प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ  
       
नामदेव- एक महाराष्ट्रीय संतकवि. सातारा जिल्ह्यांत कर्‍हाडजवळ नरसिवामणी नांवाचें एक खेडें आहे तें नामदेवाच्या घराण्याचें मूळचें राहण्याचे ठिकाण होय. याच खेड्यास सध्या भये नरसिंगपूर म्हणतात. नामदेवाचे पूर्वज जातीनें शिंपी असून ते शिंप्याचा अगर कापड विकण्याचा धंदा करीत. नामदेवाच्या बापाचें नांव रामशेट असून आईचें नांव गोणाबाई होतें. हीं दोघें पंढरपुरास गेलीं व तेथेंच शके १९९२ मध्यें नामदेवाचा जन्म झाला. नामाच्या गणगोताची माहिती पुढील अभंगांत आहे.

गोणाई राजाई । दोघी सासु सुना ।
दामा नामा जाणा । बाप लेक ।।
नारा महादा गोंदा । विठा चौघे पुत्र ।
जन्मले पवित्र । त्याचे वंशी ।।
लाडाई गोडाई । येसा साखराई ।
चौघी सुना पाही । नामयाच्या ।।
लिंबाई ती लेकी । आऊबाई बहीण ।
दासी वेडी जनी । नामयाची ।।

नामदेवास थोडेसें व्यवहारिक शिक्षण देण्यांत आलें तथापि पिढीजाद चालत आलेल्या धंद्यात त्याची गति मुळीच दिसून आली नाही. हा पुढें मोठा विठ्ठलभक्त झाला. विसोबा खेचर हा नामदेवाचा गुरू होय. विसोबा खेचरास मूर्तिपूजा मान्य नव्हती असें म्हणतात. कारण आपल्या गुरूनें आपणास `पाषाणाचा देव बोलेचिना कधी। हरी भवव्याधि केंवी घडे।।‘ (तुकारामतात्या प्रत, अभंग १९१; अगर गाथापंचक; नामदेवगाथा, अभंग १५५) या अभंगांत सांगितल्याप्रमाणें उपदेश केला असें नामदेव म्हणे. ``तुझिया सत्तेनें वेदांसि बोलणें। सूर्यासि चालणें तुझिया बळे’’ या अभंगात ईश्वर कसा सर्वशक्तिमान आहे हें चांगल्या रीतीने दाखविलें आहे. तेव्हां यावरून असें दिसून येईल की जरी नामदेव पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीस भजत असे तरी ईश्वराच्या वास्तविक स्वरूपाचें त्यास ज्ञान होतें; व याच ईश्वराची प्राप्ति करून घेण्यास तो अहर्निश झटत होता. ``व्रत तप न लगे करणें सर्वथा। नलगे तुम्हां तीर्था जाणें तया’’ या अभंगांत अंत:करणाची शुद्धि करून ईश्वर. प्राप्ति करून घेण्यास व्रत, तप, दान, तीर्थयात्रा वगैरे व्यर्थ होत असें नामदेव म्हणतो.

``सर्वांभूती पाहें एक वासुदेव। पुसोनिया ठाव अहंतेचा। तोचि साधु ओळखावा निका। येर ते आईका मायाबद्ध’’ या अभंगांत जो वासुदेवाचा भक्त आहे व जो वासुदेवास सर्वत्र पाहतो अशा माणसाची शुद्ध वृत्ति अगर स्थिति वर्णन करून लोकनिंदेकडे लक्ष न देतां त्यास शरण जाण्याबद्दल नामदेवानें उपदेश केला आहे.

अंत:करणाची शुद्धि, नम्रता, आत्मसमर्पण, क्षमा, ईश्वराची भक्ति हें नामदेवाच्या सर्व उपदेशाचें सार आहे. नामदेवानें हिंदीमध्येंहि कांहीं अभंग केले आहेत. शिखांचा मुख्य धर्मग्रंथ जो ग्रंथसाहेब किंवा आदिग्रंथ त्यांत नामदेवाचे अभंग असून शीख लोक नामदेवाला फार मान देतात. पंजाबांत गुरुदासपूर जिल्ह्यांत घुमन येथें एक नामदेवाची समाधि बांधिलेली असून त्यावरून पंजाबांत महाराष्ट्रांतल्याप्रमाणेंच नामदेवावर केवढी श्रद्धा आहे हें दिसून येतें.

महाराष्ट्रांतील भक्तिमार्गाचे अध्वर्यू ज्ञानदेव, नामदेव व तुकाराम हे म्हणतां येतील. त्यांतल्या त्यांत शेवटच्या दोघां संतांनी महाराष्ट्रांतील खालचा निरक्षर समाज आपल्याकडे ओढून त्याला कसें धार्मिक व सदाचारी बनविलें आहे, हें वारकरी पंथाकडे पाहिल्यास कळून येईल. नामदेवाचे अभंग फार सोपे व परिणामकारक असे आहेत. त्यांचें विवेचन `अभंग’ या लेखांत आढळेल.

नामदेवाच्या ग्रंथाची जी संप्रदायशुद्ध म्हणून गाथा, रा. आवटे यांनी छापिली आहे ती अविश्वसनीय आहे (भा.इ. सं.मं. १८३३), कारण तींत (१) विष्णुदास नामा (शके १५१७) याचे अभंग नामदेवाच्या नांवीं घातले आहेत. (२) संप्रदायशुद्ध गाथेमधील भाषा नामदेवकालीन नाही, विष्णुदासकालीनहि नाही, तर वर्तमानकालीन आहे (३) नामदेवानंतर झालेल्या स्त्रीपुरुषांची (उदाहरणार्थ भानुदास, मिराबाई, कबीर, संताजी पवार रांजणगांवकर, बोधलेबोवा धामणगांवकर) चरित्रें नामदेवकृत म्हणून दिली आहेत. नामदेवाचा जन्मकाळ शके ११९२ हा (स. १२७०) सांगितला आहे. या सनांप्रमाणें पाहिले तर तो ज्ञानदेवाचा समकालीन ठरतो. कारण ज्ञानेश्वरीचा काळ इ.स. १२९० हा आहे पण ज्ञानेश्वरीची मराठी भाषा निर्विवाद अधिक जुनी आहे; व नामदेवाच्या अभांगांची भाषा बरीचशी अर्वाचीन धर्तीवर आहे. नामदेवाच्या हिंदी अभंगाची भाषादेखील इ.स. १३ व्या शतकांतील हिंदी भाषेहून अधिक अर्वाचीन स्वरूपाची भासते. याचें कारण काय हें सांगणे कठीण आहे; तथापि नामदेवाचा जन्मकाळ बराचसा मागें लोटून म्हणजे शके ११९२ हा कल्पून त्यास ज्ञानदेवाचा समकालीन बनविला असला पाहिजे. विष्णुस्वामीच्या अनुयायांत (त्याच्या मागून येणार्‍यांत) नामाजीनें ज्ञानदेवाचा प्रथम उल्लेख केला आहे. नामदेवाच्या मराठी व हिंदी भाषेच्या स्वरूपावरून पाहतां त्याचा काळ जवळजवळ एक शतक अलीकडे ओढला पाहिजे.

नामदेव केव्हां होऊन गेला याची कांहीशी कल्पना, विसोबा खेचरानें (नामदेवाचे गुरु) मूर्तिपूजेचें वैय्यर्थ्य जोरदार शब्दानें वर्णन केलें आहे असें नामदेव म्हणतो, त्यावरून करतां येण्यासारखी आहे. विसोबा खेचर मूर्तिपूजेच्या अगदी विरुद्ध होता असें त्याच्याविषयीं उपलब्ध असलेल्या माहितीवरून दिसते. रामानुजादि पूर्वीच्या ग्रंथकारांनी व त्याच्यानंतर झालेल्या कित्येकांनीं मूर्तिपूजेचें कोणत्या ना कोणत्या रीतीने समथर्न केले आहे. खेचर तर मूर्तिपूजेच्या अगदीं विरुद्ध होता; तेव्हां यावरून तो व त्याचा शिष्य नामदेव हे मुसुलमानी अंमल (अगर वर्चस्व) पूर्णपणें स्थापित झाल्यानंतर होऊन गेले असावेत. दक्षिणेंत मुसुलमानांचा अंमल इ.स. १४ व्या शतकांत सुरू झाला. नामदेवकाली मुसुलमानांचा मूर्तिपूजेविषयीचा द्वेष हिंदुधर्मांत शिरून सुमारे १०० वर्षांचा काळ लोटला असला पाहिजे. पण दक्षिणेत मुसुलमानी अंमल सुरू झाल्यानंतर नामदेव होऊन गेला याविषयी अगदी प्रत्यक्ष प्रमाण अगर खात्रीचा पुरावा म्हटला म्हणजे नामदेवानें आपल्या एका अभंगात तुरकांनीं मूर्ती विध्वंसिल्याबद्दल उल्लेख केला आहे हा होय (तुकारामतात्या प्रत, अभंग ३६४). हिंदु लोक पूर्वी मुसुलमानांस `तुरक’ म्हणत असत हें प्रसिद्ध आहे. तेव्हां नामदेव बहुतकरून चवदाव्या शतकाच्या अखेरीच्या सुमारास होऊन गेला असावा असें प. वा. डॉ. भाडारकर सिद्ध करतात. [वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजिअस सिस्टिम्स]. नामदेवाच्या सर्व कुटुंबानें एकाच वेळी पंढरपूरच्या देवद्वारी समाधी घेतली अशी आख्यायिका असून विठोबाच्या देवळांत नामदेवाच्या समाधीची पायरी दाखविण्यांत येते. नामदेव शिंपासमीज या पायरीला आपले पवित्र धर्मस्थान मानतो; व ती जागा बडव्यांच्या ताब्यांतून घेण्याचा त्या समाजाचा प्रयत्न चालू आहे.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .