प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ   
        
निकोबार- बंगालच्या उपसागरांतील अंदमान निकोबारच्या नांवांच्या बेटांच्या समूहांपैकीं एक समूह. `अंदमान आणि निकोबार’ द्वीपसमूहांची माहिती त्या लेखांत दिली आहे. निकोबार बेटाचें क्षेत्रफळ ६३५ चौरस मैल आहे. यांत एकूण १९ बेटें असून त्यांपैकीं ७ बेटांवर वस्ती नाहीं. लोकसंख्या (१९११) ८८१८. याचें `नक्कावार’ हें मूलचें नांव असून त्याचेंच पुढें निकोबार झाले.

वेगळ्या वेगळ्या बेटांत वेगळ्या वेगळ्या उंचीचे डोंगर आहेत. निकोबारला चांगलें स्वच्छ पाणी नाहीं. फक्त मोठ्या निकोबारवर नद्या आहेत. ननकोवी नांवाचें मोठें बंदर आहे. इतर बंदरें म्हणजे नुसत्या नांगर टाकण्याच्या जागा आहेत. हरएक बेटावर निरनिराळी तर्‍हेची सृष्टिशोभा दृष्टीस पडते. उत्तरेकडून दक्षिणेकडे पहातां करनिकोबार हें तर सपाट पोंवळ्याचें बेट आहे. चौरा हें देखील सपाट जमीनीचें आहे पण दक्षिण भागीं उंच जागा असून डोंगरसपाटी आहे. टेरेसा हें टेंकड्यामय आहे. बोम्पोका ही एकच मोठी ज्वालामुखी टेंकडी आहे. तिलनचाँग ही तर एक लांबच लांब पण अरुंद अशी डोंगराची ओळ आहे. कमोर्टा व ननकोवी हीं दोन्हीहि डोंगराळ आहेत. त्रिन्कट हें तर अगदीं सपाट मैदान आहे.लहन व मोठें निकोबार हीं दोन्हींहि डोंगराळ असून, लहान निकोबारमधीलसर्वांत उंच शिखराची उंची १४२८ फूट आहे. मोठ्या निकोबारमधील शिखराची उंची २१०५ फूट आहे. कारनिकोबार येथें नारळाचीं झाडें बरींच आहेत. हिरवें गवत बेटावर मुबलक असून ठिकठिकाणीं जंगलहि आहें. कांहीं ठिकाणी सृष्टिशोभा फारच रमणीय व आल्हादकारक आहे.

खडकांतून कांहीं कांहीं ठिकाणी तांबें सांपडतें. अंदमान येथील जंगलापेक्षा निकोबारचें जंगल उत्पन्नाच्या दृष्टीने मातब्बर नाहीं. येथील इमारती लांकूड पहिल्या नंबरचें असतें. फलवृक्ष, नारळीची झाडें व सुपारीचीं झाडें चांगलीं फोंफावलेली असतात व बेल, पोपया, संत्रें, लिंबें, सिताफळें इत्यादि झाडें लावली जात आहेत.

मगरी समुद्रकांठीं व नद्यांच्या पात्रांतून बर्‍याचशा दृष्टीस पडतात व मोठें निकोबार, लहान निकोबार व कटचल येथें वानरहि आहेत. येथें `स्पंज’ सांपडतो. पावसाळ्याचे दिवस सोडतां येथील हवामान फार उष्ण आहे. येथें कधीं कधीं वादळें किंवा `चक्रवात’ वारे वहातात. जोराचे भूकंपाचे धक्के मधून मधून बसतात.

इतिहास- टोलेमीच्या वेळेपासून अंदमान निकोबारच्या अस्तित्वाची माहिती आहे. १७ व्या शतकांत मिशनरी लोकांचें लक्ष निकोबार बेटांकडे वेधलें. १७५६ सालीं वसाहतीकरितां डेन्स लोकांनीं हें बेट आपल्या कबज्यांत घेतलें, पण ट्रान्क्वीबारला ही वसाहत जोडल्यामुळें येथें खरी वसाहत झाली नाहीं तेव्हां डेन्स मोरव्हिअन लोकांस वसाहत करण्यास व धर्मप्रसार करण्यास बोलाविलें. पण मोरव्हिअन लोकांस ह्या प्रयत्नांत यश आलें नाही. सन १७८७ तच त्यांचे सर्व प्रयत्न संपुष्टांत आले.

डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी ह्यामुळें फार निराश होऊन हे बेट सोडून गेली (१७७३). विल्यम बोल्टस नांवाच्या एका धाडशी डचमनच्या सांगण्यावरून ऑस्ट्रियन लोक येथें आले, पण ३ वर्षांत त्यांची निराशा झाली. पण डेन्स लोकांनां ह्या कृत्याचा राग येऊन त्यांनीं ननकोरी बंदरावर सन १७८४ ते १८०७ पर्यंत पहारा ठेविला. १७९० व १८०४ साली मोरव्हियन लोकांनीं पुन्हां नवे प्रयत्न केले. नेपोलियनशी झालेल्या लढायांमध्यें सन १८०७ ते १८१४ पर्यंत ही बेटें इंग्लिश लोकांच्या ताब्यांत होती व तीं तहाच्या अटीप्रमाणें डेन्स लोकांस परत केली. १८३१ साली रोजन (डॅनिश) यानें वसाहत करण्याचा पुन्हां प्रयत्न केला, पण मदतीच्या अभावामुळें १८३४ सालीं तो सोडून गेला व १८३७ सालीं ही वसाहत नामशेष झाली, व डेन्स लोकांनींहि ह्या बेटांवरील आपला हक्क सोडून दिला. तेव्हां १८३५ सालीं फ्रेन्च लोक कारनिकोबार येथें आले व सर्व त्रास सोसूनहि हरेसा व चौरा येथें स. १८४६ पर्यंत राहिले व नंतर तेथून गेले. १८४५ सालीं डेन्स लोकांनीं इंग्लिश जहाजांतून `बुश’ नांवाच्या गृहस्थास ही बेटें आपल्या ताब्यांत घेण्यास पाठविलें. १८४८ साली डेन्स लोकांनीं सर्व मलकी सोडून दिली व ह्या बेटांतून आपली वसाहत उठविली. १८५८ सालीं ऑस्ट्रियन्स आले होते पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाही. सन १८६७ त मारेर यानें प्रशियन लोकांस ह्या बेटांचा ताबा घेण्याची सल्ला दिली, पण १८६९ सालीं ब्रिटिश सरकारनें डॅनिश सरकारशीं तडजोडीचें बोलणें लावून ह्या बेटांचा ताबा घेतला व ननकौरीबंदर हे गुन्हेगार लोकांकरितां अंदमानच्या जोडीला वसाहत म्हणून ठरविलें. पण १८८८ त वसाहत करण्याचें बंद करण्यांत आलें. सन १८७१ पासून अंदमान व निकोबार बेटांच्या चीफ कमिश्नराच्या हातीं ही निकोबार बेटें आहेत. येणेंप्रमाणएं निकोबार बेटांवरील वसाहतीची हकीकत आहे.

ब्रिटिश सरकारनें ह्या बेटांवर वसाहत करण्याचा १८८४ सालीं प्रयत्न केलें, पण तो प्रयत्न सिद्धिस गेला नाहीं. मॅनयानें वसाहतीची हकीकत मोठी मजेदार रीतीनें शेवटच्या रिपोर्टीत (अहवालांत) नमूद केली आहे. निकोबार बेटांवर वसाहत करण्यास म्हणजे मोठें भांडवल व विलक्षण चिकाटी पाहिजे असें दिसतें.

यूरोपीअन लोकांनीं आपला ताबा ह्या बेटांवर बसविला होता तरी येथील रहिवासी लोक व खुद्द ननकौरी बंदरांतील लोक चांचेगिरीचा धंदा करीत अशत. व ह्या लोकांनीं पुष्कळ लोकांचा प्राणनाश केला असें आढळून आल्यावरून हा त्यांचा धंदा अगदीं बंद पाडण्यांत आला.

येथील एकंदर लोकसंख्या ६५११. ह्या लोकांत जातिभेद नाहीं. वेगवेगळ्या बेटावरचे लोक वेगवेगळी भाषा बोलतात व अशा एकंदर ६ भाषा प्रचारांत आहेत. कारनिकोबार, चौरा, तेरेस्सा या भाषा त्या त्या बेटांत बोलल्या जातात. एक शतकापूर्वी येथील व्यापारी भाषा पोर्तुगीज होती, पम तिला देखील डॅनिश, जर्मन, इंग्लिश इत्यादि भाषांचे मधून मधून गालबोट लागलेलें आहे. पोर्तुगीज भाषेच्या पूर्वी मलायी व चिनी भाषा बोलत असत.

लोक- अंदमान व निकोबारमधील समाजस्थिति दाखविण्यासाठी ज्ञानकोश विभाग पहिला यांतील पंथभेद, भाषा व जाती दाखविणारी कोष्टकें (पृ. १६५-१६९) उपयुक्त वाटतील. निकोबारी लोक विलक्षण धर्मभोळे असून त्यांच्यांत फार वेढ्या समजुती प्रचारांत आहेत. चोरास किंवा खुनी इसमास फांशी देण्यांत येत असे. पण आतां ही चाल बंद पाडण्यांत आली आहे. भूताखेतांवर तर ह्या लोकांचा फारच विश्वास आहे. मृत मनुष्याचे कपडे व दागदागिने त्याच्या बोरबरच पुरतात. प्रेतें बहुतेक मध्यरात्रीपूर्वी, सूर्यास्तानंतर किंवा प्रात:काळी पुरतात. अशामुळें प्रेतावर किंवा थडग्यावर माणसाची सावली पडत नाहीं असें हे लोक मानतात.

सैतान मारण्याच्या चाली कारनिकोबारमध्यें फार चमत्कारिक आहेत. बायकांनां, पुरुषांनां व कधीं कधीं मुलांनां देखील ह्या समजुतीखातर बळी जावें लागतें. बदमाष व समाजास धोका आणणारे लोक बहुतेक सैतानानें भारलेले आहेत, असे ते लोक समजतात व अशा लोकांस प्रथमत: त्यांचे हातपाय तोडून नंतर फांशी चढवितात व नंतर समुद्रांत बुडवितात. निकोबारी लोक अंगाने सुदृढ व धिप्पाड असतात. पालकाच्या व पित्याच्या मरणानंतर इस्टेटीचा वारसा मोठ्या मुलाकडे जातो.

नारळीची झाडें, फळझाडें व लहानशा प्रमाणावर एखादी बागाईत हीच ह्या लोकांची इस्टेट असते. इतर सर्व तर्‍हेची इस्टेट बहुतेक प्रेताबरोबर दहन करण्याची चाल आहे. बापाच्या मरणानंतर मुलीस इस्टेटीचा कांहींच वांटा मिळत नाही. लग्नाच्या वेळेस आंदणादाखल जें काय मिळतें तेवढेंच. मुलींनां वरसंशोधनाचा हक्क असतो. लग्नाचा समारंभ किंवा गवगवा कांहीं फार मोठासा नसतो. बोलण्यामध्यें सभ्यतेचा हे लोक मोठा आव आणतात. हे लोक सुतारकामामध्यें निष्णात आहेत.

ह्या बेटांचा व्यापार बहुतेक हिंदुस्थान, ब्रह्मदेश, मलाया व चीन इत्यादि देशांतील लोकांशी आहे व ह्या समूहांतील बेटांचा आपपासांतहि व्यापार चालतो. नाण्याऐवजीं हे लोक नारळाचा उपयोग करतात. उपजीविकेचे जिन्नस वगैरे सर्व नारळानेंच ते विकत घेतात. बहुतेक गांवांत एक मुख्य असतो. त्याच्याकडून ग्रामव्यवस्था होते. सर्व जमिनीचा हक्क ह्याच्याकडेच असतो. परंतु गांवांतील स्थावर जंगम मालकीवर ह्याचा हक्क पोंचत नाहीं. गांवांत वयोवृद्ध लोकांसहि मुख्याचा खालोखाल मान दिला जातो. स. १८८२ पासून गांवमुख्याला काढून टाकण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार इंग्रज सरकारनें आपल्या हातीं ठेवलेला आहे. खरें म्हटलें तर मुख्य निवडण्याचा अधिकार गांवांतील लोकांसच असतो. ननकौरी येथें सरकारी एजंट आहे. गांवांत शांतता व सुव्यवस्था राखणें व रिपोर्ट करणें त्याचप्रमाणें लहान लहान भांडणें मिटविणें वगैरे कामांत त्याला गावंमुख्यास मदत करावी लागते.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .