विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्झेलियस (१७७९ – १८४८) - हा स्वीडनमधील रसायनशास्त्रज्ञ स्टाकहोम येथे प्रोफेसर होता. याने स. १८१८ त एक अणुभारांकमाला तयार केली व १८२६ साली ती सुधारली. हींत प्राणवायूचा अणुभांराक मूलमान धरला होता याने विद्युद्रसायनशास्त्राचा पाया घातला. तसेंच मूलद्रव्यांस संक्षिप्त संज्ञा दिल्या व अनेक नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला. (रसायन शास्त्राचा इतिहास पहा, विभाग ५.)