विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारबरटन - हे ट्रान्सव्हालचे मुख्य शहर असून प्रिटोरियाच्या पूर्वेस रेल्वेने २८३ मैल आहे. १९०४ साली येथील लोकसंख्या २४३३ होती. हे समुद्रपाटीपासून २८२५ फूट उंच असून, कापखिंडीजवळ आहे. कापखिंडीत सोने सापडूं लागल्यामुळे १८८६ साली हे शहर अस्तित्वांत आले. १९०२ सालच्या युध्दांत सर जॉन फ्रेंचने बोअर लोकांना येथून घालवून दिले.