प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर

बाळाजी बाजीराव पेशवे - उर्फ नानासाहेब, हे थोरल्या बाजीरावाचे पुत्र; यांचा जन्म ता ८ डिसेंबर १७२१ रोजी मौजे साते (नाणेंमावळ) येथें झाला, व मुंज १७२८ च्या जानेवारींत झाली. आणि स. १७३० च्या जानेवारीत गोपिकाबाईंशीं लग्न झालें. नानासाहेबांनी लहानपणीं राजकीय शिक्षण चिमणाजीआप्पाच्या व अंबाजी पुरंद-याच्या हाताखालीं सातारा येथें मिळालें. वडील स्वा-याशिका-यांवर असतां नानासाहेब साता-यास रहात असत. चवदा पंधरा वर्षांचे नाना साता-यास कशा बातम्या काढीत हें त्यानीं आप्पास आंग्रयाच्या बाबतींत प्रतिनिधीनें शाहूपांशीं चालविलेलें कारस्थान लिहून पाठविलें आहे, त्यांवरून व्यक्त होतें (१७३६-३८). थोरल्या बाजीरावाच्या धोरणाविरूध्द इंग्रजांनीं खटपट करण्यास गॉर्डन हा वकील थेट शाहूकडे पाठविला असतां, त्यानें तेथे नानांची भेट घेतली, त्यावेळी इंग्रजांचा हा भेदनीतीचा डाव त्यांनां पटला नाहीं (जून १७३९). या सालांत शाहूनें मिरजेवर स्वारी केली, तींत नाना होते, ही त्यांची पहिलीच खेप असावी. तेथून नाना पुण्यास परत आल्यावर मस्तानीचें प्रकरण विकोपास गेलें व चुलत्या (आप्पा) पुतण्यांनीं बाजीराव-मस्तानीची ताटातूट केली. बापलेकांचें पटत नसे. शेवटी बाजीराव उत्तरेस गेले व तिकडेच वारले (१७४० एप्रिल), तेव्हां नाना कुलाब्यास मानाजी आंग्रयाच्या मदतीस आप्पासह गेले होते. त्यांनी तेथें क्रिया वगैरे करून, पुण्यास येऊन आप्पासह साताऱ्यास गेले (जून); तेथें त्यानां १२ दिवसांनी पेशवाईचीं वस्त्रें मिळाली (२५ जून) नानानीं बाजीराव असतांनाच राघोबा दादाची मुंज व सदाशिवरावभाऊचें लग्न केलें होतें. त्यासाठी शाहूराजा स्वतः पुण्यास आला होता. थोडयाच दिवसांत चिमणाजीआप्पा वारला (डिसेंबर). यावेळीं नानासाहेबांचे वय १९ वर्षाचें असून कौटुंबिक व राज्यकारभार विषयक जबाबदारी सर्वस्वी त्यांच्यावर पडली. याच सुमारास शाहूच्या पश्चात कोल्हापूरकर संभाजीस सातारच्या गादीवर बसविण्याचा करार संभाजी व नानासाहेब यांच्यांत झाला होता. हें नानासाहेबांचें पहिलें कारस्थान होय. त्यांची ही कलपना राष्ट्राच्या फायद्याची होती. मात्र ती पुढें साधली नाहीं. नानांस पेशवाई न देतां ती बाबूजी नाइकास द्यावी अशी खटपट रघूजी भोंसल्यानें केली, कारण शाहूच्या पश्चात आपल्या मुलाला गादी मिळावी व त्यास नानासाहेबांचा अडथळा होईल, तर तो नसावा, असा त्याचा हेतु होता. बाबूजीचें (आप्तपणा असतांहि) नानांशीं वांकडें होतें. परंतु शाहूनें ते म्हणणें धुडकाऊन दिलें; शाहूची नानांवर अतिशय मर्जी होती, व बहुतेक दरबारहि त्यांनां अनुकूल होता. मागील दोन्ही पेशव्यांनीं सुरू केलेलें धोरण पुढें चालविणारा नानासारखा लायक माणूस त्यावेळीं दुसरा नव्हता. तरी पण काहीं वर्षे वृध्द सरदारांनां आटोक्यांत ठेवणें नानासाहेबांस कठिण गेले.

प्रथम पेशव्यांनीं बाजीरावास झालेलें कर्ज फेडण्याची व्यवस्था केली. त्यासाठी खंडणी वगैरे रोख घेण्याचा परिपाठ ठेवला. दक्षिणोत्तरेकडील द्रव्याचा ओघ थेट महाराष्ट्रांत सतत राहण्याचा उपक्रम त्यानीं केला, त्याबरोबर राज्याची सुव्यवस्थाहि लावली व शेवटीं हिंदुपदपातशाही स्थापण्यासाठीं प्रयतन केला आरंभी कांही वर्षे त्यासाठी पेशवे सारखे हिंडत होते; त्या कार्यात लग्न, जन्म, मृत्यु इत्यादि प्रसंगांची त्यानीं मुळींच पर्वा केली नाहीं काशी, प्रयाग, बंगाल, बहार वगैरे प्रांत मिळविण्यासाठीं तयानीं एव्हांपासून (१७४३) च प्रयत्न चालविला होता. सर्व सरदारांच्या उद्योगास मध्यवर्ती नियंत्रण लाविलें. या पेशव्यानीं २१ वर्षे कारभार केला. त्यांत शाहूच्या मृत्यूपर्यंतच्या काऴांत (१७४९) पेशवे केवळ छत्रपतींचे हस्तक होते, मात्र पुढील काळांत सर्वतोपरी राज्याचे मुखत्यार झाले. त्यांत पहिलीं तीन वर्षे (१७५०-५२) रामराजाची परीक्षा घेण्यांत गेली, परंतु तींत तो उतरला नाहीं म्हणून पुढील ९ वर्षे सर्व भार पेशव्यानीं आपल्यावर घेतला. शाहूच्या हयातीपर्यंत पेशव्यांनी सुरंजभेलसें (१७४०-४१), माळवा, प्रयाग, बंगाल(१७४०-४१), भेलसे (१७४४-४५), कर्नाटक पहिली लढाई (१७४६-४७), नेवाई (१७४७-४८) इतक्या स्वा-या केल्या व मृत्युसमयीं साता-यास मुक्काम केला. लढायानंतरचे व पूर्वीचे तह, डावपेंच वगैरे पेशवे स्वतः ठरवीत. नानासाहेब मुत्सद्दी, उत्तम संस्कृतज्ञ, कलामबहाद्दर, धोरणी व अत्यंत हिशेबी होते व ते कोठेंहि असले तरी सर्व ठिकाणचे व्यवहार स्वतः उलगडीत असत; श्रीरंगपट्टणास राहून दिल्लीचा, तर बुंदेलखंडांतून कर्नाटकचा कारभार ते करीत. बापाच्या वेळच्या अर्धवट कामांची तड लावण्यांत यांची पहिली ३/४ वर्षे गेली. उत्तरेकडील आपलें वर्चस्व हलूं नये म्हणून पेशव्यानीं तिकडे लागोपाठ तीन स्वा-या केल्या व शत्रुमित्रांवर छाप बसविली. त्यांचा मुक्काम ३/४ दिवसांवर कोठेंच होत नसे, इतकी त्यांची तडफ होती. स्वभावतः त्यांचा कल तडजोडीचा असे, परंतु प्रसंगी कडकपणाहि ते धरीत. बाबूजी नाईक, रामचंद्र बाबा शेणवी, महादो पुरंदरे, रघूजी भोंसले, दमाजी गायकवाड वगैरे बरेच लोक चुरशीनें अथवा घमेंडीने पेशव्यांशी विरोध करीत, परंतु त्यानीं सर्वानां ताब्यांत आणलें होतें. पेशव्यांचे विरोधी शाहूजवळ त्यांच्या चहाडया सांगत, शाहूच्या राज्यांत कलह चाले, या सर्व गोष्टींकडेहि पेशव्यानां लक्ष देऊन उपाय करावे लागत. त्यासाठी भाऊसाहेब व दादासाहेब यांनां साता-यास ठेवण्यांत आलें होतें.

उत्तरेकडे सुरंजभेलशाची स्वारी करण्याचें कारण, नादीरशहाच्या स्वारीमुळें व निजामाच्या विरूध्द कारस्थानामुळें दिल्लीदरबारांतील व उत्तरेकडील मराठयांचें वर्चस्व कमी होत होतें, तें पुन्हां प्रस्थापित करावयाचे हें होय. त्यामुळें निजामाशीं एदलाबादेस तडजोड करण्यांत आली. निजामाच्या मुलानें (नासिरजंग) बंड केल्यानें पेशव्यानीं त्याच्या विरूध्द निजामास (असफज्याह) मदत केली व निजामानें माळव्याच्या सुभेगिरीची नक्त नेमणूक पेशव्यांस बादशहाकडून देवविली. पेशव्यानीं धार, नेमाडचा कांहीं भाग, देवरी वगेरे प्रांत व ठाणी काबीज केलीं. नंतर सवाई जयसिंहाची भेट घेऊन व परस्परांस मदत करण्याचें ठरवून पेशवे पुण्यास परतले आणि बाजीरावाच्या वेळचें बरेचसें कर्ज त्यानीं फेडलें (जून १७४१). नंतर तीन महिने साता-यास राहून व शाहूची संमति घेऊन पेशव्यानीं दिल्लीवर जास्त शह बसविण्यासाठीं बुंदेलखंड, बागेलखंड या प्रांतांचा प्रथम बंदोबस्त केला व काशीप्रयाग ताब्यांत घेण्याचा उपक्रम केला. परंतु या वेळीं रघूजी भोंसले हा पेशव्यानां प्रतिस्पर्धी उत्पन्न होऊन त्यानें पूर्वेकडून त्यांच्या प्रयत्नास अडथळा आणण्याचें सुरू केलें. तो प्रत्यक्ष शाहूच्याहि आज्ञा धाब्यावर बसवी; मराठा-मंडळांत फूट पाडणा-या व्यक्तींपैकीं तो एक होता. परंतु त्याची एकंदर परिस्थिति मजबूत असल्यानें पेशव्यानां त्याचा एकदम बंदोबस्त करतां येईना. मात्र रघूजीनें आपण होऊनच पेशव्यांवर भडाले येथें स्वारी केली, तींत उलट त्याचाच मोड झाला; नंतर दोघांनीं आपापल्या प्रांतांच्या वाटण्या करून घेतल्या (आक्टोबर १७४२). पुढें शाहु अजारी असल्याचें ऐकून दोघेहि साताऱ्यास आले व त्यांची समजूत शाहूनें घालून दिली.

बुंदेले राजांनी छत्रसालानें बाजीरावास दिलेल्या प्रांताचा वसूल याच सुमारास (१७४२) अडवून धरून व मराठयांचा वसुली अधिकारी मल्हाराव कृष्ण यास ठार मारलें; त्यामुळें पेशव्यानीं नारो शंकर यास बुंदेल्यांवर पाठवून व त्यांस कैद करवून आपला अंमल बसवून झांशी सुभा स्वतंत्र तोडला. लष्करी जोर दाखविल्याशिवाय नुसत्या निजामाच्या व जयसिंगाच्या मध्यस्थीनें दिल्लीवाला बादशहा वळत नाहीसें पाहून पेशव्यानीं यावेळी बुंदेलखंड, मावळा, बंगाल वगैरे प्रांतांत सर्वत्र एकदम धुंद माजविली; तेव्हां बादशहानें पेशव्यांस माळव्याच्या सुभेदारीची सनद प्रत्यक्ष व सर्व बादशाही मुलुखावर चौथाई देण्याचें वचन दिलें (याची सनद मात्र पुढें १७५० सालीं मिळाली). माळव्याच्या सनदेंत पेशव्यानीं आपली एक छोटीशी तैनाती फौज बादशहाच्या पदरीं ठेवण्याचें कलम कबूल करून घेतलें आहे (१७४३ एप्रिल). सारांश या तीन वर्षांत पेशव्यानीं बादशहा, निजाम, राजपूत राजे वगैरे परकीय सत्ताधा-यांवर युक्तीनें शह बसविला व प्रतिनिधी, रघूजी, दमाजी वगैरे स्वकीय विरोधकांवर छाप बसविली; त्यामुळें नानासाहेबांशिवाय दुसरा लायक इसम मराठी राज्य चालविण्यास लायक नाहीं अशी शाहूचीहि खात्री झाली. यावेळी नानासाहेब लिहितात, ''एकदां उत्तरेकडील सुवर्णनदी व दक्षिणेची नदी दोहींचा संगम सागरकूपसमान, पुणें या स्थळी, मध्यें न जिरतां, परयुक्त योग घडणें, तेव्हां श्रमसार्थक.'' यापुढें भेलशावरील स्वारी श्रीमंतानी केली, तींत भोपाळचे अर्धे संस्थान व माळव्याच्या पलीकडील बराचसा प्रांत काबीज करून त्यांची व्यवस्था लाविली आणि परत साता-यास आले (आगष्ट १७४५). यापुढील दोन वर्षांत साता-यास भानगडी निघाल्यानें पेशवे दूरच्या स्वारीवर गेले नाहींत; मात्र शिंदेहोळकरादि सरदारांकडून ठिकठिकाणची कामे पार पाडून घेत असत. या सुमारास सवाई जयसिंग मरून त्याच्या दोन मुलांत गादीबद्दल तंटा लागला, तेव्हां पेशव्यांनीं जिकडून जास्त पैका मिळेल तिकडे मदत करण्याचें धोरण ठेविलें, त्यामुळें पूर्वीसारखें मराठे-रजपुतांत प्रेम राहिलें नाहीं,तसेंच इकडे मराठयांतहि शिंदेहोळकरांत फूट पडली; ही भानगड मिटविण्यास नानासाहेबांनीं उत्तरेकडील शेवटची नेवाईची स्वारी केली; मात्र शिंदे-होळकरांची फूट त्यांनां जोडतां आली नाहीं. उत्तरेकडील हा कारभार होण्यापूर्वी बाबूजी नाईक हा कर्नाटकच्या सुभेदारीवरून अपेशी ठरून आल्यानें व तो, रघूजी भोंसले, शाहूची धोरली राणी, मुतालिक, दाभाडे, गायकवाड वगैरे मंडळी नानासाहेबांच्या विरूध्द मसलती करीत असल्यानें, पेशव्यानीं त्या मसलती वारून नाइकाची समजूत पाडून व कर्नाटकावर सदाशिवराव भाऊ पाठवून तिकडील सर्व बंदोबस्त केला व पोर्तुगीजांनीं वसई ते गोवें या दरम्यान ज्या किरकोळ घालमेली केल्या त्याचाहि बंदोबस्त केला (१७४७). याच सालच्या पहिल्या दोन तीन महिन्यांत वर सांगितलेल्या विरूध्द पक्षाच्या कारवाईनें व स्वतःच्या कर्जाच्या चिंतेनें शाहूनें नानासाहेबांस पेशवाईपदावरून दूर केलें होतें, परंतु विरूध्द पक्षांतील त्यांच्याइतका कर्तबगारीचा एकहि माणूस पुढें न आल्यानें पुन्हां नानासाहेबानां पेशवाईचीं वस्त्रें दिली (एप्रिल १७४७). याच सुमारास भाऊसाहेब कर्नाटकच्या स्वारींतून परत आला. नंतर नेवाईची व आसुंबरीची या लढाया होऊन पेशवे पुण्यास आले (१७४८), थोडयाच दिवसांनीं शाहूची प्रकृति बिघडल्यानें मोठी फौज घेऊन ते साता-यास गेले (आगष्ट १७४९) व शाहूचा अंत होऊन रामराजास गादीवर बसवून मग परत पुण्यास आले (एप्रिल १७५०). मध्यंतरी (१७४५-४८) पर्वतीचें मंदिर, तुलदान, थेऊरास कल्पलतादान वगैरे धार्मिक प्रसंग व प्रकार चालू होते. शाहूनें स. १७४७ च्या एप्रिलांत नानासाहेबांवरच राज्याचा सर्व भार टाकला; त्यानंतरच्या अडीच वर्षात पुढील राज्यकारभारासंबंधी नाना प्रकारचीं कारस्थानें घडून आली. अनेक प्रकारचे बेत झाले आणि शेवटी रामराजास गादीवर बसवून नानासाहेबानीं स्वतःच्या अखत्यारीनें राज्य चालवावें असा स्वदस्तुरचा दस्तैवज पेशव्यांस करून देऊन नंतर शाहुराजानें आपला देह ठेविला (१५ डिसेंबर १७४९). शाहूनें नानासाहेबांस लिहिलेल्या २ याद्या म्हणजे मराठी साम्राज्याच्या सूत्रचालकत्वाच्या सनदाच होत. यावरून पेशव्यानीं भोंसल्याचें राज्य बळकाविलें हा आक्षेप अगदीं खोटा ठरतो. राजाराम कर्तृत्ववान निघाला नाहीं याचा दोष नानासाहेबांवर कसा येतो? शिवाय रामराजा पुढें नालायक निघेल म्हणून अगदीं पेशव्यानीं त्याला मुद्दाम राजा केलें हेंहि म्हणजे चूक आहे, कारण तो कर्तृत्ववान निघेल अशीच उलट पेशव्याची भावना होती.

रामराजाच्या राज्यरोहणापासून (जानेवारी १७५०) पानपतापर्यंत (जानेवारी १७६१) अकरा वर्षांत मराठी राज्याचें चालकत्व या पेशव्यांकडे होतें. शिवाजीच्या ध्येयाला अनुसरून ब्राह्मण व मराठे सरदारांनी याच मुदतींत निकराचा उद्योग केला. तंजावर ते दिल्ली व अटक ते कलकत्तापावेतो सर्व हिंदुस्थानाला मराठयांनीं याच काळांत आटोप घातला. नानासाहेबांनीं प्रथम दोनतीन वर्षात आपल्या विरोधीपक्षाचा बंदोबस्त करून, नंतर राज्यकारभाराचें मुख्य ठिकाण पुण्यास केलें. नंतर निजामाची खोड जिरविली. निजामास नाहींसा करून दक्षिण मोकळी करावी हा पेशव्यांचा फार दिवसांचा संकल्प त्यानीं उद्गीरच्या लढाईत बहुतेक तडीस नेला. दुसरी कामगिरी कर्नाटक काबीज करण्याची. बाजीरावानें उत्तर मोकळी करण्याचा प्रयत्न केला, तर नानानें दक्षिणेचा प्रयत्न केला, परंतु पानपतामुळें त्यास विघ्न आलें. उत्तरेचा सर्व भरंवसा शिंदोहोळकरांवर होता. एकदां जरी स्वतः नानासाहेब तिकडे जाते तर एकंदर व्यवस्था चांगली लागती, परंतु अखेरपर्यंत तसें झालें नाहीं. शाहूच्या मृत्यूच्या नंतर थोडयाच दिवसांत ताराबाई पेशव्यांवर रूसून सिंहगडास गेली व खटपटी करूं लागली, परंतु पेशव्यानीं तिची समजूत काढली व सिंहगड सचिवाकडून स्वतःकडे घेतला (जुलै १७५०) आणि रघूजी प्रतिनिधी वगैरे सरदारांची व त्यांच्या प्रांतांची स्वतंत्र व्यवस्था करून दिली. प्रतिनिधीनें सांगोल्यास पेशव्यांविरूध्द लढाई दिली होती पण तींत त्याचाच पराभव झाला (आक्टोबर). सांगोल्यास सदाशिवराव भाऊनें रामराजापासून राज्यव्यवस्थेची जी योजना करून घेतली, तीमुळें नानासाहेबांच्या मनांत भाऊबद्दल विकल्प आला व त्यास रामचंद्र बाबानें भर दिली परंतु नानासाहेबांनीं पडतें घेऊन व भाऊस कारभारी घेऊन हें घरभांडण मिटविलें. तिकडे ताराबाईनें स्वतःच्या हातीं राज्यकारभार येण्यासाठी रामराजास गफलतीनें कैद केलें (नोव्हेंबर); त्यानंतर १३ वर्षांनीं (१७६३) त्याचे पाय पुन्हां सिंहासनास लागले. ताराबाईनें पेशव्यांविरूध्द मोठें कारस्थान उभारलें व प्रतिनिधी, नाईक वगैरेकडून राज्यांत बखेडा माजविला. दमाजी गायकवाडानें तर पुण्यापर्यंत चालून येऊन (पुणें सोडून) साता-यास कूच केलें. तेथें मात्र नाना पुरंद-यानें त्याचा पराभव केला. पुढें पेशव्यानीं त्याला कैदेंत ठेवून त्याच्याकडून निम्मी गुजराथ आपल्या नावाची करून व त्यानें आपल्या हाताखालीं वागण्याचें कबूल केल्यावर त्याला सोडलें (१७५२). दमाजी व दाभाडे मुख्य सरकारचा हुकूम धाब्यावर बसवून गुजराथेंत वाटेल तसा कारभार करते तर मराठेशाहीचे तुकडे पडते म्हणून पेशव्यानां हा उद्योग करावा लागला. याच वेळीं थोडें आधी पेशवे निजामावर चालून गेले होते (१७५१). निजामाकडून परत आल्यावर पेशव्यानीं प्रथम वरीलप्रमाणें गायकवाडाचा निकाल लावल्यावर रामराजाची सुटका करण्याचे प्रयत्न केले, परंतु ताराबाईंच्या मृत्यूपर्यंत त्याची सुटका झाली नाहीं. मात्र त्यानें पेशव्यांस, आपणांस सरंजाम नेमून द्यावा व तुम्ही वाटेल तसा राज्यकारभार करावा असे लिहून दिलें. या सुमारास नानासाहेबानीं ताराबाईस व रामराजास स्वच्छ कळविलें कीं, तुम्ही कोणीहि अखत्यारीचा कारभार करावा, ज्या कारभारामुळें बहुतांचा दावा पदरी पडतो तो आम्हांस नको. सारांश, आपमतलबानें पेशव्यानीं सर्वाधिकार हातीं घेतले नाहींत, तर दुसरा कोणीं पुढें आला नाहीं म्हणून घेतलें होते.

यानंतर ताराबाईनें पेशव्यांशीं समेट करून घेतला, त्यावेळच्या पत्रव्यवहारावरून नानासाहेबांचा बाईंविषयींचा आदर स्पष्ट दिसून येतो (१७५१ अखेर). समेट झाला तरी ताराबाई, पेशव्यांविरूध्द खटपटी करीतच होती. पेशव्यांनीं ताराबाईच्या सल्ल्यानें संभाजी कोल्हापूरकरास सातारच्या गादीवर बसविण्याची खटपट चालविली पण ताराबाईच्या हाताखाली नांदण्याचे संभाजीनें नाकारलें. पुढें संभाजी वारल्यावर, व त्याच्या उलाढाल्या बायकोच्या (जिजाबाई) हातीं कारभार ठेवल्यास ताराबाईसारखा राज्यांत घोटाळा होईल म्हणून पेशव्यांनीं तिला दत्तक देण्याचा विचार केला (डिसेंबर १५६०). यावेळी पेशवे पानपतची बाजू सांवरण्यास उत्तरेस जात होते. परंतु पुढें पेशव्यांच्या मृत्यूनें तें प्रकरण शेवटास गेलें नाही. याहि कामांतील पेशव्यांनां कोल्हापूरचें राज्य गिळंकृत करावयाचें होतें हा आक्षेप खोटा आहे; बायकी कारभार नसावा हाच त्यांचा उद्देश होता. ताराबाईच्या समेटानंतर पेशव्यांनीं अहमदाबाद, बहुतेक सर्व गुजराथ व काठेवाड काबीज करून त्यांपैकी बराचसा प्रांत दमाजी गायकवाडानें स्वरींत नोकरी बजावल्यामुळें त्याच्याकडे लावून दिला (१७५३-५७). मात्र ताराबाईच्या व या दमाजीच्या (१७५१ मधील) दंग्यामुळें, नासिरजंगाच्या नंतर निजामाच्या गृहकलहांत निजामशाही बुडविण्याची व बुसीचा जम बसूं न देण्याची संधि नानासाहेबानां फुकट घालवावी लागली व शिंदेहोळकरांस उत्तरेकडे वेळेवर मदत पाठवितां न आल्यानें पर्यायानें पानपतचा धक्का बसला. निजामाची व पेशव्यांची चुरस होऊन निजामानें बुसीच्या उठावणीवरून पेशव्यांच्या मुलुखावर थेट तळेगांवापर्यंत धुमाकुळ उडविल्यानें, पुणें पळालें. परंतु पेशव्यांनीं त्याचा कुकडीवर (घोड नदी येथें) पराभव केला (१७५१). याच वेळीं गाजीउद्दिनास मदत करून त्याच्या मोबदल्यांत तापी-गोदा- दुआब पेशव्यांनीं मिळविला, परंतु त्याच वेळीं गाजीचा खून झाल्यानें सर्व निजामशाही स्वतःच्या आटोक्यांत आणण्याची पेशव्यांची संधि फुकट गेली (१७५२ आक्टो.) तरीपण सलबतजंगाकडून वरील दुआब आपल्याकडे लिहून घेतला; या तहास भालकीचा तह म्हणतात. याच प्रसंगी नानासाहेबानीं ''आम्ही गनीम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहों'' असे बाणेदार उद्गार काढले आहेत. पुढें ४/५ वर्षे निजामाचा व पेशव्यांचा सलोखा होता. डुप्ले जोंपर्यंत पांडिचेरीस मुख्य फ्रेंच अधिकारी होता, तोपर्यंत बुसीचें वजन निजामशाहींत फार होतें, तें ओळखून पेशव्यांनीं आपलाहि हात पुढें सरकावला आणि डुप्लेच्या जागीं जर गोदेहू न येतां, बुसीला निजामाचा दरबार सोडावा न लागता तर फ्रेंचांनीं व मराठयांनीं सर्व निजामशाही खाऊन टाकली असती. सावनूरच्या लढाईंत निजामानें पेशव्यांस मदत केली होती, पण पुढें त्याचें त्यांच्याशीं फाटत चाललें. पेशव्यानीं शिवनेरी काबीज केली (१७५७ मे) हा किल्ला पुष्कळ वर्षे मोंगलांच्या ताब्यांत होता व तो मिळविण्याची खटपट बाळाजी विश्वनाथापासून चालली होती. तसेंच पुढें दौलताबाद व नगरचा किल्लाहि पेशव्यांनीं घेतला (१७५९ नोव्हेंबर) त्यामुळेंच उदगीरची लढाई झाली. तत्पूर्वी निजामानें पेशव्यांस कबूल केलेली २५ लक्षांची जहागीर न दिल्यानें सिंदखेडास उभयतांत लढाई झाली (१७५७ आगष्ट-१७५८ जाने). या लढाईत १६ वर्षाचे विश्वासराव मुख्य होते व त्यांनां सांभाळण्यास दत्ताजी शिंदे होता; आणि मागून खुद्द नानासाहेब व भाऊ हे पाठपुरावा करीत होते. दक्षिण मोकळी करणें हें एक धोरण नानासाहेबांचें होतें, त्यामुळेंच ही लढाई मुख्यत्वें झाली, जहागीर हें एक निमित्त होतें. लढाईत निजामाचा पराभव होऊन २५ लक्षांची जहागीर व नळदुर्ग मराठयांस मिळाला. पुढें निजामअल्ली व सलाबतजंग या भावांच्या भांडाभांडींत निजामअल्लीचा सरदार इब्राहिमखान गारदी यास बडतर्फी मिळली. त्याचा पराक्रम सिंदखेडच्या लढाईत पेशव्यानीं पाहिल्यामुळें त्यास त्यानीं आपल्या पदरी ठेविलें (१७५९) बुसी देशी गेल्यावर व इंग्रजांचा जम कर्नाटकांत बसूं लागलेला पाहून निजामानें इंग्रजांशीं सख्य जोडलें, हें पेशव्यांस खपलें नाही; निजाम हा आपल्या हातांतील बाहुलें बनावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळें त्याला कायमचा गाडण्यास पेशव्यानीं १७५९ त प्रारंभ केला याचवेळी नगर-दौलताबाद किल्ले त्यांनी मसलतीनें मिळविले. कबूल केलेली दहा लाखांची जहागीर व नगरपरांडा किल्ले देत नाही म्हणून निजामावर ही स्वारी आहे असें प्रसिध्द केलें. निजामाची लढाईची तयारी चांगली नव्हती; उलट पेशव्यांची उत्कृष्ट होती; शिवाय इब्राहिमखानाची पलटणें नुक्तींच पदरी ठेवलीं हातीं. दादा, भाऊ व विश्वासराव या तिघांनी या लढाईत भाग घेऊन निजामाचा पराभव करून साठ लक्षांचा प्रांत व अशीरगड वगैरे किल्ले घेतले आणि निजामास बहुतेक संपुष्टांत आणलें (जाने.-मार्च १७६०).

याच्या पूर्वीच नानासाहेबानीं कर्नाटकांत आपला दाब बसविला होता; वास्तविक त्यानीं उत्तरेपेक्षां दक्षिणेकडेच जास्त लक्ष घातलें होतें. त्यामुळें कांही लेखक त्यानां दोषहि देताता. परंतु कर्नाटकांत इंग्रज व फ्रेंच या परकीयांचा वाजवीपेक्षां जास्त सुळसुळाट झाल्यानें पेशव्यांनीं तिकडे विशेष लक्ष घातलें असण्याचा संभव असावा. भालकीच्या तहानंतर पेशवे हे धारवाड, रायचूर,श्रीरंगपट्टण इकडे गेले व खंडण्या वसूल करून परत फिरले (१७५३ जून). यानंतर पेशव्यानीं बहुतेक दरवर्षी स्वा-या केल्या. दुसरी स्वारी बागलकोट ते हरिहर (१७५४ जून), तिसरी वेदनूरची (१७५५ एप्रिल), चवथी सावनूरची (१७५६ जुलै), पांचवी श्रीरंगपट्टणची (१७५७ जून), सहावी मेहेंदळयाची (१७५८), सातवी पटवर्धन- रास्त्यांची (१७५९) व आठवी पटवर्धन-बिनी-वाल्यांची (१७६०). पहिल्या ५ स्वा-यांत स्वतःनानासाहेब हजर होते. शेवटच्या स्वारींत पानपत झाल्यानें ती अर्धवट झाली. बहुतेक स्वा-यांत नवीन प्रांत हस्तगत करणें व मांडलिकांपासून खंडणी वसूल करणें ही कामें होत. या स्वा-यांत मुबलक पैसा मिळाल्यानें पेशवाईची सांपत्तिक स्थिति सुधारली, लष्कर लढण्यास तयार झालें, नवीन तोफखाना निर्माण झाला व हुरूपी माणसें पुढें आली. सावनूरचा नबाब मध्येंच खडयासारखा असल्यानें पेशव्यानीं प्रथम त्यास आपला मांडलिक बनविलें (१७५६) व मराठी राज्याची हद्द कृष्णेपासून तुंगभद्रेपर्येत पुढें सरकली. श्रीरंगपट्टणच्या स. १७५७ च्या लढाईत पेशव्यानीं ३६ लाख खंडणी घेतली होती (कांही रकमेबद्दल १४ परगणे लावून घेतले). मेहेंदळयानें कर्नाटकांतील पांच (अर्काट, शिरें, कडपें, कर्नूळ व सावनूर) नबाबांपैकी (शिरेकर व सावनूरकरांस पेशव्यानीं मागेंच मांडलिक बनविलें) कडण्याच्या नबाबावर स्वारी करून त्याला लढाईत मारून त्याचें अर्धे राज्य घेतलें. त्यानें इंग्रज, चित्रदुर्गकर, मुरारराव घोरपडे वगैरेंनां मदतीस बोलाविलें व त्यानीहि कबूल केले, पण आयत्यावेळी कोणी गेले नाहींत. शहाजीच्या जहागिरींतील (मूळच्या शिवाजीच्या स्वराज्यांतील) बराचसा प्रांत कडप्याच्या जहागिरींत होता, तो या वेळीं सोडविला गेला. अर्काटकराची खंडणी माफ करण्याची इंग्रजांनीं फार मध्यस्थी केली पण मेहेंदळयानें ती धुडकावून दिली. पुढें सिंदखेडची मोहीम निघाल्यानें इकडे म्हैसूरकर, नंदराज व हैदरअल्ली पुढें आले, नाहीं तर हैदराला मूळांतच उखडून टाकतां आलें असतें. त्याचा फायदा घेऊन हैदरानें मराठयांनां दिलेल्या १४ परगण्यांत धुमाकूळ घातला; त्याचा निकाल पटवर्धन-रास्त्यांनीं लावून ३२ लाख खंडणी घेतली. यावेळी हैदर नसता नर श्रीरंगपट्टण संस्थान पेशव्यांचें मांडलिक बनतें. पण हैदरानें दक्षिणेकडे व अब्दालीनें उत्तरेकडे मराठयांच्या आड येऊन इंग्रजांनां पुढें येण्यास संधि दिली.

आंग्रे-प्रकरणांत (१७५५-५६) इंग्रजांस घरांत घेण्याची पेशव्यांची अक्षम्य चुकी झाली; मानाजी व तुळाजी या भावांच्या तंटयांत आंग्रे घराणेंहि हतबल झालें; पेशव्यानीं तंटे तोडण्याऐवजी त्यास भर दिली. इंग्रजांच्या छातीवर आंग्रे हें जबरदस्त दडपण होतें, तें नाहीसें करण्यास इंग्रज फार उत्सुक होतें व ती संधि आपण होऊन पेशव्यानीं दिली आणि इंग्रजांनीं पेशव्यांस बाहुल्याप्रमाणें खेळवून आपला फार दिवसांचा हेतु तडीस नेला (१७५५-५६). याप्रमाणें आंग्र्याचें आरमार साफ नाहीसें झालें व मराठी राज्याचा पश्चिमकिनारा मोकऴा होऊन इंग्रज निर्भय बनले. एकंदरींत पेशव्यांचें आंग्रयांशीं वर्तन दगाबाजीचें होतें तुळाजी दुर्वतनी होता व तो पेशव्यानां मानीत नसे हें खरें पण त्याचा बंदोबस्त निराळया प्रकारें करतां आला असता. इंग्रजांनी आग्रयांचा दिवाण रामजीपंतास फितुर करून त्याच्या करवीं पेशव्यानां आपल्याकडे वळवून घेतलें असें फारेस्टच्या निवडक लेखांवरून स्पष्ट दिसतें. परंतु पेशवे त्यास बळी पडले हें खरें. इंग्रजांनीं तुळाजीच्या या मोहिमेत विजयदुर्ग आपणच परभारें ताब्यांत घेतला. डफनेंहि इंग्रजांचे या वेळचें वर्तन निर्दोषी व निःस्वार्थी नव्हतें असे स्पष्ट म्हटलें आहे. विजयदुर्ग आपल्याकडे ठेवण्यासाठी इंग्रजांनी रामजीपंताच्या कारकुनास लांच दिला. कसेंहि असो, शिवाजीनें दूर दृष्टीनें जे आरमार स्थापन केले ते नानासाहेबांनी कोत्या दृष्टीने बुडविलें एवढें खरें. विजयदुर्गानंतर यशवंतगड, सिंधुदुर्ग (शिवाजीची शिवलंका) हे किल्ले थोडयाच दिवसांत इंग्रजांनीं घेतले (१७६५) आणि त्यानंतर बहुतेक पश्चिम किनाराच त्यांनी घेतला. विजयदुर्गप्रकरणानें मात्र पेशव्यांच्या डोक्यांत इंग्रजांबद्दल लख्ख प्रकाश पडला; हबशी व निजाम हे दोन काटे मराठयांच्या राज्यांत ठेवण्याचा इंग्रजांचा प्रयत्न आतां त्यानां समजला. हबशानें त्रास दिल्यानें पेशव्यानीं त्याच्यावर स्वारी केली, तींत इंग्रजांनीं उघडपणें हबशांस मदत केली (१७५७-६०); तरीहि उंदेरी मराठयांनीं घेतली; परंतु पुढें पानपत झाल्यानें इकडील ही मोहीम अर्धवटच राहिली.

या सुमारास (१७५८-५९) पेशव्यांची सत्ता कळसास पोहोंचून ते आतां हिंदुस्थानांत सार्वभौमसत्ता स्थापणार असें दिसतांच त्यांच्याशीं गोडी राखण्याकरितां इंग्रजांनी आपला वकील पुण्यास पाठविला होता. रघूजी भोंसले वारल्यावर त्याच्या सरदारीचा तंटा नानासाहेबानीं तोडला (१७५७).

उदगीरच्या लढाईनंतर लागलीच पानपत झालें; पानपतच्या युध्दची ठळक कारणें व युध्द याची माहिती ''पानिपतचें युध्द'' या नांवाखाली दिली आहे (ज्ञा. को. वि. १७ पहा). भाऊसाहेब पानपतकडे गेल्यानंतर दसरा झाल्यावर नानासाहेब निजामावर नजर ठेवण्यासाठी नगरच्या बाजूस आले (डिसेंबर १७६०). भाऊसाहेबांचे शेवटचें पत्र (१४ नोव्हेंबरचे) पेशव्यांस मिळालें. त्यानंतर कांही बातमी न समजल्यानें त्यानां काळजी लागली. एका पत्रांत विश्वासरावानें ४० हजार फौज व १ कोटी रू. पैका ताबडतोब मागितला, तेव्हां महादोबा पुरंद-यानें पेशव्यानां ताबडतोब निघण्यास सांगितलें. या सुमारास श्रीमंतानीं पैठणच्या वाखरे या देशस्थ सावकाराच्या मुलींशी लग्न लाविलें (डिसें.), आणि तात्काळ उत्तरेकडे निघाले बरोबर भोंसले, बारामतीकर, पटवर्धन, मुतालिक, वगैरे मंडळी होती. निजामास बोलवण्यास राघोबादादा गेले. भेलशापर्यंत स्वारी आली; तेथें ती सावकारी चिठी (दोन मोती गलत...रूपयोकों गणत नहीं) मिळाली (२४ जाने. १७६१) व पुढे जास्त जास्त हकीकत समजत गेली; त्यामुळें श्रीमंतांचा धीर खचला. शेवटीं मल्हारजी होळकर भेटला व खरें वर्तमान समजलें; तरीहि श्रीमंतानीं दिल्लीकडे व झाशींकडे बंदोबस्त करविला. त्यांचा हेतु गिलचांचा सूड उगवावा, व जर नानासाहेब पुढें जाते, तर अब्दालीचा पराभव झाला असता. परंतु मल्हारजी नारोशंकर वगैरे पळपुटया सरदारांनी व गोपिकाबाईंनी आग्रह केल्यावरून श्रीमंत परत फिरले (२२ मार्च). त्यानीं भाऊंचा फार ध्यास घेतल्यानें मधून मधून त्यानां भ्रमाचे झटके येऊं लागले. जूनच्या आरंभी स्वारी पुण्यास आली. ज्यांनी (होळकर, पवार, वगैरे) युध्दांत कुचराई केली, त्याचें महाल श्रीमंतानी जप्त करून त्यांस ठपकाहि दिला. श्रीमंतांची प्रकृति दिवसेंदिवस क्षीण झाली, पुत्रशोक व बंधुशोक जबर झाला. हवाफेरासाठीं स्वारी पर्वतीस गेली (१८ जून), परंतु उतार न पडतां २३ तारखेस दीड प्रहर रात्री श्रीमंताचें देहावसान झालें; लकडीपुलाजवळ सार्थक केलें व तेथें वृंदावन बांधलें.

नानासाहेब मुत्सद्दी, सर्वाचें मनोधारण करणारे, सर्व जातींतील उमेदवार माणसास योग्यतेस चढविणारे, माणसाचे पारखी, जबर कार्यकर्ते, सर्व हिंदुस्थानांत मराठयांचा दरारा बसविणारे होते. एकंदर सर्व पेशव्यांत नानासाहेब पहिल्या दर्जाचे ठरतील. आंग्रयांचे उदाहरण सोडल्यास, त्यांच्या हातून राष्ट्राचें नुकसान असें झालें नाही. त्यांच्या, कारकीर्दीत सर्वत्र सुखशांति असून अजूनहि प्रजा त्यानां धन्यवाद देत आहे असें डफ म्हणतो. व्यापार, धंदे वगैरे धनोत्पादनाच्या मार्गाकडे व शास्त्रीय शिक्षणाच्या बाबींकडे मात्र पेशव्यांचें लक्ष नव्हतें. शाहूवर पेशव्यांची इतकी निष्ठा होती कीं त्यांच्या पादुकावर पर्वतीस देवदेवेश्वराची स्थापना त्यानीं केली; तसेंच पर्वतीचें तळें बांधलें व पुणें शहरच्या नवीन पेठा वगैरे वसवून वस्ती वाढविली. सारांश, पेशवाईचा माध्यान्हकाळ म्हणजे नानासाहेबांची कारकीर्द होय. (पेशव्यांची बखर; शाहु, राजाराम, भारतवर्षातील चिटणिशी, नागपूरकर, भोंसले, प्रतिनिधी, दाभाडे, भाऊसाहेब, पानिपत, हरिवंश यांच्या बखरी; नानासाहेब व शाहु यांच्या रोजनिशा; राजवाडे खंड १, २. ३, ६, ८; का. इ.सं. पत्रेंयादीः डफ; ऐ.ले सं. भा. १; पेशवेदफ्तरांतील माहिती; इति. संग्र. ऐति. टिप. भा १; आंगरे यांची हकीकत)

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .