प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ
            
नृत्य- ही कला अत्यंत प्राचीन कालापासून तयार होत आहे आणि हिची जोपासना जगांत सर्व प्रकारचे लोक करीत आहेत. आपल्या देशांत या कलेस आज एक प्रकारचें गौणस्थान आहे, व चांगल्या स्थितींतील पुरुष व स्त्रिया या कलेकडे गौरवानें पहात नाहींत. वेश्यावृत्तीच्या स्त्रियांच्या हातीं ही कला पडली आहे. तथापि यावरून या कलेकडे आपल्या लोकांचें पूर्वीपासून दुर्लक्ष होतें असें म्हणतां येत नाहीं. कां कीं, या कलेवर संस्कृत पंडितांनीं लक्ष देऊन त्या कलेच्या शास्त्रीकरणासाठीं लागणारा प्रयत्न केला आहे. उलटपक्षीं असेंहि म्हणतां येणार नाहीं कीं पाश्चात्य देशांत या कलेच्या धंदेवाईकांकडे समाजाचें सन्मानपूर्वक लक्ष पूर्वीपासून होतें. सामान्य नाचणार्‍या स्त्रिया म्हणजे त्या अनीतिमार्गी असावयाच्याच ही समजूत पाश्चात्य देशांतहि बरीच प्रचलित आहे व तरुण शृंगारास्वाद घेऊं इच्छिणारीं पोरें अशाच प्रकारच्या स्त्रियांशी दोस्ती जमविण्याचा प्रयत्न करतात, आणि सुशिक्षित मध्यम वर्गाची तरुण मुलगी जर रंगभूमीवर गेली तर अजूनहि लोकांत त्याबद्दल डोळे वटारले जातात.

आपल्याकडे नृत्यकलेस समाजांत कनिष्टस्थान मिळालें याचें कारण तिचे उपासक कमी होऊन ती कला केवळ धंदेवाईकांच्या हातीं पडलीं हेंच प्रामुख्यानें देतां येईल. धंदेवाईक नर्तकनर्तकींची नैतिक स्थिति समाजांत नेहमीच वरखालीं होत जाणार व ती खाली होणें ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्याकडे कांहीं वरच्या वर्गांतील स्त्रिया षोकासाठीं नृत्य शिकत असाव्यात हें शक्य आहे. पण या गोष्टीची व्याप्ति मध्यमवर्गांत किती होती हें सांगतां येत नाही. प्राचीन हिंदुस्थायांत नृत्यकलेचें व त्यांतील हावभावांचें कसें शिक्षण देत हें नंदिकेश्वराच्या `अभिनयदर्पणा’ वरून कळून येईल. या ग्रंथाचा गोषवारा `अभिनय’ या लेखांत [ज्ञानकोश विभाग ६, पृ. ३०८] दिला आहे, तो पहावा.

वेदकालांत नृत्य ही गोष्ट लोकप्रिय होती तथापि तिकडे सद्बुद्धीने लोक पहात असत अशी समजूत करून घेण्याचें खात्रीपूर्वक साधन नाही. महाव्रतांत जें नृत्य आहे तें दासीचें आहे. केवळ श्रौतसंस्थांत नृत्याचा प्रवेश म्हणजे संस्थेचा सन्मान असें मुळींच नाहीं. कां कीं, महाव्रतांत कांहीं अश्लील गोष्टीहि आल्या आहेत, तथापि नृत्य ही गोष्ट शास्त्रीय तर्‍हेनें अभ्यास करण्यास लायक आहे इतपत लोकांची खात्री झाली होती. शास्त्रीकरणाचें स्वरूप खालीलप्रमाणें देतां येईल.

मनुष्यांतील व इतर अनेक प्राण्यांतील भावनांचें स्नायूद्वारां आविष्करण करण्याची जी नैसर्गिक क्रिया तिला नृत्य म्हणतात. समाज व व्यक्ति यांच्या प्रत्येक हालचालीशीं संबंध येईल अशा रीतीनें मानववंशाच्या सामाजिक व्यवहारांत नृत्याला वाव मिळालेला आहे. त्याच्या हालचालीला तालबद्धता पाहिजे. ही तालबद्धता अतिशय गंभीर व निरुद्ध अशा भावनांचें आविष्करण करण्यास चांगली उपयोगी पडते. अशा नृत्यामुळें लोकांनां ज्याची मनापासून आवड त्यां विषयीं आवेश वाढतो. नृत्यांत सर्व अवयवांनां चालना मिळते, भावनामय उत्साह प्रदीप्त होतो, तो इतका कीं कधीं कधीं नाचणारी व्यक्ति बेहोष होऊन पडते. याप्रमाणें एखादी गोष्ट साजरी करण्याचा व वैयक्तिक किंवा सामाजिक भावना दिग्दर्शित करण्याचा नृत्य हा नैसर्गिक प्रकार आहे. मुळारंभीं हा एक निव्वळ शारीरिक खेळ असून विषयवासनेला उत्तेजन किंवा करमणूक म्हणून तो करीत पण समाज जसजसा विकसत गेला तसतसा नृत्याचा उफयोग समारंभ व नाटकें यांतूनच विशेषत: होऊं लागला, व त्यांतच अनेक अंगांचा समावेश होत असे. उदाहरणार्थ, साध्या हास्योत्पादक नाचांत, उपासना, नाटक, व्यायाम, आवेश, करमणूक, खेळ, कला या सर्वांचे मिश्रण असतें.

चलनवलनांचे क्षेत्र- नृत्याचें क्षेत्र साहजिकच फार मोठें असते. एका टोंकाला भावनाहीन कवायती तर दुसर्‍या टोंकाला संभाषणांत योजले जाणारे हस्ताभिनय या दोहोंमधील विस्तीर्ण क्षेत्र नृत्याचें आहे. करमणूक म्हणून केल्या जाणार्‍या आधुनिक नाचांत हें चलनवलन फक्त पायांपुरतेंच असतें. पण पूर्वावस्थांत बाकीचें सर्व शरीर आणि विशेषत: हात यांचा उपयोग करीत (`अभिनय’ पहा); प्राचीन नृत्यकलेंत शरीराचें चलन प्रामुख्यानें नजरेस येई. संगीत व इतर साधनें हीं शारीरिक आविर्भावाला मदत म्हणून उपयोजिण्यांत येतात. कलाकौशल्याच्या नाचाचे कांहीं प्रकार कोल्हाट्याच्या किंवा जादूगाराच्या खेळासारखे वाटतात. उलट बहुतेक सामाजिक, धार्मिक नाच मिरवणुकीवजा असतात.

अनुनय व नृत्य- ज्याप्रमाणें अनेक पक्षिगणांतील नर आपल्यांत व आपल्या प्रणयिनींत कामोद्दीपन व्हावें म्हणून मादीभोंवतीं नाचतात त्याचप्रमाणें रानटी माणसें स्त्रियांची आराधना करण्याकरितां त्यांच्याभोंवती नाचतात. मनुष्य व पक्षी या दोहोंतहि निसर्गबुद्धीनेंच हें काम होतें; हेतुपूर्वक नसतें. स्त्रियांच्या पुढें पुढें करण्याची आजची तरुणांची वृत्तीहि वरच्या सारखीच नैसर्गिक आहे. आज होत असलेले बॉल-रूममधील नाचहि तरुणतरुणींनां एकत्र आणण्याकरितां योजिलेली एक सर्वमान्य युक्ति आहे. स्त्रीपुरुषांच्या आकर्षकतेचें वर्णन करण्याचा आणि त्यांस एकत्रपणें सुशिक्षित करमणूक करून देण्याचा हा एक सुसंस्कृत प्रकार आहे. कामोद्दीपनाच्या शक्तीमुळें त्याची लोकप्रियता वाढते ही गोष्टहि लपत नाही. ज्यांत स्त्रीपुरुषांनीं परस्परांनां घट्ट आंवळून नाचण्याची पद्धत प्रथमच पुढें आली तो `वाल्टस्’ नाच जेव्हां इंग्लंडांत एक शतकपूर्वी सुरू झाला तेव्हां त्याच्या विरुद्ध लोक बरेच खवळले होते.

युद्धनृत्य- नाचणार्‍या योद्ध्यांच्या अंगी शारीरिक उत्साह व शौर्य वाढण्याकरितांच म्हणून मुख्यत: या नाचाचा मूळ उपयोग असे. शिवाय या नाचाच्या अंगीं असणारा जादूचा प्रभाव व आपल्या अत्याचाराच्या हावभावांनीं शत्रूच्या ठिकाणीं उत्पन्न होणारी भीति या सारख्या मूळच्या लोकांच्या कल्पनाहि या नाचाला कारणीभूत आहेत. या नाचाचा व्यावहारिक पण त्या रानटी लोकांनां अज्ञात उपयोग असा आहे की, त्यामुळें त्यांनां शत्रूवर हल्ला करण्याच्या प्रकारांची आपोआप उजळणी मिळते व कवाईत केल्यासारखी होते. तेव्हां रानटी लोकांच्या किंवा स्पार्टन लोकांच्याहि युद्धनृत्यांनां, त्यांनां नकळत केली जाणारी लढाईची रंगीत तालीम म्हणतां येईल. तथापि कोणत्याहि अतिमानुष शक्तीशीं झगडण्याकरितांहि हीं युद्धनृत्यें होतात. कृषिविषयक धार्मिक विधींत पिकांचे रोग, वाईट हवा आणि इतर नापीकतेच्या गोष्टी यांच्याशी झगडण्यासाठीहि अशी युद्धनृत्यीं किंवा यासारखेच प्रकार केलेले दिसून येतात.

कृषीवल नृत्यें- लागवडीच्या वेळी केले जाणारे अशा प्रकारचे समारंभ पिकांनां यशस्वी होतात अशी समजूत असते. अनुकरणप्रवर्तक जादूमुळें नाचणार्‍यांच्या हालचालींचा पिकांवर परिणाम होतो, किंवा नाचणार्‍यांच्या ठिकाणी वनस्पतिदेवता अवतरून त्या सद्गुण व सुपीकता प्रसृत करतात असा साधारण समज आहे. यूरोपांत तर हे नाच फार. आपल्या हालचालीनें आपण निसर्गाला हलवितों या समजुतीनें शेतकरी नाचतात. आपणांकडील गौरीप्रमाणें एखादें झाड किंवा खांब यांभोंवतीं नाचणें विशेष रूढ असून त्याला लौकिक नृत्यहि म्हणतां येईल. यांत धार्मिक विधी व करमणूक यांचें सुंदर मिश्रण दृष्टीस पडतें. यांत मानवप्राण्यांच्या सुरतलीला  सृष्टीला समृद्ध करण्याला उफयोगी पडतील अशा वाटतात असे अनेक विधी आहेत. नाचांत पुष्कळ वेळां सुरत-प्रयोगाचें अनुकरण केलें जातें व त्याचा जादूटोण्याप्रमाणेंहि उपयोग मानितात व यामुळें नृत्यकलेंत उत्पन्न होणारे हावभाव सभ्य नृत्यांस चिकटवण्याचा प्रयत्न, अर्वाचीन कालांत वारंवार होतो.

जादू नृत्य- आपल्या आवेशपूर्ण हालचालीमुळें भोंवतालच्या वातावरणांत नृत्य हें चलबिचल घडवून आणतें ही कल्पना पाऊस पाडण्याच्या आफ्रिकन किंवा आस्ट्रियन लोकांच्या विचित्र चालींत चांगली दिसून येते. ग्रीक पुराणांतील बकनृत्य हे सूर्याच्या प्रगतीला साहाय्यक असें जादूनृत्य आहे असें मानितात. जगांतील निरनिराळ्या भागांत चालणारीं मुग्धाभिनयी नृत्यें ही निरनिराळ्या पक्ष्यांच्या गतीला अनुसरून आहेत. कांहीं नृत्यें केवळ जादूची नसून `सहानुभूत्युत्पादक’ (सिपेंथेटिक) असतात. मृताभोंवती नाचण्याची कित्येकांत (यूरोपीयन लोकांतहि) चाल आहे. त्याबद्दल समजुतीहि भिन्न भिन्न आहेत.

धार्मिक नृत्य- धार्मिक उपासनेचा एक भाग किंवा रूप म्हणून नृत्याला स्थान मिळणें अगदी स्वाभाविक आहे. अशा नृत्याचे हेतू प्रसंगाप्रमाणें निरनिराळे असूं शकतील. ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रथणवस्थेत बिशप हे भक्तांनां घेऊन देवळांत व संतांच्या समाधीपुढें नाच करीत. ६९२ च्या कौन्सिलनें ही चाल बंद करण्याचा प्रयत्न केला, पण ती बंद झाली नाही. १८ व्या शतकांत देखील फ्रान्समध्यें संतांच्या उत्सवप्रसंगी उपाध्यायांचा नाच होई. नृत्यासंबंधींच्या निरनिराळ्या कल्पना या धार्मिक नृत्यांत गर्भित असतात. आपल्याकडे हरिभक्तांचें नाचणें वारंवार दृष्टीस पडतेंच.

मुग्धाभिनयी नृत्य- सौंदर्यशास्त्रीय दृष्टीनें पहातां नृत्य हें स्नायु-संगीत म्हणतां येईल. संगीताप्रमाणें तें प्राधान्यें करून स्वत:चेंच दिग्दर्शन करतें. त्यानंतर तें कलेच्या क्षेत्रांत व साधनांत जें कांहीं असेल त्याचें आविष्करण करितें. या दुसर्‍या कार्याच्या वेळीं नृत्य हें मुग्धाभिनयी असतें. या प्रकारच्या नृत्याचा इतिहास फार दूरवर पोंचतो. हें नृत्य आस्ट्रेलियनांसारख्या अतिशय कमी सुधारलेल्या लोकांत बरेंच विकास पावलेलें असून आजच्या सुधारणेच्या शिखरास पोंचलेल्या लोकांतहि अत्यंत प्रिय अशेंच आहे. इतर प्रकारांप्रमाणें याचाहि उपयोग निरनिराळ्या कारणाकरितां निरनिराळ्या ठिकाणीं करतात. मुग्धाभिनयी किंवा छद्मेवेषी नृत्यांत बराच गूढार्थ आहे असें कांहीं लोक समजतात. वायव्य अमेरिकेंतील देश्य लोकांत या नृत्यांची बरीच प्रगति दिसते. यांतून जातीच्या संरक्षक देवतांच्या चरित्रांतील प्रसंग दाखविण्यांत येतात. दैवक उपासनेच्या प्राण्यांची नृत्यें या लोकांच्या बर्‍याच धार्मिक भावना व्यक्त करतात.

आजकाल प्राथमिक शाळांतून शैक्षणिक प्रयोगादाखल मुग्धाभिनय होत असतात. पेरणी, कापणी यांसारख्या साध्या क्रिया मुलें अंगविक्षेपानें बरोबर करून दाखवितात. आतांच्या सिनेमाप्रमाणें करण्यांत येणारीं मूकनाटकें प्राचीन काळीं लोकप्रिय होतीं. याकरितां पुराणांतून कथानकांची निवड करीत; यांतून नाचहि बरेच असत. अर्वाचीन बॅलट नृत्य १५ व्या शतकापासून अस्तित्वांत आहे. इटलींतून बॅलट जेव्हां फ्रान्समध्यें आलें तेव्हां त्याची खरी प्रगति झाली.

सामाजिक करमणुकीचा प्रकार- नाटकांप्रमाणेंच कलाकौशल्ययुक्त व नाटकी नृत्यांवरहि पुष्कळ वेळां निरनिराळ्या समाजांचे हल्ले होऊन ती निषिद्ध ठरत. यामुळें नाचाचा धंदा करणारांचा एक स्वतंत्र वर्ग बनला. बर्‍याच समाजांतून असे वर्ग असून त्यांनां प्राप्तीहि चांगली होते, तथापि लोक त्या धंद्यांत पडूं इच्छीत नाहींत. जागतिक कलेच्या इतिहासांत टॅग्लिओनी व पॅव्हलोव्हा यांसारखे श्रेष्ठ नृत्यकार होऊन गेले असून त्यांचा दर्जा अतिविख्यात गवयी व पद्यकार यांच्या खालोखाल लागेल यांत शंका नाही.

सामाजिक करमणूक म्हणून नृत्याचा उपयोग अगदी अलीकडचा आहे. मुलांनीं व मुलींनी एकत्र नाचावें या मताचा प्लेटो होता तरी १५ व्या शतकांत इटलींत या कलेचें पुनरुज्जीवन होऊन ती फ्रान्समध्यें जाईपर्यंत तिला खेळाच्या दृष्टीनें फारसें महत्त्व नव्हतें. पुढें स्पेन हें या कलेचें माहेरघर बनलें. नृत्यकलेच्या विकासाचा इतिहास नि:संशय सामाजिक विकासावर बराच प्रकाश पाडील. या इतिहासांत एकामागून एक येणार्‍या विकासावस्था किंवा संप्रदाय स्पष्ट दिसतात. विशिष्ट नृत्यांमध्यें पॅव्हने’चा प्रमुखत्वानें उल्लेख करावा लागेल. याचें धंदेवाईक स्वरूप आहे. `मिन्युएट’ हें या कलेंतील अतिसुंदर फळ म्हणतां येईल. पण वास्तविक हें फक्त सभ्याचाराचे कृत्रिम नियम दर्शवितें. `पाल्टस’ हें युग्मनृत्य संशयजन्य आहे. संस्कृत व रानटी लोकांचा संबंध येत गेला म्हणजे एकमेकांतील नृत्यप्रकार एकमेक उचलतात असा अनुभव आहे.

आपल्याकडे नृत्याचे शास्त्रीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला तो येणेंप्रमाणें.

प्रत्येक नाचांत शरीराच्या हालचाली म्हणजे अभिनय वर्णन करतांना (१) अंगें, म्हणजे डोकं हाताचे पंजे, कुशी, कंबर, पाय व मान (२) प्रत्येंगें, म्हणजे खांदे, बाहू, पोट, माड्या, पोटर्‍या, मनगटें, गुडघे व हातांचे कोपरे (३) आणि उपांगे म्हणजे डोळे, पापण्या, बुबुळें, गाल, नाक, तोंड, ओठ, दांत, जीभ, हनुवटी, चेहरा. या तीनहि प्रकारच्या अभिनयस्थानांच्या हालचालींचे वर्णन करावें. नृत्यवर्णनाची शास्त्रीय भाषा तयार झाली आहे ती येणेंप्रमाणें:- गाणें ज्याप्रमाणें सात स्वरांत लिहितां येतें त्याप्रमाणें प्रत्येक नाच अभिनयांत लिहितां येतो. स्वाभाविक क्रिया करतांनां जे अंगविक्षेप होतात अगर ज्या क्रिया होतात त्यांपैकीं प्रत्येक अंगाच्या, प्रत्यंगाच्या व उपांगाच्या प्रत्येक निरनिराळ्या क्रियांस नांवें दिली गेली आहेत. त्यामुळें सर्व प्रकारच्या हालचाली (अभिनय) थोडक्यांत लिहितां येतात. अनेक प्रकारचे अभिनय एकत्र होऊन एक नृत्य होतें. नृत्याचे हेतू सामान्यत: तीन असतात (१) शरीर-चापल्य व हालचालींतील गोंडसपणा दाखवून प्रेक्षकास आश्चयर्चकीत करणें, (२) संगीतास जोड म्हणून आपल्या पायांनीं अगर घंटांनीं नाद उत्पन्न करून, किंवा नादास योग्य असे अंगविक्षेप करून, श्रोत्यांच्या किंवा प्रेक्षकांच्या मनावर एकभाव उत्पन्न करणें, (३) स्मरणानें पूर्वानुभूत विकार जागृत करतां येतात म्हणून, सर्वांस परिचित असलेल्या क्रियांची, अगर ऐतिहासिक, पौराणिक व नाट्यविषय झालेल्या कथांची, प्रसंगांची अगर व्यक्तींची भावविषयक स्मृति उत्पन्न करणें.

या पद्धतीने नृत्य विवेचन आपल्या ग्रंथांत आढळतें. यूरोपांतहि शास्त्रीकरणाचे प्रकार याच पद्धतीचे आहेत. पण त्यांनी अनेक ठिकाणी आढळणार्‍या अंगविक्षेपसंतति अवलोकून आणि त्यांनां अधिक गोंडसपणा देत जाऊन त्यांस कलेंत स्थान दिलें आहे.

अर्वाचीन नृत्य- अर्वाचीन काळांत कला व करमणुकीचें साधन या नात्यानें नृत्याची वाढ झालेली आढळते. मनोविकार अगर धार्मिक भावना उद्दीपित करण्याचें नृत्य हें महत्त्वाचें साधन आहे अशी जी प्राचीन कल्पना होतीं ती अर्वाचीन काळांत मागें पडत चाललेली दिसते.

पंधराव्या शतकांत इटलीमध्यें नृत्यामध्यें क्रांति घडून आली, व फ्रान्समध्यें त्याच्या वाढीला चांगला अवसर मिळाला. खुद्द फ्रान्समध्यें उत्पन्न झालेले नृत्याचे प्रकार फारच थोडे आहेत, पण परकीय राष्ट्रांतील विविध नृत्यांचे प्रकार आपल्या राष्ट्रांत आणून त्यांची सुंदर तर्‍हेने वाढ करण्याचें काम फ्रान्स राष्ट्राला उत्तम साधतें. नृत्यशास्त्रांतील संज्ञा बहुतेक फ्रेंच भाषेंतील आहेत एवढी एकच गोष्ट वरील विधानाच्या समर्थनाला पुरेशी आहे.

डॅन्से बॅसे व हौटे:- सोळाव्या शतकामध्यें डॅन्से बॅसे व डॅन्से हौटे हे नृत्याचे नवीन दोन प्रकार अस्तित्वांत आले. डॅन्से बॅसे हा शिष्टांमध्यें प्रचलित असे तर दुसरा खेडवळ लोकांत प्रसार पावला होता. याखेरीज या शतकांत, गैलार्ड, वोल्ट, ब्रनले, पवान इत्यादि नवीन नवीन प्रकारामध्यें पवान हा प्रसिद्ध व लोकप्रिय नृत्यप्रकार होता. याचें वर्णन टॅबोरे नांवाच्या एका नृत्यशास्त्रज्ञानें सविस्तर दिलें आहे. या प्रकारांत नृत्यकौशल्यापेक्षां, बाह्यदेखावाच अधिक असे. नर्तक व नर्तकी यांचे भपकेदार पोषाख  असत, नर्तकांच्या हातांत तलवारी असत व डोक्यावर पिसांच्या टोप्या असत.

पवान व इतर:- पवान अगर ब्रनले व १७ व्या आणि १८ व्या शतकांत उदयास आलेल्या इतर नृत्यप्रकारांमध्यें चुंबनालाहि बरेंच महत्त्व देण्यांत येत असे व त्यामुळें ते लवकर लोकप्रिय झाले. १७ व्या शतकांत सरबंद नांवाचा एक नृत्यप्रकार अतिशय लोकप्रिय होता. पण तो फार दिवस टिकला नाही. पवानच्या खालोखाल कौरान्टे नांवाचा एक प्रकार अस्तित्वांत आला. या नाचांत, पायाच्या बोटावर नाचण्याची व अनेक वेळां प्रणाम करण्याची पद्धत असे. चवदाव्या लुईला हा नाच फारच आवडत असे व त्याच्या वेळी प्रत्येक सरदार घराण्यांतील माणसाला हा नाच शिकावा लागे असें म्हणतात.

मिन्युए:- पण फ्रान्सनें ज्याची पूर्ण वाढ केली असा नाच म्हणजे मिन्युए हा होय. हा १६५० साली बाहेरून फ्रान्समध्यें आला. प्रथम हा नाच विनोदी व हास्योत्पादक होता. पण त्याचा दरबारांत प्रवेश झाला त्यावेळीं त्याला भारदस्त स्वरूप प्राप्त झालें. चवदाव्या लुईच्या कारकीर्दीत तर याच्या लोकप्रियतेचा कळस झाला. हल्लीच्या मिन्युए नाचाला जें छचोरी स्वरूप प्राप्त झाले आहे तें लुईच्या वेळीं मुळींच नव्हतें. तरीपण त्यावेळीहि या नाचांत भपकेदार पोषाखाचा व थाटमाटाचा प्रवेश झाला होताच. निरनिराळ्या नाचांतून चांगला भाग जेवढा असेल तेवढा या मिन्यूएमध्यें घेतलेला होता. तत्कालीन फ्रान्स हा `शिव्हलरी’ उर्फ वीरवृत्ति व स्त्रीदाक्षिण्य याबद्दल फार प्रसिद्ध होता. अर्थात त्यावेळच्या परिस्थितीला साजेसे फरक या मिन्यूएमध्यें करण्यांत आले होते. उत्कृष्ट हावभाव, ऐटींत मान लववून प्रणाम करण्याची पद्धत, हंसरा चेहरा, तिरप्या दृष्टीने बघणें इत्यादि मनोवेधक गोष्टींचा या मिन्युएमध्यें अंतर्भाव झाला असल्यामुळें, या नाचानें सर्वांनां वेड लावलें होतें. मिन्यूएमधील तालाबरहुकूम स्वरैक्यघटना करण्याची त्यावेळीं फ्रान्समध्यें पद्धत पडली. यावरून या नाचाची लोकप्रियता किती होती हें दिसून येतें. या मिन्यूएच्या अखेरीस `गॅव्होटे’ नाच करण्याचा प्रथम प्रघात असे, पण पुढें तो स्वतंत्र रीतीनें नाचण्यांत येऊं लागला. प्रथमत: त्याच्यांत चुंबन घेणे, मनोहर तर्‍हेनें उड्या मारणें इत्यादि प्रकार असत. पण पुढें त्यालाहि गंभीर स्वरूप प्राप्त झालें. विशेषत: याचा प्रसार रंगभूमीवर फार झपाट्यानें झाला.

याशिवाय फ्रान्समध्यें एकौसैस (१७६०); दहाव्या चार्लसच्या कारकीर्दीत काटीलाँ, जमिनींतून आलेला गलॉप, स. १८३६ मध्यें लॅबोर्देनें काढलेला लॅन्सर्स, प्रागमधून आलेला पोल्क, शोटिशे (१८४४); बोरी कड्रिल, बल्ट्स इत्यादि नाच फ्रान्समध्यें १८ व्या शतकांत व १९ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळांत उदयास आले.

पण फ्रान्स हें नृत्यसंवर्धनाचें तर स्पेन हे नृत्योत्पत्तीचें माहेरघर होय. स्पेनमध्यें नृत्य हा जीविताचा एक आवश्यक भाग म्हणून गणला जातो. दहाव्या अगर बाराव्या शतकांतील नाच अद्यापीहि प्रचारांत असलेले आढळतात. तुरडियॉन, गिबिदन, पीदे गिबाओ, मडम ऑर्लीअन्स, अलेमन, पवान इत्यादि नाच स्पेनमध्यें प्राचीन काळी प्रसिद्ध होते. चवथ्या फिलिफच्या कारकीर्दीत रंगभूमीवर नाचांचा फार सुळसुळाट असे; व ते नाच फार भपकेदार रीतीनें करण्यांत येत असत. त्यामुळें स्पेनमध्यें जे खरे खुरे नाच होते ते १८ व्या शतकांत मागें पडले. याच शतकांत बोलेरो, सेगुइदिला, फंडँगो इत्यादि प्रसिद्ध नाच उदयास आले. त्यांत फंडँगो हा सर्वांत महत्त्वाचा नाच होय. हा नाच दोघांनीं नाचावयाचा असतो. प्रथमत: अगदीं सावकाशपणें करतालांत व चुटक्या वाजवून नाचाला सुरवात होते आणि शेवटी तो ऐन रंगात आला म्हणजे अतिशय गडबडीनें नाचाला सुरवात होते. या नाचांतील महत्त्वाचा विशेष म्हणजे नाचाच्या मध्यंतरीच एकदम सर्व वादन बंद होतें व त्याबरोबर ते वादन पुन्हां सुरूं होईतों नाचणारें युग्म अगदी स्तब्ध व शरीराची यत्किंचत हालचाल न करतां उभें रहातें.

स्पेन:- बोलेरो हा नाच बराच अलीकडच्या काळांतला आहे. हा तिसर्‍या चार्लसच्या कारकीर्दीत, सेबॅस्टियन सेरेझो यानें काढला. या नाचांत, शस्त्रांचा उपयोग स्वैरपणानें करण्यांत येई. हा एका अगर एकाहून अधिक युग्मांकडून नाचण्यांत येत असे. स्पेनमधील प्रत्येक प्रांताचा स्वतंत्र असा नाच असे. अरागॉनमध्यें जोत हा नाच फार लोकप्रिय असे. विशेषत: धार्मिक समारंभाच्या वेळीं हा नाच करण्यांत येत असे. कचूका नांवाचा नाच त्रितालामध्यें नाचण्यांत येई. या नाचांत डोक्याच्या व खांद्याच्या हालचाली फार कराव्या लागत असत. याशिवाय, जिप्सींचा `जलेओडे जेरेझ’ हा नाच, पॅलोटीया, पोलो, गलेगडा, हबरुवेर्द, विटो इत्यादि नाच स्पेनमध्यें लोकप्रिय आहेत.

ग्रेटब्रिटन:- ग्रेटब्रिटनमधील नाच जवळ जवळ फ्रान्समधीलच असल्यानें त्यांचे येथें निराळें विवेचन करण्याचें कारण नाहीं. तथापि खास इंग्लंडचे असे कांहीं नाच आहेत, त्यांबद्दल येथें थोडे फार- विवेचन केलें पाहिजे. अशा खास इंग्लंडच्या नाचांपैकी एग व कॅरोल हे नाच होत. तिसर्‍या एडवर्डच्या कारकीर्दीत निघालेले मॉरिस नाचहि अद्यापि इंग्लंडांत प्रचारांत आहेत. मॉरिस नाचांपैकी, रॉबिनहूड, मेडमेरियन, फ्रायर टक, लिटल जान, टॉम दि पाइपर हे नाच फार प्रसिद्ध आहेत. इंग्लिश नाच हे शीघ्र गतीनें नाचावयाचे असतात. यांपैकी कांहीं मॉरिस नाच अजून नाचले जातात. तुतारीच्या साथीवर नाच नाचण्याची चाल इंग्लंडांत फार प्रचलित आहे. एलिझाबेथच्या कारकीर्दीत, साधे पण मनोरंजक असे नाच फार लोकप्रिय झाले. `हंट दि स्लिपर’, `किस इन दि रिंग’ इत्यादि नाच अगदीं साधे आहेत; यांनां आज नाच म्हणण्यापेक्षां मुलांचे खेळ म्हटलें पाहिजे. हे लपंडावासारखे आहेत. ट्यूडर अंमलांतील नाचांत चुंबनांचा फार सुळसुळाट असे. `कुशन’ नांचांत तर चुंबनाचें फारच स्तोम असे. याशिवाय `टॉली पॉली’, `कम किस मी नाऊ’, `दि हॅपी मॅरेज’, `डिसेंब्लिंग लव्ह’, `अंडर अण्ड ओव्हर’ इत्यादि अनेक नाच प्रसिद्ध होते. प्यूरिटन राजांच्या अमदानींत नाच मागें पडले पण रेस्टोरेशनच्या काळांत व अनच्या कारकीर्दीत पुन्हां नाचांस ऊत आला; व त्यांत अश्लील प्रकार घुसडले गेले. पण थोडक्याच काळांत पुन्हां सभ्य नाचाकडे लोकांची प्रवृत्ति होऊं लागली. स्कॉटलंडमध्यें जिगची फार लोकप्रियता आहे. वेल्समध्यें खास वेल्श लोकांचा असा स्वतंत्र नाच नाहीं. व्हिक्टोरियाच्या काळापासून नृत्यांतून चुंबन गेले आहे.

गेल्या पिढींत इंग्लंडमध्यें प्रचारांत असलेले नाच म्हणटे वाल्टझ, कड्रिल, लॅन्सर्स, पोल्का, गॅलप, वॉशिंग्टन पोस्ट, पोल्का मझुर्का, स्काटिशे, सर रॉजर डी कॉव्हर्ले, कोरिलान, बॅले इत्यादि होत. वाल्टझ् हा मुळांत फ्रेंच नाच होता. तो स. १८१२ मध्यें इंग्लंडांत आला. गंग्ल, वाल्डट्यूफेल, स्ट्रॉस इत्यादि घराण्यांतील नर्तकांनीं तो फार लोकप्रिय केला. क्वाड्रिल नाच इंग्लंडमधअयें लोकप्रिय करण्याचें श्रेय, लेडी जर्सी, लेडी हेरियट बटलर, लेडी सुसन रायडर, माँटगणरी, हार्ले, माँटेग्यू इत्यादि नर्तक-नर्तकींकडे आहे. लॅन्सर्स नाच १८५० सालीं इंग्लंडमध्यें आला व मॅडम सॅक्रे हिनें तो लोकप्रिय केला. पोल्का हा बोहेमियन लोकांचा नाच, इंग्लंडमध्यें १८४० साली आला. हा इंग्लंडमध्यें फारच लोकप्रिय झाला. सर रॉजर डी कॉव्हरले हा एवढाच नाच मात्र खास इंग्लिश आहे. टांगो, फास्कट्राट, दि ब्ल्यूज, वनस्टेप, टू स्टेप हे अगदीं अलीकडचे नृत्यप्रकार आहेत. सध्यांच्या नृत्यप्रकारांत अश्लीलता वाढत चालली आहे.

नृत्य हें शारीरिक शिक्षणाचें एक प्रमुख अंग आहे. यानें शरीराच्या सर्व भागांनां थोडक्यांत पुष्कळ श्रम होतात. शिवाय हे श्रम मनोरंजन होऊन साहजिकपणें होतात, त्यामुळें त्यांनां फार महत्त्व आहे. [व्हुइलीयर- हिस्ट्री ऑफ डान्सिंग, (१८९७); गिरौडेट-ट्रेटे डे ला डॅन्से (१९००).]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .