प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
           
निकराग्वा- हें एक मध्यअमेरिकेंतील लोकसत्ताक राज्य आहे. सीमा- उत्तरेस होंडुरस, पूर्वेस कारिबियन समुद्र, दक्षिणस कोस्टिरका व पश्चिमेस पासिफिक महासागर. लोकसंख्या ५,५०,००० व क्षेत्रफळ ४९२०० चौरस मैल. हा देश समभुजत्रिकोणाकृति असून त्याचा पाया कारिबियन समुद्राच्या कडेनें १८० मैल पसरला आहे व त्याचें टोंक थेट पश्चिमेकडे कोझेग्विना नांवाच्या ज्वालामुखीनजीक आहे.

या देशाच्या दोन्हीं किनाऱ्यांचा आकार निरनिराळा आहे. या देशांतील उत्कृष्ट बंदरें येणेंप्रमाणें:- फॉन्सेकाचा दक्षिण फांटा, कोरिंटो, ब्रिटो व सॅन ज्यूअन डेल सूर. या देशाचे स्वभावत: ५ विभाग झाले आहेत. यांतील ज्वालामुखी पवर्त कोझेग्विना, सॅन्टा क्लॅरा, टेलिका वगैरे आहेत. १८३५ साली जानेवारीच्या २० व्या तारखेस काझेग्विनचा अपूर्व व अतिशय भयप्रद असा स्फोट झाला; तो चार दिवस चालू होता.

मनाग्वी व निकाराग्वा या दोन सरोवरांमधून जहाजें चालतात. परंतु या दोहोंनां जोडणार्‍या पनालोया नांवाच्या खाडीमध्यें टिपिटापा शहराजवळ प्रवाह जोराचा असल्यानें जहाजें खाडींतून जात येत नाहींत. निकाराग्वांतील पर्वतांची जी मुख्य ओळ तिला बहुश: कॉर्डिलेरा डि लॉस अन्डिस असें म्हणतात. या मुख्य ओळीस जागोजाग निरनिराळ्या नांवानें संबोधितात. याचें कोणतेंहि शिखर ७००० फुटांहून अधिक उंच नाही. सरोवराकडील बाजू जास्त उभी आहे. परंतु कारिबियनकडील उतरण मोठी नाही. मुख्य पर्वताच्या रांगेच्या पूर्वेस असलेले मैदान म्हणजे निकाराग्वा प्रांताचा अर्धा भाग होतो. येथील प्रमुख नदी म्हटली म्हणजे सिगोव्हिया आहे. हिचें पात्र अरुंद आहे, परंतु लांबीला मध्य अमेरिकेंतील सर्व नद्यांत ही मोठी नदी आहे. या प्रांताचा विशेष म्हणजे इतकाच कीं यांतील सर्व मोठ्या नद्या पूर्व-गामिनी आहेत व पाण्याचा पुरवठा मुख्यत्वेंकरून मुख्य पर्वताच्या ओळीपासून होत नाही.

येथील उंचवट्याच्या प्रदेशावरील हवा यूरोपांतील लोकांस मानवेल अशीच आहे. परंतु इतर ठिकाणीं ती समशीतोष्ण आहे. सरासरी हवामान ८० अंश डिग्री आहे. सरोवराच्या पश्चिमेस पाऊस मुसळधार असतो, परंतु कधी कधी पूर्व किनार्‍यावरही फारच जोराचा पाऊस पडतो. पूर्व किनार्‍यावर उन्हाळ्यांतहि पाऊस असतो. पासिफिकच्या बाजूस कधी भूकंपाचे धक्के बसतात. परंतु इतर ठिकाणच्या मानानें त्यांचा जोर कमी असतो.

सरोवराजवळील सखल प्रदेश व त्याच्या भोंवतालचा उंचवट्याचा प्रदेश हेंच सुधारणेंचे केन्द्रस्थान होय. या भागांतील हवा समशीतोष्ण, सुपीक जमीन व स्वाभाविक जलमार्ग असल्यामुळें युरोपियन लोकांची येथेंच विशेष गर्दी झाली. ब्रिटिश, डच, फ्रेंच वगैरे लोकंशी बेटीव्यवहार सुरू झाल्यामुळे प्रजा संमिश्र होऊं लागली. अपभ्रष्ट स्पॅनिश भाषा हीच बहुतांशी प्रचिलत आहे. इंडियन व निग्रो यांच्या प्रजेस सॅम्बॉस अथवा झॅम्बॉस असें म्हणतात. हे इंडियन लोक अरण्यांत उघड्यावर छावण्यांत किंवा गांवें वसवून राहतात. त्यांची संख्या कांही फार नाहीं.

मॅनाग्वा ही राजधानी व लिअन, ग्रॅनाडा, मसाला ही मुख्य शहरें आहेत. पूर्वी मालाची ने आण खेंचराकरवी होत असे. परंतु पुढें रस्ते बांधण्यांत आले व मालाची देवघेव सुरू करण्यांत आली. पॅसिफिक आगगाडीचा रस्ता या राज्यांत १७१ मैलांचा आहे. इतर रेल्वे तयार करण्याचें घाटत आहे.

दरसाल सरासरी २२५००००० पौंड वजनाची कॉफी निघते. ती मुख्यत्वेंकरून मॅटागाल्फा प्रदेशांत पिकते. कॅरिबियनच्या किनार्‍यावर सोनकेळीं उत्कृष्ट होतात. तंबाखू, तांदूळ, वाटाणे वगैरे येथील उपयोगापुरतेच होतता. निर्गत माल- कॉफी, सोनकेळी, सोनें, रबर, गुरेढोरें, कातडें व लांकडी सामान. आयात माल- कापूस, लोंकरीचें सामान, यंत्रें, दारू, स्पिरिट व औषधें इत्यादि. १९१७ सालीं आयात १२७८६१३ पौंडांची व निर्गत ११९५०५१ पौंडांची होती. बहुतेक व्यवहार कागदी नोटांवरच चालतो व त्यांची किंमत केव्हां केव्हां बदलते. समुद्रावरील जकात, तंबाखू, रेल्वेवगैरे वरील कर या मुख्य उत्पन्नाच्या बाबी होत. १९१९ सालीं उत्पन्न २९१९९८ पौंड व खर्चहि तितकाच होता.

येथील राज्यपद्धति लोकसत्तात्मक असून काँग्रेसच्या दोन मंडळांत ४ वर्षांपुरते निवडलेले ४० डेप्युटी व ६ वर्षांकरितां निवडलेले १३ सिनेटर असतात. अंमलबजावणीच्या खात्याचा मुख्य एक लोकांनीं निवडलेला अध्यक्ष असतो. बव्हंशी रोमनकॅथॉलिक हाच धर्म येथें प्रचलित आहे. परंतु इतर कोणत्याहि धर्मानुयायांस मुभा आहे. येथें प्राथमिक शिक्षण फुकट असून सक्तीचें आहे. यांत तीन विश्वविद्यालयें आहेत.

१५०२ साली जरी कोलंबसनें अमेरिका शोधून काढिली तरी १५२२ पर्यंत निकाराग्वाच्या सर्व भागांत लोकांचा प्रवेश झाला नव्हता. स्पेनच्या लोकांनीं तो सर्व प्रातं घेऊन तेथें आपले वर्चस्व बसविलें. १८२३ सालीं निकाराग्वा मध्यअमेरिकेच्या राष्ट्रसंघांत सामील झाला. पण तो संघ १८३९ सालीं मोडला. राष्ट्रसंघ असेपर्यंत या प्रांतांत बंडाळी व दंगे-धोपे फार माजत असत.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .