प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ    
   
नाकाचे रोग- घ्राणेंद्रियें जें नाक त्यायोगें बर्‍या व वाईट गंधांचें ज्ञान मेंदूस होतें; परंतु त्यास त्याच्या नाना ठिकाणीं नाना प्रकारचे रोग होतात; व म्हणून तें इंद्रिय आपल्या परिचयांतलें असलें तरी रोगपरीक्षणार्थ त्याचे भाग पद्धतशीर रीतीनें तपासण्याची माहिती पाहिजे. नुसत्या डोळ्यांनीं बहुधां हें कार्य करतां येतें. परंतु त्याजोगता एक बारीक आरसा -जो घशांत घालतां येऊन नाकपुड्यांचा घशांतील मागील भाग प्रकाशित करील अशा प्रकारचा जवळ असल्यानें परीक्षणास मदत होते. आरशानें व तदर्थ दुर्बिणीनें नाकपुड्यांत पुढूनहि प्रकाश पाडतां येतो. प्रथम रोग्याच्या नाकाचा बाह्य भाग तपासावा. नंतर त्यास डोकें मागें वांकविण्य़ास सांगितल्यानें नाकपुड्यांच्या आंतील भाग प्रकाशित करतां येतो व तसा तो झाला म्हणजे आंतील पडदी, नाकाचा तळभाग अगर भूमि (डोकें मार्गे वांकविलेल्या स्थितींत असलेली), दोन्ही बाजू व त्यांवरील श्लेष्मल आवरण, यांतच नाकपुड्यांच्या बाहेरील व पडदीच्या आंतील बाजूच्या हाडांच्या सुमारास आडव्या दोन खोबणी, ज्यावर श्र्लेष्मलत्वचा आहे अशा व नाकपुड्या या भागांचें निरोगी स्थितींत परीक्षण करण्याची संवय असल्यास रोगविज्ञान व विकृतस्थिति लवकर लक्षांत येते. नाकपुड्यांचीं घशांतील छिद्रें घशांत बोट घालून तपासतां येतात व तेथें ग्रंथि वगैरे असल्यास त्या चांचपतां येतात. वरील जबड्याच्या व नाकामागील मस्तकाच्या पोकळ अस्थींचा संबंध नाकाशीं आहे.

लाल नाक अगर नाकावरील मुरुमाच्या फुटकुळ्या - दारूबाजाचें नाक लाल असतें हा समज खरा आहे. कारण नाक लाल होण्याचें तें एक कारण आहे. पण त्याशिवाय तितकींच महत्त्वाचीं कारणें आहेत ती अशीं कीं सर्द हवा, सर्दी, यौवनावस्था प्राप्त होण्याचा काल, अजीर्ण व अग्निमांद्य. स्त्रियांनां हा रोग विशेष होतो. याचें कारण शोधून त्यावर उपाय करावे. बाहेरून लावण्यासाठीं गंधकाचें मलम अगर रसकापुराचें धावन उपयुक्त असतें. बारीक व मध्यमशा ग्रंथी व दुष्ट (असाध्य) ग्रंथी या ठिकाणीं होतात व त्यासाठीं शस्त्रक्रियेची मदत पाहिजे. चरणारा असाध्य व्रण व ल्युपसनामक त्वग्रोग या ठिकाणीं होतात. त्यासाठीं त्यावर सांगितलेले उपचार करावेत. फिरंगोपदंशासंबंधीं होणारीं गळवें व गुमडीं; हीं हाडास होऊन तीं रात्रीं ठणकतात व त्यांवर त्या रोगाचे इलाज करावेत.

नाकपुड्यांतील रोग.- (१) घुणघुणा फुटणें:- मेंदू, यकृत या ठिकाणीं रक्ताधिक्य झाल्यास घुणघुणा फुटल्यानें बरें वाटतें. मुलांची यौवनावस्था, म्हातारपण, यकृतरोग, हद्रोग, व मूत्रपिंडाचे रोग या अवस्थेंत रक्त खराब व पातळ होणें, रक्तपित्त, कांहीं प्रकारचे ताप व रक्तस्राव होण्याची प्रकृति असणें, नाकास व डोक्याच्या कवटीच्या तळास मार, इजा, धक्के इत्यादि लागणें अगर अस्थि भंग होणें; आंतील पडद्यास, रक्तग्रंथी, श्र्लेष्मल ग्रंथी, असाध्यग्रंथी अगर हाडीव्रण असणें हीं मुख्य कारणें होत. रक्त एका अगर दोन्ही नाकपुड्यांतून येतें किंवा मागील छिद्रांतून तें गिळलें जातें अगर तोंडांतून बाहेर व्हातें अगर श्वासनलिकेंत शिरून खोकला व ठसका उत्पन्न करतें.

उपचार:- सशक्त माणसांत रक्तस्राव आपोआप थांबतो व फार तर साधे उपचार करावे व थोडेंफार रक्त गेल्यानें फायदाच असतो. म्हणून तें अगदीं ताबडतोब बंद करूं नये. रोग्यास उताणा निजवून त्याचे हात डोक्याकडे पसरून ठेवावे व डोकें अमळ उंच राहील असें ठेवावें. त्यास बर्फ चोखण्यास द्यावा. अति थंड अगर कढत पाण्याची पिचकारी हळूहळू नाकांत सोडावी, मानेस अगर नाकास बर्फ लावावें. हात व पाय गरम ठेवावे, पोटामध्यें अर्गटचा अर्क, क्यालशियम् लॅक्टेट हीं ओषधें द्यावींत. नाकांत पिचकारीनें घालण्यास तुरटीचें पाणी, आयर्न क्लोराईडचें पाणी हीं औषधें चांगलीं, अगर हेझेलिन किंवा अड्रिनेलिनचे थेंब घालावे अगर त्यांत कापूस भिजवून त्याचा बोळा नाकांत ठेवावा. अगर रक्तस्रावाच्या ठिकाणी विजेची पेटी लावावी. वरील उपचार करण्याच्या अगोदर कोणतें कारण संभवत आहे हें पाहून उपचार करावे.

(२) जुनाट पडसें:- कारणें- मुलांची अशक्त व क्षयी प्रकृति, वरचेवर पडसें येणें, घशाच्या मागें मऊ व बिलबिलीत बारीक ग्रंथी असणें, मधील पडदी वांकडी असणें, चिंचोळ्या नाकपुड्या, तपकीर फार ओढणें इत्यादि. या रोगाचे तीन प्रकार अगर अवस्था आहेत. (अ) नाकांतून पांढरा-पिवळा शेंबूड येणें, व नाक आतूंन लाल होणें. परंतु नाकांतील त्वचा जाड न होणें व त्यांतून दुर्गंधिमय खपल्या न निघणें व नाकाची घाण न येणें हीं लक्षणें असतात. (आ) मागील रोगाची हयगय झाल्यानें नाकाची अंतस्त्वचा सजून लाल होते व त्यांतून पांढरा पिवळा शेंबूड फार येतो, आवाज नाकांतून येतो, नाक चोंदल्यामुळें वरचेवर शिंकरावें लागतें व श्वासासाठीं तोंड उघडें ठेवणें जरूर असल्यामुळें चेहरा बावळट दिसतो, शेंबूड नाकाच्या मागून घशांत उतरतो व तो खांकरून थुंकावा लागतो. याचा कानाशीं संबंध असल्यामुळें बहिरेपणाहि येतो. ठसका, दमा अगर घरेंसुद्धां यामुळें होतें. बाहेरून नाकपुड्या जाड दिसतात. मागील छिद्रें तपासलीं असतां तेथें त्वचा सुजलेली दिसून त्याच्या गांठीहि बनलेल्या असतात. याच रोगाचें तिसर्‍या प्रकारांत पर्यवसान होतें (इ) पीनस रोग:- नाकांतील अंतस्त्वचेची सूज ओसरून ती रुक्ष होऊन त्याखालील रचनेचा नाश होणें हें लक्षण यांत असतें व म्हणून यांत नाकपुड्या फार मोठ्या दिसतात. अंतस्त्वचा नेहमीपेक्षां कमी लाल दिसते व तीवर हिरव्या व पिंवळ्या खपल्या धरतात. बहुतेक रोग्यांच्या नाकाला या खपल्याखालीं जमणार्‍या स्रावामुळें अत्यंत दुर्गंधी येते. जुनाट पडश्यामुळेंच असें झालें असल्यास खपलीखालीं व्रण बनतो. उपदंश वगैरे इतर कारणांमुळें नाक बिघडून त्यांत व्रण व दुर्गंधी येते तो प्रकार पुढें येईलच.

उपचार- आरंभीच न कंटाळतां खटपट केली तर हा रोग बरा होतो. परंतु शेवटच्या पीनसाच्या अवस्थेपर्यंत जाऊं दिल्यास पूर्ण बरा होत नाहीं. रोग्याची प्रकृति तो क्षयी व अशक्त असल्यास कॉडलीव्हर आईल, मालटाईन, आयर्न आयोडाईड, या औषधांनीं सुधारावी. नाक स्वच्छ करण्यासाठीं औषधें घालावयाचीं तीं तुषार उडवण्यार्‍या पिचकारीनें घालावीं व त्यासाठीं हायड्रोजन परॉक्साईड हें औषध चांगलें आहे. त्यानंतर त्या भागास स्तंभत्व येण्यासाठीं टॅनिक असिड, झिंक सल्फोकार्बोलेट, टर्पिन, कोकेन व थायमॉल हीं औषधें पातळ पेट्रोलिअममध्यें यथायोग्य प्रमाणांत विरघळून घालावींत. अंतस्त्वचा फार जाडी असल्यास तिला क्रोमिक असिड लावावें. अगर कांहीं व्यंग असल्यास शस्त्रक्रिया करावी. पीनस रोगासाठीं दुर्गंधी कमी होण्यास कॅर्बोलिक असिड, बोरॅक्स, अरिस्टॉल इत्यादींच्या धावनांचा उपयोग करावा अगर दुर्गंधीनाशक पूड नाकानें ओढावी व पोटामध्यें कंकोळयुक्त औषध द्यावें.

(३) नाकांत व्रण होणें:- हा  क्षयी व अशक्त प्रकृतीमुळें होतो व तो हाडापर्यंत गेल्यानें नाक बसकें व विद्रूप होतें. उपचार:- पोटांत कॉडलिव्हर ऑईल वगैरे घेऊन प्रकृति सुधारावी व वर सांगितलेल्या धावनानें अगर आयडोर्फाम किंवा ल्याक्टिक आसिड लावून व्रणाचें स्थान शुद्ध करावें. व्रण जुनाट असल्यास शस्त्रानें खरडावा किंवा आंतील नासक्या हाडाचा तुकडा काढावा.

(४) फिरंगोपदंशसंबंधीं नासारोग:-  लहान मुलास हा रोग (आईच्या संसर्गानें वगैरे) झाल्यास प्रथमावस्थेंत पटकुळ्या येऊन पडसें येतें व त्यामुळें श्वासोच्छासाच्या वेळीं मोठा आवाज, हीं लक्षणें होतात. यापुढील स्थितींत नाकपुडींत व्रण होतो व “गमा” नामक ग्रंथि होतात व त्यामुळें आंत चरत जाणारे खोल हाडीव्रण होऊन हाडें कुजून जातात व पू वाहून नाक खचतें व नंतर वसकें होतें, नंतर मधील पडदी झडते, टाळूस भोंक पडतें व नंतर नाकावरील मांस व त्वचा झडून गेल्यावर माणूस फार विद्रूप दिसतें. फार दिवस टिकणारा स्राव व हाडाची एक विशिष्ट दुर्गंधी व जुनाट पडशाप्रमाणें नाकाची अंतस्त्वचा सुजलेली नसणें आणि पूर्वी उपदंश झाल्याचा पुरावा मिळाल्यानें रोगनिदान होऊन उपचार करणें सोपें होतें. उपचार:- पोटांत पोटॅशियम आयोडाईड हें औषध द्यावें;  व त्याबरोबर क्किनाईन, सिंकोना, व नाना पारदभस्म प्रकारांपैकीं एखादा योग्य प्रकार योजून द्यावेत व पिनस रोगांत सांगितल्याप्रमाणें नाकावर धुण्याचे उपचार करावेत. कुजकें हाड शस्त्रक्रियेनें नाकपुड्याच्या पुढील अगर मागील छिद्रांतून काढून टाकावें.

(५) लेंकरांनां सांसर्गिक फिरंगोपदंश रोग झाल्यास पोटांत कांहीं महिने ग्रे पावडर हें औषध सूक्ष्म प्रमाणांत देऊन नंतर पोट्याशियम आयोडाईड दिल्यानें आश्चर्यकारक गुण येतो. नंतर कॉडलिव्हर आईल द्यावें.

(६) ल्यूपस नामक त्वग्रोग नाकाबाहेर होतो. तो कधीं नाकाच्या पडदीस होऊन तेथें छिद्र पडल्यानें स्राव सुरू होतो. तेथील जागा लाल होऊन तीवर कोंडा व खपल्या जमतात, व त्या काढल्या तर त्यांखालीं मऊ व्रण दिसतो. उपचार:- पोटांत कॉडलिव्हर आईल व सोमल हीं पौष्टिक औषधें देऊन रोगनाश करणारीं ल्याकटिक असिडें वगैरे औषधें लावावीं अगर शस्त्रानें खरडावें अगर “क्ष” किरणांचा उपयोग करावा.

(७) नासाश्मरी:- मुतखड्याप्रमाणें चुन्याच्या फॉस्फेटचें कीट नाकांत जमून खडा बनतो व त्यामुळे शेंबूड स्राव, नाक चोंदणें हीं लक्षणें होतात. निदान करतांना अस्थिग्रंथि अगर क्यान्सर आहे कीं काय असा घोंटाळा होतो. यास उपचार:- खडा चिमट्यानें ओढून काढावा. खडा मोठा असल्यास प्रथम तो फोडण्याचें शस्त्र असतें त्यानें प्रथम बारीक करून काढावा. आगंतुक पदार्थ आंत शिरल्यासहि वरीलच उपचार उपयोगी आहेत.

ग्रंथिरोग- यांचे तीन प्रकार आहेत. (अ) श्र्लेष्मल ग्रंथि- ही गांठ बहुधां नाकाच्या बाजूस आंतून होते व फार क्वचित मधील पडदीस होते. या गांठी अनेक व लहान असून त्यांचा बहुधा पुंजका असतो. लक्षणें:- नाक चोंदणे, गेंगाणा आवाज व पांढरा स्राव, दमा, खोकला कसलाच वास न येणें हीं लक्षणें असतात. नाक तपासलें तर पांढर्‍या-करड्या रंगाच्या, ओलसर, हालणार्‍या व त्यावर टोंचलें किंवा दाबलें तर तेथें खळगा पडणार्‍या गांठी दिसतात. गांठीं खोल जागीं असल्या तर नाक तपासण्याच्या दुर्बिणीची मदत घ्यावी लागते. उपचार:- यास प्रथम कोकेन लावून विजेच्या साहाय्यानें जाळून काढतां येते. अगर तारेच्या फासांत अगर चिमट्यांत पकडून पीळ घातल्यानें त्या तुटतात. (आ) तंतुमय ग्रंथी या नाकपुडींत पुढील भागास प्राय: होत नाहींत; आंत खोल घशांत होऊन मोठ्या झाल्यावर त्या नाकांत अडथळा करतात. याचीं लक्षणें वरील प्रमाणेंच पण घाणेरडा स्राव व त्यांत रक्त, विशेष बहिरेपणा, श्वासासव, कधींकधीं अन्न गिळतांना अडचण हीं होत. मनुष्य मोठा होतो तसतशा या गाठीं लहान होतात. परंतु त्या फुटल्या तर फार रक्तस्राव होऊन रोगी दगावतो सुद्धां. उपचार:- या गांठी शस्त्रक्रियेनें काढतांना रक्तस्राव फार होतो म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यास उत्तम शस्त्रवैद्याची उत्तम मदत हवी. (इ) असाध्य (क्यान्सर सार्कोमा ग्रंथी) यांचीं लक्षणें वरीलप्रमाणें. उपचार शस्त्रक्रिया करणें.

नाकपुड्यांमधील पडदीचे रोग:- (१) रक्त सांखळून गांठ बनणें; हें मार अगर धक्का, इजा यामुळें घडतें. ही गांठ मऊ विलबिलीत असते व ती इजा झाल्यानंतर लागलीच आल्यामुळें तें गळूं नव्हे असें ओळखतां येतें. पडदीच्या दोन्हीं बाजूंस बहुधां ती असते ही फोडूं नये, ती आपोआप ओसरून जाते. (२) गळूं झाल्यास मात्र तें फोडावें. लाली, सूज, दाह, ठणका यावरून गळूं ओळखावें.

(३) फिरंगोपदंशजन्य “गमा” नामक ग्रंथि होऊन तीवर उपचार न केल्यास ती चरत जाते व व्रण होऊन पडदीस भोंक पडतें व नाकाचीं हाडें कुजून नाक बसतें अगर झडतें. त्या व्रणावर हिरवें- काळें सायटें धरून त्याभोंवतीं लाली असते. उपचार:- आरंभींच पोटॅशियम आयोडाइड औषध घेतल्यानेंहि गांठ जिरते. नाहीं तर पुढें व्रण बनल्यास शस्त्रवैद्याची मदत घ्यावी लागते. क्षयी व अशक्य प्रकृतीमुळें होणारा रोग हाडीव्रण व लाल पुटकुळी या दोहोपैकीं एखाद्या स्वरूपांत हा रोग होतो. फुप्फुसांत कफक्षयाचीं लक्षणें बहुधां सांपडतात. उपचार:- शस्त्रवैद्याकडून व्रण अगर पुटकुळी खरडून घेऊन नंतर तीवर शामक उपचार करावे.

पडदीची उपजत अगर इजेमुळें असलेली वक्रता -  यामुळें एका नाकपुडींत फुगवटी व दुसरींत खळगा दिसतो. नाकपुडीची बाहेरील बाजूहि अंमळ वक्र दिसते. नाक चोंदून श्वासास अवरोध, शेंबूड येणें, बहिरेपण, माथेशूळ हीं लक्षणें असतात. उपचार -  ही वक्रता नाहींशीं करण्याजोगता एक चिमटा असतो; त्यांत पकडून पडदी सरळ करितात. परंतु ती कायम तशी राहण्यासाठीं दोन्ही नाकपुड्यांत नाकपुडीच्या आकाराच्या कांड्या बसवून कांहीं दिवस त्या ठेवतात. नंतर भोंवतालच्या रचनेस नवीन वळण येईतोंपर्यंत ठेवल्यास त्या काढून त्यांऐवजीं व्हलकनाइट किंवा हस्तिदंताच्या कांड्या काहीं काळ ठेवतात. याच पोकळ कांड्या बसविल्या म्हणजे श्वासास अवरोध होण्याची अडचण दूर होते. नंतर त्याहि काढून टाकतात.

पडदीस तंतुमय, कूर्चामय, अस्थिमय अगर रक्तवाहिन्यायुक्त ग्रंथी होतात त्यांवर इलाज शस्त्रप्रयोग हाच होय. मृत्किरासम (बिलबिलीत) ग्रंथी लहान मुलाच्या घशांत नाकपुड्याच्या मागील छिद्रांजवळ पुष्कळांनां होतात; कारण त्या होण्याजोगी अनुकूल रचना तेथें असते. अशा मुलाच्या गळ्यांतील गांठीहि बहुधां मोठ्या असतात. या मुलांनां घशांतील सूज, दाह व पडसें वरचेवर येतें व त्याची हयगय झाल्यास कान ठणकतो, फुटतो व बहिरा होतो. लक्षणें:- बहिरेपण, नाकांतून श्वासास अवरोध, घोरणें, नाकांतून आवाज येणें अगर निर्जीव पुळपुळीत आवाज येणें, व सदा श्वासासाठीं तोंड उघडें राहिल्यानें चेहर्‍यावरील बावळटपणा. तोंडांत बोट घालून नाकपुड्यामागें चांचपिलें तर या ग्रंथी मऊ मऊ व बोटांस गांडुळाप्रमाणें लागतात. आरशानें तपासलें तर त्या गुलाबी रंगाच्या व दाट उगवून नाकपुड्याच्या मागील छिद्राआड आलेल्या दिसतात. उपचार:- शस्त्रानें कापून काढणें. यासाठीं हाताचें नख, वर्तुळाकार (आंगठीप्रमाणें) चाकू, चिमटा अगर खरवडण्याचें हत्यार यांपैकीं जें सोयीचें दिसेल त्या साधनानें त्या काढून टाकतात. व साधल्यास घशांतील गांठीहि काढतात. गुंगी आणण्यास प्रथम ईथर हुंगवून मग क्लोरोफार्मने गुंगी आणतात; तो जपून दिला पाहिजे. कारण रक्त नाकांतून व तोंडातून वाहून तें गालांत जमतें व तेथून तें स्पंजानें अगर बोळ्यानें वरचेवर टिपून घेतां येईल असा मदतनिसास अवसर द्यावा लागतो. म्हणून डोकें एका बाजूवर ठेवतात. शस्त्रक्रियेनंतर रोग्याचें तोंड बंधनानें बांधून टाकतात म्हणजे तो नाकानें श्वास आपोआप घेऊं लागतो.

नाकाच्या पोकळीशीं संलग्न अशा इतर (जबडा, मस्तक, कपाळ इ.) पोकळीचे रोग:- नाकांत पडसें, सूज प्रथम येऊन ती इकडे पसरल्यामुळें अगर श्र्लेष्मल ग्रंथी किंवा किडक्या दांताच्या मुळाची पीडा होऊन त्यामुळें हा रोग उत्पन्न होतो. याची लक्षणें:- एका नाकपुडींतून फिकट पिंवळा पू बाहेर येतो. पू येण्यासारखी नासाश्मरी, कुजकें हाड, फिंरगोपदंशजन्य व्रण हीं कारणें जर नसलीं तर या पोकळीपैकींच कारण बहुधां असतें. जबड्याच्या पोकळींतील पू वाहिल्यावर कांहीं दिवस बंद होतो व तो पू दुर्गंधियुक्त असा वाहतो. डोकें मागें केल्यानें अगर दूषित जबड्याच्या विरुद्ध बाजूवर निजल्यानें नाकपुडीच्या बाजूच्या आंतील अंगाकडून पू येतो. गालावर अगर दांत दाबला तर दुखतें. विजेच्या दिव्याच्या साहाय्यानें रोगनिदान होतें. परंतु तें नक्की अजमावण्यासाठीं दातांच्या वरील जागेंत पोकळ सुईच्या अग्रानें टोंचून आंत पू आहे किंवा नाहीं हें पाहतात. जबड्याखेरीज इतर पोकळींतून येणारा पुवाचा स्राव सतत वाहातो व मस्तक ताठ ठेवल्यानें अधिक येतो. नाकामागें खोल ठिकाणी दुखतें अगर डोळ्यांत व कपाळांत पोकळी दूषित असलेल्याप्रमाणें दुखतें, तसेंच डोळे पुढें आलेले बटबटीत दिसल्यास नाकामागील अगर अस्थींतील पोकळींत पू आहे असें दर्शविते. पापणी पडली राहून निर्जीव होणें, तिवरेपणा, व एकदम अंधत्व हीं लक्षणेंहि तेंच दर्शवितात. उपचार:- अगोदर औषधी पाण्यानें जुनाट पडशाचे उपचार, फवारा उडविण्याच्या पिचकारीनें करून नाकांतील स्राव कमी करावा. त्यानें उपयोग बराच होईल न झाल्यास शस्त्रक्रिया करावी. म्हणजे जबड्याच्या अगर कपाळाच्या हाडांतील पोकळींतील पू धुवून ती निर्मळ करतां येते. अगर ती चिरून तिच्यांतील पुवाचा निचरा होण्यासाठीं तिच्यामध्यें पू वाहून नेणारी नळी कांहीं दिवस ठेवावी म्हणजे कांहीं दिवसांनीं ती पोकळी पूयरहित व स्वच्छ होते. हें करण्याच्या वेळीं दांत शाबूत असल्यास दांतांच्यावर हाडांत छिद्र पाडून आंत नळी घालावी पण एखादा दांत किडका असेल तर तो उपटून अगर अगोदरच पडून गेलेला असेल तर त्याच्या उगवण्याच्या पोकळींत छिद्र पाडून त्यावाटें जबड्यांत नळी शिरकवावी. नळी ठेवल्यानें तें छिद्र बुजत नाहीं व त्यांतून रोज बोरिक असिड किंवा झिंक सल्फेटच्या धावनानें ती पोकळी धुवून निर्मळ करतां येते. एवढ्यावर बहुधा भागतें. पण न भागलें तर हेंच छिद्र मोठें करून त्यावाटे आंतील मऊ श्र्लेष्मल त्वचा खग्डण्याच्या हत्यारानें खरवडून ताजी व स्वच्छ करतात. म्हणजे त्यांतील पूयोत्पादक दुर्गुण नाहींसा होऊन स्राव बंद होतो. त्याच प्रमाणें कपालास्थींतील पोकळीपुढील बाजू भोंक पाडून धुतात अगर खरवडतात व त्याचा नाकाशीं असलेला स्वाभाविक संबंध बुजला असेल तर तो सळईनें फोडून सुरू करतात. नाकामागील हाडाच्या पोंकळी खरवडण्यासाठीं नाकांतून जपून शस्त्र घालावें लागतें अगर डोळा व नाक यांच्या कोपर्‍यांत चिरून खालील खोलभाग उघडा करावा लागतो.

नासाकाठिण्य रोग.- हा एक दुर्मिळ व विशिष्टजंतुजन्यरोग आहे व यांत नाक, ओंठ हे दगडासारखे कठिण होऊन श्वासावरोध होतो; दु:ख नसतें. यास उपचार, त्या जंतूची लस टोंचणें. नाकांत आगंतुक पदार्थ जाऊन बरेच दिवस झाल्यास दुर्गंधियुक्त स्राव सुरू होतो. एखादेवेळीं हा पदार्थ आंत गेलेला आईबापांसहि माहीत नसतो व बर्‍याच दिवसांनीं नाकांत व्रणहि होतो. उपचार:- संशय आल्यास रोग्यास भूल देऊन नाकांत आगंतुक पदार्थ शोधावा व तो चिमटा अगर सळई या साधनांनीं काढावा अगर तो मागें घशांत ढकलावा.

नासास्थिभंग:- मार लागून हाडें मोडल्यास नाकपुड्यांत बोट अगर सळई घालून तीं हाडें नेहमींप्रमाणें जुळवून ठेवावीं व तीं पुन्हां विस्कटूं नयेत म्हणून नाकपुड्यांत हस्तिदंती व पोकळ खुंट्या कांहीं दिवस ठेवाव्या. नाकाचा अंतस्त्वचेचा संबंध मेंदूशी असल्यामुळें या इजेची हयगय करूं नये.

नवें नाक बसवणें- रोगानें नाक झडतें. अगर कोणी दुसर्‍यानें द्वेषानें नाक कापल्यास त्यामुळें अति विद्रुपता प्राप्त होते; स्त्री असो, पुरुष असो त्यास ही विद्रूपता असह्य होते. ती जाण्यासाठीं नाकाच्या क्षेत्रफळायेवढें त्रिकोणी कातडें, रोग्यास भूल देऊन त्याच्याच कपाळावरून सोलून काढून तें नाकाकडे न तोडतां तसेंच वळवून त्याचें नाक व नाकपुड्या बनवून त्या जागच्याजागीं टाके मारून कायम करतात. त्यास पोषण करणारी रक्तवाहिनी शाबूत असल्यामुळें नवीन ठिकाणीं मूळ धरीपर्यंत व नंतरहि तें कृत्रिम नाक तजेलदार रहातें व तेथें तें कांहीं दिवसांनीं चिकटल्यावर वळलेल्या त्वचेचा संबंध तोडतात. तोंपर्यंत कपाळाच्या ठिकाणीं नवीन त्वचा आल्यामुळें कपाळहि साफ होतें. हें नवीन नाक अर्थात कृत्रिम असल्यामुळें केवळ शोभेचें होय. त्याचा वास अगर घाण जाणण्याच्या कामीं उपयोग नाहीं. पण विद्रुपता बरीचशी घालविणें हा त्याचा मोठा उपयोग होतो.

आयुर्वेदीय निदान.- दंव, वारा, धुरळा, फार बोलणें, फार निजणें, फार जागणें, सखल डोकें ठेऊन किंवा फार उंच उशी घेऊन निजणें, पाणी बदलणें, फार पाणी पिणें, पाण्यांत फार डुंबणें, वांती व अश्रू यांस आवरून धरणें या व इतर अशाच प्रकारच्या कारणांनीं वातादिक दोष कुपित होऊन नाकांत दाट होऊन पडसें उत्पन्न करतात. तें जसजसें वाढतें तसतसा मनुष्य क्षीण होत जातो आणि अतिशय वाढलें असतां त्यापासून शेवटीं क्षयरोगहि होतो. वाताच्या पडशांत तोंडास कोरड, अतिशय शिंका, नाक चोंदणें व त्यांत टोंचल्यासारखें होणें, दांत, कानशिलें व डोकें यांत व्यथा होणें, भिवयींच्या आसपास किडे फिरल्यासारखें वाटणें, आवाज बसणें, पडसें उशीरा पिकणें आणि थंड व पातळ शेंबूड येणें हीं लक्षणें असतात. पित्ताच्या पडशांत तहान, ताप, नाकांत पुळ्या येणें, भोंवळ, नाकाच्या बोंडीवर बारीक पुळ्या येणें आणि रुक्ष, उष्ण, तांबूस व पिवळट शेंबूड येणें हीं लक्षणें होतात. कफाच्या पडशांत खोकला, अरुचि, दमा, वांती, अंग जड होणें, तोंड गुळचट होणें, नाकांत कंड सुटणें आणि, चिकट पांढरा दाट असा शेंबूड येणें हीं लक्षणें होतात. त्रिदोषजन्य पडशांत वरील तिहींची लक्षणें असून तें कारणावाचून एकाएकीं कमीजास्त होतें. रक्त दूषित होऊन नाकाच्या शिरांत जाऊन पडसें उत्पन्न करतें, त्यांत छाती बधिर होते, डोळे लाल होतात, श्वासास घाण येते, नाक, नाक व डोळे यांत कंड सुटते, आणि पित्तजन्य पडशाचीं लक्षणेंहि होतात.

या सर्व प्रकारच्या पडशांची हयगय केली असतां तीं दुष्ट होतात. त्यांत वरील लक्षणें अधिक जोरदार असल्यामुळें सर्व इंद्रियांस त्रास होतो. अग्निमांद्य, ताप, दमा, खोकला, उरांत व बरगड्यांत वेदना, तोंडास दुर्गंधी व सूज, हे विकार होतात. पुष्कळदां हें पडसें कारणावांचून जास्त होते. वरचेवर नाक कोरडें किंवा ओलें होतें, मोकळें असतें किंवा चोंदतें, पुवासारखा काळसर, रक्ताच्या गांठींनीं युक्त असा शेंबूड येतो आणि त्यांत लांब गुळगुळीत पांढरें व बारीक असे कृमी असतात. अंग हलकें होणें, शिंका थांबणें, चिकट व पिंवळा शेंबूड येणें, आणि रस व वास कळूं लागणें हीं सर्व प्रकारचीं पडशीं पिकल्यांचीं लक्षणें होत. तीक्ष्ण पदार्थ हुंगणें, सूर्याचे किरण, सूत, गवत व इतर वातप्रकोप करणार्‍या कारणांनीं नाकांतील कोंवळीं हाडें घांसलीं गेल्यानें वायु कुपित होऊन त्याचा मार्ग बंद झाला म्हणजे तो शृंगारक मर्मांत जाऊन तेथून उलटतो आणि अतिशय शिंका आणतो. या विकारास भृशक्षव (शिंका अतिशय येणें) म्हणतात.

वायु नाकांतील कफास शुष्क करून नासिकाशोष नांवाचा विकार उत्पन्न करतो. यांत नाकांत कुर्से भरल्यासारखें वाटतें व श्वास टाकतांना कष्ट होतो. नासानसांत कफानें वायु कोंडला जाऊन नाक चोंदतें आणि श्वासोच्छ्वासास अटकाव झाल्यानें नाकाचीं छिंद्रे बंद झाल्यासारखीं होतात. पित्त, नाकपुडींतील त्वचा व मांस यांचा पाक करून दाह व शूळ उत्पन्न करतें, यास घ्राणपाक म्हणतात. कफानें स्वच्छ व पाण्यासारखा पातळ असा निरंतर स्राव होत असतो. तो रात्रीं विशेष होतो. त्यास घ्राणस्राव असें म्हणतात. नाकांत कफ वाढून तो स्रोतांस बंद करून अपीनस नामक रोग उत्पन्न करतो, यांत पडशापेक्षां जास्त वेदना असतात. श्वास घुरघुर वाजतो आणि मेंढीसारखें नाक चिघळून त्यांतून एकसारखा बुळबुळित पिवळा, पिकलेला व दाट असा शेंबड वहातो. नाकांत रक्ताचा विदाह झाला असतां नाकास आंतून व बाहेरून स्पर्श सोसेनासा होतो, एकसारखा कढत उच्छास निघतो व नाक पेटल्यासारखें वाटतें. या रोगास दीप्ति, असें म्हणतात. टाळूच्या मुळाशीं तिन्ही दोष दुष्ट झाले म्हणजे तोडांतून व नाकांतून जो वायु व शेंबूड येतो त्यास दुर्गंधी येते. या विकारास पूतिनास म्हणतात. त्रिदोषापासून किंवा नाकावर अथवा डोक्यावर आघात झाल्यानें नाकांतून पू व रक्त वहातें त्यास पूयरक्त असें म्हणतात. यांत डोक्याची आग व वेदना होतात. पित्त व कफ यांनीं नाकांत वायु अडकला म्हणजे तो कफास सुकवितो. त्यायोगानें नाकपुड्या कोरड्या होतात या विकारास पुटक असें म्हणतात. नासार्श व नासार्बुद हे पूर्वी सांगितलेल्या अर्श व अर्वुद या विकारांसारखेच असतात. त्यांचे दोष व लक्षणेंहि त्यांच्याप्रमाणेंच समजावीं. सर्व प्रकारच्या नासार्श व नासार्बुदांत उच्छास करण्यास कष्ट पडतात, पडसें येतें, एकसारख्या शिंका येतात, गेंगणा शब्द येतो, तोंडांतून व कानांतून दुर्गंधियुक्त वायु व शेंबूड येतो आणि डोकें दुखतें. या अठरा प्रकारच्या नासारोगांत दुष्ट प्रतिश्याय अथवा दुष्ट पीनस याप्य आहे; बाकीचे साध्य आहेत.

चिकित्सा.- सर्व प्रकारच्या पडशांत अगोदर निवार्‍याच्या  जागेंत रहावें. स्रेहपान करणें, शेकून घाम काढणें, वमन, ध्रूमपान, गुळणे, जड व उबदार कपडे व डोक्यास जाडसें वस्त्र बांधणें हे उपचार करावे. शिंका येण्याकरितां तीक्ष्ण नस्यें ओढावीं. हलकें व रुक्ष अन्न खावें. धूम्रपान करावें. स्नान, शोक, राग, फार निजणें व थंड पाणी हीं वर्ज्य करावीं. दुष्ट पीनसावर क्षयरोग व कृमी यांवरील चिकित्सा करून रोग्याची शक्ति कमी होऊं देऊं नये. पूयरक्त नवीन असतां त्याची मधुर औषधांनीं चिकित्सा करावी आणि जुनें होऊन अतिशय वाढल्यावर नाडीव्रणासारखी चिकित्सा करावी. नासार्श व नासाबुंद यांचा दाह करून सैंधव, मनशीळ, हरताळ, इत्यादि औषधांची वात करून ती नाकांत घालून ठेवावी. बाकीच्या सर्व नाकाच्या रोगांवर तीक्ष्ण नस्यांचा उपयोग करावा व दोषानुरोधानें इतर चिकित्साहि करावी.

ज्याचें नाक तुटलें असेल तो तरुण असल्यास प्रथम रेचकादिकांनीं शुद्ध करून तुटक्या नाकाएवढा एक पानाचा तुकडा कातरावा. तो तुकडा नाकाजवळ गालावर ठेवून तेवढ्याच आकाराचा त्वचेचा व मांसाचा एका अंगास धर राखून तुकडा काढावा; तो तुकडा एका बाजूस करून गालाचा छेद जुळवून मध्यें कापसाचा बोळा घालून सुईनें टांके मारावे, नंतर नाकाचा छेद खरवडून तो बाजूस केलेला गालाचा तुकडा नाकावर वळवून घेऊन गालास बंध बांधावा व फार जपून नाक शिवावें. नंतर श्वासोच्छास चांगला चालण्याकरितां नाकांत दोन नळ्या घालून नाकपुड्या उचलून धराव्या. शिवणीवर हिरवें तेल लावून रक्त बंद करणार्‍या औषधांचें वस्त्रगाळ चूर्ण वर लावावें व व्रणाचे उपचार करावे. अवस्था पालटल्यास सद्योव्रणावरचे उपचार करावे. व्रण भरून आल्यावर नाकाजवळ वाढलेले मांस चामड्यासकट कापावें आणि साफ करून शिवावें. नाक कमी म्हणजे बसकट झाल्यास पुन्हां पालिवर्धक तेलांनीं वाढवावें. नाक तुटल्याबरोबर वैद्यास समजल्यास त्यानें लागलाच तो तुकडा वर बसवून बाकी सर्व उपचार व्रणाप्रमाणें करावे.

नस्य- गळ्याच्या वर असलेले विकार नस्यानें (नाकांत घातलेलें औषध) घालवितां येतात. कारण नाक हें डोक्याचें द्वार आहे म्हणून नाकांत घातलेलें औषध डोक्यांतील दोष काढून टाकितें. या नाकांतून ओढण्याच्या औषधाचे त्याच्या कार्यावरून तीन भेद आहेत. अस्पमार, पडसें, डोकें दुखणें व जड होणें, कृमि, डोळे येणें, इत्यादि विकारांत आंतील दोष बाहेर काढून टाकण्यासाठीं जें नस्य देतात त्यास विरेचन नस्य म्हणतात.

वातिक शूल, आवाज बसणें, सूर्यावर्त रोग इत्यादि विकारांत वायूच्या शांत्यर्थ देतात तें बृंहण नस्य व केशदोष, डोळ्यांचे रोग, नालिका, वांग इत्यादि रोग जाण्याकरितां तेथल्या तेथें दोष जिरून जाण्याकरितां देतात तें शमन नस्य होय. हीं विरेचन, बृंहण आणि शमन अशीं तीनहि प्रकारचीं नस्यें स्नेहाच्या रूपानें ज्यावेळीं द्यावयाचीं असतात त्यावेळीं त्या स्नेहाच्या प्रमाणावरून त्यांस मर्श व प्रतिमर्श अशीं नावें देतात. मर्शाची मात्रा प्रतिमर्शापेक्षां तिप्पट अगर चौपट मोठी असते व त्यांत कांहीं चूक झाल्यास अपाय होतो. प्रतिमर्श निरोगी लोकांनीं इंद्रियें तरतरीत रहाण्याकरितां द्यावयाचा असतो व त्यास पथ्य नसतें. याचें प्रमाण दोन थेंब आहे. तीक्ष्ण औषधें वाटून चटणीच्या अगर चूर्णाच्या रूपानें देऊन विरेचनकार्य ज्यावेळीं करावयाचें असतें त्यावेळीं त्या विरेचननस्याला अवपीड असें म्हणतात. हें चूर्णस्वरूपाचें औषध नळीनें नाकांत फुंकावें म्हणजे पुष्कळ दोष बाहेर निघतात.

नस्य घ्यावयाचें असतां अगोदर डोक्याला स्नेह व स्वेदविधी करावे. नंतर निवांत जागीं उताणें सरळ निजावें, पाय थोडे उंच करून डोकें खालीं करावें; नंतर एक एक नाकपुडी बंद करून औषध ऊन पाण्यांत ऊन करून नळीनें अगर बोळ्यानें नाकांत औषध घालावें. औषध घातल्यावर पाय, हात, खांदे व कान हे चोळावे. जितका वेळ औषध ठेवावयाचें तितका वेळ झाल्यावर हळू हळू कुशीवर होऊन नाकांतील औषध काढून टाकावें. याप्रमाणें दोन तीन वेळ औषध संपेपर्यंत करावें.

नाकांत घातलेल्या तीक्ष्ण औषधांनीं मूर्छा आल्यास डोक्यावर थंड पाणी शिंपडावें. विरेचननस्य दिल्यावर स्निग्ध नस्य द्यावेंच. नाकांत औषध घातल्यानंतर दोन मिनिटें उताणें निजावें; नंतर औषध काढून टाकावें व नंतर धूम्रपान करून ऊन पाण्याच्या चुळा मुखशुद्धीकरितां कराव्या. नस्याकरितां नेहेमी उपयोगांत येणारें अणुतैल नांवाचें औषध प्रसिद्ध आहे. यानें डोक्याचे पुष्कळ विकार जातात. नेहेमीं नस्य औषधें वापरणार्‍यांचे खांदे, मान, वक्षस्थल व तोंड हीं घट्ट व उंच आणि त्वचा चांगली असलेलीं होतात. इंद्रियें दृढ होऊन केंस लवकर पिकत नाहींत.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .