विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें
पद्मनाभपुरम्- मद्रास इलाख्यांतील त्रावणकोर संस्थानाच्या कलकुलम तालुक्यांतील एक गांव. हें त्रिवेंद्रमपासून ३२ मैल दूर आहे. लोकसंख्या सुमारें तीन हजार आहे. हें गांव अगदीं प्राचीन काळीं त्रावणकोरची राजधानी होती. गांवाभोवतीं मोडकळीस आलेला तट आहे. येथील 'महाराजांचा वाडा' फार उत्तमपैकीं बांधलेला आहे. हें पद्मनाभपुरम् जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे.