प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ 
       
नाताळ- दक्षिण आफ्रिका संघांतील एक समुद्रकिनार्‍यावरील प्रांत. हा दक्षिण अक्षांश २७ आणि ३१ व पूर्व रेखांश २९आणि ३३ यांत हा वसला आहे. याच्या आग्नेयीस हिंदीमहासागर; नैर्ऋत्येस केप प्रांत व बासुटो लँड : वायव्येस ऑरेंजफ्रीस्टेट व उत्तरेस व ईशान्येस ट्रान्सव्हाल व पोर्तुगीज ईस्ट आफ्रिका आहे. नाताळचा समुद्रकिनारा ६० मैल लांबीचा आहे. क्षेत्रफळ ३५२९१ चौरस मैल आहे. या प्रांताचे खुद्द नाताळ व झुलुलँड असे दोन भाग आहेत.

नाताळदेशाचा आकार एखाद्या भव्य व सुळेवजा जिन्याप्रमाणें आहे. हा जिना चढून गेलें म्हणजे पलीकडे विस्तृत सपाटीचा प्रदेश लागतो. ड्रेकन्सबर्ग पर्वताची ओळ मध्यें भिंतीसारखी उभी आहे. या पर्वतांतून पुष्कळ नद्यांचा उगम आहे. पर्वताच्या आग्नेय बाजूस दाट जंगल आहे, व किनार्‍यावर वनराजी इतकी दाट आहे कीं त्यायोगें नाताळला `उद्यानवसाहत’ (गार्डन कॉलनी) असें नांव पडलें आहे. नाताळमधील सर्व नद्यांचे उगम ड्रेकन्सबर्ग पर्वतांतून आहेत. सर्वांत मोठी नदी टुगेला ही होय. ग्रिक्वालँड ईस्ट व नाताळमधील सरहद्द उम्झिमकुलु नदी ही आहे. या नदीच्या खोर्‍यांतून फारच रमणीय देखावा दिसतो.

हवामान – नाताळची हवा बदलणारी असली तरी रोगकारक मात्र नाही. खोर्‍यांची व किनार्‍यावरील हवा फारच उष्ण आहे. इतकी की अत्यंत कडाक्याची थंडी पडली असतांहि शेगड्यांची गरज भासत नाहीं. आक्टोबरमध्यें उन्हाळा सुरू होतो व मार्चमध्यें संपतो. बाकीच्या कालांत हिवाळा असतो. नाताळच्या रहिवाश्यांनां छातींतील रोगाची बाधा मुळीच होत नाहीं.

रहिवासी- १९ साव्या शतकाच्या आरंभीच्या वर्षांत झुलु लोकांनीं येथील एतद्देशीयांचा पुरा नाश केला. याच्या पूर्वी एतद्देशीयांची संख्या एक लाख होती. बुशमनांखेरीज करून बाकीचे सारे एतद्देशीय लोक बांटु वंशाचे आहेत. आज सर्व जातींत झुलु रक्ताचें बरेंच मिश्रण झालेलें आहे. नाताळांतील एतद्देशीयांनीं आपली जातिविषयक संघटना बरीच केली आहे. झुलु लोकांच्या अत्याचारापूर्वी येथील एतद्देशीय काफीर राष्ट्रजातीची शाखा जी आमाक्सोसा, त्या शाखेचे होते. याशिवाय अमानीउस्वा, अमाकुनु या राष्ट्रजातींचीहि या ठिकाणी वस्ती आहे. गौरकाय व आशियाखंडस्थ लोक देखील येथें राहतात.

मोठी शहरें- पिटरमारित्झबर्ग हें प्रांतिक सरकारच्या राज्यकारभाराचें मुख्य ठिकाण आहे. याशिवाय डंडी, न्यू कॅसल, युट्रेड, ग्रे टाउन, व्हेरूलम हीं मुख्य शहरें आहेत.

दळणवळण- केपटाउन किंवा सुवेझ ह्या बाजूनें यूरोपकडे जाणार्‍या-येणार्‍या बर्‍याच आगबोटीचे रस्ते दरबानवरून गेले आहेत. मोठालीं व महत्त्वाचीं स्थळें आगगाड्यांनीं जोडली आहेत. येथें सुव्यवस्थित असें पोस्टखातें व तारायंत्र खातें आहे.

शेतकी व धंदे- विविध प्रकारचें हवामान व अनेक तर्‍हेची जमीन, यांमुळें शेतीपासून उत्पन्न होणार्‍या जिन्नसांतहि अनेक प्रकार दृष्टीस पडतात खडकाळ जमीन व खेळत्या पाण्याचा अभाव यांमुळें कृषिकर्मास कांहीं ठिकाणी अडथळा उत्पन्न होतो. मोठ्या प्रमाणांत ज्याचें पीक येतें, असें धान्य म्हणजे मका होय. एतद्देशीयांचे तें मुख्य खाद्य आहे. याशिवाय एतद्देशीय लोक, तंबाखू, दुधेभोंपळे, रताळीं वगैरेंचीहि लागवड करतात. मध्यदेशीय व डोंगराळ भागांत गहूं, जव, व ओट हीं धान्यें उत्पन्न होत असून त्यांची लागवड गौरकाय शेतकरी करतात. सखल व दलदलीच्या भागांत ऊंस, चहा, कॉफी, तंबाखू, आरारोट, कापूस इत्यादि जिन्नसांची पैदास होते. मध्यदेशीय व डोंगराळ प्रांतांतून गुरांच्या पैदासीचा धंदा विस्तृत प्रमाणांत चालतो. गुरांच्या बाजाराची मुख्य पेठ जोहान्सबर्ग ही होय. दुधदुभत्याचा धंदाहि चांगला भरभराटीत आहे व नाताळच्या लोण्यास मागणी फार असते. सरकारनें कृषिकर्माच्या प्रयोगशाळा काढल्या असून गुरांकरितां म्हणून एक वैद्यकखातेंहि काढलें आहे. कोळसा, लोखंड, तांबे आणि सोनें हीं खनिज द्रव्यें आहेत. येथें निघणारा कोळसा फार उत्तम असतो. १९१९ सालीं २८ लाख टन कोळसा बाहेर पडला.

आयात माल- लोखंडी सामान, सूत, कापड, शेतकी आणि खाणीविषयक यंत्रें, तंबाखू आणि खाद्यवस्तु वगैरे.

निर्गत- कोळसा, लोंकर, कातडीं, चहा, साखऱ, फळें इत्यादि.

सरकार व शासनपद्धति– १८९३ पासून १९१० पर्यंत नाताळ ही स्वयंशासित वसाहत होती. सध्यां नाताळ येथील सीनेट व सभागृह यांचे अनुक्रमें आठ व सतरा सभासद संयुक्त पार्लमेंटमध्यें आहेत. काळ्या लोकांनां, ते काळे आहेत म्हणून मत देण्याचा अधिकार नाहीं, असा जरी सरकारी कायदा नसाल, तरी, `विशिष्ट कायदे व न्यायसभा यांनीं नियंत्रित असलेल्या’ कोणाहि व्यक्तीस मतदानाचा हक्क नसल्यामुळें, व या सदरांत सर्वच एतद्देशीयांचा समावेश होत असल्यामुळें, एतद्देशीयांनां मतदानाचा हक्क नाहीं असेंच म्हणावें लागतें. याच संबंधांत दुसरा जो कायदा आहे त्याचाहि परिणाम एतद्देशीयांनां मतदानाधिकारी पुरुषांच्या मालिकेंतून वगळण्यांतच होतो.

प्रांतीय राज्यव्यवस्थेच्या शिरोभागी `संयुक्त प्रधनमंडळानें’ निवडलेला अधिकारी असतो. हा पांच वर्षेपर्यंत अधिकारावर असतो. प्रांतिक मंडळानें निवडलेल्या चार सभासदांचें एक कार्यकारी मंडळ याच्या मदतीस असतें. प्रांतिक मंडळाचे २५ सभासद असून त्या मंडळास निव्वळ प्रांतिक कारभार पाहण्याचाच अधिकार आहे. या मंडळाची मुदत तीन वर्षांचीच असते. स्थानिक राज्यकारभाराच्या सोयीकरितां नाताळचे लहान लहान परगणे पाडले आहेत. झुलुलँड मात्र निराळ्या विशिष्ट शासनयंत्राखाली आहे. मोठमोठ्या शहरांचा कारभार म्युनिसिपलसंघ व लहान शहरांचा कारभार लोकलबोर्डे पाहतात.

कायदा व न्याय- १९०९ च्या साउथ आफ्रिका ऍक्टानें दक्षिण आफ्रिकेमध्यें वरिष्ट कोर्ट स्थापण्यांत आलें व नाताळ येथील पूर्वीचें वरिष्ठ कोर्ट या कोर्टाचा एक प्रांत विभाग करण्यांत आला. नाताळमध्यें रोमन-डच कायदा क्वचित ठिकाणीं फरक करून व सुधारून लावण्यांत येतो. एतद्देशीयांनां होतां होईतों त्यांचेच कायदे व चालीरीती लागू करण्यांत येतात. १८७८-८७ सालीं एतद्देशीय कायद्यांचा सुधारून सुव्यवस्थित संग्रह करण्यांत आला व १९०१ पासून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. परदेशांतून येथें आलेल्या मजुरांकरितां विशिष्ट कायदे पास केलेले आहेत. मॅजिस्ट्रेटला लहानसहान बाबतींत दिवाणी व फौजदारी अधिकारी आहेत. मॅजिस्ट्रेटच्या निकालावर प्रांतिक कोर्टाकडे अपील करतां येतें. आपसांतील भांडणांचा निकाल एतद्देशीय मुख्य अधिकारी लावूं शकतात. खुनासारख्या गुन्ह्याच्या बाबतींत मात्र त्यांनां तसें करतां येत नाहीं.

धर्म- गोर्‍या रहिवाश्यांपैकीं बहुसंख्याक लोक प्रोटेस्टन्ट पंथाचे आहेत. १९०४ सालीं केलेल्या खानेसुमारींत ४०८८० अँग्लिकन्स; १२१८४ प्रेस्बिटेरीअन्स; ११९९२ वेस्लेयन मेथॉडिस्ट; ११३४० `धी डच रिफार्म चर्च’चे अनुयायी; ४८५२ लुदरन्स; व २१९३ बॅप्टिस्ट; १०४१९ रोमन कॅथॉलिक व यहुदी समाजाचे १४९६ होते. आशिया-खंडस्थ लोकांपैकीं हिंदूंची संख्या ८७२३४ व मुसुलमानांची १०१११ भरली.

शिक्षण- प्राथमिक शिक्षणाखेरीज करून इतर शिक्षण सर्व संयुक्त सरकारच्या हाती आहे. गौरकाय लोकांच्या मुलांनां प्राथमिक शिक्षण सार्वजनिक व खासगी शाळांतून देण्यांत येतें. शिक्षण सक्तीचेंहि नाहीं किंवा मोफतहि नाहीं, पण फीचे दर फारच कमी आहेत. स. १९०९ च्या डिसेंबरमधील ऍक्टानें मारित्झबर्ग येथें एक नॅशनल युनिव्हर्सिटी कॉलेज काढण्यांत आलें आहे. एतद्देशीय मुलांकरिता मिशनर्‍यांनीं शाळा चालविल्या आहेत. सरकारच्या मदतीशिवाय चालविलेल्या खाजगी शाळा व विद्यालयेंहि आहेत.

वृत्तपत्रे:-
नाताळमधील पहिलें वर्तमानपत्र `नेटलीअर’ हें होय. याच्यानंतर `पेट्रिअट’ पत्र निघूं लागलें. हीं दोन्हीं डच पत्रें होतीं. `नेटलविटनेस’ हें पहिलें इंग्रजी पत्र असून त्याचप्रमाणें `नेटल मरक्युरी’ `नेटल अडव्हरटाइझऱ’ ही वृत्तपत्रेंहि आहेत.

इतिहास- १४९७ सालीं वास्को द गामानें दरबान बंदराच्या प्रवेशद्वाराजवळील उंच किनारा पाहिला व त्यानें त्या भागास टेरा नाटालिस असें नांव दिलें. १५७६ सालीं मॅन्युअल डी मेस्क्विटा पेरीस्ट्रोलो यानें दक्षिण आफ्रिकेचा किनारा शोधून काढून नाताळची साग्र हकीकत लिहून काढली. १६८३ सालीं जोहान्ना नांवाचें इंग्रजी गलबत डेलागोआबेच्या किनार्‍यास लागले व त्यावरील तांडेल नाताळ येथें उतरले. दुसरें एक इंग्रजी गलबत १६८४ सालीं नाताळ बंदरांत आले. १६८५ व ८६ सालीं एक इंग्रजी व एक डच अशा दोन गलबतांचा या ठिकाणी नाश झाला. १६८९ सालीं केपटाउन येथील गव्हर्नरानें `नुर्ड’ नांवाचें गलबत हस्तिदंताचा व्यापार करण्यास व डेलागोआबेची मालकी मिळविण्यास पाठविलें. त्याप्रमाणें डेलागोआ बे हें ५० पौंडास खरेदी करण्यांत आलें. १७२१ मध्यें केप सरकारनें येथें बखार घातली पण ती लगेच मोडण्यांत आली. यानंतर एक शतकपर्यंत नाताळकडे यूरोपीयनांनीं लक्ष दिलें नाहीं. १८२४ सालीं केपकॉलनी ग्रेटब्रिटनच्या ताब्यांत देण्यांत आली.

नाताळमध्ये ज्यावेळी ब्रिटिशांनीं प्रथम वखार घातली त्यावेळीं झुलु लोकांचा मुख्य जो चाक्का त्यानें आपल्या अनन्वित अत्याचारानें नाताळचें अप्रतिहत स्वामित्व मिळविलें होतें. १८२३ सालीं फ्रॅन्सिस जार्ज फेअरवेल यानें आग्नेय किनार्‍यावरील लोकांशीं व्यापार करण्यांकरितां एक कंपनी काढली. फेअरवेलनें पोर्ट नाताळ येथें जाऊन चाकाची भेट घेतली व त्याची जखम बरी करून आपल्या कंपनीकरितां नाताळ बंदर व भोंवलातलचा प्रदेश यांची कायमची मालकी मिळविली. स. १८२४ आगस्टच्या २७ व्या तारखेस या मुलुखावर ब्रिटिशांची मालकी जाहीर करण्यांत आली. या ठिकाणीं निरनिराळ्या वखारी घालण्यांत आल्या. १८२८ त चाकाचा भाऊ डिंगान यानें त्याचा वध केला. १८२९ त फेअरवेलहि मारला गेला. १८३१ त डिंगान यानें ब्रिटिश ठाण्यांवर हल्ला केला. स. १८३४ त केपटाउन येथील व्यापार्‍यांनीं नाताळ येथें ब्रिटिश वसाहत स्थापण्याकरितां अर्ज केला, पण तो मान्य झाला नाहीं. १८३५ त दरबान शहराची स्थापना करण्यांत आली. १८३७ त कॅप्टन गार्डीनर याला ब्रिटिश सरकारनें व्यापार्‍यांवर शासनसत्ता गाजविण्याचा अधिकार दिला. पण इंग्रज व्यापारी या गोष्टीस कबूल होईनात.

केपकॉलनी येथील बोअरांना ब्रिटिश अंमलाचा कंटाळा आल्यामुळें त्यांचे थवेच्या थवे जमिनीच्या मार्गानें नाताळमध्यें येऊं लागले. बोअरांची पहिली टोळी पीटर रेटीफ याच्या नेतृत्वाखाली येथे आली. डिंगान यानें रेटीफला त्याच्या अनुयायांसह पोर्ट नाताळ व लगतच्या भागांत राहण्याची लेखी परवानगी दिली. या परवान्यावर सही होऊन दोन दिवस होतात तोंच त्यानें बोअरांवर अचानक छापा घालून त्यांची कत्तल केली, तींत रेटीफ हाहि मारला गेला. या धांदलीचा फायदा घेऊन दरबान येथील इंग्रज वसाहतवाल्यांनीं डिगानवर चाल केली; परंतु त्यांचे बहुतेक सैन्य कामास आले. इकडे बोअर लोकांनीं आपली जमवाजमव करून डिंगानवर हल्ला केला व निकरानें लढून त्याचा पराभव केला. बोअरांनीं राजधानींत शिरून डिंगानच्या सहीचा तो परवाना अगोदर हस्तगत केला. नाताळचे एकछत्री मालक आपण आहोंत असें आतां त्यांनां वाटूं लागलें.

बोअर लोक विजयानंदांत निमग्न आहेत तोच इकडे ब्रिटिशांनीं पोर्ट नाताळ काबीज केले. इकडे बोअरांनीं पीटर मारित्झबर्गची स्थापना केली व नाताळच्या राज्यावर डिंगानचा भाऊ पांडा याला बसविलें. अर्थात हा राजा बोअरांच्या हातांतील बाहुलें होतें हें सांगावयास नकोच.

येवढ्या परिश्रमानें विजय विकत घेतल्यावर आतां बोअरांनां आपण स्वतंत्र व्हावें असें वाटल्यास त्यांत कांहीं नवल नाहीं. `रिपब्लिक ऑफ पोर्ट नाताळ अँड एडजेसेंट कंट्रीज’ या नांवाखालीं एक स्वतंत्र राज्य स्थापण्याची त्यांनीं केपकॉलनीच्या गव्हर्नराजवळ परवानगी मागितली. `आमच्या स्वत:च्याच प्रजाजनांचे स्वातंत्र्य आम्ही मान्य करूं शकत नाहीं, वाटल्यास इतर ब्रिटिश प्रजानांनां बरोबरीचे व्यापारी हक्क आपण देऊं’ असें राणीसरकारचें उत्तर आलें. बोअरांनीं या उत्तराचा निषेध केला. तेव्हां केपकॉलनीचा गव्हर्नर नेपीअर यानें पोर्टनाताळची लष्करी नाकेबंदी करण्याचा जाहीरनामा काढिला. याचवेळीं बोअरांनां आपल्याला नेदरलंड्सची मदत मिळेल अशी आशा वाटून त्यांनीं इंग्लंडला विरोध करण्याचें निश्चित केलें. अशा रीतीनें एकंदर युद्धाची भूमिका तयार झाल्यावर रणशिंग फुंकावयास मुळींच वेळ लागला नाहीं. दोन्ही दळांनीं हालचाल सुरू केली. पहिल्याच धडकीस कॅप्टन स्मिथ याला बोअरांनीं चीत केलें. या अपयशाची बातमी जोहान्सबर्ग येथें पोंचून तेथून ब्रिटिशांच्या साहाय्यार्थ कुमक येऊन ठेपली. या नूतन सैन्यानें पीटर मारित्झबर्गवर चाल करून बोअरांचे शासनमंडळ जें व्होल्क्सराड त्याला शरण यावयास भाग पाडलें. तरीहि ब्रिटिश सरकारास नाताळ ब्रिटिश वसाहत करणें योग्य वाटलें नाहीं. तथापि सर जार्ज नेपीअर याच्या आग्रहामुळें शेवटीं एकदाचें सरकार नाताळ ब्रिटिश वसाहत बनविण्यास कबूल झालें. पण अशी एक अट ठेवण्यांत आलीं की केवळ वर्णभेद, भाषाभेद, अथवा धर्मभेद यांचा कायद्याच्या समान अंमलबजावणीच्या बाबतींत अडथळा येऊं नये. यावेळीं बोअर लोकांत दोन विरुद्ध पक्ष उत्पन्न झाले पण शेवटी व्होल्क्सराडनें सरकारी योजनेस आपली संमतीहि दिली. विरुद्ध पक्षाचे बोअर नाताळ सोडून ट्रान्सव्हालच आरेंजफ्रीस्टेट येथें जाऊन राहिले. पांडा यानेंहि ट्युगेला व बफेलो नद्यांमधील मुलुख ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. १८४३ सालीं नाताळ ब्रिटिश वसाहत म्हणून जाहीर करण्यांत आलें व १८४४ त केपकॉलनीला जोडण्यांत आले. १८५६ त पुन्हां तो केप कॉलनीपासून विभक्त करण्यांत आला. यावेळी नाताळला १६ सभासदांचे एक कायदे कौन्सिल देण्यांत आलें. त्यापैकी १२ सभासद लोकनियुक्त असून ४ सरकारनियुक्त असतात. चहाची लागवड करण्याकरितां स. १८६० मध्यें येथें हिंदी मजुरांनां मुदतबंदीनें आणण्यांत आलें. १८६६ सालीं काफ्रेरियाचा कांहीं भाग वसाहतीस जोडण्यांत आला. इतक्या कालावधींत एतद्देशीयांत शिक्षणप्रसार करण्याचें किंवा त्यांनां सुधारण्याचें सरकारनें मुळींच प्रयत्न केले नाहींत. पांडाच्या जुलुमास कंटाळून एतद्देशीय राष्ट्रजातीचे थवेच्या थवे नाताळांत येत होते. आम्हालुबी या राष्ट्रजातीचा नायक लंगालीबालेली यानें ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारले. पण १८७४ सालीं त्याला पकडण्यांत येऊन बंडाचा बीमोड करण्यांत आला.

बिशप कोलेंझो याला सरकारनें आम्हालुबी राष्ट्रजातीशी केलेले वर्तन आवडलें नाही व त्यानें त्याचा जोरानें निषेध केला. याचा काहीं एक विशेष फायदा न होतां सरकारनें एतद्देशीयांविषयींच्या आपल्या धोरणांत थोडे फेरफार केले इतकेंच. या कोलेंझोनें मरेपर्यंत एतद्देशीयांची बाजू उचलून धरल्यामुळें त्याला `लोकपिता’ असें म्हणत असत. सन १८७२ मध्यें पांडा याचा मुलका केटावाया हा गादीवर आल्यामुळें झुलु लोकांशी कटकटी उपस्थित झाल्या. १८७८ सालीं नातालकडे त्याची वक्रदृष्टि फिरल्यामुळें सरकारनें केटीवायोविरुद्ध युद्ध पुकारून झुलु सत्तेचा समूळ नाश केला. हें भय नाहीसें होतें न होतें तोच ट्रान्सव्हाल येथील बोअरांनीं बंड उभारले (१८८०-८१). माजुना वगैरे ठिकाणीं बोअरांनीं ब्रिटिशांचा पराभव केला. याचा परिणाम ट्रान्सव्हाल रिपब्लिक स्थापण्यांत झाला.

सर गार्नेट वुलसे यानें नियुक्त केलेल्या नूतन झुलु नायकांत लागलेलीं भांडणें बोअरांनीं मध्यें पडून मिटविल्यामुळें बक्षीस म्हणून बोअरांनीं झुलु देशाचा ८००० चौरस मैल भाग आपल्या राज्यास जोडून त्याला `न्यू रिपब्लिक’ असें नांव दिलें. या बोअरांच्या कृत्यानें नाताळवासीय इंग्रज अधिकच खवळले. तथापि स. १८८६ मध्यें या रिपब्लिकला ब्रिटिश सरकारनें आपली मान्यता दिली व १८८८ सालीं तें ट्रान्सव्हालमध्यें समाविष्ट करण्यालाहि ब्रिटिश सरकारनें अनुमति दिली. १८८७ त झुलुलँडचा शेषभाग ग्रेटब्रिटननें आपल्या राज्यास जोडला. १८८४ ते ९१ च्या दरम्यान दरबानचा व्यापार फारच वाढल्यामुळें तें बंदर बनविणें अत्यावश्यक झालें. १८९७ त या कामास सुरवात होऊन स. १९०४ मध्यें तें पुरें झालें. १८८२ सालीं नाताळ वसाहतीस साम्राज्यसरकारनें स्वराज्य देऊं केलें पण वसाहतवाल्यांनीं तें नाकारलें. १८८३ सालीं कायदेकौन्सिलाची पुनर्रचना करण्यांत येऊन २३ लोकनियुक्त व ७ सरकारयुक्त सभासद देण्यांत आले. स. १८९३ मध्यें स्वराज्याचा कायदा पास होऊन व त्याला साम्राज्यसरकारची संमति मिळून नाताळला स्वराज्य मिळालें. १८९७ मध्यें झुलुलँड नाताळला जोडण्यांत आला. इकडे प्रिटोरियन सरकारनें जय्यत लष्करी तयारी चालविल्यामुळें नाताळ येथील प्रधानमंडळाचें धाबें दणाणलें. स. १८९९ मध्यें युद्धाग्नि भडकला. बोअरांनीं फ्रीस्टेट सरहद्दीवरील एक नाताळ आगगाडी ताब्यांत घेतली. यानंतर त्यांनीं लेंगस नेक, न्यूकॅसल हीं शहरें घेतली. टालाना येथील लढाईंत बोअरांच्या एका टोळीचा पराभव झाला. इलँडसलोगट येथेंहि बोअरांचा पराभव झाला. यानंतर बोअर सैन्यानें लेडीस्मिथला वेढा दिला. १९०० सालच्या फेब्रुवारीच्या २८ व्या तारखेस वेढा उठविण्यांत येऊन शहराची मुक्तता करण्यांत आली. तेव्हां बोअर सैनिकांनां नाताळ सोडून जाणे भाग पडलें. या युद्धाचा परिणाम असा झाला की ट्रान्सव्हालचा सुमारें ७००० चौरस मैलांचा भाग नाताळला जोडण्यांत आला. यायोगानें नाताळमधील गोर्‍या लोकांची संख्या एकदशांशानें वाढली व काळ्यांचीहि संख्या तितकीच वाढली. अशा प्रकारें युद्धाचा यशस्वी रीतीनें निकाल लागला तरी सरकारच्या मागची साडेसाती कांहीं संपेना. ज्या डच वसाहतवाल्यांनी युद्धांत शत्रूला कुमक केली त्यांनां क्षमा करण्यांत आली. पण तद्देशीय लोकांच्या बंदोबस्ताचा प्रश्न तितका सुलभ नव्हता. केटीवायोचा मुलगा दिनीझुला याची, आपल्या घराण्यांत पूर्वी राज्य चालत असे ही आठवण अजून जिवंत होती. या सर्व कारणांमुळें नेटिव्ह प्रश्नांचा सांगोपांग विचार करण्याकरितां सरकारनें १९०३-०४ मध्यें एक कमिशन नेमलें. त्या कमिशननें नेटिव्हांनां वसाहतीच्या कारभारांत प्रतिनिधित्वाचा हक्क मिळावा व प्रत्येक वयांत आलेल्या नेटिव्हावर निदान एक पौंड तरी डोईपट्टी बसवावी अशी शिफारस केली. त्याप्रमाणें १ पौंड डोईपट्टी एतद्देशीयांवर बसविण्यांत आली. यामुळें १९०६ साली नेटिव्हांनी बंड उभारलें. मुख्य मुख्य बंडखोरांनां दयामाया न करतां फांसावर चढविण्यांत आलें. या सर्व अनर्थांचें पाप दिनी झुला याच्या माथीं लादण्यांत येऊन बंडखोरांनां आश्रय दिल्याच्या क्षुल्लक आरोपावर त्याला अपराधी ठरविण्यांत आलें. स. १९०६ मध्यें फक्त नाताळ- नेटिव्हांचाच विचार करण्याकरितां कमिशन नेमण्यांत आलें. त्या कमिशनचा रिपोर्ट स. १९०७ मध्यें प्रसिद्ध झाला. त्या रिपोर्टान्वयें एतद्देशीयांचा कारभार चार डिस्ट्रिक्ट कमिशनरांच्या हाती देण्यांत येऊन, एतद्देशीय प्रश्नांचा विचार करण्याकरितां एक कौन्सिल निर्माण करण्यांत आलें.

नाताळ- नेटिव्हांचा प्रश्न हातावेगळा होतो न होतो तोंच हिंदी लोकांचा प्रश्न पुढें दत्त म्हणून उभा राहिला. स. १८९० पासून नाताळमध्यें हिंदी लोकांची दाटी होऊ लागली. काळ्या हिंदी लोकांनीं `स्वतंत्र’ म्हणून येथें राहावें हें गौरकाय यूरोपीयनांस खपलें नाहीं. तेव्हां `इंडियन इमिग्रेशन रॅजिस्ट्रेशन ऍक्ट’, `डीलर्स लायसेन्सेस ऍक्ट’ वगैरेंसारख्या ऍक्टांच्या मालिका हिंदी लोकांनां येथें राहणें व येणें अशक्य व्हावें म्हणून पसार करण्यांत आल्या. स. १९०८ मध्यें नेमलेल्या कमिशननें तर असा निकाल दिला कीं, `मजूर या नात्यानें हिंदी लोकांनीं येथें राहणें अवश्यच आहे, कारण त्याशिवाय आम्हाला चहाकॉफी कशी प्यावयास मिळणार! परंतु या गुलामाच्या नात्याव्यतिरिक्त लोकांनां स्वतंत्र म्हणून येथें राहूं न देतां स्वदेशीं जाण्यास भाग पाडावें. १९०९ सालच्या जूनमध्यें नाताळ दक्षिणआफ्रिका संघांत सामील करण्याचें ठरलें. स. १९१० च्या मेच्या ३१ व्या तारखेस हा संघ स्थापण्यांत आला व नाताळ त्यांत सामील केलें.

लोकसंख्या- स. १९११ च्या खानेसुमारींत नाताळची लोकसंख्या ११९४०४२ होती. तीपैकी ९८११४ गौरवर्णी लोक व उरलेल्या लोकांत बांटू आशियाटिक व इतरांचा समावेश होतो. स. १९१८ मध्यें गौरकायी लोकांची संख्या १२१९३१ होती. नाताळमध्यें गौरकायांची संख्या इतर वसाहतींतील शहरांपेक्षां अधिक आहे. नाताळांत दरबान, पीटरमारित्झबर्ग व लेडीस्मिथ हीं तीन शहरें आहेत. पीटरमारित्झबर्ग या राजधानीच्या शहरी नाताळ- विश्वविद्यालय (कॉलेज) आहे. तसेंच या ठिकाणीं प्रांतिक कौन्सिलची इमारत वगैरेंसारख्या पुष्कळ सुंदर इमारती आहेत. स्वायत्तसंस्थान या नात्याचा दर्जा बदलून आफ्रिकन यूनियनमध्यें नाताळचा समावेश होऊ लागल्यापासून, नाताळमधील गोर्‍या लोकांनां जितकें स्वातंत्र्य पाहिजे तितकें मिळेनासें झालें आहे. त्यामुळें त्यांच्या अंगाचा चडफडाट झाला आहे. यूनियन कौन्सिलमध्यें नाताळच्या प्रतिनिधींनीं इंग्रज सरकारशीं राजनिष्ठ राहण्याचें ठरवून आपलें स्वतंत्र अस्तित्व कायम राखिलें. नाताळचा अंत:कारभार पक्षभेदापासून अलिप्तपणें चालविण्यांत येतो. नाताळचा पहिला कारभारी स्मिथ हा होता. तो स. १९१८ मध्यें मरण पावल्यानंतर, प्लौमन हा मुख्य कारभारी झाला. १९१७-१८ सालामध्यें नाताळचें उत्पन्न १७२००० पौंड होतें. यूनियन सरकारकडून ३६१००० ते ३७५००० पौंड मदत मिळत असे. १९१७-१८ सालीं नाताळचा वार्षिक खर्च सुमारें ३४०००० पौंड होता. त्यापैकीं १६९००० पौंड शिक्षणाकडे खर्च करण्यांत आले.

नाताळमध्यें हिंदी लोकांची बरीच संख्या असल्याकारणानें (१९२१ सालीं १४१३३६) व तेथें त्यांनीं निरनिराळ्या उद्योगधंद्यांनां मदत केल्यामुळें आपल्या हक्काबद्दल त्यांच्या मनांत जागृति उत्पन्न होऊं लागली होती. आफ्रिकेंतील गोर्‍या लोकांनं हें कसें पटणार? त्यांनीं अधिक हिंदी लोक नाताळमध्यें येऊं नयेत याबद्दल खटपट लाविली. हिंदुस्थान सरकारलाहि ही गोष्ट आवडली नाहीं; व त्यानें हिंदुस्थानांतून मुदतबंदी मजूर मिळविण्याची बंदी या गोर्‍या आफ्रिकन लोकांस केली. महात्मा गांधी हे यावेळी आफ्रिकेंत होते; त्यांनीं हिंदी लोकांची बाजू उत्तम रीतीनें पुढें मांडण्यास सुरवात केली. त्यांनीं तेथील हिंदी लोकांची उत्कृष्ट प्रकारची संघटना करून, गोर्‍या लोकांच्या जुलमी कायद्याला प्रतिरोध करण्यास सुरवात केली. गोर्‍या लोकांच्या उद्दामपणामुळें १९१३ सालीं कांहीं दंगेधोपे झाले. १९१४ सालीं, हिंदी लोकांवरचा मिठावरील कर कमी करण्यांत आला. जादा हिंदी लोकांनां नाताळमध्यें येण्याची बंदी करण्यांत आली. पण त्यावेळी जे हिंदी लोक येऊन राहिले होते त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासंबंधी गांधी व स्मटस् यांच्यामध्यें करारनामा झाला. [`दक्षिणआफ्रिका, पहा.]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .