प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ    
       
नाशिक, जिल्हा- मुंबई इलाख्यांतील मध्य भागांतला एक जिल्हा. उ.अ. १९३५’ ते २०५३’ व पू.रे. ७३ १५’ ते ७५५६’. क्षेत्रफळ ५८५० चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) ८३३५७६. याच्या उत्तरेस खानदेश, आग्नेयीस निझामचा मुलुख, दक्षिणेस अहमदनगर, पश्चिमेस ठाणा जिल्हा व धरमपूर, सुरगणा आणि डांग मुलुख. हा सर्व जिल्हा समुद्रसपाटीपासून १३०० ते २००० फूट उंचीवर वसला आहे. पश्चिमेकडील डांग भागांत बरेच पर्वत असून यांवर फक्त खरीप पिकें येणें शक्य आहे. पूर्वेकडील `देश’ भाग मात्र सुपीक असून मोकळा आहे. सातमाळ किंवा चांदवड पहाडावरून दोन्ही बाजूंनां वहाणार्‍या, पूर्वेस गोदावरी व पश्चिमेस गिरणा दोन नद्या या आहेत. सर्वांत उंच शिखर धोडप (४७४१ फूट). इतर बरींच ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचीं लहान लहान शिखरें आहेत. दिंडोरी व नाशिकमध्यें एक लहान पर्वत आहे; यावरच चांभारलेणीं आहेत. गोदावरी ही मोठी नदी असून हिला मिळणार्‍या नद्या दारणा, कादवा व गिरणा वगैरे आहेत. गिरणा नदी शेतीस फार उपयोगी असून तिला अनेक धरणें बांधिलीं आहेत. या जिल्ह्यांत किल्ले बरेच असून मराठ्यांशी लढाई झालेली अशी बरींच ठिकाणें यांत आहेत. येथील हवा फार चांगली आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंत समुद्राकडील वार्‍यामुळें हवा समशीतोष्ण असते.

इतिहास:- इ.स. पूर्वी दुसर्‍या शतकापासून इ.स.च्या दुसर्‍या शथकापर्यंत येथें आंध्र घराण्याचा अंमल असून राजधानी पैठण (नाशिकच्या आग्नेयीस ११० मैल) येथें होती. पुढें कांहीं काळ अनुक्रमें चालुक्य, राठोड व देवगिरीचे राजे यांचेहि अंमल होते. इ.स. १२९५ ते १७६० पर्यंत मुसुलमानांपैकीं अनुक्रमें देवगिरीचे राजे गुलबुर्ग्याचे बहानी राजे, अहमदनगरचे निजामशाही राजे व मोंगल सरदार यांनीं राज्य केलें. इ.स. १७६०-१८१८ पर्यंत येथें मराठेशाही होती; त्यानंतर हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यांत गेला.

नाशिक हें पौराणिक शहर असून येथें देवालयें बरींच आहेत. बौद्ध व जैन गुहाहि पहाण्यासारख्या आहेत. गोविंदेश्वर येथें जी देवळें आहेत तीं सर्वांत उत्तम आहेत. बागलाणमध्यें कळवण येथील जोगेश्वर देवळांतील नकशीकाम फार सुरेख आहे. इ.स. १९०६ त येथें सत्रप वंशाच्या वेळचीं बरींच नाणीं सांपडलीं.

या जिल्ह्यांत एकंदर ३८ डोंगरी किल्ले असून यांचे दोन प्रकार आहेत; सह्याद्रीवर असणारे व मध्यभागाच्या चांदवड पहाडावर असणारे. सह्याद्रीवर एकंदर २३ किल्ले आहेत; पैकीं मुख्य गलन, अंजनेरी, त्रिबक, कुलंग, अलंग व कळसुबाई हे होत. चांदवड पहाडावर पंधरा किल्ले आहेत; पैकी अंकई, चांदवड व धोडप हे मुख्य होत. हे सर्व किल्ले बहुधां सारखेच आहेत. हे बहुतेक शिवाजीनें बांधले आहेत. मार्कंड हा किल्ला राष्ट्रकूटांच्या वेळेस होता.

लोकवस्ती:- यांत शहरे व १६४९ खेडीं आहेत. लो.सं. (१९२१) ८३२५७६. १९०१ सालीं लो.सं. दुष्काळामुळें कमी झाली. मुख्य शहरें नाशिक, मालेगांव, येवला, इगतपुरी, सिन्नर, मनमाड, नांदगांव व त्रिंबक हीं असून येथील मुख्य भाषा आहे. या जिल्ह्यांत ब्राह्मण, मराठे, कुणबी, कोळी, भिल्ल, वंजारी, साळी, ठाकुर, वारली, तेली, महार, वगैरे मुख्य जाती असून शेंकडा ५९ लोक शेतकी, ९ मजुरी व २ भिक्षा मागून उपजीविका करतात. येथील जमीन ४ प्रकारची आहे. ती :- (१) नदीकांठची (लालसर काळी माती), (२) उंच प्रदेशांतील (हलकी काळी माती), (३) घाटाशेजारची (पिंगट माती) व (४) सर्वांत सुपीक अशी लालसर माती) खताचा उपयोग बगीच्यांत करतात. येथें बहुतेक रयतवारी पद्धति आहे. पण कोठें कोठें इनाम जमिनीहि आहेत. मुख्य पिकें बाजरी, गहू, ज्वारी, तांदूळ, नागली, कुळीथ, तूर, हरभरा, गळिताचीं धान्यें, कापूस (मालेगांव), तंबाखू, ऊस वगैरे. बागांत द्राक्षें, पेरू, बटाटे, भुइमूग, विड्याचीं पानें होतात. एकाच शेतांत अनुक्रमें नाचणी, साव व खुरासणी पेरतात. तीन वर्षांनंतर जमीन पडीत ठेवितात. येथें रेड्यांकडूनहि शेतीचें काम करवितात. येथें बकर्‍यांचे गैराणी व हराणी असे दोन प्रकार आहेत.

कालवे:- या जिल्ह्यांत कदवा नदी व परसुल तलाव यांचे कालवे आहेत, त्यांपैकी पहिला कालवा ६३ चौरस मैल जमिनीला पाणी पुरवीत असून यांत दिंडोरी व निफाड येथील पालखेड कालव्याचा समावेश होतो. येथील विहिरी ६ ते ३२ फूट खोल असतात.

जंगलप्रदेश:-
याचे तीन वर्ग आहेत :- गिरणा, गोदावरी व पेठ. रक्षिक जंगलाचे खुरटें जंगल, इमारती लांकडाचें (साग), सर्व काळ हिरवें असणारें व बभळीचें जंगल असे ४ प्रकार आहेत.

व्यापार:-
येवलें येथे सुती, रेशमी व जरीचें कापड तयार होऊन बाहेर जातें. मालेगांव व विंचूर येथें हातमागावर कांहीं कापड होतें. नाशिक येथें पितळ,कांसें, चांदी वगैरे धातूंची फारच उत्तम भांडी तयार होतात.

निर्गत माल:-
धान्य, गळिताचीं धान्यें, काकवी, रेशमी व सुती कापड, सण-ताग, तांबें, पितळेचीं व चांदीचीं भांडी, कांदे, विड्याचीं पानें व लसूण.

आय़ात माल:-
कच्चें रेशीम, सूत, तांबें व पितळ, साखर, किरकोळ सामान व मीठ. दर आठवड्याला बाजार भरतो व नाशिक व त्रिंबक येथें यात्रा भरतात. येथें फार दूरदूरची मंडळी यात्रांनां येतात.

स्थानिक व्यापाराचीं शहरें:-
इगतपुरी, नाशिक, लासलगांव, नांदगांव, मनमाड, येवला, चांदवड, मालेगांव वगैरे.
नाशिक जिल्ह्यांत ग्रेट इंडियन पेनिशुला रेल्वे, दौंड- मनमाड रेल्वे व हैदराबाद गोदावरी व्हॅल रेल्वे हे तीन आगगाडीचे मार्ग आहेत. याशिवाय ५७० मैल लांबीचा बैलगाडीचा रस्ता आहे.

दुष्काळ:- १३९६ ते १४०७ मध्यें दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाला अजून लोक विसरले नाहींत. १४६०, १५२० व १६२९ या सालीं साधारण दुष्काळ पडले. इ.स. १७९१-९२ त फिरून मोठा दुष्काळ पडला तो पेशव्यानीं धान्याची निर्गत बंद करून व अन्य तर्‍हांनीं कसातरी बंद केला. स. १८०२-४ त पेंढारी लोकांमुळें अर्धा शेर गहूं ११ आण्याला विकत मिळे. १८९६-९७ त फिरून थोड्या प्रमाणांत दुष्काळ पडला. स. १८९९ त पाऊंस मुळींच पडला नाहीं. इ.स. १८९९-१९०० त वाजवीपेक्षां ३१८९० मनुष्यें जास्त मेलीं. या दुष्काळाचे परिणाम कमी करण्याकरितां एकंदर खर्च ४५ लक्ष (यांत ११०८ लक्ष सार्‍याची सूट सुद्धा धरली आहे.) झाला महायुद्धाच्या वेळचा दुष्काळ सर्वत्र सारखाच जाणवला.

कारभार:- जिल्ह्यांत १२ तालुके आहेत ते :- नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, चांदवड, येवला, नांदगांव, मालेगांव, बागलाण, कळवण व पेठ. येथील कलेक्टर हा सुरगणा संस्थानचा पोलिटिकल एजंट असतो. स. १८१८ त थोडा होळकरांनीं इंदूरजवळच्या भागाऐवजी दिलेल्या व पेठच्या बेगमेकडून आलेल्या भागांमुळें नाशिकचा विस्तार झाला. १८१८ साली नाशिकचा भाग अहंमदनगराकडे तोडून दिला होता, परंतु स. १८६९ त नाशिकचा भाग अहंमदनगराकडे तोडून दिला होता. परंतु स. १८६९ त नाशिकची सध्या आहे तशी विभागणी केली. इतर जिल्ह्यांच्या मानानें येथें शिक्षण मागें असे. इ.स. १९०१ त याचा शिक्षणाच्या बाबतींत २४ वा नंबर लागला होता. एकंदर शेंकडा ४.३१ लोकांनां लिहितां वाचतां येत होतें. अलीकडे मात्र वाढ होत चालली आहे.

तालुका:- नाशिक जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ४७० चौरस मैल. यांत ३ शहरें व १३४ खेडीं आहेत. तालुक्याची लोकसंख्या (१९१७) ११४८१७. याचा पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. यांतील जमीन सुपीक नाहीं. येथील हवा बरी आहे. पाण्याचा पुरवठा सह्याद्रीशेजारी खेरीजकरून सर्वत्र चांगला आहे.

शहर– मुंबई, नाशिक जिल्हा. ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेवरील नाशिकरोड स्टेशनाच्या वायव्येस ४ मैलांवर गोदावरी नदीच्या कांठीं, उत्तर अक्षांश २०व पूर्व रेखांश ७३५१’ यांवर हा गांव वसलेला असून डाव्या किंवा पूर्वेच्या तीरावर पंचवटी क्षेत्र आहे व उजव्या तीरावर दक्षिणेच्या अंगास जुनें गुलशनाबाद अथवा मुसुलमानी नाशिक आहे व याच्या उत्तरेस नवें मराठी नाशिक आहे. यापैकी सर्वांत महत्त्वाचें जुनें मुसुलमानी नाशिक ही हिंदूंची फार जुनी वसाहत असून तिचा भर्हुत येथील चैत्यावरील शिलालेखांत (८७) व पांडव लेण्यांतील १९ व २१ या शिलालेखांत उल्लेख आलेला आहे.

याच्या आसपास नऊ टेंकड्या असून याचें मूळ नांव नवशिख असावें. येथील हवा निरोगी व सुखकर आहे. येथें उन्हाळा फारसा होत नाहीं व पश्चिमेकडील वारा नेहमीं वहात असतो. पाऊस सरासरी २९ इंच पडतो. उष्णतेचें मान सरासरी ८४ आहे.

येथें वकील, जमीनदार, भिक्षुक, व्यापारी, सावकार, कांसार, वगैरे सर्व धंद्याचें लोक आहेत. येथें बरींच घरें दुमजली असून दगडी चौथर्‍यांवर आहेत. आदितवार पेठेंतील व पुलावरील वस्ती चांगली असून तींतच पेशव्यांचे वाडे आहेत. येथील पुष्कळ घरांवर लांकडी खोदकाम असून तें फार सुबक आहे. जरी या शहराभोंवती तट नव्हता तरी कांहीं वेशी आहेत. नाशिक हें वर्‍हाड- मध्यप्रांत आणि समुद्रकिनारा यांच्या मध्यावर असल्यामुळें येथें फार प्राचीन कालापासून व्यापार चालत असे. मुसुलमानी अमदानींत काझीपुरा व उर्दूबाजार या व्यापारी पेठा होत्या, पेशवाईमध्यें तिउंधा अथवा चौकामध्यें सर्व घडामोडी चालत असे. परंतु हल्लीं मोठ्या सडकेवर व पुलावळ मुख्य दुकानें आहेत. येथें सर्व प्रकारच्या मालाची विक्री चालते.

नाशिक येथें सर्व जिल्हाधिकारी रहातात. येथें म्युनिसिपालिटी, दवाखाना, तुरुंग, ३ हायस्कूलें व बर्‍याच मराठी शाळा आहेत. शिवाय एक मुलींची इंग्रजी शाळा आहे. १९२४ सालीं एक आर्ट्स कॉलेज निघालें. येथें प्रवाशांकरितां दोन बंगले आहेत.
येथील म्युनिसिपालिटीची स्थापना १८६४ सालीं झाली असून १८७४ सालीं तिला शहर म्युनिसिपालिटी करण्यांत आलें. पाणी बहुतेक गोदावरीचेंच वापरतात. याखेरीज धोंडो महादेवाच्या हौदाचें पाणीहि चांगले असून पिण्याकरितां नेतात. येथील गटारांची वगैरे व्यवस्था असावी तितकी चांगली नाही.

देवळें:- येथें एकंदर जवळ जवळ ६० देवळें आहेत; यावरून यास पश्चिम काशी असें म्हणतात. येथें जैनांचा आठवा तीर्थंकर चंद्रप्रभसूरि याचें कुंतिबिहार नांवाचें देवालय असल्याबद्दलचा प्रथम उल्लेख जिनप्रभसूरि या जैन ग्रंथकारानें १४ व्या शतकांत केला आहे. सांप्रत याचा कोठें मागमूस लागत नाहीं. यानंतर १६८० सालीं अवरंगझेबाच्या दक्षिणेतील सुभेदारानें आदितवार पेठेंतील सुंदरनारायण व उमा-महेश्वर आणि पंचवटींतील रामजी व कपालेश्वर वगैरे २५ देवळें पाडल्याबद्दलचा उल्लेख आढळतो. जुन्या गढीवरील महालक्ष्मीच्या देवळाची त्यानें जामामशीद बनविली. हल्लीचीं बहुतेक मोठाली देवळें पेशवाईमध्यें बांधली आहेत. यापैकीं बहुतेक पेशव्यांच्या कुटुंबातील माणसें, त्यांचे नाशिक येथील प्रतिनिधी राजेबहाद्दर व नारोशंकर, ओक, चंद्रचूड वगैरे सरदार, अहिल्याबाई होळकर वगैरेंनीं बांधलेलीं असून पुष्कळांनां वर्षासनें वगैरे आहेत.

शिल्पकामाच्या दृष्टीनें पंचवटींतील रामाचें देऊळ, नारोशंकराचें देऊळ व सुंदरनारायणाचें देऊळ हीं उत्तम आहेत. पैकी रामाचें मोठें पण साधें आहे. नारोशंकराचें  लहान असून त्याचें नक्षीकाम सुंदर आहे व सुंदरनारायणाचें देऊळ दोन्ही दृष्टींनीं मध्यम आहे. शहराच्या आसपास निरनिराळी तीर्थें व कुंडें आहेत. नाशिक आणि गोवर्धन गंगापूर यांच्या दरम्यान गोवर्धन, पितृ, गालव, ब्रह्म, ऋणमोचन, कण्व अथवा क्षुधा, पापनाशन, विश्वामित्र, श्वेत, कटि व अग्नि अशी अकरा कुंडें आहेत. यांखेरीज बद्रिकासंगम, शुक्लतीर्थ, अस्थिवलय, सूर्य, चक्र, अश्विनी, अहिल्यासंगम वगैरे अनेक तीर्थें व कुंडे आहेत. गोदावरीचें सान्निध्य व तिला येऊन मिळणारे अरुणा, वरुणा, सरस्वती, इ. फांटे, त्याप्रमाणेंच ब्रह्म व अस्थिवलय हीं कुंडे व विशेषत: राम, सीता व लक्षअमण याचें वास्तव्य, या सर्व गोष्टींमुळें नाशिक हें फार पवित्र क्षेत्र मानलें गेलें आहे.

येथील सर्वांत पवित्र तीर्थ म्हणजे रामकुंड हें होय. येथें नेहेमी व विशेषत: सिंहस्थामध्यें हिंदुस्थानांतील सर्व भागांतून यात्रेकरू येतात. येथील क्षेत्रोपाध्यायाजवळ इतर क्षेत्रांप्रमाणें यजमानांच्या नांवाच्या चोपड्या अशतात. यात्रेकरू येथें तीर्थविधि, गंगापूजा, नगरप्रदक्षिणा, वगैरे करून कपालेश्वर, काळाराम, सीतागुंफा, तपोवन इ. स्थळें पाहून यात्रा संपवितो. येथील मुसुलमानांच्या काळचे अवशेष म्हटले म्हणजे जुनी गढी, दिल्ली दरवाजा, काझीपुरा दरवाजा, जामामशीद, पीरजादची कबर व इतर लहानसहान २२ मशीदी हे होत. जोगवाडा पेठेमध्यें दरग्याजवळ मदीना येथील सय्यद सादशहा हुसेन कादरी सरमस्त याची कबर असून तेथें फाल्गुन व।। पंचमीस उरूस भरतो.

इतिहास:- नाशिक शहरास कृतयुगामध्यें पद्मनगर, त्रेतायुगांत त्रिकंटक, द्वापारयुगांत जनस्थान आणि कलियुगांत नवशिख अथवा नाशिक अशी नावें होतीं. यांपैकीं जनस्थानाचा रामायणांत उल्लेख आहे. येथें राम रहात असून त्याच्याशी संबंध असलेली तिउंधा, पंचवटी, सीतागुंफा, तपोवन, शूर्पनखेचें नाक वगैरे स्थानें दाखविण्यांत येतात. नाशिक या शहराचा नासिक्य (महाभाष्य ६२६) य नांवानें पतंजलीनें उल्लेख केलेला आहे. त्यानंतर जबलपूरच्या ईशान्येस भर्हुत येथील स्तूपामध्ये एका कठड्यावरील शिलालेखांत नाशिक शहराचा उल्लेख आहे (ख्रिस्तपूर्व २००). त्यानंतर पांडव लेण्यांमधील १८ व १९ या शिलालेखांत नाशिकचा उल्लेख (ख्रिस्तपूर्व १२५-१००) आढळतो; त्यावरून त्या कालीं नाशिक येथें व्यापारी श्रेणी (पेढ्या) असून नाशिक हें तेव्हांपासून भरभराटींत आहे असें दिसतें. टॉलेमीनें (इसवी सन १५०) नासिका या नांवानें याचा उल्लेख केला आहे. वराहगिहिराच्या बृहत्संहितेंत नाशिक हें नांव आढळतें. १४ व्या शतकाच्या आरंभी जिनप्रभसूरि यानें याचें एक अध्यायभर वर्णन आपल्या तीर्थांच्या वर्णनांत केलेलें आहे.

१४ व्या शतकामध्यें नाशिक, दिल्लीचा दौलताबाद येथील सुभेदार याच्या सत्तेखाली होतें; तें पुढें बहामनी राजांच्या हातीं गेलें. पुढें तें अहमदनगरच्या राज्यांत मोडत असे व त्यांच्यापासून पुढें मोंगलांनीं घेतलें. एका मुसुलमान सुभेदारानें याचें नांव गुलशनाबाद असें ठेविलें होतें. पण हें पेशव्यांच्या ताब्यांत (१७५१०५२) गेल्यावर त्याचें पूर्वीचें नाशिक हें नांव पुन्हां प्रचारांत आलें. १७६०-६१ मध्यें नाशिक हें मराठ्यांचें एक मोठें शहर होतें व गोपिकाबाईनें येथें बरींच देवळें व कुंडें बांधलीं. राघोबादादानें येथून जवळच असलेल्या चौंधस या गांवाचें आनंदवल्ली (पहा) असें नांव ठेवून तेथें एक वाडा बांधला. १७९० तील कागदपत्रांवरून नाशिक हा संगमनेर सुभ्यांतील एक महाल असून त्याचें उत्पन्न १६७७६० रुपये होतें. इ.स. १८०३ मध्यें अमृतरावानें नाशिक लुटले. १८१८ त नाशिक येथील सैन्य त्रिंबकेश्वरावर गेलें. व नाशिक शहर ब्रिटिशांच्या ताब्यांत आलें. १८४३ सालीं यूरोपियनांनी येथें एक गाय मारल्यामुळें दंगा झाला होता.

नाशिकच्या पश्चिमेस ६ मैलांवर व आनंदवल्लीच्या पश्चिमेस ३ मैलांवर गोदातीरी गोवर्धन-गंगापूर नांवाचें खेडें आहे (पहा). नाशिकच्या दक्षिणेस ५ मैलांवर अंजबेरी त्रिंबक टेंकड्यांपैकी तीन अलग टेंकड्या असून त्यांपैकीं पूर्वेकडील नाशिकपेक्षां १०६१ फूट व समुद्रसपाटीपासून ३००४ फूट उंच असून तीमध्यें जुनीं (ख्रि.पू. २५० ते ६०० इसवी) बौद्ध लेणीं आहेत. त्यांनां `चांभारलेणीं’ (पहा) असें म्हणतात. [इं.गॅ. पु. १८; ग्रँट डफ; वेरिंग्स मराठाज; बर्टिन्स टॉलमी, मुं.ग. (नाशिक जिल्हा) १६; वि. विस्तार. पु. २१; इं. अँ. पु. २२.]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .