विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारिसाल – बंगाल. वकरगंज जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे बारिसाल नदीच्या पश्चिमतीरावर आहे. लोकसंख्या सुमारे २२ हजार. अठराव्या शतकाच्या मध्यंतरी बारिसाल येथे महत्त्वाची मिठाची चौकी होती, व येथे मिठावर कर गोळा करीत असत. १८७६ साली बारिसाल येथे म्युनिसिपालिटी स्थापन झाली. शहरांतील रस्ते रुंद व सरळ असून चांगले ठेवलेले आहेत. येथे १८५५ साली स्थापिलेले सार्वजनिक वाचनालय आहे. येथे ब्रिज मोहन कॉलेज, पांच हायस्कुले, पहिल्या प्रतीचे एक कॉलेज व एक औद्योगिक शाळा आहे.