विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
नगरकोट- पंजाब. कांग्रा जिल्ह्यांतील जुनें शहर. येथें ज्वालामुखी असल्यानें पूर्वीपासून यास पवित्रपणा आला आहे. येथें फार श्रीमंत देवालय होतें ते महंमूद गझनीकर यानें लुटलें (१००५-६). पुढें हिंदू राजांनीं नगरकोटचा किल्ला मुसुलमानांपासून जिंकून घेतला (१०४३). जास्त माहितीकरितां “कांग्रा” (ज्ञानकोश, विभाग १०) पहा.