राजपुताना, काठेवाड व कच्छ या प्रांतांत मुख्यत: हे लोक आहेत. लोकसंख्या (१९११) ११८५१८. यांत महार जातीचा समावेश होत नाहीं; ते स्वतंत्र धरले आहेत. धेड हे आपण क्षत्रिय कुलांतील आहोंत असें म्हणतात. परंतु कराचीकडील धेड आह्मी रजपूत आहोंत असें सांगतात. महारमांगांप्रमाणेंच या लोकांचा समाज मूळच्या अनार्य जातीचा असावा. हे इतर जातींतील लोक आपल्या जातींत घेतात. जाडें भरडें कापड विणणें व ओझीं वहाणें हे त्यांचे मूळचे धंदे होते. कधीं कधीं हे वाटाड्यांचा धंदा करीत. यांचे चवदा पोटवर्ग असून एका पोटभांगांतील लोक दुसऱ्या पोटभागांतील लोकांशीं विवाहसंबंध करीत नाहींत. यांचीं पुष्कळ कुळें असून मातंग कुळांतील लोक सर्वांत श्रेष्ठ समजले जातात. विवाह बहुधां प्रौढपणीं होतात. लग्नापूर्वी २।३ वर्षें मागणी घालून वर निश्चित ठरवितात. वर हा वधूच्या घरीं लग्नास जातो तेव्हां त्याचे आईबाप त्याच्या बरोबर नसतात. मित्रमंडळीनें लग्न लावावयाचें असतें. लग्नविधि गारुड्यांच्या विधीप्रमाणें व गारुड्यांकडून होतात. वधूवरानीं दिव्याभोंवती प्रदक्षिणा करणें हा मुख्य विधि होय. पुनर्विवाहाची चाल यांच्यांत रूढ आहे. विधवेस धाकट्या दिराशींहि लग्न लावितां येतें. हे लोक मांसाहारी असून मेलेल्या गाई-म्हशींचेंहि मांस हे खातात. कोळी, पारधी, भंगी या लोकांच्या हातचें अन्न खात नाहींत. तरी हे मुसुलमान हजामांखेरीज सर्व मुसुलमानांच्या हातचें अन्न स्वीकारतात. यांच्या देवता मुख्यत्वेंकरून गणपति, माता, मारुति व नरसिंह ह्या असून यांचे उपाध्ये गारूड (गारुडी?) असतात. कच्छांतील मघवाल नांवाचे ब्राह्मण या लोकांच्या हातचें जेवण जेवतात व कधीं कधीं त्यांच्यांशी विवाहसंबंधहि जोडतात. सुरत जिल्ह्यांत या लोकांची मोठी ज्ञातिपंचायत आहे. घटस्फोटाबद्दल व एखाद्या स्त्रीला पळवून नेण्याबद्दल ५१ रुपये दंड केला जातो इतर अपराधाबद्दल २५ रुपयेपर्यंत दंड केला जातो. इतरत्र असलेल्या सर्व पंचायतींचा एकमेकांशीं संबंध असून एका पंचायतीचा निकाल सर्व पंचायतींनां मान्य करावा लागतो. अहमदाबादमधील धेडांची अशीच एक मध्यवर्ती पंचायत आहे. कच्छप्रांतांतील धेडांमध्यें खास पंचायती नाहींत, म्हणून तंटयाचा निकाल दोन्ही पक्षांचे सारखे प्रतिनिधी नेमून दिला जातो. माहेश्री, मारवाडी व कच्छांतील गोरजा मघवाल लोकांनां सरकारला कांहीं दंड व दंडाच्या उत्पन्नाचा कांहीं भाग द्यावा लागतो. काठेवाड व सिंधू प्रांतातहि पंचायतीं आहेत. [मुंबई से. रि. १९११]

गुजराथेंतील डोंगराळ प्रदेशांतील धरद लोक व दक्षिण कानडा प्रांतांतील दाएर्द लोक यांचें व धेडांचें पुष्कळ बाबतींत साम्य दिसून येते. राजपुतान्यांतील धेड आपल्याविषयीं असें सांगतात कीं, आपण मूळचे क्षत्रिय असून परशुरामानें क्षत्रियांचा जो नि:पात केला तो चुकविण्यासाठीं, आह्मी कनिष्ठ वर्गांतील आहोंत असें त्याला सांगितलें व त्यामुळें कनिष्ठ वर्गांत मिसळलों गेलों त्यांच्यांत असलेल्या चावड, चासिया, चोहान वगैरे उपनांवांवरून ते अंशत: रजपूत बीजाचे असावेत असें दिसतें.

गु ज रा थी धे ड.- गुजराथेंत मारवाडांतून आलेले कांहीं मारवाडी अगर मारुधेड व कोंकण आणि दक्षिणेंतून आलेले कांही महार धेड आहेत. धेडांत उपनांवावरून पडणाऱ्या पोटवर्गांशिवाय इतरहि पुष्कळ पोटवर्ग आहेत. अगदीं प्राचीन पोटवर्ग म्हटले म्हणजे चासिया आणि कुसिया हें होत. यांच्यांत मारुशिवायकरून आणखी दहा पोटवर्ग असून त्यांनां धंद्यावरून अगर स्थलांवरून निरनिराळीं नांवें पडलीं आहेत. मारवाडी धेड इतर सर्व वर्गांशी रोटीव्यवहार करीत नाहींत व गुजर धेड फक्त महार धेडांशीं रोटीव्यवहार करीत नाहींत. मारवाडी आणि सुरती धेडांनां एक प्रकारचा विशेष मान असतो. मारवाडी धेड इतरांशीं न मिसळतां उंट हांकण्याचें काम करून पोट भरतात. सुरती धेड हे पार्शी व यूरोपियन लोकांशीं शरीरसंबंध केल्यामुळें दिवसेंदिवस गोरे होत चालले आहेत (बॉम्बे ग्याझे. पु. ९. भा. १. पृ. ३३९). ते यूरोपियन आणि पार्शी लोकांच्या घरीं आचाऱ्याचें, चपऱ्याश्याचें व मोत्तद्दाराचें काम करतात. कांहीं धेड स्त्रिया सुस्वरूप व देखण्या असतात. धेडांची भाषा अशुद्ध गुजराथी आहेत. धेड हलकीं धान्यें, मांस (आपोआप मेलेल्या जनावरांचें मांसहि) खातात. ते अफू खातात व दारू पितात. यांचा पोषाख अगदीं भिकार असतो. सुखवस्तु धेड लोकांचा पोषाख चांगला असतो. स्त्रिया गळ्यांत ‘किडिया’ म्हणजे कांचेच्या मण्यांच्या माळा घालतात, नाकांत कांचेच्या म्होरण्या घालतात, व हातांत हस्तिदंती बांगड्या व पायांत चांदीचे वाळे घालतात. अहमदाबाद व खेडा या जिल्ह्यांतील धेड लोक खासगी नोकर आहेत. त्यांनां चांभारांपेक्षा अधिक मान असून मेलेली जनावरें ओढून नेण्याशिवाय कोणतींहि इतर हलकीं कामें ते करीत नाहींत पूर्वी ते कापूस पिंजून खादी विणीत असत व सरकारी खजिन्याची ने आण करीत. परंतु सांप्रत गिरण्यांमुळें त्यांचा ग्वादीचा धंदा बसला व ते मजुरी करू लागले.

गुजराथेंत जमीनदारी किंवा शेतकरी आणि धेड कुटुंब यांतील संबंध धनी आणि गुलाम यांसारखा असतो. जमीनदार मेल्यावर त्याच्या जमिनीबरोबर त्याच्या धेडांचीहि वांटणी होते. कुणबी व धेड लोक लेव आणि देव या दोघां भावांचे वंशज आहेत अशीं दंतकथा आहे. धेड लोक फार उद्धट असतात. उत्तर गुजराथेंत भंगी लोकांपेक्षां धेडांविषयीं फार तिटकारा आहे. तिकडे पूर्वी थुंकण्यासाठी धेडांनां गळ्यांत मडकीं बांधावीं लागत व आपलीं रस्त्यांत उमटलेलीं पावलें पुसून टाकण्यासाठीं हातांत झाडाच्या डहाळ्या न्याव्य लागत.

रस्ते झाडणें वगैरे कामें धेडच करतात. याबद्दल त्यांनां इनामी जमीन असून मोठमोठ्या शहरांतून धेड लोक शौचकूप झाडण्याचेंहि काम करतात. बहुतेक धेड लोक बीजमार्गी कंबीरपंथी व रामानंदी असून, कांहीं हरिबावाचे अनुयायी व स्वामीनारायणपंथी आहेत. त्यांचीं कुलदैवतें नाहींत. त्यांची देवळें गांवाबाहेर असतात. शकून, जारणमारण व चेटूक यांवर त्यांचा विश्वास आहे. धेड लोक आपले उपाध्याय जे गारुड त्यांनां अत्यंत मान देतात. त्यांच्यांत खिमो व शिवो हे साधू होऊन गेले. मुलाचें नांव पांचव्या दिवशीं ठेवतात. धेड लोक अलीकडे शिक्षण संपादन करू लागले आहेत. या गुजराथी धेडांप्रमाणेंच इतर भागांतील धेडांची बहुतेक स्थिति आहे व हल्लीं हे झपाट्यानें सुधारत आहेत. [बाँबे ग्याझेटियर पु. ९ भा. १; सेन्सस ऑफ इंडिया, १९११, पु. ७; अलोनी..लग्नविधि व सोहळे.]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .