विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बांगरमौ - संयुक्तप्रांत. जिल्हा उनाऊ, तालुका सफीपूर. हें गांव कल्याणी नदीजवळ व उनाऊपासून हरदोईस जाणा-या रस्त्यावर आहे. लोकसंख्या सुमारे ५ हजार. येथून सुमारे २ मैलांवर नवल नावाच्या प्राचीन टेंकडया आहेत. या ठिकाणी पूर्वी राजवाडयाचे अवशेष असून तेथे ह्यूएनत्संग हा गेला होता.