विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बादरायण - ब्रह्मसूत्रांचा कर्ता. ब्रह्मसूत्रांना वेदान्तसूत्रे अगर व्याससूत्रे असे म्हणण्याचाहि प्रघात आहे. त्यावरून बादरायणाला व्यास हेहि नाव होते असे दिसते. या आधारावरून बादरायण व्यास व वेद व्यास हे एकच होत, असा प्रो,वेवर याने निष्कर्ष काढला आहे; पण कै.तेलंग यांनी प्रो.बेबरचे म्हणणे चुकीचे आहे असे पुराव्यानिशी सिध्द केले आहे कै.लो. टिळकांच्या मते बादरायणव्यासानेच ब्रह्मसूत्रे व गीता ही रचिली असावीत व यावरून बादरायण हा इ.स.पूर्व. ५०० वर्षांपूर्वी झाला असावा, असे दिसते. ब्रह्मसूत्रांमध्ये उपनिषदांतील भिन्न भिन्न अध्यात्मसिध्दांतांचे पध्दतशीर विवेचन केलेले आहे.