प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें 
 
पशुवैद्यक- पशुवैद्यकशास्त्र म्हणजे ज्या शास्त्रामध्यें पशूंच्या रोगांचें निदान व त्या रोगांची चिकित्सा म्हणजे त्यांवर औषधयोजना यांसंबंधीं विचार केला जातो तें शास्त्र. याच शास्त्रास संस्कृतांत शालिहोत्र असें म्हणतात. पशु हा शब्द फार व्यापक असून त्यामध्यें सर्व चतुष्पाद प्राण्यांचा समावेश होतो. हें शास्त्र अद्याप बरेंच बाल्यावस्थेंत आहे तरी मनुष्याच्या सुखसोईसाठीं म्हणून जे प्राणी निर्माण केले आहेत त्यांच्यासंबंधी शास्त्रज्ञ लोकांनीं बरीच मेहनत घेतली असून अद्यापहि प्रत्यहीं घेत आहेत. जरी या शास्त्रामध्यें अद्यापि पुष्कळ सुधारणा व्हावयाची आहे तरी पण आजपर्यंत झालेल्या शोधांवरून आपला ज्या जनावरांशीं नित्य संबंध आहे अशा जनावरांच्या रोगांची व त्यांवरील उपचारांची बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. आज जी माहिती मिळाली आहे तीवरून असें दिसून येतें कीं मनुष्यप्राण्याला होणारे बहुतेल सर्व रोग इतर प्राणिमात्रांनां होतात, एवढेंच नव्हे तर कितीएक रोग असे आहेत कीं त्यांवर उपाय योजणें हें मनुष्यमात्राच्या सुखसोईला अवश्य होऊन बसलें आहे. हिंदुस्थान देश हा शेतीवर अवलंबून आहे व जनावरांशिवाय शेती करणें अशक्य आहे.

जनावरांच्या रोगांचे मुख्यत: दोन प्रकार करतां येतील. ते प्रकार म्हणजे सांसर्गिक सांथीचे रोग आणि दुसरे इतर सर्व रोग. हिंदुस्थानांत गुरांचे सांसर्गिक रोग जे पाहण्यांत येतात ते येणेंप्रमाणे:- लाळ अथवा खुरकूत, डरंगळ्या अथवा देवी, फर्‍या, फांशी व घटसर्प. घोडयांमध्यें आढळणारे सांसर्गिक रोग असतात ते:- शेंबा अथवा गर (ग्लँडर आणि फांशी), सांसर्गिक वेलीरोग (लिंफॅगिटिस एपिझूटिक), गर्मी (डूराइन), सरा, शिंगाडा (स्‍ट्रॅंग्लर). कुत्र्यामध्यें डिसटेंपर, व पिसाळणें (रॅबिज). शेतकरी व इतर लोकांनां सांथीच्या रोगांसंबंधीं थोडीशी माहिती असणें फार अवश्य आहे. ती थोडक्यांत खालीं देत आहों.

लाळ अथवा खुरकूत.- हा रोग लहानमोठया गाई म्हशी, शेळ्या, मेंढरें यांनां होतो. यांत ताप, लाळ गळणें, तोंडांत व जिभेवर चट्टे पडणें; शिंगें व खूर गरम होणें; व पायांच्या दोन्ही नख्यांमधील जागेंत फोड येऊन फुटणें व जनावर लंगडूं लागणें वगैरे रोग होतात. या रोगांत शेंकडा एक दोन जनावरें मरतात. उपचार करणें असल्यास तोंडांतील चट्टे तुरटीच्या अगर टांकणखाराच्या पाण्यानें दिवसांतून दोन चार वेळ धुवावेत. जनावराच्या नख्यांमधील जागा मिठाच्या कोंबट पाण्यानें धुवून काढावी; तापावर काढेचिराइताचा काढा पोटांत द्यावा. गुरांचे पाय नीट स्वच्छ धुतले नाहींत तर जखमांमध्यें किडे पडतात व जनावर जायबंद होतें अशा वेळीं फिनाईलच्या पाण्यानें पाय धुवून काढावेत व नंतर डांबर व मोरचूत यांचे मिश्रण वर लावावें. वरील उपचार पांच सहा दिवस काळजीपूर्वक केल्यास जनावर बरें होतें जनावरास खाण्यास नरम व ओलें गवत, कोथिंबीर, विलायती गवत, तांदळाची पेज, ज्वारीच्या अगर बाजरीच्या पिठाची कांजी हीं ताकद वाढण्याकरितां दिलीं पाहिजेत. या रोगानें आजारी असलेल्या जनावराचें दूध तापवून प्यावें व तें लहान मुलांनां मुळींच देऊं नये.

डरंगळ्या अथवा देवी (रिंडरपेस्ट)- हा रोग बराच धातुक आहे. यांत शेंकडा ५० जनावरें मरतात. हा रोग गाई, म्हशी व शेळ्यामेंढयांनां होतो. रोगाची मुदत नऊ दिवस असते. निगा नीट राखली तर जनावर सहसा न दगावतां नऊ दिवसांनीं बरें होतें. या रोगांत ताप येतो, डोळ्यांतून पू व पाणी येतें, डोळे लाल होतात, जनावराला जुलाब होतात, शेणामध्यें रक्त अथवा शेंब व केव्हां केव्हां आंतडयाच्या आंतील त्वचा पडते, जनावर लाळ गाळतें, ओंठाच्या आंतील बाजूस टांचणीच्या डोक्याएवढीं बारीक छिद्रें पडतात, नाकांतून शेंबूड येत असतो व केव्हां केव्हां तर अंगावर चोंहोंकडे देवीसारखे फोड येतात. गाभणी जनावरें गाभ टाकतात व दुभत्या जनावरांचें दूध एकदम नाहीसें होतें. औषधोपचार करणें तो तुरटीच्या अगर टांकणखाराच्या पाण्यानें तोंड रोज चार वेळ स्वच्छ धुवून टाकावें, नाक, डोळे, ढुंगण स्वच्छ ठेवावें, पोटांत काडेचिराईताचा काढा द्यावा, ताक अथवा चिंचेचा कोळ पाजावा व काताची पूड जुलाब थांबण्याकरितां द्यावी. वारंवार कांजी पाजीत असावें. इतर जनावरांनां रोग होऊं नये म्हणून त्यान जनावरांच्या डॉक्टरांकडून देवी (इनॅक्युलेशन) काढवून घ्याव्या त्यांपासून जनावरांनां कोणताहि अपाय होत नसून त्यांचें रोगापासून सरंक्षण होतें.

फर्‍या.- हा रोग वयानें लहान व सशक्त अशा गुरांनां होतो. हा रोग फार घातुक असून या रोगानें पछाडलेलें जनावर फारच लवकर म्हणजे एक दोन दिवसांत मरतें. यांत ताप येतो, जनावर सुस्त होतें, लंगडूं लागतें, अंगावर बहुतकरून मागील पायाच्या मांडीवर सूज येते व ती हात लावून पाहिली असतां गार लागते व दाबली असतां आंत पोकळ असून हवा असल्यामुळें चरचर वाजते. जनावर एका बाजूस खालीं मान घालून उभें राहतें किंवा जमिनीवर पडून रहातें. या सांथीत मृत्युसंख्या शेंकडा ९५ पर्यंत असते. हा रोग म्हशींनी फार थोडया प्रमाणांत होतो. या रोगावर अद्याप खात्रीलायक उपाय सांपडला नाहीं तर हा रोग ठराविक ऋतूंमध्यें व ठराविक जागेंत होतो असें अनुभवाने ठरल्यास रोग सुरू होण्याच्या पूर्वी एक महिनाभर गुरांच्या डॉक्टरांकडून देवी काढविल्यास रोग त्या सालीं होत नाहीं असें आढळून आलें आहे.

फांशी (अ‍ॅथ्रॅक्स).- हा रोग सर्व प्राण्यांनां व मनुष्यमात्राला सुद्धां होतो. परंतु हा हिंदुस्थानांत फार मोठया प्रमाणांत कधींहि होत नाहीं. हा फारच घातक असतो. यानें शेंकडा ९९ जनावरें मरतात. यांत ताप येतो; शरीरावर कोठेंहि सूज येते, पोटांत दुखतें, सूज कठिण, गरम असून दुखत असते. बहुतकरून औषधोपचार करण्यापूर्वीच जनावर मरतें. रोगप्रतिबंधक लस टोंचून घेतली असतां जनावरांचा बचाव होतो.

घटसर्प (हिमरेज सेप्टिकॅमिआ).- हा रोग बहुतकरून म्हशी व रेडे यांनां फार होतो. तो गाईबैलांनां सुद्धां होतो. मृत्यूचें प्रमाण शेंकडा ९० पर्यंत असतें. या रोगांत ताप येतो. घशाखालीं अगर नरडीवर सूज येते. जनावर लाळ गाळतें, जीभ सुजून बाहेर लोंबू लागते, खाणेंपिणें बंद होतें व श्वासोच्छ्वास करतां येत नाहीं, तेणेंकरून जनावर गुदमरून मरतें. या रोगावर खात्रीलायक असा उपाय नाहीं. रोगप्रतिबंधक लस टोंचल्यानें फायदा होतो.

या सर्व रोगांमध्यें रोगाचा प्रसार होऊं नये म्हणून रोगी जनावरें निराळीं बांधावींत. रोगी व निरोगी जनावरांनां एके ठिकाणी अगर एका भांडयांत पाणी पाजूं नये रोगी जनावरांचें मलमूत्र व त्यांच्या पुढील चारावैरण सर्व जाळून टाकावी. मेलेलीं जनावरें न फाडतां सबंध पुरून टाकावींत. हे सर्व रोग विषारी जीवजंतूंपासून उत्पन्न होतात तेव्हां जंतुनाशक औषधें पोटांत द्यावींत. रोगी जनावरांचे दूध उपयोगांत आणूं नये मांस सुद्धां अपायकारक असतें सबब तेंहि वर्ज्य करावें.

शेंबा अथवा वागर (ग्लँडर्स व फारी).- हा रोग घोडे, खेंचरें यांमध्यें होतो. हा सर्व प्राण्यांनां व मनुष्यांनां सुद्धां होतो. यामध्यें खालच्या जबडयाच्या हाडावर कठिण गांठ येते. नाकांतून चिकट शेंबूड तारेसारखा लोंबत राहतो. नाकपुडयांच्या मधील पडद्यावर व्रण पडतात, पाय सुजतात, पायांवर जागोजागीं गांठीं येतात व त्या फुटतात. हा रोग असाध्य आहे. सरकारी कायद्याप्रमाणें ह्या रोगाचें जनावर मारून टाकावें लागतें.

सांसर्गिक वेलीरोग (लिंफॅगिटिस एपिझूटिका).- हा रोग घोडे, खेंचरें, गांढवें यांना होतो. याचा प्रसार फार नसतो. रोगाचा प्रसार होऊं नये म्हणून कायद्यानें या रोगाचे घोडे मारावे लागतात.

गर्मी (डूराइन).- मनुष्याच्या विकाराप्रमाणें हा रोग असून तो वळू घोडयांत आढळतो. हिंदुस्थानांत हा फारसा आढळत नाहीं,

सरा.- या रोगानें घोडा सहा सहा महिने तापाच्या पाळ्या येऊन आजारी पडतो, पायांवर, पोटाखालीं व छातीखालीं सूज येते, डोळ्यांच्या आंतील त्वचेवर तांबडे व जांभळे चट्टे दिसतात. जनावर अशक्त व सुस्त असतें. त्याचें रक्त तपासलें असतां त्यांत सूक्ष्म जंतू दिसतात. याला खात्रीलायक औषध नाहीं. रोगाचा प्रसार होऊं नये म्हणून घोडे मारावे लागतात. कांहीं ठिकाणीं यांसंबंधी कायदा आहे.

शिंगाडा (स्ट्रँगल्स).- गळ्याखालील जागेमध्यें अगर कानशिलाच्या बाजूस गांठ येऊन सूज येते, घोडयास ताप व नाकांतून शेंबूड येतो. सरदी होते. खोंकला होतो, गांठ पिकल्यावर फोडून टाकावी व स्वच्छ धुवून औषधोपचार करावा. बहुतकरून हा रोग वयानें लहान अशा शिंगरांनां फार होतो.

डिस्टेंपर.- हा रोग पाळींव कुत्र्यांनां होतो; त्यांनां ताप येतो, हगवण लागते, पोटावर फोड येतात, खोकला येतो, शेंबूड येतो, डोळे चिकटतात व त्यांतून पू येतो. हा रोग औषधोपचारानें बरा होण्यासारखा आहे.

पिसाळणें (वेड).- पिसाळलेला कुत्रा जगत नाहीं; परंतु त्याच्या दंशामुळें दुसरी जनावरें व माणसें यांनां धोका असल्यानें अशा रोगाचें कुत्रें मारून टाकावे. पिसाळलेलें कुत्रे थंड जागेंत आणि अंधेरांत बसतें, विनाकारण भुंकत असतें, आवाज घोगरा येतो, कुत्रें लाळ गाळतें, जीभ लोंबत असते व पायांमध्ये शेंपूट घालून सरळ रेघेंत मागेंपुढें न पाहतां पुढें असेल त्याला चावीत पळत जात असतें. पिसाळलेल्या कुत्र्यावर लस टोंचण्याची सोय हल्लीं बर्‍याच जिल्ह्यांच्या ठिकाणच्या दवाखान्यांत करण्यांत आली आहे.

जनावरांच्या सांथींच्या रोगाच्या खालोखाल महत्त्वाचे बिनसांथीचे जे कांहीं रोग आहेत, त्यांमध्यें जनावरांच्या पायांनां होणार्‍या रोगांचा प्रथमत: विचार होणें जरूर आहे. कारण, जनावराचे पाय जर कांहीं कारणानें अधू होतील तर तें जनावर कामास निरुपयोगी होईल. पायांनां होणारे, ज्यामुळें जनावर लंगडूं लागतें ते, बहुतेक सर्व विकार जनावरांची नीट निगा राखल्यास टाळतां येण्यासारखे आहेत. उदाहरणार्थ:- हाड किंवा सांधा निखळणें किंवा मोडणें. निष्काळजीपणानें जनावर पडल्यास किंवा मारहाण केल्यानें अशा तर्‍हेच्या इजा होतात. दुसरे कांही विकार म्हणजे हड्डी वाढणें हे होत. ह्यामध्यें बेरहड्डी, मुतरा, चक्राबळ वगैरे घोडयांनां होणार्‍या रोगांचा समावेश होतो. लचक ही सांध्यामध्यें (स्नायूमध्यें) अथवा नसेमध्यें होऊं शकते. पाय उगाळल्यामुळें (तापलेल्या खडकाळ रस्त्यावरून जनावरांची पुष्कळ चाल झाल्यामुळें) किंवा गोठयांत अगर तबेल्यांत घाण सांचून ती जनावरांच्या पायांच्या गेळ्यांत (पुतळींत) राहूं दिल्यानें तो भाग सडून किडे पडतात त्यामुळें जनावरें लंगडूं लागतात. नालबंदीच्या वेळेस सुंभ फार कापल्यानें किंवा मेखा वर्मी लागल्यानें जनावर लंगडूं लागतें. उपचार करण्यापूर्वी रोगाचें निदान खात्रीलायक झालें पाहिजे. वरपासून खालपर्यंत पाय नीट तपासून पहावा. ज्या पायाच्या भागांत इजा किंवा लंगडण्याचें निमित्त असेल तो भाग किंचित गरम व लाल झालेला दिसेल, दाबलें असतां दुखेल व कदाचित तेथें सूजहि येऊं शकेल. ज्या कारणानें जनावर लंगडतें तें कारण शोधून काढल्याशिवाय उपचार करण्याच्या भानगडींत पडूं नये, व उपचार करणें असल्यास ज्या भागांत इजा आढळून येईल त्या भागापुरताच उपचार करावा. नाहींतर अडाणी लोक फर्‍यापासून खालीं सुंभापर्यंत सर्व पाय चीक घालून किंवा डागून किंवा इतर औषधोपचार करून सुजवतात त्यामुळें जनावरांनां फायदा होण्याच्या ऐवजीं विनाकारण त्रास मात्र होतो व अशा उपचारापासून कांहीं एक उपयोग होत नाहीं. साधारणपणें उपचार करणें ते नाल काढून टाकावा व सुंभांमध्यें विकार झाला असल्यास सर्व सुंभ स्वच्छ धुवून काढावेत. कुचका-नासका भाग कापून काढावा. पोटीस (भुस्साचें) बांधावें. लचक किंवा हाड वाढलें असल्यास पलिस्तर किंवा डाग द्यावेत. नसा, स्नायू वगैरेंमध्यें लचक भरली असल्यास शेकण्यानें (गरम पाण्याच्या वाफेनें) किंवा थंड पाण्याची सारखी धार धरल्यानें, मालिश केल्यानें, किंवा टरपेन तेल, मोहरीचें तेल, खोबरेल तेल वगैरे लावल्यानें लचक बरी होते.

जनावरांनां कोणत्याहि कारणानें जखम झाल्यास त्या जखमेवर माशा बसून अंडी घालतात व पुढें किडे पडतात त्यामुळें जनावरांनां चैन पडत नाहीं, जखमेला सूज येते, रक्त वाहूं लागतें व बाजूच्या भागास इजा होते. अशा वेळीं जखमा, फिनाइल मिश्र पाणी करून किंवा मिठाचें पाणी करून त्यानें स्वच्छ धुवून काढाव्यात. सडका भाग काढून टाकावा, किडे चिमटयानें काढावेत, जखमेभोंवतालची जागा स्वच्छ ठेवावी. रक्त वाहात असल्यास रक्तस्त्राव बंद होईतों बोटानें रक्तवाहिन्यांचीं तोंडें थोडा वेळ दाबून धरावीतं. जखमेंतील पू व पाण्याचा निचरा झाला म्हणजे अर्धें काम झाले असें समजावे. किडे मारण्याकरितां कापूर एक भाग, टरपेन तेल दोन भाग व गोडें तेल चार भाग यांचें मिश्रण करून कापसाचा बोळा जखमेंत बसवावा. दोन चार दिवस असें केल्यानें किडे तेव्हांच मरतील. जनावरांच्या अंगावर किंवा पायांत असलेली जखम केव्हांहि उघडी टाकूं नये, कारण मनुष्यांप्रमाणें जनावरांनांहि-विशेषत: घोडयांनां-चांदणी (टिटॅनस) हा रोग जखमेंतून त्या रोगाचे जंतू जाऊन होतो. घोडयांनां बरसात म्हणून एक प्रकारचा वनस्पतिजन्य अशा, डोळ्याखाली, गालावर, पायाच्या सांध्यावर जखमी होतात; त्या जखमांमध्यें पेरूच्या बियांसारखा एक कठिण पदार्थ सांपडतो. ते सर्व नाहीसें होईपर्यंत जखम बरी होत नाहीं व चरत जाते. या रोगास पावसाळ्याच्या आरंभी सुरवात होते व तो सहा महिनेपर्यंत सुद्धां बरा होत नाहीं. ही जखम मोरचुताचा खडा रोज लावीत राहिल्यास लवकर बरी होते.

जनावरांच्या शरीरावरील कातडीला होणारे सर्व रोग मनुष्यांमध्यें होणार्‍या रोगांप्रमाणें असतात. उदाहरणार्थ:- गजकर्ण, नायटे, इसब, खरूज वगैरे. ह्या सर्व रोगांमध्ये विकार झालेली जागा गरम पाणी व साबू यांनी साफ धुवून काढून कोरडी करावी. केंसाळ भाग असल्यास केंस कापून काढावे, व शुद्ध केलेला गंधक एक भाग, डांबराचें तेल दोन भाग व गोडें तेल चार भाग हीं एकत्र करून चोळून लावावी व प्रत्येक चार दिवसांनीं असेंच करावें. जनावरांकरितां उपयोगांत आणलेले जिन्नस, उदा. हातळी, झूल, ब्रश वगैरे स्वच्छ कढत पाण्यांत उकळून काढावे. कारण या रोगांचे जंतू फार सूक्ष्‍म असून त्‍यांपासून रोगाच प्रसार होतो.

जनावरांच्या अंगावर गोचिडया, सुळे, उवा वगैरे प्राणी आपलें उपजीवन करून जनावरांचें रक्त शोषण करितात व त्यामुळें त्यांच्या विषारी दंशामुळें नाना तर्‍हेचे रोग होतात; अशा रोगांचे शोध लागत आहेत. गोचिडया, सुळे यांच्यामुळें दरसाल कितीएक जनावरें मरतात. हे प्राणी दिसण्यांत, जरी लहान असले तरी त्यांच्याकडून अपाय फार होतो. तेव्हां त्यांचा नायनाट केल्यानें जनावरांनां सुख लागून देशाचाहि फायदा होतो.  गोचिडयांची वाढ फार जलद व पुष्कळ होते. त्यांच्यामध्यें नर व मादी असते. त्यांचा नायनाट करावयाचा म्हणजे त्यांच्या माद्या शोधून काढून त्या मारून टाकल्या पाहिजेत. हे प्राणी फिनाईलचें पाणी, तंबाखूचें पाणी, तपकीर, कडू तेल वगैरे चोळल्यानें खालीं पडतात. परंतु मरत नाहींत. नुसतें अंगावरून खालीं पाडल्यानें काम भागत नाहीं. त्यांनां, तर जाळूनच टाकलें पाहिजे. मादी साधारणपणें दिसण्यांत मोठी, रंग काळसर तांबूस, पोट मोठें, चालण्यांत सुस्त अशी असते.

जनावर प्रथमत: कामास लावल्यास त्याचा खांदा व घोडयाची छाती सुजते किंवा पावसाळ्याच्या आरंभीं बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर एकदम आउताच्या कामास जनावर लावल्यानें खांदा सुजतो, जनावराला खालीं मान करून पाणी पितां येत नाहीं, किंवा चारा खातां येत नाहीं, व सुजलेला भाग दुखतो व कढत लागतो. अशा वेळीं जनावरांस काम न देतां मान शेकून काढावी; ती काव व खोबरेल तेल एकत्र करून मर्दून काढावी. मानेवर जूं अगर आऊत ठेवण्याच्या जागी लहानमोठया गांठी येतात. केव्हां केव्हां गळवें होतात किंवा नुसते चट्टेहि पडतात. मोठया शहरांमध्यें गुरांनां असे चट्टे कायमचे पडून खांदा ओबडधोबड, जाड व गलिच्छ राहतो. गळवांमध्यें पू, पाणी किंवा नासकें रक्त असतें. यावर वेळींच शस्त्रक्रिया करून घेतल्यास पुष्कळ उपयोग होतो.

जनावरें एकमेकांशीं झुंजतांना (लढतांना) किंवा खालीं पाडलीं जातांना किंवा कोठें तरी अडकून त्यांच्या शिंगाचें कवच निघून येतें व आंतील गाभा लालभडक व रक्तबंबाळ होतो; अशा वेळीं गाभा स्वच्छ धुवून काढून तेलांत चिंधी भिजवून ती गाभ्याच्या भोंवतीं गुंडाळावी व वर दुसरें फडकें बांधावें. केव्हां केव्हां शिंग आडवें मोडून पडतें, रक्तस्त्राव फार होतो; तेव्हां करवतीनें शिंगाचा मोडका भाग सरळ कापून त्यावर राळेची पूड लावून तर तापलेल्या उलथण्यानें चरका द्यावा म्हणजे रक्त बंद होऊन राळेच्या योगानें शिंगाचें मोडकें टोंक उघडें पडत नाहीं.  नंतर दोन दोन किंवा चार चार दिवसांनीं शिंग स्वच्छ धुवून काढून त्यावर डांबरामध्यें सण बुडवून बसवीत जावा.

भिरड.- या नांवाचा आणखी एक विकार शिंगांनां होतो. त्यामध्यें शिंगाला आंतून कीड लागून आंतील भाग सडतो, शिंग हळू हळू वांकडें होऊं लागतें, मुळाशीं हलूं लागतें व कांहीं दिवसांनीं गळून पडतें. शिंग गळून पडल्यानंतर जनावर बरें न होतां खंगत जाऊन मरते. शिंगाला अतिशय घाण येते. यावर अद्याप खात्रीलायक उपाय सांपडला नाहीं. शिंग वांकडें होऊं लागलें आहे असें दिसून येतांच तें मुळांत कापून काढावें व उपचार करावा म्हणजे बरें होण्याचा संभव असतो.

जनावरांच्या कानांत मळ फार झाल्याकारणानें त्यांचे कान ठणकूं लागतात, कानांतून पू वाहूं लागतो व मान बाजूला कललेली असते. कानांत कोमट पाण्याच्या पिचकार्‍या मारून कान आंतून धुऊन काढावा. तुरटीची लाही करून तिची वस्त्रगाळ पूड कानांत फुंकून घालावी.

मोटेच्या व आउताच्या कामाच्या बैलांच्या कानांनां दोरीचा घट्ट वळसा घातल्यानें कान निर्जीव होतो व वांकून खालीं गळलेला दिसतो. रंवथ करून करून अगर चर्वणानें जनावरांच्या दाढांनां धार येते, त्यामुळें तोंडांतून फेंस गळतो, गालांत घांस राहतो व अर्धवट चावलेला चारा बाहेर पडतो. यास दाढांची धार घांसून काढली म्हणजे गुण येतो.

केव्हां केव्हां जनावरांच्या टक्करीमध्यें नसेला झालेल्या इजेमुळें डोक्यापासून तोंडापर्यंत एक बाजू लुली पडते, त्या बाजूच्या गालांत घांस रहातो, डोळा बारीक दिसतो, कान गलित दिसतो व जनावर अर्धांगवायु झाल्याप्रमाणें दिसतें.

जनावरांच्या जिभला, ओंठाच्या आंतील बाजूस, गालफडांत, जिभेखालीं, टाळ्यावर किंवा पडजिभेला कांहीं इजा झाल्यास तोंड गरम लागतें, तोंडातून लाळ अगर फेंस येतो, जनावराला खातां येत नाहीं, व ढांस लागते. अशा वेळीं तुरटी अथवा टांकणखार व बाभळीच्या सालीच्या पाण्यानें तोंड धुवून काढावें. केव्हां केव्हां कणसाचा बुडखा, कडब्याचें बाटूक, आंब्याची कोय किंवा असाच एखादा पदार्थ नरडींत अडवला म्हणजे जनावराचा जीव घाबरा होतो, डोळे तारवटलेले असतात. जनावर ऊठबस करतें, पोट फुगतें व उपचार वेळेवर न केल्यास जनावर गुदमरून मरून जातें. अशा वेळीं तोंड नीट उघडून पहावें. कांही पदार्थ अडकलेला असल्यास तो त्वरित काढून टाकावा व काढून टाकणे शक्य नसल्यास वारंवार गोडया तेलाचे घोट देऊन तोंडांतील पदार्थ हळू हळू चोळून पोटाकडे हातानें ढकलावा.

जनावराच्या जबडयाच्या हाडाला एखादी कठिण गांठ येते व ती बरीच मोठी होते. केव्हां केव्हां तीत पू होतो, त्याला मांजरी असें म्हणतात. कधीं सगळी जीभ लांकडासारखी कठिण होते, ती वळत नाहीं अशा वेळेला जनावराला खातां न आल्यामुळें जनावर अशक्त व रोड होतें. पालाशअदिद (पोटॅशिअम आयोडाइड) नांवाचें इंग्रजी औषध देत राहिल्यास आठ पंधरा दिवसांत गुण येऊन जीभ नरम होऊन जनावर नेहमींप्रमाणें खाऊं लागतें. डोळ्याला होणारे विकार म्हणजे खुगर्‍या, बडस, मोतीबिंदु वगैरे होत. या रोगांवर माणसांनां उपयोगीं पडणारीं औषधें जनावरांनां उपयोगी पडतात.

जनावरांना पचनेंद्रियाचे रोग मोठया प्रमाणांत होतात. अजीर्ण, जुलाब, आंव, पोटदुखी, पोटफुगी वगैरे नेहमीं दिसून येतात. यांतील बहुतेक विकार खाण्यापिण्याच्या हयगयीमुळें होतात. पोटफुगीपासून मृत्यूहि येतात. डाव्या बाजूची कूस फुगलेली दिसते. आंत हवा भरलेली असते. जनावर ऊठबस करतें, वारंवार थोडी थोडी लघवी होते; पाय ताणतें व वेळेवर उपचार न झाल्यास जनावर मरतें. त्याच्यावर तात्कालिक व सोपा उपाय म्हणजे अर्धा ते एक तोळा हिंग, दोन ते चार तोळे टरपेन तेल व अर्धाशेर गोडें तेल एकत्र करून द्यावें, जनावर फिरतें ठेवावें, व पोट उतरल्यानंतर दोन तासांनी पाणी व वैरण घालावी. दुसर्‍या दिवशीं एखादें जुलाबाचें औषध द्यावें. अगदीं आणीबाणीच्या प्रसंगी औषध मिळालें नाहीं व पोट अतिशय फुगलें आहे असें दिसून आल्यास एक जाड खिळा लाल तापवून डावी कूस जेथें फार फुगलेली असेल त्या फुगेच्या मध्यावर त्या खिळ्यानें भोंक पाडावें म्हणजे आतील हवा निघून जाऊन जनावर ताबडतोब बरें होतें. खिळ्यानें पाडलेलें भोंक औषधोपचारानें भरून येतें. शाळूचें पीक अगदीं कोवळेपणीं जनावरानें खाल्ल्यास त्यांत असलेल्या विषापासून (अ‍ॅसिड हायड्रोसिअन) जनावर ताबडतोब मरतें व त्याला किरळ लागलें असें म्हणतात. पीक खातां न येईल असें मुसकें घातल्यास जनावरांनां असे अपघात कमी होतील.

घोडयाचा पोटदुखी हा रोग फार घातुक असतो. रोगाचें निदान झाल्याशिवाय औषध नीट लागू पडत नाहीं. घोडयाच्या पोटदुखीला साधारणपणें कुरकुरी म्हणतात. काळीज, प्लिहा वगैरे पोटांतील रोग फार थोडया प्रमाणांत होतात व त्यांची चिकित्सा करणें फार कठिण असतें. घोडयांनां कावीळ होते; तिचीं चिन्हें माणसाला होणार्‍या काविळीसारखीं असतात. लघवी पिवळी व लाल होते, लीद पांढरी असते, डोळे, नाक व तोंड यांची आंतील त्वचा पिवळी दिसते, भूक मंद होते, किंचित ताप असतो, व काळजाच्या जागेवर दाबलें असतां दुखतें.

गाईम्हशींच्या व मेंढयांच्या काळजांत किडे पडतात. त्याचीं चिन्हें-जबडयाखालीं धांवरें येतें, परसाकडेस पातळ व काळे होतें, त्यास घाण येते व कितीहि उपचार केले जरी गुण येण्याचा संभव नसतो. मुबलक मीठ खाण्यास दिल्यास यावर उपयोग होऊं शकेल. माणसाप्रमाणें जनावरांना विशेषत: पित्त अंगावर उसळतें, अंगाला कंड सुटून गोधडीसारखे ओबडधोबड चट्टे पडतात व थोडया वेळानें मावळतात. जनावरांनां त्यांच्या पोटांत व आंतडयांत निरनिराळ जंत होतात. ते वाटोळे, लांब, बारीक सुतासारखे, चपटे, व नाडीसारखे असतात. विशेषत: लहान वासरें व घोडे यानां वाटोळे लांब जंत होतात. टरपेन तेल, हिंग, सँटोनाईन पोटांत दिल्याने गुण येतो. बारीक सुतासारखे जंत बहुधां घोडयांनां फार होतात. जुलाबाचें औषध पोटांत देऊन टरपेन तेल अगर मीठ यांच्या पाण्याचा बस्ती दिल्यास गुण येतो. चपटे नाडीसारखे जंत कुत्र्यांना बर्‍याच मोठया प्रमाणात होतात. त्यांच्यावर चिकणी सुपारी उगाळून देतात. जनावरांनां पुष्कळ वेळां अवरोध होतो. साबणाच्या पाण्याचा बस्ती दिल्यास तात्पुरता गुण येतो.

फुप्फुसांचा दाह, सूज, जलोदर, हृदयाचे विकार वगैरे सर्व रोग जनावरांनां होतात. दुभत्या जनावरांची कांस सुजून आंतून दुधाऐवजीं पाणी, पू, रक्त किंवा दुधाच्या गांठी येतात. सगळें दूध न काढल्यानें, थंडीमुळें, कोणत्याहि प्रकारें कांसेला इजा झाल्याकारणानें हा रोग होतो; याला धांवरें असें म्हणतात. याच्यावर उपाय करणें तो खाणें अगदीं कमी करून आंबोण, सरकी वगैरे बंद करावी. वारंवार कांस पिळून काढावीं. दिवसांतून दोनचार वेळ बोळ्याच्या वाफेनें शेक द्यावा. जनावरें व्याल्यानंतर अशक्तपणामुळें वेणा बंद पडून वार पडत नाहीं. ती वार लवकर काढून घ्यावी नाही तर त्यापासून धुपणीचा विकार होतो व जनावर दुधाला कमी पडून अशक्त होतें. मनुष्यांप्रमाणें गुरांनांहि क्षय होतो; पण तो हिंदुस्थानांतल्या जनावरांत फार थोडया प्रमाणांत असतो. क्षयी जनावरांचें दूध पिऊं नये. प्रसूतीच्या वेळीं पुष्कळ वेळा वासरूं आडवें येतें. त्याचे पुष्कळ प्रकार आहेत. वेळींच योग्य तर्‍हेनें उपाय न केल्यास दोघांच्याहि जीवास धोका पोंचतो.

खच्चीकरणें.- पशुवैद्यकामध्यें शस्त्रक्रिया करण्याचे विशेष प्रसंग येतात. त्यांतल्या त्यांत जनावरें खच्ची करण्याचे उद्देश निरनिराळे असतात. वाईट बैलापासून उत्पत्ति चांगल्या तर्‍हेनें होत नाहीं असें सिद्ध झाल्यानें अशा बैलांनां खच्ची करण्याचा प्रघात आहे. खच्ची केलेलें जनावर लवकर माणसाळतें, रागीट होत नाहीं व शरीराच्या ठेवणींत फरक पडतो. पुठ्ठा व ढुंगण हीं चांगलीं भरतात. वशिंड, खांदा व मान मांसल होत नाहींत व त्यामुळें जनावर चपळ रहातें. सुधारलेल्या शेतकीच्या हलक्या आउतांनां जोडण्याचे बैल लाहनपणीं खच्ची केलेले असावेत. जुन्या पद्धतीचीं आउतें, ज्यामध्यें शक्तीचा उपयोग जास्त लागतो, त्यांस उपयोगांत आणावयाचे बैल पूर्ण वयांत आल्यावर खच्ची करावेत. खच्ची करण्याच्या पूर्वी ज्या कामाला, जनावर उपयोगांत आणावें लागेल त्या कारणाचा प्रथम विचार केला पाहिजे. हलकें काम असल्यास लहानपणीं खच्ची करणें चांगलें. जड व शक्तीचीं कामें असल्यास पुरी वाढ झाल्यावर करणें चांगलें. खच्ची करण्याचा मुख्य परिणाम म्हणजे नराची मादीवर चढण्याची इच्छा नाहींशी होते. जनावराचें वृषण काढल्यानें वीर्य उत्पन्न होत नाही. वृषण काढण्याच्या पूर्वीच्या ज्या कांहीं पद्धति आहेत त्यामुळें मुक्या जनावरांनां अतिशय दु:ख होतें. एका पद्धतींत वृषण ठेंचून काढतात. दुसर्‍यामध्यें दोर्‍या तोडतात किंवा मळतात. पहिल्या पद्धतीत अतिशय वेदना व रक्तस्त्राव फार होतो. दुसर्‍या तर्‍हेनें खच्ची केल्यास पोटाखालीं सूज फार येते, जनावर खातपीत नाहीं, व दोर्‍या अर्धवट तोडल्या गेल्यास खच्ची करण्याचा उद्देश सिद्धीस न जातां जनावर मारकट व त्रायदायक होतें. पाश्चात्य पद्धतीप्रमाणें खच्ची करणें चांगलें. यामध्यें वृषणावरच्या पिशवीस शस्त्रानें चीर पाडून वृषण बाहेर ओढून धरतात व ज्या शिरांनां अगर नसांनां वृषण लोंबत, असतें त्या शिरा चिमटयांत दाबून धरून त्या शिरा दुसर्‍या चिमटयाच्या साहाय्यानें हळू हळू तुटेपर्यंत पीळ देतात यामुळें रक्तस्त्राव मुळींच होत नाहीं, वेदना होत नाहींत, सूज येत नाहीं, व जनावर खाणेंंपिणें बंद करीत नाहीं. या कृतीमध्यें वैगुण्य म्हणजे, अशा रीतीनें जखम झालेली असते कीं तिच्याकडे मालकाचें दुर्लक्ष होतां कामा नये. जखम नीट धुवून स्वच्छ ठेवल्यास जनावर आठ दहा दिवसांत बरें होतें. रबारी, धनगर, व भिल्ल लोक शस्त्राच्या ऐवजीं धारेच्या गारगोटीच्या योगानें चीर पाडतात व वृषण कापून काढतात. खेडेगांवांतून बहुतकरून मांग लोक जनावरें जुन्या पद्धतीनें खच्ची करतात व ती नीट रीतीनें होत नसल्याकारणानें केव्हां केव्हां जनावरें जायबंदी होतात व दगावतात. जनावरांच्या दवाखान्यांतून शस्त्रक्रियेनें खच्ची करणें चांगलें.

पैदाशीचीं मूलत्तवें.- पशुवैद्यकामध्यें जनावरांची पैदास हा एक महत्त्वाचा भाग आहे. जनावरांची शास्त्रीय रीत्या पैदास केल्यास शेतीचीं व दुभत्याचीं जनावरें सुधारतां येतात. इकडे आपल्या लोकांचे जितके लक्ष जावें तितकें जात नाहीं म्हणून हल्लीं दिवसानुदिवस जनावरें खुजीं व अशक्त निपजूं लागली आहेत. आपल्या इकडल्या गाईला वेळेस दोन तीन शेर दूध आलें म्हणजे पुष्कळ झालें असें वाटतें; पण अशा गाईपासून शास्त्रीय रीत्या दोन तीन पिढया पायाशुद्ध पैदास केल्यास पुढील होणार्‍या गाई वेळेस दहा पंधरा शेर दूध देऊं शकतील. जनावरांची पैदास करणारांनी खालील तत्वें पूर्णपणें लक्षांत बाळगलीं पाहिजेत. ती अशीं:- (१) पैदासीकरितां उत्तम वळू असावा (२) वाईट मादीपासून पैदास करूं नयें. (३) ज्या जातीच्या माद्या असतील त्या जातीपेक्षां चांगल्या जातीचा वळू ठेवावा; कारण वळू वाईट असल्यास प्रजा वाईट होईल. (४) अगदीं जवळ नातें असलेल्या नरमादीपासून पैदास करूं नये. (५) लहान कालवडी व गोर्‍हे यांची जोपासना नीट रीतीनें ठेविली पाहिजे. ज्याप्रमाणें उत्तम जमीन असली तरी उत्तम धान्य उत्पन्न करणार्‍यास उत्तम बियाण्याची जरूर लागते त्याप्रमाणें जनावरांची पैदास करून अवलाद सुधारण्यास उत्तम माद्यांप्रमाणे उत्तम नरांचीहि जरूर असते. जर वळू चांगला नसेल तर त्यापासून होणारी प्रजा चांगली होणार नाहीं. कारण, त्याच्यापासून होणार्‍या प्रजेच्या शरीरांतील ठेवणीचा भाग पुष्कळसा वळूच्या ठेवणीवर अवलंबून असतो. तान्ह्या जनावरांना बांधा बहुतकरून त्यांच्या आईसारखा असतो व गुण मात्र बापाच्या (वळुच्या) गुणांप्रमाणें असतात. मादी प्रथमत: मालावर आली म्हणजे तिला चांगलाच वळू दाखविला पाहिजे. जर तिला एकदां वाईट वळू मिळाला तर तिच्या मनावर व कोठयावर जो परिणाम होतो त्यामुळें तिला पुढील खेपेस चांगला वळू दाखविला तरी प्रजा चांगली निपजत नाही. म्हणून पहिलटकरीण मादीस उत्तम वळू दाखविण्याची खबरदारी घ्यावी. वळूची पुरी वाढ झाल्याशिवाय त्याला मादीवर चढूं देऊं नये कारण त्याच्या पूर्वी तो चांगला वयांत आला नसल्याकारणाने त्याच्यापासून प्रजोत्पत्ति चांगली होत नाहीं व कित्येक वेळां गर्भधारणा होत नाहीं. प्रत्येक तीन चार वर्षांनीं वळू बदलावा. वळूशिवाय इतर अंडील नर कळपामध्यें येऊं देऊं नयेत. वळूला निराळी चंदी अथवा खुराक देणें जरूर आहे. वळू देखणा, नमुनेदार, असावा व त्याची प्रकृति तनदुरुस्त असावी. त्याचीं जननेंद्रियें पूर्णत्वास आलेलीं असावींत व त्याच्यांत मादी फळविण्याची उमेद व ताकद असली पाहिजे. जनावरांची उत्तम निपज होण्यास दुसर्‍या एका गोष्टीकडे कानाडोळा करतां कामा नये. ती गोष्ट म्हणजे लहानपणीं जनावरांची खाण्यापिण्याची आबाळ होऊं देता कामा नये. मादी वयस्क झाली म्हणजे तिच्यापासून पैदास करूं नये. [ले. यशवंत नारायण मराठे ].

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .