विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बॉइल, राबर्ट (१६२७ – १६९१) - एक इंग्लिश शास्त्रज्ञ, याने इटन येथे अध्ययन संपवून यूरोपचा प्रवास केल्यावर 'अद्दश्य विद्यालय' नांवाची संस्था काढली. याने वाताकर्षक यंत्राच्या साहाय्याने व राबर्ट हूक याच्या मदतीने कित्येक प्रयोग करून पुढील नियम सिध्द केला - ''वायूचे आकारमान आणि त्याचा दाब हे परस्पराशी व्युत्क्रमप्रमाणांत असतात,'' यास बॉईलचा नियम म्हणतात. यानें रसायन व पदार्थविज्ञानशास्त्रावर बरेच परिश्रम केले.