प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें  
          
प्रभु जाती, (१) कायस्थः- एक महाराष्ट्रीय जात (कायस्थ पहा.). इसवी सन १९२१ च्या खानेसुमारींत या ज्ञातीची मुंबई इलाख्यांतील लोकसंख्या २६,५८६ भरली. याशिवाय इंदूर, धार, देवास वगैरे मध्यहिंदुस्थानांतील संस्थानांत व व-हाड आणि नागपूर या सर्व ठिकाणची लोकसंख्या सुमारें २५०० भरेल, म्हणजे या ज्ञातीची एकंदर लोकसंख्या सर्व हिंदुस्थानांत सुमारें २९,००० आहे असें म्हणतां येईल. इसवी सन १९११ मध्यें मुंबई इलाख्यांत या ज्ञातीची लोकसंख्या २७,१२० होती व मध्यहिंदुस्थान व नागपूर इकडील २५०० लोकसंख्या धरून एकंदर लोकसंख्या ३०००० होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. या दहा वर्षांत लोकसंख्येची वाढ न होतां ती कमी झाली आहे असें दिसून येईल. ही लोकसंख्या कमी होण्यास प्लेग, इन्फ्लुएन्झा वगैरे सर्वसाधारण कारणें आहेतच, परंतु याशिवाय दुसरीहि काही आर्थिक कारणे आहेत. खेडीं सोडून पोट भरण्याकरितां पुष्कळ कुटुंबांनां शहरांत यावें लागत आहे. व शहरांतील संकोचित जागेंत रहाण्याचा दुष्परिणाम कुटुंबातील स्त्रिया तरूण मंडळीं व मुलें यांच्यावर होऊन पुष्कळ मंडळीं क्षयरोगासारख्या रोगांनां बळी पडत आहेत.

मुंबई इलाख्यांतील सर्व जातींमध्यें चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचें साक्षरतेचें प्रमाण जास्त आहे हीं गोष्ट मागील दोन तीन खानेसुमारींचे रिपोर्ट पाहिले असतां दिसून येईल साक्षर स्त्रियांचेंहि प्रमाण इतर ज्ञातींतील स्त्रियांपेक्षां अधिक आहे हीहि गोष्ट याच रिपोर्टावरून दिसून येईल. इंग्रजी शिक्षणाचा प्रसार याच ज्ञातीमध्यें युनिव्हर्सिटीच्या स्थापनेपासून झपाटयानें झाला. लेखनकला हेंच या ज्ञातीच्या उपजीविकेचें मुख्य साधन असल्यामुळें व सरकारी खात्यांत नोकरी मिळविण्यास इंग्रजी शिक्षण मिळाल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळें त्या शिक्षणाचा प्रसार या ज्ञातींत होणें क्रमप्राप्तच होतें. युनिव्हर्सिटीची स्थापना झाल्यानंतर पुष्कळ वर्षेंपर्यंत या ज्ञातीच्या मंडळीचा आर्टस् कोर्स (वाङ्मयशाखे)कडे व कायद्याकडे ओढा जास्त होता. ही स्थिति इसवी सन १९०५ सालापर्यंत अबाधित रीतीनें चालली तीं. पुढें ग्रॅज्युएटची संख्या जसजशी जास्त होत गेली व बी.ए.ची परीक्षा पास होऊन नोकरी मिळणें दुरापास्त झालें तेव्हां हळू हळू इंजिनियरिंग, वैद्यकी, इकडे या ज्ञातींतील तरूणांचें लक्ष वेधूं लागलें; व त्या शाखांतून हीं मंडळीं जाऊं लागली. तथापि अद्यापि देखील आर्टस् कोर्सकडे व कायद्याकडे या ज्ञातींतील पुष्कळ विद्यार्ध्यांचीं मनें धांव घेत असतात. गेल्या दहा पंधरा वर्षांत परकीय देशांत जाऊन शिक्षण मिळविण्याचा क्रम या ज्ञातींतील ब-याच विद्यार्थ्यांनीं सुरू केला आहे. एकॉनमिक्स (अर्थशास्त्र), कायदा, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, शेतकी, वैद्यकी, रसायनशास्त्र वगैरे विषयांचा अभ्यास अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या देशांत जाऊन विद्यार्थी करीत आहेत. खेडेगांवांतून उपजीविकेचें साधन नाहींसें होत असल्यामुळें आपलें गांव सोडून या ज्ञातींतील बरेच लोक शहरांकडे धांव घेत आहेत. यामुळें त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचें कार्य अनायासें घडून येतें. ठाणें येथील ज्ञातीच्या शिक्षणसंस्थेनें व बडोदें येथील शिक्षणसंस्थेनें उत्साही व हुषार तरूण मंडळींनां उच्च शिक्षण देण्याच्या कामीं पुष्कळ मदत केली आहे. अलीकडे युनिव्हर्सिटीचें उच्च शिक्षण घेण्याच्या ऐवजीं धंदेशिक्षण घेतलें असतां जास्त फायदेशीर होईल अशी पुष्कळ विद्यार्थी लोकांच्या मनाची प्रवृत्ति होत चालली आहे; पण अद्यापि प्रवृत्तीला विशेषसें दृश्य स्वरूप आलें नाहीं.

मुलींनां लिहिण्यास व वाचण्यास शिकविण्याची व व्यावहारिक शिक्षण देण्याची पद्धति या ज्ञातींत पूर्वापार चालू आहे. मुलींच्या शाळा निघाल्यापासून या ज्ञातींतील मुली त्यांत शिकत आहेत. ज्या ज्या ठिकाणीं शाळा आहेत त्या त्या ठिकाणीं ज्ञातींत मुली बहुधां निरक्षर सांपडत नाहींत. ज्या ठिकाणीं शाळा नाहींत त्या ठिकाणीं घरांतील वडील माणसें आपल्या मुलींनां घरीच शिकवितात. शहरांपासून अत्यंत लांब दूरवर असलेल्या व मागसलेल्या खेडयांत मात्र मुली निरक्षर असण्याचा पुष्कळ संभव असतो. पुणें, मुंबई, बडोदें वगैरे ठिकाणीं जेथे मुलींच्या इंग्रजी शाऴा आहेत त्या ठिकाणी मुली या शाळांतून अभ्यास करीत आहेत. सध्या मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा वाढल्यामुळें व हुंडयाच्या वाढीमुळें मुली लग्न होण्यापूर्वी इंग्रजी पांच सहा इयत्ता शिकेतोपर्यंत शाळेत जातात. म्याट्रिक्युलेशन पास होणा-या मुलींची संख्या गेल्या पांच सहा वर्षांत वाढत आहे. थोड्या स्त्रिया बी.ए.हि झाल्या आहेत. एक दोन एम्.बी.बी.एस. झालेल्या आहेत. नर्सिंग आणि एल्.सी.पी.एस्. करितां मेडिकल स्कूलमध्यें पुणें, मुंबई येथें कांहीं विद्यार्थिनी अभ्यास करीत आहेत; मराठी अभ्यास संपवून ट्रेनिंग कॉलेजमध्यें अभ्यास करणा-या विद्यार्थिनींची संख्या फारशीं नाहीं. तथापि ही संख्या आणखी वाढेल असा संभव दिसत आहे.

या ज्ञातींतील मराठयांच्या इतिहासांत प्रसिद्ध असलेल्या पंधरा पुरुषांचीं नांवें कालानुक्रमें पुढें दिलीं आहेत-

(१) दादाजी नरस देशपांडे.
(२) बाळाजी आवजी चिटणीस.
(३) बाजी प्रभु देशपांडे.
(४) मुरार बाजी देशपांडे.
(५) दादाजी रघुनाथ प्रभु देशपांडे.
(६) कृष्णाजी दादाजी प्रभु देशपांडे.
(७) आबाजी विश्वनाथ देशपांडे.
(८) खंडो बल्लाळ चिटणवीस.
(९) गोविंद खंडेराव चिटणीस.
(१०) सखाराम हरी गुप्ते.
(११) रावजी अप्पाजी फणसे            
(१२) बाबाजी आप्पाजी फणसे                                    
            दिवाण बडोदें.
(१३) बापूजी रघुनाथ दिघे-दिवाण, धार व ग्वाल्हेर.
(१४) निळकंठ रामचंद्र पागे.
(१५) रंगो बापूजी-वकील सातारा राजातर्फे

या ज्ञातींतील ब्रिटिश अमदानींत पुढें आलेल्या पंधरा मंडळींचीं नांवें-

(१) दिवाण बहादुर लक्ष्मण जगन्नाथ वैद्य.
(२) रघुनाथ शिवराम टिपणीस, जज्ज.
(३) दिवाण बहादूर वासुदेव माधव समर्थ.
(४) रावबहादुर बाळकृष्ण आत्माराम गुप्ते.
(५) सर रघुनाथ व्यंकाजी सबनीस.
(६) सर गंगाधर माधवराव चिटणवीसं.
(७) शंकराराव माधवराव चिटणवीस
(८) सर महादेव भास्कर चौबळ.
(९) जर्नादन दामोदर दीक्षित, जज्ज.
(१०) त्रिंबक रामचंद्र कोतवाल, मेंबर ऑफ दि कौन्सिल, बडोदें.
(११) प्रोफेसर शंकर आबाजी भिसे.
(१२) राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज).
(१३) चिंतामण द्वारकानाथ देशमुख, आय्.सी.एस्.
(१४) नारायण माधव समर्थ, इंडिया कौन्सिल.
(१५) विनायक आत्माराम ताम्हणे, एम्.एजी.एम्.सी. साईल फिजिसिस्ट.

या ज्ञातीची पौराणिक माहिती स्कंदपुराणांतील सह्याद्रि खंडाच्या आधारें घेतली आहे ती अशी-

परशुरामानें एकवीस वेळां पृथ्वी निःक्षत्रिय केली; त्या वेळेस कांहीं राहिलेली क्षत्रीय मंडळी गहन अरण्यांमध्यें जाऊन लपलीं. या युद्धांमध्यें चंद्रसेन नांवाच्या एका क्षत्रिय राजाचा सर्व आप्तमंडळीसह वध झाला; त्यावेळीं त्याची गर्भवती स्त्री तेथून निघाली ती आश्रयार्थ दालभ्य ॠषीच्या आश्रमास गेली. ही बातमी परशुरामास कळली व तो ॠषीच्या आश्रमास गेला. ॠषीनें त्याचा सत्कार करून परशुरामानें गर्भास अभयदान द्यावें या अटीवर त्यानें ती स्त्री परशुरामाच्या स्वाधीन करण्याचें कबूल केलें. परशुरामानें ॠषीचें म्हणणें एका अटीवर कबूल केलें; ती अट हीं कीं, चंद्रसेनाच्या भावी पुत्रानें क्षत्रिय चालवूं नये. हि अट ॠषीनें मान्य केली. यानंतर चंद्रसेनाच्या पत्नीस झालेला मुलगा दालभ्य ॠषीच्या आश्रमांत वाढला. नंतर तो पुढें लेखनवृत्तीनें आपली उपजीविका करूं लागला. या राजपुत्राचे जे वंशज झाले त्यांना चांद्रसेनीय कायस्थ असें म्हणूं लागले.

या ज्ञातीचा संक्षिप्त पूर्वेतिहासः- महाराष्ट्रांतील कोणत्याहि ज्ञातीचा प्राचीन इतिहास संगतवार मिळणें शक्य नाहीं. या बाबतींत ऐतिहासिक लेख चवदा किंवा पंधराव्या शतकाच्या पूर्वीचे बहुतेक सांपडत नाहींत. चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीचा पूर्वेतिहास शिलाहारांच्या कारकीर्दीपासून सुरू होतो. त्या पूर्वीचा इतिहास पूर्वापार चालत आलेल्या कथा, ज्ञातींतील दैवतें व उपनांवें, धर्मविधि यावरून अजमावला पाहिजे. शिलाहारांच्या वेळीं देखील या ज्ञातीची लोकसंख्या एक हजारापेक्षां पुष्कळच कमी असली पाहिजे. चांद्रसेनीय कायस्थप्रभुज्ञाति हा एक पूर्वापार चालत आलेला संघ आहे; याच्या निरनिराळ्या प्रयाणामध्यें हा इतर ज्ञातींशीं मिश्र झालेला नाहीं ही गोष्ट सर्व समाजामध्यें एकत्र असलेल्या रीतीभाती, धर्मसमजुती, धर्मविधी यांवरून उघड होत आहे. कोंकणामध्यें ही ज्ञात उत्तर हिंदुस्थानांतून आली यांत संशय नाहीं. या ज्ञातींत फार जुने जे कागदपत्र आहेत व कांहीं कांहीं प्रसिद्ध घराण्यांच्या जुन्या वंशावळी आहेत त्यांमध्यें चांद्रसेनीय कायस्थ ज्ञातीचीं कांहीं घराणीं मांडवगड संस्थान सोडून इकडे आलीं असें लिहिलें आहे. इकडे येण्यापूर्वी या ज्ञातींतील कित्येक घराण्यांत मोठमोठ्या अधिकाराच्या जागा चालत आलेल्या असाव्या व या घराण्यांतील मंडळींनीं पराक्रमाचीं कृत्यें केलेलीं असावीं; हे राजे, प्रधान, चौबळ, समर्थ, रणदिवे या व इतर नांवांवरून उघडच दिसतें. मांडवगड संस्थान धारजवळ होतें व मांडवगडाचा दुर्भेद्य किल्ला मुसुलमानांनीं इसवी सन १२०५ मध्यें काबीज केला व तेथील लोकांची कत्तल उडविली. यानंतर सुमारें चारशें मंडळीं, मुसुलमानांच्या राज्यांत राहणें बरें नाहीं व तेथें राहिलें असतां आपल्या धर्मास त्रास होईल म्हणून गुजराथमार्गानें कोकणांत आली. यावेळीं कोंकणांत शिलाहारांचा अंमल होता. मांडवगडच्या राज्याचा व शिलहारांचा सलोखा असल्यामुळें व या धामधुमीच्या काळांत धाडसी व उत्साही मंडळींचा उपयोग होईल असें समजून त्यांनीं आपल्या राज्यांत या मंडळीस आश्रय दिला. यांपैकीं कांहीं मंडळीं शिलाहारांच्या नोकरीस राहिली व कांहींनीं नवीन वस्ती करून जमिनी लागवडीस आणिल्या. या राज्यांत या ज्ञातींतील कांहीं मंडळी आपल्या कर्तबगारीनें उच्च पदास चढली. इसवी सन १३४७ त बहामनी राज्य स्थापन होईपर्यंत कोंकणांतला काळ अत्यंत अस्वस्थतेचा व धामधुमीचा गेला. या काळांत खरी सत्ता देशपांडे व देशमुख या मंडळीच्या हातांत होती. या ज्ञातीपैकीं बरीच मंडळी या अधिकारावर होती. अर्थातच या धामधुमीच्या काळांत त्यांच्या हातांत थोडी फार राजकीय सत्ता होती. बहामनी राज्याची स्थापना झाल्यानंतर कांहीं वर्षांनीं कोंकणप्रांत त्यांच्या ताब्यांत आला. कोंकणप्रांतास पूर्वीचे जे अधिकारी होते त्यांचे अधिकार बहामनी बादशहांनीं कायम राखिले व देशपांडे व देशमुख यांच्या मार्फत त्या भागांतील कारभार व वसुली पूर्ववत चालविली. बहामनी बादशहांची देशमुख, देशपांडे वगैरेसंबंधाचीं सनदापत्रें अद्यापि कांहीं कुंटुबांच्या जवळ आहेत. इसवी स. १३९६ त महाराष्ट्रांत दुर्गादेवीचा पुष्कळ पडला त्यावेळीं महाराष्ट्रांतील कांहीं भाग अगदीं बेचिराख झाला. दुष्काळ संपल्यानंतर या प्रांतांत पुन्हां वस्ती करून येथील जमीन लागवडीस आणणें अवश्य होतें. कोंकणांतींल कांहीं देशमुख मंडळींनीं ही कामगिरी स्वखुषीनें किंवा राजाज्ञेंने अंगावर घेतली व आपल्या भागाच्या लगतच्या सह्याद्रीच्या मावळ प्रदेशांत वस्ती करून तो भाग लागवडीस आणण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीनें मावळामध्यें या देशमुख व देशपांडे मंडळींची वस्ती झाली. ब्राह्मणीं राज्य मोडल्यानंतर विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यांत मावळांतील प्रदेश व कोंकणांतील कांहीं भाग गेला. अर्थातच या प्रांतांतील देशमुख व देशपांडे विजापूरच्या आदिलशाहिचे नोकर बनले. पुढें राजे शिवाजीराजे यांनीं जेव्हां स्वराज्यस्थापनेच्या कार्याला सुरवात केली तेव्हां या प्रभुज्ञातींतील देशपांडयांपैकीं प्रमुख व होतकरू दादाजी नरसू देशपांडे हे धैर्यानें पुढें आले व त्यांनीं राजे यांच्या साहसांत भाग घेण्याची व त्यांनां मदत करण्याची शपथ घेतली. या कुटुंबानें दोनशें वर्षेंपर्यंत मराठी राज्याची सेवा इमानेइतबारें केली. संभाजीच्या वेळीं मावळ प्रांतांत नेटानें लढणा-या कृष्णाजी दादाजीपासून सातारच्या राज्याकरितां पार्लमेंटमध्यें भांडणा-या रंगे बापूजीपर्यंत या कुटुंबांतील मंडळी आपल्या राजनिष्ठेला जागृत राहिली. बाजीप्रभु देशपांडे, मुरारबाजी, विश्वासराव नानाजी वगैरे मावळांतील देशपांडे, मंडळींनीं शिवाजीच्या राज्यस्थापनेच्या कार्यास मनापासून मदत केली व बाळाजी आवजी, दादाजी रघुनाथ वगैरे कोंकणप्रांतांतील मंडळीहि लवकरच शिवाजीस मिळली. संभाजीच्या काळीं खंडो बल्लाळ, कृष्णाजी दादाजी, आबाजी विश्वनाथ, दादाजी रघुनाथ वगैरे मंडळी राज्याच्या संरक्षणार्थ मनापासून लढली. राजारामाच्या व ताराबाईच्या कारकीर्दीत खंडो बल्लाळ व त्याच्या ज्ञातींतील इतर मंडळी यांची कामगिरी इतिहासांत प्रसिद्ध आहे. शाहूराजे दक्षिणेंत आल्यावर या ज्ञातींतील मंडळी त्यांच्या पक्षाला गेली. शाहूच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीराव पेशवे यांनां सर्वाधिकार मिळविण्याच्या कामीं गोविंद खंडेराव यांनीं मदत केली. नानासाहेबांच्या ताब्यांत राज्यसूत्र गेल्यापासून व पेशवाईचा कारभार पुणे येथे सुरू झाल्यापासून सातारा नामशेष झाला. अर्थातच या ज्ञातींचे राज्यकारभारांतील वजन कमी झालें. पेशव्यांच्या दरबारांत सखाराम हरि गुप्ते,  निळकंठ रामचंद्र वगैरे थोडी मंडळीं उदयास आली. पण शाहूच्या मृत्यूनंतर या ज्ञातींतील मंडळीनीं महाराष्ट्र सोडून बडोदें, धार, नागपूर या प्रांतात प्रयाण केले आणि त्या ठिकाणी त्यांच्यातील बरीच मंडऴी उदयास आली. बडोदे, धार, नागपूर वगैरे ठिकाणीं या वेळेपासूनच या ज्ञातीची वस्ती झाली. असा या ज्ञातीचा ब्रिटीश अमदानीपूर्वीचा इतिहास आहे.

या ज्ञातीवर एकंदर नऊ ग्रामण्यें झालीं त्यांची यादी नानासाहेब पुरंदरे यांच्या दफ्तरांत इतिहाससंशोधक राजश्री राजवाडे यानीं खंड ६ मध्यें दिलेलीं आहे तीः-

(१) पूर्वी ग्रामण्य जोगाईचे आंब्यास जालें, (शके १३९१) तेसमई निळकंठ गुरू गोसावी यानीं काशीस जाऊन शंकराचार्य आणून समाधान केलें (यासंबंधाचे कागदपत्र अस्तित्वांत नाहींत).

(२) दुसरें ग्रामण्य कोंकणांत जाले तेसमयीं काशीस जाऊन पत्रें आणून निराकर्ण जालें (याहि ग्रामण्याचे कागदपत्र अस्तित्वांत नाहींत).

(३) तिसरे ग्रामण्य चिटणीसाचे आवजी बल्लाळ यांचे मुंजीसमयीं रघुनाथपंती केलें. तें निराकर्ण गणेश जोशी दीक्षित शास्त्री टकलें यांनीं केले शके १५९१; (यासंबंधाचें पत्र चांद्रसेनीय कागस्थ प्रभूंच्या इतिहासाचीं साधनें यांत प्रसिद्ध केलें आहे).

(४) चवथें ग्रामण्य कल्याणप्रांतीं जालें. त्याजला रघुनाथ पंडित अमात्यांचीं पत्रें नेऊन निराकर्ण केलें; शके १५९७.

(५) पांचवें ग्रामण्य यमाजी शिवदेव यानीं केलें. ते समयीं काशीहून ब्राह्मण व चिंतामण गुरूजीनीं निराकर्ण केलें. शके १६६९. (याबद्दलची पत्रें प्रसिद्ध झालेली आहेत).

(६) सहावें ग्रामण्य सदोबा भाऊसाहेबी उल्लेख केला. ते नानासाहेब पेशवें यानीं मना केलें. भाऊसाहेब पानपतांत गत झाले (या ग्रामण्याला दृश्य स्वरूप प्राप्त न झाल्यामुळें त्याचा उल्लेख कागदपत्रांत कोठेंहि आढळत नाहीं).

(७) सातवें ग्रामण्य नारायणराव बल्लाळ यानीं केलें. आठवें महिन्यांत मारले गेले, दादासाहेबी याद घेतली ती देविली सखाराम हरीस (या ग्रामण्याचे कागदपत्र इतिहासप्रसिद्धच आहेत).

(८) आठवें ग्रामण्य माधवराव नारायण शके १७१४ ता ॥ १७१८ काशीहून पत्रें सरकार श्रीमंतांस आलीं. नंतर (आपाशास्त्री) पंचाईत झाली. सोडचिठ्ठीचीं पत्रें बाजीराव रघुनाथ यांचीं झालीं. एक वेळ याद झाली, राहिली. दुस-यानें पत्रें जालीं (या ग्रामण्याचें काशीचें पत्र व बाजीराव रघुनाथ यांचीं आज्ञापत्रें प्रसिद्ध झालेलीं आहेत).

(९) नववें ग्रामण्य बाळाजीपंत नातू शके १७४५, शंकराचार्य स्वामींचीं पत्रे आनंदराव तासकर घेतलीं. निराकर्ण श्रीमंत बुवासाहेब यानीं केलें. बाळशास्त्री बिन जनार्दन शास्त्री व आबा पारसनीस होते (यासंबंधाचीं सर्व पत्रें व शंकराचार्याचीं आज्ञापत्रें प्रसिद्ध झालीं आहेत).

(रा. केशव त्रिंबक गुप्ते, सेक्रेटरी, चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ऐतिहासिक मंडळी-पुणें, याकडून आलेली माहिती.)

(कायस्थ प्रभूंच्या आगमनमार्गासंबंधानें जें मत वर दिलें आहे, तें आम्हांस ग्राह्य नाही. ते मांडवगडाकडून आले असते, तर रस्त्यांत त्या जातीच्या अनेक वसाहती असत्या. त्या तशा नाहींत. त्यांची वसती मुख्यत्वेंकरून समुद्रकाठानेंच असल्यामुळें ते समुद्रमार्गानेंच महाराष्ट्रांत आले असावेत, असें आम्हांस वाटतें. (सं. ज्ञानकोश).)

(२) पाठारे प्रभु- इ.स. १९१४ च्या डिसेंबर महिन्यांत पाठारे प्रभु ज्ञातीनें घेतलेल्या खानेसुमारीवरून दिसून येतें कीं, ज्ञातीची एकंदर लोकसंख्या ४७३९ आहे. पैकीं २३९५ पुरुष व २३४४ स्त्रिया. इ.स. १९२४ सालच्या डिसेंबर महिन्यांत ज्ञातीकडून खानेसुमारी पुन्हां घेण्यांत आली. तीवरून एकंदर लोकसंख्या ४७४२ असून, पैकीं २४२१ पुरुष व २३२१ स्त्रिया आहेत. यावरून जात संख्याक्षय पावत नाहीं असें दिसून येईल.

ज्ञातींचें मुख्य वस्तीचें स्थान मुंबई हें शहर आहें. येथें ज्ञातीची वस्ती सुमारें २५०-३०० वर्षांपासून आहे. त्यापूर्वी बरीच वस्ती सांष्टी व अष्टागर वगैरे उत्तर कोंकण प्रांतांत होती. कांहीं कुटुंबें सुरत, अहमदाबाद, खेड, पंचमहाल वगैरे ठिकाणीं होती. एकंदर कुटुंबें हल्लीं सुमारें ८२९ आहेत. त्यांपैकीं सुमारें ६५४ कुटुंबें मुंबई शहर येथें राहत आहेत. बाकींचीं १५० कुटुंबें परळ, दादर, नायगांव, माहीम, वांद्रें, सान्ताक्रूस, गोरेगांव, मालाड, बोरिवली वगैरे मुंबईच्या आसपासच्या भागांतून राहत असतात. आणखीं बाकी राहिलेलीं सुमारें २५ कुटुंबें इंदूर, कराची, अहमदनगर, सुरत, बडोदें, पुणें, दक्षिणहैदराबाद, औरंगाबाद, कलकत्ता, भडोच, दिल्ली, अहमदाबाद, बिआवर, खामगांव, कोल्हापूर सोलापूर, मिरज, बनारस, वर्धा, विलायत वगैरे ठिकाणीं आहेत.

ज्ञातीमध्यें पंचायत अशी संस्था नाहीं, आणि पूर्वी केव्हांहि नव्हती. तथापि ज्ञातीसंबंधींच्या सर्व सामाजिक, धार्मिक, औद्योगिक वगैरे प्रश्नांचा विचार ज्ञातीच्या सार्वजनिक सभांपुढें होऊन बहुमतानें जे ठराव मान्य होतील ते अंमलांत आणले जातात. ज्ञातिसंबंधाच्या निरनिरळया प्रश्नांचा विचारविनिमय गेल्या ४५ वर्षांत ज्ञातिबांधवांनीं स्थापन केलेल्या निरनिराळ्या संस्थांतून होत असतो. आणि त्यावरून ज्ञातींतील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक गरजा लक्षांत येऊन गरजवंत आणि निराश्रित लोकांनां ताबडतोब मदत करण्यांत येते. उदाहरणार्थ- (१) पाठारेप्रभुरिलिफ फंड.-ह्या संस्थेची स्थापना इ.स. १८८७ सालीं झालीं. तिचें भांडवल हल्लीं दोन लक्ष रुपयांवर आहे व या रकमेच्या व्याजांतून आजपर्यंत सुमारें ७५ हजार रुपये ज्ञातींतील गरीब, असहाय्य व निराश्रित मंडळींनां मदत करण्यांत आणि गरीब विद्यार्थ्यांनां शिष्यवृत्त्या देण्यांत खर्च झाले आहेत. ह्या कामीं दरमहा सुमारें ५०० रुपये मदतीदाखल खर्च करण्यांत येतात. (२) पाठारेप्रभुचॅरिटीझ.-ही धर्मादाय संस्था १९०१ सालीं स्थापन करण्यांत आली. या संस्थेकडून ज्ञातीच्या मालकीचीं कांहीं देवळें, धर्मशाळा व गरीबांकरतां बांधलेलीं वसतिगृहें ह्यांची व्यवस्था पाहण्यांत येते, व गरजूंची अडचण दूर करण्यांत येते. (३) पाठारेप्रभु सोशलक्लब आणि पाठारे प्रभु सोशल समाज.-ह्या दोन्ही संस्था १८८८ सालीं अस्तित्वांत आल्या, व सामाजिक, शैक्षणिक वगैरे बाबींचा खल होऊन ज्ञातिसुधारणेच्या कामाची दिशा निश्चित करण्यांत येऊन त्या सुधारणा अंमलांत आणण्याचे प्रयत्न करण्यांत येतात. तसेंच ज्ञातींतील अनिष्ट व अहितपरिणामी चालीरीतींचा प्रतिकार करण्यासंबंधाचें मतसुद्धां तयार करण्यांत येतें. सदरहू संस्थांमधून साधारण स्वरूपाच्या अनेक पश्नांचा खल होतो. त्याखेरीज इतर सामाजिक सुधारणा व धार्मिक वादग्रस्त प्रश्नांचा विचारविनिमय विशिष्ट प्रसंगानुसार ज्ञातींच्या सर्वसाधारण सभांतून होत असतो. ह्या खेरीज ज्ञातींवर एखादें संकट किंवा एखादा प्लेगसारखा दुर्धर प्रसंग ओढवला तर त्याचा प्रतिकार करण्याकरितां ज्ञातिबंधुभगिनींकडून त्या त्या प्रसंगीं द्रव्यनिधि गोळा करून संकटाला तोंड देण्यांत येतें. उदाहरणार्थ, प्लेगच्या सांथीच्या आरंभींच्या कांहीं वर्षांमध्यें हेल्थ कॅम्प व हॉस्पिटल या संस्था स्थापन करण्यांत आल्या व त्याचप्रमाणें स. १९१८-१९ सालांतील एन्फ्ल्युएन्झाच्या सांथीमध्यें पुन्हां एक हॉस्पिटल उघडण्यांत येऊन ज्ञातींतील रोगग्रस्तांस योग्य वेळीं कोणत्याहि प्रकारचा मोबदला घेतल्याशिवाय मदत करण्यांत आली. या प्रसंगी ज्ञातींतील लहानथोरांनीं व भिषग्वर्यांनीं एकजुटीनें, धैर्यानें आणि मृत्यूची भीति मनांत बिलकुल न बाळगतां स्वयंसेवक व स्वयंसेविका या नात्यांनीं जे अविश्रांत श्रम केले ते खरोखर प्रशंसनीय व भूषणार्ह असून त्याबद्दल त्यांचा सरकारकडून योग्य गौरव करण्यांत आला.

ज्ञातींचीं देवळें, चाळी वगैरे खालीलप्रमाणें आहेतः-

देवतानाम व संस्थेंचें नांव ठिकाण बांधणाराचें नांव
१. श्रीव्यंकटेश ठाकुरद्वार पाठारे प्रभुज्ञाति
२. रामचंद्र रामवाडी विठोबा कान्होजी
३. रामचंद्र २ री फणसवाडी केशव बापूजी
४. मारुती भायखळा जनार्दन पुरुषोत्तम
५. प्रभादेवी माहीम पा. प्रभुज्ञाति
६. महालक्ष्मी ब्रीच क्यांडी  ,,
७. विठोबा परळ विठोबा माणकेश्वर
८. ठाकुरद्वार माहीम पाठारे प्रभुज्ञाति
९. श्रीमहेश्वरी नवी वाडी नवीवाडींतील पा. प्रभु रहिवासी
१०. महादेव परळ रामचंद्र भास्कर
११. चंद्रमहेश्वर परळ डॉ. दामोदर केशव
१२. धाकलेश्वर महालक्ष्मी धाकजी दादाजी
१३. महादेव, गणपती वाळकेश्वर राघोबा जीवाजी
१४. घंटाळी ठाणें ,,
१५. मारुती मालाड भास्कर सुंदरजी
१६. मारुती ब्रीच क्यांडी लक्ष्मण हरिश्चंद्र
१७. विठोबा मुगभाट विठोबा कान्होजी
१८. गणपति भुलेश्वर वासुदेव विश्वनाथ
१९. गणपति गणेशवाडी जनार्दन पुरुषोत्तम
२०. राम अनंतऋषीची वाडी सुन्दर बावाजी
२१. राम कान्देवाडी ,,
२२. श्रीरामचंद्र पालवरोड ठाकुरद्वार विठोबा वासुदेव झावबा
२३. धर्मशाळा चौपाटी पाठारे प्रभुज्ञाति
२४.  ,, सोनापूर ,,
२५. राधाबाई बिल्डिंग भटवाडी गिरगांव ,,
२६. सरस्वतीबाई विनायक पांडुरंग बिल्डिंग चौपाटी ,,
२७. प्रभु सेमिनरी भाई जिवनजीची गल्ली, ठाकुरद्वार ,,

सदरहू स्थावर मिळकतींपैकीं बहुतेक मिळकतींची व्यवस्था ज्ञातींतील चॅरिटीज (धर्मादाय) संस्था पहात असते. आणि इतर मिळकतींची व्यवस्था प्रभु मालकांच्या वंशजांकडे किंवा पा. प्रभु ट्रस्टकडे आहे.

विवाहादि संस्कार बहुतेक ठिकाणीं कोंकणस्थ ॠग्वेदी ब्राम्हणांच्या हातून होत असतात. कांहीं थोड्या कुटुंबांत यजुर्वेदी, वाजसनेयि, माध्यंदिन ब्राह्मणांकडूनहि विवाहादि संस्कार होत असतात. ज्ञातिसंबंधाचे सर्व प्रश्न ज्ञातच सोडवीत असते. धर्माच्या कामीं शास्त्राधार घेण्यासारख्या बाबी ज्ञातींत आजपर्यंत उद्भवल्या नाहींत. मात्र पेशवाईंत ज्ञातीच्या क्षत्रियत्वाविषयीं विनाकारण वाद उपस्थित करण्यांत आला होता. त्यावेळीं ज्ञातीनें कांहीं मुंबईकर विद्वान ब्राह्मणांचा सल्ला घेऊन श्रृंगेरी आणि संकेश्वर मठांच्या श्रीजगद्गुरूचीं आज्ञापत्रें मिळविलीं. आणि तीं पेशव्यांच्या दरबारांत हजर करून त्यांनीं आपलें क्षत्रियत्त्व प्रस्थापित केलें. आणि वेदोक्त कर्मे करण्याचा अधिकार ज्ञातीला आहे याबद्दल श्रीश्रृंगेरी आणि संकेश्वर मठाधिपतींची आज्ञापत्रें मिळविलीं आहेत.

चातुरर्वर्ण्यव्यवस्थेंत ज्ञातीचें स्थान क्षत्रिय हें आहे. ह्या संबंधींचा निवाडा शृंगेरी मठाधिपति श्रीमत् शंकराचार्य यांच्या आज्ञापत्रानुरोधें आणि मुंबईतींल वे.शा.सं. शास्त्रीमंडळींच्या संमतिपत्रान्वयें आणि साष्टीचे सरसुभेदार रामाजी महादेव यांच्या अभिप्रायाप्रमाणें ज्ञातितर्फे देण्यांत आला. म्हणजे ते पाठारे प्रभु शूद्र नसून पूर्ण क्षत्रिय आहेत असें ठरविण्यांत आलें.

वसईकर ब्राह्मण व पाताणे प्रभु यांच्यामध्यें वैमनस्य होण्याचीं कारणें- पोर्तुगीज लोकांनी हिंदुस्थानच्या पश्चिम भागांत १५१२ सालीं आपलें राज्य स्थापिलें. त्यांनीं पाताणे प्रभूंनां आपल्या अंमलाखालीं असलेल्या प्रांतांत मोठमोठ्या जागा दिल्या व त्यांनीं जीं कामें करावयाची होतीं त्यांपैकीं एक काम म्हणजे वेठीचें काम करून घेणें हें होय व हें काम जर त्यांनीं कबूल केलें नसतें त त्यांस जबरीनें बाटवून ख्रिस्ती धर्मांत ओढून घेतलें असतें. करितां हिंदुधर्मशास्त्राप्रमाणें राजाज्ञा ही शिरसावंद्य मानून आपल्या स्वतःच्या मर्जीविरुद्धहि त्यांनां प्रजाजनांकडून वेठीनें हलकें सलकें काम करून घेणें भाग पडे. प्रभु पाताण्यास नाइलाजास्तव आपणांकडून हीं कामें करून घ्यावीं लागत आहेत, ही गोष्ट त्यावेळच्या ब्राह्मणांनीं लक्षांत न घेतां प्रभु आपला अशा रीतीनें मुद्दाम छळ करीत आहेत अशी त्यांनीं आपल्या मनाची समजूत करून घेऊन प्रभूंबद्दल त्यांच्या मनांत द्वेषभाव उत्पन्न झाला व तो दिवसेंदिवस वाढतजाऊन ह्या दोन जातींमध्यें कायमचें वैमनस्य सुरू झालें. ह्या वैमनस्याचा परिणाम त्यावेळच्या पाठारे प्रभूंस कसा भोगावा लागला हें खालीं दिलेल्या वृत्तांतावरून कळून येईल. त्यावेळीं कांहीं प्रभु कुळें मुंबईत राहत होतीं. दादाजी लक्ष्याजीराव ह्या श्रीमंत प्रभु गृहस्थास मुलबाळ नव्हतें. म्हणून त्यानें मुंबई मुक्कामी भुलेश्वर येथें १७०४ सालीं एक गणपतीचें देवालय बांधलें व गणपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकरितां त्यांनीं वसईकर ब्राम्हणांस न बोलावतां चित्तपावन आणि इतर ब्राह्मणांस बोलाविलें. 'हा हक्क आमचा आहे' असें वसईकर ब्राह्मण म्हणूं लागलें. परंतु त्यांचें म्हणणें प्रभूंनीं कबूल केलें नाहीं. त्यांनीं आपले राजगुरु खेडकर यांच्या सल्ल्यानें चेऊलचे धर्माधिकारी वेदमूर्ति चिंतामणी दामोदर पिटकर व इतर ब्राह्मण यांनां बोलावून त्यांच्या हस्तें सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घेतली.

१७३९ सालीं चिमणाजी आप्पा यांनीं वसईचा किल्ला सर करून पोर्तुगीज लोकांचा अंमल त्या प्रांतांतून नष्ट केला व मराठयांचे राज्य प्रस्थापित केलें. त्यावेळीं पाठारे प्रभूंस पोर्तुगीजांचा धर्मच्छल असह्य होऊन त्यांनीं पोर्तुगीज राजसत्तेखालीं असलेला मुलुख सोडला आणि मराठयांच्या अंमलाखालीं असलेल्या प्रांतांत आपली वस्ती केली.

१७३९ सालीं कै.वा. दादाजी लक्ष्याजी यांच्या पत्नीने त्रिंबकभट पाणशे यांनां सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा करण्याकरितां बोलावून त्यांस त्यांच्या ह्या पुण्यकार्याबद्दल कांहीं शेतजमीन व मालोडी नांवाची वाडी बक्षीस दिली. त्यामुळें वसईकर ब्राह्मणांचा प्रभूंबद्दल असलेला त्वेष वाढून त्यांनीं मत्सरबुद्धीनें प्रभुलोकांबद्दल काही खोटीं विधानें, वसईचे सुभेदार राजश्री शंकराजी केशव यांजपाशी केलीं. त्यांपैकीं एकदोन खालीं देत आहों-


(१) चेऊलच्या केशव दामजी नांवाच्या प्रभूनें पुनर्विवाह केला होता. त्यामुळें इतर प्रभूंनीं त्यास वाळींत टाकलें, ही पुनर्विवाहाची चाल प्रभुजातींत रूढ झाली आहे असें खोटें विधान ह्या ब्राह्मण मंडळींनीं केलें.

(२) त्याचप्रमाणें बिंबदेवाबरोबर आलेल्या रजपूत क्षत्रियांचे हे प्रभू वंशज नाहींत असेंहि त्यांनीं दुसरें विधान केलें.

(३) प्रभु ज्ञातींतील लोक आपल्या घरीं पूजाअर्चा करण्यास वाटेल त्या ब्राह्मणास बोलावीत असतात व त्यांचे राजगुरू खेडकर यानां देणग्या देऊन व त्यानां जीवित्वाची भीति घालून ते त्याजकडून उपनयन व लग्नकार्ये ही वैदिक धर्मास अनुसरून करून घेत असतात आणि मंत्र व ब्रह्मगायत्री शिकण्याचा जो फक्त द्विजांनाच अधिकार आहे, हे सर्व प्रकार ही प्रभुमंडळी खेडकर ब्राह्मणांकडून शिकून घेत असतात आणि हीं सर्व वैदिक कर्मे खेडकर ब्राह्मणांस, प्रभु हे शूर व लढवय्ये लोक असून त्यांजपाशीं शस्त्रें असल्यामुळें आपल्या जीवितसुरक्षिततेसाठी करावीं लागत असत असेंहि विधान प्रभुलोकांविरुद्ध करण्यांत आले होतें.

याप्रमाणें वसईकर ब्राह्मणांनीं बरींच खोटीं विधानें करून तीं त्यांनीं वसईचे सुभेदार शंकराजी केशव यांजपाशीं सादर केलीं. सदर्हू सुभेदारानें एक पंचायत बोलाविली. या सभेस पाताणे प्रभूंस आमंत्रण दिलें नव्हतें. उलट पांचकळशीं; सोनार, भंडारी, कांसार आणि प्रभूंनीं ज्यांस वाळींत टाकलें अशा लोकांस आणि ज्यांनां प्रभूंच्या घरीं धर्मवृत्ति चालविण्याचें बंद केलें होतें अशा ब्राह्मणांस पाचारण केलें होतें. अशा प्रकारें ज्या लोकांनां प्रभूंच्या उत्पत्तीविषयीं व त्यांच्या धार्मिक हक्कासंबंधीं मत देण्याचा कोणत्याहि प्रकारें अधिकार पोंचत नव्हता अशा लोकांचीं उपरिनिर्दिष्ट सभेंत मतें घेऊन सदरहू सुभेदारानें प्रभु लोकांनां प्रतिकूल असा निर्णय दिला, व या सर्व प्रकरणाचा रिपोर्ट सुभेदार साहेबांनीं श्रीमंत पेशवे यांच्या पुण्याच्या दरबारीं सादर केला. त्यावरून श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांनीं १७४३ सालीं आज्ञापत्र काढून चेऊलचे धर्माधिकारी व अंमलदार यांस फर्मान केकें कीं, ब्र्राह्मणांनीं प्रभूंस ब्रह्मकर्म शिकवूं नयेत किंवा त्यांजकडे ब्रह्मकर्म करूंहि नये. जे ब्राह्मण या आज्ञेचें उल्लंघन करतील त्यंनीं श्रीक्षेत्र काशी येथें पापकर्म केलें असें समजलें जाईल व ते सरकारच्या शिक्षेस पात्र होतील आणि त्याबद्दल त्यांनां प्रायश्चित्त भोंगावें लागले. सदरहू आज्ञापत्रांत आणखी फर्माविलें होतें कीं, प्रभु लोकांनीं ब्रह्मगायत्री शिकूं नये व ब्रह्मकर्म आपल्या घरीं करूं नये.

वरील आशयाचें आज्ञापत्र सरसुभेदार रामजी महादेव याजकडे रवाना झालें व त्याच्या नकला मुंबई, चेऊल, वसई येथील लोकांकडे व रेवदंडयाचे मोरोजी शिंदे नामजाडे यांजकडे पाठविण्यांत आल्या. सदरहू आज्ञापत्र 'ज्ञानोदय पत्रांत' तारीख २ नोव्हेंबर स. १८४६ रोजीं व 'पुणें ऑबझर्व्हर' मध्यें तारीख १४ जुलै स. १८६५ रोजीं छापून प्रसिद्ध करण्यांत आलें.

या आज्ञापत्राची अंमलबजावणी होऊन कांहीं प्रभूंनां देहान्त शिक्षाहि देण्यांत आल्या व कांहीं प्रभूंनीं मोठे दंड भरून आपली सुटका करून घेतली.

येणेंप्रमाणें पांच वर्षें धर्माच्या बाबतींत प्रभूंचा अनावर छल झाल्यानंतर त्यांनीं साष्टीचें सुभेदार राजेश्री रामजी महादेव यांजपाशीं अर्ज देऊन श्रीमंत पेशवे यांच्या दरबारीं आपले गा-हाणें मांडलें. मोरोजी शिंदे नामजाडे यांच्या नोकरांकडून आपला विनाकारण अत्यंत छल होत आहे त्याची चौकशी व्हावी म्हणून त्यास अर्ज केला. त्यावरून राजेश्री रामाजी महादेव, श्रीमंत पेशवे यांचे कोंकणचे सर सुभेदार, यानीं पुण्याच्या दरबारीं पत्र पाठविलें तें येणेंप्रमाणेः-
                                                                  
श्री.

श्रीमंत राजश्रियाविराजित राजमान्य राजेश्री (श्रीमंत सरकार बाळाजीं बाजीराव पेशवे उर्फ नाना) साहेब अखंडित लक्ष्मी अलकृंत पुण्यनगरप्रभृति विराजमान प्रमुख प्रधान पेशवे.

सेवेशी पोष्य रामजी महादेव सुभेदार प्रांत साष्टी शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना विशेष सेवकास आज्ञापत्र मितिरवाना चंद्र २२ रबिलाखर सुरु सन आरबा, रुधिरोद्गारी नाम संवत्सरे शके १६६५ चें लिहिलें कीं, ''पाताणे परभूंनीं शूद्रवत् सर्व कर्मे आचरण करावीं इत्यादि,'' अशा लिखितार्थाप्रमाणें, मोरोजी शिंदे, हा चौल आणि साष्टी या प्रांतीं ह्या आज्ञेवरहुकूम प्रभूंवर सत्ता चालवूं लागला. त्यास आज पांच वर्षे होत आलीं. याजमुळें त्याचा फारच बलात्कार; बोभाटा व न्याय करावा. असा वारंवार ते प्रभूंपुढें येऊन मजपाशीं म्हणतातः-याजकरितां अगत्य झालें, आणि तो न्याय मनास आणावा लागला. तो असा कीं, राजश्री शंक्राजी केशव सुभेदार प्रांत वसई यांणीं कितीएक ब्राह्मण वसईस मिळविले, परंतु या प्रभूंस बोलाविलें नाहीं, आणि त्यांचें कसें मूळ आहे हेंहि शोधिलें नाहीं. म्हणून मी उरणच्या मुक्कामी तपास केला त्या प्रभूंस आणि वसईकर ब्राह्मण यांस बोलावून न्याय करून पाहतां सारा गैरबाका आहे. तो असा कीं, मागलें फिरंगीं राजवेठेमुळें ह्या ब्राह्मणांनीं या प्रभूंवर वांझावहिमा घेतला होता तो एक व लोभामुळें एकमेका ब्राह्मणांस महाकार्यांत मानाअपमान अधिक उणा प्राप्त झाला म्हणून द्वेष उत्पन्न झाला, अशी दोनं ऐत कारणांमुळें या प्रभूंवर कर्मकांडाची हे आतां वाटाघाट करूं लागले आहेत. आणि या प्रभूंची पाहातां, सनातन वहिवाट कर्मकांडी आहे. हें एक, हे प्रभू सुक्षत्रिय असे, श्री व्यासोक्तिग्रंथी प्रमाण आहे हे दोन, आणि त्यावर श्रीजगद्धरु शंकराचार्य स्वामींची संमति आहे हे तीन, असा निर्णय पाहतांच त्या सर्व ब्राह्मणांस मी विनंति केली की, सुखरूप तुम्ही या प्रभूंचें घरी जाऊन पूर्ववत कार्यप्रयोजनें संपादावी हीच सेवकाची करद्वय जोडून विनंति असे. शके १६७० विभव नाम संवत्सरे, माहे चैत्र शुद्ध २, रवाना चंद्र दुसरा रबिलाखर सुरूसन तिसाआर्बेनमयाअलफ.'' (अस्सल पत्र मोडी अक्षरांत आहे).

सरसुभेदार साहेबांकडून प्रभु लोकांनां मोरोजी शिंदे यांजकडून वाईट प्रकारें वागविलें जातें अशी तक्रार पेशव्यांच्या दरबारांत केली आहे. असे जेव्हां मोरोजी शिंदे यानें ऐकलें तेव्हां तो प्रभु लोकांनां थोड्याशा सौम्यपणानें वागवूं लागला. शेवटी १७८७ सालीं जेव्हां शृंगेरीचे श्रीमच्छंकराचार्य विरूपाक्ष विद्याशंकरभारती हे मुंबईस आले तेव्हां प्रभु लोकांनी (१) श्रीसह्याद्रिखंड ग्रंथ, (२) वंशावळी, (६) प्रभुलोकांची राजसत्ता, (४) पाताणेप्रभु या नांवाची दुसरी क्षत्रिय जात नाहीं याबद्दलचे लेख, (५) प्रभुलोकांचे धर्माधिकारी यांनां राजगुरु ही संज्ञा आहे याबद्दलचा उल्लेख, (६) श्रीमच्छंकराचार्य कोल्हापूरचे स्वामी यांचे संमतिपत्र, (७) प्रभु लोकांच्या उत्पत्तीसंबंधाने कांही विद्वान ब्राह्मणांची मतें, (८) राजा बिंबदेवाकडून मिळालेले ताम्रपट (दानपत्र) ह्या आठ प्रकाराच्या पुराव्याच्या नकला श्रींच्याकडे रवाना केल्या आणि श्रींचे अधिकारयुक्त मत प्रभु लोकांच्या उत्पत्तीसंबंधानें मागितलें व प्रभूंनी आपल्या घरीं इतःपर कमें कोणतीं व तीं कोणत्या रीतीनें करावीत याबद्दल श्रींनीं आज्ञा करावी अशी विनंति केली. त्याखेरीज प्रभु लोकांनी पेंशवें दरबारकडून धर्मबाबतींत आपला फार छल झाला म्हणून हकीकत सांगून श्रींच्या आज्ञेप्रमाणें वागण्यास आपण तयार आहोंत असें श्रींनां विदित केलें. तेव्हां श्रीनीं सर्व कागद पत्र वाचून पुण्याच्या दरबारांत आज्ञापत्र पाठविलें तें येणेंप्रमाणें-

श्रीविद्याशंकर

० ।।श्री।। ०
शृंगेरीश्रीविरुपाक्ष
विद्याशंकरभारति

 

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य पदवाक्यप्रमाण
 पारावारपारीण यमनियमासनप्राणायामप्रत्याहार
                       ध्यानधारणासमाध्यष्टांगयोगानुष्टान

निष्टांगरिष्टतपचक्रवर्त्यानाद्यविछिन्न गुरुपरंपराप्राप्त षट्दर्शन स्थापनाचार्य व्याख्यान सिंहासनाधीश्वर सकल वेदार्थ प्रकाशक सांख्यत्रयी प्रतिपालक सकल आगमनिगमागमसारहृदये वैदिकमार्गप्रवर्सक सर्वतंत्रस्वतंत्रादि राजधानि कर्नाटक सिंहासन प्रतिष्ठापनाचार्य श्रीमद्राजाधिराजगुरु भूमंडलाचार्य तुंगभद्रातीर निवास ॠष्यशृंगपुरवराधीश्वर शृंगेरी विरूपाक्ष श्रीविद्याशंकरदेव दिव्य श्रीपाद पद्माराधक शृंगेरी विरूपाक्ष श्रीपादभिनवोदंड नृसिंहभारती स्वामीनांकरकमलसंजात श्रीमदभिनवविद्यारण्यभारतीस्वामिभिः-

श्रीवेदशास्त्रसंपन्नपारावाराभिज्ञेषु, पुण्यनगरप्रभृति तद्देशनिवासिषु, तथा मुंबापुर वसईप्रांताष्टागरराजापुर कुडलाष्टांतप्रभृति, कोंकणवासेषु, निखिलविद्ववृंदादियांसि, आज्ञा केली ऐशी कीं, हे पत्तनप्रभू बहुत वर्षें या प्रातांत राहतात, याचे येथें पूर्वापर सुरलित कार्यप्रयोजनें चालत असतां, यांचे शत्रु वर्गाही यत्न करून, गैरबाका समजाऊन, यांचे विरुद्ध पुण्याहून, पत्र आणलें, परंतु, यांचा न्याय व शोध करितां, कोणीच मनास आणिला नाहीं, उपरांत कित्येक ब्राह्मणांही, आपले ठिकाणीं शोध करितां, त्यांची निशा झाली कीं, येरव्ही पत्तन प्रभू खरे, ''यांजकडेस लटका आरोप ठेवितात.'' यावरून पुनः पूर्ववत् कार्यप्रयोजनें मुंबईत, श्रीमंत पेशवे यांचें राज्यांत चालू लागली, यानंतर पुन्हा शत्रूंनी उभारणी केली. त्यावरून राजश्री शंकाजी केशव सुभेदार प्रांत वसई याहीं कितीएक ब्राह्मण वसईस मेळविले, परंतु पत्तनप्रभु यांसी बोलाविलें नाहीं व यांचें मूळहि शोधिलें नाहीं, उगेच शत्रुवर्गाचें सागितल्यावरून, मुंबई व माहिमकर ब्राह्मणांसी पत्र लिहिलें कीं, ''याचे घरी कार्यप्रयोजने चालवावयासी न जावें,'' नंतर राजेश्री रामाजी माहादेव सुभेदार प्रांत साष्टी याहि उरणचे मुक्कामी, तपासितां, त्यांची निशा झाली कीं, सारा गैरवाका आहे, त्यावरून ब्राह्मणांसी आज्ञा केली कीं, ''सुखरूप पत्तन प्रभूंचे घरी जावें व पूर्ववत् कार्यप्रयोजनादि संपादीत जावीं,'' त्याप्रमाणे ब्राह्मण वसई प्रांतांत, व साष्टी प्रांतांत तथा मुंबईस वर्तणूक करीत गेले, यासी कितीएक वर्षे जाहालीं, यावर पुन्हां शत्रू शहरपुण्यास जाऊन, गैरवाका समजाऊन, श्रीवेदमूर्ति, सकलशास्त्रसंपन्न, राजमान्यराजेश्री रामशास्त्री यांचें खोटें पत्र समस्त महाराष्ट्र ब्राह्मण मुंबई व माहिमकर यासि आणिले कीं, ''पत्तन प्रभू यांचे घरी ब्राह्मण जातात ते ज्ञातीविरहित''. एणेंकरून पत्तन प्रभू बहूत श्रमी झाले, निमित्य कीं निरर्थक शत्रु वर्गाचे सांगितल्यावरून, व शास्त्रसंमत् न पाहातां, भलतेंच लिहितात, कां जर हे दुर्बल लोक व नित्यसेवक, किती वाद सांगतील, असे ते श्रमी होऊन, मजकडेस विनंती केली कीं, आमचा पुर्ता, ''शोध करून, जो निर्णय चित्तास येईल ती आज्ञा करावी'' त्यावरून प्रभु पत्तन यांची साधनें पाहातां सह्याद्रिखंडी यांची उत्पति सविस्तारे आहे, ती अवलोकन केली, तथा वंशावळया पुरातन आहेत, त्याहि मनास आणिल्या, व याची चाल, व नांव पुरातन सर्व प्रांतांत प्रसिद्ध असें आहे कीं, पत्तन प्रभू दुसरे कोणी एके ज्ञातीस हें नांव, आईकण्यांत आले नाहीं, व यांचे गुरूस राजगुरु प्रसिद्ध म्हणतात, व वरकड ज्ञातीचे गुरु आहे, त्यांस तर गुरु अथवा गुरु गोसावी म्हणतात. यानंतर श्रीशंकराचार्य स्वामी कोल्हापूरनिवासियाचा निर्णय अवलोकन केला. तथा थोर थोर पंडिताचे निर्णय अवलोकन केला. तथा थोर थोक पंडितांचे निर्णय सिक्यानिसी अवलोकन केले, तथा, राजा बिंबाचेवेळेचीं जुनीं ताम्रपत्रें आहेत, तीं अवलोकन केलीं. हें सर्व मनास आणितां, आज्ञा ऐशी केली कीं ''हे पत्तन प्रभू सूर्य व सोमवंशी क्षत्रिय खरे, वरकड यांजवर शत्रुत्वें व राज्यमदें, लटकाच आरोप ठेवितात. तो खरा लटका आहे. यांचे घरीं सर्व ब्राह्मणांनीं जाऊन कार्यप्रयोजनें, संपादित जावीं.'' संवत् १८४३, शके १७०९ प्लवनाम संवत्सरे, माहे आश्विन शुद्ध १०, रवौ.इतिनारायणस्मृति (कर्नाटकी अक्षरी मुद्रा).

यानंतर ह्याच दिवशीं म्हणजे वरील आज्ञापत्राच्या मितीच्या दिवशी श्रीमुंबापूरकर समस्त शिष्ट महाराष्ट्र ब्राह्मण १६ मिळून एक स्वतंत्र संमतिपत्र मराठी भाषेंत केलें तें असें- ''श्रीमुंबईपूरकर महाराष्ट्र ब्राह्मणांचें हें सहावें संमतिपत्र असें कीं, सकल वरील मजकूर शंकरस्वामीचे मराठी आज्ञापत्राचा तसा सविस्तारें लिहून व पाहून पुढें आणखी ह्या पत्रीं त्याहीं अधिक असें लिहिलें की ''हे पाताणे प्रभु खरे शुद्ध क्षत्रिय आहेत असें आम्हांस बरें ठाऊक आहे हें आमचे परंपरेनें म्हणून संमतें करितों.''  या संमतिपत्रावर १६ जणांच्या सह्या आहेत.

हें संमतिपत्र तारीख १६ माहे फेब्रुवारी सन १७८८ रोजी मुंबईतील 'टॉऊन हॉल' मध्यें रजिष्टर केलेलें आहे.

प्रभुंच्या वादाचा शेवटः- आतां श्रीवेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री घनःश्याम शास्त्री उपनाम जडये हे मुद्दाम सर्व प्रभूंचीं साधनें जी शंकरस्वामींचे आज्ञापत्रीं लिहिली आहेत तीं समागमें घेऊन पुण्यास गेले, आणि श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांस सभेंत दाखविलीं. त्यांनीं तीं पाहतांच श्रीशंकर स्वामी जगदुरूचे त्या आज्ञापत्रास अभिवादन करून प्रभूंचे शत्रुवर्गास स्पष्ट सांगितलें कीं, ''तुमचा सकल वाद खोटा आहे.'' असें म्हणून आणि या शास्त्रीदादास म्हणाले कीं, ''श्रीशंकरस्वामींचे आज्ञेप्रमाणें सुखरूप या प्रभूंचे पुरोहितांनीं सर्व कार्यप्रयोजनें पूर्ववत्प्रमाणें प्रभूंचें घरी चालवावीं, इत्यादि''- ''परंतु त्यावेळेचे राजमंदातले फडणवीस (म्हणजे बाळाजी जनार्दन भानु उर्फ नाना फडणवीस) आदिकरून होते त्यांस हें बरें झालें असें वाटलें नाहीं कां कीं, यांच्या पोटी आदीचा डंश होय म्हणून त्याचा उघड तर असा आहे कीं, हा वाद उत्पन्न होण्याचें मुख्य कारण कोणतें झालें म्हणाल तर तें पहा- मागें फिरंगी राजाज्ञेवरून हे प्रभु- सकल ब्राह्मण आदिकरून जे जन प्रजा त्यावेळेस सन्मुख सांपडत त्यांस सरकारी वेठीस धरीत'' असा हा फिरंग्यांचा बलात्कार होत्साता हे मुद्दाम प्रभू आम्हांस वेठीस नेतात असा हा वाजा वहिमा या प्रभूंवर घेतला होता-असें पूर्व वीर पेशव्यांचें मनीं स्मरत होतें. यावर शके १६६५ चे वर्षापासून जे या प्रभूंवे शत्रू असत त्यांचे सांगीवर बाळाजी बाजीराव इत्यादिकांहीं त्या वैरामुळें न्याय व राजनीतिशास्त्र न पाहतां वेळोवेळा पुण्याहून पत्रें सिक्यानिसीं सकल ब्राह्मणांस लिहिलीं होतीं. ती अशीं कीं ''या प्रभूघरी पूर्ववत्प्रमाणें कार्यप्रयोजनें करूं नये इत्यादि.'' त्यांतील कांहीं पत्रें हल्लीं लोक संग्रहीं उपलब्ध आहेत. आणखी त्या वैरामुळें राजमदानें पेशव्यांही कित्येक प्रभूंस तर देहान्त प्रायश्चित्त दिलें कां कीं, हे आपले प्रजारूप आहेत. त्यांची दाद कोठून लागेल म्हणून असे स्वधर्मार्थी मागें हे प्रभू बहूत कष्टी झाले. आणि आता तर त्या दुःखाचा विसर या प्रभूंस पडला आहे. अद्यापि त्या मतानुसारी कांही ब्राह्मण आहेत. परंतु तो वाद तर दोन वेळां आधीच तुटला. प्रथम तर ब्राह्मण-ब्राह्मणांहीं मिळून निर्णय केला. नंतर पुन्हां राजश्री रामाजी महादेव सुभेदार यांही उरणचे मुक्कामी भरसभेंत निःपक्षपातानें न्याय केला आणि आतां श्रीशंकरस्वामींहीं तर त्या वादाचा उघड फडशा केला तो पहा. त्यांचे त्या आज्ञापत्रीं आणखी धर्मसंबंधी तर श्रीजगद्गुरु संमतिपुढें इतर संमति रद्द होत. का कीं त्यांचें संमत जगन्मान्य आहे म्हणून. याजकरितां त्या शास्त्रीदादाहीं या प्रभूंचा अधिकार त्या पेशव्यास दाखवून व त्यांजकरवीं त्या भर सभेंत सन्मान आपला घेऊन असा तो वाद भंग करून ते मुंबईस परत येते झाले आणि ते म्हणाले ''समस्त विषनिर्विषम्'' त्यावेळीं प्रभुज्ञातांस फार फार आनंद झाला.

पाठारे प्रभु यांच्या क्षत्रियत्वासंबंधाची एक दुसरी हकीकत अशी आहे कीं, शके १६४८ वर्षी श्रीविद्याशंकर भारती हे मुंबईस आले होते. तेव्हां जे प्रभु होते ते सर्व मिळून त्या स्वामीस प्रार्थना करिते झाले. ते असें कीं, ''स्वामी, आम्ही श्रीसूर्यवंशी क्षत्रिय आहोंत, आणि त्य वर्णाश्रमधर्मेकरून अद्यापि चालतों व लिहिण्यास असें लिहितों कीं आपलें नांव, गोत्र आणि उपनांव अमुक आहे. परंतु हा अवघा निर्णय कोणते ग्रंथांत आहे तो स्वामीही कृपा करून आम्हांस सांगावा.'' तेव्हां स्वामी म्हणाले कीं,'' ''हें तुमचें सकल सविस्तर कथन श्रीसह्याद्रीखंडी आहे, असे ते बोलून त्यांणी संमतपत्र करून दिलें तें हें.

श्रीशृंगेरीपुरमठकर शंकर स्वामीचें हें प्रथम संस्कृत संमत षष्ठश्लोकी पत्र ॥१॥ शके १७०१.

श्रीशंकर.

०।।श्री।।०
अनेकशक्तिसंघट्टप्रकाश
लहरीघन:। ध्वांतध्वंसो विजयते
विद्याशंकरभारती

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यरिषड्वर्गदमनपूर्वक सद्गुणगणभूषणभूषितपदवाक्य- प्रमाणपारावारपारीण यमनियमासन         प्र्रणायामप्रत्याहारध्यानधारणसमाधिपराष्टां   
 गयोगचिरपक्षतिसंततसादरतत्परतथश्चक्रवार्त   
त्वावघिन्नसकलदुष्टशिक्षापूर्वक शिष्टाचार
श्रुतिस्मृत्यनुसरणसंद्रमवर्त्म संप्रदायप्रवर्तकाचार्या-
खिल दुर्वादिमतखंडनवत्वाछिन्नषण्मतस्थापनाचार्या
माद्याविछिन्नगुरुपरंपरागतं निखिलवेदवेदांतशास्त्र- प्रणीत प्रसंगोत्तमव्याख्यानपांडित्यावछिन्नाव्याहतषड्गुणैश्वर्यसंपन्न श्री मच्छंकेश्वरादिमठसिंहासनाधीश्वर श्री.६

यतिवरकरकजजश्री ६ श्रीनरसिंहभारतितींद्राः सर्वगुरवः
॥ श्रीशंकरभारतीय ॥

-श्री-

सकलविद्वद्व्टंदादि निखिलाधिकारीजनप्रति नारायणस्मरणपूर्वक नैरंतर्यावछिन्नमंगलचिंतनाशिषयंति । भोजनास्मत्समीपे पाठारीयप्रभुजातिविचारोयंभूत् ॥ स्कंदपुराणे आदिरहस्ये सह्याद्रिखंडे गणेशेश्वरसंवादे षड्- विंशतिसकाशात्पंचत्रिंशतिपर्यंताध्यायमध्ययोवस्तुदनुसारेण । कोसोभावो येनविचार इत्याकांक्षायां तत्रायंश्लोकाभिप्रायः ॥ श्रीरामवंशःकश्चनाश्वपतिनाम भूपस्यसुतानासन् भृगुप्रसादेन भारद्वाजादि विश्वामित्रांतद्वादशॠषिभ्यःसकाशात् द्वादशमंत्राणामुपदेशोभूत् ॥ तत्प्रभावेन द्वादशगोत्रजाः द्वादशपुत्राः अभवन् ॥ ततो वंशवृद्धिरभूत् ॥ सतीर्थयात्राप्रसंगेन पैठीणसीपत्तने दानादिकर्तृ- त्वाभिनिविशेनागतस्यापि गुरोर्नसन्मानितं ॥ तेन कारणेन भृगुणा संशप्तस्ते वंशनाशःस्यादिति ॥ पश्चाद्विनयपूर्वकतत्प्रार्थनेन प्रसादितस्प्तगुरु: ॥ मम वाक्यं न वृथा स्यःत् परंतु तव शरणप्राप्तत्वात्त्वद्वंश्याश्चैवराजानोनिर्वीर्याराज्यहीनगाः ॥ आद्यं प्रभु्त्वंतेषावैलीपीका जीवनं भवेत् ॥ पाठारीयाः प्रसिद्धास्ते पत्तनाख्याभवंतुवा । प्रभूत्तरपदंतेषांपत्तनाःप्रभवश्चत इति ॥ एतेन तेषां सामान्यस्वरूपान्वयविकृतिपूर्वक पाठारीय प्रभूत्वाख्य सामान्यांतरप्राप्तत्वात् ॥ वेदोक्तानुसार श्रीमत्पाराशर्यजवर्त्मा- नुसरणं यागादियजनं षट्कर्मनिरतं निमित्तीकृत्य वेद समाख्याध्ययनं यथोक्तपथात्मीयादानप्रतिग्रहौच सर्वेप्येते संत्येवेत्यतः क्षत्रियास्तुतिकर्मिणि इत्येतत्येक्षया तेषां वेदोक्तानुसरण व्यासभव मार्गोक्त कर्मचतुष्टयाधिकारोस्तीति सर्वमिदं विमृश्य विदुषोज्नुवदतेत्यस्मदाज्ञानिश्चये नैवावगंतव्या ॥ श्री रस्तु ॥ विकार्यब्दे श्रुचितिते द्वादशांबुधवासरे ॥ एतत्प्रभुवचोभिश्च सद्वचोभिविलेखनं ॥ आज्ञोयमुल्लसति ॥ इत्यलम् ॥

शके १७१० मध्यें श्री करवीरमठकर शंकर स्वामी यांचें दुसरें संस्कृत संमत पत्र मिळालें तें-

श्रीशिवशरणम्.

अस्तिदक्षिणस्यांदिशिप्रभुपदवाच्यः केचितद्विविधाकायस्थप्रभुवः पत्तनप्रभूवश्च x x x तत्र पत्तनप्रभूणांतु संस्काराचारजीवीकासंदेहप्राप्तः श्रीस्कंदपुराणांतर्गत सह्याद्रिखंडे पर्यालोचनया निर्णयाः ॥ तद्यथा पत्तनप्रभूणां पाठारीयतीनामंतरविषये श्रीगणपतिप्रश्ने माहादेवोत्तरोत्तम् यथा श्री अश्वपतिनामाभूपाः सूर्यवंशः पैठणे दानादिप्रसंगेनव्यक्तः ॥ समागतंभृगुमुनिमपिनसंश्चकाश ॥ ततो भृगुः राज्यहानिवंशनाशाभ्यां तंशशाप ॥ ततोराजामुनिसोगतः कोपोमुनिस्तमनुजा गृंह ॥ उवाच मुनिश्रेष्ठोराजानंदानतत्परं ॥ राजन्मेवृथावाक्यं भविष्यतिन संशयः ॥ त्वमेवशरणमांपन्नोवंशवृद्धिर्भविष्यति ॥ तद्वंशजाश्चराजानोनिः शौर्याराज्यहीनगाः आद्यप्रभुत्वं तेषांवैलीपिकाजीवनंभवेत् ॥ पैठीणे पत्तनेशप्ता मया कोपवशात्किल ॥ पाठारीया प्रसिद्धास्ते पत्तनाख्याभवंतुच ॥ प्रभूत्तरपदंतेषांपत्तनप्रप्रवश्चये ॥ इत्यादिवचोनिश्चयविचारेण पाठारीयप्रभूणां परपूर्याणां पत्तनप्रभूणां शुद्धक्षत्रियत्वं जातिमतया क्षत्रियवर्णविहिताचारसंस्कारादिकं सर्वंभवत्येवेति प्रतिभाति यद्यपि क्षत्रियाणां मायुः प्रधानजीविकेतिक्षत्रियजीविताइति वाक्येन धर्म निर्बंधेषु विहिता तथापि लीपिकाजीवनं भवेदिति भृगुवाक्येन तामपोह्य लीपिकाजीविकेतिदिक् ॥ किंच त्क्षत्रियाणांगर्भाधानादि संस्कारादिकं ॥ ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्रामुख्यवर्णास्त्वाद्यास्त्रयोद्विजानिषेकाद्यास्मशानांतास्तेषांवैमंत्रतः क्रियाः इत्यादियाज्ञवल्क्यादिवचोभिः समंत्रकायंभवति इतीज्याध्यायनंदानादि वैश्यस्यक्षत्रियस्यच इत्यादि याज्ञवल्क्यवचनप्रतिपादितं संगच्छेत् ॥ श्रीमत्सूर्यपुरेविहिताश्चप्रकाशानंदेनसंमती ॥ तत्समये श्रीमन्नृपविक्रमार्कसंवत १८४४ तथाच नृपभूप शालिवाहान कृत शाके १७१० कलिक नामसंवत्सरे शुभकारि जेष्ठमासे कृष्ण पक्षे तिथौ सप्तम्यांगुरोयांसुगुर्जर ब्राह्मणस्य संमतं ॥  (या संमतिपत्रावर ४० इसमांच्या सह्या आहेत.)

पाठारे प्रभु ज्ञातीची खानेसुमारीसन १९१४ च्या डिसेंबर महिन्यांत घेण्यांत आली. त्या रिपोर्टांतील शिक्षणाबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे, ती येणेप्रमाणें- प्रभु लोकांची संख्या ४७३९ आहे; पैकीं २३९५ पुरुष व २३४४ स्त्रिया आहेत. २३९५ पुरुषांपैकी २१३०, म्हणजे शेंकडा ८८.९ मराठी जाणणारे आहेत, आणि १८११ म्हणजे शेंकडा ७५.६ इंग्रजी जाणणारे आहेत व २३४४ स्त्रियांपैकीं १९५२ म्हणजे शेंकडा ८४.५ मराठी शिकलेल्या आहेत, व ६०० स्त्रिया म्हणजे शेंकडा २५.० इंग्रजी शिकलेल्या आहेत. म्हणजे लहान मुलांची संख्या वजा केली तर प्रत्येक स्त्रीपुरुष सुशिक्षित आहे असें दिसतें. या ज्ञातींत उच्च शिक्षण घेतलेले, बडे सरकारी नोकरवाले, डॉक्टर, बॅरिस्टर वगैरे लोक आहेत व काही स्त्रियांहि शिक्षकिणी, नर्स, उद्योगधंदे वगैरेंत गुंतलेल्या आहेत.

प्रभु ज्ञातींच्या स्थावर मिळकतींमध्यें जमीदा-या, जमिनी, घरें, वाडया, चाळीं, वगैरे मिळकती अनेक ठिकाणच्या एकंदर २१७ आहेत.

ज्ञातिसंबंधाचे कागदपत्र प.वा.शामराव मोरोजी नायक यानीं पुस्तकरूपानें छापून प्रसिद्ध केले आहेत. अस्सल कागद एके ठिकाणीं मिळणे शक्य नाहीं.

पाठारे प्रभु हे सुर्यवंशी व सोमवंशी क्षत्रिय आहोंत असें म्हणतात. त्यांस 'पाताणे' प्रभु असेंहि म्हणतात. 'पाताणे' ह्या नांवासंबंधानें दंतकथा अशी आहे कीं, पाठारे प्रभु हे अश्वपति व कामपति ह्यांचे वंशज आहेत असें स्कंदपुराणांतील सह्याद्रिखंडांत लिहिलें आहे. अश्वपति राजानें भृगुंॠषींचा अपमान केल्यामुळें ॠषींनीं राजास शाप दिला कीं तुझ्या वंशजाच्या हातची राजसत्ता जाऊन त्यांच्या हातांत लेखणी येईल आणि पाठारीयप्रभु हें नांव जाऊन त्यांस 'पत्तनप्रभु' असें नांव मिळेल. ह्या शापावरून मूळचे पाठारेप्रभु हे राज्यपदावरून 'पतन' पावले, आणि त्यामुऴे त्यांस ‘पत्तन’ , ‘पतन’ अथवा 'पातणे' अशी संज्ञा प्राप्त झाली. वास्तविक 'पाठारे' आणि 'पाताणे' हीं दोन्हीं नांवें स्थलदर्शक आहेत हें खाली नमूद केलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून दिसून येतें. पाठारे प्रभु हे प्रथमतः इंद्रप्रस्थाजवळ असलेल्या पठारावर रहात होते. 'पठार' हा उत्तर हिंदुस्थानांतील एका पर्वताचा सपाट पृष्ठभाग असून त्याच्या चतुःसीमा येणेंप्रमाणे आहेतः- उत्तरेस यमुनानदी, दक्षिणेस विंध्याद्रि पर्वत, पश्चिमेस अरवलीची रांग आणि पूर्वेस चंबळ नदीचें खोरें. पर्वताच्या सपाटीस कुश्वागर अथवा श्रीरामचंद्रपुत्र कुश ह्याचें नगर असें म्हणत असत. आणि ह्या पठारावर राहणा-या प्रभूंस पाठरीय म्हणूं लागले. पाठारीय याचा अपभ्रंश पाठारे असा झाला. या पठारं प्रदेशांतून प्रभूंची कांहीं कुळें हळूहळू आजूबाजूंच्या प्रदेशांत म्हणजे हस्तिनापूर, नागाबाज, राजपुताना, मारवाड, गुजराथ, काठेवाड, प्रभास उर्फ सोमनाथपाटण, अनहिलवाडापाटण, चंपानेर आणि मुंगीपैठण व पन्हाळा येथें येऊन राहिली. म्हणजे त्यांचें स्थलांतर उत्तरेकडून होऊन ते राजपुताना, गुजराथ आणि काठेवाड या प्रदेशांतून दक्षिणेकडील पैठण ह्या शहरापर्यंत झालें. सदरील शहरांपैकीं नागाबाज अथवा नागोर ही रजपुतांची प्रसिद्ध राजधानी होंती;  अनहिलवाडपाटण ही सोळंकी व चालुक्य राजांची राजधानी होती. पाठारे प्रभु दक्षिण पैठणाकडील भागांत येऊन राहिल्यानंतरहि ते पुन्हां कालवकाच्या फे-यांत सांपडून तेथूनहि स्थानभ्रष्ट झाले. त्यावेळीं पाठारे प्रभूंची कांहीं कुळें गुजराथेत कायमची वस्ती करून राहिलीं होतीं. १०२४ सालीं जेव्हां महंमद गिझनी यानें सोमनाथाच्या देवळावर स्वारी केली तेव्हां ह्या देवालयाचें रक्षण करण्यासाठी गुजराथच्या बिंबराजाबरोबर कांहीं प्रभु सोमनाथ पाटण येथें आलें. तेथे बिंबराजाच्या हांतून त्यांचा पराभव होऊन ते अनहिलवाडापाटण ह्या राजधानींत आले आणि ह्या पाटण शहराच्या आजूबाजूच्या भांगांतून मुक्काम करून राहिले. त्यावेळी पराभूत झालेल्या लोकापैकी कांहीं प्रभु गुजराथ व सोमनाथपाटण सोडून जलमार्गानें उत्तर कोंकणात आले आणि चौल शहरीं मुक्कामास राहिले. त्यावेळीं चौल हें हिंदुस्थानांतील व्यापार उदीमाचें प्रख्यात शहर गणलें जात असे. प्रभु उत्तर कोंकणांत येऊन राहिले होते यासंबंधाचें लहानसें वर्णन वेलजी नांवाच्या प्रभूनें लिहिलेल्या शिलालेखावरून स्पष्ट दिसून येतें. (मुंबई जिऑलॉजिकल सोसायटी, भाग १ ला; इ.स.१८३६). शिलाहार राजांच्या कारकीर्दीत उत्तर कोंकणप्रांतांत लिहिलेल्या कांहीं शिलालेखांवरून असें दिसून येतें कीं शिलाहार राजांच्या कांहीं मंत्र्यांचीं आणि अंमलदारांचीं उपनांवें हीं प्रचलित पाठारे प्रभूंच्या उपनांवांसारखीच होती, किंबहुना तींच होती; आणि ह्या शिलाहार राजांच्या कारकीर्दीत कांहीं पाठारे प्रभु, कायस्थप्रभु आणि यजुर्वेदीय ब्राह्मण उत्तर कोंकणांत वसाहत करून राहिले असेहि ह्या शिलालेखावरून कळून येतें. (मुंबई सिटी गॅझेटियर, भाग २ रा, पृ. १३ व १४). पुढें इ.स.१२८८ मध्येंहि कांहीं प्रभुकुळांचे दक्षिण पैठणाहून स्थलांतर झालें त्यावेळी रामराजा नांवाचा दक्षिण पैठणचा एक मांडलिक राजा होता. सदरहु सालीं अहंमदशाह नांवाच्या मुसुलमान राजानें रामराजाचा पराभव करून त्यास ठार मारलें; आणि ह्याच सुमारास त्याच्या पदरचीं प्रभुकुलें दक्षिण पैठण सोडून दक्षिण बाजूच्या भागांत म्हणजे देवगिरी, चंपानेर आणि गुजराथ येथें जाऊन राहिलीं आणि त्यांपैकी थोड्या कुळांनीं उत्तरकोंकणांत जाऊन वस्ती केली. हा रामराजा पाठारे प्रभु ज्ञातीचा मूळ पुरूष होय. त्या विषयांची सविस्तर माहिती आणि वंशावळ कौस्तुभचिंतामणि नांवाच्या ग्रंथांत दिली आहे (मराठी रिसायत, भाग १ ला, पान ३२). त्यापुढेंहि आणखी एकदां पाठारे प्रभूचें गुजराथेंतून उत्तर कोंकणांत स्थलांतर झालें. ती वेळ म्हणजे इ.स.१२९४ साल हें होय. ह्या वर्षी अल्लाउद्दीन खिलजी यानें गुजराथच्या स्वातंत्र्याचा नाश केला. त्यावेळीं बिंबदेव अथवा बिंबराजा याजबरोबर ६६ प्रभुकुळें गुजराथेंतून निघून उत्तर कोंकणप्रांतीं आलीं आणि तेथेंच ती कायमची वस्ती करून राहिलीं. एकंदरीनें, पाठारे प्रभु कुळें उत्तर हिंदुस्थानांतील इंद्रप्रस्थाहून निघून राजपुताना, काठेवाड, व गुजराथ या प्रांतांतून वस्ती करून खालीं उतरत दक्षिणपैठणशहरीं आलीं आणि पुन्हां गुजराथेंत परत फिरून तीं कोंकणप्रांतांत आली.

ह्या सर्व हकीकतीवरून असें दिसून येतें कीं राजा बिंब याचा हस्तिनापूर, नागाबाज, चापानेर, मुंगीपैठण आणि पन्हाळे ह्या पांच पैठणांच्या राजवंशांशीं संबंध होता. त्याजबरोबर बरींच प्रभुकुळें ह्या पांच गांवांहून आलीं; इतकेंच नव्हें, तर कांहीं कुळें चेरणें, दौलताबाद (देवगिरी), अनहिलवाडा, काठेवाड, राजपुताना वगैरे ठिकांणांहून येऊन त्यांनीं आपली शेवटची कायमची वस्ती उत्तरकोंकणप्रांतांत केली. त्यांच्याबरोबर बायकांमुलें वगैरे सर्व परिवारहि होता. कोंकण प्रदेशांत हीं पाठारे प्रभूची कुळें कायमची वतनदरहि झालीं; उदाहरणार्थ, चेऊल, येकसर, कोंदिवटे, दईसार, शाहार, फोजिवरें, अंधेरी, भांडूप, मरोळ, बानरे, निळापुर, पवळे, माजासा, सासवण, कळवे, कणेर, माहीम, ठाणें वगैरे. ह्या प्रभु कुळांची ज्या ज्या ठिकाणांहून स्थलांतरें झालीं त्या त्या भागांतील भाषा व चालीरीतीहि त्यांनीं आपल्याबरोबर आणल्या होत्या. कोणत्याहि कुळाचें पुर्वकाळीन वसतिस्थान नक्की करण्यास भाषेची आणि चालीरातींची बरीच मदत मिळते. दोन तीन पिढयांपूर्वी पाठारे प्रभु-कुटुंबांतून जी भाषा बोलण्यांत येत असे त्या भाषेंत राजपुतानी, काठेवाडी, मारवाडी आणि गुजराथी शब्दांचा बराच भरणा असे. अद्यापिहि पाठारे प्रभूंच्या अगदीं घरगुती भाषेंतून काठेवाडी, मारवाडी आणि गुजराथी शब्द बरेच आढळून येतात. कोंकणांतील भाषेचे कांही अशुद्ध प्रकारहि पाहण्यांत येतात. सर्वात गुजराथी शब्दांचा जास्त भरणा आहे हें सहज कळून येतें. तुलनेसाठीं कांहीं शब्द पुढें देत आहे-

'बुंदाळा' (भांडयाला बाहेरून दिलेलें राखेचें लेपण) हा शब्द शुद्ध गुजराथी आहे; 'बुंदु'=तळ, 'आळो'=मातीचें किंवा राखेचें लेपण. ''मोळली'' (विळी) हा शब्द सुद्धां शुद्ध गुजराथी आहे; मोळवुं=(भाजी)चिरणें. आमचे लोक अद्यापि गुजराथी लोकांप्रमाणें 'दूधवाळा', 'भाजीवाळा' असें म्हणतात. 'दूधवाला' असें म्हणत नाहींत.

याप्रमाणें प्रभु लोकांच्या भाषेंत अद्यापि बरेच गुजराथी शब्द आहेत. भाई, नानाभाई, मोठाभाई, बेनाबाई हीं तर विशेषनामें होऊन राहिलीं आहेत. तरी स्थलसंकोचास्तव आणखी शब्द येथें देता येत नाहींत. वर दिलेले शब्द जरी थोडे आहेत तरी पाठारे प्रभूचें मूळस्थान शोधून काढण्याच्या कामीं त्यांचा बराच उपयोग होतो.

पाठारे प्रभु ''खाकरा'' शब्द भाकरी शब्दाबद्दल वापरतात, तो गुजराथी भाषेंत कोठेंहि सांपडत नसून फक्त काठेवाडांत सांपडतो आणि त्यावरून ते एकेकाळीं काठेवाडांत रहात होते असें व्यक्त होतें; कारण ज्ञातींतील सर्व माणसें एकाएकीं एखाद्या खाण्याच्या पदार्थाला दुस-या लोकांच्या सहवासानें कधींहि एखाद्या नांवानें संबोधित नसतात. तेव्हां हा असला महत्त्वाचा शब्द अद्यापि प्रभुज्ञातींत रूढ आहे. ह्यावरून पाठारे प्रभु हे काठेवाडांत रहात होते हें सिद्ध होतें. याचें पुष्टीकरण आमच्या पागोटयावरून होते. पुढें प्रभु काठेवाडांतून गुजराथेंत येऊन तेथे बराच काळ राहिले, आणि गुर्जरां त्या सहवासानें त्यांनीं हळूहळू त्यांचे बरेच शब्द उचलले. तसेंच पुढें महाराष्ट्रीयांच्या दीर्घ सहवासानें त्यांच्या भाषेंतील गुजराथी शब्द बहुतेकासाफ जाऊन त्यांच्या ऐवजीं मराठी शब्द आले व जे थोडे गुजराथी किंवा काठेवाडी शब्द राहिले आहेत ते देखील कालांतरानें जातील.

त्याचप्रमाणे प्रभूंच्या भाषेंत कांहीं मारवाडीहि शब्द आहेत, ते गुजराथी किंवा काठेवाडी भाषेंत कोठेंहि सांपडत नाहींत. मग हे शब्द त्यांच्या भाषेंत कसे आले? प्रभु गुजरार्थेत असतांना त्यांनी आजूबाजूस राहणा-या मारवाडी लोकांचे शब्द घेतले कीं काय? पण असें असतें तर ते दुस-या गुजराथी लोकांच्या भाषेंतहि सांपडले असते. ते फक्त प्रभूंच्या भाषेंतच तेवढे कां सांपडावे? ह्याला समाधानकारक असें एकच त्तरउ आहे व तें हें की, काठेवाडांत येण्यापूर्वीं प्रभू मारवाडांतून आले. मारवाडांतून काठेवाडांत आले असें म्हणण्याचें कारण हें कीं काठेवाडासारख्या सुपीक प्रदेशांतून कोणीहि मारवाडासारख्या निर्जल व रुक्ष देशांत जाईल असें संभवत नाहीं आणि यावेळीं वरचेवर लढाया होत असल्यामुळें काठेवाडांत लोकांची वस्ती मुळींच दाट नव्हती. रजपूत लोकांच्या इतिहासाकडे पाहिलें तर ते देखील असेच उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे सिंध, राजपुताना, गुजराथ, व काठेवाड येथें आले असें दिसतें.

वर दिलेल्या गुजराथी शब्दांवरून आणखी एक गोष्ट सिद्ध होते, ती ही की, जेव्हां पाठारे प्रभु उत्तर कोकणांत आले. तेव्हां त्यांच्याबरोबर त्यांच्या बायका व मुलें हीं होतीं. कारण, बायका व मुलें ज्या शब्दांचा उपयोग करतात असे बरेच गुजराथी शब्द अद्यापि प्रचलित आहेत. कांहीं आक्षेपकांच्या म्हणण्याप्रमाणें फक्त प्रभु पुरुष जर कोंकणांत येऊन तेथील स्त्रियांशीं त्यांनीं आपले शरीरसंबंध केले असते तर घरगुती शब्द मूळ कोंकणांत रहाणा-या स्त्रियांचेच असते; गुजराथी व काठेवाडी नसते.

आतां कदाचित् कित्येक अशी शकां घेतील कीं, जर प्रभूंची मूळची भाषा गुजराथी किंवा काठेवाडी होती तर ती अद्यापि तशीच कायम कां राहिली नाहीं? ह्याला उत्तर इतकेंच कीं जेव्हां कांहीं लोक एखाद्या नवीन देशांत जाऊन राहतात तेव्हां ते हळूहळू त्या देशाच्या भाषेचा साहजिक अंगीकार करतात. नॉर्मन लोकांनीं इंग्लंड देश जिंकल्यावर ते तेथें जाऊन राहिले, त्यांची भाषा नॉर्मन न राहतां इंग्रजी झाली. पारशी लोक हिंदुस्थानांत पळून आले व सुरतेजवळ राहिले. पुढें त्यांची मूळची भाषा लुप्त होऊन तिच्या ऐवजीं गुजराथी भाषा प्रचारांत आली; इतकेंच नव्हे तर त्यांच्या आचारविचारांत पोषाखांत, व चालीरीतींत देखील त्यांच्या नवीन देशबंधूंच्या आचारविचारांची मिसळ झाली. तरी पण 'खुदा' वगैरे त्यांचे मूळचे शब्द अद्यापि कायम आहेत. पाठारे मूळचे कोठले हें ठरविण्याचीं खालील साधने आहेत.

चालीरीतीः- इतिहासावरून असें दिसून येतें कीं पाठारे प्रभु हे इ. स. १४९५ मध्यें वसई तालुक्यांत होते. ह्याच्यापूर्वीं ते तेथें केव्हां आले हें निश्चयपूर्वक सांगतां येत नाहीं. तरी पण ते तेथें बराच काळ पूर्वी आले असावे. इतक्या काळांत काठेवाडांत आणि गुजरार्थेत किती तरी राज्यक्रांत्या झाल्या; त्यामुळें कांही रजपूत वगैरे लोक तेथील मूऴचे रहिवासी दक्षिणेत आले व दुस-या प्रांतांतून लोक गुजराथेंत गेले हे इतिहासप्रसिध्दच आहे ह्या नवीन लोकांच्या संसर्गाने तेथील मूळच्या लोकांच्या चालीरीतींत व आचारविचारांत हळूहळू फेरबदल झाला हें सहाजिकच आहे म्हणून चालीरीतींत साम्य मिळणें कठिण आहे. तथापि कांहीं चालीरीतींत जरी फेरबदल झाले तरी धर्मसंबंधीं किंवा धर्माच्या नांवाखाली येणा-या चालीरीतींत सहसा फेरबदल होत नसतो. म्हणून अशा काही थोड्या चालीरीती पाठारे प्रभूंत आणि गुजराथी लोकांत सारख्या दिसून येतात त्या अशा-

पाठारे प्रभू लग्नांत (मुंजींत सुद्धां) देवदेवकाजवळ भिंतीवर, आंब्याच्या झाडावर सुवासिनी स्त्रिया आंब्याच्या पानानें पाणी शिंपडतात, असा चित्रपट काढतात. ही चाल राजपूत लोकांत आहे, ते देखील पाठारे प्रभूंप्रमाणें देवदेवकाजवळ तलवार ठेवितात.

लग्नांत प्रभु कुलस्वामिनीला बकरा बळी (भोग) देतात. पशु बळी देण्याची चाल गुजराथच्या कुमारपाल सोळंकी राजानें बंद केली. तेव्हांपासून कित्येक गुजराथी लोक (लोहाणे) वगैरे पशुवधाच्याऐवजी कोहळे कापतात. प्रभु लोक देखील देवकस्थापनेच्या वेऴी कोहऴे कापतात. त्यास 'कोहळेंरासणें' असें म्हणतात व भोगाच्यावेळीं ''बोकडरासणें'' (बकरा मारणें) म्हणतात. रासणें हा ''रहेसवुं'' ह्या गुजराथी शब्दाचा अपभ्रंश आहे.

लग्नाच्या दिवशीं वरराजास आपल्या घरीं लग्नास येण्याचें आमंत्रण देण्याकरितां नवरीचा बाप इष्टमित्रादि पुरुषमंडळीस घेऊन वराच्या घरीं जातो. त्यास प्रभु ''पायपाखाणी'' असें म्हणतात. ही चाल गुजराथी लोकांत आहे. फरक इतकाच कीं, त्यांच्यांत नवरीची आई देखील दुस-या स्त्रियांस घेऊन जाते. नंतर वर ''ह्यों'' (हजामत) करवितो. ही चाल गुजराथी लोकांत आहे. त्यास ते चेहरा करविणें म्हणतात. मो, मो, ह्यो, चेहरा हे मुखवाचक गुजराथी शब्द आहेत. वर रेशमीं पिंवळें वस्त्र (पाळनेत) नेसतो, अंगांत कपडे घालतो (पूर्वी जामा घालीत असे) व डोकीस लाल पागोटें घालतो. हातांत चाकू घेतो व घोडयावर बसून नवरीच्या घरीं जातो. ही चाल देखील गुजराथेंत आहे. पण लोहाणे लोक हातांत कटयार घेतात आणि रजपूत लोक तलवार घेतात. प्रभु देखील पूर्वी कटयार किंवा तलवार घेत असत,असें दिसतें. वर नवरीच्या घरीं गेला म्हणजे प्रभु लोकांत नवरीचा बाप त्याच्या घोडयास प्रदक्षिणा घालतो. रजपूत लोकांत नवरीचा बाप व आई वराच्या घोडयास आरती ओवळतात. प्रभु वर मुराळयास (नवरीच्या भावास) पोषाख देतो. रजपूत राजे त्यास गांव इनाम देतात. त्या विधीस ते 'साळाकटारी' म्हणतात.

प्रभु लोकांत नवरी पाळनेत (पिंवळें रेशमी वस्त्र) वेढयांचें नेसते. म्हणजे पदर व कांसोटा घेत नाहीं. अंगांत चोळीच्या ऐवजीं कांचोळीं घालते व अंगावर दुपेटा घेते.

लग्नांत प्रभु ज्याप्रमाणें विवाहित मुली व जांवई यांचे पाय धुतात, त्याप्रमाणें रजपूत लोकहि विवाहित मुली व जांवई यांचे पाय धुतात. लग्नाच्या वेळीं प्रभुलोक वधूवरांमध्यें अंतःपट धरतांना हातांत तरबार धरतात तसे रजपूतहि धरतात.

लग्न झाल्यानंतर नवरा व नवरी यांस त्यांचे इष्टमित्र कांहीं द्रव्य देतात, त्यास चांदला करणें असें म्हणतात. ही चाल रजपूत व दुसरे गुजराथी लोक यांच्यांत आहे व ते त्यास चांदलाच म्हणतात. प्रभु जसे नव-याकडील स्त्रीमंडळीला वस्त्रें (पातळें) देऊन त्यांचा ''गौरव'' करतात, तसें रजपूत व दुसरे गुजराथी लोक मेजवानी देऊन तसाच गौरव करतात. त्यास ते गौरव असें म्हणतात.

प्रभूंत स्त्री पहिल्या वेळीं गरोदर असली म्हणजे पांचव्या महिन्यापासून सातव्या महिन्यापर्यंत तिला संध्याकाळीं उंची पोषाख घालून व तिचे केश त-हेत-हेचे बांधून किंवा मोकळे सोडून त्यांत फुलें किंवा फुलांचे हार भरतात. गालावर व कपाळावर रंगीत कटा-यांनीं चित्रे किंवा नकशी काढतात. त्यास ते वाडी भरणें असें म्हणतात. अशा प्रसंगीं केव्हां केव्हां ह्या स्त्रीला मोठ्या थाटानें मेजवानी देतात व तिच्या बरोबर भोजनास आप्त आणि इष्टमित्रादि मंडळी असते. ह्यास ''गरवारीचें जेवण'' असें म्हणतात. ही चाल गुजराथी लोकांत आढळते. गुजराथी लोक प्रभूंसारखीच गरभार स्त्रीला ''वाडी'' भरतात व तिला आणि तिच्या इष्टमित्रादि मंडळीला भोजन देतात. अशा वेळीं ते फार पैसे खर्च करतात. केव्हां केव्हां तर सर्व ज्ञातीस भोजन देतात. ते देखील वाडी भरणें हाच शब्द वापरतात. प्रभुप्रमाणें ते देखील लहान मुलींस ''वाडी'' भरून तिला इष्टमित्रांच्या घरीं पाठवितात.

मुलाच्या जन्मानंतर पांचव्या किंवा सहाव्या दिवशीं जिवतीची पूजा करण्याचा परिपाठ सर्व हिंदु लोकांत आहे. प्रभु ही पूजा पांचव्या दिवशीं करतात, आणि तीस ''सटीची पूजा'' असें म्हणतात. गुजराथी लोकहि सहाव्या दिवशीं अशाच प्रकारची पूजा करतात आण तीस ''छदीनी पूजा'' म्हणतात. केव्हां केव्हां श्रीमंत लोक ही पूजा सहाव्या दिवशीं करतात, त्यावेळीं तीस ''षष्ठी पूजन'' म्हणतात. प्रभु लोक पहिल्या मुलाच्या वेळीं मोठ्या थाटानें षष्ठीपूजन करतात, पण तें पांचव्या दिवशींच करतात. सटी शब्दावरून इतकें सिद्ध होतें कीं पूर्वी प्रभु ही पूजा सहाव्या दिवशीं करीत होते व पुढें येथें म्हणजे मुंबईत आल्यावर येथील रहिवाशांच्या सहवासानें पांचव्या दिवशीं पूजा करू लागले. सटीच्या पूजेजवळ ते तरवार, कागद, शाई आणि लेखणी ठेवितात, व दरवाजाजवळ धनुकल्या ठेवितात. ही चाल रजपूत लोकांतहि आहे.

जे दागिने प्रभूस्त्रिया घालतात. त्यांपैकीं वेळा, आयदोरा (आहेवदोरा), राखी, कमरपट्टा  हे रजपुतांत आढळतात.

प्रभूंच्या पागोटयास ''परभी पागोटें'' असें म्हणतात. तें काठेवाडांत आढळतें, दक्षिणेंत आढळत नाहीं व कांहीं काठेवाडी लोक असलें पागोटें अद्यापि घालीत आहेत व त्यास काठेवाडी पागोटें असे म्हणतात. प्रभासपाटण व त्याच्या बाजूचे, वेरावळ, पोरबंदर इत्यादि गांवचे कांहीं लोक तसेंच सलाट लोक (धोंडफोडे लोक) व कतारी लोक देखील असलें पागोटें बांधतात. सलाट लोकांची अशी दंतकथा आहे कीं, ते पूर्वी सोमनाथाचे ब्राह्मण होते, पुढें त्यास वाळींत टाकल्यामुळें ते धोंडफोडे झाले. एकंदरींत हें पागोटें सोमनाथ (प्रभास) पाटण व त्याच्या बाजूच्या प्रदेशांतलें आहे असें सिद्ध होतें व आपण सोमनाथाहून आलों अशी प्रभूंची हकीकत आहेच. प्रभुमंडळीप्रमाणें काठेवाडांतील कित्येक भागांत दुःखप्रदर्शक पागोटें तपकिरी रंगाचें असतें व तें सासरा देत असतो. प्रभुपागोटे सद्यःकालीं म्हणजे नव्या पिढींत बहुतेक नाहींसें झालें आहे.

एकंदरीनें वर लिहिलेल्या भाषेच्या आणि चालीरीतींच्या प्रकारांवरून पाठारे प्रभु पूर्वकालीं राजपुताना, काठेवाड आणि गुजराथ येथें होते असें निश्चयात्मक ठरतें. सारांश, उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यावरून सांगावयाचें म्हणजे-

(१) पाठारे प्रभु हे क्षात्रकुलोत्पन्न आहेत.  (२) ते बराचकाळ राजपुताना, उत्तरहिंदुस्थान, गुजराथ, काठेवाड, दक्षिणमहाराष्ट्र व उत्तर कोंकण या ठिकाणीं रहात होते. (३) गुजराथेंतील पट्टग शहरीं त्यांचें वास्तव्य बरींच वर्षे झाल्यामुळें त्यास 'पाटगना प्रभु' अथवा 'पाताणे प्रभु' हें नांव मिळालें. (४) मुसुलमान धर्मियांनीं त्यांस गुजराथेंतून हांकून लावल्यामुळें त्यांनीं दक्षिणेस कांही वेळ मुक्काम केला आणि त्यानंतर त्यांनीं आपला कायमचा मुक्काम उत्तरकोंकण पट्टीवरील अनेक बंदरें आणि शहरें यांतून केला. (५) महंमद गझनी आणि अल्लाउद्दीन खिलजी यांनीं गुजराथ प्रांतावर स्वा-या केल्या त्या वेळच्या दरम्यान म्हणजे इ.स. ११ व्या आणि १३ व्या शतकाच्या आंत पाठारे प्रभु हे गुजराथेंतून उत्तर कोंकणांत आले (६) गुजराथेंतून उत्तर कोंकणांत येतांना त्यांनीं बायका मुलें वगैरे आपला सर्व परिवार आपल्या बरोबर आणला होता. (७) १३ व्या शतकाच्या अखेरीस प्रभु उत्तर कोंकणांत मोठमोठ्या हुद्दयाच्या व वसुलाच्या कामावर होते आणि बराच काळ त्यांच्या हातांत राजानुशासन आणि तत्संबंधीं बरीच सत्ता होती. (८) सोळाव्या आणि सतराव्या शतकांत पोर्तुगीज राजांच्या अंमलाखालीं त्यांच्याकडे मोठमोठीं विश्वासाचीं आणि जबाबदारीचीं कामें होतीं. त्यांपैकीं कित्येकांस इनाम जमिनीहि मिळाल्या होत्या. (९) १८ व्या शतकांत आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांचें राजदरबारी मोठें वजन असून त्यांस शस्त्रें बाळगण्याचाहि अधिकार होता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यार्धात त्यांचें मुंबई शहरांत कायमचें ठाणें झालें आणि त्या शहरीं त्या वेळच्या इतर सर्व लोकांपेक्षां त्यांचें वजन फार असून सुशिक्षित वर्गामध्यें त्यांची प्रामुख्यानें गणना होत असे.

पाठारे प्रभु १३ व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे सुमारें १२९४ सालीं उत्तर कोंकणांत येऊन राजा बिंबदेवाबरोबर राहिले आणि त्यांनीं त्यावेळीं तेथल्या राज्यकर्त्या नायक सरदारांचा पराभव करून बिंबाच्या आधिपत्याखालीं साष्टी, अष्टागर, वसईबेट, मुंबई, माहीम वगैरे ठिकाणीं त्यांनीं आपली राजसत्ता चालू केली आणि मुंबईमाहीम ह्यास महिकावती असें नांव देऊन तीं त्यांनीं आपली राजधानी केली आणि माहीम येथें आपली कुलदेवता प्रभावतीं हिचें देऊळ बांधलें. त्यानंतर मुसुलमान व पोर्तुगीज राजांच्या अमदानींत धार्मिक व राजकीय जुलमामुळें प्रभूंचीं बहुतेक कुळें साष्टी, अष्ठागर, वसई येथून इंग्रजांच्या सत्तेखाली मुंबई बेटांत उपजीविकेच्या साधनाकरितां येऊन राहिलीं आणि तेव्हांपासून प्रभुमंडळीं ही मुंबई शहर आणि आसपासच्या भागांतून वस्ती करून राहिली. (पाठारेप्रभुइतिहासमंडळाकडून आलेल्या माहितीवरून.)

(३) कंचोळे- सुमारें दीडदोनशें वर्षांपूर्वी वसई मुक्कामीं एका पाठारे प्रभूच्या घरीं एक लग्नसमारंभ झाला. लग्न लागल्यानंतर पाठारे प्रभुज्ञातीच्या रिवाजाप्रमाणें वरात निघण्यापूर्वी जमलेल्या मंडळीस गंध लावून त्यांचा सत्कार करण्यांत येतो. त्या समारंभास 'सभापूजन' असें म्हणतात. त्यावेळीं ज्ञातीचे धर्मगुरू यांसहि पाचारण करून त्यांस दक्षिणा, वस्त्रप्रावरण वगैरे देऊन त्यांचेंहि पूजन करण्यांत येतें. हे धर्मगुरू अथवा राजगुरु तूर्त वे.शा.सं.केशव बळवंत खेडकर हे होत. ह्या राजगुरुस बोलावून त्यांचा सत्कार करण्याची चाल आज २५-३० वर्षांत बहुतेक बंद पडली आहे, आणि राजगुरु संस्थाहि बहुतेक नामशेष झाली आहे. सदरील लग्नसमारंभाच्या वेळीं सभापूजन करण्यांत आलें होतें. ज्ञातींतील लहान थोर मंडळी बरीच जमली होती. वधूच्या घरांतील एक तरुण गृहस्थ मंडळीस गंध लावूं लागला. प्रथमतः त्यावेळचे राजगुरु यांस गंध लावून नंतर इतर गृहस्थांस त्यांच्या वयाच्या मानानें गंध लावण्याची वहिवाट होती त्याप्रमाणें गंध लावणारा गृहस्थ गंध लावीत असतां 'अमुक गृहस्थ माझ्यापेक्षां वयानें मोठे आहेत, त्यांना आधीं गंध लावा' असें त्यांस दोन चार इसमांनीं सांगितल्यावरून तो गृहस्थ किंचित त्रासून वयाचें कमीजास्त मान लक्षांत न घेतां मंडळी ज्याप्रमाणें बसली होती, त्याप्रमाणें तो त्यांस सरसकट गंध लावूं लागला. हीं गोष्ट कांहीं वयातीत गृहस्थांस न आवडून आणि त्यामुळें आपला अपमान होत आहे असें त्यांस वांटून त्यांनीं गंध लावणारास दूषण दिलें. हें ऐकतांच गंध लावणारा गृहस्थ चिडला आणि त्यानें आपल्या हातांतील गंधाचें कचोळें फेंकून दिलें. 'कचोळें' ह्या शब्दांस ज्ञातींत 'कंचोळे' असें म्हणतात. गंध लावणारानें कंचोळें फेंकल्याबरोबर सभेंत आरडाओरडा सुरू झाली. सभेचा अपमान झाला, व असा अपमान करणा-या गृहस्थानें सभेची माफी मागावी असें सांगण्यांत आलें. परंतु त्या गृहस्थानें माफी मागितली नाहीं. पुढें हें प्रकरण बरेंच विकोपास गेलें. ज्ञातीचा अपमान करणा-या गृहस्थास बहिष्कृत करावें असा वाद उपस्थित झाला. त्या गृहस्थालाहि कांहीं मंडळीचें पाठबळ मिळालें. कंचोळें फेकण्यानें ज्ञातीचा कांहीं एक अपमान होत नाहीं असें प्रतिपक्षाचें बोलणें सुरू झालें. पुढें ही गोष्ट बरीच विकोपास जाऊन ज्ञातीचा अपमान करणारा गृहस्थ, त्याचें कुटुंब आणि त्याचा पक्ष उचलणारे गृहस्थ ह्या सर्वांवर ज्ञातीनें बहिष्कार घातला, आणि त्यांजबरोबर रोटीबेटीव्यवहारहि बंद पाडले. ह्या बहिष्कृत मंडळींची संख्या दोनशें अडीचशें होती असें म्हणतात. कित्येक समंजस गृहस्थांनीं हें प्रकरण शांत करण्याची खटपट केली. पण त्यांत त्यांनां यश आलें नाहीं. तंट्याचें कारण वास्तविक क्षुल्लक होतें. तरीहि पाठारे प्रभुज्ञातींत ह्या कारणामूळें दोन पक्ष उत्पन्ना झालें. एक मूळचा बहुसंख्याक पाठारे प्रभुज्ञातीचा पक्ष, आणि दुसरा वीसपंचवीस कुटुंबांचा अल्पसंख्यांक बहिष्कृत पाठारे प्रभूंचा पक्ष. ह्या बहिष्कृत पक्षास ज्या कारणानें बहिष्कार घालण्यांत आला तेच नांव म्हणजे 'कंचोळे प्रभु' हें देण्यांत आलें. त्यावेळीं ज्ञातिभोजन, प्रायश्चित अथवा इतर कांहीं धर्मविधी करून समेट करण्याची उभयपक्षांनीं व्यवस्था केली असती तर आजपर्यंत हे भेद राहिलेच नसते. परंतु दोन्ही पक्षांतील लोक फार मानी होते. ते तेमानें एकमेकांपासून बुद्धया दूर राहिलें. ही बहिष्काराची मूळ कथा मूळ पक्षांत आणि बहिष्कृत पक्षांत वर्षानुवर्षें वाडवडिलांपासून रूढ आहे; आणि त्यासंबंधाचे अभिप्रायहि मूळ पक्षांतील कांहीं वयोवृद्ध व वजनदार गृहस्थांनीं लिहून ठेविले आहेत. त्याखेरीज ज्या तरूण गृहस्थांनीं ही गोष्ट आपल्या वाडवडिलांपासून ऐकली त्यांनींहि त्याबद्दलचे आपले अभिप्राय लिहून दिले आहेत. बहुतेक अभिप्राय इ.स. १८८१ मध्यें देण्यांत आले. ते पुस्तकरूपानें छापून प्रसिद्ध होऊन त्याच्या प्रती मूळपक्षांतील ब-याच गृहस्थांपाशीं आहेत. मूळ अभिप्रायहि उपलब्ध आहेत. अभिप्राय देणा-यांपैकीं बहुतेक गृहस्थ सद्यःपिढींतल्या स्त्रीपुरुषांचें जनक अथवा आप्त होत. त्यांपैकीं श्री. सदाशिव विवनाथ धुरंधर, कॅप्टन माधवराव, श्री. जगन्नाथ रावजी धुरंधर, श्री. रामचंद्र आत्माराम मानकर, श्री. दिनकर खंडेराव विजयकर, श्री. रामराव नाना गोरक्षकर, श्री. नारायण गणपत कोठारे, श्री. कुंजबिहारी सदाशिव घुरंघर आणि श्री. लक्ष्मण बाळकृष्ण नायक हे गृहस्थ हयात आहेत. प्रभु ज्ञातीचे राजगुरु वे.शा.सं.केशव बळवंत खेडकर हेहि हयात आहेत. त्यानीं व त्यांच्या राजगुरु वंशांतील पूर्वजांनीं बहिष्कृत कुटुंबांतहि ते पूर्ववत् पाठारे प्रभूच आहेत असे मानून आपली वंशपरंपरागत वृत्ति कायम ठेविली आहे. ह्या राजगुरूंनींहि आपला अभिप्राय दिला आहे. अभिप्राय देणा-या गृहस्थांपैकीं श्री. सदानंद विश्वनाथ अजिंक्य, श्री.द्वारकानाथ विश्वनाथ अजिंक्य, श्री. श्रीकृष्ण नारायणजी, श्री. हरिश्चंद्र पुरुषोत्तमजी कीर्तिकर, श्री. नारायण रघुनाथजी नवलकर, श्री. गोपीनाथ रघुनाथजी, श्री. नारायण सदाशिवराव, श्री.नामदेव नारायणजी तळपदे, श्री.शामराव श्रीकृष्णजी, श्री. केशरीनाथ आनंदराव, श्री. विनायकराव रघुनाथजी नवलकर, श्री. बाळकृष्ण मोरोजी, श्री. गणपतराव पांडुरंगजी वेलकर, श्री. नारायण आत्मारामजी, श्री. श्रीकृष्ण सखारामजी आणि श्री. शामराव द्वारकानाथ अजिंक्य हे मयत आहेत. ह्या सर्व गृहस्थांच्या आणि तूर्त हयात असलेल्या गृहस्थांच्या अभिप्रायांचा गोषवारा खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.

(१) कंचोळे प्रभु नांवाची बहिष्कृत मंडळी आणि त्यांचे वंशज हे पाठारे प्रभु आहेत. बहिष्काराचा वृत्तांत आम्हांला आमच्या वाडवडिलांपासून माहीत आहे. बहिष्काराचें कारण अत्यंत क्षुल्लक आहे. अशा क्षुल्लक कारणामुळें ह्या मंडळींनां आज इतकीं वर्षे दूर ठेवण्यांत आलें हा खरोखरी अन्याय होय.

(२) ह्या बहिष्कृत कंचोळे मंडळींस कित्येक लोक धुरुप्रभु असेंहि म्हणतात. परंतु ते आमच्याचपैकीं म्हणजे पाठारे प्रभु होत. बहिष्कृत मंडळींपैकीं कांहीं गृहस्थ वसई येथें जमीनदार होते, व तेथील जमीनदारांस धुरु म्हणण्याची पूर्वी वहिवाट होती. राजगुरु केशव बळवंत यांजपाशीं ब-याच वर्षांपूर्वीच्या बिदागीच्या याद्या आहेत. त्यांपैकीं कांहीं ८०-९० वर्षांच्या जुन्या आहेत. त्यांपैकीं कांहीं याद्या अंताजीपंत, रामाजीपंत, रामचंद्रपंत बाळाजीपंत, लक्ष्मण अनंत वगैरे पूर्वकालीन राजगुरू आणि विद्यमान केशव बळवंत राजगुरु यांच्या स्वदस्तुरच्या आहेत. ह्या याद्या म्हणजे प्रतिवर्षी अथवा लग्नकारणादि विशिष्ट प्रसंगीं राजगुरूंचा सत्कार करण्यांत येऊन पाठारे प्रभुज्ञातिगृहस्थांकडून बिदागी या नांवानें वस्त्रप्रावरणें, दक्षिणा वगैरे नजराणे मिळत असत, त्यांचीं नामवारीं पत्रकें होत. ह्या पत्रकांतून बिदागी देणा-या शेंकडों पाठारे प्रभु गृहस्थांचीं नांवें दृष्टीस पडतात व त्याच पत्रकांतून बहिष्कृत मंडळींच्या पूर्वजांचीहि कांहीं नांवें दिसून येतात. मूळपक्षांतील कांहीं गृहस्थांच्या, तसेंच कांहीं बहिष्कृत पाठारे प्रभूच्या नांवापुढें 'धुरु' ही संज्ञा जोडलेली आहे. त्यावरून मूळपक्षांतील कांहीं गृहस्थांसहि धुरु असें म्हणत असत. एकंदरीनें, 'कंचोळे' ही संज्ञा जातिवाचक नाहीं. त्याप्रमाणें धुरु हीहि संज्ञा जातिवाचक नाहीं. राजगुरु हे फक्त पाठारें प्रभूंचेच राजगुरु होत.

(३) बहिष्कृत मंडळींचीं बहुतेक कुटुंबें नामशेष झालीं आहेत त्यांपैकीं कोटकर (वेलकर), राणे, दळवी, मानकर, कोठारे आणि नवलकर ही कुटुंबें विद्यमान आहेत. त्यांची हल्लींची लोकसंख्या ४८ आहे. कोटकर (पूर्वीचे वेलकर) हें नांव कोट ह्या गांवावरून पडलें आहे.

(४) ह्या कुटुंबांचीं आडनांवें गोत्रे, कुलदेवता आणि प्रवर आणि मूळपक्षांतील कुटुंबांचीं आडनावें, गोत्रें, कुलदेवता आणि प्रवर हीं एकच आहेत.

(५) बहिष्कृत मंडळींच्या शंभर सवाशे वर्षांपर्यंतच्या वंशवेलांतील स्त्रीपुरुषांचीं नावें श्रीक्षेत्र नाशिक क्षेत्रीं आणि इतर हिंदु क्षेत्रांच्या ठिकाणीं तेथील तीर्थोपाध्यांनी अनेक वर्षे लिहून ठेवलेल्या तीर्थास जाणा-या स्त्रीपुरुषांच्या नांवाबरोबर ताडून पाहतां तीं नांवें तंतोतंत जुळून येतात. आणि हीं नांवें तीर्थोपाध्यायांनीं पाताणे प्रभूंसाठीं खास लिहून ठेवलेल्या वह्यांतून आढळून येतात. म्हणजे पूर्वकाळापासून बहिष्कृत मंडळी आणि त्यांचे वंशज हे पाताणे प्रभूच असल्यामुळें त्यांचीं नांवें क्षेत्रस्थानीं मूळपक्षाकरितां लिहिलेल्या वह्यांतूनच लिहिलीं गेलीं आहेत.

(६) ह्या मंडळींच्या पूर्वजांच्या जन्मपत्रिका, जुने खानेसुमारीचे रिपोर्ट, जुने ग्रंथ, वंशवेल, जन्ममृत्युनोंद, स्थावर मिळकतीसंबंधींचीं कागदपत्रें वगैरे अनेक पुराव्यांवरून ही बहिष्कृत मंडळी 'कंचोळे' प्रभु म्हणून भिन्न जात नसून ते पाठारे प्रभूच आहेत असें सिद्ध होतें.

(७) बहिष्कृतांचें लग्नसंबंध त्यांच्या कुटुंबांतूनच झाले आहेत. परजातीबरोबर त्यांनीं शरीरसंबंध केले नाहींत. त्यामुळें त्यांनीं आपल्या रक्ताची शुद्धता निष्कलंक ठेविली आहे. वर्णसंकर झालेला नाहीं. फक्त अलीकडे दहापंधरा वर्षांत एकदोन इसमांनीं परज्ञातीय स्त्रियांबरोबर शरीरसंबंध केल्याचें कळून आल्याबरोबर त्यांवर 'कंचोळे' प्रभूंनीं बहिष्कार घातला आहे. हे इसम हल्लीं कोठें आहेत तें माहीत नाहीं आणि त्यांची संततीहि कांहीं असल्याची बातमी नाहीं.

(८) कंचोळे प्रभूंचे आचारविचार, आहारपेहराव, धर्मविधी, विवाहादि चालीरीती आणि इतर सामाजिक व धार्मिक व्यवहार हे सर्व मूळपक्षाच्या आचार विचार इत्यादि सर्व चालीरीतींस पूर्ण अनुसरून आहेत. त्यांनीं कोणत्याहिं बाबतींत आपल्या पाठारे अथवा पाताणे पूर्वजांच्या आचारविचारपरंपरेचें बिलकूल उल्लंघन केलेलें नाहीं.

(९) बहिष्कृत कंचोळे प्रभूंची अनेक वर्षे मूळ पक्षांतील सजातीय लोकांबरोबर पुणें, ठाणें, वसई, साष्टी वगैरे प्रांतांत आणि मुंबईच्या आसपासच्या भागांत वस्ती असे. हल्लीं त्यांची वस्ती पुणें आणि सिकंदराबाद येथें आहे. ह्या निरनिराळ्या ठिकाणीं मूळ पक्षांतील स्त्रीपुरुषांबरोबर त्यांचा अन्नोदकव्यवहार आज कित्येक वर्षें चालू आहे.

(१०) मूळपक्षांतील लोकांबरोबर बेटीव्यवहार बरीच वर्षे बंद होतां. त्यामुळें ह्या अल्पसंख्याक बहिष्कृत मंडळींचे शरीरसंबंध आपापसांतच होत गेले. परंतु कुटुंबें थोडी असल्यामुळें पुढें आपापसांतहि शरीरसंबंध होणें बंद पडून हीं कुटुंबें हळू हळू क्षीण होत गेलीं त्यांपैकीं बरीच कुटुंबें आतां नामशेष झालीं आहेत. बाकी राहिलेल्या कुटुंबांतूनहि शरीरसंबंधाचीं अशक्यता तीव्र वाटूं लागल्यामुळें स. १८८१ पासून मूळपक्षांत सामील होण्याबद्दल ह्या मंडळींनीं तीन चारदां प्रयत्न केले परंतु त्यांस त्यांत काहीं कारणांमुळें अद्यापि यश आलें नाहीं.

(११) बहिष्कृतांशीं बेटीव्यवहार करणें ही गोष्ट जरी मूळपक्षांतील सर्व लोकांस आजतागाईत मान्य नाहीं, तरीहि गेल्या पंधरावीस वर्षांत मूळपक्षांतील कांहीं समंजस व वयोवृद्ध गृहस्थांच्या मध्यस्थीनें आणि मदतीनें मूळपक्ष आणि बहिष्कृत पक्ष यांच्यामध्यें सात आठ लग्नसंबंध घडून आले आहेत.

(१२) बहिष्कृत मंडळींचे बहुतेक पूर्वज कमिसेरिअट खातें, मिलटरी खातें, सिव्हिल खाते, रेल्वे कंपनी आणि इतर मोठमोठ्या सरकारी कचे-यांतून नोकरी करीत होते. त्यांचे हल्लींचे वंशजहि अशाच प्रकारच्या कामांवर आहेत. सर्व स्त्रीपुरुष सुशिक्षित आहेत. त्यांच्या कांहीं पूर्वजांनीं न्यायधिशांचींहि कामें केलीं आहेत. त्यांचीं आर्थिक स्थिति साधारण प्रकारची आहे. त्यांच्या पूर्वजांच्या ठाणें, कल्याण, मुंबई व वसई मुक्कामीं स्थावर मिळकती होत्या व हल्लीं देखील त्यांपैकीं कांहीं गृहस्थांच्या खडकीं व पुणें येथें स्थावर मिळकती आहेत.

पाठारे प्रभूंची माहिती मागें दिली आहेच. बहिष्कृत कंचोळे प्रभूंचे पूर्वज व मूळपक्षांतील पाठारे प्रभूंचे पूर्वज हे मूळ एकच असल्यामुळें बहिष्कृतांच्या पूर्वजांविषयीं अधिक सविस्तर माहिती देण्याची आवश्यकता राहिली नाहीं कारण, कंचोळे नांवाचे बहिष्कृत पाठारे प्रभु आणि मूळपक्षाचे पाठारे प्रभु हे दोन्ही पक्ष मिळून एकच ज्ञाति होय हें मी आज ७।८ वर्षे अत्यंत श्रमपूर्वक केलेल्या संशोधनावरून आणि अनेक पुरावे, वंशवेल आणि साधनें पाहून स्वतःच्या खात्रीनें सांगत आहे. (लेखक पाठारेप्रभु लक्ष्मण बाळकृष्ण नायक, मुंबई).

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .