प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ   

नारु-
ह्याला इंग्रजीत ``गिनीवर्म``असें म्हणतात. व प्राणिशास्त्रांत याचें नांव ``फिलॅरिया मेडिनेब्सिस्``असें आहे. हा एक परकायोपजीवी कीटक आहे, व हा केव्हां केव्हां मनुष्याच्या शरीरांत आपलें ठाणें देतो व मनुष्यप्राण्यास पुष्कळ इजा करतो. हा प्राणी हिंदुस्थानांत दक्षिण, सिंध या प्रांतांत, व इराण, तुर्कस्तान, अरबस्तान व आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशांत आढळून येतो. हा या सर्व ठिकाणीं सारख्याच प्रमाणांत आढळून येत नाहीं. कांही ठिकाणी कमी व कांही ठिकाणीं जास्त अशा प्रमाणानें आढळून येतो. दक्षिणेंत कांही कांही ठिकाणीं वर्षा व शरदृतूंत साधारणत: अर्ध्या लोकांनां हा नारूचा रोग होतो. व आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील बहुतेक सर्व निग्रो लोकांनां या रोगानें पछाडलेलें आढळतें, यूरोपांत हा रोग क्वचितच होतो. कारण त्यास कायमचें ठाणें देण्यास हवापाण्याचें आनुकूल्य मिळत नाहीं. तेथें कधीं कधीं हा रोग मनुष्येतर प्राण्यांस म्हणजे गाय, बैल, कुत्रा, घोडा इत्यादि प्राण्यांसहि होतो. अगदीं लहानाहून लहान नारूची लांबी १२।।। इंच असते. व अगदीं मोठयाहून मोठया नारूची लांबी ४० इंच असते. व सरासरीनें पहातां याच्या तंतूची लांबी ३० इंच असते. या किड्याचा व्यास सरासरीने १/१० इंच असतो. याचें शरीर लांब, गुळगुळीत, व दोर्‍यासारखें एकसारखें असतें व याचा वर्ण दुधासारखा पांढरा असतो. याच्या शेपटीचें टोंक थोडेसें वळलेलें असून त्या टोंकाचा मनुष्याच्या शरीराच्या भागाशीं चिकटून राहण्याकरितां आकडीसारखा उपयोग होतो असें म्हणतां येईल. या किड्याचें डोक्यावरील टोंक बोथट असतें, व शेवटी या टोंकाचें शिरकवच होतें. या किड्याचें तोंड फार लहान असून त्रिकोनी असतें.

मनुष्याचे हात, पाय, व शरीराचा मुख्य भाग यांच्या चामडीच्या खालील भागांत नारु आपलें ठाणें देतो. नारु म्हणजे या किड्याची मादी होय. हा नारू पूर्णदशेस पोंचला म्हणजे तो आपल्या स्वाभाविक बुद्धीनें हळू हळू वाट काढीत खालीं जाऊ लागतो व शेवटीं तंगडीत किंवा पायांत येतो. शेंकडा ८५ रोग्यांस पायालाच नारू होतो.नारू आपल्या अंतिमस्थानी आला म्हणजे तो आंतल्या जाड त्वचेस भोंक पाडतो. या ठिकाणीं कांहीं दाहजनक पदार्थ उत्पन्न झाल्यामुळें वरील पातळ त्वचेवरहि एक लहानसा फोड उत्पन्न होतो. कांहीं काळानें हा फोड फुटून त्याच्या जागीं एक लहानसा उथळ व्रण दिसून येतो. या व्रणाच्या मध्यभागीं एक लहानसें छिद्र असतें. कधीं कधीं फोड फुटतांच या छिद्रांतून नारुचें डोकें बाहेर आलेलें दिसतें. पण साधारण नियम असा आहे कीं, नारू असा पहिल्याप्रथम बाहेर दिसत नाहीं. व्रणाजवळ जर स्पंजाच्या तुकडयानें थंड पाण्याचा प्रवाह सोडला व असें करतांना व्रणाच्या मध्यभागीं असलेल्या छिद्राकडे बारकाईनें पहात राहिलें, तर नारूचें अस्तिव दिसून येतें. ह्या छिद्रांतून बाहेर पडलेल्या पदार्थाचा एक थेंब जर सूक्ष्मदर्शक यंत्राखालीं ठेवून पाहिला तर त्यांत वेटाळ्यासारखे व कांहीं हालचाल करीत नसलेले असे लक्षावधि नारवांचे गर्भ दृष्टीस पडतात.

सायक्लॉप्सच्या (खेंकड्याच्या वर्गांतील सूक्ष्म प्राणी) शरीरांत जें नारूचें स्थित्यंतर होतें त्याचा शोध पहिल्यानें तुर्कस्तानांतील फेडस्केन्को या शास्त्रज्ञानें लाविला. या शास्त्रज्ञाचें असें मत होतें कीं, हा सायक्लॉप्स प्राणी पिण्याच्या पाण्याबरोबर मनुष्याच्या पोटांत जातो व तेथें त्याचें पचन होऊन जातें. अशा रीतीनें त्याच्या शरीरांतील नारू मोकळे होतात व हळू हळू मनुष्याच्या त्वचेखालच्या भागांत येतात.

नराबद्दल कांहीं खात्रीलायक माहिंती नाहीं. तशीच मादीची गर्भधारणा केव्हां व कोठें होते याबद्दल सुद्धा कांहीं खात्रीची माहिती नाहीं. बहुतकरुन मादी मोठी होण्यापूर्वीच तिची गर्भधारणा होत असावी; आणि नराचें काम झाल्याबरोबर तो मरत असावा व मादीच्या शरीरांतच त्याचें शोषण होत असावें असें दिसतें. मनुष्याच्या शरीरांत नारूची पूर्ण वाढ झाली म्हणजे नारू पायाकडेच जातो व पायावरील किंवा तंगडीवरील कातडीला भोंक पडतें. कारण पाण्याच्या डबक्याशीं (ज्यांत नारूचा मध्यस्थ म्हणजे सायक्लॉप्स असतो त्या) शरीराच्या इतर भागापेक्षां पायांचाच अधिक स्पर्श होतो. तसेंच नारू झालेल्या भागाला पाण्याचा स्पर्श झाला म्हणजे नारू आपलीं अंडी बाहेर टाकतो. तसेंच नारु पिकला म्हणजे लोक त्यावर पाण्याची धार सोडतात, अथवा नदींत किंवा तळ्यांत पाय ठेवतात. याचें कारण पाणी पाहून नारू आपलीं अंडी घालण्याकरितां बाहेर निघावयाचा संभव असतो. पण नदींत पाय ठेवल्यानें नारवाचा प्रसार होण्यास मात्र आयतेंच साधन होतें.

मनुष्याच्या शरीरांत नारू केव्हां केव्हां पूर्णावस्थेस येण्यापूर्वीच मरून जातो. अथवा पूर्णावस्थेस पोंचला तरी एखाद्या वेळीं कातडीस भोंक पडत नाहीं. या दोन्ही गोष्टींपैकीं कोणतीहि गोष्ट घडून आली तरी तेथें विद्रधि होण्याचा संभव असतो अथवा नारूचें खडूसारख्या पदार्थांत रूपान्तर होतें. असें झालें म्हणजे पुष्कळ वर्षेपर्यंत चामडीखालीं एखाद्या कठिण दोरीप्रमाणएं नारूचीं वेटाळीं हाताला लागतात.

उपचार- फार दिवसांपासून, नारू झाला म्हणजे त्याचा बाहेर निघालेला भाग एखाद्या काडीला बांधून त्या काडीला रोज एक दोन फेरे देऊन हळूहळू नारूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. केव्हां केव्हां या प्रयत्नाला यश येतें, परंतु यामुळें नारू तुटूनहि जातो. अशा रीतीनें नारू तुटला म्हणजे त्याचे परिणाम फार वाईट होतात; नारूचे असंख्यात गर्भ बाहेर पडून शरीरांत प्रवेश करतात व त्या जागेचा दाह होतो व ताप येतो, नंतर गळवें होतात व तो भाग सडून जाण्याचा संभव असतो. यांतून नीटपणें बरें होण्यास फार दिवस लागतात. कधीं कधीं कायमचा अनिष्ट परिणाम घडून येतो. म्हणजे हाताचे अगर पायाचे सांधे जखडले जातात. केव्हां केव्हां तर मृत्यूहि येतो. म्हणून अशा रीतीनें नारूस जबरीनें बाहेर काढण्याचा मार्ग बरा नव्हे. कांहीं वैदू लोक नारू काढण्याच्या कामांत वाकबगार असतात. जें काम डॉक्टर-वैद्यांकडून होत नाही तें हे लोक सहज व थोड्या पैशांत करतात. पण पुष्कळांचा या लोकांवर विश्वास नसतो.

नारू झालेल्या भागास जर कांहीं इजा होऊं दिली नाही, व तो भाग वारंवार थंड पाण्यानें धुतला तर नारूच्या गर्भाशयांतील अंडी हळू हळू आपोआप बाहेर येतात. अशा रीतीनें सर्व अंडी बाहेर पडेपर्यंत नारू बाहेर येत नाही; त्यास बाहेर काढूं लागलें तर तो त्याचा प्रतिकार करतो. बहुतकरून नारूच्या शेंपटीला असलेल्या आकडीमुळें त्याला चिकाटी धरून राहतां येतें. परंतु १५-२० दिवसांत सर्व अंडी बाहेर आलीं म्हणजे नारू आपोआप बाहेर येतो. यावेळेस हळूहळू एखाद्या काडीला गुंडाळून नारू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या बाहेर पडण्यास पुष्कळ मदत होते. सर्व अंडी बाहेर पडण्याच्या पूर्वी मात्र कधीहि ओढाताण करूं नये. पाण्याचे हपके मारून नारू धूत असतांना जर कांहींहि बाहेर आलें नाहीं तर बहुतकरून सर्व अंडी बाहेर पडलीं असें समजावें.

एमिली नांवाच्या फ्रेंच शास्त्रवैद्यानें नारूवर एक दुसराच उपचार सुचविला आहे. हा उपाय केला तर नारूचीं सर्व अंडी बाहेर पडण्याची वाट पहात रहावें लागत नाही; अथवा नारू तुटून जे भयंकर परिणाम होतात त्यांचेंहि भय बाळगावें लागत नाहीं. नारू जर बाहेर दिसत असला, तर त्या नारूच्या छिद्रांत १००० त १ या प्रमाणाचें मर्क्युरिक लोशन, किंवा रसकापराचें पाणी प्रॅव्हॅझच्या पिचकारीनें घालावें. म्हणजे नारू मरतो. नंतर चोवीस तासांनीं नारू सहज बाहेर काढतां येतो. जर नारू बाहेर दिसत नसला, तर जेथें तो हाताला लागत असेल त्याच्या अगदीं होईल तितक्या जवळ वरील मर्क्युरिक लोशनची पिचकारी मारावी. नारूच्या सभोंवतीं ४५ निरनिराळ्या ठिकाणीं असें करावें, म्हणझे हा नारू मरतो. या मेलेल्या नारूचें पुढें शरीरांत शोषण होऊन जातें. अथवा चिरा देऊन त्याला काढावा म्हणजे झालें. या उपायाचा काळजीपूर्वक उफयोग केला म्हणजे कोणत्याहि प्रकारचा घातक परिणाम होत नाही. याशिवाय अमरपत्ती नांवाच्या वनस्पतीची पानें नारूवर रामबाण आहेत असें म्हणतात. त्याचप्रमाणें जास्त प्रमाणांत हिंग पोटांत घेतला असतांहि नारू मरतो असें म्हणतात. [भिषीग्वलास, प. १५].

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .