विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहादुरगड - १६७२ साली पावसाळयांत मोंगलांचा त्या वेळचा दक्षिणेचा सुभेदार बहादुरखान याने भीमेतीरी पांडेपेडगाव येथे छावणी दिली असता तेथे त्याने एक भुईकोट किल्ला बांधून त्यास बहादुरगड असे नांव दिले. चाळिसाहूनहि अधिक वर्षेंपर्यंत हा किल्ला पुणे प्रांतांतील मोंगल सैन्याची युध्दसामुग्री सांठविण्याचे एक मुख्य ठिकाण होते. ग्रँटडफच्या वेळी या किल्ल्याने बहादुरगड हे नावं राहिले नव्हते. हल्ली किल्ला सर्व पडून गेला आहे.