प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर

बल्गेरिया – हे यूरोपखंडाच्या आग्नेय भागांतील एक राष्ट्र असून, बाल्कन द्वीपकल्पाच्या ईशान्येस आणि काळयासमुद्राला लागून आहे. स. १८७८ पासून १९०८ च्या आक्टोबरपर्यंत हे तुर्कस्तानच्या सुलतानच्या सत्तेखाली खंडणी देणारे मांडलिक संस्थान होते, पण हल्ली ते पूर्ण स्वतंत्र संस्थान झाले आहे. याचे क्षेत्रफळ (१९२१) ३८९१४ चौरस मैल आहे. येथे दोन पर्वतांच्या रांगा आहेत, बाल्कन पर्वतांची रांग पूर्व-पश्चिम असून ती या देशाच्या मधून जाते. आणि -होडोप पर्वतांच्या रांगेने बरीच दक्षिण सरहद्द मर्यादित केलेली आहे. या पर्वतांची सर्वात उंच शिखरे म्हटली म्हणजे युम्रुकचळ आणि कडिम्लिआ ही होत. -होडोप पर्वताचे मुसल्ला नांवाचे सर्वांत उंच शिखर दक्षिण सरहद्दीलगत आहे. बाल्कन पर्वतांपासून हळू हळू उत्तरेकडे डान्यूबपर्वत उतरत गेलेला आणि पर्वंतांनी मधून मधून विभागलेला या देशाचा भाग सुपीक आहे. या भागाच्या पूर्वेस डेलि ओरमन नांवाचे दाट जंगल असून येथील लोकवस्ती फार पातळ आहे. नद्या ब-याच आहेत.

याच्या भूगर्भात बरीच खनिजद्रव्ये आहेत. परंतु कोळशाशिवाय बाकीचे पदार्थ खणून काढण्याचा विशेषसा प्रयत्न करण्यांत आलेला नाही. याशिवाय लिनाइट व गंधकयुक्त झरेहि येथे बरेच आहेत.

येथे उन्हाळा आणि थंडी फार कडक असते. ठिकठिकाणी हवा निरनिराळया प्रकारची असून हवेत नेहमी फेरफार होत असतात. येथे विशेषेकरून ओक, पीच, अंश, एल्म, वालनट, करबल, पाप्लर, पाइन आणि जुनिपर या झाडांचे अरण्य आहे.

शेतकी ही एक द्रव्यप्राप्तीची मोठी बाब आहे. शेतकरी वर्ग वंशपरंपरागत चालत आलेल्या चालीरीतींना अजून चिकटून असल्यामुळे शेतीचे काम जुन्या पध्दतीवरच चालत असते, येथील सरकारने शेतकरी लोकांना नव्या पध्दतीने शिक्षण देऊन शेतकीचे काम नव्या पध्दतीने चालू करण्याची बरीच खटपट चालविली आहे. गहूं, मका, राय, जव, ओट आणि बाजरी, जवारी वगैरे धान्यांची पिके मुख्य आहेत. धान्याशिवाय मद्य, तंबाखू, गुलाबाचे अत्तर, रेशीम आणि कापूस हा मालहि येथे उत्पन्न होतो. दरवर्षी सरासरी ६००० पौंड गुलाबी अत्तराची निर्गत होते. सोफियाच्या आसपास बीटच्या कंदांची लागवड होते. १९२१ साली लागवडीखाली असलेली जमीन ९१८२४०९ एकर होती व जंगल ७२०३१६० एकर होते. द्रव्यबळ अपुरे असल्यामुळे उद्योगधंदाची वाढ मोठया प्रमाणावर होत नाही. स्लीव्हेन आणि गब्रोव्हो या ठिकाणी अनुक्रमे सूत कातण्याचे आणि जरीचे विणकाम करण्याचे घरगुती खारखाने आहेत. येथे निर्भेळ लोकरीचे सूत फार उत्तम तयार होते. देशांतील धंदे वाढावे या हेतूने तेथील सरकारने लोकांना देशी माल वापरण्यासाठी हुकूम केला आहे. वरील धंद्याशिवाय मद्यार्क काढण्याचे, चामडी कमावण्याचे व धान्य दळण्याचे कारखाने आहेत. १९२३ साली २०६१५१३६८ पौड किंमतीच्या मालाची आयात आणि ११५८५६८२० पौंड किंमतीच्या मालाची निर्गत झाली.

सोफियामध्ये 'नॅशनल बँक' नावाची एक सरकारी बँक आहे. याशिवाय इतर खासगी बँकाही आहेत. २०० वर रजिस्टर केलेल्या प्राव्हिडंटसोसायटया आहेत. १९२१ साली बल्गेरियन इंटर नॅशनल बँक स्थापन झाली असून तिचे भांडवल ७ कोटी ५० लाख आहे. १९२४-२५ साली बेल्गेरियाचे वार्षिक उत्पन्न ६६०४२५०००० लेवा असून खर्च ६६०४९३१००२ लेवा होता.

आगगाडया, साधे रस्ते आणि जलमार्ग ही तिन्ही दळणवळणाची साधने आहेत. बहुतेक सर्व आगगाडया सरकारच्या स्वाधीन आहेत. बल्गेरियांत १९२१ साली १६२४ मैल रेल्वे होती. येथे कालवे नाहीत. फक्त डान्यूब नदीच दळणवळणाला योग्य आहे. सेफिया हे राजधानीचे शहर आहे. १९२३ साली लोकसंख्या ५००८००० होती.

लो क - निव्वळ बल्गरवंशाच्या लोकांचे शेकडा मान ७७.१४ आहे व हे लोक डोंगराळ प्रदेशांत आढळतात. सपाट प्रदेशात राहणारे लोक भेसळ रक्ताचे आहेत व हे बहुतेक तुर्की लोकांच्या स्वा-यांनंतर आलेल्या लोकांच्या व त्यांनतर येथे वसाहत केलेल्या लोकांच्या मिश्र रक्ताचे बनले आहेत. बल्गर लोकांशिवाय इतर वंशांचे लोक म्हणजे ग्रीक, गगौझि, शोप, व्हलाच अथवा रुगान हे होत. मेंढरे चारण्यासाठी हजारो धनगरहि दरवर्षी येथे भटकत येतात. तातार हे निरुपद्रवी आणि उद्योगधंदा करून राहणारे लोक आहेत. जिप्सी लोक हे अगदी खालच्या दर्जाचे समजले जातात.

रा ज्य का र भा र. - येथे कायदेशीर आणि नियंत्रित राजसत्ताक राज्यपध्दति आहे. कायदे करण्याची सत्ता राजाच्या हाती असून त्याला साहाय्य करण्यासाठी एक राष्ट्रीय सभा असते. राज्यकारभार चालविणा-या दोन सभा असतातः- (१) सोत्रन्ये किंवा साधी सभा आणि (२) ग्रँड सोब्रन्ये. कार्यकारी सत्ता चालविण्यासाठी एक अष्टप्रधानांचें मंडळ असते. स्थानिक राज्यकारभार पाहण्याचे काम देशांतील कारभार पाहणा-या मंत्र्याच्या हाती असते. बहुतेक प्रत्येक खेडेगांवांत कॉम्युन असते. १९०९ साली जातवार प्रति निधिकत्वाचे तत्त्व अंमलांत आले.

न्यायखाते - दिवाणी आणि फौजदारी कायदे तुर्की लोकांच्या कायद्यावरून बनविले आहेत खेडयांतील क्मेट हे अगदी कनिष्ठ दर्जाचे दिवाणी आणि फौजदारी कोर्ट होय. सोफिया, रश्चक आणि फिलिप्पोपोलीस या प्रत्येक ठिकाणी एक एक याप्रमाणे तीन अपीलकोर्टे आहेत. सर्वांत वरिष्ठ कोर्ट म्हणजे सोफियामधील कस्सेशन कोर्ट होय.

लष्कर आणि आरमार – स.१९१९ च्या न्यूइलीच्या तहान्वये बल्गेरियाने २० हजारांपेक्षा आधिक सैन्य ठेवता कामा नये, असे ठरले आहे. सक्तीची लष्करी पध्दत बंद करण्यांत आली आहे. सरहद्दीवरील मुलुखाच्या संरक्षणासाठी ३ हजार शिपाई ठेवण्याची परवानगी आहे. वैमानिक दळ ठेवण्याला परवानगी नाही. डान्यूब नदीवरील आपल्या हक्कसंरक्षणार्थ ४ टापेंडो व ६ मोटारबोटी ठेवण्याची परवानगी आहे.

धर्म व शिक्षण - ऑर्थोडाक्स ग्रीक चर्चमधील धर्म हा बल्गेरियाचा राजधर्म आहे. पण सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यांत आले आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. सोफिया येथे सरकारी विश्वविद्यालय आहे. त्याशिवाय एक खाजगी विश्वविद्यालयहि स्थापन झालेले आहे.

इतिहास - डान्यूब नदी व एजियन समुद्र यांमधील प्रदेशांत राहत असणा-या प्राचीन थ्रको इलिरियन महावंशास स्लॉव्होनिक लोकानी इ.स. च्या ३ -या शतकापासून ६ व्या शतकापर्यंत निरनिराळया प्रसंगी स्वा-या करून हाकलून लाविले. स्लव्ह हे शेतकरी असून अतिप्राचीन काळी सुध्दा त्यांच्यांत प्रजासत्ताक संस्था अस्तित्वांत होत्या. राष्ट्रजाती हाच त्यांचा राजकीय घटक होता. रोमन सुधारणेचा त्यांच्यावर बराच परिणाम झाला. या भिन्न स्लाव्ह समूहाला एकीकृत करून त्याचे बलाढय राष्ट्र बनविण्याचे कार्य त्यांच्याहून सर्व बाबतीत भिन्न असणा-या एका परकीय (बल्गर) वंशाच्या हाती आले.

बल्गरलोकः – तार्तर, हूण वगैरे लोकांप्रमाणे बल्गर लोक हे तुराणी वंशाचे असून त्यांचे मूल वसतिस्थान उरलपर्वत व व्हॅल्गा नदी यांमधील मैदान हे होते. ते क्रूर, रानटी व जंगली होते. त्यांच्यात बहुपत्नीत्वाची चाल रूढ असून त्यांचा राज्यकारभार बॉयर किंवा खान लोक चालवीत. हे खान अति जुलमी असत. इ.स. ६७९ त बल्गरांनी इस्पेरिख नावाच्या खानाच्या नेतृत्वाखाली स्वारी करून स्लाव्ह लोकांना जिंकिले.

बल्गरांची संख्या कमी असल्याने ते पुढील दोन शतकांत जित लोकांत मिसळून एकजीव झाले. जित लोकांस त्यांनी आपले नावं व राजकीय संस्था घ्यावयास भाग पाडून स्वतः त्यांच्या चालीरीती, भाषा व स्थानिक संस्था उचलल्या.

आरंभीचे राज्यकर्ते - आरंभीच्या बल्गर राजांचा इतिहास म्हटला म्हणजे बायझन्टाइन बादशहाशी एकसारखे चाललेले भांडण हे होय. प्रथम इस्पेरिखखानानें ग्रीक लोकांवर जी खंडणी बसविली ती पुन्हां कारडम (७९१ - ७९७) व क्रम (८०२ – ८१५) यांनी वसूल केली. बोरीसची कारकीर्द संस्मरणीय आहे. कारण त्यांच्या वेळेस बल्गेरियांत ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली. या वेळेस पूर्वचर्च व पश्चिमचर्च यांच्यामध्ये भांडणे सुरू होऊन शेवटी ती वेगळी झाली. पोपने बल्गेरियन चर्चचे स्वातंत्र्य कबूल केले नाही, त्यावेळेस बोरीसने ग्रीक चर्चचा अवलंब केला. या गोष्टीचा बल्गर लोकांच्या पुढील इतिहासावर परिणाम झाला.

पहिले साम्राज्य – सायमन बादशहाच्या कारकीर्दीत बल्गेरियाची राष्ट्रीय सत्ता कळसास पोहोंचली. पूर्व यूरोपांत प्रबळ झाल्यावर सायमनने ''सर्व ग्रीक व बल्गर लोकांचा सम्राट'' ही पदवी धारण केली; व ती पोपने मान्य केली. त्याच्या कारकीर्दीत साम्राज्यांतील उत्तर भागांत शांतता राहून व्यापार व वाङमय वाढून राजधानी प्रेसलव्हि ही कॉन्स्टांटिनोपलच्या तोडीची बनली. त्याच्या मरणानंतर यादवीमुळे बल्गर साम्राज्याला उतरती कळा लागून शेवटी शिशमन नांवाच्या ट्रांनोव्हो येथील एका सरदाराने दुसरें राज्य स्थापिले. त्यांत अल्वेनिया व मॅसडोनिया मोडत. त्याची राजधानी ओचरिडा ही होती.

इ.स.९६९ या वर्षी स्वियार्ट स्लाव्ह बादशहाच्या हाताखाली रशियन लोक बल्गेरियावर चालून आले. बल्गेरियाचा झार दुसरा बोरीस याने ग्रीक बादशहा जॉन झिमिसस यांच्या मदतीने त्यांना हाकंलून लाविले. परंतु या जयाचा फायदा घेऊन ग्रीक लोकांनी बोरीस यालाच पदच्युत केले. याप्रमाणे तीन शतकांनंतर पहिल्या बल्गर राज्याचा अंत झाला. तथापि शिशमनच्या सॅम्युएल नांवाच्या मुलाच्या कारकीर्दीत ऑचरिडचे राज्य बरेच उदयास आले पुढे सॅम्युएलचा पराभव होऊन त्या दुःखानेच तो मरण पावला. त्याच्या पश्चात् थोडयाच वर्षांनी त्याचे साम्राज्य लयाला गेले व नंतर दीडशे वर्षे (१०१८ - ११८६) बल्गर लोक बायझन्टाईन बादशहाच्या अंमलाखाली होते.

दुसरे साम्राज्य - इ.स. ११८६ मध्ये ट्रोनोव्हो येथील इव्हॅन व पीटर ऍसेन या बंधूंच्या नेतृत्वाखाली बल्गरांनी बंड करून आपले स्वातंत्र्य मिळविले. इव्हॅननें बादशहापद धारण करून ट्रोनोव्हो ही आपली राजधानी केली. त्याने पोपची धार्मिक सत्ता कबूल करून पोपच्या प्रतिनिधीकडून आपणांस राज्याभिषेक करविला. दुसरा इव्हॅन हा सर्व बल्गर राजांत मोठा झाला. त्याने अल्बेनिया, एपायरस, मॅसिडोनिया व थ्रेस हे प्रांत आपल्या सत्तेखाली आणिले व मोठया शहाणपणाने न्यायानें राज्य केले. त्याच्या वेळी व्यापार, कला, वाङमय यांची अभिवृध्दि झाली. इ.स. १२५७ मध्ये त्याचा वंश खुंटून बंडाळी सुरू होऊन दुसरी दोन घराणी उदयास आली. त्यांपैकी एकाची राजधानी ट्रोनोव्हो येथे होती व दुस-याची व्हिडिन येथे होती. शेवटी (१३३० जून) बल्गर राजा मायकेल शिशमाड याला सर्व्हियन राजा स्टीफन याने लढाईत ठार केले. पुढील बल्गर राजे सर्व्हियन राजांचे मांडलिक बनले. स्टीफनच्या मरणानंतर (१३५५) सर्हियाची साम्राज्यसत्ता नष्ट झाली. व त्या द्वीपकल्पांतील निरनिराळया जाती आपसांतील भांडणामुळे मुसुलमानी अंमलाखाली गेल्या.

तु र्क लो कां च्या स्वा -या व त्यां चे वि ज य. - इ.स. १३४० त बल्गेरियावर तुर्क लोकांच्या स्वा-या सुरू झाल्या व इ.स. १३९६ त त्यांनी ते द्वीपकल्प पूर्णपणे पादाक्रांत केले. तुर्कांचा पांचशे वर्षाचा (१३९६ – १८७८) अंमल हा बल्गेरियाच्या इतिहासांतील एक अंधकारपूर्ण काल आहे. त्यांनी देशभर सरसहा जुलूम केल्याने देश उजाड झाला. सर्व अधिकार तुर्कांच्याच हाती गेला. तथापि बल्गर शेतक-यांची मात्र स्थिति साधारण बरी होती. लढार्इत नोकरी करण्याची त्यांच्यावर सक्ति नव्हती. त्यांचा धर्म, भाषा व स्थानिक राज्यपध्दती ही बदलून टाकण्याचा पध्दतशीर प्रयत्न तुर्कांकडून झाला नाही. इतकेंच नाही तर पुढे पुढे त्यांनी कांही शहरांस व गांवास विशेष प्रकारचे हक्क दिले. यावेळेस रयत लोकांची स्थितीहि सुधारली, व्यापार वाढला, परंतु पुढे जेव्हा तुर्की सुलतानाची सत्ता कमी होऊ लागली तेव्हा देशांत पुन्हा बंडाळी माजली व बल्गर लोकांना फार त्रास झाला.

बल्गेरियाची जागृतिः - इ. सनाच्या १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत बल्गेरियन वंशाची साग्र महिती यूरोपमध्ये स्लाव्ह लोकांनाहि नव्हती. अनेक शतके जुलमी अंमलाखाली राहिल्याने बल्गेरियन लोकांत हिंमत राहिली नव्हती. बल्गेरिया दुस-या ख्रिस्ती राष्ट्रांपासून फार दूर असून कॉन्स्टांस्टिनोपल जवळ होते. ह्या कारणामुळे ज्या लढायांनी ग्रीस व सर्व्हिया यांस स्वातंत्र्य मिऴविता आले त्या लढाईंत बल्गेरियाला भाग घेता आला नाही. इ.स. १८१० व १८२८ या वर्षी झालेल्या रशियन स्वा-यांमुळे बल्गेरियाला जास्तच त्रास झाला. पुढे देशी वाङमयाचे पुनरुज्जीवन होऊन नवीन विचारांचा संचार झाला. माऊन्ट अथॉस येथील एक साधु पैसी व बिशप सोफ्रोनी हे या जागृतीचे पुरस्कर्ते होत. एकाने बल्गेरियन झार व साधु यांचा इतिहास लिहिला व दुस-याने आपल्या आठवणी लिहिल्या. इ.स. १८३५ त पहिली शाळा उघडल्यावर पुढील १० वर्षांत पुष्कळ शाळा व छापखाने निघाले. या जागृतीमुळे लोकांमध्ये ग्रीक धार्मिक सत्तेच्या विरुध्द चळवळ सुरू झाली. बल्गेरियातील राष्ट्रीय भावना नष्ट होण्याचे मुख्य कारण तुर्कीसत्तेपेक्षां ग्रीक पेट्रीआर्केट हेंच होते. बल्गेरिया तुर्कांच्या अंमलाखाली गेल्यानंतर निरनिराळया स्वतंत्र ख्रिस्ती राष्ट्रांची चर्चे नाहीशी होऊन ग्रीक पॅट्रीआर्वहि त्या सर्वांचा प्रतिनिधी बनला. ट्रनोव्हो व ऑचरिडा येथील चर्चचे स्वातंत्र्य नाहीसे होऊन त्या जागी ग्रीक धर्माध्यक्षांचीं नेमणूक झाली. तेव्हा त्यांच्याविरुध्द वाङमयजागृतीच्या पुरस्कर्त्यांनी आपले सर्व प्रयत्न चालविले. मात्र त्याबरोबरच शिक्षणाचा प्रसार जारीने सुरू केला. ग्रीक धार्मिक सत्तेविरुध्द पुष्कळ बंडे झाली परंतु त्यांनां लोकाचा पांठिबा न मिळाल्यामुळे यश आले नाही. शेवटी बल्गेरियाची इतर राष्ट्रामध्ये जी गणना झाली ती त्याच्या तरवारीच्या जोरावर न होता मुत्सद्दी पणानेंच झाली. ग्रीक पेट्रीआर्वेट व बल्गेरियन यांची भांडणे विकोपास गेली, व शेवटी तुर्की सत्ता मध्ये पडून तिने बल्गर लोकांस स्वतंत्र चर्चे दिली. पुढे ग्रीक पट्रियार्क याने सर्व बल्गर लोकांना बहिष्कृत केल्यामुळे भांडण जास्तच वाढून त्याचा शेवट बल्गेरियाच्या राजकीय स्वातंत्र्यात झाला.

इ. स. १८७६ चे बंड - मिधतपाशा याच्या कारकीर्दीत बल्गेरियाची बरीच प्रगति झाली. इ.स. १८६१ व १८६४ या वर्षी त्याने बल्गर लोकांच्या जमिनी जप्त करून त्या तार्तर वगैरे लोकांस दिल्या. इ.स. १८७५ या वर्षी बोस्निया व हर्झेगोव्हिना या प्रांतातील बंडामुळे मुसुलमान लोक चिडून गेले. बल्गर लोकांनी सार्वजनिक बंड उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु तुर्कांनी त्यांचा अतिशय क्रौर्याने मोड केला. तेव्हा इंग्लंडात ग्लॅडस्टनने या कृत्यांचा फार निषेध केला. यामुळे सर्व यूरोपभर तुर्कांविरुध्द खळबळ उडाली. मोठमोठी राष्ट्रे तटस्थ राहिली. परंतु सर्व्हिया युध्दांत जाऊन मिळाला. कान्स्टांटिनोपल येथे निरनिराळया राष्ट्रप्रतिनिधींची सभा भरून मुसुलमान गव्हर्नरांच्या हाताखाली बल्गेरियाचे दोन भाग करून राज्यकारभारांत लोकप्रतिनिधी घेण्याचे ठरले, पंरतु तुर्की बादशहाने हे ठराव फेटाळून लाविले; म्हणून रशियाने युध्द जाहीर केले (१८७७). त्यांत बल्गर स्वयंसैनिकांनी मोठा पराक्रम करून रशियास बरीच मदत केली.

सॅन स्टेफॅनो व बर्लिन येथील तह - रशियास जय मिळाल्यामुळे रशिया व तुर्कस्तान यांच्यामध्ये तह होऊन बल्गेरिया स्वतंत्र झाला. हा बल्गेरिया रशियाचा मांडलिक होईल या भीतीने पुढे यूरोपांतील प्रमुख राष्ट्रांनी मध्ये पडून हा झालेला तह मोडून दुसरा एक बर्लिन येथे तह केला. त्यामुळे बल्गर राष्ट्राचे बल्गेरिया, पूर्वरुमानिया, मॅसिडोनिया असे तीन भाग पडले शिवाय या तहाने असे ठरले की, बल्गर लोकांनी स्वतः राजा निवडावा व कायदे करावे आणि नंतर तुर्की बादशहाने त्यांस संमति द्यावी. यानंतर ट्रनोव्हो येथे राज्यघटना तयार होईतोपर्यंत बल्गेरियाचा राज्यकारभार रशियाच पहात होता. वयांत आलेल्या प्रत्येक मनुष्यास निवडणुकीचा हक्क, सर्व राजकीय भेदांचा अभाव, कार्यकारी मंडळात लोकनियुक्त व सरकारीनियुक्त दोन्ही प्रकारचे सभासद नेमणे ही त्या घटनेची मुख्यांगे होती. बल्गेरियाचा पहिला राजा अलेक्झांडर हा रशियाचा बादशहा दुसरा अलेक्झांडर याचा पुतण्या होता. याच्या कारकीर्दीतील महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे बल्गेरियांत झालेले रशियाचे वर्चस्व व अलेक्झांडर ह्याचे अनियंत्रित राजकीय संस्था पुन्हां सुरू करण्याचे प्रयत्न, यांस उदारमतवादी लोकांचा विरोध ही होय. यावेळी दोन्ही बाजूंच्या लोकांत माथेफिरूपणा, निश्चय व अहंमन्यता होती. त्यामुळे भांडण विकोपास जाऊन राज्य सुरळीत चालविणे अशक्य झाले. शेवटी अलेक्झांडर याने रशियाच्या झारच्या संमतीने सर्व सत्ता आपल्या हातांत घेतली (१८८१). पुढे दहा वर्षांनी अलेक्झांडर याचा रशियन बादशहाशी असलेला संबंध तितका चांगला राहिला नाही. दिवसेंदिवस त्याची सत्ता कमी होऊन त्यास शेवटी उदारमतवादी लोकांशी समेट करणे भाग पडले. त्यानें ट्रनोव्हो येथील घटना कबूल करून कारभारांत जहाल व मवाळ या दोघांचाहि समावेश केला.

पूर्व रुमानियाशी बल्गेरियाचे एकीकरण. – बल्गेरियाप्रमाणे, पूर्व रुमानियांत देखील प्रजा आणि राजा यांमध्ये तंटा सुरू होऊन दोन राजकीय पक्ष उत्पन्न झाले हे दोन्ही पक्ष बल्गेरियाच्या एकीकरणास अनुकूल होते शेवटी जहाल पक्षाने गर्व्हनर जनरल क्रिरतोविच पाशा यास पदच्युत करण्याचा एक कट केला (१८८५). यावेळी पाशा यास तुर्कस्तानने मदत केली नाही व इकडे अलेक्झांडरनेंहि या कटास आपली संमति दिली. त्यामुळे जहालांनी पाशास हांकून देऊन पूर्व रुमानियाचे बल्गेरियाशी एकीकरण केले व अलेक्झांडर हा दोन्ही प्रांतांचा राजा झाला परंतु बर्लिनचा तह मोडला म्हणून इतर राष्ट्रांनी ओरड केली. रशियाने तुर्कस्तानच्या बादशहास पूर्वरुमानिया पुन्हा जिंकून घेण्याचा आग्रह केला.

सर्व्हियाशी युध्द - तुर्की सैन्य तयार होऊ लागले व बल्गेरियातून रशियन कामगार परत बोलावले गेले, बल्गेरिया अशा अडचणीत असता सर्व्हियाने त्याच्याविरुध्द युध्द सुरू केले. परंतु बल्गेरियन लोकांनी यावेळी मोठे शौर्य दाखवून शत्रूचा पराभव केला. तेव्हा आस्ट्रिया मध्ये पडून बुखारेस्टचा तह झाला (१८८६) त्या अन्वयें अलेक्झांडर हा पूर्व रुमानिया व बल्गेरिया यांचा राजा ठरला गेला. परंतु हे दोन देशांचे एकीकरण फक्त त्याच्या हयातीपुरतेंच रहावयाचें असे ठरले इतक्यांत त्याच्या विरुध्द कट होऊन कटवाले त्याला रशियांत घेऊन गेले. परंतु तत्काल सर्वत्र चळवळ सुरू होऊन लोकांनी त्याला पुन्हां परत आणलें, पण त्याने आपण रशियाच्या हातांत राज्य देण्यास तयार आहो असें जाहीर केले. त्यामुळे तो लोकांच्या अनादरास पात्र होऊन त्यास राज्य सोडावे लागले. पुढे प्रतिनिधिमंडळ स्थापिले जाऊन त्यानें पुष्कळ राजपुत्रांस बल्गेरियाचें राज्य देऊं केले. पण कोणी स्वीकारीना. शेवटी (१८८७) सॅक्सकोबर्ग गोथा येथील फर्डिनंड नांवाच्या राजपुत्राने राज्य स्वीकारिले. पण रशियाने त्यास मान्य केले नाही, शिवाय त्याच्या विरुध्द पुष्कळ शत्रूहि उठले; परंतु त्याचा प्रधान स्टँबबोल्फ यानें त्यास सर्व अडचणीतून पार पाडिले परंतु स्टँबबोल्फच्या अरेरावीपणाने त्याला पुष्कळ शत्रू उत्पन्न होऊन शेवटी भर रस्त्यांत त्याचा खून झाला (१८९५). त्याच्या मरणानंतर फर्डिनंडचे व रशियाचे सौरस्य जमले. पुन्हा रशियाचें वजन बल्गेरियांत वाढले, परंतु रशियानें बल्गेरियाच्या अंतर्व्यवस्थेत हात घातला नाही.

स्वातंत्र्याचा जाहिरनामा - यानंतर तीस वर्षेपर्यंत बल्गेरियांत एकसारखी प्रगति झाली. बल्गर लोकांत राष्ट्रीय भावनेची वाढ झाली. जरी तुर्कस्तानची साम्राज्यसत्ता नामधारी होती तरी बल्गरांनां सहन न होऊन ते स्वतंत्र होण्याची खटपट करू लागले. याच वेळेस तुर्कस्तानच्या अंतर्व्यवस्थेत बदल होऊन त्याच्या बल्गेरियाविषयींच्या धोरणांत बदल झाला. यावेळी मॅसिडोनियाचा कांही भाग आपणास मिळेल अशी बल्गेरियाची आकांक्षा होती, परंतु त्यास कांहीच मिळाले नाही. तेव्हा बर्लिनचा तह मोडण्याचा त्याने निश्चय केला, तुर्कस्ताननें आपल्या मालकीची पूर्वरुमानियन रेल्वे ओरिएन्टल कंपनीला मक्त्याने दिली होती. त्या रेल्वेवर संप होऊन सर्व त-हेचे व्यवहार बंद झाले. परंतु तुर्कस्तानचें सैन्य मात्र आगगाडयांतून जात येत होते. ही गोष्ट आपणांस फार धोक्याची आहे या सबबीवर बल्गेरियाने ती रेल्वे आपल्या हातांत घेतली. त्यावेळी तुर्कस्तानचे सैन्य आशियांत होते. रशिया युध्दामध्ये पडण्यास तयार नव्हता. ऑस्ट्रिया हा बोस्निया व हरझेगोव्हिना हे प्रांत जिंकण्याच्या उद्योगांत होता. या परिस्थितीचा फायदा येऊन फर्डिनन्ड याने बल्गेरिया हे इतःपर तुर्कस्तानचे मांडलिक नसून एक स्वतंत्र राष्ट्र आहे असे जाहीर केले (आक्टो. १९०८). तुर्कस्तानने यूरोपीयन राष्ट्रांपाशी याबद्दल तक्रार केली. परंतु शेवटी तुर्कस्तानने भरपाई घेऊन हा वाद मिटवावा असे ठरले आणि याप्रमाणे बल्गेरियाला स्वातंत्र्य मिळाले.

१९११ साली मॅलिडोव्हचे प्रधानमंडळ जाऊन त्याच्या जागी ग्यूएशोव्ह हा कौन्सिलचा अध्यक्ष झाला. मॅसिडोनियांतील परिस्थिती फार गुंतागुंतीची होत चालल्यामुळे व तुर्कांचा बंड करण्याचा उद्देश दिसूं लागल्यामुळे बल्गेरियानें ग्रीसशी व सर्व्हियाशी गुप्त तह केला. १९१२ साली कोचेन येथे बॉंबप्रकरण उपस्थित होऊन त्यामुळे तुर्कांनी बल्गेरियन लोकांची कत्तल केल्यामुळे, बाल्कन संस्थानांनी तुर्कांविरूध्द लढाई पुकारली. तींत बाल्कन संस्थानाचा जय होऊन लंडन येथे बाल्कन संस्थाने व तुर्कस्तान यांच्यामध्ये तह झाला (१९१३ मे) व पहिले बाल्कन युध्द समाप्त झाले. या तहाने तुर्कस्तानने मीडिया ते इनॉस या रेषेच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश बाल्कनसंस्थानांना द्यावा असे ठरले.

पण हा जो मुलूख बाल्कन संस्थानांनां मिळाला तो वाटून घ्यावयाच्या बाबतीत बाल्कन संस्थानांचे परस्परांमध्ये ऐकमत्य होईना व त्यामुळे दुस-या बाल्कन युध्दाला सुरवात झाली. ही लढाई एकीकडे बल्गेरिया व दुसरीकडे सर्व्हिया, ग्रीक, माँटेनीग्रो व रुमानिया यांच्यामध्ये होती. या युध्दांत बल्गेरियाचा पराभव होऊन बुखारेस्ट येथे युध्यमान राष्ट्रांमध्ये तह घडून आला. या तहाने पहिल्या बाल्कन युध्दंत बल्गेरियाला जो मुलूख मिळाला होता त्याला बल्गेरिया मुकला, रुमानियाला बल्गेरियाच्या ताब्यांत असलेला डोब्रूजाचा मुलूख मिळाला, सर्व्हिया आणि ग्रीस यांना मॅसोडोनियाचा प्रांत मिळाला व तुर्कांनीहि ऑड्रियानोपल व बराचसा थ्रेसचा भाग जिंकून घेतला.

पण बुखारेस्टचा हा तह फार दिवस टिकणार नाही ही भीति सर्वांनाच वाटत होती. मॅसिडोनिया प्रांत आपल्या ताब्यांत असावा अशी बल्गेरियाला बळकट इच्छा होती. इतक्यांत महायुध्दाला सुरवात झाली. दोस्तांनी व जर्मनीने बल्गेरियाने आपल्या बाजूने महायुध्दांत भाग घ्यावा अशाबद्दल खटपट केली. शेवटी बल्गेरियाचा राजा जर्मनीच्या अमिषास बळी पडून त्याने दोस्तांविरुध्द लढाई पुकारली. या गोष्टीला खुद्द बल्गेरियांतील लोकहि विरुध्द होते. पुढे बल्गेरियाने रुमानियावर चढाई करुन डोब्रूजाचा मुलूख परत घेतला. जर्मनीचा पराभव झाल्यावर दोस्त राष्ट्रांशी बल्गेरियाने न्यूइली येथे तह केला. या तहान्वये रुमानियाला डोब्रूजाचा मुलूख मिळाला. सर्व्हियाला सरीब्राड व स्ट्रमित्सा ही शहरे मिळाली व थ्रेसमधील मुलूख दोस्त राष्ट्रांच्या व तत्साहाय्यक ऍसोशियेटेड पावर्सच्या देखरेखीखाली रहावयाचे ठरले. ईजियन समुद्रांतून व्यापार करण्यांला मात्र बल्गेरियाला परवानगी मिळाली. १९२० च्या सॅन रेमीयो परिषदेला बल्गेरियाला आमंत्रणहि देण्यांत आले नाही व थ्रेसचा कांही भाग तुर्कांना व उरलेला भाग ग्रीसला देण्यांत आला. बल्गेरियाने ९ कोट पौंड खंडणी दोस्ताना ३७ वर्षात द्यावयाचें ठरले व त्याला जास्तीत जास्ती ३३००० सैन्य ठेवण्याची परवानगी देण्यांत आली. १९२० च्या निवडणुकीनंतर स्टचोलिस्की हा प्रधान झाला. याच साली बल्गेरियाला राष्ट्रसंघांत बसण्याचा हक्क मिळाला.


भा षा. - बल्गेरियन भाषा ही स्लाव्होनिक भाषासमूहाची एक शाखा आहे. तिचे पाद्य्रांच्या जुन्या स्लाव्होनीक भाषेशी बरेच साम्य आहे. जुन्या बल्गेरियन भाषेंत हल्ली पुष्कळ फेरफार घडून आलेले आहेत व ती अधिक सोपी करण्यांत आलेली आहे. उदाहरणार्थ पूर्वीच्या बल्गेरियन भाषेंत जे विभक्तिप्रत्यय होते ते बदलून हल्ली निरनिराळया विभक्तींसाठी निरनिराळी शब्दयोगी अव्यये घालण्याची पध्दत सुरू झाली आहे. १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात ही नवीन बल्गेरियन भाषा प्रचारांत आली. या भाषेचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. पण हल्ली पूर्व बल्गेरियन भाषाच सर्वत्र वापरण्यांत येते. या अर्वाचीन बल्गेरियन भाषेत तुर्की, ग्रीक, रशियन, फ्रेंच इत्यादी अनेक भाषेंतील शब्द आढळतात. पूर्वी बल्गेरियांत ग्लॅगोलिटिक व सीरिलिक अशा दोन लिप्या प्रचारांत होत्या, पण पुढे सीरिलिक लिपी हीच राजरोस वापरण्यांत येऊं लागली. त्यानंतर पीटर दि ग्रेटच्या काळांत या दोन्ही लिप्या जाऊन रशियन लिपीच वापरण्यांत येऊ लागली, पण हल्लीच्या बल्गेरियन लिपीत या तीन्ही लिप्यांतील अक्षरांचे मिश्रण आढळते.

वाङमय - प्राचीन बल्गेरियन वाङमयांत मुख्यतः ग्रीक भाषेंतील धार्मिक पुस्तकाच्या भाषांतराचाच भरणा असे. सेंट सीरिल, मेथोडीयस व यांच्या शिष्यांनी हे भाषांतराचें काम केले. पुढे बोरीसच्या धर्मान्तरापासून ते तुर्की सत्तेच्या स्थापनेपर्यंत बल्गेरियन वाङमयावर बायझंटाईन संस्कृतीची छाप बसलेली आढळते. या काळचेंहि वाङमय मुख्यतः धार्मिक असे. बायबलची व ग्रीक बखरीची भाषातरें करण्यापलीकडे स्वतंत्र वाङमय असे या काळात निर्माण झालेच नाही. सीमीऑन झारच्या अमदानीत इतर वाङमय थोडेसे निर्माण होऊं लागले. त्यांत जॉनचा 'शेस्तोनेव' हा उत्पत्तिविषयक प्रश्नांवर लिहिलेला ग्रंथ प्रमुख होय. पुढे थोडया काळांनतर, बोगोमिल हे नास्तिक लोक आहेत या मताचा प्रसार ज्या वेळी होऊं लागला त्या वेळी बोगोमिल लोकांनी या प्रसाराविरुध्द लिहिण्यास सुरवात केली. त्यावेळी बरेंच वाङमय निर्माण होऊं लागले. त्यापैकी 'क्वश्चन्स' ऑफ सेंट इव्हॅन बोगोस्लॉफ हा जगाच्या आद्यन्तासंबंधीचे विवेचन करणारा ग्रंथ प्रमुख होय. याच सुमारास अलेंक्झांडर दि ग्रेटचे चरित्र, ट्रॉपचा वेढा, स्टेफानिट व इखनिलट, बारलाम आणि जोसाफट इत्यादी कादंबरीवजा चरित्रवजा वाङमय बाहेर पडूं लागले. बारलाम आणि जोसाफट ही गोष्ट बुध्दाच्या जन्मविषयक हकीकतीच्या आधारे लिहिलेली आढळते. १३ व्या शतकांत आसेन राजघराण्याच्या कारकीर्दीत ऐतिहासिक ग्रंथ बरेच लिहिले गेले. पण ऑटोमन सत्तेखाली वाङमयाला पूर्णपणे उतरती कळा लागली. बल्गेरियन वाङमयातील प्रसिध्द लेखक पैसी व सोफ्लोनी हे होत. हे दोघेहि १८ व्या शतकांत उदयास आले. 'इस्टोरिया स्लव्हेनो-बोल्गस्की' हा पैसीचा महत्त्वाचा ग्रंथ होय. ऐतिहासिक द्दष्टया याची विशेष किंमत नाही तथापि यांत प्राचीन बल्गेरियातील झार व साधू यांची चरित्रे आली असल्यामुळे, त्याची बल्गेरियन लोकांमध्ये लोकप्रियता वाढली. त्याचप्रमाणे 'दि लाइफ ऍंड सफरिंग्स ऑफ सिनफुल सोफ्रीनी' या ग्रंथांत १९ व्या शतकांतील बल्गर लोकांची निकृष्ट स्थिति वर्णिली आहे. हे दोन्ही ग्रंथ पाद्रयांच्या स्लाव्होन भाषेंत लिहिलेले आहेत. खुद्द बल्गेरियन भाषेंत लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे सोफ्रिनीचा कीरिया कोट्रोमियान (स. १८०६) हा होय. सर्व्हियन व ग्रीक लोकांनी बल्गरांची कत्तल सुरू केल्यामुळे त्यावेळी बल्गेरियांतून पळून गेलेल्या लोकांनी या अमानुष गोष्टींच्या निषेधार्थ जे वाङमय निर्माण करण्यास सुरवात केली, त्यामुळे बरेंच राष्ट्रीय वाङमय बाहेर पडू लागले. १८२४ साली बुखवार नावांचा एक छोटा ग्रंथ प्रसिध्द झाला. त्यानंतर ऐतिहासिक गोष्टी, कांदब-या इत्यादि ग्रंथ लिहिले गेले. पुढे बल्गेरियन भाषा शिकवणा-या शाळा स्थापन होऊं लागल्या. त्यावेळी बल्गेरियन भाषेचे व्याकरणग्रंथ व शिक्षणविषयक पुस्तकें बाहेर पडूं लागली. रिल्स्की हा बल्गेरियन भाषेचा पहिला व्याकरणलेखक होय. राकोबस्की(१८१८ – १८६७) हा राष्ट्रीय वाङमयाचा जनक होय. करॉवेलाफ (१८३७ – १८७९) हा वर्तमानपत्रकार व कादंबरीकार होता. बोटफ हा उत्कृष्ट भावनागीतलेखक होता. याचे हजी दि मिटिर या बंडखोर मित्राच्या निधनावरील गीत फारच उत्कृष्ट आहे. स्लावीकोक याने अनेक काव्यें लिहून बल्गेरियन भाषेत उत्तम प्रकारची काव्ये करता येतात हे सिध्द केले. क्रस्तोविच याने अनेक ऐतिहासिक ग्रंथ लिहिले. स्टंबाल्फ याची औपरोधिक कवनांबद्दल प्रसिध्दी असून त्याचा मित्र स्टोयानोफ (मृत्यू १८८९) हा बखरकार म्हणून प्रसिध्द आहे व झोफ (जन्म १८५०) हा अर्वाचीन काळचा उत्कृष्ट गद्य व पद्य लेखक होय. त्याच्या पोद इगोटी या कादंबरीचे बहुतेक यूरोपीय भाषांत भाषांतर झाले आहे. क्लेमेंट याच्या कांदब-या व इव्हांको हे नाटक फार लोकप्रिय आहे. झ्लाटस्की व बाँशेफ यांनी भूगोलविषयक ग्रंथ लिहिले आहेत. तत्त्वज्ञान, कला, टीकाशास्त्र यासंबधी मात्र बल्गेरियन भाषेंत पुस्तके नाहीतच म्हटले तरी चालेल. पीरियडिच्छेस्को स्पीसानी व स्बोर्निक ही वृत्तपत्रे प्रसिध्द आहेत.

(संदर्भग्रंथ - शूरमन – बाल्कन वार्स १९१२-१३(१९१४); वॅटसन – राइज ऑफ दि नॅशनॅलटी इन बाल्कन्स (१९१७); ग्यूएशोव – दि बाल्कन लीग (१९१५); बाल्कॅनिकस -ऍस्पिरेशन ऑफ बल्गेरिया (१९१५), बोर्शियर दि फायनल सेटलमेंट इन दि बाल्कन्स (१९१७).)

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .