प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ

ध्रागध्रा, संस्थान.- मुंबई. काठेवाड पोलिटिकल एजन्सीमधील एक संस्थान. क्षेत्रफळ ११६७ चौरस मैल. उ. अ. २३ १३' व २३ ३३' ते पू. रे. ७१ ४८' व ७१. हा प्रदेश पहाडी व खडकाळ आहे. ह्या संस्थानांत हलवद व मानसर येथें विस्तीर्ण तलाव आहेत: शिवाय लहान तलाव पुष्कळ आहेत. हवा उष्ण पण प्रकृतीला सुखकारक आहे. पाऊस २४ इंच पडलो. कच्छच्या रणाचा कांहीं भाग या संस्थानांत येतो. त्या किनाऱ्यावर २० फुटांवर पाणी लागतें.

ध्रांगध्राचा राजा झाला. रजपूत जातीचा असून, त्या जातीचा मुख्य आहे. झालाचें प्राचीन नांव मकवान होतें. हे लोक उत्तरेकडून काठेवाडांत आले, व पहिल्यानें अमदाबाद जिल्ह्याच्या विरमगांव तालुक्यांत पाथ्री येथें वस्तीस राहिले व नंतर हलवद व ध्रांगध्रा येथें गेले. ईशान्येकडे व उत्तरेकडे जाण्याचा मार्ग या भागांतून असल्यानें मुसुलमानांच्या स्वाऱ्यांचा येथील राजांनां फार त्रास पोहोंचे. गुजराथमधील मुसुलमान राजांनीं येथील बराच भाग जिंकिला होता. पुढें औरंगझेबानें हलवदचा विभाग (ह्यास महंमद नगर म्हणत असत) तेथील आसपासच्य मिठागरांसह झाला वंशांतील राजास परत जहागीर म्हणून देण्यांत आला. लिमडी, वढवान, चुडा, सायल व ठान लखतर हीं छोटीं संस्थानें ह्याच ध्रांगध्रा संस्थानाच्या शाखा होत. ध्रांगध्रांच्या राजाची व इंग्रजांचीं दोस्ती इ. स. १८०७ मध्यें झाली. संस्थानिकास राजा हा किताब व दत्तक घेण्याचा हक्क आहे.लोकसंख्या (१९२१) ८८४०६. यांत २ गांवें असून १३२ खेडीं आहेत. ध्रांगध्रा हा राजधानीचा गांव आहे. यांत जंगल नाहीं. बामभान, चंद्रभाग, विलगंगा व फालुक या नद्या आहेत. हत्ती, उंट वगैरे पाळीव व डुकरें, चित्ते, काळवीट, नीलगाय हे रानटी पशू आहेत. स. १८४०च्या पूर्वी सिंह आढळत असे. येथील ब्राह्मण शेतीहि करतात. मुसुलमान कापड विणतात व तेल काढतात. ध्रांगध्रा, हलवद व सीथा या मुख्य व्यापाराच्या उतारपेठा आहेत. पिकाऊ जमीन हलक्या प्रतीची रेताड आहे. लागवडीं आणलेली जमीन २०६ चौरस मैल असून मुख्य पिकें कापूस व सामान्य प्रकारचें धान्य. येथील कापूस लांब धाग्याचा असतो. उत्तम प्रकारचा रंगीत नक्षीचा व इमारतीचा दगड बराच सांपडतो. वडगर येथे उत्तम पीक पिकतें. संस्थानाच्या मालकीच्या कारखान्यांत मॅग्नेशिअम क्लोराईड व मिठापासून होणारे रासायनिक पदार्थ तयार होतात. पितळेची व तांब्याचीं भांडी, दगडी चक्क्या, कापड व मातीचीं भांडी तयार करतात. संस्थानांत सरकी काढण्याचे कारखाने आहेत. आयात मालाची किंमत (१९०३-०४) ५।। लाख होती व निर्गत मालाची किंमत १ १/२ लाख होती. संस्थाच्या मालकीची एक रेल्वेलाईन आहे. ही वढवाण ते हलवदपर्यंत ४० मैल लांबीची आहे. अमदाबाद जिल्ह्यांतील धोलरा हें सर्वांत जवळचे बंदर आहे. ध्रांगध्रा हें काठेवाडांतील पहिल्या प्रतीचें संस्थान आहे. जमीनीची सारा पिकावर ठरविला गेला आहे. एकंदर संस्थानाचें उत्पन्न २५ लाख रुपये आहे. येथील संस्थानिक जुनागडच्या राजास व ब्रिटिश सरकारास ४४६७७ रु. खंडणी देतो. पांज फौजदारी कचेऱ्या, दवाखाने, शाळा वगैरे आहेत. सांप्रतच्या राजाचें नांव हिज हायनेस महाराणा श्री सर घनश्यामसिंघजी, जी. सी. आय. ई; के. सी. एस. आय. महाराज राजासाहेब असें असून तो सर्व झाला रजपुतांचा मुख्य आहे.

अलीकडील माहिती (१९२१-२५):- असहकारितेची चळवळ जेव्हां १९२१ सालीं अगदीं शिखरास पोहोंचली होती त्यावेळीं सार्वजनिक सभा भरविण्याच्या हक्कावर नियंत्रण घालण्यांत आल्यामुळें या संस्थानच्या प्रजेंत कांहींसा असंतोष उत्पन्न झाला होता. पण मुंबईकडील कांहीं असहकारितावादी चळवळ्यांपुरतेंच सदरहू निर्बंध तात्पुरते आहेत असें स्पष्टीकरण आल्यानंतर लोकांनीं सभा भरवून संस्थानिकावरील विश्वास जाहीर केला. १९२३ सालच्या आक्टोबरांत कुडा रेल्वे वाढविण्यांत आली आणि कुडा सॉल्ट वर्क्स (मिठाचा कारखाना) सुरू करण्यांत आला. मीठाच्या धंद्यामुळें संस्थानला कायमचें मोठें उत्पन्न लाभणार असून हजारों मजूरांची सोय लागणार आहे. शिवाय कुडा रणांत मीठ तयार करण्याचा पूर्वापार चालत आलेला हक्कहि संस्थाननें पुन्हां प्राप्त करून घेतला आहे. हिंदुस्थान सरकारनें हा हक्क बराच काळ अमान्य केला होता;पण सदरहू संस्थानिकांनीं त्या हक्काकरितां नेटाचा प्रयत्न करून तो प्राप्त करून घेतला. स्टेटच्या मालकीची रेल्वे १९२३ सालीं ४६.६९ मैल होती, आणि हालवाड ते भालीयापर्यंतच्या नव्या फांट्याला मंजूरी मिळाली होती. सार्वजनिक रस्त्यंवरील दिव्याकरितां, सरकारी इमारतींकरितां, सरकारी छापखान्यांकरितां, दळणाच्या गिरण्या व इतर लहान लहान कारखान्यांकरितां वीज घेण्याच्या कामीं सर्व काठेवाडी संस्थानांत ध्रांगध्रानें पुढाकार घेतला. तसेंच दगडांचा व्यापार वाढावा म्हणून सरकारी कर कमी करून उत्तेजन देण्यांत आलें व वाहतुकीच्या सोयीकरितां एक रेल्वेचा फांटा दगडांच्या खाणीकडे नेण्यांत आला. लांब धाग्याचा कापूस व अनेक द्विदल धान्यें हीं तेथील मुख्य पिकें होत. दोन कॉटन प्रेस व सात जिनिंग फॅक्टच्या सरकारी मालकीच्या आहेत. १९२२-२३ सालीं हलवद येथें जिनिंग फॅक्टऱ्यांची संख्या ४० नीं वाढविण्यांत आली व इमारतीमध्यें पुष्कळ फरक करण्यांत आले. शेतकीला भरपूर पाण्याचा पुरवठा नाही, हा मोठा कमीपणा आहे. सितापूर येथें ७२२ फूट खोल छिद्र पाडण्यांत आलें व तेथें चांगलें पाणी लागलें. १९२३-२४ सालीं कुडा येथें ४००फूट खोलीचें बोअर खोदलें, पण तेथें लागलेलें पाणी पिण्याच्या उपयोगाचें नाहीं. आणखी बोअर घेण्याचें काम चालू आहे.

श ह र.- या संस्थानची राजधानी ध्रांगध्रा याच नांवाची आहे. ध्रांगध्रा रेल्वेचें हें शेवटचें स्टेशन अमदाबादेच्या पश्चिमेस ७५ मैल आहे. ध्रांगध्रा हें नांव घरांग म्हणजे दगड व घर म्हणजे धरणारा यांपासून झालें असावें असें कित्येकांचें मत आहे; कारण येथें दगड पुष्कळ आहेत. लोकसंख्या (१९०१) १४७७०. येथील दगडाच्या खाणीबद्दल हें प्रसिद्ध आहे. राजवाडा, रामाचें, रणछोडचें, कृष्णाचें व स्वामी नारायणचें हीं मंदिरें पाहण्यासारखीं आहेत. प्रत्येक देवळाला एक धर्मशाळा जोडली आहे. गांवाभोंवतीं तट आहे. येथें एक हायस्कूल चालतें व गांवाला म्युनिसिपालिटीहि आहे. [बाँबे ग्याझे. पु. ८; सेन्सस रिपोर्ट. १९११.]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .