विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बताला, त ह शी ल – पंजाबात गुरुदासपूर जिल्ह्यांतील तहशील. लोकसंख्या (१९११) २७५६९५. मुख्य ठाणे बताला असून तहशिलींत दोन मोठी शहरे आणि ४८० खेडी आहेत. जमीन सुपीक आहे
.
शहर- हे गुरुदासपूर शहरापासून २० मैलांवर आहे. लोकसंख्या (१९११) २६४३०. बहलोलखान लोदीच्या कारकीर्दीत लाहोरचा सुभेदार तातारखान यानें दिलेल्या जागेंत रामरामदेव नांवाच्या एका भट्टी रजपुताने १४६४ साली हे वसविले. १८६७ साली येथे म्युनिसिपालिटी स्थापिली गेली. शहरांत कापूस, रेशीम व कातडी वगैरे माल तयार करण्याचे काही कारखाने आहेत. येथे धान्याचा व साखरेचा मोठा व्यापार आहे. येथे तीन हायस्कुले चालतात.