विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्थोले - एक फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ, आर्कुइल येथे त्याची रसायन शाळा होती. त्यानेंच स. १७८५ त ओपविण्याकरता हरवायूचा उपयोग केला. याने बंदुकीची दारू तयार करण्याकरिता सोन्याच्या ऐवजी पालाशहरिताचा उपयोग करून पाहिला. याने रंगकलेची सोपपत्तिक माहिती लोकांस दिली. या विषयावर त्याने एक पुस्तक लिहिले. स १७९८ त नेपोलियनबरोबर जे शास्त्रज्ञ ईजिप्तमध्ये गेले त्यांत हा होता. रासायनिक द्रव्ये एकमेकांशी संयोग पावताना कांही ठराविक प्रमाणांत संयोग पावतात हे तत्व व यावरून पुढे उद्भभूत झालेले रासायनिक स्नेहाचे तत्व या दोन तत्त्वांचा उगम बर्थोलेपासूनच झाला यांत शंका नाही.