प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ  
          
नीग्रो (पश्चिम आफ्रिकेंतील)- यांची वस्ती आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावर केप व्हर्डपासून कालाबारपर्यंत पसरलेली असून अन्तर्भागांत साहारा वाळवंटापर्यंत गेलेली आहे. या नीग्रो लोकांच्या अवाढव्य प्रदेशाचें संशोधन होऊन पूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाहीं. तथापि जें संशोधन झालें आहे त्यावरून असें दिसतें कीं, नीग्रो लोकांच्या अनेक जाती व उपजाती आहेत. नीग्रो लोकांच्या प्रदेशाच्या सरहद्दीवर बर्‍याच भागांत मुसुलमानी धर्माचा प्रसार झाला असून त्यामुळें नीग्रो लोकांच्या मूळ धर्मकल्पना व चालीरीती बदलल्या आहेत. नीग्रो लोकांच्या भाषेला अध्याप लेखनपद्धति माहीत नसल्यामुळें त्या भाषेंत लेख किंवा ग्रंथ मुळींच नाहींत, त्यामुळें पूर्वीची माहिती मिळण्यास दंतकथांशिवाय दुसरें साधन नाही. नीग्रो लोकांसंबंधी सर्व माहिती गेल्या दोन शतकांत उपलब्ध झालेली आहे. त्यापूर्वीची, किनाऱयालगतच्या नीग्रो लोकांखेरीज अन्तर्भागांतील नीग्रो लोकांसंबंधीं बिलकूल माहिती नाहीं. वेस्ट इंडीज बेटांत व अमेरिकेंत नेलेले नीग्रो गुलाम अन्तर्भागांत पकडलेले असत, पण अनेक ठिकाणचे नीग्रो एकत्र झाल्यामुळें त्या सर्वांच्या धर्मसमजुती एकाच प्रकारच्या बनल्या गेल्या व त्यामुळें निरनिराळ्या प्रदेशांतील निरनिराळ्या नीग्रो टोळ्यांच्या धर्मसमजुती समजण्यास खात्रीचा मार्ग नाहीं.

मानववंशशास्त्रानें अखिल मानवजातीचे गौर, ताम्र, पीत व कृष्ण अशा चार वर्णांचे चार लोकविभाग पाडले असून काळ्या मानववंशामध्यें पूर्व गोलार्धांतील उष्ण कटिबंधांतल्या पश्चिम आफ्रिकेच्या सेनिगांबिया देशापासून फिजी बेटापर्यंतच्या मुलुखांत असलेल्या काळ्या कातडीच्या सर्व लोकांचा समावेश होतो. या सर्वांचा `नीग्रॉइड’ या नांवाखालीं अंतर्भाव करून या मानववंशांतील लोकांचे विशिष्ट गुणधर्म सर्वांत अधिक ज्या आफ्रिकेंतील लोकांत आढळतात त्यांनांच फक्त नीग्रो हें नांव देण्यांत येतें. नीग्रो व तत्सदृश इतर लोकांची मानववंशशास्त्रीय माहिती तिसर्‍या विभागांत (बुद्धपूर्व जग पृ. २०) दिली आहे. नीग्रो लोकांच्या कित्येक शारीरिक विशेषांवरून पाहतां हे लोक जीवजातींच्या विकासोपानावर इतर मानवजातींच्या मानानें खालच्या पायरीवर आहेत असें म्हणावें लागतें; कारण लांब हात, चपटें व शेंडा बसलेलें नाक, कपाळाच्या पुढें आलेली हनवटी, मोठी व जड कवची आण कमानदार कपाळ हीं यांचीं वैशिष्ट्यें होत.

या लोकांचें मनुष्यसदृश्य असलेल्या उच्च वर्गांतील मर्कटजातीशीं अधिक साम्य आहे. पण फक्त एका म्हणजे केसांच्या बाबतींत गोर्‍या लोकांचें माकडांशीं जितकें साम्य आहे तितकें नीग्रोचें नाहीं. मानसिकदृष्ट्या नीग्रो हे गौरवर्णीयांपेक्षां हलक्या दर्जाचें आहेत. त्यासंबंधी एफ्. मॅनेट्टा म्हणतो, ``नीग्रोंचीं मुलें चलाख, हुषार व तडफदार दिसतात पण वयांत येऊं लागण्याच्या सुमारास त्यांच्यांत हळूहळू फरक होत जातो. त्यांची बुद्धि मठ्ठ होते, शरीरांत जडपणा येऊन चपळाईच्या ऐवजी आळस वाढतो. यावरून नीग्रो व गोरा इसम यांची वाढ निरनिराळ्या प्रकारें होते असें मानलें गेले आहे. गौरवर्णी लोकांत मस्तकाच्या बाह्य कवचीच्या वाढीबरोबरच आंतील मेंदूचा आकारहि वाढत असतो; उलटपक्षीं नीग्रोच्या मेंदूवरील कवटीचा सांधा अकाली जोडला जाऊन पुढील हाडाचा दाब मेंदूच्या मागील भागावर पडून त्याची वाढ बंद होते.’’ ही कारणमीमांसा कितपत ग्राह्य आहे? नीग्रोची बौद्धिक वाढ खुंटण्याचें किंवा अधोगति होण्याचें आणखी कारण असें सांगतात कीं, वयांत आल्यापासून नीग्रोच्या आचारविचारांनां स्त्रीपुरुषसंबंध हाच मुख्य विषय असतो. नीग्रोंच्या भोंवतालची परिस्थिति त्यांच्या कार्यकतृत्वाला उत्तेजक अशी मुळींच नसते. गोर्‍या लोकांनी ती तशी असते. नीग्रो लोकांचा प्रदेश इतका सुपीक आहे की अगदी थोडक्या श्रमांत त्यांनां उदरनिर्वाह करतां येतो. तथापि नीग्रोंची बुद्धि गोर्‍या लोकांनीं अतिशयोक्ति करून लिहिलें आहे तितकी हीन प्रतीची नाहीं. त्यांनां बेरीज- वजाबाकी सुद्धां येत नाहीं. येवढ्यावरून नीग्रोंनां पूर्ण बुद्धिहीन ठरविणें योग्य नाहीं, कारण अंकगणितांत प्रगति करण्यास अनुकूल परिस्थिति नीग्रो समाजांत नव्हती. उलटपक्षीं दृष्टि, कर्णेंद्रियशक्ति, स्थलवर्णनविद्या (टोपोग्राफी), दिशानिर्णय, वगैरे बाबतींत नीग्रो लोक गोर्‍या लोकांहून फार अधिक कुशल असतात. सर्व साधारणपणें नीग्रो लोकांची मनोरचना सुस्वभावी व आनंदी मुलासारखी असते म्हणजे अनुभवानें, सुसंस्कारांनीं व विशेषत: शिक्षणानें प्राप्त होणारा प्रगल्भपणा त्यांच्यामध्यें नसतो. त्यामुळें मुलें रागावतात, चिडतात व क्रूरपणाचीं कृत्यें सहजगत्या करतात, तसा प्रकार नीग्रो लोकांत आढळतो. इमानी कुत्र्यासारखा नीग्रो नोकरांत आणीबाणीच्या प्रसंगी विश्वासूपणाहि असतो. योग्यप्रकारें शिक्षण दिल्यास सुतारकी, लोहारकी, कांतकाम, कलाकौशल्याचीं कामेंहि ते करूं शकतात. तात्पर्य, नीग्रो लोकांत बुद्धिमत्ता नाही असें नाहीं; तर आफ्रिकेच्या अन्तर्भागांत इतर प्रगत समाजांशीं दळणवळण नाहीं अशा स्थितींत राहिल्यामुळें त्या समाजाची बौद्धिक प्रगति झाली नाहीं.शेतकी, शिकार, मच्छमारी, गोपालन या व्यवसायांपलीकडे त्यांची मजल गेली नाहीं. राजकीयदृष्ट्या प्रत्येक जण स्वायत्त असून त्यांवर एक मुख्य इसम पुढारी असतो. अनेक गांवांत दळणवळणाची नीट सोय असल्यास एखाद्या गांवाचा पुढारी शेजारच्या अनेक गांवांवर सत्ता प्रस्थापित करतो. नीग्रो लोक शेतकीप्रधान असल्यामुळें स्वाभाविकच काहारी आहेत. तथापि ते मांसाहार मिळेल तेव्हां करतात. मासे हें नाईल व कांगो नदीकाठी राहणार्‍या लोकांचें प्रमुख खाद्य आहे. हे लोक नरभक्षकहि आहेत. मनुष्यांचें मांस इतर अन्नाच्या अभावामुळें किंवा कांहीं मांत्रिक (मॅजिकल) हेतूनें खातात असें नाहीं, तर तें आवडतें म्हणून खातात. सर्व नीग्रो टोळ्यांची प्रगति पाषाणयुगाच्या पुढें गेलेली असून लोखंड या धातूचे जिन्नस तयार करण्याची कला सर्वांना अवगत आहे. मध्य आफ्रिकेंत लोखंडाच्या खाणीहि पुष्कळ आहेत. पश्चिम भागांतील लोक विणकला वलोखंडावरील खोदकाम करतात. मातीची भांडी करण्याचें कसब सर्व ठिकाणच्या नीग्रो लोकांत आहे. व्यापारी देवघेव ऐनजिनसी पद्धतीनें (बार्टर) चालते. तथापि, कांहीं कवट्या, पितळेचे तुकडे, नाण्याप्रमाणें वापरतात. नीग्रो लोकांत धर्मकल्पना व अतींद्रिंय दैवतांवर विश्वास आहे. तथापि, लोकपीडक देवतांचे ते उपासक असून धार्मिक कृत्यें पीडा न व्हावी या हेतूनें ते करतात. जादूटोळ्यावर त्यांचा विश्वास असून अशा गोष्टी करणारे लोक पुष्कळ असतात. जादूमंत्राने पाऊस पाडतां येतो अशीहि त्यांची समजूत असते व त्याप्रमणें उपाय करणारे लोक असतात. सहारा वाळवंट व पूर्व आफ्रिकेंतील बरेच नीग्रो लोक मुसुलमानी धर्माचे बनले आहेत. ख्रिस्ती धर्माचा प्रसार फारसा नाहीं. कारण इस्लामी धर्म नीग्रो लोकांच्या मूळच्या चालीरीतींत फारसा फरक करीत नाहीं. अनेक पत्नीपद्धति, मद्यपानबंदी या गोष्टी मुसुलमानी धर्मांत आहेत. उलट ख्रिस्ती धर्म एकपत्नीव्रताचा पुरस्कर्ता आहे, व त्यांत उपपंथ फार आहेत. यामुळें ख्रिस्ती मिशनर्‍यांपेक्षा मुसुलमानी धर्मप्रसारकांनां चीनप्रमाणेंच आफ्रिकेंतहि यश अधिक येत आहे. नीग्रो लोकांत प्रत्येक पांच-सहा गांवांची निरनिराळी भाषा याप्रमाणें अनेक भाषा असून सर्व घोंटाळा आहे. त्या सर्व चिकटी भाषेच्या स्थितींत आहेत आणि लिहिण्याची लिपि कोठेंहि नाहीं.

नीग्रो (युनायटेड स्टेट्समधील)- अमेरिकेंतील नीग्रो गुलामासंबंधींची माहिती देणारे जुने लेख फ्लॉरिडा व दक्षिण भागांतल्या स्पॅनिश वसाहतवाल्यांजवळ सांपडतात. स्पॅनिश सरकारनें स्पॅनिश वसाहतवाल्यांनां स्वत:च्या मालकीचे नीग्रो गुलाम अमेरिकेंत नेण्यास उघड परवानगी दिली होती आण फ्लॉरिडा व न्यूमेक्सिकोमध्यें अगदी प्रथम वसाहत करणारापाशीं नीग्रो गुलाम होते. नीग्रो लोकांत प्रवासाचें धाडस असतें ही गोष्ट पेरीबरोबर उत्तरध्रुवप्रदेशाच्या सफरींत गेलेल्या मॅथ्यू ए. हेनसन याच्या उदाहरणावरून सिद्ध होतें. हेनसन हा नीग्रो लोकांमध्यें शूर व धाडसी पुरुष म्हणून मोठा लोकप्रिय झालेला आहे. त्यानें आपल्या सफरीसंबंधीं व्याख्यानांचा दौरा काढला व आत्मचरित्रहि लिहिलें. १९१४-१५ सालच्या नीग्रो इयर बुकांत हेनसनच्या चरित्राला अर्धे पान दिले आहे. अमेरिकेंतील आफ्रिकन नीग्रो लोकांच्या इतिहासाला आरंभ इंग्रज वसाहतवाल्यांनीं स. १६१९ मध्यें नीग्रो गुलाम विकत घेतले तेव्हांपासून होतो. त्या सालचा मास्टर जॉन रोल्फ याचा एक जुना लेख सांपडला आहे. त्यांत तो म्हणतो, `आगस्ट महिन्याच्या अखेरीच्या सुमारास एक डच लढाऊ जहाज इकडे येऊन त्यानें आम्हाला वीस नीग्रो विकत दिले.’ तेव्हांपासून पुढें १५० वर्षांहून अधिक काल आफ्रिकेंतून नीग्रो लोक अमेरिकेंत नेले गेले व त्या व्यापाराचा खास परवाना इंग्रज व्यापार्‍यांनी मिळविला होता. खुद्द युनायटेड स्टेट्समध्यें निदान २० लक्ष गुलाम नेले गेले आहेत. त्यांनां धरून नेण्याच्या पद्धतीची माहिती `गुलामगिरी’ (ज्ञानकोश विभाग १२, पृ. १७९) या लेखामध्यें पहा.

१५ व्या शतकांत नव्या जगाचा शोध लागून यूरोपीय लोक तिकडे वसाहती करूं लागल्यापासून गोर्‍या व काळ्या मानवजातींमधील स्पर्धेचे अनेक प्रश्न उद्धवले आहेत. कातडीचा रंग जेथें जितका अधिक काळा तेथें तितकें या स्पर्धेला अधिक हिडिस स्वरूप आलें. अमेरिकेंत `सिव्हिल वार’ (आपसांतील युद्ध) होऊन नीग्रोंनां गुलामगिरींतून मुक्त करून राजकीय व सामाजिक हक्क गोर्‍या लोकांच्या बरोबरीनें देण्यांत आले. तथापि गोर्‍या-काळ्यामधील हा प्रश्न तेथेंहि अद्याप सुटला नाही. ``ज्याच्यामध्ये १/८ किंवा अधिक आफ्रिकन रक्त आहे तो नीग्रो’’ अशी एक सरकारी कायद्यानें नीग्रोची व्याख्या केली आहे. एकंदर नीग्रोंपैकीं सुमारे १/३ लोक मिश्ररक्ताचे आहेत. नीग्रो समाजांतील पुढारी सर्व मिश्र रक्ताचे असतात. शुद्ध रक्ताच्या नीग्रोंत पुढारीपणाचे गुण नाहींत. इतकेंच नव्हे तर नीग्रो समाजांत शुद्ध रक्ताचे नीग्रो व मिश्ररक्ताचे नीग्रो असे दोन पृथक् वर्ग पडलेले आढळतात. प्रथमपासूनच कापूस व तंबाखू यांची लागवड फार असणार्‍या दक्षिणेकडील संस्थानांत गुलाम बाळगणारे लोक अधिक होते.

सामाजिक स्थिति:- स. १६६१ पूर्वीपासून कित्येक अमेरिकन संस्थानांत गुलामगिरी रूढ होती. बर्याच संस्थानांत त्यांना जमीन किंवा पैसा-अडका यावर मालकी हक्क नसे. साधारणत: गुलाम म्हटला म्हणजे त्याला घरांतील गुरेंढोरें व इतर निर्जीव मालमत्तेप्रमाणें मानीत असत. मोठमोठ्या शेतजमिनीवर ओव्हरसीयरांच्या ताब्यांत गुलामांना गुरांप्रमाणें कळप करून ठेवीत असत, व वंत राहून काम करण्यास लायक ठेवण्यापुरेशी त्यांची खाण्यापिण्याची काळजी घेत असत; पण काम करून घेतांना निर्दयपणें पशूप्रमाणें त्यांनां चाबकांनीं मारहाण करीत असत. याप्रमाणें दोन शतकें स्थिति चालल्यावर गुलामगिरीविरुद्ध लोकमत उत्तरेकडील संस्थानांत बरेच जागृत होऊन आपसांत युद्ध झालेलें व त्यांत यशस्वी झाल्यावर प्रे. लिंकननें स. १८६५ मध्यें गुलामपद्धति बंद झाल्याचा कायदा केला व तदनुसार नीग्रो लोकांनां राजकीय व नागरिकत्वाचे हक्क देण्यासंबंधीं जरूर त्या सुधारणा युनाय. स्टे.च्या राज्यघटनेच्या कायद्यांत केल्या. तथापि भूतदयादि उच्च नैतिक तत्त्वांनीं प्रेरित होऊन केलेल्या या गोष्टी निर्दोष, मुत्सद्दिगिरी व व्यावहारिक शक्याशक्यता या दृष्टींनीं फाजील उतावीळपणाच्या ठरल्या. नुकत्याच गुलामगिरींतून मुक्त झालेल्या १० लक्ष लोकांनां एकदम मतदारीला व अधिकाराच्या जागांनां एकदम लायक ठरविणें ही राजकीय व सामाजिक घोडचूक झाली, कारण हे अधिकार व हक्क योग्य प्रकारें बजावण्यास अवश्य लागणारें शिक्षण देणाऱया संस्था अमेरिकन सरकारजवळ तयार नव्हत्या; यामुळें अपात्र लोकांच्या हाती सत्ता दिल्यामुळें उद्धवलेली अनवस्था पुढील दहा-वीस वर्षांत चांगली प्रत्ययास येऊन नीग्रो लोकांचे अधिकार कमी करण्याच्या अनेक युक्त्या, कायद्यांत फेरफार दक्षिण संस्थानांनी केले. शिक्षणविषयक लायकीच्या अटी जागोजाग ठेवण्यांत आल्या. परंतु त्याच्या बरोबरच शिक्षणप्रसारार्थहि योजना सुरू झाल्या. त्यामुळें हळूहळू योग्य प्रकारें नीग्रोंचें प्रमाण सरकारी नोकर्‍यांत वाढत जाऊन स. १९१४ मध्यें एकंदर २२,४४० नीग्रो सरकारी नोकरीत होते; व त्यापैकीं सैन्य व आरमारांत मिळून ६५०० होते. सरकारी कामांतल्यापेक्षांहि समाजांत गोर्‍या लोकांच्या बरोबरीनें दर्जा नीग्रोंनां प्राप्त होणें फार बिकट होते. स. १८८० च्या सुमारास रेल्वे, हॉटेलें, नाटकगृहें, शिक्षणसंस्था यांमध्यें नीग्रो व गोरे यांच्याकरितां पृथक् पृथक् बसण्याची व्यवस्था असावी अशा पास झालेल्या कायद्याबद्दल बरीच खळबळ उडाली होती. फ्लॉरिडामध्ये गोर्‍यानें नीग्रोच्या शाळेंत किंवा नीग्रोनें गोर्‍या मुलांच्या शाळेंत शिक्षक होणें हाहि गुन्हा आहे असा कायदा आहे. गोर्‍यांच्या वस्तींत नीग्रोनें राहूं नये किंवा नीग्रोंच्या वस्तींत गोर्‍यानें घर करूं नये, तसेंच गोर्‍यांच्या शेतजमिनीजवळ नीग्रोनें जमीन खरेदी करूं नये वगैरे गोष्टी उभय समाजांनां अधिक सोयीच्या असल्यानें दोघांचेंहि सर्वत्र हळूहळू पटूं लागलें असून अशा विभक्तपणाबद्दल तक्रारी कमी कमी होऊं लागल्या आहेत. मिश्रविवाहास बहुतेक ठिकाणीं कायद्यानें बंदी आहे. पण जेथें नाहीं, तेथें मिश्रविवाह क्वचितच होतात. तथापि या दोन जातींत परस्पर बेकायदा- व्यवहार चोरटेपणानें बरेच होतात, याचें एक कारण `नीग्रो’ याची सर्वमान्य राष्ट्रीय व्याख्या ठरलेली नाही; आणि दुसरें मिश्ररक्ताचा समाज बराच मोठा आहे. चोरटे व्यवहार होतात ते गोरे पुरुष व नीग्रो बायका असेच फार होतात, व नीग्रो पुरुष गोर्‍या बायकांवर बळजबरीचे प्रयत्न करतात, ह्याचें तें एक कारण असावें. तथापि अलीकडे दोघांमध्यें आपापल्या जातीचा अभिमान वाढत असून मिश्रजात उत्पन्न करण्याचें ध्येय नीग्रो लोकांतहि कमी होत आहे, इतकेंच नव्हें तर अमेरिका सोडून आफ्रिकेंतील आपल्या मूळ देशांत परत जाण्याचा प्रश्न कांहीं वर्षांपूर्वी नीग्रो समाजांत बराच महत्त्व पावला होता. पण आतां तो नाद सोडून देऊन अमेरिकेंतच आपला भविष्यकाळ अधिक उज्वल करण्याचाच नीग्रो लोकांचा निश्चय कायम झाला आहे.

शिक्षण व संस्कृति – गुलामपद्धति बंद करण्यापूर्वी नीग्रोंच्या शिक्षणाकरितां व्यवस्थित सोयी कांहींच नव्हत्या. मिशनरी व इतर उदारवृत्ती- संस्थांनीं शिक्षणप्रसाराचें कांहीं कार्य केलें, व उत्तरेकडील संस्थानांतील सार्वजनिक शाळांत कांहीं नीग्रोंनां घेत असत. पण विशेष कार्य खाजगी गोर्‍या मालकांकडून झालें, कारण स्वत:च्या गुलाम नोकरांनां घरकामें अधिक चांगल्या रीतीनें करतां यावीं म्हणून गोरे लोक नीग्रो गुलामांनां शिक्षण देत असत व अशा रीतीनें शिकलेले नीग्रो स्वजातींत शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार करीत. अशा रीतीनें गुलामपद्धति बंद झाली, त्याच वेळी नीग्रो लोकांत साक्षरतेचें प्रमाण शें. ५ होतें व सार्वजनिक शाळांत १०००० नीग्रो विद्यार्थी होते. उच्च शिक्षणाच्या चार शाळा असून त्यांत १५० नीग्रो शिक्षक होते. स. १८६३ मध्यें गुलामपद्धति बंद करण्याचा कायदा झाल्यापासून शिक्षणाचा प्रसार झपाट्यानें सुरू झाला. मिशनरी व इतर पीबॉडीफंड, स्लेटरफंड, जेनेसफंड, रॉकफेलरफंडाचा कांहीं भाग वगैरे फंड शिक्षणकार्यास मिळाले असून खुद्द नीग्रो लोकांतील धनिकांनीं या कार्याकरितां जें द्रव्यसाहाय्य केलें आहे त्यावरून त्यांची दूरदृष्टि व औदार्य चांगलें व्यक्त होतें. सरकारनें नीग्रोंच्या शिक्षणाच्या सोयी वाढविल्या, तथापि गोर्‍यांप्रमाणें निग्रोंच्या शिक्षणसंस्था भरपूर व उत्तम नाहींत, कारण शिक्षणाकडे लावावयाचा पैसा सरकारला नीग्रोंच्या मानानें गोर्‍यांकडूनच फार अधिक मिळत असल्यामुळें गोर्‍या लोकांच्या शिक्षणसंस्थांवरच तो अधिक खर्च होतो. तथापि गुलामपद्धति बंद झाल्यापासून पुढील पन्नास वर्षांत नीग्रोंचें साक्षरतेचें प्रमाण शें. ७० पर्यंत वाढलें असून १९१३ साली १८,००,००० विद्यार्थी मोफत शाळांत शिकत होते. ३५०० नीग्रो शिक्षकाच्या धंद्यांत होते, आणि नार्मल ट्रेनिंगकरितां शाळा व कॉलेजें ५०० होतीं. नीग्रो ग्रॅज्युएट ३८५६ होते निग्रोंच्या शिक्षणाकडे १,३५,००००० डॉलर्स वार्षिक खर्च झाला त्यापैकीं १५,००,००० डॉलर्स निग्रो लोकांकडून मिळालेले होते (निग्रो इयर बुक, पान ४). शिवाय निग्रो विद्यार्थ्यांनां कोणत्या प्रकारचें शिक्षण द्यावें याबद्दल बरीच वर्षें चर्चा व प्रयोग चालू होते. त्यांचा निष्कर्ष असा निघाला आहे कीं, उच्च बौद्धिक शिक्षण त्यांनां झेंपण्यासारखें नसल्यामुळें औद्योगिक व घरगुती शिक्षण नीग्रो लोकांनां दिलें पाहिजे, असें डब्ल्यू. ओ. कार्व्हर म्हणतो. याचा प्रत्यय हँप्टन इन्स्टिट्यूट, टस्केजी नार्मल अँड इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट या संस्थांतील शिक्षण प्रकारावरून येतो. उच्च धंदेशिक्षणाकरितां हल्ली सुमारें कायद्याच्या तीन, वैद्यकाच्या चार, शेतकी व यांत्रिक शिक्षणाकरितां १७ व औषधिविज्ञानाच्या (फार्मसी) ५ या सरकारी नियंत्रणाखालच्या शिक्षणसंस्था व अशाच प्रकारच्या खाजगी ३५० शिक्षणसंस्था आहेत. नीग्रो शाळांची नांवें मोठमोठीं भपकेदार आहेत पण सांपत्तिक स्थिति गरीबीची आणि प्रत्यक्ष शिक्षण कमी प्रतीचें असतें. उदा. त्यांची `युनिव्हर्सिटी’, हायस्कूलच्या योग्यतेची आणि कॉलेज प्राथमिक शिक्षणापासून आरंभ करून मिडलस्कूलपर्यंत शिक्षण देणारी असते. ललितकलांमध्यें नीग्रोंची अध्याप फारशी प्रगति झाली नाहीं आणि त्यांमध्यें विशेष चमकण्यासारखी लायकी कोणीहि नीग्रो इसमानें दाखविली नाही. निग्रो जातीला गाण्याचा आणि तंतुवाद्यें, वायुवाद्यें वाजविण्याचा मोठा नाद आहे. शिल्पकलेंत त्यांनी थोडेंफार नांव मिळविलें आहे. ग्रंथ लिहिणें, वर्तमानपत्रें चालविणें हीं कामें ते करतात पण तीं उच्च दर्जाचीं नाहींत. अशी वस्तुस्थिति एका दशकापूर्वी होती.

सांपत्तिक स्थिति- दहा वर्षांवरील निग्रो स्त्रीपुरुषांपैकी शें. ७१ लोक उद्योगधंदा करणारे असून शेतकी, कारखाने, व्यापार, स्वतंत्र धंदे व घरगुती नोकरी वगैरे कामें ते करतात असें स. १९१० च्या खानेसुमारीच्या रिपोर्टावरून दिसतें. कुंभारकाम, सुतारकाम हे धंदे बहुतेक सर्वस्वी त्यांच्या हातीं आहेत. अमेरिकेंत मजूरसंघ पुष्कळ आहेत. पण त्यांपैकीं बर्‍याच संघांत नीग्रो मजुरांनां सभासद होण्यास परवानगी नाही. स. १८६३ मध्यें स्वत:ची घरें असलेले ९००० नीग्रो शेतांचे मालक किंवा व्यवस्थापक १५००० आणि स्वतंत्र धंदेवाले २००० नीग्रो लोक होते. त्यांचीच संख्या १९१३ साली अनुक्रमे ५५००००, ९३७००० व ४३००० इतकी वाढली. वाणसवद्याची दुकानें, फेरीवाल्यांचा धंदा, खाटीककाम, कोळसेविकी, इमारती वगैरे बांधकामाची कंत्राटें हे मुख्यत: धंदे नीग्रो लोक करतात. नीग्रो मजुरांत कुशलता नसल्यामुळें त्यांच्यांत मजूरकामाची लायकीहि कमी प्रतीची असते. नीग्रो लोकांची घरें हलक्या प्रतीचीं, आरोग्यदृष्ट्या व नैतिकदृष्ट्या गैरसोयीचीं असतात. खेडेगांवांत लांकडी घरांत, आणि शहरांत, तबेल्यावरील लहानसहान खोल्यांत, किंवा बारीक सारीक घाणेरड्या घरांत ते राहतात. त्यामुळें त्यांच्यांत रोगांचें व मृत्यूचें प्रमाण फार असून नीतिभ्रष्टताहि फार असते. गोर्‍यांपेक्षा नीग्रोंचे मृत्यूचें प्रमाण शें. ५० नीं अधिक असतें.

धर्म व नीतिमत्ता:- धर्म हा ईश्वराची कृपा व भीति या दोन हेतूंस्तव वाईटाऐवजी चांगल्याचा स्वीकार करण्याकडे मनुष्याच्या बुद्धीची प्रेरणा करतो. पण कृत्याचा चांगलेवाईटपणा ठरविणें तो अखिल मानवसमाजाच्या हिताहितावरून ठरविला पाहिजे इतका प्रागतिक विचार प्राथमिक स्थितींतील समाजांत नसतो. त्यामुळें केवळ अदृश्य देवतेला तोषविण्याकरिता मानससमाजहिताच्या दृष्टीनें उर्फ नैतिक दृष्टीनें अयोग्य अशा धार्मिक चालरीती रानटी लोकांत असतात. नीग्रो लोक प्राथमिक स्थितींतच असल्यामुळें त्यांच्या नैतिक कल्पना अप्रगत व अप्रगल्भ आहेत. त्यामुळें युनाय. स्टे. सरकारनें केलेले कायदे, त्यांची नैतिक योग्यता न कळल्यामुळें नग्रोंनां नापसंत व सत्ताधार्‍यांचा जुलूम असे वाटतात, शिवाय सिनेमानाटकादि जे गोर्‍या लोकांच्या करमणुकीचे पण विषयसुखोद्दीपक प्रकार नीग्रोंनां पहावयास मिळतात त्यामुळें त्यांच्यामध्यें मनोविकार बळावून त्यांची तृप्ति अन्य मार्गानेंहि करण्याकडे त्यांची प्रवृत्ति होत. यामुळें गुन्हेगारांचे प्रमाण १९०४ सालीं दक्षिण संस्थानांत ४० गोर्‍यांस २२१ नीग्रो असें होतें. तथापि हें प्रमाण स. १८९० पासून उतरत आलें आहे. गोर्‍या स्त्रिया तसेंच नीग्रो स्त्रिया यांच्यावर होणाऱया बळजबरी (रेप)च्या गुन्ह्यामुळें यु.स्टे.मधील या दोन समाजांत फार वितुष्ट वाढलें असून बळजबरीच्या गुन्ह्यांबद्दल कायदेकोर्टाऐवजी लिंचिंग पद्धतीनें म्हणजे खाजगी पंचाच्या कोर्टाकडून न्याय करून अपराध्याला मार मारून अखेर जाळण्याची शिक्षा देण्याचा `हम करेसो न्याय’ असा प्रकार गोर्‍या समाजांत फार दिवस आहे. हा प्रकार नीग्रोहि थोड्या फार प्रमाणांत अंगीकारतात. तथापि लिंचिंगची संख्याहि कमी होत आहे. १९०८ साली ७ गोरे व ९३ नीग्रो आणि १९१३ साली १ गोरा व ५१ नीग्रो लिंचिंगला बळी पडले. नीग्रो लोकांत आळस, चोरी, मद्यपान, जुगार व व्यभिचार हे दुर्गुण फार आहेत. नैतिक प्रगतीचा अभाव ही गोष्ट वरील दुर्गुणांनां कारण आहेच, पण शिवाय अमेरिकेंतील संपत्ति नीग्रोंच्या श्रमाची असल्यामुळें ती गोर्‍यांपासून बळकावण्यास कांहींच हरकत नाही असलें बोल्शेव्हिक नीतिशास्त्रहि नीग्रोमध्यें प्रसृत करण्यांत येतें. नीग्रोमधील दारिद्र्य हेंहि त्यांच्या गुन्हेगिरीस एक प्रबळ कारण आहे. मद्यपानाचें व्यसन गोर्‍या लोकांच्या द्रव्यलोभामुळें कांहीं अंशीं वाढलेलें आहे, कारण नीग्रोंनां दारूचें दुकान घालण्याची परवानगी नसते.

नीग्रो लोक अमेरिकेंत आल्यावर धार्मिक बाबी गोर्‍या मालकांच्या नियंत्रणाखालीं गेल्या व त्यांच्यामध्यें ख्रिस्ती मिशनर्‍यांनीं ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू केला. ख्रिस्ती नीग्रोंनां गोर्‍यांच्या चर्चमध्येच पण गॅलरींत वेगळे बसवीत असत. शहरामध्यें नीग्रोंकरितां निराळी चर्चे बांधण्यांत आली. १८६३ पर्यंत ५ लक्षांहून अधिक ख्रिस्ती निग्रोंची संख्या होती. धार्मिक उत्सव व समारंभ विशेष करणारा रोमनकॅथॉलिक पंथ नीग्रोंनां जास्त आकर्षक वाटणें सहाजिक होतें, तथापि स. १९१३ मध्यें एकंदर ४३ लक्ष ख्रिस्त्यांपैकी ३८३२३५ रोमनकॅथॉलिक असून बाकी प्रॉटेस्टंट, बॅप्टिस्ट, मेथॉडिस्ट, प्रेस्बेटेरियन वगैरे उपपंथांचे होते.

याप्रमाणें नीग्रोंची प्रगति चालू असून कांहीं नीग्रोपक्षीयांनां नीग्रोंची प्रगतिक्षमता अद्याप संपली नाही किंवा तिची मर्यादा ठरली नाही असें वाटत आहे. गोर्‍या-काळ्यांचा हा सहनिवासाचा प्रश्न दोघांची मिळून एक मिथजात पूर्णपणे बनल्याशिवाय सुटणार नाही असें कांहीचें मत आहे. नीग्रो ही एक मानवापेक्षां पशुतुल्य जात असून गोर्‍या लोकांच्या बरोबरीनें सामाजिक, राजकीय वगैरे हक्क मिळविण्यास कधीच लायक होणार नाही, हें मत प्रतिपादन करणाऱया व एकेकाळी फार प्रसार पावलेल्या पुस्तकाबद्दलची सहानुभति अजिबात नाहीशी होत चालली आहे. आण गोरे व नीग्रो या दोन जातींनां एकाच देशांत रहाणें भाग असून दोघांनाहि सांस्कृतिक राष्ट्रीय ध्येयें एकमेकांच्या मदतीवांचून साधतां येणें शक्य नाही. या मताला ग्राह्य व मान्यता प्राप्त होत चालली आहे.

१९२० सालच्या खानेसुमारीत युनाय. स्टे.मधील नीग्रोंची संख्या १६४६३०१३ भरली. गुलामगिरींतील साठ वर्षे व स्वातंत्र्यातील साठ वर्षे यांतील लोकसंख्येच्या वाढीचें प्रमाण पुढीलप्रमाणें आहे-

१८०० साली लोकसंख्या १००२०३७ (शेंकडा वाढ ३४३); १८६० सालीं लोकसंख्या ४४४१८३० (शेंकडा वाढ ३४३); व १९२० सालीं लोकसंख्या १०४६३०१३ (शेंकडा वाढ १३६). यावरून स्वातंत्र्याच्या काळांत गुलामगिरीच्या मानानें चारदशांश इतकीच वाढ झाली. तात्पर्य स्वातंत्र्यामुळें लोकसंख्येच्या वाढीचें मान कमींच झालें. याला कारणें यु.स्टे.मधील गोर्‍या लोकांच्या वाढीचेंहि प्रमाण कमीच होण्याला जीं कारणें झालीं आहेत तींच कांहीं अंशी असावींत, कांहीं अंशी व्यक्तीच्या आणि त्याच्या अन्नोदकाचा भार व्यक्तीवर पडल्यामुळें उत्पन्न होणाऱया जबाबदारीच्या कल्पनामुळें नीग्रोंची वाढ मंदावली असावी.

महायुद्धांतील नीग्रोंची कामगिरी- १९१४ सालीं महायुद्धाला सुरवात झाली; त्यामुळें यूरोपमध्यें राजकीय, सामाजिक व आर्थिक क्रांति घडून आली. महायुद्धामध्यें अमेरिका प्रथम पडली नव्हती. यूरोपमध्यें आर्थिक परिस्थिति बिकट झाल्यामुळें अमेरिकेला त्या अडचणीचा फायदा मिळाला. अमेरिकेंतील उद्योगधंद्यांनां व व्यापाराला मोठें उत्तेजन मिळालें. अर्थात अमेरिकेंतील कारखानदारांनां नीग्रो मजुरांची अत्यंत आवश्यकता भासूं लागली. उत्तरेनें दक्षिण संस्थानांतील नीग्रोंनां आपल्या भागांत आणण्याविषयीं खटपट केली. तात्पर्य, या महायुद्धानें नीग्रोंची सांपत्तिक स्थिति बरीच सुधारली.

कांहीं काळानंतर अमेरिकाहि महायुद्धांत पडली. जर्मनीनें दोस्तांच्या वतीनें युद्धांत भाग न घेण्याबद्दल नीग्रोंचीं मनें वळविण्याचा प्रयत्न केला. पण नीग्रो लोक त्या आमिषांनां बळी पडले नाहींत. अमेरिकेंतील गोर्‍या लोकांनीं नीग्रो लोकांनां गोर्‍या सैन्यांत येऊं न देण्याविषयींहि खटपट केली, पण त्या खटपटीला यश आलें नाहीं. नीग्रो लोकांपैकीं शेंकडा १३ लोकांनीं अमेरिकेंनें उभारलेल्या सैन्यांत आपली नांवें दाखल केली. तथापि सैन्यामध्येंहि गोर्‍या सोल्जरांच्या बरोबरीचा नीग्रो सैनिकांचा दर्जा राखण्यांत आला नाहीं. गोर्‍या लोकांपेक्षां या काळ्या अदमीवर सैन्यांत दाखल होण्याच्या कामीं अधिक निर्बंध घालण्यांत आले. सैन्यामध्यें नीग्रो लोकांनां लढण्याऐवजीं गोर्‍या सैनिकांच्या व्यवस्थेसाठीं मजुराचें काम करावें लागत असे. नीग्रोंनां सैन्यांत अधिकाराच्या जागा क्वचितच मिळत असत. अशी स्थिति असतांनाहि नीग्रो लोकांनीं विशेष कुरकूर न करतां महायुद्धांत चांगली कामगिरी बजावली. फ्रान्समधील लढायांत नीग्रो सैनिकांनी आपलें शौर्य प्रगट केले. त्यामुळें फ्रेंच लोकांचीं मनें नीग्रोबद्दल अनुकूल झालीं, व त्याचा बराच इष्ट परिणाम झाला.

महायुद्धानंतर नीग्रोंच्या आफ्रिका व अमेरिका या दोन्ही ठिकाणच्या चळवळींनां जोरानें चालना मिळाली. पश्चिम आफ्रिकेंत आक्रा येथें देश्य लोकांनीं नॅशनल काँग्रेस भरविली होती. अमेरिकेंत बुकर टी वॉशिंग्टन (चरित्र पहा) हा नीग्रोंच्या सुधारणेच्या इतिहासांतील सर्वांत श्रेष्ठ पुरुष होय.

नीग्रो लोकांनीं लढाईंत चांगली कामगिरी बजावल्यामुळें त्यांनं पूर्वीपेक्षां अधिक हक्क मिळण्याची आशा उत्पन्न झाली. हे हक्क मिळूं नयेत यासाठीं गोर्‍या लोकांनीं खटपट करण्यास कमी केलें नाहीं. तथापि महायुद्धानंतर नीग्रो लोकांमध्यें आपल्या राजकीय हक्कासंबंधीची पुष्कळच जागृति झाली आहे. नीग्रो लोकांनीं आपली सर्वांगीण उन्नति करण्याच्या कामी अनेक दृष्टींनी खटपट चालविली आहे. त्यांनी आपली स्वतंत्र वर्तमानपत्रें काढलीं आहेत. रॉबर्ट एस अबटनें चालविलेल्या `शिकागो डिफेंडर’चा खप २ लाख आहे. नॅशनल असोसिएशनसारख्या संस्था त्यांनी स्थापन केल्या आहेत व त्यांचा नीग्रो लोकांमध्ये जागृतिं उत्पन्न करण्याच्या कामी अतिशय उपयोग होत आहे. नीग्रो लोकांनी आपल्या मूलस्थानाकडे- आफ्रिकेकडे- परत जावें अशा प्रकारचीहि एक चळवळ सुरू करण्यांत आली असून त्या कामी मॉर्कस गार्व्हे या नीग्रो पुढार्‍यानें आपलें सर्व बळ खर्च केलें आहे. कांहीं नीग्रो पुढार्‍यांनी, पॅन-ऑफ्रिकन चळवळ सुरू केली आहे. अशा रीतीनें नीग्रो लोकांत विलक्षण जागृति झाल्याचीं चिन्हें दृग्गोचर होऊं लागलीं आहेत. ज्या मानानें गोर्‍या लोकांनीं नीग्रोंची चळवळ हाणून पाडण्याचे प्रयत्न जोरानें चालविले आहेत, पण त्यांत यश येईलसें दिसत नाहीं. राजकीय व सामाजिक बाबींप्रमाणेंच वाङ्‌मय व शास्त्रें यांच्या बाबतींतहि नीग्रो लोक पुढें येऊं लागले आहेत. गायन व वादनकलेंत मिसेस फ्लोरेन्स, कोल टॅलबर्ट, अंडर्सन, हेज इत्यादि नीग्रोंनीं कीर्ति मिळविली आहे. गिल्पिन व आस्टिन यांनीं अभिनयाच्या बाबतींत, गोर्‍या नटांइतकी कीर्ति संपादन केली आहे. कल्लेन, मॅक्लेप्रभृति कवींचीं काव्यें जगमान्य झालीं आहेत. प्राणिविषयक शास्त्रामध्यें चार्लस टर्नरनें महत्त्वाचे शोध लावले आहेत एल्स हा इंद्रियविज्ञानशास्त्रवेत्ता या नात्यानें प्रसिद्ध आहे, तर चँडलर व ब्रॅडी यांनी रसायनशास्त्रांत आपलें नैपुण्य प्रस्थापित केलें आहे.

[संदर्भग्रंथ- दि नीग्रो इयर बुक, टस्केजी १९१४-१५; डब्ल्यू. ई. वी. ड्यू बॉईस- स्टडी ऑफ दि नीग्रो प्रॉब्लेम्स (१८९८); दि नीग्रोचर्च (१९०३); सोशल अँड फिजिकल कंडिशन्स ऑप नीग्रोज इन सिटीज (१८८७); दि सोल्स ऑफ ब्लॅक फोक (१९०३); एम. हेल्म- दि अपवर्ड पाथ (१९०९); एफ. एल. हॉफमन- रेस ट्रेटस अँड टेंडन्सीस ऑफ दि अमेरिकन नीग्रो (१९०६); जॅकसन अँड डेव्हिस- दि इंडस्ट्रियल हिस्टरी ऑफ दि नीग्रो रेस इन यु.स्टे.; जे. एम. मेक्लिन- डेमॉक्रसी अन्ड रेस फ्रिक्शन (१९१४); एफ. पी. नोवल- दि रिडेंप्श ऑफ आफ्रिका (१८९९); आर. पॅटर्सन- दि नीग्रो अन्ड हिज नीडस्; डब्ल्यू. डी. बेदरफोर्ड- प्रेझेंट फोर्सस इन दि नीग्रो प्रोसेस (१९१२); डी. डबल्यू. विल्यम्स- हिस्ट्री ऑफ दि नीग्रो रेस; वुडसन- निग्रो इन अवर हिस्ट्री (१९२२).]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .