प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें   
   
पारशी- एक जात. पर्शुभारतीय संस्कृति-अवेस्ता ग्रंथ, त्यांतील विषयांची मांडणी, रचनाकाल, अवेस्ता व संस्कृत यांतील सादृश्यांची मराठी अर्थासह यादी, अवेस्ता व वेद यांचें साम्य, व इराणी आणि भारतीय आचारविषयक साम्यें हीं बुद्धपूर्वजगत्या विभागांत (उत्तरार्ध, प्र. ८ वें) दिलीं आहेत. बुद्धोत्तरजग या विभागांत झरथुष्ट्री संप्रदाय, गाथाकार व गाथा, प्राचीन इराणचा इतिहास यांसंबंधीं माहिती आहे. झरथुष्ट्र व झेंदावेस्ता यावर स्वतंत्र लेख आहेत. पारश्यांचे ता‍‍त्त्‍विक विचार व कायदा यांचें विवेचन त्या त्या नांवाखालीं सांपडेल, उदा. जारकर्म, नीतिशास्त्र, इत्यादि.
     
पारशी हा शब्द पर्शु या संस्कृत शब्दापासून झाला असून झोरोआस्टरच्या धर्मानुयायांनां हा शब्द लावतात. इराणवर मुसुलमानांच्या स्वार्‍यांनंतर कांहीं पारशी (६५१ त) हिंदुस्थानांत आले. हिंदुस्थानांतील पारशी लोकांत प्राचीन पूर्वजांचें कांहीं विशेष राहिले असले तरी हिंदुस्थानच्या हवापाण्याचा त्यांच्यावर बराच परिणाम झाला आहे. पारशी ही मूळ जात सुस्वरूप, मध्यम उंचीची व बांधेसूद असून पारशी स्त्रिया हिंदु व मुसुलमान स्त्रियांपेक्षां अधिक सुंदर असतात. पुष्कळ प्राचीन परकी प्रवाशांनीं पारशी स्त्रियांच्या सौंदर्याची स्तुति केलेली आढळते. पण कोर्बेंस हा प्रवासी म्हणतो कीं ''पारशी स्त्रिया सुंदर असतात पण वीस वर्षांवरील स्त्रियांमध्ये पुरुषी दणगटपणा येऊन त्यांच्या सौंदर्यांत वेगुण्य उत्पन्न होतें.

इराणांतील पारशी.- सन ७६६ मध्यें हिंदुस्थानांत कांहीं पारशी आले; पण कांहीं इराणांतच राहिले. तैमूरलंग व त्याचे वंशज व नादीरशहा व त्यानंतरचे मुसुलमान राजे यांच्या अमलाखालीं पारशांचे पुष्कळ हाल झाले; त्यांचीं देवालयें व धर्मपुस्तकें नष्ट झालीं. १८४३ मध्यें सोळा सतराच पुस्तकें वेस्टर गार्ड नांवाच्या पाश्चात्तय विद्वानास आढळलीं. थोडेसे व्यापारी पारशी सुस्थितींत असून बाकी सर्व गरीबींत होते. तरी सर्व पारशांनां (सुमारें एक हजार) मिळून दोन हजार तोमन (एक हजार पौंड) जिझिया कर द्यावा लागे. येझद व आसपासचे गांव मिळून पारशांची ९।१० हजार वस्ती इराणांत आहे. पायमोजे, छत्री, चष्मा, आंगठया, वगैरे जिन्नस वापरण्याचीं त्यांनां मनाई असे. हे निर्बंध व जिझिया कर, इंग्रज व हिंदुस्थानांतील पारशी यांच्या खटपटीनें कमी करण्यांत आले (१८८२). शिवाय हिंदुस्थानांतील पारशांनीं इराणी गरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांनां व शिक्षणसंस्थांनां मदत केली आहे.

संजानचा इतिहास:- किस्से-इ-संजान या ग्रंथांत पारशांबद्दल खालीलप्रमाणें हकीकत आहे. यज्दजर्द याचा अरबांनीं पराभव केल्यावर (इ. स. ६४१) कांहीं झरथुष्ट्रीय पंथाचे लोक इराणांतील कोहिस्तान (खोरासन) प्रांतांत जाऊन १०० वर्षे राहिले. तेथेंहि त्यांस त्रास झाल्यानें ते ओरमझद
शहरीं जाऊन (७५१) १५ वर्षेपर्यंत राहिले. तेथूनहि ते गलबतांत बसून हिंदुस्थानांत येऊन दीव बंदरांत उतरले (७६६) व तेथें त्यांनीं १९ वर्षे काढलीं. नंतर ते तेथून निघून संजान येथें (७८५) येऊन उतरले. नंतर या पारसी लोकांचा दस्तुर तेथील राजा जयराणा याजकडे गेला व त्याची (१६ संस्कृत श्लोकांनीं) स्तुति करून त्यानें तेथें राहण्याबद्दल त्याची परवानगी मिळविली.

अग्निमंदिरस्थापना:- तेथें ते आनंदांत राहिले व तेथें त्यांनीं राजाकडून परवानगी मिळवून आतष बेहरामचें अग्निमंदिर बांधिलें. ज्याअर्थी आतष बेहराम याच्या प्राणप्रतिष्ठेस जवळ जवळ एक वर्ष लागलें व पारशी लोकांनां हीं उपकरणें इराणमध्यें जाऊन आणावीं लागलीं त्याअर्थी आतष
बेहरामाची स्थापना ते संजान येथें आल्यापासून पांच वर्षांनीं झाली असावी. (इ. स. ७९०; य. ज. १५९). या वेळीं त्यांस कांहीं अधिक धार्मिक पारशी येऊन मिळाले असल्याबद्दलचा उल्लेख आहे. हे लोक बहुतकरून ज्यावेळीं हिंदुस्थानांतील पारशी लोक इराणांत आपलीं उपकरणें आणण्यास गेले त्यावेळीं येथील धार्मिक स्वातंत्र्याची हकीकत ऐकून त्याजबरोबर इराणांतून आलेले दुसरे त्यांचे पारशी धर्मबन्धू असावे.

वसाहती:- याप्रमाणें संजान येथें ३०० वर्षे राहिल्यावर कांहीं पारशी लोक तेथून निघून दुसरीकडे जाऊं लागले व हा क्रम सुमारें २०० वर्षे चालला होता. इतक्या अवधींत त्यांनीं वांकानेर, भडोच, वरिआव, अंकलेश्वर, खंबायत व नवसरी या ठिकाणीं वसाहता केल्या. यावेळीं संजानमध्यें फक्त कांहीं दस्तुर (उपाध्याय) राहिले होते.

पथकोत्पत्ति:- याच्या पुढील हकीकतीचा किस्से इ.संजानमध्यें कांहीं एक उल्लेख नसून किस्से. इ. झरतुष्टिआन इ-हिंदुस्तानमध्यें असा उल्लेख आहे कीं, यावेळीं (अग्निमंदिर स्थापननेनंतर ५०० वर्षांनीं म्हणजे इ. स. १२९०; य. ज.६५९) पारशी दस्तुर यांच्या वृत्तीबद्दल भांडणें होऊं नयेत म्हणून गुजराथ प्रांताचे पांच पथक केले ते असे :-(१) संजान- पारनदीपासून दंतुर नदीपर्यंत, (२) नवसरी-पार नदीपासून बरिआव पर्यंत, (३) गोदारे (गोदावरे)-बरिआब नदीपासून अंकलेश्वरपर्यंत, (४)भडोच-अंकलेश्वरपासून खंबायतपर्यंत आणि (५) खंबायत- (कुमारिकाक्षेत्र).नंतर कांहीं वर्षांनीं संजान हे पोर्तुगीज अंमलाखालीं गेल्यावर नवसरी येथील भगरिया यांनीं आपल्या पथकांतील बलसाड हें गांव संजान येथील दस्तुर लोकांस वृत्तीकरितां दिलें.

बलसाड गांव नवसरी पथकामधून संजानपथकांत गेल्याचा काल :- पोतुगीज लोकांनीं चेंगीझखान यास सुरतेवर स्वारी करण्यास मदत केल्यामुळें त्यानें त्यास दमण व संजान हे प्रांत दिले (इ. स. १५६०). परंतु ही गोष्ट इ. स. १५३३-३४ मध्यें झाली असावी. यावर्षी सुलतानबहाद्दुर यानें पोर्तुगीज लोकांबरोबर तह करून त्यांस वसई व तिच्या खालील प्रदेश दिला. बाहाद्दुरशहानें इ. स. १५३४ मध्यें पोर्तुगीज लोकांशीं तह करून त्यानें
वसई शहर त्यांस कायमचें दिलें. याच वर्षी धर्मांतराच्या भीतीनें पारशी लोक ठाण्याहून कल्याण येथें पळून गेले. बहादूरशहाच्या कारकीर्दींतहि (हि. स. ९४१; इ. स. १५३४) पोर्तुगीज लोकांनीं गुजराथच्या राजाची स्वल, दमण व दीव हीं बंदरें घेतलीं. हें स्वल बंदर म्हणजे हल्लींचें सुरतेजवळचें सुमारी' असावें.

संजानवरस्वारी:- या नंतरची हकीकत किस्से. इ. संजान मध्यें याप्रमाणें आहे. यानंतर (अन्निमंदिराच्या स्थापने) नंतर ७०० वर्षांनी सुलतान महमूद याचा सरदार अलफ खान यानें संजानच्या राजावर स्वारी केली. त्यांत अरदेसर याच्या हाताखालीं पारशी लोकांनीं त्यास मदत केल्यामुळें अफलखान याचा पराभव झाला. परंतु अलफखान याच्या दुसर्‍या स्वारींत त्यास यश येऊन संजानचा राजा व त्याच्या बाजूनें लढणारे बरेच पारशी मारले गेले. तेव्हां राहिलेले पारशी अग्नि घेऊन जवळच्या बाहरूत पर्वतावर पळून गेले व तेथें बारा वर्षें राहून पुन्हां अग्नि घेऊन बान्स्दा येथें परत आले (१४९०).

बाहरूतपर्वत व बान्स्दा:- या लढाईमधून जे वांचले त्यांनीं अग्नि घेऊन जवळच्या बाहरूत पर्वताचा मार्ग धरिला. तेथें बारा वर्षे (इ. सन १५०२ पर्यंत) राहून नंतर ते अग्नि घेऊन बलसाडजवळ असलेल्या बान्स्दा गांवीं आले.

नवसरी:- तेथें १४ वर्षें राहिल्यावर तो अग्नि नवसरी येथील एक मुख्य रहिवाशी चांगाशा यानें, बान्स्दा येथें जाण्यास वगैरे लोकांस त्रास होत असे व तेथील पुजार्‍यासहि त्रास होत असे म्हणून नवसरी येथें (१५१६) आणिला. किस्से. इ. संजानमध्यें येथपर्यंतचीच हकीकत आहे. पुढें 'किस्से. इ. झरतुष्ट्रिआन. इ. हिंदुस्तानमध्यें पुढील हकीकत आहे.

पथकांमधील तंटे:- नवसरी येथें अग्नि आल्यावर अग्नीचे संजान येथून आलेले तीन पुजारी व नवसरी येथील उपाध्याय यांच्यामध्यें वितुष्ट येऊं नये म्हणून चांगाशा यानें असा लेखी करार लिहून टाकला की संजाना येथील दस्तुर लोकांनीं फक्त अग्निपूजेचें उत्पन्न घ्यावें व नवसरी येथील उपाध्याय लोकांनीं सर्व लोकांचे-संजान येथून आलेल्या दस्तुरांचेहिसंस्कार चालवावे. हा करार सर्वांनीं मान्य केला. यानंतर ७० वर्षें शांततेंत गेलीं. नंतर नवसरी येथील भिक्षुकवर्ग व गृहस्थ यांमध्यें तंटा उपस्थित झाला व संजानचें दस्तुर गृहस्थ वर्गास मिळालें. पुढें त्यांच्यात मारामारी होऊन दोहों
बाजूचे कांहीं लोक मारले गेले. नंतर गृहस्थ लोकांनीं सुरतेस जाऊन तेथील देसाई यांच्या मदतीनें फिर्याद केली. तेथील नबाबानें जसवल यास सैन्य देऊन नवसरीस पाठविले व त्यानें तेथून कांहीं भिक्षुकांनां कैद करून आणून तुरुंगांत टाकिले (१६८६). यावेळीं सुरत येथें कुवरजी मोदी या नांवाचे एक गृहस्थ होते. त्यांच्याकडे सुरतचे भिक्षुक आले. तेव्हां त्यांनीं खटपट करून त्या तुरुंगातील भिक्षुकांस सोडविलें. या गोष्टीमुळें संजान भिक्षुकांस आनंद झाला व त्यांनी नवसरी येथील भिक्षुकी आपणास मिळेल असें वाटलें.  त्यावेळीं नवसरी येथील भिक्षुकांनीं संजान भिक्षुकांस बजाविलें कीं,
तुम्ही येथील गृहस्थवर्गाचीं धर्मकृत्यें चालवाल तर तुमचा आमचा तंटा होईल. परंतु त्यांच्यामधील हा तंटा तसाच चालू राहिला.
     
पुढें नवसरी येथें खोरशेद देसाई या नांवाचा एक मनुष्य होऊन गेला. यानें नवसरी येथील भिक्षुकांच्या वतीनें तेथील राजा गंगाजी गायकवाड याजपुढें फिर्याद मांडली. या फिर्यादीचा निकाल असा झाला कीं त्यांचीं सव्र धर्मकृत्यें नवसरी येथील भगरिया भिक्षुकवर्गानें चालवावी (१७३५). नंतर खारेशेद देसाई यानें भगरिया भिक्षुकांस असें दाखवून दिलें कीं, त्यांस संजान येथील जे भिक्षुक नवसरी येथें आले होते त्यांचींहि धर्मकृत्यें चालविण्याचा अधिकार आहे.

संजान भिक्षुकांनीं मूळ प्रत पाहण्यास मागितली. ती दाखविल्यावर थोडा वेळ ते स्वस्थ बसले, पण पुढें त्यांनीं तेथील राजा दमाजी गायकवाड याजकडे फिर्याद केली. यावेळीं दमाजीची कचेरी सोनगडावर असे. तेव्हां दोन्ही बाजू ऐकून घेऊन दमाजीनें निकाल दिला कीं, संजना भिक्षुक हे आपल्या करारापासून पराड्मुख झाले असून त्यांची वृत्ति नवसरी नसून संजान ही आहे. तेव्हां संजान भिक्षुक म्हणूं लागले कीं यापेक्षां आम्ही आपला अग्नि घेऊन निघून जातों. दमाजीनें याबद्दल देसाई यास विचारल्यावर त्यानें आपली हरकत नाहीं असे उत्तर दिलें.

बलसाड:- तेव्हां संजान भिक्षुक दमाजीचा परवाना घेऊन व बरोबर अग्नि घेऊन नवसरी सोडून बलसाड येथें गेले. (१७४०).

उदवाडा:-
बलसाड येथें ते दोन तीन वर्षे राहिले. नंतर तेथून ते राजा दुर्जनसिंग याच्या आश्रयाखालीं उदवाडा येथें गेले (१७४२).

बलसाड येथें दोन वर्षें राहिल्यानंतर येथील उपाध्याय मांडवीचा राजा दुर्जनसिंगजी यास ते भेटले. यावेळीं तो पार्डीयेथील किल्ल्यांत रहात असे. त्यानें त्यास आश्रय देण्याचें कबूल करून त्यांस समुद्रकिनार्‍यावरच्या कांहीं खेडयापैकीं एखादें खेडें पसंत करण्यास सांगितलें. उदवाडा येथें त्यावेळीं
कांही पारशी रहात असून तेथें एक शांतिमंदिर (पारशी स्मशानभूमि) होतें म्हणून तें ठिकाण त्यांनीं पसंत केलें. तेव्हां राजानें त्यांनां कांहीं हक्क व सवलती देऊन एक सनद करून दिली.

सुरत:-
वरील हकीकतींत एका गोष्टीचा उल्लेख आलेला नाहीं. ही गोष्ट म्हणजे इ. स. १७३३ पासून १७३६ पर्यंत नवसरी येथून सुरतेस अग्नि नेल्याबद्दलची होय. यावेळीं देशांत सर्वत्र अस्वस्थता माजली होती, दिल्ली येथील सत्तेचा र्‍हास होत असून मराठयांच्या सत्तेचा उत्कर्ष होत होता.
बाजीराव हा जरी शाहूचा नांवाला प्रधान होता तरी त्याच्या हातीं अनियंत्रित सत्ता होती. प्रतिनिधि, पेशवा व सेनापति यांच्यामध्यें अधिकाराबद्दल चढाओढ लागली होती. यामुळें आजूबाजूच्या प्रांतांत मराठे नेहमीं लुटालूट करीत असत. म्हणून इ. स. १७३३ पासून १७३६ पर्यंत अग्नि तात्पुरता नवसरी येथून सुरत येथें नेण्यांत आला होता. याच सुमारास पुष्कळसे पारशी लोक मराठयांच्या लुटालुटीस कंटाळून सुरत येथें येऊन राहिले होते. सुमारें एकदोन हजार पारशी लोक नवसरी मराठयांच्या ताब्यांत गेल्यावर तेथील कांहीं अंमलदारांस कंटाळून सुरत येथें येऊन रुस्तमपुरा बसवून तेथें राहिले. याला रुस्तममाणक (इ. स. १६३५-१७२१) याचें नांव दिलें. नबाब मोमिनखान यानें इ. स. १७१५ मध्यें शान्तिमंदिर (स्मशानभूमि) बांधण्यास
जमीन दिली व याच्या करितां इ. स. १७२२ मध्यें पारशी लोकांनीं वर्गणी जमविण्याकरितां एक सभा बोलविली होती.

नवसरा येथें दुसर्‍या अग्निमंदिराची स्थापना:- नवसरी येथून अग्नि गेल्यानंतर कांहीं दिवसांनीं नवसरी येथें इ. स. १७६५ मध्यें अग्निमंदिर बांधून त्यांत आतषबेहरामची स्थापना केली.

याप्रमाणें पारशी लोक इराणांतून येऊन हिंदुस्थानांत स्थायिक कसे झाले व त्यांची अग्निपूजेची परंपरा त्यांनीं नियमितपणें अखंड कशी राखली यासंबंधींची हकीकत दिली आहे. पारशांसंबंधीं मुसुलमानी इतिहासांत उल्लेख आढळतात ते येणेंप्रमाणें:- १५९५ सालीं पारसी दस्तुर कैकोबाद माहिया यास अकबरानें पूर्वी २०० बिघे जमीन दिली होती. त्याच्या जोडीस आणखी १०० बिघे दिली.

पारशांचा प्रवेश मुंबईमध्यें पोर्तुगीज अमलाखालींच झाला. इंग्रजांनां मुंबई मिळाली त्यावेळेस दोराबजी नानाभाई नांवाचा एक पारशी पोर्तुगीजांच्या नोकरीस होता आणि मुंबई देतेवेळेस पोर्तुगीजांनीं त्याची इंग्रजांकडे शिफारस केली.  सुरतेच्या इंग्रजांस व्यापारावर जकातीची माफी औरंगझेबाकडून मिळवून देण्यास एक पारशी मोबेद जमशेट बिन कैकोबाद (मुक्काम सुरत) कारण झाला असें पारशी प्रकाश (भाग १, पृ. १५) म्हणतें व समर्थनार्थ कांहीं अर्जाच्या व हुकुमाच्या कविता दिल्या आहेत. पण त्या कोठून व कशा मिळविल्या इत्यादि दिली नाहीं (१६६०).

जंजिर्‍याच्या शिद्दयानें मुंबईवर हल्ला केला त्यावेळेस मुंबईचें संरक्षण करण्यामध्यें रुस्तम (दोराबजी नानाभाईचा मुलगा) यानें प्रमुखपणानें काम केलें (१६९२).

पा र शां ची सा मा जि क मा हि तीं.- गुजराथेंत राहिलेले पारशी शेती व ताडी काढण्याचा धंदा मुख्यत: करीत. शिवाय सुरत वगैरे मोठया शहरीं सुतारकीचा, जहाजें बांधण्याचा आणि यूरोपीयांच्या फॅक्टरींत दलालीचा धंदा करीत. सुरत येथें १९ व्या शतकांत पारशांचीं सुमारें २०००० कुंटुंबें
होतीं. दिल्लीच्या मोगल दरबारांतहि त्यांनां चांगला मान व वनज असे. ब्रह्मदेश व चीन येथेंहि त्यांनीं व्यापारी संस्था स्थापल्या. गुजराथेंत जे दुष्काळ पडले त्यावेळी पारशांची वस्ती मुंबई शहरांत वाढूं लागली आणि तेथें इंग्रजांच्या बरोबरीनें त्यांची भरभराट होऊन १९ व्या शतकांत मुंबई शहर व बेट यांची जी वाढ झाली तिचें बरेचसें श्रेय पारशीं समाजाला आहे, ही गोष्ट मुंबईंत जे अनेक थोर पारशी गृहस्थांचे पुतळे उभारलेले आहेत त्यावरून सहज लक्षांत येईल. सर दिनशा पेटिट, जमशेटजी जिजिभाई, रेडिमनी, भावनगरीख् फेरोजशहा मेथा, दादाभाई नवरोजी, वगैरे पुढारी होऊन गेले. पाश्चात्य शिक्षणांचस फायदा घेणार्‍यांत पारशी हे पहिले होत. साक्षरतेचें प्रमाण पारशांमध्यें सर्वांहून अधिक (१००० पैकीं साक्षर पारशी ६५०, ख्रिस्ती २९२, जैन २६९, हिंदु ५९ व मुसुलमान ४१) आहे. इंग्रजी भाषा जाणणारांचें प्रमाण पारशांतच अधिक (१००० संख्येंत पारशी २५८, ख्रिस्ती २०९, जैन ९, हिंदु ४ व मुसुलमान २ असून इंडियन स्पेक्टेटर, व्हॉईस ऑफ इंडिया, ईस्ट ऍंड वेस्ट यांचें संपादक पारशी गृहस्थ होते. स्त्रीशिक्षणाचा प्रसारहि पारशांतच सर्वांहून अधिक असून बी. ए., एम. ए., एलएल. बी., एम. डी. वगैरे पदव्या मिळविलेल्याहि पारशी स्त्रिया आहेत. उच्च शिक्षणांतहि त्यांची प्रगति फार झाल्यामुळें डॉक्टर, वकील, इंजिनियर, वरिष्ठ सरकारी नोकर, राजकीय पुढारी, हिंदुस्थानांतील प्रांतिक व वरिष्ठ कायदेमंडळांत आणि इंग्लंडांतील पार्लमेंटांत सभासद, देशी संस्थानांचे दिवाण वगैरे सर्व प्रकारच्या उच्च धंद्यांत व नोकर्‍यांत पारशी इसम पुष्कळ आहेत. ब्रिटिश पार्लमेंटातले पहिले हिंदी सभासद दादाभाई नवरोजी हे पारशी होत. पाश्चात्तय संस्कृति हिंदुस्थानांत दिसूं लागल्यापासून हिंदूंप्रमाणें पारशांतहि पुराणमतवादी व सुधारक असे दोन पक्ष उद्भवले, आणि 'रास्त गोफ्तार' नामक वर्तमानपत्रानें गेलें अर्धे शतक सुधारक पक्षाचीं मतें फैलावण्याचें काम केलें. पारशी लोक घरांत व सार्वजनिक व्यवहारांत गुजराथी भाषा बोलतात. आपसांतील खासगी व सामाजिक तंटे तोडण्याकरितां सुरत, मुंबई, बडोदें नवसरी, वगैरे सर्व ठिकाणीं पारशी पंचायती १७ व्या शतकापासून असून पंचायतीच्या मुख्याला दावर असें म्हणतात. अलीकडे पारशी विवाह, घटस्फोट, वारसा, वगैरे बाबींचे कायदे पास झाले असून सरकारी कोर्टांत तत्संबंधीं खटले चालतात. तरी पारशी पंचायती अस्तित्वांत असून त्या धर्मादाय फंडाची व्यवस्था ट्रस्टी या नात्यानें पाहातात.

धर्म.- झोरोआस्ट्रियानिझम धर्माचा मूळ संस्थापक झोरोआस्टर (मृत्यु ख्रिस्तपूर्व ५८३) यास मानतात (पहा) पण वास्तविक हा मूळ धर्मसंस्थापक नसून केवळ धर्मसुधारक होता. पारशी लोक हे प्राचीन आर्यलोकांचीच एक शाखा असून त्यांचा धर्म भारतीयांच्या वैदिक धर्माप्रमाणें
फार जुना आहे इतकेंच नव्हे तर त्यांचे वैदिक धर्माशीं फार साम्य आहे. त्यांच्या जुन्या धर्माला पोईरोल्कएश हें नांव असून अग्नि, सूर्य, चंद्र, आकाश, वगैरेंनां ते स्वतंत्र देवता मानीत. आथ्रवन हे त्यांचे पुजारी व यजन (यज्ञ) करणें व हओम (सोम) रस पिणें, हे मुख्य धर्माविधी होते. झरथुष्ट्र
(झोरोआस्टर) यानें त्यांत सुधारणा करण्याकरितां मुख्य तत्त्‍व हें प्रतिपादिलें कीं परमेश्वर एक आहे व इतर देवता त्यांच्या अंकित आहेत. जगतांत जें वाईट आहे तें परमेश्वरानें उत्पन्न केलें नसून तें उत्पन्न करणारी अहरिमन् ही दुष्ट शक्ति आहे. परमेश्वराचें नांव अहुरमज्द व त्याचा मुख्य गुण बोहुमन (उत्तम मन) हा आहे व त्याचा अर्थ परोपकार किंवा प्रेम असा आहे. पारशांचा मुख्य धर्मग्रंथ अवेस्ता असून पारशांचे मुख्य धर्माविधी नामकरण, विवाह, नवगोत, व मृतसंस्कार हे चार आहेत. विशेष माहिती 'बुद्धपूर्व  जग' (विभाग तिसरा, प्र. ८, पर्शुभारतीय संस्कृति) यांत पहा.

पारशी लोकांत जशी जूट दिसून येते तशी हिंदुस्थानांतील दुसर्‍या कोणत्याहि जातींत नाहीं. स्वबांधवांनां मदत करण्याकरितां श्रीमान पारशी लोक नेहमीं तयार असतात. त्या समाजांत निरनिराळे धर्मार्थ फंड आहेत व त्यांचा विनियोग उत्तम प्रकारें केला जातो हें पुढील पारशी (मुंबई) धर्मपंचायतीच्या (१९२३ सालच्या) अहवालांतून घेतलेल्या त्रोटक माहितीवरूनहि दिसून येईल.-

पारशी पंचायतीमार्फत चाललेल्या धर्मखात्याचे तीन प्रकार आहेत : (१) ज्या खात्यांच्या कामाची वहिवाट खुद्द पंचामार्फत केली जाते अशीं खातीं, अशीं खातीं एकंदर ४५ आहेत. (२) ज्या खात्यांच्या कामाची वहिवाट पंचांमार्फत होत नसून दुसर्‍या व्यवस्थापकामार्फत केली जाते अशीं खातीं, अशा खात्यांची संख्या ७० आहे. (३) खाजगी लोकांच्या नांवानें असलेलीं खातीं, यांची संख्या ३१४ आहे.

स्थावर मिळकत:- (मुंबई) ह्यूजरोडजवळील घरांची संख्या १८ असून त्यांची किंमत रु. ७८९१५६-६-९ आहे. शिवाय इतर ठिकाणीं सुमारें १७ मिळकती असून त्यांची किंमत २३६६२३९-११-२ आहे. या मिळकतींत दोन सॅनिटोरियम, चार इस्पितळें, एक आरामगृह, एक रवानगी (प्रेत) गृह;
दोन धर्मशाळा, व गृहें इत्यादिकांचा अंतर्भाव होतो.

सन १९२३ ह्या वर्षाच्या सुरुवातीला रु.११४९४८३८-०-८ जमा होती, ती त्याच वर्षाच्या शेवटीं रु.११९४२११८०-३-९ झाली, म्हणजे ह्या वर्षी ४४७२८०-३-१ वाढ झाली. अहवालाच्या सालीं सहा स्त्री-पुरुषांनां धार्मिक स्वरूपांत मदत देण्यांत आली. प्रेतवाहक खातीं रु. ५०२४९-६-४ खर्च झाला. गरीबांनां अन्नवस्त्र, औषधपाणी वगैरे देण्याच्या कामीं रु. १३६७-८-० खर्च झाला. मुंबईतील पारशी धर्मशाळेबाबत रुपये १९८८३-१४-६ खर्च झाला. मुंबईंतील आंधळ्या-पांगळ्या पारशी लोकांनां रु. २७४५६ मदतीदाखल खर्च झाले. मुंबईंतील अडचणींत सांपडलेल्या कुलीन लोकांनां रु. ६७३५ मदतीदाखल देण्यांत आले. गरीब असहाय विधवांनां रु. ९६४८ मदत म्हणून देण्यांत आले. मुंबईंतील गरीब असहाय लोकांनां प्रेतयात्रेकरितां मदतीदाखल रु. १८६४-१२-० देण्यांत आले. गरीब बालसंरक्षणखातीं पुष्कळ मदत देण्यांत आली. गरीब असहाय मुलींचीं लग्नें करण्यासाठीं रु. २९२५ मदत देण्यांत आली. खेडयापाडयांतील असहाय लोकांनां वर्षश्राद्ध वगैरे धार्मिक कार्यांकरितां मदत म्हणून रु. १००३४-६-० खर्च केला. मुंबईंतील अनाथ पारशांनां फुकट धान्य वांटण्याबाबत रु. ५४६-१२-६ खर्च झाला. गरीब व आजारी लोकांनां मदत म्हणून रु. १९०७-८-० देण्यांत आले. पारशी लोकांचें धर्मशिक्षण व विद्यादान याबाबत रु. ६३९२ खर्च झाला शिक्षकांचा पगार म्हणून रु. ७१८८ व विद्यार्थ्यांनां शिष्यवृत्तीदाखल रु. ३०९० खर्च झाले. ना. सर जमशेटजी जिजीभाई भाषांतर फंडामधून २२ पुस्तकांनां मदत म्हणून रु. ४५३२-१३-० व अनाथ बालकें व अनाथ विधवा यांनां दरमहा मदत म्हणून रु. ४९६९-९-६ खर्च झाला. विद्यार्थ्यांनां पुस्तकांची मदत म्हणून रु. ७५-४-० खर्च झाला. सराफशिक्षणफंड व सर जमशेटजी जिजीभाई फंड ह्यांतून अनुक्रमें रु. १५७४५-४-० व रु. ४५९३-५-४ खर्च झाला. पारशी लोकांनां रहाण्यासाठीं म्हणून १९२३ साल अखेर १७ इमारती बांधण्यात आल्या.

१९२३ सालीं ट्रस्टी लोकांची सभा भरली होती. देवळाली येथील जमीन लॅण्ड अक्विझेशनमध्यें जाणार होती त्या विरुद्ध केलेल्या खटपटीला यश आलें. डुंगरवाडीमध्यें नवीन १५ झोंपडया रु. १०००० खर्चून प्लेगनिवारणार्थ म्हणून बांधण्यांत आल्या.

आजच्या गरजा:- (१) प्रेतसंस्कार फंडाची वाढ, (२) असहाय लोकांनां मदतफंड-वाढ. (३) मुंबईतील अंध-पंगूंनां मदत फंड-वाढ. (४) चौपाटीवरील धर्मशाळेंतील अनाथांनां मदत फंड-वाढ. (५) गरीबांनां औषधपाणी वगैरे फंड-वाढ. (६) मुंबई व इतर ठिकाणच्या शाळांबाबत फंड. (७) गरीब व असहाय विधवांनां मदत फंड. (८) गरीब व अनाथ विधवा व मुलें मदतफंड. (९) पारशांनां रहाण्याला इमारती किंवा भाडयाचा खर्च कमी करण्याबाबत फंड इत्यादि.

पारशी कायदा.- (जुना) हा फक्त वारसाच्या बाबतींतील आहे. सन १८३५ सालीं एक पारशी मयत झाला होता. त्याच्या थोरल्या मुलानें दावा केला कीं, माझया मयत बापाच्या ईस्टेटीचा वारस मी एकटाच आहे. त्यावरून त्यावेळच्या पारशी लोकांनीं नामदार इंग्रजसरकारास अर्ज केला कीं
त्यास इंग्लंडचा स्थावर मिळकतीचा कायदा लागू पडूं नये. सबब इंग्रजसरकानें तारीख १५ माहे मे, सन १८३७ रोजीं सन १८३७ चा अ‍ॅक्ट नंबर ९ 'दि पारशी चॅटल रिपील अ‍ॅक्ट' पसार केला कीं, इंग्लंडांतील स्थावर मिळकतीसंबंधींचा कायदा प्रेसिडेन्सी शहरांतील पारशीं लोकांस लागूं पडत नाहीं. मुंबई शहराच्या बाहेरगावीं जे पारशी रहात होते त्यांच्या ईस्टेटीची वांटणी त्यांच्या मरणानंतर सन १८२७ रेग्युलेशन नंबर ४ प्रमाणें होत असे.

ह्याप्रमाणें प्रेसिडेन्सी शहर आणि बाहेरगांवांतील पारशी लोकांचा कायदा एक नसल्याकारणामुळें सन १८६२ सालीं पारशीं लोकांकरितां एक कमिशन नेमण्यांत आलें होतें. त्यानें आपला तारीख १३।१०।६२ रोजीं एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे; त्यांत त्यानें असें लिहीलें आहे कीं सन  १८६२ च्या पूर्वीं मुंबई शहरांतील पारशी लोकांच्या मरणानंतर त्यांच्या ईस्टेटीची वांटणी दि इंग्लिश स्टेटयुट ऑफ डीस्ट्रिब्यूशनप्रमाणें करण्यांत येत होती. त्या कामी कमिशनच्या आधारें इंग्रजसरकारनें दि पारशी ईनतेसेट सक्सेशन अ‍ॅक्ट ता. २१ एप्रिल सन १८६५ चा तारीख १०।४।१८६५ रोजीं पसार केला आहे.

दि लॉज् केलॉट् अ‍ॅक्ट:- हा अ‍ॅक्ट सन १८७४ चा अ‍ॅक्ट १५ प्रमाणें सन १८६५ चा अ‍ॅक्ट २१ शेडयुल डिस्ट्रिक्ट शिवायकरून सर्व हिंदुस्थानांत लागू करण्यांत आला.

सन १८७४ च्या दि शेडयुल अ‍ॅक्टप्रमाणें खालीं लिहिलेल्या शेडयुलड डिस्ट्रिक्टवर नमूद केलेला कायदा लागूं करण्यांत आला आहे. सिंध पश्चिम नाट पायगुरी, हजरीबाग लाहोरडागा, मानभुम परगणा, डाटभुम डिस्ट्रिक्ट व सिंगभुम डिस्ट्रिक्टांतील लॉट होज जोहनसी डिव्हिजन मुकमोजान व गरला, मिरझापुर डिस्ट्रिक्टमधील दि शेडयुलड भाग, जोसरवापेशावर, कोहट बाजु डेराईस्माईलखान, डेरागाझीखानचे डिस्ट्रिक्ट, अजमेर व मेरवाड व सिलहट डिस्ट्रिक्ट दि नार्थ वेस्टर्न ओव्हीजसंसत राईचे शेडयुलड डिस्ट्रिक्ट.

सरदहु कायद्यांप्रमाणें जर एखादा पारशी पुरुष मयत झाला तर त्याच्या मरणानंतर त्याच्या स्थावर-जंगम मिळकतीची वांटणी अशी करावी कीं दर एक मुलीस एक, विधवास दोन व दर एक मुलास चार भाग मिळावे.

जर एखादी पारशी बाई मयत झाली तर तिच्या स्थावर जंगम मिळकतीची वांटणी अशी करावी कीं तिच्या दरएक मुलास एक भाग व तिच्या नवर्‍यास दोन भाग मिळावे.

एखाद्या पारशी पुरुषाच्या मरणाच्या वेळीं जर त्याची स्त्री हयात नसली तर त्याच्या स्थावर-जंगम मिळकतीची वांटणी अशी करावी कीं, दरएक मुलीस एक व दरएक मुलास चार भाग मिळावे.

एखाद्या पारशीबाईच्या मृत्युसमयीं जर तिचा नवरा हयात नसला तर तिच्या स्थावर जंगम मिळकतीची वांटणी अशी करावी कीं दरएक मुलास सारखा हिस्सा मिळावा.

जर एखाद्या पारश्याचा मुलगा व मुलगी त्याच्या हयातींत मरण पावली असेल तर त्याची विधवा अगर भ्रतारास व त्याच्या ट्रस्टीस त्याच्या मयत बापाचा अगर आईचा हिस्सा मिळावा.

जर एखाद्या पारशाच्या मृत्युसमयीं त्याची विधवा अगर एखादा पारशी बाईच्या मृत्युसमयीं तिचा नवरा हयात असेल तर त्यास, कांहीं शेती नसल्यास त्याच्या स्थावर जंगम मिळकतीचे दोन भाग करावे व त्यांतील एक भाग मयताची आई व बाप यास किंवा एक हयात असेल त्यास
मिळावा व मयताची विधवा अगर तिच्या नवर्‍यास दुसरा भाग मिळावा.

जर मयताचे आईबाप दोघेहि जिवंत असतील तर आईचा हिस्सा बापाच्या हिश्श्यापेक्षां निम्मा असावा. कदाचित मयताची आई किंवा बाप जिवंत नसल्यास खालीं दिलेल्या परिशिष्ट अ प्रमाणें मयताच्या बापाच्या नातेवाइकांस त्यांच्या नंबराप्रमाणें निम्मा हिस्सा मिळावा परंतु पुरुष
वारसाचा हिस्सा स्त्री वारसापेक्षां दुप्पट असावा जर ह्याच्या तर्फें कोणी नातेवाईक नसेल तर मयताची विधवा किंवा भ्रतार यास सर्व इस्टेट मिळावी.

जर एखाद्या पारशी पुरुषाच्या आईच्या मरणाच्या समयीं त्यास संतति नसेल व त्याची विधवा किंवा मयत स्त्रीचा भ्रतार नसेल तर परिशिष्ट आ मध्यें नमूद केलेल्या त्याच्या मिळकतीचे वारस यांस त्याच्या नंबराप्रमाणें सर्व मिळकत मिळावी. परंतु एका स्त्रीवारसाचा हिस्सा पुरुषाच्या हिश्याच्या निम्यानें असावा.

पारशी लोकांस दि इंडियन सेक्सेशन अ‍ॅक्ट १० सन १८६५ चा भाग ३ व ४ यांतील सेक्शन २५ शिवाय करून भाग ५ वा सेक्शन ४३ लागू पडत नाहीं. बाकीचे सर्व भाग व सेकशन्स पारशी लोकांस लागू आहेत.

परिशिष्ट अ:- भाऊ व बहिण ह्यांपैकीं कोणीहि मयतापूर्वी मेले असतील तर त्याची औरस संतति. आजा व आजी काकी व आत व तिची औरत संतति ह्यांपैकीं कोणी मयताच्या हयातींत वारले असतील तर. पणजा व पणजी व यांचे मुलगे व मुलीं आणि ह्यांपैकीं जर कोणी मयताच्या
हयातींत वारले असतील तर त्यांची औरस संतति.

परिशिष्ट आ; बाप व आई:- भाऊ व बहीण ह्यांपैकीं कोणी मयताच्या हयातींत वारले असेल तर त्यांची औरस संतति आजा व आजी, काका व आत ह्यापैकीं कोणीहि मयताच्या हयातींत मरण पावले असतील तर त्यांची औरस संतति. पणजा व पणजी, पणजा व पणजीचे मुलगे व मुली ह्यांपैकीं कोणी मयताच्या हयातींत वारले असतील तर. आईच्या तर्फे भाऊ म्हणजे पहिल्या घरचे भाऊ व बहीण व दुसर्‍या घरचे भाऊ व बहीण ह्यांपैकीं मयताच्या हयातींत कोणीहि मरण पावले असेल तर त्याची औरस संतति. आईचा बाप व बहीण, आईच्या बापाचे मुलगे व मुली ह्यांपैकीं जर कोणी मयताच्या हयातींत वारले असतील तर त्याची औरस संतति. सून-जर तिनें मयताच्या वेळीं किंवा अगोदर पुनर्विवाह केला नसेल तर. भावाची विधवा-जर तिनें मयताच्या मरणाच्या वेळीं किंवा अगोदर पुनर्विवाह केला नसेल तर. आज्याच्या मुलांची विधवा-जर तिनें मयताचे मरणाच्या वेळीं किंवा अगोदर पुनर्विवाह केला नसेल तर. आईच्या आज्याच्या मुलाची विधवा-तिनें मयताच्या मरणाच्या वेळीं किंवा अगोदर पुनर्विवाह केला नसेल तर. मयताच्या मुलीचा भ्रतार-जर मुलीनें मयताच्या मरणाच्या वेळीं किंवा अगोदर दुसरें लग्न केलें नसेल तर. आईच्या आज्याचे आईबाप. आईच्या आज्याच्या बापाचे मुलगे व मुली ह्यांपैकीं जर कोणी मयताच्या हयातींत मरण पावले असतील तर त्यांची औरस संतति. बापाच्या आजीचे आईबाप. बापाच्या आजीच्या बापाचे मुलगे व मुली ह्यांपैकीं जर कोणी मयताच्या हयातींत मरण पावले असतील तर त्यांची औरस संतति. (ले. बमनजी पेस्तनजी, वकील) (नुकताच नवीन अ‍ॅक्ट झाला आहे.)

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .