विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बंदनिके - किंवा फंदनिके. म्हैसूर संस्थान. शिमोगा जिल्ह्यांत शिकारपूर तालुक्यांतील एक ओसाड गांव. पूर्वी नगरखंड (सत्तरी) प्रांताची ही राजधानी असून येथे चंद्रगुप्ताने राज्य केले असे एका शिलालेखांत लिहिले आहे. याचे पौराणिक नाव ''बांधवपुर'' असे होते. येथे देवळांचे व खोदकाम केलेल्या इमारतींचे बरेच अवशेष आहेत. चालुक्य, कल्चुरी, होयसल, सेऊण व विजयानगरच्या राजासंबंधी माहिती देणारे तीन शिलालेख सांपडले आहेत. विजयनगरचे राज्य मोडल्यानंतर मुसुलमानांनी १५६५ साली या गांवाचा विध्वंस केला असावा.