विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाली – राजपुतान्यांतील, जोधपूर संस्थानांतील बाली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या पांच हजार. या गावांभोवती तट असून येथील किल्ला अद्याप चांगल्या स्थितीत आहे. येथून १० मैलांवर, राठोड रजपूत रहात असलेल्या प्राचीन हस्तकुंडी गांवाचे अवशेष अद्याप आहेत. ९९७ सालचा एक शिलालेख येथे सांपडला आहे. त्यांत दहाव्या शतकांतील पांच राजांची माहिती दिली आहे. हे गांव अठराव्या शतकाच्या अखेर जोधपूरच्या राजांच्या ताब्यांत आले.