विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाघपत, तालुका – संयुक्तप्रांतांत, मीरत जिल्ह्याचा वायव्येकडील तालुका. यांत बाघपत, बरौत, कुताना, छप्रोली हे परगणे आहेत. क्षेत्रफळ ४०१ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) २९४२८३. बरौत, बाघपत, खेक्रा व छप्रोली ही मुख्य गांवे होत.
गां व - बाघपत तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे मीरतपासून ३० मैल आहे. लो.सं. पांच हजार. महाभारतांत असलेले व्याघ्रप्रस्थ गांव ते हेंच होय असे म्हणतात. कसबा म्हणजे शेतकी भाग व मंडी (मंडई?) म्हणजे व्यापारी भाग असे या गांवाचे २ भाग आहेत. स.१८६९ पासून १९०४ पर्यंत येथे म्युनिसिपालिटी होती. येथे अबदाली यमुना उतरून पानिपतास आला.