विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारवल - एक जात. यांची वस्ती पंजाब (८५६५७) व काश्मीर संस्थानांत (११३५५) आहे. हिंदु व मुसुलमानी अशा दोन्ही धर्मांचे अनुयायी या जातींत आढळतात. उंच टेकडयांवर राहणा-या लोकांना बारवल म्हणतात. चांभार लोकांप्रमाणे हे लोक हलक्या जातीचे असून ते मोलमजुरी व गवत विकण्याचा धंदा करतात.