विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारमूळ - काश्मीर संस्थानातील एक गांव. लोकसंख्या सुमारे पाचं हजार. हे गाव झेलम नदीकाठचे बंदर असल्यामुळे त्याला महत्त्व आलेले आहे. बारमूळ येथे धरणीकंप वारंवार होतात. १८८५ साली धरणीकंपाने गांवाचा बहुतेक नाश झाला होता. प्राचीन वराहमूळ या गांवाच्या नावावरून बारमूळ हे नांव पडले आहे. हल्लीच्या बारमूळ गांवी, पूर्वी हविष्कनावाच्या राजाने वसविलेले हुष्कपूर नावाचे गांव होते.