विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बराकपूर - बंगालमध्ये 'चोवीसपरगणे' जिल्ह्यांतील बराकपूर पोटविभागाचे मुख्य ठिकाण. कलकत्यापासून हे १५ मैलांवर हुगळी नदीच्या पूर्व तीरावर आहे. याचे उत्तर बराकपूर (लोकसंख्या (१९९१) ११८४७) व दक्षिणबराकपूर (वस्ती २७६०५) असे दोन भाग आहेत. दक्षिणबराकपूर छावणी असून तिची लोकसंख्या ११४८५ आहे. इ.स.१७७२ पासून येथे शिपायांच्या बराकी असल्यामुळे यास हे नांव पडले आहे, तेथील लोक यास 'चानक' म्हणतात. येथे एक काळया शिपयांची पलटण आहे. बराकपूर येथे इ.स. १८२४ व १८५७ मध्ये दोन वेळा बंडे झाली होती.