विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरपाली – ओरिसा. ही जमीनदारी संबलपूर जिल्ह्यांत आहे. संबलपूरचा चवथा राजा बलियारसिंग याने आपला दुसरा मुलगा विक्रमसिंग याच्या खुराक-पोशाखानिमित्त ही दिली. या जमीनदारीत अदमासे ७० गांवे आहेत. क्षेत्रफळ २५ चौरस मैल. लोकसंख्या गेल्या खानेसुमारीत १७३०४ होती