प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ  
        
नारळ (माड)- याची लागवड उष्णकटिबंधांत फार प्राचीन काळापासून होत आहे. तरी जगाच्या व्यापारी दृष्टीनें याला अलीकडे म्हणजे ३०-४० वर्षांतच महत्त्व प्राप्त झाले आहे. माडाची लागवड सर्व उष्णकटिबंधांत समुद्रकाठीं होते तरी फिलिपाईन बेटांत हल्लीं फारच मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. सर्व जगांत व्यापाराकरितां म्हणून जेवढें खोबरें तयार होतें त्याचा तिसरा हिस्सा फिलिपाईन बेटांत तयार होतो. खोबरें व खोबरेलतेल यांचा खप जर्मनी व फ्रान्स देशांत फार होतो. माडाची पैदास डच ईस्ट इंडीज, स्ट्रेट सेटलमेन्टस्, फिलिपाईन बेटें, सिलोन, हिंदुस्थान, झांजीबार, मलाया स्टेटस्, निकोबार, लखदिव व मालदिव बेटें वगैरे देशांत मुख्यत्वेंकरून होते.

इतिहास- हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर यांमधील बेटांत ही झाडें असल्यामुळें त्यांची फळें तेथून अमेरिका, चीन, सयाम, ब्रह्मदेश व हिंदुस्थान येथें वहात आलीं असावीं असा समज आहे. स्पॅनिश, पोर्तुगीज व डच प्रवाश्यांनीं यांचा प्रसार बराच केला असावा; सध्यां नारळाला निरनिराळ्या देशांत इतकीं निरनिराळीं नांवें आहेत. त्यावरून त्या त्या देशांत नारळ गेल्यास फार कालावधि झाला असला पाहिजे. परंतु पूर्वेकडे अमेरिकेपासून पश्चिमेकडे मादागास्करपर्यंत नारळाला जीं नांवें आहेत त्यांतील बरीच संस्कृत भाषेंतील `नारीकेल’ शब्दापासून झालेली आहेत. यावरून हें झाड मूळचें अमेरिकेंतील नसून आशियांतील असणें अधिक संभवनीय आहे. यावरून तें हिंदुस्थानंतीलच असेल असें नाहीं तर संस्कृत भाषेच्या प्रसाराबरोबर नारळाची लागवड वाढत गेली एवढेंच म्हणतां येईल. तथापि नारळाच्या उत्पत्तिस्थानासंबंधीं बराच वाद आहे.

हिंदुस्थानांत माडाची लागवड मलबारचा किनारा, मद्रासचा पूर्वकिनारा, कारवारचा पश्चिम किनारा, कोंकण, काठेवाड वगैरे प्रांतांत फार आहे. गोदावरीच्या मुखाजवळील माड फार उत्तम समजले जातात. त्या ठिकाणी दर माडास २०० नारळ म्हणजे बेताचें उत्पन्न समजलें जातें. माडाची लागवड पार प्राचीन आहे, तरी त्यामानानें त्याच्या जाती फार थोड्या आहेत असें म्हणावें लागतें. माडाची लागवड बियांपासून होत असल्यामुळें त्याच्या जाती फारशा नाहींत ही गोष्ट लागवडीच्या दृष्टीनें फार महत्त्वाची आहे. नाही तर रायवळ आंब्याची जशी स्थिती आहे तशीच माडाचीहि झाली असती. एकंदरींत ज्या जातीचें बी त्याच जातीचे झाड उत्पन्न होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं.

आतां खोबर्‍यासाठी माडाची लागवड करावयाची असेल तर बियांसाठीं नारळ मोठेच असले पाहिजेत असे नाहीं. कारण नारळ लहान असला तरी त्यापासून खोबरें मोठ्या नारळापेक्षां जास्त निघण्याचा संभव असतो. म्हणून ज्या माडाला पुष्कळ नारळ येतात त्याचेच नारळ बियांसाठी घ्यावे हें उत्तम. मोठे परंतु थोडे नारळ ज्या झाडास येतात त्याचे नारळ बियांसाठीं घेण्यांत फायदा होणार नाहीं. लवकर लागास येणार्‍या माडाचे नारळ बियांकरितां घ्यावे. ते नारळ माडावरून उतरून घ्यावे, वरून टाकूं नयेत. कारण वरून टाकल्यामुळें तो दुखावतो व कदाचित् त्याला चीर पडते व त्यामुळे तो रुजत नाहीं. नारळ उतरल्यानंतर कोरड्या हवाशीर जागीं महिनाभर नीट ठेऊन द्यावे. रुजत घालतेवेळीं त्यांतील बहुतेक पाणी आटून जावयास पाहिजे व खोबरें घट्ट झालेलें असावें, तसेंच बियाचे नारळ फार लहान माडाचे किंवा फार ढांकीचे (जुन्या झाडांचे) हि काढूं नयेत, मध्यम वयाच्या झाडाचे काढावे. कित्येक ठिकाणीं पेंदीच्या (लोंबर्‍याच्या) शेंवटाकडील नारळ बियांसाठीं ठेवण्याची वहिवाट आहे; परंतु यांचा उपयोग खरोखर होतो किंवा नाहीं हें खात्रीनें सांगतां येत नाही.

नारळ रुजत घालण्याच्या पद्धतीमध्यें स्थानपरत्वें फरक दिसतो. फिलिपाईनबेटांत हल्लीं माडाचीं लागवड फार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळें तिकडे मोठमोठे वाफे करून त्यांत नारळ रुजत घालतात. ही जमीन पहिल्यानें बर्‍याच वेळां चांगली नांगरतात व आंतील सर्व घाण, तण, मुळ्या वगैरे काढून टाकतात. जमीन निदान एक फूटपर्यंत तरी खोल पोकळ व्हावयास पाहिजे. वाफे सहा ते आठ फूट रुंद असून मधून रस्ते असतात. नारळ रुजत टाकतात त्यांमध्यें ४ इंच अंतर ठेवतात. नारळ वाफ्यांत आडवाच ठेवून त्याचा अर्धा किंवा दोनतृतीयांश भाग जमिनींत पुरून टाकतात, व पेंढा, गवत किंवा असेंच दुसरें कांहीं गवत रीक कापून तें त्यावर पातळ अंथरतात. याच्या योगानें वाफ्यामध्यें ओलावा चांगला रहातो व नारळ वाळून जात नाहींत. एकदां पाणी दिल्यानंतर पुन्हां पाणी देण्याचें कांहीं कारण नाहीं. नारळ रुजून कोंब २-२।। फूट वाढला व मुळ्या ४-८ इंचांपर्यंत बाहेर आल्या म्हणजे रोपा लावण्यास योग्य झाला असें समजतात. यापेक्षां मोठा झाल्यास तो काढून लावण्याच्या जागीं नेण्यास व लावण्यास त्रास पडतो. रोपा लहान असला म्हणजे नारळांतील अन्नरस कोंबाला मिळत असल्यामुळें त्याला अपाय वगैरे कांहीं होत नाहीं व म्हणून तो लवकर जीव धरतो. लहान रोपा लावण्यास खर्चहि फार कमी येतो. तसें मोठ्या रोप्याचें होत नाहीं.

हिंदुस्थानांत नारळ काढल्यावर ते एक दोन महिने घरांत ठेऊन नंतर जमिनींत तिरपे लावून पुरून टाकतात, व ते रुजल्यावर हिंवाळ्यांत किंवा पाऊस बेताचा असेल तर पावसाळ्यांत कायमच्या जागीं लावतात. कित्येक ठिकाणीं रोपे दोन वर्षांचे होईपर्यंत कायमच्या ठिकाणी लावीत नाहींत. कारवारकडे नारळ विहिरीमध्यें टाकून त्यांनं मुळ्या व कोंब फुटल्यावर ते विहिरींतून काढून एकदम कायमच्या जागीं लावतात. जावा वगैरे बेटांत नारळ घरच्या वळचणीला टांगून ठेवून तेथेंच त्यांनां मुळ्या व कोंब फुटल्यावर ते कायमच्या जागीं लावून देतात. गोवा प्रांतांत नारळ जमिनीमध्यें अर्धा पुरतात.

माडाला जमीन पुळणवट लागते. काळ्या किंवा चिकण जमिनींत पाण्याचा चांगला निचरा होत असल्यामुळें माड चांगले होत नाहींत. कोंकणांतील आगराचें गांव समुद्रालगत असल्यामुळें तेथील (समुद्रकांठची) बागेंतील जमीन जास्त पुळणवट असते व पूर्वेकडील जमीन जरा बर्‍यापैकी असते. पूर्वेकडील भागांत पोफळी लावतात व पश्चिमेकडील भागांत माड लावतात. जमिनी फारच चढत्या असल्यामुळें रहाटाचें पाणी साध्या पाटानें शेवटच्या माडापर्यंत पोंचत नाहीं. यासाठी चिर्‍यांचे पक्के पाट बांधून त्यांतून पाणी न्यावें लागतें. दुष्काळाच्या वर्षी किंवा उन्हाळ्यांत विहिरींनां पाणी कमी पडल्यास जेवढें पाणी मिळेल तेवढें प्रथम पोफळींनां देऊन राहिल्यास माडांनां देतात किंवा मुळींच देत नाहीत. गोवा प्रांतांत व इतर कित्येक ठिकाणीं खाजणांमध्ये तीन चार फूट उंचीचे व पंधरा फूट रुंदीचे लांब लांब बांध असतात. त्यांवर माड लावण्याची वहिवाट आहे. हे बांध म्हणजे खाचरांतील माती काढून त्याचेच केलेले असतात. दोन बांधामधील चरांतून भरतीचें पाणी येत असतें. बांधावरच्या माडांनां लहान आहेत तोपर्यंत हातपाणी द्यावें लागतें. अशा रीतीनें जरी या माडांची जोपासना केलीं तरी त्यांनां चांगलीशी फळें येत नाहींत. रोपे लावण्यासाठीं खड्डे तीन फूट हम चौरस खणावे. रोपे लावतेवेळी एखादें विशेष खत घालण्याची वहिवाट नाहीं. रोप्याचा नारळ जमिनीत सुमारें फूट सव्वाफूट राहील अशा बेतानें लावावा. पुढें खड्डा आपोआप भरून येईल. कोंकणांत रोपे लावण्याची वेळ म्हणजे हिवाळा ही होय.

झाडें जितकीं जास्त तितकें उत्पन्न जास्त अशी सामान्य समजूत असल्यामुळें झाडें दाट लावण्याची मालकाची नेहमीं प्रवृत्ति असते. परंतु ही पद्धत फार घातक आहे. कारण माडाला ऊन व हवा विपुल मिळेल तर माड चांगला लागास येतो. यासाठीं रोपे २५ फुटांपेक्षां जवळ लांवू नयेत; त्यामध्यें अंतर ३० फूट असल्यास चांगलेंच. वार्‍यापासून माडांचें रक्षण व्हावें म्हणून त्यांच्या भोंवतीं दुसरीं झाडें लावावीं; या कामासाठीं विशेषत: करंज व भेंड झाडें हीं फार चांगलीं; कारण करंजापासून तेलासाठीं बिया, राबासाठीं पाला व कवळ मिळतें; भेंडीचीं झाडें फार लवकर वाढतात आणि त्यांच्या लांकडाला भावहि चांगला येत असल्यामुळें यांच्यापासूनहि उत्पन्न चांगलें मिळतें. समुद्रकिनार्‍यालगत पाऊस फार असल्यामुळें पावसाळ्यांत नारळाच्या बागेंत दुसरें कसलेंहि पीक घेणें शक्य नसतें. तागाचें वगैरे बीं पेरल्यास त्यावर झांपावरील पाणी पडून तें मरून जातें. कदाचित् भाद्रपद महिन्यांत ताग पेरल्यास बिवड चांगलें तयार होण्याचा संभव आहे. परंतु यासंबंधी प्रयत्न झालेले नाहींत. कोंकणांत माडांनां पावसाळ्याच्या आऱंभी एक एक ओझें पांढर्‍या कुड्याचा टाळ घालण्याची वहिवाट आहे. ऐपत असल्यास कांहीं लोक शेणखत व मीठ (दर माडास एक पायली किंवा चार पौंड) देतात. मीठ देण्याची वेळ श्रावण महिना होय. ज्यांनां वर्षास मीठ घालण्याची ऐपत नसेल त्यांनीं दोन वर्षांनीं एकदां द्यावें. वेंगुर्ल्याकडे दर माडास दहा पौंडप्रमाणें मासळी देतात.

माड लहान आहेत तोपर्यंत त्यामध्यें कोणतेंहि पीक घेण्यास हरकत नाहीं. परंतु बाग जुनी असली व मेलेले माड भरून काढावयाचे असले म्हणजे पीक काढतां येणार नाहीं. कारण पूर्वीच्या माडांमुळें भरपूर सावली होऊन दुसरें पीक काढणें किफायतशीर होणार नाहीं. तरी सुद्धां केळी, पोपया, अननस, काफी वगैरे पिकें काढतात. माडाच्या बागेंतील जमीन नांगरण्याची इकडे वहिवाट नाहीं. परंतु फिलिपाईन बेटांत माड दोन वर्षांचे झाले व रोप्यांनीं मुळ्या चांगल्या धरल्या म्हणजे वर्षांतून दोनदां सर्व जमीन नांगरानें नांगरून व तव्याच्या कुळवानें कुळवून घेतली असतां पीक उत्तम येतें असें दिसून आलें आहे. नांगरतांना झाडाच्या जवळ तीन फूट जमीन सोडली पाहिजे व नांगरहि चार इंचांपेक्षां खोल लावूं नये. माडाच्या मुळ्या फारशा खोल नसल्यामुळें नांगरीनें कांहीं मुळ्या तुटतील ही गोष्ट खरी आहे, तरी माडाला ७००० पेक्षां जास्त मुळ्या असल्यामुळें त्यांपैकीं थोड्या दुखविल्या तरी हरकत नाहीं. मुळ्यांची लांबी ७-१८ फूट असते व त्या ३-४ फुटांपेक्षां खोल जात नाहींत. त्यांची जाडी ३ इंच असते. नांगरानें नांगरल्यावर खालच्या मुळ्यांनां चलन मिळून त्याच खोल जाऊं लागतील व पुढील नांगरीणीच्या वेळीं मुळ्या त्या मानानें फारशा दुखविल्या जाणार नाहींत. नांगरटीनें जमिनींतील द्रव्यें मोकळीं होऊन तीं खोल गेलेल्या मुळांनां मिळूं लागतील, हा नांगरटीचा विशेष फायदा होय. तो न नांगरलेल्या जमिनींतल्या माडांनां मिळत नाहीं. ज्या बागांतून शक्य असेल त्यांत नांगरट करून काय फायदा होतो तो पहावा.

खतांसंबंधीं सविस्तर माहिती वर सांगितलीच आहे; याशिवाय माडाचे जे भाग निरुपयोगी असतील ते सर्व जाळून त्यांची राख माडाच्या बुंधाशीं पुरून टाकावी.

सिलोनमध्यें नारळाची सर्व चोडें (सालें) माडांच्या बुंधाशीं अळ्यासारखी ठेवतात; याच्या योगानें अळें झांकलें जाऊन त्याच्यांतील पाणी निघून जात नाहीं; नंतर शेवटीं ती कुजलीं म्हणजे त्यांचें खत होतें. आपल्याकडे थरपे (दांडे) पोया, चोडें, करट्या वगैरे सर्व सर्पणासाठी वापरतात; यासाठीं त्यांची राख होईल तेवढी तरी निदान माडाला परत दिली पाहिजे. मद्रास इलाख्यांत ज्या माडांनां कांहींच नारळ येत नाहींत त्यांच्याभोवतीं चांगलीं अळीं करून धैचाचें (तांबड्या देंठाच्या शेवरीचें) बिवड, शेणखत व ६।८७ पौंड मासळीचें खत दिल्यानें ज्या माडांनां पूर्वी दहा नारळ सुद्धां येत नसत त्यांनां दुसर्‍याच वर्षी ४७ नारळ आले असा अनुभव आहे.

फिलिपाईन बेटांत नारळांचा उपयोग विशेषत: तेल गाळण्यासाठी करतात. तिकडे खोबर्‍याची किंमत रंगावर व वजनावर असते; तेलाच्या प्रमाणावर नसते. परंतु ही स्थिती जाऊन तेलाच्या प्रमाणावर त्याची किंमत केली जाईल असा रंग दिसत आहे. नारळ चांगला जून झालेला असला म्हणजे त्याचें तेल जसें निघतें तसें कोंवळ्या नारळाचें निघत नाही. शिवाय कोंवळ्या नारळाचें खोबरें वाळल्यानंतर देखील त्याच्या अंगीं हवेंतील पाणी शोषून घेण्याची शक्ति असते. त्यामुळें त्याला एक प्रकारचा वास येतो व त्यावर बुरशी येते त्यामुळें त्यांतील बरेंच तेल नाहीसें होतें. यासाठीं उत्तम प्रकारचें खोबरें पाहिजे असेल तर माडावरून नारळ मुद्दाम न पाडतां आपोआप पडतील तेवढेच गोळा करणें चांगलें असा अनुभव फिलिपाईन बेटांत आला आहे. परंतु इकडचा अनुभव असा आहे कीं नारळ सुमारें पाऊण हिस्सा जून झाला म्हणजे त्यापासून तेल जास्त निघतें. शिवाय आपल्याकडील बागा फार लहान असल्यामुळें व चोरांचें भय फार असल्यामुळें नारळ पडेपर्यंत झाडावर राहूं देणें शक्य नसतें. खोबर्‍यासाठीं नारळ पाडावेच लागले तर एक महिनाभर तरी ते कोरड्या जागेंत सांठवून ठेवावे.

माडावर चढण्यासाठीं त्याच्यावर खांचा करण्याची वहिवाट आहे. परंतु ही पद्धत फार नुकसानकारक आहे. खांचा करणें झाल्यास त्यांत पाणी रहाणार नाहीं अशा बेतानें त्या कराव्या. पायंड्यांच्या साहाय्यानें वर चढणें चांगलें.

उत्पन्न- माड फार दाट लावले असल्यास उत्पन्न फार कमी येतें. कांहीं ठिकाणीं दर झाडास १० नारळ देखील लागत नाहींत. ज्या ठिकाणीं माडांची उत्तम प्रकारची निगा आहे त्या ठिकाणीं उत्पन्नाचें प्रमाण असें असते :- सातव्या वर्षी १५ नारळ, आठव्या वर्षी २५ नारळ, नवव्या वर्षी ४० नारळ व दहाव्या वर्षी ६० नारळ. यापुढें ५० ते ६० वर्षेपर्यंत उत्पन्न इतकेंच रहातें. सुमारें साडेचार नारळांपासून एक खेर (२ पौंड) खोबरें निघतें व दहा नारळांपासून पावणेदोन पाइंट तेल (सुमारें २ शेर) निघतें. कित्येक ठिकाणीं याहिपेक्षां जास्त उत्पन्न येतें. गावठी घाण्यांत तेल काढल्यास पुष्कळ तेल फुकट जातें, म्हणजे शेंकडा तीस ते पन्नासपर्यंत निघतें. परंतु नवीन तर्‍हेच्या यंत्राच्या साहाय्यानें तेल काढल्यास शेंकडा ६५ ते ७० पर्यंत तेल निघतें. यंत्राच्या साहाय्यानें तेल काढण्याचे कारखाने फक्त मलबारांत कोचीन येथें आहेत. कोचीन येथील तेल इतर ठिकाणच्या तेलापेक्षां चांगलें समजलें जातें. याचें कारण तेथील नारळ पूर्ण जून झालेले असतात व खोबरें वाळवतात; त्यावर कसलीहि घाण पडूं देत नाहींत.

खोबरेल तेलाचा उपयोग खाण्याकडे व मेणबत्त्या आणि साबण करण्याकडे होतो. काडलिव्हर ऑईल, सिट्रोनेला ऑईल वगैरे तेलांत मिसळण्यासाठीहि याचा उपयोग होतो. खोबरेल तेलापासून एक प्रकारचें लोणी तयार करितात; तें गाईम्हशींच्या लोण्यापेक्षां किंवा चरबीपेक्षां उत्तम असतें. कारण ते मुळींच नासत नाहीं. यामुळें त्याचा उपयोग पावबिस्किटें वगैरे करण्यासाठीं फार होतो. फ्रेचं सरकारनें या लोण्याचा उपयोग सैनिकाकरतां करण्याची परवानगी दिल्यामुळें खोबरेल तेलाला व त्यापासून तयार केलेल्या लोण्याला फार भाव येतो. तेल काढल्यानंतर जी पेंड शिल्लक रहाते तिला पुन्नाक असें म्हणतात. या पेंडीत तेल जितकें जास्त असेल तितकी ती जास्त कसदार समतात व त्यावर तिची किंमत ठरविली जाते. खोबर्‍याच्या व पेंडीच्या किंमतीचें प्रमाण ४:१ असें असतें. पेंडीचा उपयोग दुभत्या जनावरांकरितां व बैलासारख्या कामाच्या जनावरांकरितां करितात.

खोबरें उन्हांत वाळवितात परंतु त्यांत पाणी शेंकडा ९ पर्यंत असतें. उत्तम खोबर्‍यांत शेंकडा सहापेक्षां जास्त पाणी असूं नये. यासाठी खोबरें वाफेनें किंवा गरम हवेनें तापवितात. याच्या योगानें ओले ताजे नारळ वाफेनें वाळविल्यास १५ तासांत व गरम हवेंत वाळविल्यास ४ तासांत तयार होतात. धुरानें वाळविलेल्या खोबर्‍यांत पाणी शेंकडा २० पेक्षां देखील जास्त राहतें म्हणून ही पद्धत फार वाईट होय.

माडापासून होणारे कांहीं जिन्नस, सुंभ:- सुंभासाठीं नारळ काढावयाचे असल्यास ते साधारणपणें कोंवळेच काढावे लागतात. अगदीं कोंवळे नारळ असल्यास काथ्या लवकर तुटतो. पूर्ण जून झालेल्या नारळाचीं चोडें कुजत नाहींत. सुंभ काढण्याचे कारखाने सिलोन, मलबार, लखदिवबेटें, फेडरेडेट मलाया स्टेटस् यांमध्यें आहेत. काथ्या करण्यासाठी पहिल्यानें खाजणांत खार्‍या पाण्यांत चोडें कुजत टाकतात. गोड्या पाण्यांत चोडें चांगलीं कुजत नाहींत व काथ्या वाईट होतो असें म्हणतात. तेथें तीं सहा महिनेपर्यंत कुजल्यावर तीं काढून कुटून त्यांच्यापासून काथ्या तयार करतात. काथ्या चांगला किंवा वाईट हें माडाच्या जातीवर अवलंबून आहे असें दिसतें. सिलोनमध्यें चाळीस नारळांपासून सहा पौंड काथ्या निघतो. मद्रासकडे १८ नारळांपासून व लखदिवकडे ६० नारळांपासून सहा पौंड काथ्या निघतो; परंतु लखदिवच्या एक पौंड काथ्यापासून २२० फूट लांब सुंभ बनतें, व मद्रासच्या तेवढ्याच काथ्याचें १३२ फूट सुंभ होतें. यंत्राच्या साहाय्यानें दोरखंडें व सुंभ तयार करण्याचे कारखाने मुंबई इलाख्यांत नाहींत. सुंभ हातांनीच वळून त्याचा घरगुती कामाकडेच फक्त खर्च होतो. व्यापारीदृष्ट्या याला महत्त्व नाही.

माडी:- माडाची पोय कोंवळी कापल्यास तिच्यांतून जो रस येतो त्याला माडी म्हणतात. मद्रास इलाख्यांत ताडापासून ताडी काढतात. ठाणें व सुरत जिल्ह्यांत शिंदीपासून शिंदी काढतात. माडाची पोय कापल्यावर फूल व फळ धरत नाहींत. माडाची लागवड आहे तेथें माडी काढण्याची पद्धत सर्वत्र चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत ब्राह्मण लोक सहसा आपले माड माडीसाठी वहावयास देत नाहींत; भंडारी लोक देतात. एका माडापासून १.४० लिटर माडी रोज निघते. माडाच्या एक ते तीन पोया कापतात. यापेक्षां जास्त पोया एकाच वेळी कापीत नाहींत. पोयींतून २५ ते ४० दिवसपर्यंत माडी वहात असते. माडी दिवसांतून तीन वेळ काढतात व प्रत्येक वेळीं नवीन काप घेतात म्हणझे रस जोरानें येतो. एका माडावरून दुसर्‍या माडावर जाण्यासाठी बांबू बांधून त्याचा उपयोग करण्याची वहिवाट इकडे नाही. परंतु फिलिपाईन बेटांत व इतर कित्येक देशांत ही पद्धत आहे.

गूळ:- गोवा प्रांतांत ताज्या माडीपासून गूळ करतात. या गुळाचा खाण्याकडे हि उपयोग करितात. गूळ सीमेंट व चुना यांच्यामध्यें मिसळला असतां तो घट्ट होऊन त्यावर पॉलिश अथवा तकाकी चांगलीच चढते.

रोग– माडाला अनेक प्रकारचे रोग होतात. त्यांत `कोंब कुजणें’ या नांवाचा रोग मद्रास इलाख्यांत फार भयंकर आहे. मुंबई इलाख्यांत हा रोग फारसा नाहीं. या रोगापासून क्यूबा बेटांत भयंकर नुकसान झालेलें आहे. त्याचप्रमाणें हा रोग जमेका, त्रिनिदाद, मद्रास, सिलोन, पोर्तुगॉल, आफ्रिका या देशांत आहे. दुसरा एक रोग झांपांच्या शेवटच्या पात्यांवर दिसून येतो. याच्या योगानें पात्या पांढर्‍या होऊन गळून पडतात. याला उपाय म्हणजे रोगट पानें तोडून जाळून टाकावीं आणि नंतर बार्डोमिश्रण शिंपडावें. १५-२० दिवसांनीं हेंच मिश्रण पुन्हां शिंपावें. मुंबई इलाख्यांत हा रोग फक्त ताडावर पडतो, माडावर फारसा आढळत नाहीं; तरी तो माडावरहि पडण्याचा संभव आहे. तिसरा रोग माडांतून तांबूस रस गळणें; हा रोग एका प्रकारच्या अलिंबापासून होतो. हा रोग विशेषत: सिलोन व दक्षिण मलबारांत आहे. यास उपाय- हा रोग दिसल्याबरोबर रोगट जागा पूर्णपणें कापून काढून जाळून टाकणें. रोग फार झाला असल्यास सर्व झाड तोडून जाळून टाकावें.

भुंगे:- माडाला दोन प्रकारचे भुंगे लागून त्यापांसून फार नुकसान होतें. या भुंग्यांवर औषध, विष वगैरे कांहींच लागू पडत नाही. यामुळें ही कीड कमी करण्याचा उपाय म्हणजे लांकूडफांटा वगैरे कुजणारे जिन्नस बागेंत राहूं देऊं नयेत. दुसरा उपाय म्हणजे ८-१० फूट लांबरुंद व तीन फूट खोल असे खड्डे खणून ते घाणेरड्या कचर्‍यानें, शेण, कुजकीं लांकडें यांनीं भरून काढावे. म्हणजे त्यांमध्यें हे भुंगे अंडी घालतात, व त्याच ठिकाणीं त्यांच्या आळ्या होतात. दोन महिन्यांनीं हे खड्डे उकरून पाहिल्यास खड्ड्याच्या कडेला पुष्कळ किडे सांपडतील, ते सर्व वेंचून मारून टाकावे.

माडाला दुसरा शत्रू म्हणजे उंदीर, उंदरापासून नारळाचें संरक्षण होण्याकरितां माडावर पाचसहा फुटांवर पत्रे मारतात. हे पत्रे खालच्या बाजूला सुटे व बाहेर झुकते असतात. शिवाय त्यांची खालची बाजू थोडी कातरलेली असते. यामुळें उंदरांनां या पत्र्यावरून वर चढतां येत नाहीं. माडाच्या झाडाचा जितका उपयोग होतो तितका दुसर्‍या कोणत्याहि झाडाचा बहुधां होत नसेल. माडाचीं बहालें,वांसे, पन्हळ वगैरे चांगलीं होतात. पानांचे झांप वळून त्यांनीं घरें शाकारतात. पात्यांचे हीर काढून त्यांचें खराटे उत्तम होतात. नारळाच्या करवंटीचा उफयोग गुडगुडी, लहान लहान भांडी, बटणें वगैरे करण्याकडे होतो.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .