विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बालकंपवातरोग (कोरी) - हा वातरोग बहुतकरून बालवयांत आढळतो व त्याचे मुख्य लक्षण हे की सर्व शरीरांतील स्नायूमधून झटके आल्याप्रमाणे हलतात.
का र णे - नऊ ते बारा वर्षांपर्यंत म्हणजे बालवयांत पहिले दांत पडून जाऊन नवे दांत येण्याच्या सुमारास हा रोग विशेष आढळतो. अति लहान लेकरांत व जेव्हा यौवनावस्था प्राप्त होते त्या चवदा वर्षांपुढील मुलांना हा रोग झाल्याचे फार करून पाहण्यांत येत नाही, पण या नियमास अपवादहि बरेच सांपडतात. मुलींमध्ये हा वातरोग जितक्या प्रमाणांत आढळतो त्यापेक्षा मुलांना तो झालेला दुप्पट अधिक प्रमाणांत आढळतो. अगोदर प्रकृति कांही कारणामुळे अशक्त होऊन त्यांत पूर्वानुवंशिक वातरोग होण्याची साहजिक प्रवृत्ति असल्यास तशा मुलांना हा रोग होतो. या रोगाचा आरंभ होण्यास तात्कालिक निमित्त, भीति, मुलास कठोरपणे वागविणे किंवा त्यास अतिश्रम पडणे, अपुरे अन्न, मनास अगर शरीरास कोणत्याहि प्रकारची फाजील दगदग, काळजी अथवा श्रम यांपैकी एखाद दुसरे होऊन त्यामुळे मनाचा संक्षोम होऊन दुखणे जडते. पुनर्दंतोद्भव, पोटांत जंत होणे, इत्यादी दूरस्थ पंरतु संक्षोभ करणारी अन्य कारणे ही रोगाचे निमित्त होऊ शकतात. गरोदरपणामध्ये हा वातरोग झाल्याची उदाहरणे पहाण्यांत येतात. संधिगत वायुरोगाचा व या रोगाचा निकट संबंध व कदाचित कार्यकारणभाव असावा असा अनेकदा अनुभव झाल्याचे सिध्द होऊन तो संबंध वैद्यशास्त्रांत मान्य झाला आहे. कारण रोगी मूल पूर्वी या रोगाने आजारी होते असा पूर्वेतिहास बहुधा सांपडतो किंवा संधिवातवायुरोग मुलाम प्रथम होतो व त्यांत झटके आल्याप्रमाणे रोग्याच्या इच्छेविरुध्द त्याचे स्नायू हलूं लागतात. यावरून या रोगाचा आरंभहि एखाद्या वेळी त्या रोगांतच होतो. शिवाय संधिगत वायूमध्ये ज्याप्रमाणे हृदयांतील एक अगर अधिक पडदे बिघडतात, त्याप्रमाणे ते हा रोग झाल्यामुळेहि बिघडतात. हा रोग ज्याच्यायोगे होतो असा रोगजंतू पॉईटन व पेन यांनी शोधून काढून शास्त्रज्ञ लोकांना त्यांचे अस्तित्व सिध्द करून दाखविले आहे. यामुळे हा रोग अंमट स्पर्शसंचारी असावा असा कित्येक वैद्यांचा तर्क आहे.
रो ग ल क्ष णे - भीति वगैरे कारणांचें निमित्त होऊन रोगाच्या लक्षणांस आरंभ होत असल्याचे आढळून आले आहे; तथापि तसे कारण न होता सावकाशपणे आपोआप रोगलक्षणांचा आरंभ अनेक रोग्यांत आढळतो. रोगाच्या पूर्वावस्थेत मूल अंमऴ अशक्त होऊन त्याच्या स्वभावांत चिडेखोरपणा, लहर व औदासिन्य असल्याचे दिसून येते, व लक्षांत येण्यासारखे पहिले लक्षण म्हणजे मूल कावरे बावरे होऊन त्यास एकदम सर्वांग किंवा काही विशिष्ट भाग हलविण्याचा चाळा लागला आहे असे वाटते. कधी मूल चालतांना एकच पाय सरपटत चालत असल्याचे नजरेस येते. यानंतर आरंभी तरी जे स्नायू आपोआप हालतात ते फक्त एका हाताचे किंवा पायाचे, मात्र त्यांनतर रोगाच्या पूर्णावस्थेतहि त्या अवयवापुरताच स्नायुकंप असतो किंवा अनेक ठिकाणी स्नायुकंप सुरू होतो, पण त्यांतल्या त्यांत उजव्या अगर डाव्या भागास जसा कंप विशेष स्पष्ट असतो तसा तो विरुध्द बाजूस नसतो. रोग पूर्णावस्थेस पोचला म्हणजे मूल उभे असो किंवा बसलेले असो ते संथपणे स्वस्थ बसत नाही, तर एकदा एक पाय नाही तर हात हालवील व लगेच दुसरा हातपाय, नंतर दुसरा कोणतातरी शरीराचा भाग-याप्रमाणे त्याचा अंगनाचरेपणा चालू असतो, कधी तोंडच वाकडेतिकडे करण्याचा चाळा त्याला लागतो. या लक्षणांवरून रोग ओळखण्यास कठिण पडत नाही. असा चाळा लागण्याचे कारण वातामुळे स्नायूंची बेशिस्त हालचाल हे होय. मूल आपण होऊन एखादी हालचाल कांही विशिष्ट कार्य करण्यासाठी करू लागते तेव्हा अगर परकी माणसे त्याच्या हालचालीकडे निरखून पाहूं लागली म्हणजे त्या मुलाचे हे अंगनाचविणे अगर चाळा अधिकच वाढतो, कारण स्नायूंवर त्याचा ताबा कमीच असतो. मुलांचे बोलणेहि चमत्कारिक येते. याचे कारण वातामुळे त्याच्या जिभेस जडत्व येते हे एक व त्यामुळे तो अनैच्छिकपणे आंत श्वास घेत असतांच शब्दोचार करतो, पोटांत अन्न जाण्याचीहि अडचण पडते, कारण घांस तोंडाशी पोचेपर्यंत तो बराचसा सांडतो व शिवाय अन्न गिळण्याचे स्नायू वातामुळे ती क्रिया नीट करीत नाहीत. मुलास जीभ दाखिवण्यास सांगितले म्हणजे मोठया मुष्किलीने कांपत कांपत तो जीभ बाहेर काढून दाखवितो न दाखवितो तोच ती पुन्हा आत नेतो. चालण्यामध्ये व इतर हालचाल करण्यामध्ये ह्या स्नायूंच्या बेशिस्तपणामुळे मुलांच्या चालण्यात, वागणुकीत व हालचालींत लक्षांत येण्याजोगता बेडौलपणा दिसून येतो. चालताना मूल थोडेसे चालते, नंतर अडखल्याप्रमाणे जरा थांबते, नंतर काही वेळ उडया मारीत चालते. व या अशा चालीमुळे पायांत पाय घोटाळून पुन्हा अडखळून थांबते. एकंदरीत सर्व स्नायूची क्रिच्या रोग्याच्या मनाप्रमाणे न चालता हवीतशी यदृच्छेने चालते, व म्हणून एका डाक्टराने या रोगांत ''स्नायूंना वेड लागते'' असे विनोदाने म्हटले आहे. त्या म्हणण्यांत बरेच सत्य आहे. अमुक एक ठरलेली क्रिच्या करावयाची अशी निश्चित क्रिया रोग्याकडून घडत नाही, कारण त्याच्या प्रत्येक स्नायूचा कल जणु काय स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागण्याचा असल्यामुळे रोग्यास सहज व सफाईने हालचाली करता येत नाहीत. हृदयाच्या वगैरे शरीरांतील अनैच्छिक स्नायूंच्या ठराविक गतीमध्ये मात्र बदल होत नाही हा विशेष लक्षांत ठेवण्यासारखा आहे, तथापि स्नायूंना अन्य त-हेने विकृति या रोगातंहि (संधिरोगांत होते तशी) होते, व त्यामुळे कायमचा हृदयरोग जडतो. रोगाचे स्वरूप विशेष तीव्र असल्यास त्या रोग्याचे पदोपदी नडते व त्याची प्रकृतिहि बरीच खालावलेली दिसते. पंरतु झोपेमध्ये मात्र रोगांची लक्षणे सौम्य असतात. रोग्यांच्या स्वभावांत व मनोरचनेत बदल होतो. मूल रागलोभादि मनोधर्मास लवकर विकारवश होऊन चिडखोर व अंमल वेडसर व दिसण्यात बावळट दिसते. तथापि हा बाह्य फरक कायमचा नसतो व जसजसा रोग कमी होतो तसतशी चर्येतहि सुधारणा होते. क्वचित्प्रसंगी या रोगाचे स्वरूप इतके तीव्र असलेले आढळते की रोग्यास स्नायूंच्या हालचालीमुळे इजा होऊ नये म्हणून मुद्दाम त्याचे हातपाय बांधून ठेवून अगर त्यास भूल येण्याचे औषध हुंगवून स्वस्थ ठेवावे लागते. असले रोगी असाध्यच असतात. कारण त्यांना झोप येत नाही, उत्तरोत्तर त्याची शक्ति क्षीण होत जाऊन शेवटी ते मरण पावतात. परंतु असले अपवादात्मक कांही रोगी वगळले असता बहुतेक रोग्याची लक्षणे एक दोन महिने किंवा कांही जास्त काळ टिकून नंतर कांही थोडया किंवा ब-याच कालानंतर रोग्यास पूर्ण आराम पडतो.
औषधोपचार - या रोगावर पुष्कळ औषधे प्रचारांत आहेत पण त्याचा खरा उपयोग कितपत होतो याची वानवाच आहे. कारण असे पाहिले आहे की रोग्यास आरोग्यवर्धक परिस्थितीत ठेविल्याने रोग आपोआप बरा होण्याच्या, पंथास लागतो ही गोष्ट सदा ध्यानात ठेविली पहिजे. म्हणून रोग्यास पचेल व रुचेल असे हलके पण पौष्टीक अन्न द्यावे. त्याच्या मनास त्रास, क्षोभ वगैरे न होईल असा बंदोबस्त राखावा. जंत वगैरे त्याचे कोठयात किंवा अन्य ठिकाणी काही विकृति असल्यास ती बरी करून त्याची एकंदर प्रकृति सुधारावी. लक्षणे जरा तीव्र असतील तरच मात्र रोग्यास घराबाहेर किंवा प्रसंगविशेषी अंथरुणातूनहि हलूं देऊ नये. परंतु हे कारण संपले म्हणजे होता होईल तो जितक्या लवकर रोग्यास उघडया हवेंत चालण्याचा व्यायाम घेण्यासाठी जाता येईल तितक्या लवकर त्यास हिडण्याची मोकळीक द्यावी. पण कोणी एका प्रसिध्द वैद्याच्या मते बेयर मिचेलच्या पध्दतिनुसार रोग्यास महिना दीडमहिना वेळेने व पूर्ण विश्रांती घेऊ द्यावी व निजवून ठेवावा. व त्या अवधीत त्यास बिलकूल हिंडू फिरु देऊ नये. सोमल, लोह व बंग ह्याचे क्षार व भस्मे एकंदर प्रकृति सुधारून रक्तात इष्ट सुधारणा घडवून आणून शक्ति वाढवितात म्हणून ती द्यावीत सोडासॅलिसिलेट हे औषध संधिवातावर रामबाण आहे म्हणून ते याहि रोगांत द्यावे असे काहि डॉक्टराचे मत आहे. अर्गट, क्यांफर मॉनोब्रोमोट व कढत पाण्यात फडक्याची घडी निजवून शेक करणे हे उपाय कोणी पसंत करतात. दिवसांतून पाठीच्या कण्यावर दोन वेळा ईयर या औषधाच्या तुषाराचा वर्षाव केल्याने स्नायूंच्या वेडयावाकडया हालचाली थांबतात असा अनुभव आहे झोपेसाठी पोटयाश ब्रोमाइड अथवा क्लोराल हैड्रेट हे औषध चांगले आहे. रोग जुनाट होऊ लागल्यास हवापालट करून रोग्यात सौम्य त-हेची तालीम करण्यास जिंकवावे. विजेचा पेटी लावून किंवा अंग माहितगाराकडून चोळविण्याने फायदा होतो. या उपायानीं रोग बरा झाल्यानंतर काही काळपर्यंत रोग्यास मनास चंड व राग येईल अशी खबरदारी ठेवावी. कारण त्याची मनःस्थिती व मज्जाशक्ति लवकर संक्षोम पावते. त्यास अति अभ्यास किंवा शारीरिक श्रम करू देंऊ नयेत.