विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बयाबाई रामदासी - या महाराष्ट्र कवयित्रीची थोडीशी कविता प्रसिध्द आहे. तीवरून रामदासाच्या चरित्रावर कांही प्रकाश पडतो. रामदासावर बयाबाईची गुरुभक्ति अपरंपार होती. बयाबाईने आर्या केल्या आहेत, त्यावरून शिवकालीन महाराष्ट्रांत आर्या रचण्याची चाल होती. आर्यायमकाचा छंद मोरोपंताच्याहि पूर्वीपासून महाराष्ट्रांतील कवींमध्ये होता असे वाटते. बयाबाईची हिंदी रचना मराठीपेक्षा जास्त ठसकेदार आहे असे महाराष्ट्रसारस्वतकार म्हणतात.