प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ 

नीळ- अनिल, अर्जेंटिया, आरेक्टा, आर्टिक्युलेटा- लाँगेरासीमोसा, टिक्टोरिया वगैरे `इंडिगोफेरा’च्या अनेक जातींपासून सध्याची नीळ तयार होते. पण या जातींशिवाय अशीं कित्येक झाडें आहेत कीं, त्यांपासून रासायनिकरीत्या अगदीं निळीसारखाच पदार्थ तयार करतां येतो, आणि म्हणूनच या झाडांपासून उत्पन्न होणार्‍या रगाला पुष्कळ भाषांत `नीळ’ हेंच नांव वापरण्यांत आलें आहे. अशी वस्तुस्थिति असल्यामुळें भारतीय अभिजातवाङ्‌मयांत आढळणारा `नील’ शब्द इंडिगोफेराच्या जातीकरितां वापरला आहे. किंवा निळीसारखाच पदार्थ प्रसवणार्‍या इतर झाडांकरितां वापरला आहे, याचा उलगडा करणें कठिण पडतें. प्राचीन यूरोपीयन ग्रंथकारांनीं ज्या वोडनामक झाडाचा उल्लेख केला आहे तें झाड आज मध्यआशियांत आढळतें. संस्कृत ग्रंथकारांचें `नील’ म्हणजें बहुतेक हें `बोड’ झाडच असावें. हिंदुस्थानांत निळीचा रंग काढण्याकरितां अनेक झाडांचा उपयोग करण्यांत येतो. त्यांपैकीं कांहींचीं नांवें येणेप्रमाणें:- मध्य चीन व आसाम येथील `रम’; ईशान्य भागांतील `रायअम’; दक्षिण हिंदुस्थानांतील `नेरिअम’ अथवा `पाल’; ब्रह्मदेशांतील जिम्नेमा टिगेन्स; कोचिन-चीन येथील स्पिलँथेस,टिक्टोरिया, वगैरे. निळीचें झाड बहुवर्षायु आहे, परंतु तें बहुतकरून एकदोन वर्षांपेक्षां जास्त दिवस ठेवीत नाहींत. या झाडाला चिंचेच्या पानांप्रमाणें बारीक पानें येतात व मठाच्या शेंगेप्रमाणें शेंगा येऊन त्यांत बारीक बीं येतें.

ऐतिहासिक माहिती- `पेरिप्लुस ऑफ दि इरीथ्रिअनसी’ (ख्रिस्तपूर्व ८०) या ग्रंथावरून असें दिसतें कीं, बारबरीकॉन नामक सिंदुनदीवरील सिथिअन शहरांतून त्यावेळीं निळीची निर्गत होत असे. मार्कोपोलो यानें (१२९८) क्वीलॉन येथें स्वत: पाहिलेल्या निळीच्या उद्योगधंद्याचा खरा इतिहास लिहून ठेवला आहे. `काननाट’ (कँबे) येथें स. १४६८ त निळीची लागवड होते, असें `अथानासीअस नीकीतिन’ हा रशियन प्रवाशी म्हणतो. १४९८, १५०३ व १५१६ या वर्षांच्या दरम्यान हा उद्योगधंदा मंदावलेला असावा असें वास्को द गामा, व्हार्थेमा आणि बार्बोसा, हे प्रवाशी, त्याचा निर्देश करीत नाहीत, यावरून दिसतें. स. १५६३ त पश्चिम हिंदुस्थानांत निळीचे कारखाने असावेत असें गार्सिआ डी. ऑर्टा यानें दिलेल्या माहितीवरून दिसतें. बाबराच्या आत्मचरित्रांत निळीचा कांहींच उल्लेख नाही. ऐने-ई-अकबरीमधील उल्लेखावरून आग्रा येथें त्यावेळीं नीळ होते असे असें सतें. लिन्सचॅटिन हा म्हणतो की, स. १५९८ त फक्त कँबेआ येथेंच निळीचा धंदा इतका भरभराटला होता की,तेथून सबंध जगांत नीळ जात असे.

फिंच यानें हिंदुस्थानांतील निळीच्या धंद्याचें व ती तयार कशी करतात याचें जें वर्णन केलेलें तें फार महत्त्वाचें आहे (ट्रॅव्हल्स इन इंडिया- परचास पिलिग्रिमीज, १६०७). हिंदुस्थानांत नीळ कशी तयार करीत याची माहिती फॉस्टर यानें १६१६ सालीं लिहून ठेवली आहे (ई. आय.सी. लेटर्स, ४,२४१). गुजराथमध्यें (अहमदाबाद) १६३८ सालीं नीळ कशी तयार करीत याची हकीकत मांडलेस्लो यानें लिहून ठेवली आहे (ट्रॅव्हेल्स- ऑलिआरिअसच्या हिस्टरी मस्कोव्ही, इ. १६६८).

१६२२ सालच्या गुजराथेंतील निळीसंबंधानें टेरी यानेंहि जवळ जवळ वरच्याप्रमाणेंच माहिती दिलेली आहे. फ्रान्सिस बर्निअर याच्या लेखांत दिल्ली येथील निळीचा उल्लेख आला आहे. टॅव्हरनिअर यानें गुजराथ, गोवळकोंडे, आग्रा, बंगाल इत्यादि ठिकाणच्या निळीच्या धंद्याचें बरेंच विस्तृत वर्णन केलें आहे. र्‍होड यानें, मलबार किनार्‍यावरील निळीच्या धंद्याची माहिती दिलेली आहे. बंगालमध्यें निळीची लागवड करण्याकरितां १६८१ साली वेस्टइंडीजहून यूरोपीयन मळेवालें नेण्यांत आले. त्याप्रमाणें १७९० साली जेसोर येथें निळीचे कारखाने काढण्यांत आले. हा धंदा बंगालमध्यें स्थापन होऊन कांहीं दिवस होतात न होतात तोंच तो बुडाला.

मिंडेन विलसनसाहेबानें, `इंडियन प्लँटर्स गॅझेटांत’ हिंदुस्थानांतील निळीच्या धंद्यासंबंधीं बरीच ऐतिहासिक माहिती दिलेली आहे. त्या माहितीवरून निळीच्या धंद्याच्या उत्पादकांपैकीं, ग्रँडसाहेब हे एक होते असें दिसतें. तिरहुत येथें हा धंदा सन १७७८ आणि १८०० यांच्या दरम्यान स्थापला गेला होता. स. १७८० आणि १८०२ पर्यंत कंपनीचा या धंद्यास प्रत्यक्ष पाठिंबा होता. परंतु या धंद्याचें सर्व नेतृत्व फक्त अँग्लो-इंडियन समाजाकडेच असल्यामुळें, या धंद्याला बंगालमध्यें चांगली बरकत येईना. तेव्हां यूरोपच्या बाजारांत विकण्याच्या योग्यतेची नीळ जर एतद्देशीय कारखानदार तयार करतील, तर त्यांच्यापासूनहि ती विकत घ्यावी असें कंपनीनें ठरविलें.

हिंदुस्थानांतील निळीचा हा प्राचीन धंदा रसातळास कसा गेला याचा इतिहास फारच हृदयद्रावक व बोधप्रद असल्यामुळें, त्याचा येथें थोडक्यांत उल्लेख केल्यास वावगें होणार नाहीं. ज्यावेळीं हिंदुस्थानांतील नीळ खरेदी करून तिची यूरोपमध्यें निर्गत करण्यास यूरोपीयनांनीं प्रथम सुरुवात केली त्यावेळीं जवळजवळ सर्व निळीची निर्गत पश्चिम इलाख्यांतून व विशेषत: सुरत येथून होत असे. पोर्तुगीज लोक ती खरेदी करून लिस्बनला नेत व तेथून हॉलंडच्या रंगवाल्यांनां विकीत. पुढें डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यावर निळीचा सर्व व्यापार डच लोकांच्या हाती गेला. या व्यापार्‍यांत डच लोकांचा अतोनात फायदा होत आहेसें पाहून यूरोपीय राष्ट्रांच्या मनांत हेवा उत्पन्न झाला, व आपल्या देशांतील `बोड’ची लागवड करणार्‍या व्यापार्‍यांच्या पोटावर पाय येण्याचा रंग दिसतांच जर्मनी, इंग्लंड व फ्रान्स या देशांनीं प्रतिबंधक कायदे पास करून हिंदुस्थानांतील निळीच्या निर्गतीस आळा घातला.

जो कोणी हिंदुस्थानांतील नीळ खरेदी करील अथवा तिचा उपयोग करील तो मृत्यूच्या शिक्षेस पात्र होईल असें या देशांनीं ठरविलें. हिंदुस्थानांतील नील यूरोपमध्यें पाठविण्याचा ईस्ट इंडिया कंपनीनें एकसारखा क्रम सुरू ठेवल्यामुळें स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, आणि इंग्लंड येथील वसाहतवाल्यांनीं हिंदुस्थानाबाहेर नीळ उत्पन्न करण्याचे प्रयत्न सुरू केले व त्यातं त्यांनां इतकें यश आलें की, त्यांच्याशी चढाओढ करणें अशक्य होऊन ई. इं. कंपनीनें यूरोपमध्यें निळीची निर्गत करण्याचें कार्य सोडून दिले. परंतु याच वेळी अमेरिका व फ्रान्स यांच्यांत काहीं राजकारणविषयक अडचणी उपस्थित झाल्यामुळें आणि वेस्ट इंडीजमध्यें साखर आणि कॉफी यांची लागवड जास्त किफायतशीर होऊन तेथें निळीचा धंदा अजीबात बसल्यामुळें हिंदुस्थानांत या धंद्यास फिरून चलन मिळालें. बंगालमध्यें हा धंदा पुनरुज्जीवित करण्यांत आला, पण वर सांगितल्याप्रमाणें तो लवकरच रसातळास गेला. तेथून या धंद्याचें तिरहुत आणि संयुक्तप्रांत येथें स्थानान्तर झालें. परंतु याच सुमारास रासायनिकरीत्या नील तयार करण्याच्या प्रयोगास जर्मनींत यश आल्यामुळें नैसर्गिक वनस्पतिजन्य निळीच्या अस्तित्वावरच आपत्ति येऊन गुदरली. अर्थातच रासायनिक निळीपुढें हिंदुस्थानांतील नैसर्गिक निळीचें कांहीं न चालल्यामुळें या धंद्याचें आयुष्य संपुष्टांत आलें. १९१५ च्या फेब्रुवारी महिन्यांत दिल्लीला एक परिषद भरून नैसर्गिक निळीच्या धंद्याला, कृषिविषयक, संशोधक व व्यापारी दृष्टीनें उत्तेजन देण्यासंबंधीं विचार करण्यांत आला. स. १९१८ त इंपीरियल लेजि. कौन्सिलमध्यें इंडिगो. सेसबिल पास झालें. शास्त्रीय शोधनाकरितां बाहेर पाठविल्या जाणार्‍या निळीवर या बिलान्वयें जकात बसविण्यांत आली. कारण शास्त्रीय संशोधनाच्या योगानें परकीय देशांत निळीची लागवड चांगल्या प्रकारें होण्यास मदत मिळे.

निळीचे क्षेत्र व रंगाचें उत्पन्न
प्रांताचें नाव क्षेत्र रंगाचे उत्पन्न
  मार्च, सन १९१४ अखेर
५ वर्षांची सरासरी एकर
सन १९१६ ते १७ एकर मार्च, सन १९१४ अखेर
५ वर्षांची सरासरी. हंड्रेडवेट
सन १९१६ ते १७, हंड्रेड
बिहार-ओरिसा  ८३०००  ८०६००  ११७००  १०९००
 मद्रास  ७३०००  ४४९००  १६२००  ५९१००
 पंजाब  ३२९००  १५७४००  ५१४००  ९९००
 संयुक्त प्रांत  २४४००  ५९३००  २९००  १४१००
 मुंबई- इलाखा  ५२००  ७०००  १३००  १००
बंगाल ११०० २२०० १०० २००
एकूण २२०००० ७५६४०० ३७६०० ९५५००

(मुंबई इलाखा व बंगाल यांतील आंकडे अनुक्रमें २ व ४ वर्षांच्या सरासरीचे आहेत.)

याप्रमाणें गेल्या शतकांत बाहेरील देशांनां निळीचा पुरवठा हिंदुस्थानांतून होत असे. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळीं बंगालप्रांतांत मोठमोठे कारखाने निघाले व त्यांतून सन १८९६ पर्यंत हिंदुस्थानांतून कोट्यवधि रुपयांची नीळ यूरोपांत जात असे. जर्मनींतील कृत्रिम रंग हिंदुस्थानांत येऊं लागल्यापासून निळीची लागवड खालावत चालली होती; तिची लढाईमुळें पुन्हां ऊर्जितावस्था होत चालली हें वर दिलेल्या क्षेत्राच्या व किंमतीच्या आंकड्यांवरून लक्षांत येईल. हिंदुस्थानांत १८९५ सालीं निळीखालीं १६,८८,०४२ एकर क्षेत्र होतें, तें कमी होते होत सन १९१४ म्हणजे लढाई सुरू होण्यापूर्वी १५०००० एकरांवर आलें होतें. लढाई सुरू झाल्यापासून पुन्हां हें क्षेत्र चढत्या प्रमाणावर आहे हें वर दिलेल्या कोष्टकावरून सहज लक्षांत येईल.

लढाई बंद पडल्यावर पुन्हां उत्पन्न कसें उतरलें हें १९२३-२४ च्या आंकड्यावरून दिसून येईल.

प्रांत एकर हंड्रेडवेट
मद्रास ९५९०० २२०००
संयुक्तप्रांत १९८०० २२००
बिहार-ओरिसा २४८०० ४२००
पंजाब २६००० ६६००
बंगाल ९०० ....
मुंबई इलाखा ८००० ११००
एकूण १८५४०० ३६१००

कृत्रिम निळीमुळें किमतींत कसा फरक होत गेला हें खाली दिलेल्या आंकड्यांवरून सहज कळून येईल. इ.स. १८९७ दिलेल्या आंकड्यांवरून सहज कळून येईल. इ.स. १८९७ मध्यें एक पौंड चांगल्या निळीला ७ ते ८ शिलिंग (म्हणझे ७४.६६ पौंडांच्या एका मणाला ४००-४५० रुपये) किंमत पडत असे. लढाई सुरू होण्यापूर्वी जर्मनींतून कृत्रिम नीळ हिंदुस्थानांत दरवर्षी सुमारे ३२४ टन येत असे. लढाई सुरू झाल्याबरोबर किंमतींत अतोनात फरक झाला. सन १९१३-१४ च्या डिसेंबर महिन्यांत एका हंड्रेडवेटला जेथें २५५ रुपये पडत होते तेथें १९१४-१५ साली त्याच महिन्यांत  १०१२ रुपये पडूं लागलें. सन १९१५-१६ सालीं ९३७ व १९१६-१७ साली १०१२ रुपये एका हंड्रेडवेटाची किंमत झाली. हिंदुस्थानांतून निळीची निर्गत किती झाली हें खाली कोष्टकावरून दिसून येईल.

वर्ष हंड्रेडवेट किंमत रुपये
१८९४-९५ १६६,३०८ ४,७४,५९,१५३
१९८५-९६ १८७३३७ ५,३५,४५,११२
१८९९-१९०० ८५,४६० २,०८,७८,८४८

सन १८९७ पासून १९०६ पर्यंत निळीच्या व्यापाराला थोडथोडा उतरता पाय लागला व तो तसाच उतरत राहिला

वर्ष हंड्रेडवेटस् किंमत रुपये
१९०६-१९०७ ३५,१०२ ७०,०४,७७३
१९११-१९१२ १९१५५ ३७,५८,०२५
१९१२-१९१३ ११,८५७ २२,०१,३२५
१९१३-१९१४ १०,९३९ २१,२९,०७०
१९१९-१९२० ३२,६८७ ... ....
१९२१-१९२४ ६,७०२ ... ...बंगल्यांतून निर्गत मद्रास इलाख्यांतून निर्गत
वर्ष हंड्रेडवेट वर्ष हंड्रेडवेट
१८९६ १११,७१४ १८९६ ६२,४२५
१९१३ ८,७५२ १९१३ १,७८७
१९१९ १५,७३९ १९१९ ४,१७९
१९१२ ३,३१६ १९२३ २,७४४


सन १८८० मध्यें सर्व हिंदुस्थानांत निळीचे २८०० मोठे व ६००० लहान कारखाने होते व त्यांत ३६०००० लोक काम करीत होते. तेच १९११ साली १२१ मोठे कारखाने असून (पैकी ११२ वाफेनें चालणारे) त्यांत काम करणार्‍यांची संख्या ३०७९५ होती).

बिहार प्रांतांत दोन जातींच्या निळीची लागवड करतात. एक सुमात्रा व दुसरी नेटल- जावा; यांपैकीं सुमात्रा जातीची लागवड संयुक्तप्रांतांत, मद्रास इलाख्यांत व पंजाबांत विशेष आढळते. जावा जातीची लागवड बिहार प्रांतांत सन १९०४ पासून जास्त प्रमाणांत सुरू झाली व या जातीचें सरासरी उत्पन्न सुमात्रापेक्षां कमी होतें हें खाली दिलेल्या आंकड्यांवरून सिद्ध होतें.

रंग रंगाचें उत्पन्न
दर एकरी सरासरी उत्पन्न सरासरी दर १०० मण पाल्यांतून
वर्ष शेर छटाक शेर छटाक
१९०६ जावा १४ १४ १३
सुमात्रा १० १५ १२


१९१६ सालीं हेंच उत्पन्न जास्त आलें आहे. जावा १६ ते १८ शेर. सुमात्रा ८ ते त ९ शेर. याच सालांतील जावांतील पहिल्या कापणीच्या पानांत इंडिगोटिनचें शेंकडा प्रमाण ०.८ ते १ व सुमात्रांतील शें. प्रमाण ०.४ ते ०.६ होतें.

जावाची पेरणी आक्टोबरांत करितात व दर एकरीं बीं ५-६ शेर पडतें. जानेवारीपर्यंत त्याची फारशी वाढ होत नाहीं. पहिली कापणी मे-जून महिन्यांत होते. ही सहा इंच बुडखे ठेवून करतात. दुसरी कापणी आणखी दीड महिन्यानें येते. सुमात्रा जातीची लागवड फेब्रुवारींत करतात. ही लागवड आक्टोबरांत केल्यास थंडीमुळें पीक बरोबर येत नाहीं. बीं दर एकरी ८-१२ शेर पेरितात. याची पहिली कापणी जुलई महिन्यांत येते. दुसरी कापणी दोन महिन्यांनीं येते. बहार व बंगाल प्रांतांत नदीकांठच्या मळईंत पूर येऊन गेल्यावर निळीचें बीं आक्टोबरांत फेकून पेरितात. याची एक कापणी उत्तम येते. संयुक्त प्रांतांत हलक्या जमिनींत निळीचें एक पीक पाणी देऊन पेरून सप्टेंबरांत कापतात. याची दुसरी कापणी घेत नाहींत. निळीच्या बियावरील कवच कठिण असल्यामुळें तें नरम व्हावें व लवकर उगवावें म्हणून पेरण्यापूर्वी तें गंधकांच्या तेजाबांत व नंतर पाण्यांत धुवून वाळवून पेरितात. बीं दर एकरीं पांच सहा शेर पडतें. एक मण बियाला तीन शेर तेजाब लागतो. तेजाबांत बीं चांगलें मिसळल्यावर त्यावर २० ते ३० ग्यालन पाणी ओतून तें झराझर हालवावें व एक मिनिट थांबून पाणी ओतून टाकावें. असें पांच सहा वेळ सर्व तेजाब नाहींसा होईपर्यंत धुवावें. नंतर सर्व पाणी काढून बीं उन्हां घालून वरचेवर परतून वाळवावें.

नीळ हें झाड द्विदल जातीपैकीं असल्यामुळें ज्या जमिनींत निळीची लागवड करावी ती जमीन सुधारत जाते व पुढच्या पिकास त्यापासून फायदा होतो. तांबूस, काळ्या अगर रब्बी पिकें करण्यास योग्य अशा जमिनींत नीळ चांगली होते. जमीन नांगरून कुळवून ढेंकळें फोडून तयार झाल्यावर ती फळी फिरवून घट्ट करितात. दर एकरीं शेणखत २० ते ३० गाड्या देतात. नंतर एक फुटाच्या अंतरानें पाभरीनें बीं पेरितात. बीं दर एकरीं १२ ते १५ पौंड पडतें. पुढें या पिकास दोन खुरपण्या व दोन तीन कोळपण्या देतात. जमीन नेहमी भुसभुशीत राहील अशी तजवीज करतात. पेरणी जूनमध्यें झाली असल्यास पहिली कापणी ३।। ते ४ महिन्यांनीं म्हणजे सप्टेंबर महिन्यांत मिळते. फुलें येऊ लागलीं अगर पानें मोडून जर चटदिशीं दोन तुकडे होतील तर नीळ कापण्यास तयार झाली असें समजावें. पीक कापल्यानंतर त्यावर पाऊस पडल्यास त्यांतील रंग बिघडतो व कमी पडतो. दुसरें पीक घेणें असल्यास २-३ इंच बुडखे ठेवून झाडें कापावीं. म्हणजे पुन्हां साडेतीन चार महिन्यांनीं कापणी येते. याप्रमाणें तिसरेंहि पीक घेता येतें. परंतु बहुतेक ही कापणी न घेतां झाडें बियाकरितां ठेवितात. कित्येक ठिकाणीं हीं झाडें दोन तीन वर्षे राहूं देतात. पाणी दिल्यास दर तीन महिन्यांत एक कापणी मिळते. पहिली कापणी सप्टेंबर ते आक्टोबर;  दुसरी नोव्हेंबर ते डिसेंबर व तिसरी फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत मिळते. केव्हां केव्हां कपाशींत निळीचें बीं पेरतात. खानदेशांत एक कापणी पहिल्या वर्षी घेतात तिला `धुरपान’ म्हणतात. दुसर्‍या वर्षी दोन कापण्या घेतात त्यांनां अनुक्रमें `खोडवा’ व `मच्छी’ म्हणतात. तिसर्‍या वर्षी पिकाचें बीं धरितात.

रंग तयार करण्याची रीत- निळींचीं झाडें सकाळीं कापून तीं एका चुनेगच्ची गोळ (सुमारे ६ फूट व्यासाच्या व ४ फूट खोलीच्या) कुंडींत दगडाखालीं दाबून ठेवितात. सभोंवतीं दीड फूट जागा सोडून आंत एक लहान कुंडी केलेली असते. तिचा व्यास तीन फूट व खोली दोन फूट असते. नंतर त्यांत स्वच्छ पाणी सोडितात. तें निळीवर तीन इंच असलें पाहिजे. प्रत्येक कुंडीत सुमारें झाडाचीं बारा ओझीं मावतात. सुमारें चोवीस तासांनीं पाल्यांतील रंग पाण्यांत उतरतो. दुसर्‍या दिवशीं पहाटे हीं दाबलेलीं झाडें बाहेर काढितात. व कुंड्यांतील पाणी दोन तीन तास पायानें ढवळतात. कित्येक ठिकाणीं काठ्यांनीं ढवळतात. जावांत घुसळण्याचें काम आंत वाफ सोडून अगर कोंडलेली हवा सोडून करितात. पाण्याचा रंग प्रथम फिकट हिरवट असून पुढें तो निळा होतो व नंतर तांबूस दिसूं लागतो. कुंडींतील पाणी उतूं येऊं लागल्यासारखें दिसूं लागल्यावर त्यांत पळसाचा डिंक पाण्यांत भइजवून अगर पळसाच्या सालीचें पाणी करून टाकितात. या योगानें रंग तळाशी जाऊन बसतो. नंतर पाणी स्थिर झाल्यावर वरील पाणी फेंकून देऊन खालील रंगाचा गाळ लहानशा कुंडींत टाकून तींत तो रात्रभर रहूं देतात. दुसर्‍या दिवशीं वरील पाणी फेंकून खालील रंगाचा सांका खादीच्या कपड्यावर घालितात व त्याला विळ्यानें कवच्या पाडितात. यानें सर्व पाणी निघून जाऊन रंगाचा सांका दाट होतो. या कपड्याची गांठोडी करून त्यावर चार पांच तास दगडाचा दाब ठेवितात. नंतर गाळाच्या वड्या कापून ठेवितात व वर राख टाकतात. सर्व पाणी निचरून गेल्यावर जमिनीवर राख टाकून त्यावर दुसर्‍या दिवशीं त्या वड्या चटईवर उन्हांत वाळवितात. तिसर्‍या दिवसापासून त्या सावलींत वाळवितात. याप्रमाणें सुमारें तीन आठवड्यांत बाजारांत विकण्याजोगा रंग तयार होतो.

सुक्या पानांपासून रंग करण्याची कृति:- या कृतीनें रंग करण्याची पद्धत मद्रासेकडे जास्त प्रचारांत आहे. पानें वाळलेली असल्यामुळें फुरसतीप्रमाणें रंगाचें काम करितां येतें. या कृतींत झाडें कापून ती दोन तीन दिवस शेतांत वाळवितात. नंतर फादंया झोडून पानें वेगळीं करितात व तीं सुक्या जागेंत सांठवून ठेवितात. पुढें रंग करण्याच्या वेळीं वरीलप्रमाणें एका चुनेगच्ची हौदांत भिजत घालितात. त्यांत पानांच्या सहापट पाणी घालितात व तीं दोन तास लांकडी दांड्यांनी ढवळतात. सर्व पानें भिजून पण्यांत खालीं बसेपर्यंत असें करावें लागतें. दोन-तीन तासांनीं पाण्याला हिरवा रंग येतो व पाणी दाट दिसूं लागतें. नंतर तें पाणी दुसर्‍या हौदांत घेतात. पहिल्या हौदांत पाणी जास्त वेळ राहिल्यास कांहीं रंग पानांत पुन्हां मिसळून जातो. पुढें सर्व कृति पहिल्या प्रकारांत सांगितल्याप्रमाणें करावी. एक वर्षाच्या सर्व पिकांचें उत्पन्न सरासरी ९-१० टन होतें.

दर एकरीं सरासरी उत्पन्न रंगाचें प्रमाण शेर
पहिल्या कापणीस ४०—५०
दुसर्‍या  ,, ७०--८०
तिसर्‍या  ,, ३०—४०

निळीचा रंग पक्का असतो. कापड फाटलें तरी रंग जात नाही. निळीच्या फांद्यांचा रंग काढल्यावर त्यास खानदेशांत ``लाखो’’ व बहार प्रांतांत ``सांट’’ म्हणतता. त्यांचा खताकडे चांगला उपयोग होतो.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .