विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिजनी जमीनदारी - आसाम, गोलपाडा जिल्हा. क्षेत्रफळ ६५० चौरस मैल. या घराण्याचा मूळपुरूष कोचचा राजा नरनारायण हा होय. यानें १५३४-८४ पर्यंत राज्य केलें. याच्या मरणानंतर याच्या राज्याचे २ भाग झाले. मुसुलमानी अमदानींत याचा पणतू विजितनारायण हा मनास व संकोशमधील मुलुखाचा जमीनदार झाला व त्याला २०० रूपये खंडणी मोंगल बादशहास द्यावी लागे. सध्यां १९००० रूपये सारा या जमीनीवर बसला आहे. उत्पन्न २ लाख रूपये. भूतानच्या युध्दानंतर भूतानच्या पूर्वदुबार घाटाच्या प्रदेशापैकीं १ लक्ष ३० हजार एकर जमिनीच्या सा-यापैकी शेंकडा ६॥ टक्के येथील जमीनदारास मिळतात.