विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बागलाण - मुंबई इलाखा. नाशिक जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगरांच्या उत्तरेकउील प्रदेश. यांत बागलाण व कलवण तालुके आहेत. प्राचीन काळी हा प्रदेश राठोड घराण्याच्या ताब्यांत होता, व दख्खन आणि गुजराथ यांच्या दरम्यान चालणा-या व्यापाराचा मार्ग या प्रदेशांतून असल्यामुळे याची भरभराट असे. दक्षिणच्या इतिहासांत यास बरेंच महत्त्व होते.